Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367426
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

In reply to by आजानुकर्ण

सहमत. लग्न म्हणजे खरोखर जुगार झालाय. आपल्याकडे एक म्हण आहे. मुलगा आणि नारळं पुढे कसा निघेल सांगता येत नाही. आता त्या जोडीनी अरेंज मॅरेजामधला जोडीदार कसा असेल हे सांगता येतं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नारळ बदलता येतो...आणि समानतेचा जमाना आहे त्यामुळे "मुलगा आणि नारळं पुढे कसा निघेल सांगता येत नाही" या वाक्यामुळे माझ्या भावना दुखावल्या आहेत ;)....कुठे दगडफेक करावी?

In reply to by टवाळ कार्टा

एक डाव धोबीपछाड मधला एक ड्वायलॉक आठिवला... "बाब्या, तुझ्या बापानी बनविल्या का रे म्हनी?" =)) ज्यानी म्हण बनवली त्याच्या घरावर मेणबत्ती मोर्चा नेउ रे आपण!!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दोनशे आणी हाफशेंच्युरी निमीत्त भावी श्री.वरांचा आणी भावी सौ.वधुंचा सत्कार एक एक अपेक्षा देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते =))

In reply to by टवाळ कार्टा

माझा काय पत्रिका छापायचा व्यवसाय नाय. त्यामुळे गलतीसे मिष्टेक हो गया . :-) अवांतर-तिनशे करावे का ? अतिअवांतर-धागा टाकुन मुवि कुठे गायबले?

In reply to by जेपी

अनेक विवाहोत्सुक तरूण आपापल्या फुंकण्या घेऊन जोमाने धागा पेटलेला ठेवत आहेत ! त्यामुळे दर प्रतिसादाला प्रति-प्रतिसाद देऊन हवा देण्याच्या (उघड उघड) गनिमी काव्याची गरज या धाग्याला अजून पडलेली नाही. ;) त्यामुळे मुवि सौदी वाळवंटात खुर्ची टाकून खजूर खाता खाता चाय सुलेमानीचे घुटके घेत मजा पाहत आहेत (अश्या स्मायलीची कल्पना करा). +D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुवि सौदी वाळवंटात खुर्ची टाकून खजूर खाता खाता चाय सुलेमानीचे घुटके घेत मजा पाहत आहेत (अश्या स्मायलीची कल्पना करा)
हातात चाय सुलेमानी...मनात एल.पी. ;)

In reply to by आजानुकर्ण

त्यात आजकाल मुलामुलींकडं स्वतःचाच भरपूर पैसा आल्याने लै म्हन्जे लाइच सरसकट विधान. मुम्बै - पुने पुरते लागु. विदर्भ - मराठ्वादा वैगेरे तुम्च्या कक्षेत नसावेत बहुतेक

माझ्या बहिणीला आम्ही स्थळ बघतोय .. एक स्थळ . मुलगा दहावी आणि बारावी मेरीट मध्ये आलेला . कुठल्याश्या भारी कॉलेजमधून MBA केलं होतं आणि IT हमाल . तो तर काहीच बोलला नाही .त्याचे वडील सगळ्यात जास्त बोलत होते . आम्ही आमच्या मुलाला हिंजवडी लांब पडत म्हणून कंपनी बदलायला सांगितली . हि लोक कोथरूड मध्ये राहणारी . दुसऱ्या मुलाला पण घराजवळ नोकरी बघायला सांगितली आहे . माझी बहिण इंजिनिअर आहे . IT कंपनी मधेच आहे . आणि तिची नोकरी करायची इच्छा आहे . तर मुलाचे वडील : नोकरी करायची काही गरज नाहीये . कशाला लागते नोकरी . आमचा मुलगा व्यवस्थित कमावतो. माझ्या बायकोनी कुठे केली नोकरी . आमच्या मुलाला हातात पाण्याचा ग्लास लागतो . त्यावर माझी आई म्हणाली कि अहो आजकाल मुलींचे पण खर्च वाढले आहेत आणि तिची इच्छा आहे नोकरी करायची. तर मुलाचे वडील : कशाला पाहिजे नको ते खर्च .उगाच आपलं beauty parlour मध्ये जायचं आणि पैसे उडवायचे . मी तर कधी पावडरपण लावत नाही . दुसरा किस्सा : पहिल्या अनुभवातून शहाणे होऊन ती पुढच्या स्थळाच्या वेळेस मी आधी त्याला भेटते आणि आवडला तर मग दोघांच्या आई बाबा ना भेटवू असा विचार केला. मुलाच्या ढीगभर अटी फक्त भेटायचं ठिकाण ठरवायला. मुलगी : शनिवारी किवा रविवारी भेटू या . मुलगा : मला ट्रेकिंग ला जायचं . आपण मंगळवारी भेटू माझं ऑफिस संपलं कि. मुलाच ऑफिस magarpatta ,मुलीचं ऑफिस कोथरूड. मुलगी : CCD मध्ये भेटू या . मुलगा : नको .मला तिथली कॉफ्फी नाही आवडत . मुलगी : मग dominos ला भेटू मुलगा: dominos चा पिझ्झा बेस फारच कडक असतो . मला नाही आवडत . मुलगी : मग अभिषेक ला भेटायचं का ? मुलगा: तिथे जेवण चांगलं असतं का? मुलगा भेटायच्या आदल्या दिवशी : जर्मन बेकरी ला भेटायचं का ?तिथे खायला मस्त मिळत असं आइकल आहे . मुलगी (वैतागून ): माझ्या होस्टेल च्या पार्किंग मधेच भेटू या . मला बोलणं महत्वाच आहे, जेवायला जाणे नाही . दोघेही अखेर अभिषेक ला भेटली . तिथे ह्या मुलानी त्याच नाव एका वृत्तपत्रात आलं होतं .त्याचं कात्रण घेऊन आला .आणि हिला म्हणाला वाच मोठ्यांनी .बघ माझं नाव आलं आहे पेपर मध्ये . *dash1*

In reply to by मीता

जरा तुमच्या बहिणीच्या अपेक्षा सुध्धा लिहा की (इथे त्या २ नमुन्यांच्याची बाजू घेण्याची कोणतीही इच्छा नाहीये)

In reply to by टवाळ कार्टा

बहिणीच्या अपेक्षा : १. शक्यतो IT मधला नसावा. (ती स्वतः IT मध्ये असली तरी तिला IT मधला नकोय ) २. मुलगा आणि त्याचे कुटुंबीय सुसंस्कृत असावेत. ३. मुलगा व्यवस्थित कमावता हवा (१ लाख पगार वगैरे अपेक्षा नाहीच आहेत ) पण बायको ला व्यवस्थित पोसू शकणारा हवा. उद्या जर तिला काही कारणांनी नोकरी सोडायला लागली तर त्याच्या पगारामध्ये घर नीट चालेल इतका. ४. फक्त बायको म्हणून नाही पण आयुष्याची जोडीदार म्हणून वागवणारा हवा .(यात बरेच मुद्दे आहे - निर्णय दोघे मिळून घेणे , एकत्र फिरणे , sharing ) उगाच नवरेपणा गाजवणारा नको. ५. मित्र ,मैत्रिणी बायकोलाही असतात हे समजून घेण्याची तयारी हवी. ६. त्याला स्वयंपाक यावा अशी अपेक्षा नाही पण कधीतरी मदत करायची तयारी दाखवावी (बायको स्वयंपाक करतेय तर निदान पाण्याचे ग्लास भरावेत ).किवा कधी बायको दमली असेल तर बाहेरून खायला आणायची किवा हॉटेल मध्ये जायची तयारी पाहिजे . ७. फिरायला जायची आवड हवी अर्थात बायकोबरोबर,घरातल्यांबरोबर . ८. भूतकाळातले affairs वर्तमान काळात आणि भविष्यात नकोय. ९.स्वतःच घर आत्ता नसलं तरी ठीक आहे पण भविष्यकाळात असाव .(अर्थात दोघांनी मिळून घ्याव ) १०. बाईक हवी हे must आहे .(तिला बाईक आवडते म्हणून ) ११. IT मधला जॉब आहे तर ९ ते ६ असं असेलच असंही नाही .कधी थांबायला लागल तर समजून घेतलं पाहिजे . १२. मुलगा अगदीच Handsome असावा अशी अपेक्षा नाही पण गबाळा नको . ही सगळी तिची मत आहेत . सगळ्यांची अशीच असतील असंही नव्हे .

In reply to by टवाळ कार्टा

लिफ्ट हवी असल्यास स्मायल्यांच्या खूणा करणे सोडून सरळ विचारणा करा असा आगाऊ/आगावू सल्ला आहे ;)

In reply to by मीता

४. फक्त बायको म्हणून नाही पण आयुष्याची जोडीदार म्हणून वागवणारा हवा .(यात बरेच मुद्दे आहे - निर्णय दोघे मिळून घेणे , एकत्र फिरणे , sharing ) उगाच नवरेपणा गाजवणारा नको. ५. मित्र ,मैत्रिणी बायकोलाही असतात हे समजून घेण्याची तयारी हवी.
@मीता - वरील आणि त्या सारख्या गोष्टी बोलायला छान छान असतात. पण कुठलाही पॅरॅमिटर ठरवलात तर तो मोजायची सोय पण असायला हवी ना. वरील गोष्टी मुलात आहेत की नाही कसे कळणार अगदी ५ वेळा भेटुन सुद्धा. मुलाला सुद्धा स्वताला आपण लिबरल आहोत वगैरे गैरसमज असतात, पण एकदा नवरा बायको च्या नात्यात शिरल्यावर कोण कसा वागू शकेल ते सांगता येत नाही. त्या मुळे ज्या गोष्टी दिसतील ( घर्, फ्लॅट, गाडी, उंची, नोकरी, हँडसम दिसणे ) त्या नीट बघुन घ्याव्यात. ज्या मोजता येतीत ( पगार ) त्या मोजुन घ्याव्यात. बाकीच्या गोष्टी नशिबावर सोडाव्यात.

In reply to by प्रसाद१९७१

ज्या गोष्टी दिसतील ( घर्, फ्लॅट, गाडी, उंची, नोकरी, हँडसम दिसणे ) त्या नीट बघुन घ्याव्यात. ज्या मोजता येतीत ( पगार ) त्या मोजुन घ्याव्यात. बाकीच्या गोष्टी नशिबावर सोडाव्यात.
असे करण्यापेक्षा
वरील गोष्टी मुलात आहेत की नाही कसे कळणार अगदी ५ वेळा भेटुन सुद्धा.
यात बदल नाही का करता येणार??? ५ च्या ऐवजी १०-१५ वेळा भेटूदे की

In reply to by टवाळ कार्टा

यात बदल नाही का करता येणार??? ५ च्या ऐवजी १०-१५ वेळा भेटूदे की
याला +१ आणि
मग माणूस ओळखण्यासाठी लिव्ह-इनला पर्याय नाही
टका.. याला +१०० आमच्या मनातले बोललात.!! खरेतर ५ भेटीत पण कोणी मुखवटा घेवून येणार असेल तर त्यालाच नंतर जास्त त्रास असणार नाही का ? (आयुष्यभर त्याच मुखवट्याच्या दबावाखाली राहण्याचे). म्हणजे असे की दोन्ही बाजूंना दुसरी बाजू नीट जाणून घ्यायची इच्छा असते, त्यामुळे दुसरे ५-५ भेटींसाठी मुखवटेच घेऊन येतील हे काही पटत नाही. (तसेही थोडे HR प्रश्न गाठीशी ठेवावेतच की आपल्याला हवे ते माणूस शोधायला. :) )

In reply to by मीता

शक्यतो IT मधला नसावा. (ती स्वतः IT मध्ये असली तरी तिला IT मधला नकोय )
तिला आयटीमधला नकोय तरी तुम्ही पाहिलेला पहिला मुलगा आयटी हमालच होता की!

In reply to by टवाळ कार्टा

हो ना. शिवाय अपेक्षांच्या यादीत तो नंबर १ चा मुद्दा असल्याने मला सर्वात महत्त्वाचा निकष आहे असे वाटले.

In reply to by आजानुकर्ण

"शक्यतो "असे लिहिलेले आहे. सगळ्याच गोष्टी हव्या तशाच मिळतात असही नाही. तडजोड प्रत्येक ठिकाणी आहेच .पण ती किती आणि कुठे करायची ते कळल पाहिजे .

In reply to by मीता

आजकाल मुलींचे पण खर्च वाढले आहेत आणि तिची इच्छा आहे नोकरी करायची.
माझ्या मते कसलेही explaination द्यायची गरज नाही. "मुलीची इच्छा आहे नोकरी करायची" इतके पुरेसे आहे.
मुलगी : CCD मध्ये भेटू या . मुलगा : नको .मला तिथली कॉफ्फी नाही आवडत .
ह्या पहील्या प्रश्नाच्या उत्तरावरच मुलीनी संभाषण थांबवायला हवे होते.

In reply to by प्रसाद१९७१

मुलगा: dominos चा पिझ्झा बेस फारच कडक असतो . मला नाही आवडत .
या वाक्यानंतर मुलालाच विचारायला हवे होते एकदा कि बाबा कुठे भेटायला जमेल...दर वेळी मुलगीच ठिकाण सुचवते आहे असे १ निरिक्षण नोंदवतो

In reply to by मीता

दुसर्‍या किश्श्यातला मुलगा लहान आहे अजुन. त्याला नक्की कशासाठी भेटायचे आहे हेच कळाले नसावे

In reply to by मीता

मग त्याला तिला भेटायचं नसेल, सगळेच जण फटकळ नसतात. "बाई गं, मला तुला भेटायचं नाही." असं स्पष्ट सांगणं नाही जमत काही लोकांना.

In reply to by सूड

आता आलाच आहात तर लावा हातभार... कमीत कमी एखादी काडी टाकून तरी. :) (मुविंचा चाय सुलेमानीचा कप अजून संपला नाही ;) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आता आलाच आहात तर लावा हातभार... कमीत कमी एखादी काडी टाकून तरी
असं म्हणता!! बरं!! धागा आणि प्रतिसाद वाचून एक सहज आपलं मनात आलं बरं का!! एवढे उपद्व्याप, वाढलेल्या अपेक्षा, लग्नाचे खर्च आणि मनासारखं नाही झालं तर परत ते टिकवायची कसरत...येवढं होऊन सुद्धा बाबांनो/बायांनो तुम्हाला वाटेल आणि पटेल तेव्हा लग्न करा असं म्हणणारी एकही व्यक्ती भेटलेली नाही. "अमुक इतकं वय? अजून लग्न नाही?" फार मोठा काहीतरी गुन्हा घडल्याचे भाव आणून अशाच पद्धतीची येणारी आणखी काही वाक्य!! अरे काय चाल्लंय काय!! *dash1*

In reply to by सूड

येवढं होऊन सुद्धा बाबांनो/बायांनो तुम्हाला वाटेल आणि पटेल तेव्हा लग्न करा असं म्हणणारी एकही व्यक्ती भेटलेली नाही. "अमुक इतकं वय? अजून लग्न नाही?" फार मोठा काहीतरी गुन्हा घडल्याचे भाव आणून अशाच पद्धतीची येणारी आणखी काही वाक्य!! अरे काय चाल्लंय काय!!
जाणिवांचा विकास झालेला नस्तो, मग वक्तव्येही अशीच येणार.

In reply to by बॅटमॅन

जाणिवांचा विकास झाल्यामुळे वयाचे परिणाम होणे थांबते की काय ? वेळेत लग्न झाले तर मुले, त्यांची आजारपणे, शिक्षण सेटलमेंट इ. जबाबदाऱ्या शरीरात ताकद असेपर्यंत निभावता येतील, हा विचार, वेळेत लग्न करण्यामागे.

In reply to by टवाळ कार्टा

तस काय नाय आता, लोक आणी संम दोघपण काश्मीर ला कंटाळले आहेत. त्यामुळे धागा 400 काय 700 (सप्तपदी) पर्यंत गेला तरी चालेल. *biggrin*

In reply to by टवाळ कार्टा

फूsss... फूsss... फूsss... ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

असं एका लयीत नका म्हणू....लोक आधीच पुर्षांची मंगळागौर म्हणतायेत, असं लयीत म्हणून फुगडी खेळायचा किंवा घागरी फुंकायचा इफेक्ट येतोय. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

फूsss... फूsss... फूsss...

In reply to by सस्नेह

अग्गागा...काय तो स्वतःबद्दलचा स्पष्टवक्तेपणा तुम्ही पडीक राहिला असता म्हणजे बाकीचे सुध्धा पडीक रहातील असे कशावरून वाटले =))

In reply to by टवाळ कार्टा

बाकीचे सुध्धा पडीक रहातील असे कशावरून वाटले
'बाकीचे' हा उल्लेख कुठे दिसला तुम्हाला ? चोराच्या मनात .... *biggrin*

In reply to by सस्नेह

टक्याशी सहमत.. बाकी चोराच्या मनात.. ऐवजी , पोराच्या मनात... हे चपखल ठरेल =))

In reply to by सस्नेह

आमच्या जाणीवा पुरेशा 'विकसित' नाहीत ! नैतर आम्ही अजून 'पडीक'च राहिलो असतो
याचाच अर्थ तुम्ही आत्ता पडिक नाही पण बाकीचे आहेत

त्या मुळे ज्या गोष्टी दिसतील ( घर्, फ्लॅट, गाडी, उंची, नोकरी, हँडसम दिसणे ) त्या नीट बघुन घ्याव्यात. ज्या मोजता येतीत ( पगार ) त्या मोजुन घ्याव्यात. बाकीच्या गोष्टी नशिबावर सोडाव्यात -------- ह्याच गोष्टी आजकाल वाढल्या आहेत असच काथ्या कुटणे चालू आहे ना