✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

अ
अजया यांनी
Mon, 06/08/2015 - 10:09  ·  लेख
लेख
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता! मग पुढच्या दिड शतकी धाग्यात दोन कट्टे होतील इतपत काथ्या कुटुन प्रगती झाली!त्यात ७चा कट्टा अानंदी हाॅलला होणार म्हंटल्यावर शहाण्यासुरत्या;)लोकांनी कट्टयाची सूत्र हातात घेऊन तिसरा धागा काढला!त्यानुसार पाताळेश्वरला गप्पा आणि राजधानी थाळी नक्की झालं एकदाचं.मात्र कट्टयाला कोण कोण येणार हे मात्र गुलदस्त्यात होते. सातला विशाखा पाटील अनिवासी पुणेकर असल्याने साडेदहाला दिल्या वेळेआधीच पाताळेश्वरला हजर!तिचा फोन आला आणि ती सोडुन कोणीच मिपाकर तिथे आलेले नसल्याची वार्ता तिने दिली!आम्ही (मी आणि माझा नवरा)डेक्कन जवळ पोहोचलोच होतो.तिला म्हंटलं आलोच आम्ही पाच मिनिटात.दोन अनाहिता भेटल्या तरी राॅकिंग कट्टा होऊ शकतोच ना;) पण त्यानंतर रितसर रस्ता चुकत आम्हाला जवळच्या अंतराला पोहोचण्यात अर्धा तास गेला.जाऊन बघतो तर मिपाकरांनी पाताळेश्वराचे प्रांगण भरलेले अाणि साक्षात नीलकांतनी कट्टयाला हजेरी लावलेली!एका वडाच्या झाडाखाली पारावर सर्व मिपाभुतं जमलेली!आम्ही यायला आणि युनिफाॅर्मातले गुरुजी जायला एकच गाठ पडली.ते गेल्यानंतर त्यांचे काही दु दु मित्र गणपती सरस्वती बारसं बाटल्या असं बोलत असलेलं ऐकलं बुवा!खखो वडावरचा मुंजा जाणे! एक हिंदी भाषक काका कोण होते कळले नाही.एका बाजूला पारावर अोक काका आणि एक मिपाकर होते.ते नंतर दिसले नाहीत.त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.उत्साही विनायक देशपांडे काका नीलकांतशी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार मोडमध्ये होते.उपास आणि त्यांची सौ.,चिमी ,विशाखा पाटील एका झाडाखाली पारावर बसले होते.वल्ली दोन ग्रंथ हातात घेऊनच आलेले!चिनार,प्रशांत आणि एक्का काका बहुधा पुढल्या कटाची माहिती असल्याने सुहास्यवदनाने सगळ्यांशी गप्पा मारत होते! वात्रट कार्टी सगा ,सूड, टकाचे सोंग घेतलेला दु दु अभ्या(!)आणि एक डु आय डीचा डु आयडी बनलेला दमामि(म्हणे)यांचे कटकारस्थान सुरु होते.अभ्याला प्रत्यक्ष न पाहिल्याने तो टका बनून लाजत आणि लपत होता.अभ्या कुठे फेडशील हे पाप?=)) या सर्वात एक पाहाताक्षणी वात्रट दिसाणारे कार्टे दमामि नाव घेऊन वावरत होते!दमामि अाम्ही ओळखल्या असल्याने त्याची पंचाईत होऊन तो असंबंध्द उत्तरं द्यायला लागला.पण तेवढ्यात जोराचा पाऊस आल्याने सगळ्यांची पळापळ सुरु झाली.पाताळेश्वराच्या नंदी असलेल्या वर्तुळाकृती जागेत काही तर पलीकडे काही असे आपोअाप दोन ग्रुप पडले.धोधो पावसाने शत्रुपक्ष आणि आम्ही यामधला खंदक पाण्याने भरुन गेला;) आता अलीकडे इ एक्का नीलकांत उपास अनाहिता आोक काका आणि पलिकडे उरलेले दु दु लोक्स!!तेवढ्यात भर पावसात भिजत सुरंगी ताईने येऊन बोलण्याची सूत्र हातात घेऊन सर्वाना गप्प करुन टाकले!नीलकांतला सर्वांनी इतकी सजेशन देऊनही न कंटाळता प्रत्येकाशी संवाद सुरु होता.तेवढ्यात ओककाकांच्या हातावर बांधलेला दोरा तुटला!तो वेड्या बहिणीची रे वेडी माया म्हणत सुरंन्गीताईने बांधुन दिला.तिथे असलेल्या एका वात्रट अनाहितेला दोरा का नाडी हा प्रश्न आवरला नाही असे ऐकले,ख.खो. नंदी जाणे=))(ओककाका ह. घ्या हो!तुमच्या ज्ञानाचा आदर आहे.) तेवढ्यात बॅटमॅन हजर झाल्याने खंदका पलिकडची कूमक वाढली!मग या सर्वांचा समाचार घ्यायला मी आणि विशाखा खंदक ओलांडुन डायरेक शत्रुपक्षात एन्ट्री मारली! तिथे शहाण्या अभ्याने हळूच मी टका नाही,पैचान कौन करुन कन्फुजन वाढवले आणि मग तो अभ्या आहे असे सांगीतले.तरी वाटतंच होतं एवढा शहाणा दिसाणारा मुलगा टका कसा=)) त्यामुळे दमामिची उलटतपासणी सुरु केली!दमामि नाहीच पण साक्षात टवाळ असे चेहेर्यावर छापलेला हा कोण हे कळणार तोच बाकीचे नेमस्त पक्षीय पण खंदक ओलांडुन जमा झाले.मधेच मृत्युंजय हजेरी लावुन गेले.गप्पा सुरु असताना अचानक एक दुबईवासी कुटुंब तिथे आले.ते गृहस्थ स्वतः मिपाकर आहेत.समोर जमलेला ग्रुप बघुन चौकशी करता हा मिसळपावचा कट्टा असल्याचे कळल्याने ते आवर्जून भेटायला आले.जय मिपा! आता सगळ्याना जेवायला जाण्याचे वेध लागलेले.दंबुकधारी बाबा पाटलांना राजधानीला यायला सांगुन बाकीच्यानी राजधानीकडे कूच केले.इथे नीलकांतने मात्र सगळ्यांचा निरोप घेतला. राजधानीला आल्यावर कटात सामिल लोकांनी सो काॅल्ड दमा मि ला अनाहितांत बसवल्याने चोरुन लपुन वावरणार्या,अनाहितांना न घाबलणार्या टकाचे सोंग उघडे पडले!!त्याची जेवताना मग अनाहितांनी प्रेमळ विचारपूस केली,महत्त्वाचे सल्ले दिले;) टक्याच्या वधू संशोधनाबाबत काही चिंतन करण्यात अाले.समस्त दारु आवडणार्या अविवाहित मुलींना टक्यासाठी मागणी घालण्याच्या विषयावर चर्चा केल्या गेली!या सर्व चिंतनमननानंतरही शिल्लक राहिलेल्या टक्याला सुरन्गी ताई स्वतःबरोबर गाडीने नेऊन लां....ब सोडायला रिक्षात घालून घेऊन जाताना बालके सूड सगा यांनी त्याला साश्रु नयनांनी निरोप दिला.कल्जी घ्यायला सांगीतली.ते भावविभोर दृश्य बघून उरलेल्यांचे ड्वाले पानावले:( टकाचा बंदोबस्त करुन बाकीची मंडळी सूड सगा वल्ली एक्का काका वाल्गुद महाशय विशाखा आणि श्री व सौ अजया महात्मा फुले म्युझियम जवळच असल्याने बघायला गेले.तिथे इ. दुशली ब च्या मुलांसाठी असलेल्या वस्तू बघुन कट्टयाची सांगता झाली! ता.क:ज्या दिपक_कुवेत यांच्या आगमनार्थ कट्टा होणार होता ते या कट्टयाला न येता आदल्या दिवशी पक्षी तीर्थ कट्टा करुन रविवारी निमुटपणे तुळशी बागेत गेले.यावरुन सर्व काही ध्यानात आले आहे;)सहानुभूती दाखवल्या गेली आहे!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नाट्य
पाकक्रिया
इतिहास
बालकथा
बालगीत
विडंबन
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
विनोद
समाज
जीवनमान
राहणी
प्रवास
भूगोल
ज्योतिष
सामुद्रिक
राजकारण
मौजमजा
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
39243 वाचन

💬 प्रतिसाद (143)

प्रतिक्रिया

नै रे, मी फक्त गाळलेल्या जागा

विशाखा पाटील
Mon, 06/08/2015 - 19:10 नवीन
नै रे, मी फक्त गाळलेल्या जागा भरल्या. तुझा वृत्तांत लवकर टाक बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हैला... इत्ता सब हुवा आउर वो

संदीप डांगे
Mon, 06/08/2015 - 19:20 नवीन
हैला... इत्ता सब हुवा आउर वो पनीर.कुवेत दिकैच नै बावा... लोग बी सुम्मडीमें कट्टेका टायटलकोईच फाटेपे मारके गुपचूप है..
  • Log in or register to post comments

पनीर.कुवैत हमारे साथ आये थे

सतिश गावडे
Mon, 06/08/2015 - 19:49 नवीन
पनीर.कुवैत हमारे साथ आये थे मिया. बोले, धन्यामिया मेरेको पनीर नै होना. फिर इत्ता इत्ता फिश फ्राय आऊर प्रान्स दबाया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अच्छा. वो छे तारिक के

संदीप डांगे
Mon, 06/08/2015 - 20:32 नवीन
अच्छा. वो छे तारिक के कट्टेमें थे क्या...? मेरकू लगा छे अउर सात दोनोमे रेनेवाले थे क्या... आय माय स्वारी बरंका.. वो फटू नै दिक्या उनका... इस्लिये वाईच चवकशी कर्‍या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

मस्त..

स्वाती दिनेश
Mon, 06/08/2015 - 19:42 नवीन
कट्टा,कट्ट्याचा वृत्तांत,फोटो सगळेच टॉप.. (स्वगत-इनोची बाटली संपली.. आता??) स्वाती
  • Log in or register to post comments

वाह! दमदार कट्ट्याचा खुमासदार

सानिकास्वप्निल
Mon, 06/08/2015 - 19:45 नवीन
वाह! दमदार कट्ट्याचा खुमासदार वृतांत आवडला फोटो पण मस्तं, मज्जा आली वाचताना :)
  • Log in or register to post comments

मस्त कट्टा वर्णन अजया!छान

इशा१२३
Mon, 06/08/2015 - 19:48 नवीन
मस्त कट्टा वर्णन अजया!छान मज्जा केलेली दिसतीये.
  • Log in or register to post comments

लै भारी...

अमितसांगली
Mon, 06/08/2015 - 20:06 नवीन
केरळमध्ये उभ्या पावसात जळायला लागलोय...
  • Log in or register to post comments

केव्हापासून होतंय हे असं?

सूड
Mon, 06/08/2015 - 20:15 नवीन
केव्हापासून होतंय हे असं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

इनोने अंघोळ करा.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 06/09/2015 - 07:06 नवीन
इनोने अंघोळ करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितसांगली

टका मिस्टर इंडीया

ईश्वरसर्वसाक्षी
Mon, 06/08/2015 - 20:41 नवीन
टका भौ तो किसी भी फोटो मे दिखाइच नही.
  • Log in or register to post comments

फोटो क्र. ४,५,६ नजरेखालून

खटपट्या
Tue, 06/09/2015 - 06:50 नवीन
फोटो क्र. ४,५,६ नजरेखालून घालावे. दर्शन होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी

तनमननानंतरही शिल्लक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 06/08/2015 - 20:50 नवीन
तनमननानंतरही शिल्लक राहिलेल्या टक्याला सुरन्गी ताई स्वतःबरोबर गाडीने नेऊन लां....ब सोडायला रिक्षात घालून घेऊन जाताना बालके सूड सगा यांनी त्याला साश्रु नयनांनी निरोप दिला.
_/\_ तेथे कर माझे जुळती. बाकी सगाला अश्रु आलेले का आनंदाश्रु आलेले हे प्रत्यक्ष भेटीत कळेल. मजा मिसली एवढं मात्र खरं :(
  • Log in or register to post comments

तू लेका पुण्यातल्या एकाही

प्रचेतस
Mon, 06/08/2015 - 20:52 नवीन
तू लेका पुण्यातल्या एकाही कट्ट्याला येत नाहीस. दुत्त दुत्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यनि करतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 06/08/2015 - 20:58 नवीन
व्यनि करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

व्यनी करा असे लिहायचे अस्ते =

टवाळ कार्टा
Mon, 06/08/2015 - 21:18 नवीन
व्यनी करा असे लिहायचे अस्ते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

पिंचि पुण्यात नाही??

टवाळ कार्टा
Mon, 06/08/2015 - 21:19 नवीन
पिंचि पुण्यात नाही??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 06/08/2015 - 21:24 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

बहारदार कट्टा वृत्तांत आणि फोटो!!

जुइ
Mon, 06/08/2015 - 21:24 नवीन
बहारदार कट्टा वृत्तांत आणि फोटो!! राजधानी नविनच सुरु झाले आहे असे वाटत आहे. थाळीचा आकारही कल्पक आहे.
  • Log in or register to post comments

३/४ वर्षे झाली राजधानी सुरु

प्रचेतस
Mon, 06/08/2015 - 22:51 नवीन
३/४ वर्षे झाली राजधानी सुरु होऊन. सुकांताची सर नाही पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

छ्या! पुणं पुर्वीचं राहिलं

काळा पहाड
Mon, 06/08/2015 - 23:18 नवीन
छ्या! पुणं पुर्वीचं राहिलं नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद वल्ली!

जुइ
Tue, 06/09/2015 - 00:05 नवीन
नाहीतर पुढिल भारत भेटीत इथे जायचा विचार होत ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुइ

कट्ट्याच्या भेटी

शशिकांत ओक
Tue, 06/09/2015 - 00:19 नवीन
आज कट्टा भेटीचा धावता आढावा प्रत्यक्षापेक्षा उठावदार होता. कट्ट्यावर पडलेल्या पावसाने हजेरी लावत मिपाकरांच्या आनंदात सहभागी मी ही आहे असे दाखवून दिले...!
  • Log in or register to post comments

बहारदार वृत्तांत

श्रीरंग_जोशी
Tue, 06/09/2015 - 06:19 नवीन
लै मजा केलेली दिसत आहे कट्टेकर्‍यांनी. मिपामालकांना बर्‍याच वर्षांनी कट्ट्यात सामिल झालेलं पाहिलं. फोटोजही आवडले.
  • Log in or register to post comments

१००.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 06/09/2015 - 06:31 नवीन
१००. धाग्याची १००री झाल्याबद्दल अजया तैंना दात उपटायचा चिमटा, टकाचा पत्ता आणि कडक बुंदीचे लाडु देउन सत्कार करणेत येत आहे =))
  • Log in or register to post comments

ह्या ह्या ह्या ह्या ह्या =))

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/09/2015 - 07:24 नवीन
ह्या ह्या ह्या ह्या ह्या =))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्या ह्या ह्या

स्वीत स्वाति
Tue, 06/09/2015 - 09:15 नवीन
बाकी वर्णन मस्त मी मिस् केला हाही कट्टा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

=))

टवाळ कार्टा
Tue, 06/09/2015 - 09:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

दमदार झालाय की कट्टा. :)

झकासराव
Tue, 06/09/2015 - 10:10 नवीन
दमदार झालाय की कट्टा. :)
  • Log in or register to post comments

एकदम झक्कास!

पैसा
Tue, 06/09/2015 - 22:19 नवीन
कं लिवलंय! कं लिवलंय! वा वा! अनाहितांच्या लाडोबाला लांSSSब सोडल्याची कथा श्वास रोखून वाचली. दोडोबांनी अशी काय संधी न देता य: पलायते स: जीवति! असे म्हणत सूंबाल्या ठोकला भौतेक! यग्झॆक्टली त्याच वेळेला रत्नांग्रीत एका नवरा नवरीला अक्षता फेकून मारत असलेने दूरध्वनी करून टका आणि बॆट्याची चौकशी करू शकले नाही. मात्र अजया आणि विशाखा यांणी ते काम चोख बजावले असे कळते.
  • Log in or register to post comments

काही लोकांना दुसर्‍यांची

एस
Tue, 06/09/2015 - 22:39 नवीन
काही लोकांना दुसर्‍यांची चवकशी करायची उगीच हौस असते. जरा लोकांना मोकळं सोडा की! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नै ओ!

पैसा
Tue, 06/09/2015 - 23:13 नवीन
ते हौसेने चवकशी करायचं काम फक्त पुणेकरांचं. मी फक्त खास खास लोकांची चौकशी करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आब्बां??? अब मई खासंम खास बन

टवाळ कार्टा
Wed, 06/10/2015 - 00:28 नवीन
आब्बां??? अब मई खासंम खास बन गयां???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुम्ही सूड आणि सगाजीराव वाकडे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 06/09/2015 - 23:06 नवीन
तुम्ही सूड आणि सगाजीराव वाकडे ह्यांना विसरलात असं नम्रपणे लक्षात आणुन देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नै नै!

पैसा
Tue, 06/09/2015 - 23:14 नवीन
ते दोघे पुण्यात हरवायची शक्यता नै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

म्हणुन चौकशीचं नाही करायची :O

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 06/09/2015 - 23:16 नवीन
म्हणुन चौकशीचं नाही करायची :O!!! बाकी तुमचे धनकवडी आय.बी.एम. जवळ कोणी नातेवैक आहेत का हो? एक पत्ता विचारायचा होता. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

विचारा की बिनधास्त!

पैसा
Tue, 06/09/2015 - 23:20 नवीन
आमच्याकडे पत्ते सांगायचे पयशे घेत नैत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

धनकवडी आयटी पार्कमधे आयबीएम

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 06/09/2015 - 23:25 नवीन
धनकवडी आयटी पार्कमधे आयबीएम कुठे आहे ते सांगतील का ते जरा? एका मित्राला पुढच्या वेळी टेंपोत बसवुन तिकडे धाडायचाय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

असां काय!

पैसा
Tue, 06/09/2015 - 23:34 नवीन
टेंपोत बसवायला मदत लागली तरी बिनधास सांगा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एकूनात कट्टा एकदम सोलिड

गरजू पाटिल.
Wed, 06/10/2015 - 19:46 नवीन
एकूनात कट्टा एकदम सोलिड झालेलाय. अजयातै अन॑ सुडाचे वृत्ता॑त एकदम ईशय इषेश, एक्का काक्का॑चे फोट्टॉवृत्त गोडात आन्हिक गोड ...... बाकी, लोक्स ओलखू येव लागलेत फोटुतन॑.. पुण्यातल्या म्होरल्या कट्ट्याला यायला आवडेल. बेत चा॑गलय, अजयतैचा फोटो पावसात जळायासाठी टाकल्याचे वाट्टे.
  • Log in or register to post comments

सहीच झालाय की कट्टा!!!

प्रीत-मोहर
Wed, 06/10/2015 - 20:28 नवीन
सहीच झालाय की कट्टा!!!
  • Log in or register to post comments

७ च्या कट्ट्याची सफलता

देशपांडे विनायक
गुरुवार, 06/11/2015 - 18:47 नवीन
७ च्या कट्ट्याची सफलता पाताळेश्वर मंदिराच्या आवारात वडाची झाडे आहेत . भली मोठी आहेत त्या झाडाच्या छायेत मिपा चा कट्टा सुरु झाला आणी थोड्या वेळात पाऊस आला आणखी थोड्या वेळाने त्याने रूद्र रूप धारण केले मंडळी वडाचा आडोसा सोडून गाभारा गाठू लागली पण चार पाच जण तेथेच राहिले एकाला जाताच येणार नव्हते दुसरा तर त्याला कोणत्याच परिस्थितीत साथ न सोडण्याचे वचन देऊन बसलेला पावसाने आणखी जोर वाढवला झाडाखाली थांबलेले भिजत होते पण त्या दोघांना सोबत करत होते पण पाऊस लवकर थांबेल असे वाटेना आणि मग मात्र व्हील चेअर ढकलून नेण्यासाठी आणि पायऱ्या वरून ती उचलण्यासाठी त्या दोघांना तो मदत करू लागला मी गाभाऱ्याकडे मोर्चा वळवला तो THANKS म्हणण्यासाठी माणुसकीचे दर्शन झाल्यावर दुसरे काय करावयाचे ?
  • Log in or register to post comments

छान प्रतिसाद. सेंटी कर दिया

सतिश गावडे
गुरुवार, 06/11/2015 - 18:59 नवीन
छान प्रतिसाद. सेंटी कर दिया देशपांडे काका आपने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देशपांडे विनायक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा