Skip to main content

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 21/09/2014 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, कर्तन करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण पैसा ताई फू...फुंकरुनी निखार्‍यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ ) मम हाती तो तांब्या-कसला जिल्बी पडता जीवच घेई दुष्ट हत्ती तो काड्या लावी संधी कधिही सोडत नाही स्वतःच देतो तांब्या भरुनी आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ ) धन्या वाकडू सामिल यांना हल्ली तो ही काड्या सारी धन्या वा कडू... असला तरिही दगड मारण्या तयार भारी खाटुक म्यानी भाषाSभक्षी मधेच येऊन तांब्या ओढी शब्द प्र'भावी असले तरिही मनात याच्या अट्टल खोडी =)) कसे दुष्ट हे सारे जमले मम आत्म्याला क्लेशच देती परस्परांच्या संगनमतीने खरड्वहीतुन दगड मारती मी ही आता कवने रचुनी तैय्यारी ती पुरती केली बघता बघता शब्द जुळोनी फिरला तांब्या,जिल्बी झाली! =)) ======== lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif
लेखनविषय:

वाचने 27881
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

आरती आत्मूबुवा वाहन हे आक्टीवा घालूनिया हो मांडी कशी चालविता देवा आरती आत्मूबुवा || धृ || आम्ही सारे अडाणभोट काही कळेना हो आम्हा करुनिया तुमची सेवा देवा विनवितो तुम्हा आरती आत्मूबुवा || १ || तुमच्या साधूवाण्याची असे कथा हो वेगळी नौका ती न हो बुडता तया सद्बुद्धी ती झाली आरती आत्मूबुवा || २ || मिळता ती संधी तुम्हा करता प्रबोधन हो देवा आम्हा पुस्तक पंडितांना वाटतो तुमचा हो हेवा आरती आत्मूबुवा || ३ || म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध आरती आत्मूबुवा || ४ ||

In reply to by धन्या

निव्वळ थोर _/\_ धन्यानेही या निमित्ताने आपल्या विडंबनशस्त्रावरची धूळ झटकली हे पाहून आनंद वाटला.

In reply to by बॅटमॅन

धनाजीराव.... जबरीच हो! __/\__ आणि या सांगते'साठी विशेष आभार! http://www.sherv.net/cm/emo/happy/im-happy-smiley-emoticon.gif
म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध
=========================== @विडंबनशस्त्रावरची धूळ झटकली हे पाहून आनंद वाटला.>>> आणि खाटुकमॅनास +++१११

जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा तुमचा काय विचार वर्णावा नामा मुखे आणी फेस लिहोनी भाषा नाना संस्कृत उर्दू कन्नड काहीही म्हणाना. काडीसारुनी होता हळूच पळ काढाना वाढे स्मित वदनी मग पॉपकॉर्न खाताना जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा

हरे आत्मा हरे आत्मा हरे हरे हरे आमची कॉमेंट येते तेंव्हा मुखी मूग भरे ..... कारे ब्याट्या कारे धन्या कारे कारे कारे ? बुवाचा असा छळ करता नाही हे बरे .... आता कोणाला जमेल तर मंत्र पुष्प येउन द्या ! नमो व्रात्यपतये आत्मू दादाय नमो नमः

In reply to by चौकटराजा

सगळ्या आरत्या दिवळी अंकात टाकाच अशी संपादकांना णम्र विणंटी

In reply to by टवाळ कार्टा

>>> दिवळी जुन्या घरांच्या जाड भिंतींमध्ये छोटे १.५ फुट बाय १.५ फूट आणि साधारण १ फुट खोल असा कप्पा असे. त्याला दिवळी म्हणत. बहुतेक संध्याकाळी/ रात्री दिवे/कंदिल/ चिमण्या ठेवण्यासाठी त्यांचा वापर होत असे. ते आठवलं.

गुरुजी आले परत घेऊनी तांब्या पाडी कविता फार सुंदर. गुरुजी तांब्या ब जिलबी उत्तम. बॅटमॅन साहेब व धन्यासाहेब तुमचया कविता फार उत्तम.

वा वा गुर्जि ..वल्लि धन्या काका आणि सुड काका आणि ते खाटु़क कोण ते कळ्ळं नै .. पण .. ' रचता कवणे जिल्बी होइ अगोबा करी खाण्याची घाई काकाहि माझे जिल्बीवेडे जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच बाई =))

In reply to by जेनी...

@जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच बाई >>> =)) बालिका आली!!! =)) धूम धूम धमाल!!!!!! :-D

अाता अारती पैैसाताईची!! ॥ अारती पैसाताईची ॥ जय देवी पैसाताई,मिपा संपादिनी भक्तांना पावसी ट्रोलांवर तू धावसी॥ अनाहिते पाठी उभी राहसी टवाळां धपाटे घालसी कर्तरी वापरोनी संपादना तू करिसी॥१॥ कधी विनोद साधण्या कि.ती.शहाणी तू होशी कधी सुबक भाषेत लिखाण करिशी कधी काड्या तू सारिशी कंपुबाजांसोबत कधी मौजा तू करिशी ॥२॥ जय देवी पैसा ताई..

In reply to by अजया

तुमचंही खरच म्हणा!! जिथे लिखाणातच दम नाही चाल कशीही लावली तरी असा काय उजेड पडणार आहे!! ;)

In reply to by सूड

हो ना,तुमच्या कुजकट लिखाणातला दम आमच्या सरळ लिखाणात कसा येणार?आणि तुमचा उजेड तेवढाच पडणार म्हणा!!

In reply to by बॅटमॅन

थिस इस चेअतिन्ग. नोत फैर. बूस्ट (इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी वालं ) द्यायचं रे कुणाला तरी. आपणच खेळत बसलं तर ५०१ सहज होतील की :-/

In reply to by प्यारे१

च्यायला. २ तर प्रतिसाद टंकले. कुणीही आत्मशतकोत्सुक मिपाकर हेच करेल. ;) अन ५०१ होत नसतात. संमंची बहुधा प्रतिज्ञा असावी. कायपण केलं तरी ५०० नै होऊ देणार म्हणून. :(

In reply to by बॅटमॅन

प्रशांतचा ४०० वर प्रतिसाद असलेला एकोळी धागा आहे, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेबद्दलचा. त्याच्यापुढे कोणी जाता कामा नये असं

मी

ठरवलं आहे! ;)

In reply to by पैसा

यवढा मोठ्ठ्ठ्ठा

मी

लई दिसांनी पायला... आजचा दीस सार्थकी लाग्ला ! :) ;) आणि प्रतिसाद स्वयंसंपादन अवतिर्ण झाले... आजी सोनियाचा दीस ! *i-m_so_happy*

व्यवस्थापनाचे हार्दिक अभिनंदन !