Skip to main content

शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 19/10/2015 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, नुक्ताच वयाच्या पासष्ठाव्या वर्षात प्रवेश करता झालो. खूप पूर्वी होतो, तसा पुन्हा आता मी एकदम फिट आणि उत्साही झालेलो आहे. गेली पंधरा-वीस वर्षे मात्र मी असा नव्हतो. यासाठी मी कोणताही औषधोपचार वा खास व्यायाम केलेला नाही. फक्त आहारात बदल केल्याने हे सर्व कसे घडून आले, हे मी या लेखात सांगतो आहे. १. आरोग्यातून अनारोग्याकडे वाटचाल : पंचविशी - तिशीत सडपातळ आणि उत्साह- ऊर्जेने भरलेला मी पुढे चाळीशी-पन्नाशीत हळूहळू स्थूल, आळशी, निरुत्साही कसा होत गेलो, हे कळलेही नाही. अपचन, सुटलेले पोट, वाढलेले वजन, प्रमाणाबाहेर कोलेस्टरोल, यातून आता आपली सुटका नाही या विचाराने आणखीनच नैराश्य येऊ लागले. 'क्रॉनिक फटिग सिंड्रोम' ची लक्षणे माझ्यात दिसत होती, आणि वर्षानुवर्षे 'फिस्टुला' च्या वेदना मी भोगत होतो. फिस्टुलावर शस्त्रक्रिया हाच उपाय असल्याचे सर्जनने सांगितले, परंतु जालावर हुडकता शस्त्रक्रिया करून सुद्धा पुन्हा फिस्टुला उद्भवतो असे समजले. अ‍ॅलोपाथीची औषधे घेणे मला कधीच भावत नसल्याने आता करावे तरी काय, हेच कळेनासे झाले. पूर्वी नियमित व्यायाम करायचो, तोही आळस आणि निरुत्साहामुळे बंद झाला. गोड, तळकट खाणे सोडवले जात नव्हते. अतिशय निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली होती. रेक्झीन च्या खुर्चीवर बसल्याने, सिंथेटिक कापडाची विजार घातल्याने, कॉफी प्यायल्याने लगेच फ़िस्टुला होतो हे लक्षात आल्यावर कॉफी पूर्ण बंद केली, सुती पटलूण घालू लागलो, आणि सिनेमाला जातानासुद्धा बुडाखाली ठेवायला सुती बस्कुर नेऊ लागलो. या उपायांनी फिस्टुला होण्याचे प्रमाण जरा कमी झाले खरे, परंतु पुढे मूळव्याधीने पण मला ग्रासले. --- आता मात्र माझी पाचावर धारण बसली. जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे "मै अपनी जिंदगीसे तंग आ चुका था… मेरी बीवी मुझसे नफरत करने लगे थी " --- असे झालेले होते, पण ... " फिर एक दिन मुझे पिंटो मिला, उसने मुझे xxxxx के बारे मे बताया" ... असे मात्र काही घडून येत नव्हते. २. आशेचा किरण : अश्या परिस्थितीत २०१४ च्या जुलै महिन्यात अमेरिकेत येऊन पहुचलो. मुलाचे घर पहिल्या मजल्यावर होते, तो एक जिना चढायलाही मला जड जात होते. आलो, त्याच दिवशी मुलाने ' Fat, Sick and Nearly Dead' हा सिनेमा दाखवला आणि त्यात दाखवल्याप्रमाणे आपण सर्वजण एक आठवडा फक्त भाज्या-फ़ळांचा रस घेऊन राहूया, असा प्रस्ताव मांडला. मला आणि पत्नीला ही कल्पना अशक्य कोटीतील वाटली. नुसत्या रसाने पोट कसे भरणार ? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटे, दूध-तूप वगैरेंशिवाय शक्ती कशी राहणार ? एक दिवस सुद्धा जेवणात पोळी नसेल तर आपण त्रस्त होतो, सात दिवस कसे काढणार ? वगैरे शंका होत्या, पण मुलगा एवढे म्हणतो आहे तर करून बघू, झाला तर फायदाच होईल, अगदी रहावले गेले नाही तर खाऊया काहीतरी, असा विचार करून आम्ही संमती दिली. ३. रस-आहारावर वीस दिवस आणि 'काळ-सर्प वियोग' मग लगेचच बाजारात जाऊन ज्यूसर खरेदी केला आणि काकडी, हिरवी सिमला मिर्च, दुधी भोपळा, पालक, पोदिना, सेलरी, केल वगैरे हिरव्या भाज्या, हिरवी (ग्रॅनी स्मिथ) सफ़रचंदे, पिवळी-लाल सिमला मिर्च, गाजरे, संत्री, टमाटर, ग्रेपफ़्रूट, बीटरूट, लाल सफ़रचंदे, अननस, कलिंगड, वगैरे लाल-पिवळ्या भाज्या आणि फळे, आले, ओली हळद, लिंबू असे सर्व सामान नीट धुवून फ्रिज मध्ये ठेऊन सज्ज झालो. . दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले. ... रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो. . रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते. . पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले... ... सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला. अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले. ४. यानंतरचा काळ : भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो. . ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले. ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला. कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत. http://www.rebootwithjoe.com Fat Sick and Nearly Dead: https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8

वाचने 275694
प्रतिक्रिया 317

प्रतिक्रिया

In reply to by स्वप्नांची राणी

स्वप्नांची राणी, तुम्ही दिलेली माहिती चांगली आहे! तुम्ही ५३ म्हणजे ५३ वर आहात म्हणजे खरोखरच तुम्हाला स्वत:ला ओवाळून घ्यायचा हक्क आहे. या वयात हे नक्की कौतुकास्पद! सलाम तुम्हाला!

