✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११

च
चतुरंग यांनी
Sun, 11/23/2014 - 18:16  ·  लेख
लेख
रसिकहो माफ करा, आज धागा काढायला उशीर झाला. अकरावा डाव. आनंद ५.५ वि.४.५ गुणांनी मागे. काळी मोहोरी घेऊन आज तो काय करणार? कोणते नवीन वेरिएशन मॅग्नुसला विचारात पाडेल? चुका करायला भाग पाडेल? आज आनंद जिंकला तर सामना पूर्ण पणे झुकेल आज हरला तर संपलेच! आज बरोबरी झाली तर परवाच्या डावाची उत्कंठा काहीच्या काही शिगेला पोचेल. चला डाव बघूयात. कृपया पट टाका.

Book traversal links for आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११

  • ‹ आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १०
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
18161 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

पुन्हा एकदा बर्लिन!

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 18:24 नवीन
क्रामनिकने कास्पारोवला हरवले त्यावेळेपासून हा बचाव भलताच प्रसिद्ध झाला. या सामन्यात सगळ्याच डावात मॅग्नु पांढर्‍याने खेळताना हाच बचाव वापरला गेलाय. नवव्या खेळीला आनंदने उंट डी७ अशी वेगळी चाल केली आणि मॅग्नुसला थोडे विचारात पाडले.
  • Log in or register to post comments

सोळाव्या खेळीनंतर काळा राजा बी७ असा सरक्लाय हत्तीला

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 18:39 नवीन
पट्टी मोकळी करुन देण्यासाठी पुढची खेळी सी६ असे प्यादे सरकवून घोड्याला हुसकावून लावणे असू शकेल, त्याआधीच मॅग्नुस त्याचा घोडा एफ ६ असा नेऊन ठेवू शकतो. ई५ वरच्या प्याद्याला त्याने उंट, घोडा आनी हत्ती असे तीन जोर लावून ठेवलेत त्यामुळे ते प्यादे आणि घोडा अशा काँबिनेशनने ठाणे धरुन ठेवायचे हा प्लॅन आहे. आनंदकडे काय प्रत्युत्तर आहे? एफ ८ वरचा काळा उंट बाहेर काढून हत्तींचा समन्वय करणे आणि पांढर्‍याला आत घुसण्यापासून रोखणे.
  • Log in or register to post comments

पट

बहुगुणी
Sun, 11/23/2014 - 18:44 नवीन
  • Log in or register to post comments

हा पट कसा टाकायचा इथे?

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 18:44 नवीन
.
  • Log in or register to post comments

या दुव्यावर

बहुगुणी
Sun, 11/23/2014 - 18:59 नवीन
या दुव्यावर जाऊन Magnus Carlsen vs Viswanathan Anand [*] असं लिहिलं आहे त्यावर क्लिक करा (आता १२वा डाव्यात तुम्हाला हे करता येईल्) म्हणजे पट दिसू लागेल, त्या पटाखाली साधारण मध्यभागी डावीकडे embed दिसेल, त्यावर क्लिक करून This game or the whole tournament? असे options मिळतील. त्यानंतर Game सिलेक्ट करा, मग small 567X720 किंवा big 726X705 असे options मिळतील. small 567X720 वर क्लिक करून जो code दिसेल तो कॉपी करा, आणि मिपाच्या खिडकीत पेस्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

धन्यवाद!

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 19:09 नवीन
हा embed कोड सापडला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मॅग्नुसचा रोख राजाच्या बाजूला प्यादी सरकवायला सुरुवात करणे

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 18:52 नवीन
आहे. जी ४ असे प्यादे सरकले आणि घोडा डी२, ई४ असा उड्यामारुन दुसरा घोडा एफ६ वरती आला तर काळ्याची परिथिती कठिण होणार.. आनंदने वजिराच्या बाजूला प्रतिहल्ल्याची तयारी केलीच पाहिजे परंतु त्याची मोहोरी तिकडे हलवणे आत्ता कठिण दिसते आहे..
  • Log in or register to post comments

घड्याळात आनंद किंचितसा

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 18:56 नवीन
पुढे आहे फक्त ५ मिनिटांनी..अजूनतरी स्थिती बरोबरीची आहे परंतु आनंदने आता ए प्यादे सरकवून पटाचा भाग व्यापणे गरजेचे आहे अन्यथा जागेची घुसमट मोहोर्‍यांची मुसकटदाबी करते आणि मग डाव कठिण होत जातो. एकदम थेट हल्ला करण्यापेक्षा मॅग्नुस अजगरासारखी घुसमट करतो..
  • Log in or register to post comments

त्याबाबतीत तो कार्पोवसारखा खेळतो

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 18:57 नवीन
बोआ काँस्ट्रिक्टर!! :)
  • Log in or register to post comments

येस!

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 18:57 नवीन
ए प्यादे ६ मधे सरकले...
  • Log in or register to post comments

ए ५ असे सरकले

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 18:59 नवीन
आणि मॅग्नुसने ताबडतो ए ४ असे प्यादे सरकवून त्याची वाट रोखली, घोडा ई ७ मधे घेऊन जी६ किंवा सी ६ असा येण्याची तयारी शिवाय पांढरा उंट मोकळा करुन घेतला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंदचा राजा फार एक्सपोज झालायं

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 18:58 नवीन
आणि कार्लसनचे दोन्ही हत्ती आणि डी-५ मधला घोडा फुल स्विंगमधे आहेत.
  • Log in or register to post comments

कार्लसनचा डी-५ मधला घोडा

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 19:03 नवीन
आनंदला तापदायक ठरणारे. तो हालल्या बरोबर कार्लसननं भेदी खेळी केली!
  • Log in or register to post comments

डी कॉलमच्या

रामदास
Sun, 11/23/2014 - 19:07 नवीन
वर्चस्वासाठी ह्या खेळी आहेत का ?
  • Log in or register to post comments

हो

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 19:14 नवीन
पटाच्या मध्यात कार्लसनचे वर्चस्व आहे. तिथून पोझीशन भेदून मोहोरी आत घुसवणे हा उद्देश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

राजाचा मोहर्‍यासारखा उपयोग करण्याचं कौशल्य

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 19:13 नवीन
कार्लसनकडनं शिकावं! मला वाटतं इट इज द मोस्ट डेअरींग थींग.
  • Log in or register to post comments

या पोझीशन्मध्ये

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 19:19 नवीन
हे कॉमन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कार्लसनची १९ वी मूव

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 19:17 नवीन
महत्त्वाची ठरणारे!
  • Log in or register to post comments

कार्लसन आता बहुदा

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 19:20 नवीन
बी-३ खेळणार!
  • Log in or register to post comments

उंट आणि घोड्याने जी प्याद्याला जोर लावल्याने

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 19:21 नवीन
आनंद एच ५ खेळू शकतो. मॅग्नुसने एच ४ खेळी केली तर मारामारी होऊ शकते!
  • Log in or register to post comments

आज चाल करताना

रामदास
Sun, 11/23/2014 - 19:33 नवीन
आनंद वेळ कमी घेतो आहे काय ?
  • Log in or register to post comments

आनंदने

बहुगुणी
Sun, 11/23/2014 - 19:33 नवीन
आनंदने कार्लसनच्या घोड्यासाठी हत्ती (आणि उंट) ईरेला घालण्यापेक्षा सी प्यादे पुढे का सरकवलं नसेल?
  • Log in or register to post comments

सी फाईलमधे आधीच आनंदची पॉन्स डबल-अप झालीयेत

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 19:39 नवीन
ती खेळी केली की राजाला हालायचा आणखी लोच्या होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

काळे प्यादे सरकवण्यातला

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 19:46 नवीन
मुख्य प्रॉब्लेम असा आहे की पांढर्‍या उंटाची हलायची घरं जवळपास बंद होतात. राजाच्या बाजूला घरं बंद झालीच आहेत. त्यात सी प्यादे सरकले की उंट बंदिस्त झाला आणि डी ७ असा मागे गेला तर हत्तीच्या वाटेत येतोय त्यामुळे ते प्यादे सरकवणे अवघ्ड आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कार्लसन

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 19:48 नवीन
एफ ४ असे प्यादे खेळला तर मात्र सी ६ ही थ्रेट होते कारण तो घोडा हलला तर एफ ४ वरचे प्यादे किंचित दुबळे होते..
  • Log in or register to post comments

आयला!

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 19:53 नवीन
आता खेळ फुल ओपन होणार!
  • Log in or register to post comments

कार्लसन बहुदा

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 19:55 नवीन
सी४ * बी५ खेळणार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आता असे दिसते आहे की

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 19:57 नवीन
कार्लसन घोडा एच५ असा आणून एफ ४ ची तयारी करणार त्यामुळे आनंदला सी ६ असे प्यादे रेटून घोड्याला मागे ढकलणे भाग आहे. परंतु मग एफ प्यादे ५ मधे आले तर उंट घोडा असा फोर्क देऊ शकते...त्यामुळे त्या दोन मोहोर्‍यांना जागा हवी!
  • Log in or register to post comments

कार्लसनचा गेम थरार निर्माण करणारा आहे

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 20:01 नवीन
तो आता पटाच्या डाव्याबाजूलाच सगळा खेळ करणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ओहो आनंदने

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 19:58 नवीन
गँबल खेळला!! बी प्यादे पाच वर टाकले. सॅक्रिफाईस.. वजिराची बाजू मोकळी करुन हत्ती घुसवणे हा प्लॅन आहे का?
  • Log in or register to post comments

एक अतिशय

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 20:05 नवीन
इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली आहे की तीनही प्रोसेसिंग इंजिन्स काळ्याची थिती किंचित सरस दाखवत आहेत!! आनंदला हे अ‍ॅडवांटेज जिंकण्यापर्यंत नेता येईल का?
  • Log in or register to post comments

कार्लसननला गेम ओपन झाला!

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 20:06 नवीन
आता आनंदचं अवघड आहे.
  • Log in or register to post comments

प्रत्यक्षात उलट आहे...

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 20:09 नवीन
आनंदची स्थिती आता जास्त चांगली आहे..तुम्ही पुन्हा काळ्या पांढर्‍या मोहोर्‍यांचा घोळ घालताय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

नाही

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 20:13 नवीन
माझ्या मते कार्लसनची स्थिती जास्त आक्रमक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आणि त्याचा राजा सुद्धा जास्त सुरक्षित आहे

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 20:20 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मॅग्नुसची घोडी

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 20:30 नवीन
मोक्याच्या जागांवर असली तरी त्यांच्या प्रगतीचा स्पष्ट मार्ग नाहीये. उलट बी संभ अचानक मोकळा झाल्याने मॅग्नुसला ते खिंडार कसे बुजवावे हा प्रश्न सतावणार आहे. आता बी स्तंभाचे वर्चस्व विरुद्ध घोड्यांई थिती आणि डी स्तंभाचे वर्चस्व असा लढा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आता जरी आनंदनं बी फाईलमधे हत्ती आणला असला तरी

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 20:35 नवीन
बी फाईलकडून कार्लसनला काहीही धोका संभवत नाही. सगळा खेळ डी फाईलवर अवलंबून आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

नक्कीच डी स्तंभावर खेळ अवलंबून आहेच

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 20:38 नवीन
परंतु त्याला थेट काउंट्र करण्यापेक्षा बी स्तंव्भ मोकळा करुन खेळाचा रोख हलवणे हाच प्रतिहल्ला ठरु शकतोय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कार्लसनचा डी-५ मधला घोडा

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 20:23 नवीन
आधीच तापदायक होता. आता पुन्हा एफ-६ मधल्या घोड्यामुळे तो केंव्हाही पुनर्जन्म घेऊ शकतोयं!
  • Log in or register to post comments

दोघांनाही घड्याळाकडे

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 20:26 नवीन
लक्ष देणे गरजेचे आहे. चौदा खेळ्यांना साधारणपणे तीस मिनिटे आहेत. थिती बर्‍यापैकी काँप्लिकेटेड असल्याने वेळ बराच लागणार आहे..
  • Log in or register to post comments

कार्लसनची दुसर्‍याच्या सायकॉलॉजीशी खेळायची कला

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 20:28 नवीन
गमतीशिर आहे. जेंव्हा त्याला नक्की काय करावं हा प्रश्न पडतो तेंव्हा तो, निर्णय शिताफीनं प्रतिस्पर्ध्याकडे पास करतो!
  • Log in or register to post comments

उदाहरणार्थ,

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 20:31 नवीन
त्याची राजा एफ-३ ही आता केलेली मूव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ती मूव

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 20:34 नवीन
करायलाच हवी होती कारण त्याने घोडा एफ ४ ही आनंदची खेळी रोखली गेली..त्यात सयकॉलॉजी नाहीये थेट खेळ आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वॉव

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 20:41 नवीन
हत्ती बी ४ टाकलाय आनंदने हत्तीचा सॅक्रिफाईस आणि दोन मोहोरी + दोन प्यादी असा मामला होणार बीस्तंभातले प्यादे डोकेदुखी करायचा प्लॅन आनंदचा!!
  • Log in or register to post comments

हे सॅक आनंदला

चतुरंग
Sun, 11/23/2014 - 21:49 नवीन
महागात पदले...त्याला पुरेसे कोंपेन्सेशन नव्हते आणि मॅग्नुसने एवढ्या ताणात अचूक निर्णय घेतला त्याबद्दल त्याला मानायलाच हवे. आनंदने देखील हे प्रेस कॉन्फरंसमधे मान्य केले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आनंद मस्त खेळलायं!

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 20:43 नवीन
गेममधे रंगत आली.
  • Log in or register to post comments

आनंदनं खेळाचा सगळा फोकस डी फाईलवरनं बी फाईलवर नेलायं !

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 20:50 नवीन
बहोत खूब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कार्लसननं मोठ्या शिताफिनं एच फाईलमधला स्वतःचा घोडा

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 20:59 नवीन
अ‍ॅक्टीव केला!
  • Log in or register to post comments

आता या फोर्कमुळे

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 21:02 नवीन
आनंदला, घोडा घालवायचा की उंट असा प्रश्न पडलायं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आता कार्लसन घोड्यानं घोडा घेईल!

संजय क्षीरसागर
Sun, 11/23/2014 - 21:06 नवीन
आणि त्याच्याकडे दोन हत्ती आहेत त्यांनी चढाई सुरु करेल.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा