Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367426
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

सहवास नव्हे "सहजीवन" अश्या "बुरसटलेल्या" विचारांचा प्रतिगामी नाखु
सहमत.बुरसटलेल्या विचारांची प्रतिगामी अजया!

अरे बापरे इतके कॉम्प्लिकेटेड असते का हे? असे काही वाचल्यावर माझ्या हिलरीने मला किती मोलाची साथ दिली हे समजून येते. आमचे लग्न व्हायच्या साडेतीन वर्षे आधीपासून मी आणि हिलरी ऑनलाईन वेबकॅमवर चॅट करत होतो. अनेक वेळी फोनवरही बोललो होतो.त्यावेळी मी होतो अमेरिकेत (इंजिनिअरींगमधला एक बत्थड पी.एच.डी विद्यार्थी म्हणून) आणि हिलरी होती मुंबईत.त्यामुळे आम्ही एकदाही भेटलेलो नव्हतो. इंजिनिअरींगमधील पी.एच.डी माझ्याच्याने झेपणाऱ्यातली नाही आणि मला भारतात परत यावे लागणार हे कळले तेव्हा तो माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक कालखंड होता.त्यातून बाहेर येण्यासाठी काय करायचे याचा मी विचार करून ठेवला होता.पण त्याची अंमलबजावणी एका वर्षानंतरच सुरू करता येणार होती.मधल्या काळात मी नक्की कुठे राहणार, कुठली नोकरी करणार याचा अजिबात पत्ता नव्हता.आमच्या सुदैवाने सर्व काही सुरळीत झाले.आम्ही पहिल्यांदा भेटलो त्या दिवशी माझा इंटरव्ह्यू होता.त्याच इंटरव्ह्यूमध्ये मला पुण्यातील नोकरीची ऑफर दिली गेली.अर्थातच पगार जेमतेमच होता.त्यानंतर आम्ही भेटलो.यथावकाश लग्नही झाले.मुंबईबाहेर कधी यायची तयारी नसलेली हिलरी माझ्याबरोबर पुण्यात राहायला तयार झाली.त्यानंतर २००९ ते २०११ ही दोन वर्षे आम्ही दोघेही विद्यार्थी होतो.मी अहमदाबादला तर हिलरी मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये. लग्न झाल्यानंतर सव्वा वर्ष पूर्ण व्हायच्या आत आणखी दोन वर्षे दुसरीकडे राहणे पण तिने मान्य केले. मला मुंबईला फार येता यायचे नाही.पण शक्य असेल तेव्हा ती अहमदाबादला येत असे. अशावेळी दोन दिवस आम्ही हॉटेलात राहत असू. यासगळ्याविषयीही तिने अगदी एका शब्दाने तक्रार केली नाही.आमच्या दोघांच्याही नोकरीचे नक्की झाले ते पण एकाच दिवशी-- शेवटी १ फेब्रुवारी २०११ रोजी.त्यानंतर एप्रिल २०११ मध्ये आम्ही परत एकत्र राहायला सुरवात केली.त्यानंतर जवळपास दोन वर्षे माझे शिक्षणकर्ज फेडण्यासाठी अधिक उत्पन्न हवे म्हणून आठवडाभर ऑफिसबरोबरच बहुतांश रविवारी मी १० ते ३ असे ५ तास एका क्लासमध्ये शिकवायला जात असे.तरीही त्याविषयी हिलरीने एका शब्दानेही तक्रार केली नाही.पाच-सहा महिन्यापूर्वीच आम्ही आमचे पहिले वन बी.एच.के घर घेतले.आणि अर्थातच ही सुरवात आहे.अजून बरेच पल्ले गाठायचे आहेत.हिलरीने मला या सगळ्यात अगदी १००% साथ दिली. या धाग्यातील सगळे प्रकार वाचून वाटते की पत्रिका बघून, कांदेपोहे खायचा कार्यक्रम असता तर माझे लग्न अजूनपर्यंत होणे जरा कठिणच होते :)

हा नियम फक्त मुलीच्या आई ला नसावा . खरे म्हणजे दोन्हीही (२+२) पलक नि मुलांच्या संसारात फार लक्ष् घालू नये. त्यांनी मागितला तर सल्ला द्यावा . मुलीची आई असो व मुलाची, संसारात त्रास दोगींमुळे हि होऊ शकतो. खरे तर % पाहिलेत तर मला वाटते, १०० संसार जिथे शांतता नाही, त्यातले कमीतकमी ८० तर मुलाच्या आई च्या वागण्या मुळे असतील. किती मुलींच्या आया जावयांना टोमणे मारतात, धुसफूस करतात , आमच्या घराची पद्दत इ इ बोलून वात आणतात, जावयाने ऑफिसातून आल्यावर घराची कामे करावीत असे म्हणतात, मी सांगेन तेच आणि तसेच झाले पाहिजे असे म्हणतात? लक्ष्यात घ्या , हे सग्गळे आणि वरती बरेच काही, मुलांच्या आया करतात. आधी हि मानसिकता बदला , कि मुलगी आमच्या घरी आली आहे, म्हणून तिने आमच्या पध्दतीप्रमाणे वागले पहिजे. मनुष्य स्वभाव आहे कि त्याला प्रेम, appreciation हवे असते ते मुलाच्या आई कडून मिळाले, तर सुना सासरी का रमणार नाहीत?

In reply to by सामान्य वाचक

आमची आई बहुधा काळाच्या दोन पिढ्या पुढे असावी. लग्न झाल्यावर आमची बायको आईला प्रत्येक बाबतीत विचारत असे पण आमची आई तुम्हाला पटेल तसे करा असे सांगत असे. यात मंगळसूत्र घालायचे का कुंकू लावायचे का पासून जवळच्या नातेवाईकाच्या लग्नात जीन्स घातलेली चालेल का पर्यंत सर्व आले. ही २२ वर्षापुर्वीची गोष्ट आहे.( आमची आई अजूनही साडी व्यतिरिक्त दुसरे वस्त्र नेसत नाही.)आमच्या बायकोला हे जड गेले कारण तिला माहेरी सर्व निर्णय स्वतः घ्यायची अशी सवयच नव्हती शिवाय सासू म्हणेल ते ऐकायचे असे शिकवले गेले होते. आम्ही वेगळे राहायचे ठरवतो आहे असे माझ्या भावाने २० वर्षापूर्वी सांगितले( आणि मी १० वर्षापूर्वी) तेंव्हाही आमच्या घरात कोणतीही रडारडी झाली नाही. सर्व गोष्टी सामंजस्याने झाल्या. मुलांना कसे वाढवायचे यात मतभेद असले तरीही तुमची मुलं आहेत. तुम्हाला जसे पटेल तसे करा. आम्ही सूचना देतो पाळायच्या असतील तर पाळा. तिने दोन्ही सुनांच्या बाबतीत कोणतीही ढवळा ढवळ केली नाही. यामुळे आमच्या कुटुंबात शांतता आणि जिव्हाळा कायम आहे.

In reply to by सामान्य वाचक

धन्यवाद! थोडक्यात सासु सुनेला जशी वागवते तशी नक्कीच सासु जावयाला वागवत नाही.. त्यामुळे हा इश्यु असेलही पण जितका दाखवला जातोय तितक्या % मध्ये नाहीये.. सासु-सुनेच्या तुलनेत तर अजिबातच नाही..

मिपा लव्ह स्टोरीज अशी एक जिलेबी पाडावी म्हणतो .. सारे यशस्वी- अयशस्वी अनुभव वाचता येतील आणि होतकरूंना मार्गदर्शन देखील मिळेल .

अपेक्षा वधू - वरांच्या नव्हे तर समाजातल्या प्र्तयेक घटकाच्याच वाढल्या आहेत हे ही यानिमित्तने नमूद करतो. आणि जितक्या अपेक्षा जास्त तितका अपेक्षाभंग जास्त आणि दु:ख जास्त आणि म्हणून अनिश्चितता आणि भिती जास्त !! ती भिती कमी व्हावी म्हणून लोक वाट्टेल त्या थराला जातात ... लग्नाच्या बाजारात उभे राहून आपली बोली लावणारे आपल्या भोवती पैशाने विकत घेतलेले कचकड्याचे वलय उभे करून त्या भितीवर तोडगा शोधत राहतात. आणि लग्नानंतरीही त्याच कचकड्याला ठिगळांची जोड लावून अधिक मजबूत करत राहतात. बेकेलाईटी ! बेकेलाईटी !!! प्राथमिक शिक्षक म्ह्णून नोकरी करणार्‍या आमच्या पिताजींनी वयाच्या ५५ वर्षी घर बांधले!! नो ई एम आय ! काय तृप्त आहे त्यांचे वृद्धत्व ! गायीच्या दुधावरच्या सायीसारखे .. जाडसर आणि स्निग्ध !! इतके धावापळ केल्यावर आता मी एकच ध्येय ठेवले आहे... वयाच्या ६५ व्या वर्षी मागे वळून पाहताना एक ही पश्चातापाचा, कृतघनतेचा क्षण असू नये ! अफाट पैसा आणि कचकड्याची सुरक्षितता शोधताना आयुष्य जगायचे राहून जात आहे ! अपेक्षांचे ओझे झुकारून आला क्षण जगण्याचा विवेक जागृत व्हावा हीच एक अपेक्षा !

In reply to by विटेकर

तुमच्या वडिलांचा काळ वेगळा होता. आता ५५व्या वर्षी घर बांधायचे म्हटले तर तोपर्यंत लग्नही होणार नाही अशी परिस्थिती आहे.

In reply to by आजानुकर्ण

:) :)

लेटेस्ट उदाहरणः पात्रे (लग्नेच्छुक मित्र (बी.ई. मेकॅनिकल आणि एम.बी.ए. ऑपरेशन्स) व तो पहायला गेलेली मुलगी (एम.सी.ए. आणि सद्ध्या काहीतरी टेस्टींगचा कोर्स करतीये), हल्लीच्या पद्धतीप्रमाणे दोघ परस्पर बाहेर भेटली. तो: मी अमुक अमुक कंपनीमधे डिझाइन इंजिनिअर म्हणुन आहे. शिवाय बाहेर डिझाइन सॉफ्टवेअर्स पण शिकवतो एक दिवसाआड जाउन. ती: माझं नुकतचं एम.सी.ए. पुर्ण झालयं. आता सॉफ्टवेअर टेस्टिंग मधे काही कोर्स करतीये. अजुन नोकरीचा विचार केलेला नाही. तो: तुझ्या भावी जोडीदाराकडुन काय अपेक्षा आहेत? ती: शक्यतो आय.टी. कंपनीत हवा (अगं बै मग इथे भेटायला तरी कशाला आलीस!! इति: मित्र). पुण्यात स्वतःचं स्वतंत्र घर हवं. आई वडीलांची जबाबदारी असली तरी हरकत नाही (एक मुद्दा खरचं चांगला मांडला ह्या मुलीनी). एखादी सेदान हवी दारासमोर. तो: मी ऑटोमोबाईल कंपनीमधे नोकरीला आहे हे मी आधीचं सांगीतलयं. भविष्यामधेही आय.टी. मधे जाणार नाहीये (लढं पठ्ठ्या लढं.). पुण्यात आत्ता आई-वडीलांच्या २ बी.एच.के. मधे राहतोय. आणि लवकरचं स्वतःचा एक बी.एच.के. बुक करणार आहे. गाडी सद्ध्या शक्य नाही. जेव्हा मी आणि माझी होणारी बायको नोकरी करु आणि घरं घेतल्यावर घराचे इएमाय जाउन गाडी परवडेल असं वाटेल तेव्हा एखादी गाडी घेणार. ती: (वरच्या एकाही मुद्द्याला आत्ता प्रत्युत्तर नं देता) तुझ्या माझ्याकडुन काय अपेक्षा आहेत. तो: मला तु आवडली आहेस (मुर्ख साला!!! खरेदीचा पहिला नियमः आवडलेल्या वस्तुचं विक्रेत्यासमोर कधीचं कौतुक करायचं नाही. वि स र ला. ) माझ्या अपेक्षा एवढ्याचं की आई-वडीलांबरोबर जुळवुन घेणारी हवी. नोकरी केल्यास उत्तम. शिकायचं असेल तर आमची ना नाही. पण शिकुन नुसत घरी बसणारी नको. त्या शिक्षणाचा उपयोग करुन घेणारी हवी. पगाराचा भाग आपल्या घराचा खर्च भागवुन तुझ्या आईवडीलांना आर्थिक मदत करु शकतेस. तुझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायलाही जाउ शकतेस. ती: (५ मिनिटापुर्वीच्या मुद्द्यावर येत) नाही. मला २ बी.एच.केचं पाहिजे. शिवाय मी नोकरी करीन की नाही अजुन ठरवलेलं नाही. गाडी पण हवीचं. मी टु व्हीलर वर फिरणार नै (इसको क्या पता बाईक पे घुमना कितना रोमँटीक होता है). शिवाय तु मेकॅनिकल वाला मी आयटी वाली आपलं ट्युनिंग कसं जुळणारे? (मग मुर्ख मुली, आधी भेटायलाचं का आलीस? मी काय घरी गाड्या आणणारे का इंजिनं उघडायला किंवा गाडी गाडी खेळायला? का तु घरी ० १ ० १ ० १ खेळतं बसणारेस?) परत तु भविष्यात पण आयटीतं जायचं नाही असं म्हणतोयस. तो: आय.टी. मधे जाणार नाही. पुढे जाउन मला स्वतःची इंजिनिअरिंग कन्स्लटंसी सुरु करायचीये. आणि मला किमान ३ वर्ष अजुन गाडी घ्यायला जमणार नाहीये. तु विचार करुन सांग. ती: आपलं जमणार नाही. आपण इथेचं थांबुयात. गुडबाय. तो: ठिके. धन्यवाद. गुडबाय. (आजच्या कॉफीचे पैसे टी.टी.एम.एम. =)) ) ___________ हॉरीबल परिस्थिती आहे बाहेर राव. ह्या मागण्या अवास्तव नाहीत तर काय? बरं नंतर घेउ म्हणतोय ना. दोघांनी नोकरी केल्याशिवाय एवढं सगळं कसं मॅनेज होणार? थोडतरी कुठे समजुन घेतलं पाहिजे ना. असो गुरुवर्य प्रगो म्हाराज म्हणतात त्याप्रमाणे आता एखादी ए किंवा बी. टायपाची पोरगी प्रेफेरेबली जोशी प्रेमात पडतीये का पहायला पाहिजे 3 =)) (चिंताग्रस्त) कॅप्टन जॅक स्पॅरो

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शिवाय तु मेकॅनिकल वाला मी आयटी वाली आपलं ट्युनिंग कसं जुळणारे?
ठार मेले! लग्न झाल्यावर नवरा-बायको घरात नेमकं काय करतात अशी तिची कल्पना आहे? तुम्हा सगळ्या लग्नाळू पोरांना एक आत्याबैंचा प्रेमाचा सल्ला. घर गाडी घ्यायच्या भानगडीत न पडता उत्तर प्रदेश, बिहार राजस्तान मधली मुलगी शोधा. साधारण ३ वर्षांपूर्वी माझ्या बँकेतल्या दोन राजस्थानी पोरांची लग्नं झाली. दोघांच्या सासर्‍यांनी फ्लॅट आणि गाड्या घेऊन दिल्या. तिकडे नवर्‍यामुलाच्या नोकरीनुसार काय द्यावं लागतं याची लिस्ट तयार असते म्हणे. डॉक्टर असेल तर हिर्‍याचे दागिने वगैरे बरंच काय काय असतं. बँक ऑफिसरला एक फ्लॅट आणि वॅगन आर किंवा इंडिका व्हिस्टा मिळते म्हणे! =))

In reply to by पैसा

लग्न झाल्यावर नवरा-बायको घरात नेमकं काय करतात अशी तिची कल्पना आहे?
कै आयड्या नै बा तिच्या गुढग्यात काय कल्पना होत्या त्या!!! बहुतेक तिला ऑफिसचं काम घरी घेऊन येणार्‍या नवर्‍यांविषयी माहिती असावी. =)).... आता हा भौ काय ट्रकचं इंजिन घरी डिझाईन करणारे का? कंपनीत काम नै करत घरी काय करणार =)) ____
तुम्हा सगळ्या लग्नाळू पोरांना एक आत्याबैंचा प्रेमाचा सल्ला.
सकाळमधे आपला जॅक है...पैसात्त्याचा सल्ला कॉलम सुरु कर्ताय का? आम्ही मुक्तपीठीय प्रतिक्रिया देणार नै असं वचन देतो हवं तर.
घर गाडी घ्यायच्या भानगडीत न पडता उत्तर प्रदेश, बिहार राजस्तान मधली मुलगी शोधा.
उत्तर परदेश, बिहारमधली मुलगी हमकु पसंद नाही पडत है!! आपली मराठी मुलगीचं लै भारी असते... राजस्थानी मुलगी लग्नापर्यंत कशी दिसते हे घुंगटमधुन दिसत नै...सबब कटाप...!! =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ओ कॅप्टन साहेब गाडी घेणे आजकाल कुठल्याही लुंग्या सुन्ग्याला परवडतं. मी माझी ११ वर्षं जुनी मारुती रुपये २८, ०००/- फक्त ला २००७ साली विकली. पोरीला सेदान पाहिजे तर एक १० वर्षं जुनी सेडान ३०,०००/- ला विकत घ्या आणि पोरीला टेचात सांगा माझी सेडान जुनी झाली आहे आणि आता बदलायची आहे(जसं काही १० वर्षापासूनच माझ्याकडे गाडी आहे) हाकानाका

In reply to by सुबोध खरे

नाही हो नाही परवडत. गाडी विकत घ्यायला परवडते. मेंटेन करणं अवघड आहे. आणि तो काय घेतं नाही म्हणाला नव्हता. थोडी कळं काढायची तयारी पाहिजे एवढचं म्हणणं आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पैसात्त्याचा सल्ला कॉलम सुरु कर्ताय का? आम्ही मुक्तपीठीय प्रतिक्रिया देणार नै असं वचन देतो हवं तर.
मग काय उपेग? मुक्तपिठीय प्रतिक्रिया मस्टच!

In reply to by टवाळ कार्टा

गोयंकर सांगतील की रे तुला....!!! बाकी ठाण्यासारख्या (मध्यवर्तसमान) ठिकाणी तुला एक मुलगी मिळु नये...वैट्टं वाटलं बघं दुष्काळ बघुन. सरकारी पॅकेज मिळतं का बघं =))

In reply to by टवाळ कार्टा

टागालॉग भाषेमधे पोग्गीचा अर्थ "हँडसम ड्युड" असा घेतला जातो हे येथे विनम्रपणे लिहावेसे वाटले. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

ghanta

In reply to by टवाळ कार्टा

=)) =)) =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लग्नेच्छुक मित्राला बायको म्हणून एमसीए वगैरे झालेली मुलगी नक्की का बरं हवी आहे?

In reply to by आजानुकर्ण

त्याला इंजिनिअर मुलगीचं हवीये असं काही नाहीये. इंजिनिअर मिळाली तर उत्तम नाही मिळाली तर काही फरक पडत नाही. त्याची एवढीचं इच्छा आहे की मुलगी शिकलेली असेल तर शिक्षणाचा वापर करावा. घरी बसुन रहाण्यात काही अर्थ नाहीये.

मुलींना वेगळा फ्लॅट असणारा मुलगा का हवा याची कारणे काही लग्नेच्छुक भाच्यांकडुन मिळवून मी धन्य झाले त्यांची दूरदृष्टी बघून.(#$$आम्हाला नाही सुचलं.बसले हप्ते फेडत ^_~ ) १ सुरुवातीपासुूनच वेगळे राहाता येते. २ मूल झाल्यावर आईकडे ठेवता येते.सासरच्यांची मिजास नको. ३ आईचे घर तीस वर्षापूर्वी घेतलेले पौडात असल्याने,जास्तीत जास्त कोथरुडपर्यंतचाच फ्लॅट हवा! ४ सध्या या भागात फ्लॅट घेऊ शकणार्याला तेवढा पगार असायला तो अाय टी हमाल हवा. ५ आय टी सोडुन दुस्रं प्रोफेशन डाऊनमार्केट अस्तंय.(भिंतीवर डोके आपटा हीचे) ६ सणवाराचं सगळं आईच बघेल.मला काहीच येत नाही.ती जवळ बरी! ७ सध्या यातल्या एकीचे वय ३२ फक्त! ८ त्या जे सांगत आहेत यात काहीही गैर आईबापांना वाटत नाहीये हे विशेष. ९ परत जात पोटजात भानगडी आहेतच. १० तुझ्या वयात माझे लग्न होऊन मी मुंबईतून एका छोट्याश्या गावात आले.माझ्या नवर्याने त्याला आय टी वाल्या आॅफर माझा इथे जम बसणे,मुलाला सांभाळणे यासाठी नाकारुन प्राॅडक्शन बेस्ड कंपनीत नोकरी केली.तिच्या वयाची असताना माझे मूल ८वर्षाचे होते.हे ऐकुन तिला फारच हसू आले आणि असे काय तुम्ही हे मलाच ऐकवले गेले!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

माझ्या १८ वर्षाच्या मुलाची आत्तापासूनच काळजी पडलीय! तो तर बापडा सगळ्यात वैट्ट प्रकार शिकतोय. घिसाडी (मेक्यानिकल इंजिनियर) होणारे. आताच वर्गात ३ की ४ मुली आहेत म्हणे. आणि घरी अस्तो तेव्हा फूटबॉल बघत नाहीतर खेळत असतो. तेव्हा प्रेमात बिमात पडण्याची शक्यता काय दिसत नै!

In reply to by पैसा

माझा दहावीत आहे पैसाक्का!मीच त्याच्यासाठी सातवीपासुनच्या मुलींवर नजर ठेवुन बसायचा विचार करतेय ^_~ आमचंही ध्यान प्रेमात पडेल असं वाटत नाही!वेळेवर बुकिंग झाले म्हणजे बरें!!

In reply to by पैसा

पैसा ताई मग आमचे चिरंजीव तर बांधकामावरचे हमाल ( सिव्हील) मध्ये आहेत. पण आश्चर्य म्हणजे त्याच्या वर्गात ४०% मुली आहेत. त्यातून आमचे चिरंजीव मधून मधून कडक कपडे घालून सेंट वगैरे मारून कुठे कुठे जात असतात.म्हणजे मुलगा चांगल्या मार्गावर आहे असे वाटते. नाहीतर घरात असेल तर चेहऱ्यावर भजी तळता येईल इतके तेल असते. बाकी फुटबॉलचे म्हणाल तर आमच्याही घरी तोच कार्यक्रम आहे.

In reply to by सुबोध खरे

जरा तरी आशा आहे, कोणीतरी मुलगी भेटेल त्याला कॉलेजात!

In reply to by पैसा

घिसाडी मेकॅनिकल इंजिनिअर =)) चांगलयं की आता कळेल तुम्हाला मेकॅनिकल/ प्रोडक्शन आणि सिव्हील वाल्यांचं दु़ख्खः!!! आत्ताचं स्पष्ट कल्पना द्या, बाबा हो मेकॅनिकल इंजिनिअर, पण बायकोची सोय पण आत्ताचं करुन ठेव. ग्रॅजुएट व्हायच्या आत सोय झाली तर काही खरं नाही बाबा. =)) (सबमिशन च्या ओझ्याबरोबर हे ओझं!!! ;) ) वर्गात तीन-चार मुली असतील तर कटथ्रोट स्पर्धा आहे म्हणायची. =))
घिसाडी (मेक्यानिकल इंजिनियर)
इंजिनिअरिंगच्या मदर ब्रँचला घिसाडी म्हणल्याबद्दल अतीतिव्र णिषेध...!!! =))

In reply to by पैसा

पै ताई, तुझा मुलगा अजून १८ वर्षाचा आहे आणि माझा आताशी १० वर्षाचा. पण दीर तर माझा चांगला २८ वर्षांचा झाला आहे, पण स्वतः कुठे सुत जुळवेल याची जरा सुद्धा शक्यता नाही आहे, हल्ली मलाच कसलासा आजार झाला आहे कि काय असे वाटते, लोकल मध्ये, ग्रुप मध्ये त्याची एवढी समवयस्क मुलगी दिसली कि तिला जावेच्या रुपात पाहायला सुरवात ते तिची इंत्यभूत माहिती काढेपर्यंत. पण अजून कोणतीही मोहीम सर होईना. आमच्याकडे तर जाऊ बाई जोरात हे प्रकरण लयच गाजतय.

In reply to by पैसा

तेव्हा प्रेमात बिमात पडण्याची शक्यता काय दिसत नै!
माझ्याविषयीही माझे सगळे नातेवाईक अगदी असेच म्हणत असत.मी पण मुळातला घिसाडीवालाच आणि आमच्या वर्गात तर चार वर्षे एकही मुलगी नव्हती.तरीही प्रेमविवाह करायचा तो केलाच :) तेव्हा अनेकदा दिसते तसे नसते. :)

In reply to by अजया

हे असलं वाचून वर कोणीतरी म्हटलय तसं वाटलं,स्वस्तात सुटले एकदाची! अपेक्षा काय असतात हे समजण्याआधीच लग्न झालं. एकच अट होती की हामेरिकेत राहणारा नको, पण त्या अटीचेही बंबाळे वाजले.

हे असे नुसतेच व्यवहार बघणारी लग्न पाहुन मला या मुलींची काळजीच वाटते.जराही वाचन नाही,शाॅपिंग पलिकडे छंद नाही,तडजोडीची तयारी नाही,इतर जगात काय चाललं आहे याची उत्सुकता कणव नाही.मी सगळ्याच मुली अशा असतात नाही म्हणत आहे.पण उथळ विचारांचे प्राबल्य जेवढ्यांशी बोलले त्यात फार जाणवले. मुलांनी देखील आपली आवड छंद याला अनुरूप मुली शोधाव्या.त्यांनीही मग कमी शिकलेली किंवा गृहिणी व्हायची तयारी असलेली मुलगी मला चालेल असा विचार करायला हवाच.हप्ते फेडण्यासाठी चांगली नोकरीवाली मुलगी शोधताना तीही तिच्या अपेक्षा घेऊन येईल याची तयारी हवी. आपल्या आचारविचारांशी जुळते घेणारे मुलगा मुलगी हवेत.अन्यथा हा कोरडा व्यवहार होणार आहे.

माझा मॅनेजर ८ वी पास आहे. नात्यात शोधाशोध केली तर १०-१२ वीच्या पुढचे स्थळ मिळेना. ग्रॅज्युएट मुली कशाला ८ वीच्या मुलाशी लग्न करतील? असा प्रश्न यायचा. अरे पण तो निर्व्यसनी आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, पैसे चांगले कमावतोय, स्वतःच ऑफीस घेतलय आनी स्वतःचा नवी मुंबईत प्लॅट घ्यायची तयारी झालीय हे मुद्दे गौण. नाहीतर हा ग्रॅज्युएट आहे असे खोटे सांगायचे हा प्रस्ताव होता. शेवटी एका मित्राला साकडे घातले मित्र मदतीला धावुन आला. मुलगी पाहीली आनी २४ डिसेंबरला साखरपुडाही झाला. मुलगी बी फार्म करतेय तिसर्‍या वर्षात शिकत आहे. लग्न मे ला कोर्टात करायचय. थोडक्याय काय घाबरुन जाउ नका. शोधा म्हन्जे सापडेल. हा पहा फोटो. 1 2

In reply to by अत्रुप्त आत्मा

आयतोबा "बाळ" राजें पेक्षा हा कर्तब्गार बे-रोजगार* निवडला हे बेष्ट !!! * बे-रोजगार दोन-चार लोकांना रोजगार देणारा. (उगा अनर्थ नको)

In reply to by विलासराव

मालक, फोटोतल्या मुलाची आणि मुलीचीही परमिशन घेतली नसेल तर फोटो उडवून टाका. गैरवापर होण्याची रिक्स असते.

फार वेळ घालवू नका विचारात. जे काय मिळेल ते लवकर पदरात पाडून घ्या. मुलांसाठी हातात थोडा वेळ ठेवा. तिशीच्या आत मुलं झाली तर आपण पन्नास पंचावन्नचे होइपर्यंत ते वीस पंचवीसचे होतील. मुलं एस्टॅब्लिश होण्यासाठी थोडी उमेद असेपर्यंतच आपण (वेळ पडल्यास) झगडा करू शकतो.

माझं लग्न २ महीने अगोदर झालं!अगदी अनपेक्षित!!अन हो "अरेंज्ड" ! माझी नोकरी पैरामिलिटरी ची! त्यात पानपता पासुन "शिपायाला पोर द्यायची नाय" हा शिरस्ता! त्यात आमची नोकरी चाइना बॉर्डर ला! आनंद होता एकंदरीत!! माझे अरेंज्ड असले तरी २ स्टेट्स मैरिज आहे! बायको चे पूर्वज बरगीर म्हणून उत्तर हिन्दुस्तानात आलेले सांगायचे कारण हे की अम्हला पण लई सल्ले मिळाले होते!! बायको चे मराठी कमजोर आहे म्हणून !! नकार दे म्हणे! पण बाईल आमची गुणाची!! माळ घातली तर बापूसाहेबांसच! असे म्हणाली अन आम्ही आमच्या बुलेट ची पिलियन सीट पुसायच्या उद्योगाला लागलो!!! ;)

या धाग्यावरचे मुलींच्या अपेक्षांचे प्रतिसाद प्रिंटआऊट काढुन ठेवावे म्हणते. नवर्‍याशी भांडण झाले की योग्य वेळी हे प्रतिसाद दाखवुन सांगायचे, बाबा रे, बघ तु पण नॉन आयटीवाला आहेस, फ्लॅट नाही, लहान बहीण आहे नि अजुन काय काय. ;) तरिही मी लग्न केलेय तुझ्याशी. किती नशीबवान आहेस याचा विचार कर. बाकी काही बोलु नकोस. गपगुमान राहा. :)))

H4 या व्हिसा प्रकारातील भारतीय स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर कुठे बघायला मिळेल काय? :)

In reply to by टवाळ कार्टा

या पश्नाकडे समस्त म्हैलांनी सोयीस्कररीत्या काणाडोळा केलेला आहे ते बाकीच्या स्त्री-पुरुष समानतावाद्यांना समजले आहे का?

In reply to by कवितानागेश

सध्या आहे तशी व्यवस्था मोडकळीला येत आहे ते चांगलंच आहे. एक तर लग्न म्हणजे आयुष्यभराचा १०० टक्के जुगार आहे. त्यात आजकाल मुलामुलींकडं स्वतःचाच भरपूर पैसा आल्याने हवं ते मिळवण्यासाठी लग्नाचीच आवश्यकता असते असं नाही हेही लख्ख कळतंय. कशाला जुगाराची रिस्क घेतील बॉ? त्यात आजूबाजूला लग्न केलेली सगळी जोडपी एक तर कावलेली दिसतात नाहीतर आंतरजालावर फ्रस्ट्रेशन बाहेर काढत असतात! माझा अनुभव तर असा आहे की या अवास्तव अपेक्षांमागचं मुळात कारण हे लग्न करण्याची इच्छा नसणं आणि ती इच्छा सांगण्याची सोय आपल्या व्यवस्थेत नसल्यानं उगीच थातुरमातुर कारणं सांगून लग्न लांबवत नेणं हीच आहे.