In reply to by स्टुपिड

बापरे म्हणजे या त्रेपन्नाव्या वर्षी त्रेपन्न किलो __/\__ त्याप्रमाणे मी पस्तीस किलो हवा. फारच जाड आहे मग मी :(

In reply to by स्वप्नांची राणी

लेख चांगला आहे आणि लेखाबद्दल अतीव आदर आहे. परंतु जे दुसर्याला लाभले तेच आपल्याला पण लाभेल असे काही नाही हे कळत नाही बहुदा. हुश्श कोणीतरी वेगळा मुद्दा पण मांडला त्याबद्दल खरे साहेबांचे आणि तुमचे अभिनंदन. मला काही हे पटत नव्हते. १० दिवस प्रयोग म्हणून ठीक आहे. शिवाय अमेरिका आणि युरोप सारख्या ठिकाणी चालायला, पाळायला, सायकल चालवायला निर्धोक असे रस्ते असतात आणि कोणीही तुम्हाला हिडीस फिडीस करत नाही किंवा तुमच्या अंगावर गाड्या घालायला येत नाही. हा खूप मोठा फरक आहे. पण मुदलात जितके पोटाला पुरेल तितकेच खाल्ले तरी अपोआप वजन आहे तितके राहते. कमी झाले नाही तरी वाढत नाही असा स्वानुभव आहे. थोडक्यात तोंडावर कंट्रोल आणि शारीरिक व्यायाम ह्याला काहीही पर्याय नाही.

In reply to by स्वप्नांची राणी

ज्युस थेरपीत शरीरा चे बिल्डींग ब्लॉक्स ज्यांना म्हटलं जातं त्या प्रथिनांचा काहीच विचार केलेला नाहीये. दिर्घ काळ प्रोटीन्स न घेतल्याने मग कदाचित कधीच काहीच न घेण्याची वेळ ही येऊ शकते. यावर अधिक माहिती मिळेल का?

In reply to by स्वप्नांची राणी

ज्युस थेरपीत शरीरा चे बिल्डींग ब्लॉक्स ज्यांना म्हटलं जातं त्या प्रथिनांचा काहीच विचार केलेला नाहीये. दिर्घ काळ प्रोटीन्स न घेतल्याने मग कदाचित कधीच काहीच न घेण्याची वेळ ही येऊ शकते. कुठल्याही फळाचा किंवा भाजीचा, अगदी कारल्याचा आणी दुधीचाही ज्यूस म्हणजे त्या त्या फळातली किंवा भा़जीतली कॉन्संट्रेटेड साखरच असते. असे ज्युस दिर्घ काळ घेतले तर रक्तातली शुगर लेव्हल धोकादायक रीत्या फ्लक्चूएट होऊ शकते. याचा परीणाम दृष्टी मंदावणे, प्रचण्ड थकवा येणे आणि वजनात घट (वावावा...जीव गेला तरी चालेल, वजन तर कमी झालंच ना..!!) यावर अधिक माहिती मिळेल का?

In reply to by रामचंद्र

@ रामचंद्रः दीर्घ काळ म्हणजे किती अभिप्रेत आहे ? सुरुवातीला तीन-चार वा किमान एक दिवस तरी करून बघा. महत्व स्वतः करून बघण्याचे आहे. सैद्धांतिक चर्चेला काही अंत नाही. आम्ही तिघांनी (मी, बायको आणि मुलगा) रसाहाराचा प्रयोग केला तो निर्हेतुकपणे केला होता. त्यातून वजन कमी होणे, मूळव्याध बरी होणे असा कोणताही हेतु नव्हता. परंतु अनपेक्षित मिळालेला फायदा आठ वर्षानंतर अजूनही टिकून आहे. जो क्रॉस च्या वेबसाईटवर बरीच माहिती मिळेलः https://www.rebootwithjoe.com/juicing/

In reply to by चित्रगुप्त

धन्यवाद. मी उद्याच बेंडेक्सची गोळी घेऊन (मला जंताचा त्रास नाही पण केमिस्टला विचारून) परवापासून रसाहार सुरू करणार आहे.

In reply to by रामचंद्र

खाली दिलेला जो क्रॉस याच्या दुव्यावरील विविध माहिती तसेच सबा जैन यांचे यूट्यूबवरील विविध व्हिडियो बघून घ्यावेत म्हणजे तुमच्या शंकांना उत्तरे आणि पूरक माहितीही मिळेल. तुमच्या उपक्रमासाठी हर्दिक शुभेच्छा. इथे माहिती देत रहावी. जो क्रॉसः https://www.rebootwithjoe.com/juicing/ सबा जैन (Satvic Movement) : https://www.youtube.com/@SatvicMovement

In reply to by रामचंद्र

यांचे बाकीचे खूप विडियो पण आहार आणि आरोग्य याबद्दल चांगली माहिती देणारे आहेत.

In reply to by सुबोध खरे

पर्फेक्ट. म्हणजेच चित्रगुप्तकाकांनी अवलंबलेला ज्यूसिंगचा/ आहाराचा मार्ग + व्यायाम हे दोन्ही एकमेकांस पूरक प्रमाणात केल्यास वजन कमी होईल?

वरती तजो यांनी अगदी योग्य सांगितले आहे. मात्र जूसिंग हा माझ्यासाठी तरी एक अत्यंत आनंददायी अनुभव असतो. मी तर जन्मभर करायला तयार आहे. अर्थात अधूनमधून 'वाट्टेल ते' खाणेही चालते. वजन कमी होते खरे पण त्याहीपेक्षा कमालीचा उत्साह आणि ऊर्जा वाढणे हा फायदा फार मोठा आहे. परिणामी व्यायाम व अन्य चांगल्या सवयी लावणे सहज शक्य होते.

In reply to by चित्रगुप्त

प्रत्येकाचा आपला एक दृष्टीकोन असतो व तोच त्याचं बरंवाईट करत असतो. जसे वर वेल्लाभट यांनी सांगितले की मन तयार असेल तर मग शरीरही तयार होतं, एकदा नवीन रुटीन सुरु झालं की एकामागोमाग एक अशा चांगल्या गोष्टी घडत जातात. डोमिनो इफेक्ट..! पण पहिले सोंगटी पाडणेच बर्‍याच जणांना जड जाते. ती कितीही छोटी आणि हलकी असली तरी.....

असो, खरे साहेब मनःपुर्वक धन्यवाद. काल पासुन जुसिंगवर होतो. मगाशी मस्त कचोरी, एक डेरी मिल्क सिल्क, चार इडली हिरव्या चटनी सोबत, आणी ४ मंच कॅटबरी खाल्या. शरीराला एकदम जड वाटलं पन मन अतिशय हलकं झालं. माझ्या १०३ किलो वजनाने आता काही फरक पडणार नाही विचार करुन पुन्हा एक आख्खा अननस खाल्ला. मन अतिशय प्रफुल्लीत झालं. व्यायाम करुन सगळं नियंत्रणात येत असतेच. पण मला ४-६ महिन्यातुन पंचकर्म सेंटरला भेट देउन शरीरशुध्दी करणे जास्त सोपे वाटते. कारण व्यायाम सोडलारे सोडला की अंगाने डबल झालात म्हणुन समजा. चित्रगुप्त साहेब यावयात आपण जे नेटाने करत आहात त्याबद्दल अभिमान वाटतोच आहे पण आपला व आमचा रस्ता नक्किच वेगळा आहे.. तो फिर मिलेंगे कभी कीसी नये मोड पर नये प्रतिसादोंके साथ....

In reply to by द-बाहुबली

व्यायाम सोडलारे सोडला की अंगाने डबल झालात म्हणुन समजा हे लई बेकार. ऊंचीच्या मानानं माझं वजन कमीच होतं, पण तरी वाटलं जरा ढेरी कमी करू आणि व्यायाम सुरू केला. २ महिन्या नंतर बंद केला आणि पुढच्या दोन महिन्यात वजन ७५ :(. च्यायला, त्या जीमचं तोंड काळं. फास्ट चालण्याचा ऊपाय आधी करून बघितला होता आणि वजन कमी झालं पण होतं. उगंच त्या जीमच्या नादी लागलो. आता आयुक्षात जीमचं तोंड बघणार नाही.

In reply to by नाव आडनाव

हाय इंटेन्सिटी व्यायामाचा हाच तोटा आहे. त्यापेक्षा लो इंटेन्सिटीवाले वायाम या बाबतीत परवडले बरेच.

In reply to by बॅटमॅन

हा हा हा... हे म्हंजे अभ्यास करुन केस गळतात, डोळ्यांना चश्मा लागतो.. म्हणून अभ्यासच करायला (शिकायला) नको बुवा. असे म्हटल्यासारखे आहे. थोडक्यात,
हाय इंटेन्सिटी व्यायामाचा हाच तोटा आहे.
याबद्दल असहमत.. :)

In reply to by चित्रगुप्त

मला आपल्या वयाचा आणि कुवतीचा विचार न करता केलेल्या जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग आणि डंबेल्स या तिन्हीतून दुखापत झाली आणि खूप दिवस अजिबात काही करता आले नव्हते. ऋजुता दिवेकरांच्या या पुस्तकातून असे होण्याचे नेमके कारण कळले. आता मी अतिशय सावकाश हालचालीचे ची-गाँग, ताई-ची चे प्रारंभिक व्यायाम्, आसने वगैरे करतो, ते अतिशय प्रभावी आहेत. सावकाश हालचालींचे व्यायाम करण्यातून आणखी एक फायदा म्हणजे हल्ली आपण उगाचच प्रत्येक गोष्टीची घाई करत असतो (उदा. विमान थांबले रे थांबले की लगेच वरचे सामान काढून गर्दीत ताटकळत उभे रहाणे, लोकल मधून उतरल्या उतरल्या धावत सुटणे, बका बका खाणे इ.) त्या सवयीतून सुटका होते, आणि आयुष्य हे शांतपणे, विना घाई-गडबडीचे जास्त चांगल्या रीतीने जगता येते, हे उमगते.

In reply to by चित्रगुप्त

सुंदर माहिती मिळत्ये कालपासून या धाग्यावर! अगदी मनापासून धन्यवाद चित्रगुप्त साहेब. फार महत्वाचा विषय मांडलात समोर!

In reply to by चित्रगुप्त

सहमत. ऋजुताबाईंचे वरील चित्रात असलेले पुस्तक वाचलेले नाही पण त्यांच्या पहिल्या पुस्तकात उल्लेख आहे. प्रत्येकाने आपापल्या तब्येतीला अनुसरून व्यायाम निवडावा. फायदा होतोच! चुकीच्या प्रकारे व्यायामास सुरुवात करून जी दुखापत होते, त्याने अनेक दिवस व्यायाम करताच येत नाही. जसे, ट्रेनिंगशिवाय म्यारेथॉन धावणे.

In reply to by चित्रगुप्त

सावकाश हालचालींचे व्यायाम करण्यातून आणखी एक फायदा म्हणजे हल्ली आपण उगाचच प्रत्येक गोष्टीची घाई करत असतो (उदा. विमान थांबले रे थांबले की लगेच वरचे सामान काढून गर्दीत ताटकळत उभे रहाणे, लोकल मधून उतरल्या उतरल्या धावत सुटणे, बका बका खाणे इ.) त्या सवयीतून सुटका होते, आणि आयुष्य हे शांतपणे, विना घाई-गडबडीचे जास्त चांगल्या रीतीने जगता येते, हे उमगते.
या बाबत सहमत न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हो काका. पण हे फक्त व्यायामास लागू होत नाही. शांत पणे जेवण करणे. झोपण्याआधी डोक्याला काहीतरी फीड करण्यापेक्षा शांत पडणे अशा बर्‍याच गोष्टी यासंदर्भात येतात. व्यायाम हा "यापैकी एक" असा आहे. तुमच्या मताशी सहमत आहे परंतु वरती मी हाय इंटेसिटी व्यायामाबाबत व्यक्त केलेल्या मताबाबत असहमत होतो त्याबद्दल यायोगे कारण सांगतो. तुम्ही म्हणालात "मला आपल्या वयाचा आणि कुवतीचा विचार न करता केलेल्या जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग आणि डंबेल्स या तिन्हीतून दुखापत झाली". तुमच्या वयाबद्दल मान्य पण मी विशीतल्या बरेच जणांना याचा चुकीचा अर्थ काठताना पाहिलेय. अचानक ५-१० किमी अगदी ३० मिनिटात धावू पाहणे हे गैरच पण म्हणून कोणी धडधाकट विशीतला माणूस (बाई) माझी ते अंतर (अगदी तिप्पट वेळ का लागेना) धावणे/जॉगिंग करण्याची कुवत नाही म्हणत असेल तर ते चूकच. जर तुम्हाला कोणतीही गंभीर व्याधी/विकार नसेल तर थोडा थोडा प्रयत्न या गोष्टी साध्य करु शकतो यावर माझा विश्वास आहे. आणि चाळिशीच्या आत असाल तर नक्कीच शक्य आहे हे पण. फक्त थोडे थोडे योग्य दिशेने प्रयत्न हवेत. बाकी तर वरती डॉकनी वरती सांगितल्याप्रमाणे,
परंतु एकदा तुमचा व्यायाम किंवा आहार थांबला कि झपाट्याने हे पाणी शरीरात शोषले जाऊन वजन "जैसे थे" येते
ही वस्तुस्थिती आहे. पण व्यायाम सुटल्यानंतरच्या भितीने व्यायाम करायचाच नाही हे पटत नाही.

In reply to by चित्रगुप्त

मी ह्या पुस्तकाचा उल्लेख इथे करणारच होते.
ज्या लोकांना खरोखरच व्यायाम करायचा आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे. मस्ट रिड!

In reply to by चित्रगुप्त

दिवेकर बाईंची दोन्ही पुस्तके (डोन्ट सिरीझ) वाचायला सोपी आणि सल्ले आचरणात आणायला सोपे आहेत! पहिल्यात घरबसल्या जास्त काही आहारबदल न करता आहारात हेल्दी बदल घडवून कसे घडवून आणायचे ह्यांचे चांगले सल्ले आहेत. दुसर्यात व्यायामाविषयी सगळ काही आहे. मी व्यवस्थित प्लान करून ९ किलो कमी केल होत, पण आता ३ किलो परत वाढलाय. कारणे: आहारनियम न पाळणे आणि व्यायामात सातत्य नसणे.

लोक्स एखाद्या डायटेशियन भेटून डायट का ठरवत नाहीत ?

काकांनी सांगितलं तेव्हा हा प्रकार मला रोचक वाटला होता. पण खाणे आणि वर्कआऊट्/खेळणे/पोहणे काहीही जोवर एकत्र करत नाही तोवर शरीरावर त्याचा फरक दिसत नाही असा माझा तरी अनुभव आहे. गेला एक महिना वर्कआऊट नाही/ पुण्यात पावसाच्या कृपेने स्विमींग पूल बंद त्यामुळे निव्वळ खाण्यावर कंट्रोल ठेवला आहे. पण वर्कआऊट किंवा स्विमिंगनंतर दिवसभर जो तरतरीतपणा असायचा तो तेवढा कुठेतरी कमी वाटतोय. नुसत्या डाएटने होणारे सो कॉल्ड चमत्कार क्षणभंगूर असतात असं माझं मत आहे.

In reply to by सूड

नुसत्या डाएटने होणारे सो कॉल्ड चमत्कार क्षणभंगूर असतात असं माझं मत आहे.
हे मत अनुभवाने झालेले आहे की हा एक अंदाज वा समजूत आहे ? माझी मूळव्याध आणि वीस-पंचवीस वर्षापासून असलेला फिस्टुला (याच्या वेदना आणि त्रास ज्याला होतो तोच जाणे) अवघ्या पंधरा ते वीस दिवसात कायमचा बरा झाला. वजन आणि पोटाचा घेर जो कमी झाला, तो या दीड वर्षात वाढलेला नाही, तेंव्हापासून वाढलेली उर्जा-उत्साह आणि संपलेली-निराशा, आळस ... याला क्षणभंगुर म्हणावे का?

खालिल दुव्यावरील महोदय स्वत: डॉक्टर आहेत. ते ह्या डायटला रेकमेंड करत आहेत. वर काही प्रतिसादांमधे काही डॉक्टर्स त्याला विरोध करत आहेत. नक्की कोण योग्य आहे...? http://drhyman.com/blog/2014/04/20/need-reboot/

In reply to by तर्राट जोकर

त्या डॉक्टरसाहेबांचे झटपट डायेटची पुस्तके , सीड्या, सप्लिमेंट्स वगैरे विकण्याचे दुकानच आहे हो! http://store.drhyman.com/

In reply to by सायकलस्वार

वोक्के सार, ज्यांचे दुकाने नस्तात ते डॉक्टर योग्य बोलतात..... धन्यवाद! ज्ञानात भर टाकल्याबद्दल.

In reply to by तर्राट जोकर

कोण योग्य बोलत आहे, कोण नाही यावर मी काहीच म्हणत नाहीये. दुकान प्रत्येकजणच लावून बसलेला असतो. गिर्‍हाईकानेच तारतम्य बाळगावं अशी अपेक्षा आहे. मी ज्युस डाएट डिसक्रेडिट करत नाही. पण वस्तू विकणार्‍याकडूनच वस्तूचं सर्टिफिकीट आणून दाखवणं गमतीदार वाटलं. असो.

दुसर्‍या-तिसर्‍या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते ,

In reply to by मीउमेश

असे लांबट तंतुमय जिन्नस गेल्या वर्षी आणि या वर्षी जूसिंगचे सुरूवातीचे 5-6 दिवस निघाले. जालावर शोध घेता तसले पोटातील कृमी असतात असे कळले. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसे जूसिंग केल्याशिवाय त्याची महती कळणार नाही. उगाच तर्कटे लढवण्यात अर्थ नाही.

इंटरेस्टिंग. मी २२ वर्षांपूर्वी सिद्ध समाधी योग शिकले तेव्हा त्यात कित्येक महिने कच्चे खाऊन राहिल्याचे आठवते. तेव्हा वजन प्रमाणात राहून अ‍ॅक्टिव्हिटीज चालू होत्या आणि अ‍ॅलर्टनेस, चपळता वाढली होती. मात्र तेव्हा नुसते रस घेऊन नव्हे तर माझ्या खाण्यात मोड आलेली कडधान्ये हा प्रमुख घटक होता. थोडे ड्राय फ्रुट्स, सर्व प्रकारच्या कच्च्या भाज्या व फळे (कधीतरी बदल म्हणून रस) गोडी आणण्यापुरता मध, लिबू असा आहार होता. चहा कॉफी बंद केली होती. वाटलेच तर थोडा वरण भात, किंवा कच्चे पोहे खात असे. दूधही बंद केले होते. नंतर मुलांसाठी आणि स्वतःसाठी वेगळे जेवण करणे कठीण होऊ लागले तसे ते बंद झाले. पण अजून कधी संधी मिळाली तर पुन्हा असे कच्चे खाऊन आरामात राहू शकेन. निव्वळ रसावर रहाण्यापेक्षा असे कच्चे खाऊन सहज रहाता येते. त्यात प्रोटीन्स मिळतात, फायबर मिळते. दात खराब होत नाहीत. वगैरे वगैरे. पण ज्यांना असे कांदा लसूण मिरची काही नसलेले खाणे चालत असेल त्यांना ठीक आहे. बाकीच्यांसाठी जरा अवघड आहे. एकूण प्रतिसादांमधे डॉक्टर मंडळींचे प्रतिसाद आवडले.

सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
मग चित्रगुप्त साहेब आपल्याला या प्रदीर्घ चर्चेनंतर काय समजलं? मला डॉ मनोज भाटवडेकर या मानसोपचार तज्ञाची एका पुनर्जन्माची कथा या स्वानुभवावर असलेल्या पुस्तकाची आठवण झाली

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपांडे साहेब, आम्ही उभयतांनी हा जो प्रयोग केला, तो "मुलगा एवढे म्हणतो आहे, तर करून बघूया" म्हणून. आम्हाला त्यावेळी त्यातून असे सुपरिणाम कायमचे लाभतील, याची सुतराम कल्पना नव्हती. उलट हे एक नवीनच काहीतरी अमेरिकन फॅड आहे, असे वाटले होते. त्यामुळे डायेटिशियन, डॉक्टर वा अन्य विद्वान मंडळींचे या बद्दल काय मत आहे असा कोणताही उहापोह न करता, संपूर्ण समर्पण भावनेने ते केले. नंतर इतर लोकांशी चर्चा करताना त्यांना आमच्यात झालेला बदल तर उघडच दिसून येत होता, परंतु आम्ही सांगत असलेले पटत नव्हते (माझा अगदी लहानपणापासूनचा खास, अतिविद्वान प्रोफेसर मित्र, लठ्ठ्पणा, पोटाचे विकार वगैरे भोगत असूनही अजूनही त्याला मी हे पटवून देऊ शकलेलो नाही). तेंव्हा मला हे सर्व कसे घडून आले असावे हे जाणून घ्यावेसे वाटले. अर्थात या विषयाचा आवाका फार मोठा आहे, आणि त्यात शरीरशास्त्र, आहारशास्त्र, वनस्पतिशास्त्र, पोषणशास्त्र, वगैरेंचा अभ्यास करणे आवश्यक आहे. असे सर्व इंग्रजीतून वाचण्याचा मला कंटाळा असल्याने ते लांबणीवर पडत आहे. सध्या मी सुचवतो, की आपण (आणि सर्व जिज्ञासू वाचकांनी) खालील काही व्हिडियो अवश्य बघावेत. माझे समाधान होईल इतपत अभ्यास झाल्यावर मी स्वतंत्र धागा काढेन. How the Body Reacts to a Juice Cleanse with Joe Cross https://www.youtube.com/watch?v=7JtjFNy59t4 Fat Sick and Nearly Dead -- भाग १ https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8 Fat Sick & Nearly Dead 2 (2014) HD -- भाग २. https://www.youtube.com/watch?v=7kLSs4OhS0o

आमच्यासारख्या बारीक लोकांच्या काही कामाचा नाही हा लेख.

In reply to by स्टुपिड

आमच्यासारख्या बारीक लोकांच्या काही कामाचा नाही हा लेख.
वजन कमी होणे हा एक अनुषंगिक परिणाम आहे. मुख्य फायदा पचनसंस्था कमालीची स्वच्छ होऊन त्यायोगे अनेक प्रकारच्या सध्या असलेल्या व भविष्यकालीन समस्या उद्भवण्यापासून बचाव हा आहे. आपल्याला कल्पना नसली, तरी आतड्यात कृमी आणि न पचलेले अन्न, जुनी घाण वगैरे असते, जे नाना व्याधींना जन्म देत असते. ते सर्व नष्ट होते.

@स्टुपिड , अगदी बरोबर बोललात. आपल्या सारख्यांच्या अंगावर ना चरबी ना किडे ठेवायला जागा,त्यामुळे असली थेरेपी आपल्या कामाची नाही. एक शंका, अशा थेरेपीने आतड्यातील अपायकारक जीव-जंतूंबरोबर अन्न पचवनारे जीवही बाहेर पडतात का?

In reply to by मार्मिक गोडसे

आतड्यातील अपायकारक जीव-जंतूंबरोबर अन्न पचवनारे जीवही बाहेर पडतात का?
चांगली शंका विचारलीत. माझ्या बाबतीत तरी असे झालेले नाही. दही, ताक घेणे हे यासाठी उत्तम असे ऐकले आहे. याविषयी जास्त माहिती मिळाली, तर अवश्य लिहा.

In reply to by चित्रगुप्त

गंमत म्हणून लिहीतो आहे, परंतु कदाचित असेही असू शकते: किडकिडीत असणारे लोक जे काही खात असतात त्यातले बरेचसे अन्न हे आतड्यात ठाण मांडून बसलेले, नको असलेले पाहुणे तर फस्त करत नाहीत?

In reply to by चित्रगुप्त

किडकिडीत असणारे लोक जे काही खात असतात त्यातले बरेचसे अन्न हे आतड्यात ठाण मांडून बसलेले, नको असलेले पाहुणे तर फस्त करत नाहीत?
+१

In reply to by चित्रगुप्त

गंमत म्हणून ठिक आहे. परंतू ह्या थेरेपीनंतर किडकिडीत नसणार्‍या व्यक्तींचेच वजन हे नको असलेले पाहुणे बाहेर पडल्यावर कमी का होते? शरीराचे शोषण थांबल्यामुळे ते तर वाढायला हवे.
माझ्या बाबतीत तरी असे झालेले नाही.
हे जिवाणू साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत आणि तुम्ही तुमची विष्ठा प्रयोगशाळेत तपासलीही नव्हती. मग तुम्हाला कसे समजले?

In reply to by मार्मिक गोडसे

किडकिडीत व्यक्तीने रसाहार केल्याचे उदाहरण मी बघितलेले नाही . माझ्या मुलाच्या पोटातून मोठा टेपवर्म निघाला . कृमी अनेक प्रकारचे असतात . मोठेही असतात . ते चारपाच दिवस सोडून एरवी कधीच तसले काही निघालेले नाही. शरीरशुद्धी आणि वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या रीतीने रसाहार केला पाहिजे असे वाटते . मला दोन्ही गोष्टी साध्य झाल्या . दोन्ही आवश्यक होत्या . रसाहाराने आतडी साफ झाली की योग्य आहार घेऊन वजन वाढवाढवता येईल .

फेस्बुक वर एक निती संजीव म्ह्णून आहेत त्यांचा डाएट ( डीटॉक्स) प्लॅन खूप प्रसिद्ध आहे सध्या. त्यांचा प्लॅन फॉलो करून बरेच जणं वजन कमी करण्यात यशस्वी झाले आहेत.

In reply to by चित्रगुप्त

Breakfast – GREEN JUICE Mid Day Snacks - NUTS, RAW SEEDS, FRUITS Lunch – SALAD Mid Evening Snacks – FRUITS Dinner – SALAD WITH BOILED PULSES Water – PLENTY AND MORE Apple Cider Vinegar – ONCE A DAY (2 teaspoon organic ACV diluted in a glass of water 15 mins before any one meal) Exercise –½ HOUR WALKING (anything over and above this will accelerate the weight loss like crazy!) Sunlight - 10-15 minutes of direct sunlight everyday preferably between 9-12 noon (for the vitamin D requirement of the body) Ingredients: GREEN JUICE : Half bunch Spinach, Half bunch Coriander Leaf (with part of the stem), Handful mint leaf, 1 full cucumber, 1 full tomato, Juice from 1 big lemon, ½ inch piece ginger, 2 cloves garlic Blend everything in the blender instead of putting it into a juicer, because it will lose all its fiber in a juicer or if it is strained. It would be 1-2 glasses in quantity and look like a thick smoothie... Do have the complete juice as soon as it's prepared. Nuts : Regular mixed nuts – Walnut, Almond, Cashew, Peanut, Pista, etc.- salted ones are fine too - 2 handfuls of mixed nuts a day Raw Seeds : Mix of Chia seeds, Flax seeds, Sesame seeds, Pumpkin seeds, Hemp seeds, Sunflower seeds, etc. - 2 Tablespoons of mixed seeds a day... Fruits : Absolutely any fruit your heart desires! All fruits are perfect, including high carb ones like banana, mango, etc. Salad (prepared for few days): 2-3 medium carrots, 2 medium beetroots, ½ small red cabbage, 2-3 celery sticks, red green and yellow capsicum(1 each), olives... (You can also try other raw vegan salads with dressings... this is the recipe I had during detox...) Boiled Pulses : White or black chana, kidney beans, black eyed peas, etc. I chose only one pulse for a day and pressure cook ½ cup in turmeric powder and a pinch of salt. You could also garnish it with onion, tomato and spices like pepper, cumin, etc. or fresh grated coconut हा आहार त्यांनी सुचवलेला आहे. यात फळं भाज्या आणि कडधान्ये आहेत. यात वावगं काहीच नाही. मूळ मुद्दा येतो तो घेणार्याच्या इच्छा शक्तीचा. सर्वात मोठा प्रश्न येथेच आहे. तीन दिवस असा आहार घेतल्यावर बहुसंख्य लोकांना पिझ्झा, जिलबी, रसमलई, मटण कबाबची स्वप्नं पडायला लागतात. चौथ्या दिवशी त्या गोष्टी जळी स्थळी काष्ठी पाषाणी दिसू लागतात आणि पाचव्या सहाव्या दिवशी पाय घसरतो. आणि मग येरे माझ्या मागल्या होते. माझे स्वतःचे उदाहरण देतो. काहीच कारण नसताना मी एकदा ठरवले कि आपण पूर्ण फलाहार करावा. म्हणून सकाळपासून मी फक्त केळी डाळिंब संत्रं सफरचंद आणि अननस अशी फक्त फळं खात होतो. संध्याकाळ पर्यंत मला बिस्किटं पोळी भाकरी केक यांचे स्वाद आठवू लागले.शीख कबाब चिकन बिर्याणी सारखे पदार्थ तर नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटू लागले. दुसर्या दिवशी सकाळी मी झक्क पैकी एक भाकरी आणि मिरचीचा ठेचा खाल्ला. हे फक्त एकाच दिवसात घडले.( माझ्या अंगावर एक दिवसापेक्षा जास्त टिकाव लागेल इतकी चरबीच नाही. आजकालच्या स्मार्ट फोन सारखे एक दिवसात ब्याटरी डाऊन )

In reply to by सुबोध खरे

पाचव्या सहाव्या दिवशी पाय घसरतो. >> एक्झाक्टली. न पेक्षा रोजच्याच आहारात थोडे बदल करून ३ वेळा जेवणाऐवजी पोर्शन साइझ लहान करून ४ ते ५ वेळा जेवलो आणि व्यायाम रेग्युलर ठेवला तर सब ठीक रहेगा. याने पाय घसरण्याची वेळ फार कमी येते आणि एकदा ८ १० दिवसांमध्ये सवय लागली की जास्त टेन्शन राहत नाही . डाएटिंग इज चेंजिंग युअर लाइफ़स्टाइल (टूवर्ड हेल्थ) का काय ते म्हणतात तेच खरे.

रसाहार हा अतिशय सुन्दर उपाय आहे ! गेल्या १० आठवड्यात मी १० किलो वजन कमी केले आहे , दर आठवड्याला एकदा रसाहार करुन ! freedon from diabetes या संस्थेच्या डॉ. प्रमोद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शानाखाली मी माझा मधुमेह रिवर्स ( होय , रिवर्स) केला आहे , गेले दोन महिने एकही गोळी / औषध खात नाही ! पर्यायी औषध नाही , फक्त आहाराचे तंत्र जमवून ! जी टी टी टेस्ट ओके आली की लेख लिहिनच ! उत्सुक लोकांनी freedon from diabetes / डॉ. प्रमोद त्रिपाठी गुगलून पहावे !

हे सारे इथे , भारतात . पुण्यात राहून , सुट्टी न घेता , भारतभर कंपनीच्या कामासाठी भटकत असताना ही शक्य झाले !

तुमचा ज्युसर कोणता आहे ? सेन्त्रीफ्युगल ज्युसर असेल तर काही पोषक द्रव्ये नाश होऊ शक्तात उष्णतेमुळे ! ज्युसर स्लो हवा , आणि दाबून ( बारिक तुकडे करून फिरवून नव्हे ) रस काढणारा हवा, स्लो असल्यामुळे गरम होत नाही आणि सारी पोषक मूल्ये अबाधित राहतात असा माझा अनुभव आहे ! शक्यतो रसाहारासाठी मिक्सर वापरू नये, पण ज्युसर नाही म्हणून रसाहार विनाकारण पुढे पुढे ढकलू नये ! समथिन्ग इज बेटर द्यान अजिबात नथिन्ग ! मिक्सर वापरल्यास रस गाळूनच प्यावा .. अजिबात तंतू / मगज असू नयेत.

In reply to by विटेकर

. सध्या तरी सेंट्रिफ्युगलच आहे, परंतु आता नवा घेतेवेळी पूर्ण माहिती मिळवून घेईन. जेंव्हा आपण फक्त जूसिंगवर असतो, तेंव्हा त्यात अजिबात तंतू नसावेत. याचे कारण जो क्रॉस यांनी चांगले सांगितले आहे. @ विटेकर साहेबः तुम्ही आठवड्यातून एक दिवस जूस घेता, तेंव्हा इतर दिवशी आहार काय काय, किती असतो ? कोल्ड प्रेस जूसरने काढलेला रस गाळावा लागतो का ?

एका आयुर्वेदीक माणसाला विचारले तो म्हटला हे एक प्रकारचे लंघनच आहे, पौष्टीक लंघन. सलग ३ पेक्षा जास्त दिवस करु नकोस. हे चालु असताना विशेषतः नेहमीचे व्यायाम अजिबात करु नकोस. ३ दिवस नंतर आहार हळु हळु वाढ अन्यथा पोट अजुन सुटेल. सगळा गोंधळ झालाय माहितीचा डोक्यात.

एकन्दरीत पाहता आधी मनाचाच निग्रह महत्त्वाचा, हे दिसतय मग सगळे उपाय लागू होतील. कधी जमणार कुणास ठाऊक? (गुलाबजाम खात प्रतिसाद देणारी ) आळशी माउ ;-);-)

जे तुम्ही लिहिलयं तसं व्हावं अशी तुमची ईच्छा असावी.ती फिल्म पाहून/ तसं लेख वाचून तुम्हाला तसं व्हावं अस वाटलं असेल,पण तसं होणं शक्य नाही.पॅथालाॅजीक रिपोर्ट दाखवा.आंतरजाल वरचे फोटो दाखवून असेच झाले होते म्हणने ठीक नाही.

In reply to by बाजीगर

बाजीगरपंत, इथे मी काही सिद्ध करण्यासाठी आलेलो नाही , ज्याला करायचे असेल त्याने करून बघावे, नसेल त्याने सोडून द्यावे . मी जे काल्पनिक लिखाण करतो, त्यात तसे स्पष्ट सांगतो. आपल्याला झाला तसा लाभ इतरांना व्हावा या कळकळीतून हे लिखाण केले.

ह्या थेरेपीनंतर किडकिडीत नसणार्‍या व्यक्तींचेच वजन हे नको असलेले पाहुणे बाहेर पडल्यावर कमी का होते? असा माझा प्रश्न होता.
हे जिवाणू (अन्न पचवणार्‍या बॅक्टिरिआ) साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत
ह्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या तपासण्या असतात ज्या तुम्ही केल्या नाहीत. ठिक आहे.
माझ्या मुलाच्या पोटातून मोठा टेपवर्म निघाला
हे गंभीर आहे. मांस व्यवस्थीत न शिजवता खाल्याने टेपवर्मचे इन्फेक्शन होते. टेपवर्मचा मोठा तुकडा विष्ठेत आढळला ह्याचा अर्थ तो संपुर्ण बाहेर पडला असा होत नाही. त्याचा तोंडाचा भाग शरिरात असु शकतो व त्याच्या तुटलेल्या शरिराची पुन्हा वाढ होत असते. टेपवर्मची अंडी साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत, त्यामुळे विष्ठा प्रयोगशाळेत तपासणे हे योग्य राहील.

धन्यवाद . मुलाला सांगतो तसे.