मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ८

चतुरंग · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कालचा डाव तुफान झाला. कार्पोव कोर्चनॉयच्या सर्वात जास्त खेळींच्या डावापाठोपाठचा दुसर्‍या क्रमांकाचा! शेवटी अर्थातच मॅग्नुसने विनाकारण ताणले. त्याने टाटा स्टील स्पर्धेत एका खेळाडूवर घोडा-हत्ती वि. हत्ती अशा काँबिनेशनने मात लावली होती त्यामुळे तो कालही आशावादी होता. परंतु काल आनंद त्याला पुरुन उरला. शब्दशः "कुठे आनंदचा ऐरावत आणि कुठे मॅग्नुसची तट्टाणी!" अनुभवायला मिळाले!! ;) चला आजचा आठवा डाव कमालीचा रंगतदार होणार. आनंदसाठी जिंकणे जवळपास अनिवार्य. कारण आता उरलेल्या पाच डावात त्याची पांढरी मोहोरी तीन वेळा असणार आहेत. आज त्याने १ गुण मिळवूण बरोबरी केली की सामना पुन्हा पूर्ण खुला होईल आणि मग पुढल्या दोन पांढर्‍या पैकी एकत्री जिंकून आणि उरलेल्या दोन काळ्या डावाअत बरोबरी करुन स्पर्धा जिंकता येईल. अर्थात हे म्हणणे सोपे आणि घडवून आणणे महाकठिण आहे. बघूयात आज आनंद कोणती सुरुवात करतो ?

वाचने 6819 वाचनखूण प्रतिक्रिया 23

In reply to by सुजित पवार

वेळ खुप कमी राहतोय आणि मग चूक करुन बसतो आणि मग एक तर डाव बरोबरीत सोडविण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय नै तर पराभवाचा सामना करावा लागतोय. काय गणित असतील त्यांचे देव जाणो. -दिलीप बिरुटे

चतुरंग 18/11/2014 - 22:04
आजचा डाव नीरस झाला. स्कोर ४.५ वि ३.५ मी काल म्हंटले तसे आनंदची इतकी शक्ती कालच्या साडेसहा तास चाललेल्या डावाने काढून घेतली की आज तो तितकासा आक्रमक राहू शकला नाही ही एक शक्यता आहेच. त्याशिवाय आनंदनेही आज काही गोष्टी चाचपून बघितल्या असाव्यात. आज मॅग्नुस ज्या वेगाने खेळत होता त्यावरुन त्याने सिसिलिअन आणि क्वीन्स मधली बरीच वेरिएशन्स शेवटपर्यंत खेळून बघितलेली आहेत हे आनंदला समजले आहे. उद्या विश्रांतीचा दिवस आहे. परवा काळ्या मोहोर्‍यांनी खेळताना बरोबरी करायची आणि दहावा डाव जिंकायचा असा प्लॅन करावा लागणार. बाकी तयारी आणि स्टॅमिना या दोन्ही बाबतीत मॅग्नुस वरचढ दिसतोच आहे. त्यामुळे आता आनंदला धक्का तंत्र वापरणे जरुरीचे आहे. दहाव्या आणि बाराव्या डावात वेगळे ओपनिंग खेळायची तयारी आनंदने करावी अशी अपेक्षा आहे. कारण त्याशिवाय ही कोंडी फुटणे अवघड दिसते आहे!

vikramaditya 18/11/2014 - 22:13
वयातील अंतर आनंदला भारी पडत असावे आणि त्याची दमछाक होत असावी. आमचा आपला एक अंदाज. बाकी तज्ञ सांगतीलच. काही म्हणा "उम्र का तकाजा है"