Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367574
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

अगदी असेच म्हणतो. पन्नासरावांचा प्रतिसाद नेमका आहे. स्वतःच्याच पिढीच्या शिकवणीचा परिणाम दिसला की ऑड वाटतं, त्यातला स्वतःचा रोल मात्र दिसत नाही.

In reply to by बॅटमॅन

काय म्हणताय जरा विस्कटा बरं! आमच्या पिढीमुळे पुढची पिढी असा विचार करते असं का? मला खरंच नाही समजलं!

In reply to by टवाळ कार्टा

आधीच्या पिढीने खूप मोठे बदल पाहिले आणि पचवले. आपल्याकडे जे नव्हतं ते मुलांना द्यावं या कल्पनेने त्यांनी नको इतके रेडीमेड आयुष्य मुलांना द्यायला सुरुवात केली. साहजिकच प्रत्येक गोष्टीत मुलं आईबापावर जास्तच अवलंबून रहायला लागली. आताही "आताच्या परिस्थितीला आधीची पिढी कारण आहे" म्हणत कळत नकळत तुम्ही आधीच्या पिढीकडे बघता आहात. शिवाय आधीची पिढीही मुले फक्त शारीरिक दृष्टीने मोठी झाली तरी मनाने आणि भावनिक दृष्ट्या आपली "बाळे" आहेत असे समजून वागतात. मुलांनाही ते सोयीचं असतं. मुलगी निवडताना आईवडिलांचा निर्णय स्वीकारला की आयुष्य सोपं होतंच. पण उद्या समजा नाही जमलं तर खापर फोडायलाही एक हक्काचा दगड असतो. मुलींची संख्या कमी झाल्यामुळे जर मुलींना जास्त मागणी आली असेल तर त्याला कारणही ही आधीची पिढी आहे, कारण त्यांच्याच काळात मुलींचे गर्भ नाहीसे करायची फ्याशन रूजली आणि फोफावली. माहितीचा विस्फोट आणि आर्थिक सुबत्ता यांच्याच काळात आली. आपल्याकडे अमेरिकन लाईफस्टाईल चांगलेच मूळ धरते आहे, पण त्यांच्याकडे असलेली श्रमप्रतिष्ठा आणि मुलांनी १६/१७ व्या वर्षी स्वतंत्र होऊन आपले आयुष्य सुरू करायची पद्धत मात्र स्वीकारली जात नाही. कारण ते न स्वीकारणं दोघांच्याही फायद्याचं आहे. याला आईबाप आणि मुले दोघेही कारण आहेत.

In reply to by पैसा

शेवटच्या परिच्छेदाशी सहमत. बादवे, खूपजण असे विचार मांडतात. प्रत्यक्ष कितीजण आचरणात आणतात हे गंमतीशीर आहे.

In reply to by एस

प्रामाणिकपणे सांगायचं तर मी पण आचरणात आणत नाही. कारण हेच की ते आमच्या घरात एकूणच अमेरिकन स्टायली फारशा प्रचलित नाहीत, कारण अमेरिकन लाईफस्टाईल माझी आवडती नाही. अर्थात इतर सगळी मुलं प्रोटेक्टेड वातावरणात असताना माझ्याच मुलांना "उघड्यावर टाकणे" त्यांच्यावर अन्याय असेल. कारण आताच त्यांना स्वतंत्रपणे जगायला लावले तर ती इतर मुलांबरोबर स्पर्धेत मागे पडतील. भारतातल्या पद्धतीप्रमाणे त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलं ही आमची जबाबदारी आहे. मात्र मुलांना स्वतंत्रपणे चांगलं वाईट ठरवता आलं पाहिजे आणि ती इमोशनली आपल्यावर अवलंबून नसतील याचीही काळजी मी घेते.

In reply to by पैसा

आपल्या दृष्टिकोनाशी मी असहमत आहे, पण विषय लग्नासंबंधी असताना पॅरेंटिंगकडे गाडी जाईन, त्यामुळे थांबतो.

माझ्यासाठी लग्न आणी संसार म्हणजे 'एक घरट बांधायच ,दोन अंडी घालुन त्यांना उबवत बसायच 'एवढा टिपीकल विचार करत नाही. एकच आयुष्य आहे आणी बरच काही करायचय. (ठाम )जेपी

बरयाचशा प्रतिसादांचा सूर हा एकतर्फी , एकांगी असा वाटतो आहे . आजच्या काळातील उपवर मुलांची एकुण अवस्था ही दयनीय आहे असाच मतप्रवाह दिसतो आहे . काल परवा पर्यंत मुले राज्यकर्ती होती . तर आता लग्नाच्या बाजारात / प्रक्रियेत मुलींचे पारडे जड आहे . आतापर्यंत स्त्रीवर्गाने / मुलींनी बालविवाह , अकाली मात्रुत्व , बालविधवा , अकाली वैधव्य , केशवपन , सती , हुंडाबळी , मारहाण ,लग्न मोडणे ,मानापमान हे त्रास , अन्याय सहन केले. कदाचित याच स्त्रिया / मुली पुनर्जन्म घेऊन रुबाबात 2 wheeler , 4 wheeler , flights , rockets मधून मिरवत आहेत .पुरुष वर्गाला धडा शिकवत आहेत. गतकाळातील राहून गेलेले जगणे जगत आहेत . याच संदर्भात जुना प्रतिसाद परत जोडतो आहे . पुनर्जन्म वगैरे कल्पना सोडल्या तरिही इतर मुद्द्यांवर गंभीरपणे विचार करता येइल . ---------------------------------------------------- लेख व प्रतिसाद हे जरी "वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?" या विषयावर असले तरी एकूण सूर हा "हल्लीच्या मूलींच्या / वधू पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत" असाच वाटत आहे . अविवाहीत मुलींचे कमी संख्या प्रमाण हे एक त्यामागचे मुख्य कारण असेल तर हि एकंदर परिस्थिती मुलांनी / वर पक्षाच्या लोकांनीही वेळीच ओळखली पाहिजे . व त्याप्रमाणे आपल्या अपेक्षा जर कालबाह्य , अवास्तव असतील तर त्यांत आधीच बदल केले पाहिजेत ( उदाहरणार्थ- पत्रिका ,ठराविक जात , पोटजात यांचा आग्रह ). तसेच आपल्या समाजात चूकीच्या लग्नाच्या बळी ठरलेल्या व फसवणूक झालेल्या घट्स्फोटीत मुलींचेह प्रमाण जास्त आहे . तसेच दुर्दैवाने अकालीच वैधव्य आलेल्या मुलींचेही बरेच प्रमाण आहे .या मुलींचाही लग्नासाठी मुलांनी व वर पक्षाच्या लोकांनीही मनापासून व गंभिरपणे सविस्तर विचार केला पाहिजे . या गोष्टी मनापासून व खरया प्रेमानेच घडाव्यात. त्यामागे कोणताही उपकाराचा किंवा समाज सुधारणेचा हेतू नसावा .

In reply to by सिरुसेरि

धाग्याचा उद्देश वाढलेल्या अवास्तव अपेक्षा असा आहे नं :)

In reply to by सिरुसेरि

सिरुसेरि, प्रथम कल्पना म्हणून तरी एका पिढीच्या अन्यायाचा बदला पुढच्या पिढीकडून वसूल करण्याची कल्पनाच मला अतिशय अन्यायकारक वाटते. तसेही, स्त्रीच्या अन्यायासाठी स्त्रीयाच (सासू, इतर नातेवाईक जणी, शेजारणी) जास्त जबाबदार होत्या, आहेत आणि राहतील असे वाटते. उदाहरण म्हणून विधवा विवाहाचे घ्या.
तसेच आपल्या समाजात चूकीच्या लग्नाच्या बळी ठरलेल्या व फसवणूक झालेल्या घट्स्फोटीत मुलींचेह प्रमाण जास्त आहे . तसेच दुर्दैवाने अकालीच वैधव्य आलेल्या मुलींचेही बरेच प्रमाण आहे .या मुलींचाही लग्नासाठी मुलांनी व वर पक्षाच्या लोकांनीही मनापासून व गंभिरपणे सविस्तर विचार केला पाहिजे .
यात मुलांच्या घरातील महिला किती पुढाकार घेतील हो ? अगदी शिकल्या-सवरलेल्या आजच्या काळातल्या मुलीपण आपल्या भावासाठी अशा प्रस्तावांचा किती विचार करतील ? एक प्रसंग, एक चांगली उच्चशिक्षित मुलगी की जिने या सगळ्या अपेक्षा (काय ते पगार, फ्लॅट, गाडी वगैरे) मांडून लग्न केले, स्वतःही जॉब करते, तिच्या बाळाच्या कार्यक्रमास तिने तिच्या सख्ख्या काकूस बोलावणे टाळले कारण काय तर तिला मूल नाही. याला तिचा नवरादेखील काही करु शकला नाही कारण घरातल्या सगळ्याच बायकांचे यावर एकमत होते (हा धक्काच होता त्याला!). जर स्त्री-पुरुष हा किमान भेद गृहित धरला तरी स्त्री दुसर्‍या स्त्रीला कशी वागणूक देते ते सगळ्यात आधी महत्त्वाचे आहे. त्यात सुधारणा जास्त महत्त्वाची आहे. बाकी सगळे बोलायला ठीकच.

In reply to by हाडक्या

"प्रथम कल्पना म्हणून तरी एका पिढीच्या अन्यायाचा बदला पुढच्या पिढीकडून वसूल करण्याची कल्पनाच मला अतिशय अन्यायकारक वाटते" हि सूडजन्य परिस्थिती स्त्रिवर्गाने मुद्दामहून निर्माण केलेली नाही . तर , कालचक्राने निर्माण केलेली आहे . हा तर काळाचा महिमा आहे .

In reply to by सिरुसेरि

हि सूडजन्य परिस्थिती स्त्रिवर्गाने मुद्दामहून निर्माण केलेली नाही . तर , कालचक्राने निर्माण केलेली आहे . हा तर काळाचा महिमा आहे .
स्त्रीवर्गाने निर्माण केली की नाही (जणु त्यांच्या स्त्री भृणहत्येत अजिबातच हात नव्हता कधी) हा प्रश्न इथे नाही. तसाही ही सूडजन्य परिस्थिती आहे हेही मान्य नाही तरीही असे मानू की अशी परिस्थिती आहे. मग कालचक्राचा महिमा म्हणून अशा वेळी "एका पिढीच्या अन्यायाचा बदला पुढच्या पिढीकडून वसूल करणे" हे कसे बरोबर? काळाचा महिमा ही तर पळवाट झाली आणि ती घातकही आहे, कारण,उद्या परिस्थिती उलट झाल्यावर मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न की मग. अजून असे की मग हा "काळाचा महिमा" वाला नियम, आरक्षणे आणि तत्सम गोष्टींना ही लावणार काय? म्हणजे, आधीच "पुरुष" आणि त्यात so called "उच्चवर्णीय" म्हणून भारतात जन्माला आलास, आता भोग तुझ्या सगळ्याच पूर्वजांची फळे !! असा तुमचा निष्कर्ष दिसतो, जो की पूर्णपणे चुकीचा आणि अन्याय्य आहे.

In reply to by हाडक्या

म्हणजे, आधीच "पुरुष" आणि त्यात so called "उच्चवर्णीय" म्हणून भारतात जन्माला आलास, आता भोग तुझ्या सगळ्याच पूर्वजांची फळे !! असा तुमचा निष्कर्ष दिसतो, जो की पूर्णपणे चुकीचा आणि अन्याय्य आहे.
नायतर काय मायला...

In reply to by हाडक्या

हाडुकरावांशी सहमत!! वड्याचं तेलं वांग्यावर काढायचा प्रकार आहे हा. आणि एक पुरुष स्त्रीचा जितका छळ करत नसेल ना तितका स्त्रीचं स्त्रीचा करते.

In reply to by सिरुसेरि

हैयोहैयेयो तुमचा किंवा तुम्ही त्यांचे डूआयडी आहात का हो? कालचक्र काय, काळाचा महिमा काय!! नाडीबद्दल लिहायला लागू नका आता म्हणजे मिळवली!!

हा धागा इंचाइंचाने मिपावरचा प्रथम हजार-प्रतिसादी धागा बनतो आहे... याकरिता मुवि, मिपा आणि अनेक प्रतिसादकर्त्यांचे हार्दीक अभिनंदन !!! (मुवि आपले हात पहिले तोंडावर ठेऊन, मग कानावर ठेऊन, शेवटी आकाशाकडे उंचावून "हा बहुमान मला मिळेल कधी वाटले नव्हते. धन्यवाद मिपा, धन्यवाद प्रतिसादक, इ, इ" म्हणत आहेत अशी स्मायली आणि एखाद्या वार्षीक बक्षिससमारंभाचे पार्श्वसंगीत वाजत आहे असे कल्पावे. :) ;) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्याकडून याचा पण फ्लेक्ष तयार करुन घेउया का ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या धाग्याबद्दल मुविंना कशेळी कर्जत संमेलनात सन्मानीत करण्यात यावे असा ठराव मांडत आहे. *wink*

In reply to by जेपी

जोर्दार अणुमोदन...फक्त शाल व श्रीफळाऐवजी .... एल.पी. आणि पक्षी देउ :)

In reply to by टवाळ कार्टा

एल.पी. आणि पक्षी देउ
अरे, हे एल.पी. ठाऊक आहे पण हे पक्षी काय आहे ?

In reply to by हाडक्या

कात्रजला दरीपुलाजवळ एक हाटेल आहे "पंछी-क्रंची" नावाचं. :D

In reply to by हाडक्या

काय हे ? पक्षीतिर्थातले तिर्थ माहीत आहे आणि मग पक्ष्यांवर हा अन्याय करणे बरे दिसते का ? समग्र-पक्षीतिर्थ-भाविंक-मंडळातर्फे हाडक्या यांच्या घरावर भव्य मोर्चा काढण्यात यावा ! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अनुमोदन. मोर्चा काढून या. आणि येताना पक्षी (प्राणी पण चालतील तसे) आणि भरपूर तीर्थ पण घेऊन या.. (आमच्या शेतात मट्टण पार्टी करण्याची इच्छा असलेला)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कुणीही आक्रस्ताळे-पणे आपलीच बाजू योग्य, असे म्ह्णत नाही. हजार प्रतिसादापेक्षा, सुसंवाद करणारे मिपाकर मला तरी जास्त आवडले.

इंच इंच कमेंटत सहस्रकमेन्टदर्शनाकडे धाग्याची वाटचाल सुरु आहे. लगे रहो. लग्नाळू मित्रहो, पोरी बघून कंटाळलात की आमच्या कुशासनाशेजारी आपले दर्भासन टाका. आमच्या आश्रमात भरपूर जागा आहे. आपण मुलींची मानसिकता बदलावी ह्यासाठी तपश्चर्या करू... ;)

In reply to by स्वामी संकेतानंद

नक्को....आम्ची प्रायवेट तपश्चर्या अस्ते ;) आणि
लग्नाळू मित्रहो, पोरी बघून कंटाळलात की आमच्या कुशासनाशेजारी आपले दर्भासन टाका. आमच्या आश्रमात भरपूर जागा आहे.
यावरुन तुम्ही वेगळ्याच गुरुकुलातील दिस्ता =))

In reply to by टवाळ कार्टा

नाही नाही. आपले गुरुकुल एकच.. पण पोरींच्या अपेक्षा विनासायास पूर्ण करायला स्वामी बनणे हाच एक खात्रीचा उपाय दिसला. =))

In reply to by स्वामी संकेतानंद

विनासायास
स्वामी असलात तरी पण "सायास" तुम्हालाच करायला लागणार हो ? (समजले नाही तर पोगो नैतर आस्था चॅनल बघत बसा हो स्वामी.. ;) )

In reply to by स्वामी संकेतानंद

लग्नाळू मित्रहो, पोरी बघून कंटाळलात की पोरी बघण्यात कंटाळा कसला? ते काम तर आम्ही आजन्म करत राहू. (हो.लग्न झाल्यावरही) ;)

In reply to by यसवायजी

पोरी बघण्यात कंटाळा कसला? ते काम तर आम्ही आजन्म करत राहू. (हो.लग्न झाल्यावरही)
सग्ळ्या अनाहिता लाटणे मोर्चा काढतील तुमच्या घरावर =))

In reply to by टवाळ कार्टा

@टका - आता यात अनाहितांचा काय संबंध? येऊदेत आल्यातर. बघून घीन. तू काड्या टाक अजून. :))

In reply to by यसवायजी

अनाहितांना कधी कस्ल्या लॉजिकल कारणांची गरज पड्ते का =))

In reply to by टवाळ कार्टा

अवांतर:- यावरून एक ज्योक आठवला. Q.- what is the difference between a wife's arguments & a knife? . . Ans- the knife has a point.