✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

अ
अजया यांनी
Mon, 06/08/2015 - 10:09  ·  लेख
लेख
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता! मग पुढच्या दिड शतकी धाग्यात दोन कट्टे होतील इतपत काथ्या कुटुन प्रगती झाली!त्यात ७चा कट्टा अानंदी हाॅलला होणार म्हंटल्यावर शहाण्यासुरत्या;)लोकांनी कट्टयाची सूत्र हातात घेऊन तिसरा धागा काढला!त्यानुसार पाताळेश्वरला गप्पा आणि राजधानी थाळी नक्की झालं एकदाचं.मात्र कट्टयाला कोण कोण येणार हे मात्र गुलदस्त्यात होते. सातला विशाखा पाटील अनिवासी पुणेकर असल्याने साडेदहाला दिल्या वेळेआधीच पाताळेश्वरला हजर!तिचा फोन आला आणि ती सोडुन कोणीच मिपाकर तिथे आलेले नसल्याची वार्ता तिने दिली!आम्ही (मी आणि माझा नवरा)डेक्कन जवळ पोहोचलोच होतो.तिला म्हंटलं आलोच आम्ही पाच मिनिटात.दोन अनाहिता भेटल्या तरी राॅकिंग कट्टा होऊ शकतोच ना;) पण त्यानंतर रितसर रस्ता चुकत आम्हाला जवळच्या अंतराला पोहोचण्यात अर्धा तास गेला.जाऊन बघतो तर मिपाकरांनी पाताळेश्वराचे प्रांगण भरलेले अाणि साक्षात नीलकांतनी कट्टयाला हजेरी लावलेली!एका वडाच्या झाडाखाली पारावर सर्व मिपाभुतं जमलेली!आम्ही यायला आणि युनिफाॅर्मातले गुरुजी जायला एकच गाठ पडली.ते गेल्यानंतर त्यांचे काही दु दु मित्र गणपती सरस्वती बारसं बाटल्या असं बोलत असलेलं ऐकलं बुवा!खखो वडावरचा मुंजा जाणे! एक हिंदी भाषक काका कोण होते कळले नाही.एका बाजूला पारावर अोक काका आणि एक मिपाकर होते.ते नंतर दिसले नाहीत.त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.उत्साही विनायक देशपांडे काका नीलकांतशी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार मोडमध्ये होते.उपास आणि त्यांची सौ.,चिमी ,विशाखा पाटील एका झाडाखाली पारावर बसले होते.वल्ली दोन ग्रंथ हातात घेऊनच आलेले!चिनार,प्रशांत आणि एक्का काका बहुधा पुढल्या कटाची माहिती असल्याने सुहास्यवदनाने सगळ्यांशी गप्पा मारत होते! वात्रट कार्टी सगा ,सूड, टकाचे सोंग घेतलेला दु दु अभ्या(!)आणि एक डु आय डीचा डु आयडी बनलेला दमामि(म्हणे)यांचे कटकारस्थान सुरु होते.अभ्याला प्रत्यक्ष न पाहिल्याने तो टका बनून लाजत आणि लपत होता.अभ्या कुठे फेडशील हे पाप?=)) या सर्वात एक पाहाताक्षणी वात्रट दिसाणारे कार्टे दमामि नाव घेऊन वावरत होते!दमामि अाम्ही ओळखल्या असल्याने त्याची पंचाईत होऊन तो असंबंध्द उत्तरं द्यायला लागला.पण तेवढ्यात जोराचा पाऊस आल्याने सगळ्यांची पळापळ सुरु झाली.पाताळेश्वराच्या नंदी असलेल्या वर्तुळाकृती जागेत काही तर पलीकडे काही असे आपोअाप दोन ग्रुप पडले.धोधो पावसाने शत्रुपक्ष आणि आम्ही यामधला खंदक पाण्याने भरुन गेला;) आता अलीकडे इ एक्का नीलकांत उपास अनाहिता आोक काका आणि पलिकडे उरलेले दु दु लोक्स!!तेवढ्यात भर पावसात भिजत सुरंगी ताईने येऊन बोलण्याची सूत्र हातात घेऊन सर्वाना गप्प करुन टाकले!नीलकांतला सर्वांनी इतकी सजेशन देऊनही न कंटाळता प्रत्येकाशी संवाद सुरु होता.तेवढ्यात ओककाकांच्या हातावर बांधलेला दोरा तुटला!तो वेड्या बहिणीची रे वेडी माया म्हणत सुरंन्गीताईने बांधुन दिला.तिथे असलेल्या एका वात्रट अनाहितेला दोरा का नाडी हा प्रश्न आवरला नाही असे ऐकले,ख.खो. नंदी जाणे=))(ओककाका ह. घ्या हो!तुमच्या ज्ञानाचा आदर आहे.) तेवढ्यात बॅटमॅन हजर झाल्याने खंदका पलिकडची कूमक वाढली!मग या सर्वांचा समाचार घ्यायला मी आणि विशाखा खंदक ओलांडुन डायरेक शत्रुपक्षात एन्ट्री मारली! तिथे शहाण्या अभ्याने हळूच मी टका नाही,पैचान कौन करुन कन्फुजन वाढवले आणि मग तो अभ्या आहे असे सांगीतले.तरी वाटतंच होतं एवढा शहाणा दिसाणारा मुलगा टका कसा=)) त्यामुळे दमामिची उलटतपासणी सुरु केली!दमामि नाहीच पण साक्षात टवाळ असे चेहेर्यावर छापलेला हा कोण हे कळणार तोच बाकीचे नेमस्त पक्षीय पण खंदक ओलांडुन जमा झाले.मधेच मृत्युंजय हजेरी लावुन गेले.गप्पा सुरु असताना अचानक एक दुबईवासी कुटुंब तिथे आले.ते गृहस्थ स्वतः मिपाकर आहेत.समोर जमलेला ग्रुप बघुन चौकशी करता हा मिसळपावचा कट्टा असल्याचे कळल्याने ते आवर्जून भेटायला आले.जय मिपा! आता सगळ्याना जेवायला जाण्याचे वेध लागलेले.दंबुकधारी बाबा पाटलांना राजधानीला यायला सांगुन बाकीच्यानी राजधानीकडे कूच केले.इथे नीलकांतने मात्र सगळ्यांचा निरोप घेतला. राजधानीला आल्यावर कटात सामिल लोकांनी सो काॅल्ड दमा मि ला अनाहितांत बसवल्याने चोरुन लपुन वावरणार्या,अनाहितांना न घाबलणार्या टकाचे सोंग उघडे पडले!!त्याची जेवताना मग अनाहितांनी प्रेमळ विचारपूस केली,महत्त्वाचे सल्ले दिले;) टक्याच्या वधू संशोधनाबाबत काही चिंतन करण्यात अाले.समस्त दारु आवडणार्या अविवाहित मुलींना टक्यासाठी मागणी घालण्याच्या विषयावर चर्चा केल्या गेली!या सर्व चिंतनमननानंतरही शिल्लक राहिलेल्या टक्याला सुरन्गी ताई स्वतःबरोबर गाडीने नेऊन लां....ब सोडायला रिक्षात घालून घेऊन जाताना बालके सूड सगा यांनी त्याला साश्रु नयनांनी निरोप दिला.कल्जी घ्यायला सांगीतली.ते भावविभोर दृश्य बघून उरलेल्यांचे ड्वाले पानावले:( टकाचा बंदोबस्त करुन बाकीची मंडळी सूड सगा वल्ली एक्का काका वाल्गुद महाशय विशाखा आणि श्री व सौ अजया महात्मा फुले म्युझियम जवळच असल्याने बघायला गेले.तिथे इ. दुशली ब च्या मुलांसाठी असलेल्या वस्तू बघुन कट्टयाची सांगता झाली! ता.क:ज्या दिपक_कुवेत यांच्या आगमनार्थ कट्टा होणार होता ते या कट्टयाला न येता आदल्या दिवशी पक्षी तीर्थ कट्टा करुन रविवारी निमुटपणे तुळशी बागेत गेले.यावरुन सर्व काही ध्यानात आले आहे;)सहानुभूती दाखवल्या गेली आहे!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
मांडणी
वावर
संस्कृती
कला
नाट्य
पाकक्रिया
इतिहास
बालकथा
बालगीत
विडंबन
म्हणी
वाक्प्रचार
व्याकरण
व्युत्पत्ती
विनोद
समाज
जीवनमान
राहणी
प्रवास
भूगोल
ज्योतिष
सामुद्रिक
राजकारण
मौजमजा
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
39243 वाचन

💬 प्रतिसाद (143)

प्रतिक्रिया

लै भारी. मज्जा केलेली दिसतेय.

यशोधरा
Mon, 06/08/2015 - 10:13 नवीन
लै भारी. मज्जा केलेली दिसतेय. व्हिडिओ शूटींग करायचे होते ना..
  • Log in or register to post comments

का वो? तिथं जवळच्या जवळ

किसन शिंदे
Mon, 06/08/2015 - 10:15 नवीन
का वो? तिथं जवळच्या जवळ तुम्ही कट्ट्याला गेला नाहीत??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मिठाचं पोतं घेऊन बसलाय काय? :( :|

यशोधरा
Mon, 06/08/2015 - 10:26 नवीन
त्या दिवशीच सक्काळी ६ ते दुपारी ४ परेंत हापिसात होते.. :( दुत्त शिंदे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अच्छा, असं झालं तर...

किसन शिंदे
Mon, 06/08/2015 - 10:31 नवीन
अच्छा, असं झालं तर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

दुत्त दुत्त, अगदीच दुत्त

यशोधरा
Mon, 06/08/2015 - 11:02 नवीन
दुत्त दुत्त, अगदीच दुत्त दुत्त शिंदे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

दुत्त शिंदे!

सतिश गावडे
Mon, 06/08/2015 - 10:32 नवीन
दुत्त शिंदे!
हे "दुत्त दुत्त शिंदे!" असं असायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

पुढे तब्येतीप्रमाणे

बॅटमॅन
Mon, 06/08/2015 - 12:52 नवीन
पुढे तब्येतीप्रमाणे ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ (यातील स्वर व व्यंजनांचे प्रमाण स्वादानुसार ठरवावे) , दोनपाच स्मायल्या, इ. टाकाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

कोणाच्या तब्येतीप्रमाणे?

यशोधरा
Mon, 06/08/2015 - 13:23 नवीन
कोणाच्या तब्येतीप्रमाणे? किसनाच्या? मग एकपण नको की! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दुत्ताजी शिंदे असं म्हणाला

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 06/09/2015 - 06:58 नवीन
दुत्ताजी शिंदे असं म्हणाला असतात तर पुणिपत नावाची कादंबरी लिहिला आली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

=))

यशोधरा
Tue, 06/09/2015 - 07:35 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

किसन शिंदे
Tue, 06/09/2015 - 10:13 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ठ्ठो =)) =)) =))

बॅटमॅन
Tue, 06/09/2015 - 19:37 नवीन
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/09/2015 - 22:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

भारीच. फोटो टका.

यसवायजी
Mon, 06/08/2015 - 10:21 नवीन
भारीच. फोटो टका.
  • Log in or register to post comments

मस्त कल्पनारंजन...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 06/08/2015 - 10:22 नवीन
फोटु नाय तर कट्टा नाय पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अजया ताई..मी पण होतो की

चिनार
Mon, 06/08/2015 - 10:22 नवीन
अजया ताई..मी पण होतो की कट्ट्याला !
  • Log in or register to post comments

दुरुस्ती केली आहे!

अजया
Mon, 06/08/2015 - 10:42 नवीन
दुरुस्ती केली आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

हा कोण तोतया दमामि????

दमामि
Mon, 06/08/2015 - 10:23 नवीन
हा कोण तोतया दमामि???? आम्ही आहोत अजून.....
  • Log in or register to post comments

फोटो टाका

चिमी
Mon, 06/08/2015 - 10:24 नवीन
कट्टा कम वर्षा सहल बेस्ट्च झाली :) ते दुबईवासी कुटुंब शरद काकांचे नातेवाईक होते हे ऐकुन मनात विचार आला की हे जग किती लहान आहे ..... फोटो आणि पुढच्या कट्ट्याच्या प्रतिक्षेत.. -चिमी :)
  • Log in or register to post comments

मस्त झाला कट्टा...एकदम मज्या

बॅटमॅन
Mon, 06/08/2015 - 10:26 नवीन
मस्त झाला कट्टा...एकदम मज्या आली.
  • Log in or register to post comments

आकाशातल्या

नाखु
Mon, 06/08/2015 - 11:04 नवीन
देवा कट्टा करून फोटो न टाकंणार्यांना माफ कर !!! हळहळ सांत्वनकर खालची आळी पाराजवळ
  • Log in or register to post comments

वाह ! एकदम खुमासदार व्रुतांत

पियुशा
Mon, 06/08/2015 - 11:06 नवीन
वाह ! एकदम खुमासदार व्रुतांत .आता लगोलग फटुटु येऊ दयात "फोटु नाय तर कट्टा नाय"
  • Log in or register to post comments

या वृत्तांतातील मनाचे श्लोक

टवाळ कार्टा
Mon, 06/08/2015 - 11:08 नवीन
या वृत्तांतातील मनाचे श्लोक माझ्या वृत्तांतात दुरुस्त कर्ण्यात येतील :)
  • Log in or register to post comments

वृतांत आवडला... फोटो ?

मदनबाण
Mon, 06/08/2015 - 11:14 नवीन
वृतांत आवडला... फोटो ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'हसीना' मान जाएगी? पाकिस्तानी मुहाजीरांचे 'रॉ कनेक्शन'
  • Log in or register to post comments

भारीच

स्वीत स्वाति
Mon, 06/08/2015 - 11:26 नवीन
मला खूप इच्छा होती कट्ट्याला हजेरी लावण्याची पण येऊ शकले नाही... पुढील कट्टा जर पुन्हा प्राधिकरण मध्ये झाला तर मला सोयीस्कर होईल. बघा काही जमते का.... फोटो टाका ... फोटो पाहून समाधान मानेन.
  • Log in or register to post comments

फोटो नाय तर कट्टा नाय!

चुकलामाकला
Mon, 06/08/2015 - 11:27 नवीन
फोटो नाय तर कट्टा नाय!
  • Log in or register to post comments

@आणि एक डु आय डीचा डु आयडी

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/08/2015 - 11:28 नवीन
@आणि एक डु आय डीचा डु आयडी बनलेला दमामि(म्हणे)यांचे कटकारस्थान सुरु होते.अभ्याला प्रत्यक्ष न पाहिल्याने तो टका बनून लाजत आणि लपत होता.अभ्या कुठे फेडशील हे पाप?=)) या सर्वात एक पाहाताक्षणी वात्रट दिसाणारे कार्टे दमामि नाव घेऊन वावरत होते! दमामि अाम्ही ओळखल्या असल्याने त्याची पंचाईत होऊन तो असंबंध्द उत्तरं द्यायला लागला. Image removed. पण तेवढ्यात जोराचा पाऊस आल्याने सगळ्यांची पळापळ सुरु झाली.पाताळेश्वराच्या नंदी असलेल्या वर्तुळाकृती जागेत काही तर पलीकडे काही असे आपोअाप दोन ग्रुप पडले.धोधो पावसाने शत्रुपक्ष आणि आम्ही यामधला खंदक पाण्याने भरुन गेला;) >>> इथे मला आमने सामने ढणुष्य बाण रोखलेल्या फौजा दिसल्या! Image removed. @तेवढ्यात बॅटमॅन हजर झाल्याने खंदका पलिकडची कूमक वाढली!मग या सर्वांचा समाचार घ्यायला मी आणि विशाखा खंदक ओलांडुन डायरेक शत्रुपक्षात एन्ट्री मारली! >>> Image removed. आ.........क्रमण! Image removed.
  • Log in or register to post comments

चला एकतरी कट्टा झाल्याचा

स्पंदना
Mon, 06/08/2015 - 11:32 नवीन
चला एकतरी कट्टा झाल्याचा व्रूतांत आला बाबा. काय नाही तरी नंदीचा फोटो टाक ना!
  • Log in or register to post comments

अजया, मी येण्याआधीच आणि मी

नूतन सावंत
Mon, 06/08/2015 - 11:41 नवीन
अजया, मी येण्याआधीच आणि मी गेल्यानंतरच्या वृतान्ताने बहार आणली.टकासाठी वधूसंशोनाचे काम माझ्या नणंदेकडे सोपण्यात आले आहे. त्याची वधूच्या बाबतीतील मुख्य अटसुद्धा तिला सांगितली आहे. टकाला अनाहितांमध्ये बसवण्याचा कट झाला असयाचे लक्षात आले होते.पण त्यात एक्काजीही सामील असल्याचे आताच कळते आहे.उपस्थित सर्व मिपाकरांना भेटून आनंद झाला. इतक्या अनोळखी व्यक्तींसोबत (पण अनोळखी तरी कसं म्हणू?) मी इतका वेळ सहजपणे आनंदात काढणे हे आजवर मला ओळखणाऱ्या माझ्यासाठीही नवीन होते. शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल. जय मिपा.
  • Log in or register to post comments

शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या

टवाळ कार्टा
Mon, 06/08/2015 - 11:46 नवीन
शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल.
आणि इथे उग्गीच काहीजणी ....जौदे ;) रच्याकने आपला एक कंपू बनवावा कै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

भावना पोचल्या...

खटपट्या
Mon, 06/08/2015 - 16:58 नवीन
भावना पोचल्या... बाकी कट्टा जबरद्स्त झालेला दीसतोय. अजयातै, ई.ए., सूड, वल्ली यांचे व्रुत्तांत जबराट आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

वृतांत मस्तच!!!! पण फ़ोटो कुठे

स्नेहानिकेत
Mon, 06/08/2015 - 11:42 नवीन
वृतांत मस्तच!!!! पण फ़ोटो कुठे आहेत? फ़ोटो नाय तर कट्टा नाय!!!!!
  • Log in or register to post comments

टका हाये का अजुन शिल्लक!!!

पिलीयन रायडर
Mon, 06/08/2015 - 11:50 नवीन
टका हाये का अजुन शिल्लक!!! अजया ताईने तर धुवांधार गोळीबार केलाय!! ख त रा लिहीलाय वृतांत!!
  • Log in or register to post comments

ल्ल्ल्लूऊऊऊऊउ

टवाळ कार्टा
Mon, 06/08/2015 - 11:57 नवीन
ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अप्रतिम कट्टा वर्णन .. आवडेश.

गणेशा
Mon, 06/08/2015 - 12:09 नवीन
अप्रतिम कट्टा वर्णन .. आवडेश...
  • Log in or register to post comments

यायची इच्छा होती, पण रवीवारी

विशाल कुलकर्णी
Mon, 06/08/2015 - 12:12 नवीन
यायची इच्छा होती, पण रवीवारी नेमके काही वैयक्तीक कारणामुळे श्रीवर्धनला एका मित्राच्या घरी जावे लागले. त्यामुळे उत्सुकता परत वाढीला लागली आहे. पुढच्या कट्ट्याच्या वेळी हजर राहण्याचा प्रयत्न करेन. ता.क. (हवेतर आगाऊ जाहिरात म्हणा ;) ) माझ्या मागील)दिवे आगारच्या पोस्टवर मिपाकरांनी 'रुपनारायणा'बद्दथोआवर्जून चौकशी केल्यामुळे उत्सुकता बळावली होती. त्यामुळे पुन्हा एकदा वाट वाकडी करुन तिथे भेट देवून आलो. लवकरच वृत्तांत पोस्टेन स्वतंत्र धाग्यावर.
  • Log in or register to post comments

काय बोलता तो दमामि दमामि

मृत्युन्जय
Mon, 06/08/2015 - 12:25 नवीन
काय बोलता तो दमामि दमामि नव्हता? टक्का होता? आणि अनाहितांनी दमामिला ओळखले आहे? आयला तर मग दमामि म्हणजे नक्की कोण हे कृपया स्पष्ट करावे. एकुण चाललेल्या कुजबुजीवरुन दमामि हा अनाहितांपैकी कोणाचा तरी आयडी आहे असे समजते. तर मग दमामि कोण? बाक्की दोन्ही कट्टे मस्त झाले.
  • Log in or register to post comments

काही चुकलं तर जोड्यानं हाणा

दमामि
Mon, 06/08/2015 - 16:12 नवीन
काही चुकलं तर जोड्यानं हाणा पण अनाहिता नका म्हणू भौ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जोडे तयार आहेत, कधी हाणू बोला

सूड
Tue, 06/09/2015 - 22:19 नवीन
जोडे तयार आहेत, कधी हाणू बोला फक्त!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

चायला आधी गुलाबजाम आणि आता

टवाळ कार्टा
Wed, 06/10/2015 - 00:23 नवीन
चायला आधी गुलाबजाम आणि आता जोडे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

चायला आधी गुलाबजाम आणि आता

सूड
Wed, 06/10/2015 - 17:49 नवीन
चायला आधी गुलाबजाम आणि आता जोडे???
ते रसगुल्ले होते. जल्लां मना र्‍हाव्न र्‍हाव्न येक संवशेव येतांय. ह्या टक्यान खाल्लेले रसगुल्ले आन ह्या दमामिस द्यायाच्या जोड्यांचा संबंध टक्यान् लावला कसां? नाय म्हंजे मना काय बोलियाचा हाय ता कल्ला कांय मंडली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अर्रे हो रसगुल्ले :)

टवाळ कार्टा
Wed, 06/10/2015 - 19:07 नवीन
अर्रे हो रसगुल्ले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

खाल्ल्या पाकाला जागला हं तू

सतिश गावडे
Wed, 06/10/2015 - 19:09 नवीन
खाल्ल्या पाकाला जागला हं तू बाळ टका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ख्याssssक्क!

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/10/2015 - 19:59 नवीन
ख्याssssक्क!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

कल्ला कल्ला. दमामि म्हणजे टका

काळा पहाड
गुरुवार, 06/11/2015 - 23:04 नवीन
कल्ला कल्ला. दमामि म्हणजे टका आणि टका म्हणजे दमामि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

:)

टवाळ कार्टा
Fri, 06/12/2015 - 11:32 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

@ अजया : मजा आली व्रूतांत वाचुन, छान लिहीलाय....!!

विनोद१८
Mon, 06/08/2015 - 12:34 नवीन
@...सुरन्गी :- शिवाय दोन तासासाठी भेटलेल्या व्यक्तीला लिफ्ट देताना मनात कसलीच शंका आली नाही हे मिपाचे यश म्हणावे लागेल. यातच सारे आले, असा विश्वास निर्माण होणे हेच मिपाचे यश.
  • Log in or register to post comments

आयला यात ज्याला लिफ्ट मिळाली

टवाळ कार्टा
Mon, 06/08/2015 - 12:41 नवीन
आयला यात ज्याला लिफ्ट मिळाली त्याचा कैच वाटा नै का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८

सहमत आहे.

विनोद१८
Mon, 06/08/2015 - 13:23 नवीन
नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

+१

हाडक्या
Mon, 06/08/2015 - 14:26 नवीन
ज्याने लिफ्ट घेतली त्याच्या धाडसाचे ही कौतुक करावे तेवढे कमीच आहे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा