Skip to main content

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

लेखक माहितगार यांनी सोमवार, 07/09/2015 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई ....... समजून तयाला घेतो, तू मंत्री आगळा नाही सर्वस्व लाहिले मला, काही ना बाकी ठेवले मी (उद्)देशास उडवून बसलो, माझी तृष्णा संपली नाही .........इतुके न स्वतःला घ्यावे, की भार तयाचा व्हावा ........ बघ तुझ्यात लपला आहे, तो मंत्री आगळा नाही या पदातील अपेक्षा मी चूक मानीली नाही बनलोही असतो राजा, मज पद भेटले नाही ........ स्वःची निर्मम प्रीती, मंत्र्याची वाढविते तृष्णा ........ हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

वाचने 3434
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

:)

जरा मात्रांची ओढाताण झालीय. नाहीतर कमीत कमी शब्द बदलून प्रयत्न चांगला आहे!