Skip to main content

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ११

लेखक चतुरंग यांनी रविवार, 23/11/2014 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
रसिकहो माफ करा, आज धागा काढायला उशीर झाला. अकरावा डाव. आनंद ५.५ वि.४.५ गुणांनी मागे. काळी मोहोरी घेऊन आज तो काय करणार? कोणते नवीन वेरिएशन मॅग्नुसला विचारात पाडेल? चुका करायला भाग पाडेल? आज आनंद जिंकला तर सामना पूर्ण पणे झुकेल आज हरला तर संपलेच! आज बरोबरी झाली तर परवाच्या डावाची उत्कंठा काहीच्या काही शिगेला पोचेल. चला डाव बघूयात. कृपया पट टाका.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18238
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

क्रामनिकने कास्पारोवला हरवले त्यावेळेपासून हा बचाव भलताच प्रसिद्ध झाला. या सामन्यात सगळ्याच डावात मॅग्नु पांढर्‍याने खेळताना हाच बचाव वापरला गेलाय. नवव्या खेळीला आनंदने उंट डी७ अशी वेगळी चाल केली आणि मॅग्नुसला थोडे विचारात पाडले.

पट्टी मोकळी करुन देण्यासाठी पुढची खेळी सी६ असे प्यादे सरकवून घोड्याला हुसकावून लावणे असू शकेल, त्याआधीच मॅग्नुस त्याचा घोडा एफ ६ असा नेऊन ठेवू शकतो. ई५ वरच्या प्याद्याला त्याने उंट, घोडा आनी हत्ती असे तीन जोर लावून ठेवलेत त्यामुळे ते प्यादे आणि घोडा अशा काँबिनेशनने ठाणे धरुन ठेवायचे हा प्लॅन आहे. आनंदकडे काय प्रत्युत्तर आहे? एफ ८ वरचा काळा उंट बाहेर काढून हत्तींचा समन्वय करणे आणि पांढर्‍याला आत घुसण्यापासून रोखणे.


In reply to by संजय क्षीरसागर

या दुव्यावर जाऊन Magnus Carlsen vs Viswanathan Anand [*] असं लिहिलं आहे त्यावर क्लिक करा (आता १२वा डाव्यात तुम्हाला हे करता येईल्) म्हणजे पट दिसू लागेल, त्या पटाखाली साधारण मध्यभागी डावीकडे embed दिसेल, त्यावर क्लिक करून This game or the whole tournament? असे options मिळतील. त्यानंतर Game सिलेक्ट करा, मग small 567X720 किंवा big 726X705 असे options मिळतील. small 567X720 वर क्लिक करून जो code दिसेल तो कॉपी करा, आणि मिपाच्या खिडकीत पेस्ट करा.

आहे. जी ४ असे प्यादे सरकले आणि घोडा डी२, ई४ असा उड्यामारुन दुसरा घोडा एफ६ वरती आला तर काळ्याची परिथिती कठिण होणार.. आनंदने वजिराच्या बाजूला प्रतिहल्ल्याची तयारी केलीच पाहिजे परंतु त्याची मोहोरी तिकडे हलवणे आत्ता कठिण दिसते आहे..

पुढे आहे फक्त ५ मिनिटांनी..अजूनतरी स्थिती बरोबरीची आहे परंतु आनंदने आता ए प्यादे सरकवून पटाचा भाग व्यापणे गरजेचे आहे अन्यथा जागेची घुसमट मोहोर्‍यांची मुसकटदाबी करते आणि मग डाव कठिण होत जातो. एकदम थेट हल्ला करण्यापेक्षा मॅग्नुस अजगरासारखी घुसमट करतो..

ए प्यादे ६ मधे सरकले...

In reply to by चतुरंग

आणि मॅग्नुसने ताबडतो ए ४ असे प्यादे सरकवून त्याची वाट रोखली, घोडा ई ७ मधे घेऊन जी६ किंवा सी ६ असा येण्याची तयारी शिवाय पांढरा उंट मोकळा करुन घेतला..

In reply to by रामदास

पटाच्या मध्यात कार्लसनचे वर्चस्व आहे. तिथून पोझीशन भेदून मोहोरी आत घुसवणे हा उद्देश.

आनंदने कार्लसनच्या घोड्यासाठी हत्ती (आणि उंट) ईरेला घालण्यापेक्षा सी प्यादे पुढे का सरकवलं नसेल?

In reply to by बहुगुणी

मुख्य प्रॉब्लेम असा आहे की पांढर्‍या उंटाची हलायची घरं जवळपास बंद होतात. राजाच्या बाजूला घरं बंद झालीच आहेत. त्यात सी प्यादे सरकले की उंट बंदिस्त झाला आणि डी ७ असा मागे गेला तर हत्तीच्या वाटेत येतोय त्यामुळे ते प्यादे सरकवणे अवघ्ड आहे...

एफ ४ असे प्यादे खेळला तर मात्र सी ६ ही थ्रेट होते कारण तो घोडा हलला तर एफ ४ वरचे प्यादे किंचित दुबळे होते..

आता खेळ फुल ओपन होणार!

कार्लसन घोडा एच५ असा आणून एफ ४ ची तयारी करणार त्यामुळे आनंदला सी ६ असे प्यादे रेटून घोड्याला मागे ढकलणे भाग आहे. परंतु मग एफ प्यादे ५ मधे आले तर उंट घोडा असा फोर्क देऊ शकते...त्यामुळे त्या दोन मोहोर्‍यांना जागा हवी!

गँबल खेळला!! बी प्यादे पाच वर टाकले. सॅक्रिफाईस.. वजिराची बाजू मोकळी करुन हत्ती घुसवणे हा प्लॅन आहे का?

इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली आहे की तीनही प्रोसेसिंग इंजिन्स काळ्याची थिती किंचित सरस दाखवत आहेत!! आनंदला हे अ‍ॅडवांटेज जिंकण्यापर्यंत नेता येईल का?

In reply to by संजय क्षीरसागर

आनंदची स्थिती आता जास्त चांगली आहे..तुम्ही पुन्हा काळ्या पांढर्‍या मोहोर्‍यांचा घोळ घालताय का?

In reply to by संजय क्षीरसागर

मोक्याच्या जागांवर असली तरी त्यांच्या प्रगतीचा स्पष्ट मार्ग नाहीये. उलट बी संभ अचानक मोकळा झाल्याने मॅग्नुसला ते खिंडार कसे बुजवावे हा प्रश्न सतावणार आहे. आता बी स्तंभाचे वर्चस्व विरुद्ध घोड्यांई थिती आणि डी स्तंभाचे वर्चस्व असा लढा आहे!

In reply to by चतुरंग

बी फाईलकडून कार्लसनला काहीही धोका संभवत नाही. सगळा खेळ डी फाईलवर अवलंबून आहे

In reply to by संजय क्षीरसागर

परंतु त्याला थेट काउंट्र करण्यापेक्षा बी स्तंव्भ मोकळा करुन खेळाचा रोख हलवणे हाच प्रतिहल्ला ठरु शकतोय..

आधीच तापदायक होता. आता पुन्हा एफ-६ मधल्या घोड्यामुळे तो केंव्हाही पुनर्जन्म घेऊ शकतोयं!

लक्ष देणे गरजेचे आहे. चौदा खेळ्यांना साधारणपणे तीस मिनिटे आहेत. थिती बर्‍यापैकी काँप्लिकेटेड असल्याने वेळ बराच लागणार आहे..

गमतीशिर आहे. जेंव्हा त्याला नक्की काय करावं हा प्रश्न पडतो तेंव्हा तो, निर्णय शिताफीनं प्रतिस्पर्ध्याकडे पास करतो!

In reply to by संजय क्षीरसागर

करायलाच हवी होती कारण त्याने घोडा एफ ४ ही आनंदची खेळी रोखली गेली..त्यात सयकॉलॉजी नाहीये थेट खेळ आहे..

हत्ती बी ४ टाकलाय आनंदने हत्तीचा सॅक्रिफाईस आणि दोन मोहोरी + दोन प्यादी असा मामला होणार बीस्तंभातले प्यादे डोकेदुखी करायचा प्लॅन आनंदचा!!

In reply to by चतुरंग

महागात पदले...त्याला पुरेसे कोंपेन्सेशन नव्हते आणि मॅग्नुसने एवढ्या ताणात अचूक निर्णय घेतला त्याबद्दल त्याला मानायलाच हवे. आनंदने देखील हे प्रेस कॉन्फरंसमधे मान्य केले..

गेल्यात जमा आहे. घोडा खाता येत नाही आता राजा सी ६ घेऊन थोडेफार चान्सेस आहेत, मॅग्नुसने त्याचा टेंपरामेंट न घालवता खेळ केलाय...सामन्यातला हा बहुदा शेवटचा डाव ठरणार..

आणि एकेक मूवचे कॅलक्यूलेशन! तुफान चाललाय डाव. जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत असा डाव बघितला नव्हता! आनंदने डावत पुन्हा जान आणली आहे!!

In reply to by चतुरंग

कार्लसनचे हत्ती सगळी वाट लावून टाकतील. पण गेम बहारदार होतोयं हे निखालस! आणि त्यासाठी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद! वर्ल्ड चँपियनशिप इतकी जवळून आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली.

मॅग्नुस पुन्हा चँपिअन झाला! आनंदचे कॅलक्यूलेशन चुकले कुठे तरी... अन्यथा त्याने डाव चांगला उलटवत आणला होता... मॅग्नुसच्या चॅंपिअनशिपसाठी त्याचे अभिनंदन!! :)

In reply to by चतुरंग

हे मात्र अमान्य. कारण कार्लसनचे दोन हत्ती मात करायला पुरेसे होते म्हणून आनंदला हार मानावी लागली.

In reply to by संजय क्षीरसागर

शेवटी हत्ती रहात नव्हते. खेळ जवळपास तोललेला होता. आर बी ३ झाले असते तर चित्र बरेच वेगळे दिसू शकले असते..निदान आनंदने आजचा ड्रॉ करायला हवा होता तो नर्वस डिसिजन मधे गेला आणि डाव गमावून बसला. मॅग्नुसने त्याचे टेंपरामेंट चांगलेच टिकवलेन.

In reply to by चतुरंग

माझ्याकडे बी * बी५ लाच कार्लसन जिंकल्याच दिसलं! म्हणून तर तुमच्या मागोमाग मी सुद्धा `कार्लसन जिंकला' म्हणालो.

आनंदने हत्ती बी ३ असा आणायला हवा होता त्याने गेम आणखीन लांबवायचे चान्सेस होते...

मी मागच्या वर्षीच म्हटलं होतं आनंदचा सचीन तेंडूलकर झालाय. तुम्ही लोक ऐकत नाही माझं. मी आज डाव पाहिला नाही. माझा मानसिक त्रास वाचला धन्यवाद. लोभ असावा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इथे आनंदने कँडिडेट स्पर्धा जबरदस्त पद्धतीने जिंकून या सामन्याचा आव्हानवीर म्हणून प्रवेश पटकावला होता! यात स्वेच्छेने निवृत्ती वगैरे घ्यायचा प्रश्न नाहीये त्यामुळे सचिन आनंदची तुलना पूर्णपणे अयोग्य आहे. प्रेस कॉन्फरंसमध्ये देखील आनंदला विचारले की आता तो चेस खेळणे सोडणार आहे का त्याने एका शब्दात उअत्तर दिले "नाही!"

In reply to by चतुरंग

या सामन्याचा आव्हानवीर म्हणून प्रवेश पटकावला होता!
एकदम मान्य! बहुदा त्यानं त्याचे सेकंडस बदलायला हवेत, म्हणजे विचारांचा अँगल बदलायला हवा. तो (बहुतेक) क्लिष्ट विचार करतो (लाँग ड्रॉन प्लान) आणि कार्लसन सोपा आणि सहज विचार करतो त्यामुळे त्याचा खेळ जास्त इफेक्टीव आणि थरारक होतो.

In reply to by चतुरंग

गेले दोन दिवस बुद्धीबळाच्या जेष्ठ जाणकारांचे बुद्धीबळाबद्दलचे लेखन वाचतोय. जवळ जवळ सर्वांचेच मत बनले आहे की 'दोघांच्याही डावात सर्वोत्तम खेळ बघायला मिळाला नाही, पण दोघांच्या संयम हाच या लढतीतला मोठा फरक होता, त्यात तरुण कार्लसनने बाजी मारली. तरुण वयातील आक्रमकता त्याच्या खेळीत नव्हती तर प्रचंड असा संयम होता आणि हेच सर्वात महत्वाचे होते पण यात आनंदच्या वाढत्या वयाचा मुद्दा राहुन राहुन येतोच खेळाडुला वय नसतं तो केव्हाही फॉर्ममधे येऊ शकतो पण शारिरीक मानसिक क्षमता वयोमानानुसार कमी होत जाते हेच सत्य आनंदलाही शेवटी स्वीकारावे लागले'' आनंद पूर्वीच्या स्पर्धा जिंकल्यामुळे या स्पर्धेत तो आव्हानवीर म्हणुन उतरला ही गोष्ट मान्य. पण त्या खोडसाळ कार्लसनचं मत आपण वाचलं असेलच की त्याला आनंद या स्पर्धेत आव्हानवीर म्हणुन आला याचंच आश्चर्य वाटलं याचा अर्थ अस की तो आनंदला जोखून आहे. रंगाशेठ, तुम्ही बुद्धीबळाचे उत्तम जाणकार आहात. आनंदला किमान दोन डावात जिंकण्याची उत्तम संधी होती आणि आनंदने अशावेळी चुका केल्या आणि वर्चस्व असलेल्या डावात पराभवाच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलं त्याचं कारण एकच आनंद त्याच्याविरुद्ध मानसिक लढाईत आनंद कमी पडला आणि त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं. -दिलीप बिरुटे

मला असं म्हणायचय की कार्लसन पुढे आनंदचा टिकाव लागत नाही हे सिध्द झालंय कारण १)आनंदची पांढरी असली की कार्लच्या खोड्या सुरू होतात -वजीर मारणे, राजाला हलवून कोट न करू देणे, उंट घोडे उडवणे. हे करताना पांढरीवाला निराश होऊन चुकला की तो डावपण खिशात टाकणे. याचे एक उदा॰ खंदकवाला अभेद्य किल्याचा किल्लेदार सूस्त राहतो आणि शत्रू फितुरी करवून किल्ला खिशात टाकतो. २)त्याच्याकडे पांढरी असतांना त्याला हवा तसा खेळ करवतोच ३)राजा एचपासून सीपर्यँत हलवायला घाबरत नाही.