✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 01/15/2015 - 03:24  ·  लेख
लेख
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
364438 वाचन

💬 प्रतिसाद (1423)

प्रतिक्रिया

दिसते तसे नसते :)

क्लिंटन
Sat, 01/17/2015 - 17:31 नवीन
तेव्हा प्रेमात बिमात पडण्याची शक्यता काय दिसत नै!
माझ्याविषयीही माझे सगळे नातेवाईक अगदी असेच म्हणत असत.मी पण मुळातला घिसाडीवालाच आणि आमच्या वर्गात तर चार वर्षे एकही मुलगी नव्हती.तरीही प्रेमविवाह करायचा तो केलाच :) तेव्हा अनेकदा दिसते तसे नसते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हुश्श!

पैसा
Sat, 01/17/2015 - 19:21 नवीन
आशेचा किरण दिसला!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

आशा कोण? किरण कोण?

आनंदी गोपाळ
गुरुवार, 06/16/2016 - 23:26 नवीन
आशा कोण? किरण कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आशा परेराचा बॉयफ्रेंड =))

टवाळ कार्टा
Fri, 06/17/2016 - 10:38 नवीन
आशा परेराचा बॉयफ्रेंड =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

आताचा का एक्ष?

सूड
Fri, 06/17/2016 - 17:48 नवीन
आताचा का एक्ष?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे असलं वाचून वर कोणीतरी

रेवती
Sat, 01/17/2015 - 17:20 नवीन
हे असलं वाचून वर कोणीतरी म्हटलय तसं वाटलं,स्वस्तात सुटले एकदाची! अपेक्षा काय असतात हे समजण्याआधीच लग्न झालं. एकच अट होती की हामेरिकेत राहणारा नको, पण त्या अटीचेही बंबाळे वाजले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

हे असे नुसतेच व्यवहार बघणारी

अजया
Sat, 01/17/2015 - 10:28 नवीन
हे असे नुसतेच व्यवहार बघणारी लग्न पाहुन मला या मुलींची काळजीच वाटते.जराही वाचन नाही,शाॅपिंग पलिकडे छंद नाही,तडजोडीची तयारी नाही,इतर जगात काय चाललं आहे याची उत्सुकता कणव नाही.मी सगळ्याच मुली अशा असतात नाही म्हणत आहे.पण उथळ विचारांचे प्राबल्य जेवढ्यांशी बोलले त्यात फार जाणवले. मुलांनी देखील आपली आवड छंद याला अनुरूप मुली शोधाव्या.त्यांनीही मग कमी शिकलेली किंवा गृहिणी व्हायची तयारी असलेली मुलगी मला चालेल असा विचार करायला हवाच.हप्ते फेडण्यासाठी चांगली नोकरीवाली मुलगी शोधताना तीही तिच्या अपेक्षा घेऊन येईल याची तयारी हवी. आपल्या आचारविचारांशी जुळते घेणारे मुलगा मुलगी हवेत.अन्यथा हा कोरडा व्यवहार होणार आहे.
  • Log in or register to post comments

+१

भावना कल्लोळ
Sat, 01/17/2015 - 14:54 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

माझा मॅनेजर ८ वी पास आहे.

विलासराव
Sat, 01/17/2015 - 10:47 नवीन
माझा मॅनेजर ८ वी पास आहे. नात्यात शोधाशोध केली तर १०-१२ वीच्या पुढचे स्थळ मिळेना. ग्रॅज्युएट मुली कशाला ८ वीच्या मुलाशी लग्न करतील? असा प्रश्न यायचा. अरे पण तो निर्व्यसनी आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, पैसे चांगले कमावतोय, स्वतःच ऑफीस घेतलय आनी स्वतःचा नवी मुंबईत प्लॅट घ्यायची तयारी झालीय हे मुद्दे गौण. नाहीतर हा ग्रॅज्युएट आहे असे खोटे सांगायचे हा प्रस्ताव होता. शेवटी एका मित्राला साकडे घातले मित्र मदतीला धावुन आला. मुलगी पाहीली आनी २४ डिसेंबरला साखरपुडाही झाला. मुलगी बी फार्म करतेय तिसर्‍या वर्षात शिकत आहे. लग्न मे ला कोर्टात करायचय. थोडक्याय काय घाबरुन जाउ नका. शोधा म्हन्जे सापडेल. हा पहा फोटो. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

जोडा शोभून दीसतोय. मुलीला

खटपट्या
Sat, 01/17/2015 - 15:24 नवीन
जोडा शोभून दीसतोय. मुलीला मानलं पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

@मुलीला मानलं पाहीजे.>>> ++

अत्रुप्त आत्मा
Sun, 01/18/2015 - 08:13 नवीन
@मुलीला मानलं पाहीजे.>>> ++++++११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

++१११

नाखु
Mon, 01/19/2015 - 11:57 नवीन
आयतोबा "बाळ" राजें पेक्षा हा कर्तब्गार बे-रोजगार* निवडला हे बेष्ट !!! * बे-रोजगार दोन-चार लोकांना रोजगार देणारा. (उगा अनर्थ नको)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मुलगी खरच छान आहे.

रेवती
Sat, 01/17/2015 - 17:20 नवीन
मुलगी खरच छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

मालक, फोटोतल्या मुलाची आणि

काळा पहाड
Wed, 01/21/2015 - 20:08 नवीन
मालक, फोटोतल्या मुलाची आणि मुलीचीही परमिशन घेतली नसेल तर फोटो उडवून टाका. गैरवापर होण्याची रिक्स असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

फार वेळ घालवू नका विचारात. जे

असंका
Sat, 01/17/2015 - 10:48 नवीन
फार वेळ घालवू नका विचारात. जे काय मिळेल ते लवकर पदरात पाडून घ्या. मुलांसाठी हातात थोडा वेळ ठेवा. तिशीच्या आत मुलं झाली तर आपण पन्नास पंचावन्नचे होइपर्यंत ते वीस पंचवीसचे होतील. मुलं एस्टॅब्लिश होण्यासाठी थोडी उमेद असेपर्यंतच आपण (वेळ पडल्यास) झगडा करू शकतो.
  • Log in or register to post comments

माझं लग्न २ महीने अगोदर झालं

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 01/17/2015 - 12:40 नवीन
माझं लग्न २ महीने अगोदर झालं!अगदी अनपेक्षित!!अन हो "अरेंज्ड" ! माझी नोकरी पैरामिलिटरी ची! त्यात पानपता पासुन "शिपायाला पोर द्यायची नाय" हा शिरस्ता! त्यात आमची नोकरी चाइना बॉर्डर ला! आनंद होता एकंदरीत!! माझे अरेंज्ड असले तरी २ स्टेट्स मैरिज आहे! बायको चे पूर्वज बरगीर म्हणून उत्तर हिन्दुस्तानात आलेले सांगायचे कारण हे की अम्हला पण लई सल्ले मिळाले होते!! बायको चे मराठी कमजोर आहे म्हणून !! नकार दे म्हणे! पण बाईल आमची गुणाची!! माळ घातली तर बापूसाहेबांसच! असे म्हणाली अन आम्ही आमच्या बुलेट ची पिलियन सीट पुसायच्या उद्योगाला लागलो!!! ;)
  • Log in or register to post comments

अर्रर्र

सुबोध खरे
Sat, 01/17/2015 - 13:05 नवीन
अर्रर्र पिलियनच्या सीट वर धूळ साठलेली वाचून डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

बार्डरी वर आपल्या हद्दीतच

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 01/17/2015 - 13:55 नवीन
बार्डरी वर आपल्या हद्दीतच रहायची सवय लागते! "ऑक्यूपेशनल हैजर्ड" :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

रम्य चर्चा

स्पा
Sat, 01/17/2015 - 15:12 नवीन
रम्य चर्चा
  • Log in or register to post comments

या धाग्यावरचे मुलींच्या

मधुरा देशपांडे
Sat, 01/17/2015 - 15:22 नवीन
या धाग्यावरचे मुलींच्या अपेक्षांचे प्रतिसाद प्रिंटआऊट काढुन ठेवावे म्हणते. नवर्‍याशी भांडण झाले की योग्य वेळी हे प्रतिसाद दाखवुन सांगायचे, बाबा रे, बघ तु पण नॉन आयटीवाला आहेस, फ्लॅट नाही, लहान बहीण आहे नि अजुन काय काय. ;) तरिही मी लग्न केलेय तुझ्याशी. किती नशीबवान आहेस याचा विचार कर. बाकी काही बोलु नकोस. गपगुमान राहा. :)))
  • Log in or register to post comments

तुमच्या

इरसाल
Sat, 01/17/2015 - 16:34 नवीन
पतिदेवाच्या दु:खात मी सहभागी आहे. सेम कंडिशन असलेला इरसाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुरा देशपांडे

H4 या व्हिसा प्रकारातील

टवाळ कार्टा
Sun, 01/18/2015 - 11:31 नवीन
H4 या व्हिसा प्रकारातील भारतीय स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर कुठे बघायला मिळेल काय? :)
  • Log in or register to post comments

या पश्नाकडे समस्त म्हैलांनी

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 20:10 नवीन
या पश्नाकडे समस्त म्हैलांनी सोयीस्कररीत्या काणाडोळा केलेला आहे ते बाकीच्या स्त्री-पुरुष समानतावाद्यांना समजले आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अगदी अगदी....पण त्यावरही

बॅटमॅन
Wed, 01/21/2015 - 17:27 नवीन
अगदी अगदी....पण त्यावरही उत्क्रांतीवर आधारित अर्ग्युमेंटे येतीलच. र्‍हावा तयारीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

येउदे की...मी कधीचा वाट बघतोय

टवाळ कार्टा
Wed, 01/21/2015 - 19:53 नवीन
येउदे की...मी कधीचा वाट बघतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लग्नसन्स्था लवकरच मोडकळीला

कवितानागेश
Sun, 01/18/2015 - 14:05 नवीन
लग्नसन्स्था लवकरच मोडकळीला येणार असा अन्दाज व्यक्त करतेय!
  • Log in or register to post comments

का ब्वा?

पैसा
Sun, 01/18/2015 - 14:18 नवीन
मिपावर काथ्या कुटला म्हणून? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मुलींच्या वाढलेल्या (अवास्तव)

टवाळ कार्टा
Sun, 01/18/2015 - 14:59 नवीन
मुलींच्या वाढलेल्या (अवास्तव) अपेक्षांमुळे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

बरं आहे की मग

आजानुकर्ण
Sun, 01/18/2015 - 17:47 नवीन
सध्या आहे तशी व्यवस्था मोडकळीला येत आहे ते चांगलंच आहे. एक तर लग्न म्हणजे आयुष्यभराचा १०० टक्के जुगार आहे. त्यात आजकाल मुलामुलींकडं स्वतःचाच भरपूर पैसा आल्याने हवं ते मिळवण्यासाठी लग्नाचीच आवश्यकता असते असं नाही हेही लख्ख कळतंय. कशाला जुगाराची रिस्क घेतील बॉ? त्यात आजूबाजूला लग्न केलेली सगळी जोडपी एक तर कावलेली दिसतात नाहीतर आंतरजालावर फ्रस्ट्रेशन बाहेर काढत असतात! माझा अनुभव तर असा आहे की या अवास्तव अपेक्षांमागचं मुळात कारण हे लग्न करण्याची इच्छा नसणं आणि ती इच्छा सांगण्याची सोय आपल्या व्यवस्थेत नसल्यानं उगीच थातुरमातुर कारणं सांगून लग्न लांबवत नेणं हीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

+११११ प्रतिसाद आवडला आहे.

प्रमोद देर्देकर
Mon, 01/19/2015 - 09:54 नवीन
+११११ प्रतिसाद आवडला आहे. बरोबर ही एक बाजुही अशु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

सहमत. लग्न म्हणजे खरोखर जुगार

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/19/2015 - 10:30 नवीन
सहमत. लग्न म्हणजे खरोखर जुगार झालाय. आपल्याकडे एक म्हण आहे. मुलगा आणि नारळं पुढे कसा निघेल सांगता येत नाही. आता त्या जोडीनी अरेंज मॅरेजामधला जोडीदार कसा असेल हे सांगता येतं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

नारळ बदलता येतो...आणि

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 10:32 नवीन
नारळ बदलता येतो...आणि समानतेचा जमाना आहे त्यामुळे "मुलगा आणि नारळं पुढे कसा निघेल सांगता येत नाही" या वाक्यामुळे माझ्या भावना दुखावल्या आहेत ;)....कुठे दगडफेक करावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

एक डाव धोबीपछाड मधला एक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 01/19/2015 - 10:40 नवीन
एक डाव धोबीपछाड मधला एक ड्वायलॉक आठिवला... "बाब्या, तुझ्या बापानी बनविल्या का रे म्हनी?" =)) ज्यानी म्हण बनवली त्याच्या घरावर मेणबत्ती मोर्चा नेउ रे आपण!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

दोनशे आणी हाफशेंच्युरी

जेपी
Mon, 01/19/2015 - 12:00 नवीन
दोनशे आणी हाफशेंच्युरी निमीत्त भावी श्री.वरांचा आणी भावी सौ.वधुंचा सत्कार एक एक अपेक्षा देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

"सौ.वधु" नाही रे..."चि.सौ.कां

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 12:09 नवीन
"सौ.वधु" नाही रे..."चि.सौ.कां.वधु" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

माझा काय पत्रिका छापायचा

जेपी
Mon, 01/19/2015 - 12:36 नवीन
माझा काय पत्रिका छापायचा व्यवसाय नाय. त्यामुळे गलतीसे मिष्टेक हो गया . :-) अवांतर-तिनशे करावे का ? अतिअवांतर-धागा टाकुन मुवि कुठे गायबले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अनेक विवाहोत्सुक तरूण

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/19/2015 - 12:47 नवीन
अनेक विवाहोत्सुक तरूण आपापल्या फुंकण्या घेऊन जोमाने धागा पेटलेला ठेवत आहेत ! त्यामुळे दर प्रतिसादाला प्रति-प्रतिसाद देऊन हवा देण्याच्या (उघड उघड) गनिमी काव्याची गरज या धाग्याला अजून पडलेली नाही. ;) त्यामुळे मुवि सौदी वाळवंटात खुर्ची टाकून खजूर खाता खाता चाय सुलेमानीचे घुटके घेत मजा पाहत आहेत (अश्या स्मायलीची कल्पना करा). +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मुवि सौदी वाळवंटात खुर्ची

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 13:03 नवीन
मुवि सौदी वाळवंटात खुर्ची टाकून खजूर खाता खाता चाय सुलेमानीचे घुटके घेत मजा पाहत आहेत (अश्या स्मायलीची कल्पना करा)
हातात चाय सुलेमानी...मनात एल.पी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

एलपी काय?

बॅटमॅन
Mon, 01/19/2015 - 13:05 नवीन
एलपी काय? मला के एल पी डी माहितेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 13:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्यात आजकाल मुलामुलींकडं

पिंपातला उंदीर
Wed, 01/21/2015 - 20:39 नवीन
त्यात आजकाल मुलामुलींकडं स्वतःचाच भरपूर पैसा आल्याने लै म्हन्जे लाइच सरसकट विधान. मुम्बै - पुने पुरते लागु. विदर्भ - मराठ्वादा वैगेरे तुम्च्या कक्षेत नसावेत बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

