✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११

च
चतुरंग यांनी
Sun, 11/23/2014 - 18:16  ·  लेख
लेख
रसिकहो माफ करा, आज धागा काढायला उशीर झाला. अकरावा डाव. आनंद ५.५ वि.४.५ गुणांनी मागे. काळी मोहोरी घेऊन आज तो काय करणार? कोणते नवीन वेरिएशन मॅग्नुसला विचारात पाडेल? चुका करायला भाग पाडेल? आज आनंद जिंकला तर सामना पूर्ण पणे झुकेल आज हरला तर संपलेच! आज बरोबरी झाली तर परवाच्या डावाची उत्कंठा काहीच्या काही शिगेला पोचेल. चला डाव बघूयात. कृपया पट टाका.

Book traversal links for आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११

  • ‹ आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १०
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
18161 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

याप्रकारात, सध्या तो सी-४ प्यादं घालवावं का नाही

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 21:09 नवीन
असा विचार करतोयं असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आयला, जमलं की!

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 21:12 नवीन
बरोब्बर तेच खेळलायं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आनंदचा डाव जवळपास

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 21:14 नवीन
गेल्यात जमा आहे. घोडा खाता येत नाही आता राजा सी ६ घेऊन थोडेफार चान्सेस आहेत, मॅग्नुसने त्याचा टेंपरामेंट न घालवता खेळ केलाय...सामन्यातला हा बहुदा शेवटचा डाव ठरणार..
  • Log in or register to post comments

बरोब्बर!

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 21:22 नवीन
दोन हत्ती आहेत म्हटल्यावर कार्लसन काहीही करु शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

चतुरंग हा गेम टाईम लाईनवर कुणी हारु शकेल काय?

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 21:18 नवीन
.
  • Log in or register to post comments

नाही नाही

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 21:19 नवीन
आनंदनं ४० वी खेळी वेळात केली की झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

प्याद्यांचा एंडगेम

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 21:20 नवीन
आणि एकेक मूवचे कॅलक्यूलेशन! तुफान चाललाय डाव. जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत असा डाव बघितला नव्हता! आनंदने डावत पुन्हा जान आणली आहे!!
  • Log in or register to post comments

प्याद्यांचा एंडगेम होणार नाही

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 21:28 नवीन
कार्लसनचे हत्ती सगळी वाट लावून टाकतील. पण गेम बहारदार होतोयं हे निखालस! आणि त्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद! वर्ल्ड चँपियनशिप इतकी जवळून आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

झाला!

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 21:29 नवीन
मॅग्नुस पुन्हा चँपिअन झाला! आनंदचे कॅलक्यूलेशन चुकले कुठे तरी... अन्यथा त्याने डाव चांगला उलटवत आणला होता... मॅग्नुसच्या चॅंपिअनशिपसाठी त्याचे अभिनंदन!! :)
  • Log in or register to post comments

अन्यथा त्याने डाव चांगला उलटवत आणला होता...

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 21:33 नवीन
हे मात्र अमान्य. कारण कार्लसनचे दोन हत्ती मात करायला पुरेसे होते म्हणून आनंदला हार मानावी लागली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नाही हो

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 21:42 नवीन
शेवटी हत्ती रहात नव्हते. खेळ जवळपास तोललेला होता. आर बी ३ झाले असते तर चित्र बरेच वेगळे दिसू शकले असते..निदान आनंदने आजचा ड्रॉ करायला हवा होता तो नर्वस डिसिजन मधे गेला आणि डाव गमावून बसला. मॅग्नुसने त्याचे टेंपरामेंट चांगलेच टिकवलेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आयला, खरंच की!

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 23:08 नवीन
माझ्याकडे बी * बी५ लाच कार्लसन जिंकल्याच दिसलं! म्हणून तर तुमच्या मागोमाग मी सुद्धा `कार्लसन जिंकला' म्हणालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

जिंकला की कार्लसन!

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 21:30 नवीन
!
  • Log in or register to post comments

आनंदने चांगला आक्रमक खेळ केला परंतु

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 21:31 नवीन
तणावाखाली तो ब्रेकडाऊन झाला आणि कॅलक्यूलेशन चुकले. मॅग्नुसचा खेळ निर्विवाद उच्च झाला. ही इज ए न्यू चँपिअन!!
  • Log in or register to post comments

सत्ताविसाव्या खेळीला

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 21:34 नवीन
आनंदने हत्ती बी ३ असा आणायला हवा होता त्याने गेम आणखीन लांबवायचे चान्सेस होते...
  • Log in or register to post comments

अपेक्षितच...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/23/2014 - 21:47 नवीन
मी मागच्या वर्षीच म्हटलं होतं आनंदचा सचीन तेंडूलकर झालाय. तुम्ही लोक ऐकत नाही माझं. मी आज डाव पाहिला नाही. माझा मानसिक त्रास वाचला धन्यवाद. लोभ असावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

तसं नाहीये

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 21:54 नवीन
इथे आनंदने कँडिडेट स्पर्धा जबरदस्त पद्धतीने जिंकून या सामन्याचा आव्हानवीर म्हणून प्रवेश पटकावला होता! यात स्वेच्छेने निवृत्ती वगैरे घ्यायचा प्रश्न नाहीये त्यामुळे सचिन आनंदची तुलना पूर्णपणे अयोग्य आहे. प्रेस कॉन्फरंसमध्ये देखील आनंदला विचारले की आता तो चेस खेळणे सोडणार आहे का त्याने एका शब्दात उअत्तर दिले "नाही!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदने कँडिडेट स्पर्धा जबरदस्त पद्धतीने जिंकून

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 22:58 नवीन
या सामन्याचा आव्हानवीर म्हणून प्रवेश पटकावला होता!
एकदम मान्य! बहुदा त्यानं त्याचे सेकंडस बदलायला हवेत, म्हणजे विचारांचा अँगल बदलायला हवा. तो (बहुतेक) क्लिष्ट विचार करतो (लाँग ड्रॉन प्लान) आणि कार्लसन सोपा आणि सहज विचार करतो त्यामुळे त्याचा खेळ जास्त इफेक्टीव आणि थरारक होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

कार्लसन उत्तम होता...मानसिकतेत आनंद कमी पडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/25/2014 - 07:38 नवीन
गेले दोन दिवस बुद्धीबळाच्या जेष्ठ जाणकारांचे बुद्धीबळाबद्दलचे लेखन वाचतोय. जवळ जवळ सर्वांचेच मत बनले आहे की 'दोघांच्याही डावात सर्वोत्तम खेळ बघायला मिळाला नाही, पण दोघांच्या संयम हाच या लढतीतला मोठा फरक होता, त्यात तरुण कार्लसनने बाजी मारली. तरुण वयातील आक्रमकता त्याच्या खेळीत नव्हती तर प्रचंड असा संयम होता आणि हेच सर्वात महत्वाचे होते पण यात आनंदच्या वाढत्या वयाचा मुद्दा राहुन राहुन येतोच खेळाडुला वय नसतं तो केव्हाही फॉर्ममधे येऊ शकतो पण शारिरीक मानसिक क्षमता वयोमानानुसार कमी होत जाते हेच सत्य आनंदलाही शेवटी स्वीकारावे लागले'' आनंद पूर्वीच्या स्पर्धा जिंकल्यामुळे या स्पर्धेत तो आव्हानवीर म्हणुन उतरला ही गोष्ट मान्य. पण त्या खोडसाळ कार्लसनचं मत आपण वाचलं असेलच की त्याला आनंद या स्पर्धेत आव्हानवीर म्हणुन आला याचंच आश्चर्य वाटलं याचा अर्थ अस की तो आनंदला जोखून आहे. रंगाशेठ, तुम्ही बुद्धीबळाचे उत्तम जाणकार आहात. आनंदला किमान दोन डावात जिंकण्याची उत्तम संधी होती आणि आनंदने अशावेळी चुका केल्या आणि वर्चस्व असलेल्या डावात पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं त्याचं कारण एकच आनंद त्याच्याविरुद्ध मानसिक लढाईत आनंद कमी पडला आणि त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मला असं म्हणायचय की कार्लसन

कंजूस
Sun, 11/23/2014 - 23:12 नवीन
मला असं म्हणायचय की कार्लसन पुढे आनंदचा टिकाव लागत नाही हे सिध्द झालंय कारण १)आनंदची पांढरी असली की कार्लच्या खोड्या सुरू होतात -वजीर मारणे, राजाला हलवून कोट न करू देणे, उंट घोडे उडवणे. हे करताना पांढरीवाला निराश होऊन चुकला की तो डावपण खिशात टाकणे. याचे एक उदा॰ खंदकवाला अभेद्य किल्याचा किल्लेदार सूस्त राहतो आणि शत्रू फितुरी करवून किल्ला खिशात टाकतो. २)त्याच्याकडे पांढरी असतांना त्याला हवा तसा खेळ करवतोच ३)राजा एचपासून सीपर्यँत हलवायला घाबरत नाही.
  • Log in or register to post comments

सहमत!

संजय क्षीरसागर
Mon, 11/24/2014 - 00:21 नवीन
आनंद क्लासिकल खेळायला जातो आणि कार्लसन स्पाँटेनियस (आणि तरीही बिनचूक) खेळतो, हाच नेमका फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

@ कंजूस....

मुक्त विहारि
Mon, 11/24/2014 - 00:35 नवीन
धन्यवाद.... (आता नक्की कशाबद्दल. ते भारतभेटीत सांगतोच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कार्लसन चे अभिनंदन!

आनंद
Mon, 11/24/2014 - 11:31 नवीन
कार्लसन चे अभिनंदन! ११ सामने बघताना मजा आली. या बुद्धीबळ्मय वातावरणात. मि.पा. वर बुद्धीबळ स्पर्धा घेता येतिल का?
  • Log in or register to post comments

बहुगुणीं ना धन्यवाद, मिपावर

आनंद
Tue, 11/25/2014 - 14:52 नवीन
बहुगुणीं ना धन्यवाद, मिपावर बुद्धीबळ स्पर्धेची तयारी चालु आहे असे दिसतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

सो

प्रसाद गोडबोले
Mon, 11/24/2014 - 15:06 नवीन
कार्लसन हाच नंबर वन आहे हे पुन्गा एकदा सिध्द झाले !
  • Log in or register to post comments

या खेळात एका उंटासाठी हत्तीचा

कंजूस
Mon, 11/24/2014 - 15:45 नवीन
या खेळात एका उंटासाठी हत्तीचा का बळी दिला हे कळले नाही. नंतर राजाने घोडा का घेतला नाही -कार्लचा हत्ती बी स्तंभात बी१ येउन उंटाची पाठ मोडेल वाटते. सुमो कुस्तीचे पैलवान जिंकले की योकोझुना होतात. पुढच्या स्पर्धेत हरले तरी खेळतात. शिवाय आखाड्यात नवीन पैलवानांना सरावासाठी त्यांच्याशी कुस्ती करतात. हेसुध्दा एक कामच असते. आनंदने आता हेच करावे.
  • Log in or register to post comments

@मुवि काय गंमाडी गंमत आणताहात

कंजूस
Mon, 11/24/2014 - 15:49 नवीन
@मुवि काय गंमाडी गंमत आणताहात ?
  • Log in or register to post comments

@ कंजूस....

मुक्त विहारि
Tue, 11/25/2014 - 07:43 नवीन
काही नाही... तुम्हाला गुरु केल्याने आम्हाला बराच फायदा होत आहे. थोडे फार खेळता येईल, इतपत आम्हाला पण शिकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

कोणी मंदिरा बेदी /आलिया भट या

कंजूस
Mon, 11/24/2014 - 15:54 नवीन
कोणी मंदिरा बेदी /आलिया भट या खेळासाठी समालोचन चर्चा करण्यासाठी आल्यास खेळाचे दडपण कमी होऊन न्यानात भर पडेल का ?
  • Log in or register to post comments

आनंद कार्लसनची स्पर्धा संपली

जेपी
Tue, 11/25/2014 - 15:29 नवीन
आनंद कार्लसनची स्पर्धा संपली का ? आता डाव होणार की नाही.
  • Log in or register to post comments

कार्लसन दोन गुणांनी पुढे आणि एक गेम उरलेली

संजय क्षीरसागर
Wed, 11/26/2014 - 11:24 नवीन
त्यात आनंद जिंकला तरी एक गुणानं कार्लसन पुढेच राहाणार म्हणून १२ वी गेम झाली नाही, आणि मॅच संपली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मला वाटतय आता कार्लसनला

प्रसाद गोडबोले
Wed, 11/26/2014 - 11:51 नवीन
मला वाटतय आता कार्लसनला हरवायला कोणी तरी एकदम तरुण माणुसच आला पाहिजेल करुआना , अनिश किंवा नाकामुरा वगैरे . आनंदला कुठे कमी लेखायचा प्रयत्न नाही पण आनंदच्या खेळातुन सरळ सरळ स्पष्ट पणे त्याचं वय जाणवत होतं . आता पाहु कॅन्डीडेट्स टुर्नामेन्टची वाट :)
  • Log in or register to post comments

वरकरणी आनंदच्या वयाचा प्रश्न वाटला तरी त्यानं फक्त अप्रोच

संजय क्षीरसागर
Wed, 11/26/2014 - 12:27 नवीन
बदलायचा आवकाश आहे. लाँग ड्रॉन प्लान्सपेक्षा, सुटसुटीत तीन किंवा चार चालींचे निर्विवाद प्लान्स करत इनिशिएटीव स्वतःकडे ठेवायचा प्रश्न आहे. तुम्ही कार्लसनचे सगळे गेम्स पाहा, तो इनिशिएटीव कायम स्वतःकडे ठेवतो. आनंदची बोर्ड-विजन (म्हणजे खेळी करुन झाल्यावर बोर्ड कसा दिसेल ते विज्युअलाइज करण्याची क्षमता) निव्वळ असामान्य आहे (आणि ती देखिल वेगवेगळ्या काँबिनेशन्सच्या सात-आठ मूव्हज नंतर!). त्यानं ११ व्या गेममधे विपरित परिस्थितीत केलेला खेळ अद्वितीय होता. १० व्या गेममधे वजीर जिवंत करुन सुद्धा त्याचा फायदा उठवू शकला नाही हे त्याचं केवळ दुर्दैव ! (खरं तर कार्लसनची न डगमगता खेळण्याची क्षमता!) माझ्या मते त्यानं ताज्या दमाचे (तरुण) सेकंड्स घेतले की काम झालं. बुद्धीबळात क्षमता कधीही कमी होत नाही, फक्त विचार करण्याची पद्धत बदलायला लागते. कारण खेळ तर त्याच्याकडे आहेच. सलग ५ वेळा जगज्जेतेपद राखणं सोपी गोष्ट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

Reference :TOI Article (Nov 26)

vikramaditya
Wed, 11/26/2014 - 13:43 नवीन
The top three players in the history of Modern Chess are Bobby Fischer, Garry Kasparov and Magnus Carlsen. (as per the opinion of most experts) अमित करमरकर ह्यांचा पूर्ण लेख वाचनीय आहे. तज्ञांच्या मते वर उल्लेखलेले तीन्ही खेळाडु आपल्या काळाच्या पुढे होते/ आहे. (अहेड ऑफ देअर टाईम्स) लेखकाच्या मते आनंद आणि क्रॅमनिक हे ग्रेट चँपियन असले तरी , नॉट इन द सेम क्लास.
  • Log in or register to post comments

संक्षी ,दहाव्या गेममध्ये

कंजूस
Wed, 11/26/2014 - 14:05 नवीन
संक्षी ,दहाव्या गेममध्ये प्यादाचा वजीर करण्याच्या चार खेळी अगोदर पट फिरवून अदलाबदल केली असती तर तो गेम कार्लसनने जिंकून दाखवला असता याबद्दल खात्री आहे. मी लहानपणी धाकट्या भावाबरोबर खेळायचो आणि हरलो म्हणायचो तेव्हा माझा गेम तो घेऊन मला पुन्हा हरवायचा !
  • Log in or register to post comments

एकदम मान्य आहे!

संजय क्षीरसागर
Wed, 11/26/2014 - 15:28 नवीन
कार्लसननं ज्या पद्धतीनं तो गेम ड्रॉकडे नेला, ती त्याची न डगमगण्याची क्षमता कुणीही विसरु शकणार नाही. तो जिनिअस आहे. यापूर्वी एकही चेस चँपियनशिप मॅच इतकी लक्षपूर्वक पाहिली नव्हती कारण (खरं तर) चेस बोअर व्हायचा. ज्या वेळी कार्लसनचा खेळ पाहिला तेंव्हापासून मला चेसमधे इंटरेस्ट निर्माण झाला. माझ्या दृष्टीनं तरी, आपला-परका अशा बालिश कल्पना खेळात कधीच नसतात, खेळ हा खेळ असतो आणि कौशल्य हे कौशल्यंच असतं. तस्मात, मी आनंदचा चाहता वगैरे नाही पण त्याची बोर्ड विज्युअलायजेशन कपॅसिटी (ची ग्रँडमास्टची बेसिक रिक्वायरमंट आहे), कार्लसनपेक्षा भारी आहे.... तो डावपेच लांबचे आखतो त्यामुळे अपयशी होतोयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा