( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ )
हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी!
..... ........ ........
हेग्झियाच्या डाव्या डोळ्यात जन्मतःच मोतीबिंदू होता. त्यामुळे तो त्या डोळ्याने जन्मांध. परिस्थिती अगदी बेताची. इथेतिथे काम करता करता एका factory त लागला. लग्न झाले. एक मुलगा झाला.
पण २००० साली, आयुष्यात कायमचा अंध:कार पसरवणारी घटना घडली. Factory तल्या अपघातात दगडाचे एक अणुकुचीदार टोक त्याच्या उजव्या डोळ्यात घुसले. प्रचंड वेदना. ज्या एका डोळ्याने तो जग पाही, तोही निकामी झाला. मध्यम वय. आंधळ्या माणसाला factory तच काय, पण कुठेतरी कोण नोकरी देणार? त्यात बायको सतत आजारी. एक मूल. उपासमारीची वेळ येऊन ठेपली.
..... ........ ........
तिकडे वेंकीचे निराळे दुर्दैव! जमिनीवर पडलेल्या उघड्या विजेच्या तारेचा धक्का बसल्याने, वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याला आपले दोन्हीही हात खांद्यापासून गमवावे लागले. त्याच्याही घरची गरिबी. थोट्या हातांनीच तो मित्रांबरोबर खेळत असे. तसाच, पोहायला, इतर बारीकसारीक कामे करायला शिकला. पण दु:खात सुख इतकेच कि, सगळ्या गावाने त्याला आपल्या पोराप्रमाणे वागवले. गावप्रमुखाने त्याला शाळेत घातले. पुढे मान आणि खांद्याच्या सहाय्याने तो नांगर हाकू लागला, पायाने अवजारे हाताळू लागला. एवढेच नव्हे तर पायानेच लेखन आणि सुबक विणकाम करू लागला. १९७६ मध्ये पदवीधर झाला. मग स्थानिक वनविभागात त्याला छोटीशी नोकरी देण्यात आली. झाडापानाफुलाफळांची निगराणी करता करता, त्याची झाडांशी दोस्ती जमली.
..... ........ ........
२००० साली, हे शाळूमित्र नशिबाने परत एकत्र आणले. आपल्या लंगोटमित्राचा आंधळा अवतार पाहून, थोटा वेंकी हेलावला. तेरा गम, मेरा गम एक झाले.
मग त्याने आपल्या अंधमित्राला झाडं लावण्याची, त्यातून पैसे कमवण्याची आणि त्यावर चरितार्थ चालवण्याची कल्पना दिली. यातूनच सुरु झाली एका जगावेगळ्या दोस्तीची आणि जिद्दीची कहाणी!
..... ........ ........
५४ वर्षीय हेग्झिया आणि ५३ वर्षीय वेंकी दररोज भल्या सकाळी आपल्या कामाला निघतात. स्थानिक वनविभागाकडून त्यांना नदीपलिकडची आठ हेक्टर जमीन अत्यल्प भाडेतत्वावर मिळाली. घरापासून आपल्या कर्मभूमीकडे जाताना त्यांना दररोज बरेच अंतर चालत जावे लागते. थोट्या हेग्झियाच्या शर्टची रिकामी बाही हातात धरून आंधळा वेंकी त्याच्या मागोमाग चालत राहतो. मग पाण्याला ओढ असणारी नदी लागते. हेग्झिया आपल्या मित्राला पाठकुळी घेतो. कुठेही न धडपडता, दोघेही नदीपार करतात. आज एक तप उलटून गेले, पण त्यांच्या या रोजच्या प्रवासात खंड नाही, फरक नाही! एकेकाळी बिकट होती ती वाट, आज त्यांनी वहिवाटीची केलीय!
झाडं लावून, (तोडून नव्हे!) पैसे मिळवायचे, या प्रापंचिक गरजेतून सुरु झालेले काम पुढे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले. मिळालेल्या जमिनीवर होता होईल तितकी झाडी लावायची. जगवायची. आपल्या गावाला पुरापासून वाचवायचे.वनसंपदा वाढवायची, हि या दोस्तीतील जिगर झाली.
..... ........ ........
जेव्हा १०-१२ वर्षांपूर्वी त्यांनी हे काम सुरु केले, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना वेड्यात काढले. आंधळा अन थोटा मिळून काय दिव्य करणारेत, असली हेटाळणी वाट्याला आली! क्वचित एखाद दुसरे झाड सोडले, तर वर्षानुवर्षे गावचा नदीकिनारा ओसाड होता. पण थोड्याच वर्षांत, जेव्हा तिथे झाडं तगू लागली, वाढू लागली, नदीकिनारा हिरवा दिसू लागला, तेव्हा मात्र गावकऱ्यांची मतं बदलली. मनं बदलली. या दोघांना मदत करण्यासाठी ते हि पुढे सरसावलेत. त्यांची अवजारं दुरुस्त करून दे, झाडाना पाणी घाल, तण उपटून टाक, नवीन रोपटी आणून दे अशी काहीनकाही मदत ते करतात.
..... ........ ........
पण खरं अविरत काम या दोघांचं! कलमं तयार करून, ती लावणं, तसं किचकट आणि वेळखाऊ काम! हातीपायी धड असणाऱ्यानाही कष्टप्रद वाटावं असं! पण यांच्या सुदृढ दोस्तीने झाडावनांना संजीवन दिले. त्यांनीच दहाबारा वर्षांपूर्वी लावलेल्या, आज ताडमाड वाढलेल्या झाडांची डहाळी कापून, तिचे कलम करून, खड्डा खणून लावायचे! इथेही मग एकमेकांची दृढ सोबत. आंधळा वेंकी , थोट्या हेग्झियाच्या पाठीखांद्यावर हळूहळू चढतो. हातांच्या डोळ्यांनी एखादी सळसळती डहाळी, अंदाजाने पण व्यवस्थित कापतो. मग हेग्झिया त्याला सुखरूप खाली उतरवतो.
या सगळ्या कामात दोघांच्या मनाशरीराची कमालीची एकतानता लागते. आयुष्यातील न्यूनतेने त्यांच्या शरीरमनाचे गुंते वेगळ्या अर्थाने सोडवलेत. हेग्झिया हसून म्हणतो, ‘तो माझे डोळे, तर मी त्याचे हात आहोत!’ तर वेंकी म्हणतो, ‘आम्ही मिळून काम करतो, तेव्हा वयं एकास्मि!’
आजपर्यंत त्यांनी सुमारे दहा हजार सुदृढ झाडी वाढवलीयत. पण तीन हजार झाडी खुरटून गेल्याचे, बारीक शल्यही आहे. कधीमधी मिळणाऱ्या गावकऱ्याची मदत सोडली, तर या दोस्तांचे हे एकहाती काम, सावकाश पण दमदारपणे चालू आहे! आज तीन हेक्टर जमिनीवर जंगल उभे आहे. पक्षी घरटी बांधताहेत. जंगलात नवे जीवजीवन मूळ धरत आहे.
..... ........ ........
अलिकडेच हेग्झियाला त्याच्या डॉक्टरांनी, त्याच्या उजव्या डोळ्यांवर इलाज करणे शक्य आहे, असे सांगितलेय. नेत्रपेढीतील प्रतिक्षायादीत, त्याचा नंबर लागून कुणा द्यावानाचे नेत्र मिळाले, कि नेत्ररोपणही शक्य आहे. पण तो म्हणतो, ‘ मला जरी परत दृष्टी मिळाली, तरी मी माझ्या दोस्ताबरोबर झाडं लावण्याचेच काम करीन. मला दिसो वा न दिसो, शेवटच्या श्वासापर्यंत , मी माझे हेच काम माझ्या मित्राबरोबर करत राहणार!’
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
14068
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडले
क्या बात है
+++१११
In reply to क्या बात है by श्रीरंग_जोशी
होय, श्रीरंग जोशी.
In reply to क्या बात है by श्रीरंग_जोशी
फार च जगावेगळी कथा आहे ही.
छान आहे कथा. स्वतःमधील
अप्रतिम!
+१
In reply to अप्रतिम! by एस
जे विधायक घडतेय, त्यापर्यंत
In reply to +१ by नाखु
खुप छान.
वा!
अतिशय स्फुर्तीदायक कथा.
स्पंदना....
In reply to अतिशय स्फुर्तीदायक कथा. by स्पंदना
छान माहिती...
अत्यंत प्रेरणादायी. जादेव
होय, यशोधरा! त्या हि माणसाचे
In reply to अत्यंत प्रेरणादायी. जादेव by यशोधरा
अनन्त अमुचि....
"वयम एकस्मि" हेच खरे आहे
उत्तम, प्रेरणादायी कथा, बरेच
ह्या सत्य कथेवरून एक सिनेमा आठवला...."दोस्ती" ह्याच नावाचा....
छान प्रेरक कथा.
सुंदर प्रेरणादायक कथा !
इस्पिकचा एक्का....
In reply to सुंदर प्रेरणादायक कथा ! by डॉ सुहास म्हात्रे
मिपावरच्या लेखाची लिंक.....
In reply to सुंदर प्रेरणादायक कथा ! by डॉ सुहास म्हात्रे
कथा वाचुन जयदेव पायॅंग यांची
या दोस्तीचा धागा देत आहे, दिसेल कि नाही माहित नाही.
सुदैवाने दिसतोय.
In reply to या दोस्तीचा धागा देत आहे, दिसेल कि नाही माहित नाही. by शिव कन्या
सुंदरच!!!
एक तार्किक प्रश्न..
१. नेत्रदान हे मरणोत्तरच केले
In reply to एक तार्किक प्रश्न.. by हाडक्या
(प्रतिसाद देताना अर्धवट व
In reply to १. नेत्रदान हे मरणोत्तरच केले by आनंदी गोपाळ
प्रेरक
मस्त कथा!! अत्यंत प्रेरणादायक
प्रेरणादायक कथा!!
क्या बात है.
खूप छान लिहिलेस तर्री ताई
खुपच प्रेरणादायी कथा..
प्रेरणादायी कथा. मानलं त्या
धागा वाचुन तुम्ही दिलेला
कमाल तर आहेच! पण धडधाकट
कमाल तर आहेच! पण धडधाकट
अप्रतिम
अतिशय प्रेरणादायी कथा.तुम्ही
अजया, आपल्या वाचनातील
In reply to अतिशय प्रेरणादायी कथा.तुम्ही by अजया
सुंदर लेख..
चिगो, वाचून प्रतिक्रिया दिलीत
In reply to सुंदर लेख.. by चिगो