माझ्या बहिणीला आम्ही स्थळ

मीता
Mon, 01/19/2015 - 14:00 नवीन
माझ्या बहिणीला आम्ही स्थळ बघतोय .. एक स्थळ . मुलगा दहावी आणि बारावी मेरीट मध्ये आलेला . कुठल्याश्या भारी कॉलेजमधून MBA केलं होतं आणि IT हमाल . तो तर काहीच बोलला नाही .त्याचे वडील सगळ्यात जास्त बोलत होते . आम्ही आमच्या मुलाला हिंजवडी लांब पडत म्हणून कंपनी बदलायला सांगितली . हि लोक कोथरूड मध्ये राहणारी . दुसऱ्या मुलाला पण घराजवळ नोकरी बघायला सांगितली आहे . माझी बहिण इंजिनिअर आहे . IT कंपनी मधेच आहे . आणि तिची नोकरी करायची इच्छा आहे . तर मुलाचे वडील : नोकरी करायची काही गरज नाहीये . कशाला लागते नोकरी . आमचा मुलगा व्यवस्थित कमावतो. माझ्या बायकोनी कुठे केली नोकरी . आमच्या मुलाला हातात पाण्याचा ग्लास लागतो . त्यावर माझी आई म्हणाली कि अहो आजकाल मुलींचे पण खर्च वाढले आहेत आणि तिची इच्छा आहे नोकरी करायची. तर मुलाचे वडील : कशाला पाहिजे नको ते खर्च .उगाच आपलं beauty parlour मध्ये जायचं आणि पैसे उडवायचे . मी तर कधी पावडरपण लावत नाही . दुसरा किस्सा : पहिल्या अनुभवातून शहाणे होऊन ती पुढच्या स्थळाच्या वेळेस मी आधी त्याला भेटते आणि आवडला तर मग दोघांच्या आई बाबा ना भेटवू असा विचार केला. मुलाच्या ढीगभर अटी फक्त भेटायचं ठिकाण ठरवायला. मुलगी : शनिवारी किवा रविवारी भेटू या . मुलगा : मला ट्रेकिंग ला जायचं . आपण मंगळवारी भेटू माझं ऑफिस संपलं कि. मुलाच ऑफिस magarpatta ,मुलीचं ऑफिस कोथरूड. मुलगी : CCD मध्ये भेटू या . मुलगा : नको .मला तिथली कॉफ्फी नाही आवडत . मुलगी : मग dominos ला भेटू मुलगा: dominos चा पिझ्झा बेस फारच कडक असतो . मला नाही आवडत . मुलगी : मग अभिषेक ला भेटायचं का ? मुलगा: तिथे जेवण चांगलं असतं का? मुलगा भेटायच्या आदल्या दिवशी : जर्मन बेकरी ला भेटायचं का ?तिथे खायला मस्त मिळत असं आइकल आहे . मुलगी (वैतागून ): माझ्या होस्टेल च्या पार्किंग मधेच भेटू या . मला बोलणं महत्वाच आहे, जेवायला जाणे नाही . दोघेही अखेर अभिषेक ला भेटली . तिथे ह्या मुलानी त्याच नाव एका वृत्तपत्रात आलं होतं .त्याचं कात्रण घेऊन आला .आणि हिला म्हणाला वाच मोठ्यांनी .बघ माझं नाव आलं आहे पेपर मध्ये . *dash1*
  • Log in or register to post comments

जरा तुमच्या बहिणीच्या अपेक्षा

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 14:06 नवीन
जरा तुमच्या बहिणीच्या अपेक्षा सुध्धा लिहा की (इथे त्या २ नमुन्यांच्याची बाजू घेण्याची कोणतीही इच्छा नाहीये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता

बहिणीच्या अपेक्षा :

मीता
Mon, 01/19/2015 - 14:34 नवीन
बहिणीच्या अपेक्षा : १. शक्यतो IT मधला नसावा. (ती स्वतः IT मध्ये असली तरी तिला IT मधला नकोय ) २. मुलगा आणि त्याचे कुटुंबीय सुसंस्कृत असावेत. ३. मुलगा व्यवस्थित कमावता हवा (१ लाख पगार वगैरे अपेक्षा नाहीच आहेत ) पण बायको ला व्यवस्थित पोसू शकणारा हवा. उद्या जर तिला काही कारणांनी नोकरी सोडायला लागली तर त्याच्या पगारामध्ये घर नीट चालेल इतका. ४. फक्त बायको म्हणून नाही पण आयुष्याची जोडीदार म्हणून वागवणारा हवा .(यात बरेच मुद्दे आहे - निर्णय दोघे मिळून घेणे , एकत्र फिरणे , sharing ) उगाच नवरेपणा गाजवणारा नको. ५. मित्र ,मैत्रिणी बायकोलाही असतात हे समजून घेण्याची तयारी हवी. ६. त्याला स्वयंपाक यावा अशी अपेक्षा नाही पण कधीतरी मदत करायची तयारी दाखवावी (बायको स्वयंपाक करतेय तर निदान पाण्याचे ग्लास भरावेत ).किवा कधी बायको दमली असेल तर बाहेरून खायला आणायची किवा हॉटेल मध्ये जायची तयारी पाहिजे . ७. फिरायला जायची आवड हवी अर्थात बायकोबरोबर,घरातल्यांबरोबर . ८. भूतकाळातले affairs वर्तमान काळात आणि भविष्यात नकोय. ९.स्वतःच घर आत्ता नसलं तरी ठीक आहे पण भविष्यकाळात असाव .(अर्थात दोघांनी मिळून घ्याव ) १०. बाईक हवी हे must आहे .(तिला बाईक आवडते म्हणून ) ११. IT मधला जॉब आहे तर ९ ते ६ असं असेलच असंही नाही .कधी थांबायला लागल तर समजून घेतलं पाहिजे . १२. मुलगा अगदीच Handsome असावा अशी अपेक्षा नाही पण गबाळा नको . ही सगळी तिची मत आहेत . सगळ्यांची अशीच असतील असंही नव्हे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 14:45 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता

लिफ्ट हवी असल्यास

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/19/2015 - 16:13 नवीन
लिफ्ट हवी असल्यास स्मायल्यांच्या खूणा करणे सोडून सरळ विचारणा करा असा आगाऊ/आगावू सल्ला आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कोणीतरी असा सल्ला देईल असे

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 16:37 नवीन
कोणीतरी असा सल्ला देईल असे वाटलेच होते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

४. फक्त बायको म्हणून नाही पण

प्रसाद१९७१
Mon, 01/19/2015 - 14:47 नवीन
४. फक्त बायको म्हणून नाही पण आयुष्याची जोडीदार म्हणून वागवणारा हवा .(यात बरेच मुद्दे आहे - निर्णय दोघे मिळून घेणे , एकत्र फिरणे , sharing ) उगाच नवरेपणा गाजवणारा नको. ५. मित्र ,मैत्रिणी बायकोलाही असतात हे समजून घेण्याची तयारी हवी.
@मीता - वरील आणि त्या सारख्या गोष्टी बोलायला छान छान असतात. पण कुठलाही पॅरॅमिटर ठरवलात तर तो मोजायची सोय पण असायला हवी ना. वरील गोष्टी मुलात आहेत की नाही कसे कळणार अगदी ५ वेळा भेटुन सुद्धा. मुलाला सुद्धा स्वताला आपण लिबरल आहोत वगैरे गैरसमज असतात, पण एकदा नवरा बायको च्या नात्यात शिरल्यावर कोण कसा वागू शकेल ते सांगता येत नाही. त्या मुळे ज्या गोष्टी दिसतील ( घर्, फ्लॅट, गाडी, उंची, नोकरी, हँडसम दिसणे ) त्या नीट बघुन घ्याव्यात. ज्या मोजता येतीत ( पगार ) त्या मोजुन घ्याव्यात. बाकीच्या गोष्टी नशिबावर सोडाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीता

ज्या गोष्टी दिसतील ( घर्,

टवाळ कार्टा
Mon, 01/19/2015 - 14:54 नवीन
ज्या गोष्टी दिसतील ( घर्, फ्लॅट, गाडी, उंची, नोकरी, हँडसम दिसणे ) त्या नीट बघुन घ्याव्यात. ज्या मोजता येतीत ( पगार ) त्या मोजुन घ्याव्यात. बाकीच्या गोष्टी नशिबावर सोडाव्यात.
असे करण्यापेक्षा
वरील गोष्टी मुलात आहेत की नाही कसे कळणार अगदी ५ वेळा भेटुन सुद्धा.
यात बदल नाही का करता येणार??? ५ च्या ऐवजी १०-१५ वेळा भेटूदे की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

अहो अश्या भेटण्यात मुखवटेच

प्रसाद१९७१
Mon, 01/19/2015 - 15:01 नवीन
अहो अश्या भेटण्यात मुखवटेच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा