Skip to main content

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 21/09/2014 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, कर्तन करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण पैसा ताई फू...फुंकरुनी निखार्‍यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ ) मम हाती तो तांब्या-कसला जिल्बी पडता जीवच घेई दुष्ट हत्ती तो काड्या लावी संधी कधिही सोडत नाही स्वतःच देतो तांब्या भरुनी आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ ) धन्या वाकडू सामिल यांना हल्ली तो ही काड्या सारी धन्या वा कडू... असला तरिही दगड मारण्या तयार भारी खाटुक म्यानी भाषाSभक्षी मधेच येऊन तांब्या ओढी शब्द प्र'भावी असले तरिही मनात याच्या अट्टल खोडी =)) कसे दुष्ट हे सारे जमले मम आत्म्याला क्लेशच देती परस्परांच्या संगनमतीने खरड्वहीतुन दगड मारती मी ही आता कवने रचुनी तैय्यारी ती पुरती केली बघता बघता शब्द जुळोनी फिरला तांब्या,जिल्बी झाली! =)) ======== lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif
लेखनविषय:

वाचने 27881
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

=)) =)) =)) तुम्ही एवढे खिलाडूपणाने घेता म्हणून तुम्हाला छळतात सगळे! जिल्बी मस्त झालीय एकदम, फर्मास!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

या काव्यात सातवाहन आणि अ‍ॅक्टिव्हावाहन हे दोन व्यवच्छेदक शब्द नाहीत.

In reply to by प्रचेतस

त्य "भडजी" शब्दाचे उद्गाते आम्हीच असून केवळ सार्वजनिक मंचावर सांसदीय भाषा वापरण्याचा संकेत पाळावा म्हणून आम्ही त्या मुळ चारोळीला फाटा दिला. ईच्छुकांनी श्री होयंका* गुरुजींची भरडवही* पाहावी. * श्रेयः वल्ली ** श्रेय: खुद्द श्री. होयंका गुरुजी

वा वा वा, झकास. काव्य असावे तर असे.... :smile: . बादवे अनेक वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो आहे. त्याचा नेमका अर्थ काय हो?

In reply to by खटपट्या

@वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो >> दू...दू... मंजे दुष्ट..दुष्ट..! =============== @हे नक्की कोण ?>>> ज़रा वेळ थांबा,येइलच इतक्यात! :-D मग प्रतेक्षच दाखिवतो! ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अन्दाज आलाय तसा. पण तुम्हीच स्पष्ट केलेलं बरं...

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, बोडण करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण

In reply to by चित्रगुप्त

बोडणात जिल्बी सयुक्तिक वाटणार नाही आणि पुरणपोळी मीटरमध्ये बसणार नाही म्हणून कर्तन वापरलेलं दिसतंय. ;)

कवितेचा विषय कशावर बेतलाय?. कोण कोणाला त्रास देतं.. ? मला तर काहीही कळ्ळ्ळ्ल नै. संदर्भ समजवा. :-D =D :biggrin:

खूप सारे "ण" जमवले की तुम्ही . जिलबी छानच बरं ़ का! मिपावर गेले काही दिवस धर्मं, कर्म,मंत्र्, तंत्रं , साधना, परिक्र्मा, इतिहास-भूगोल-ना. शास्त्रं, चूक, बरोबर - असं जड जड वाचून वाचून दमायला झालं होतं अगदी. बरं वाटलं !

खाटुक म्यानी भाषाSभक्षी मधेच येऊन तांब्या ओढी
इथे खाटुक म्यानी भाषाSभक्षी हळूच लपवलेले भांडे शोधी असं पायजे ना?

In reply to by प्रचेतस

@खाटुक म्यानी भाषाSभक्षी हळूच लपवलेले भांडे शोधी असं पायजे ना? >>> जिल्बीत हात-भार लाऊन स्वयं"सिद्ध असल्याचे जाहिर केल्या बद्दल धन्यवाद! =))

मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! दु.दु.भारी खट्याळ ! दिसे जरी मवाळ! हुर्यो करी असा !मी अडवू तरी कसा !! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! बॅट्या-धन्या जोडीने बघतात (काडी) सारून माझ्याकडे कसा ! जीव हो वेडापीसा ! वाटे द्यावा ठोसा (स्माईलीचा) कसा देऊ रे!! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! === अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर

In reply to by किसन शिंदे

@आनन्दिता कवितेचा विषय कशावर बेतलाय?. कोण कोणाला त्रास देतं.. ? मला तर काहीही कळ्ळ्ळ्ल नै. संदर्भ समजवा.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF हेच्च..हेच ते!!! सर्व माहित असूनंही.. =)) म्हणूनच नेहमी म्हणतो:- छळू आगोबा हत्तीची बहीण- दुत्त दुत्त आ...नन्दिता! =)) ================= @अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif बरीच चांगली खुडबुड करिता वो टुंम्ही! http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif ================= @स्पा http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-546.gif अच्च जालं तर>>> :-/ तू गप रे हलकटा!!! =))

=)) =)) =)) =)) =)) सध्या काव्यबद्धकोष्ठ झालाय. तो मोकळा झाला की जिल्ब्या पाडायला हाजीर हायेच!!!!! आत्मूसची ही जिल्बी न्हेमीप्रमाणेच मस्त ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

कविता बिघडली जिल्बी झाली छान, आम्हाला लागला गुर्जींचा वाण. ;)

In reply to by प्यारे१

आयला. प्यारेगुर्जींनी पाडलेली जिल्बीसुद्धा चक्क आध्यात्मिक आरतीच्या चालीत म्हणता येते. धन्य _/\_

In reply to by प्यारे१

कुठलीही जण्रल आरती. तिची एक पेट्ट चाल असते. काही आरत्या विशेष फेमस इ. झाल्या की लोक चाल बदलतात तरी किंवा उगा लाडिक गायकी ढंगाची चाल तरी बशिवतात. पण अगोदरची बेशिक चाल तीच असते. उदा. च पायजे तर 'सुखकर्ता' ची नॉन गायकी वाली चाल- जी घरोघरी म्हटल्या जाते ती.

In reply to by बॅटमॅन

.................................एक आरती-खाटुक-म्यानी!!! आरती खाटुक म्याना तुझी नामे किती ना..ना आंम्ही केवळ शब्द'धारी नुसत्या डोलवितो माना॥धृ॥ संस्कृत असो कन्नड तामिळी,तिथे मेंदुत बसे गोळी अजब हा खाटुकम्यान,भाजतो कुठेही ती पोळी॥१॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ व्याकरणाचे शिक्रण ते, केवळ ऐकू'लागे ग्वाड खाटुक हा पुढे तिथेही,आहे पक्का शब्द'द्वाडं॥२॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ वृत्तातही परंफेक्टं हा,नाही अक्षरांशी-मोड आमचा मामला अर्थवाही,फक्त आशयाची जोड॥३॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ मेंदूची हार्ड-डीस्स्स्स्स्स्स्कं...पाहू आहे किती ज..ड आम्ही लक्षात ठेऊ जाता,लावे आंम्हा मेली थ...ड :-/ ॥४॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ करवावे सम-रूप, खाटुकम्याना - संस्कृतात पाहू आम्म्हा जिल्बि'कांना,किती मार्क पडतातhttp://www.pic4ever.com/images/2i1d1co.gif॥५॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ ============================= http://www.pic4ever.com/images/Ghelyon.gif ....

In reply to by अत्रुप्त आत्मा

=)) बॅट्याला अम्मळ उंच स्थानी ठेवून बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले.

In reply to by प्यारे१

@बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले>>> आक्षी बराब्बर वळिकलं बगा तुमी! ;) फकस्त आरती'चा संकल्प तुमच्या णावाणी सोडिला होता...तुमाला ण सांगताच! =)) तेची पावती मिळाली तुमच्या परतीसादानी! :p

In reply to by अत्रुप्त आत्मा

म्हंजे प्यारेकाका अजून थोडं पुण्येवंत झालं म्हणायचं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अत्रुप्त आत्मा ऐसे लेवुनिया नाम संचारी त्रिलोकी आणिक चारी धाम ||धृ.|| कार्य करी, बोध सवे, करी खादाडी रांगोळीही काढी लेखनजिल्बी पाडी ||१|| पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|| दु दु आगोबा, धन्या आणि सूड पेटविति सदा त्यामागे चूड ||३|| आणिक सदस्य ऐसे- उदा. हा स्पांडू, खोडी काढी, बुवा म्हणे मारिन हां दांडू ||४|| खोड्या काढुनिया लोक ते हसती आत्म्याची परी आगळी आहे महती ||५|| पौरोहित्य करी, परी पुरोगामी कैक गोष्टींत पुरता मूलगामी ||६|| पाहुनि आत्म्याची शीघ्ररचित आरती बॅटमॅन म्हणे, भेट तुजप्रती ||७|| देववाणी राहो, सध्या मायभाषा मानुनि घ्याल गोड हीच बहु आशा ||८||

In reply to by बॅटमॅन

बुवाला अम्मळ उंच स्थानी ठेवून बॅटमॅन त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहे असे दृश्य डोळ्यापुढे आले. ;)

In reply to by बॅटमॅन

@पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|>>> =)) अफा ....ट !!! __/\__ =))

In reply to by बॅटमॅन

अ‍ॅक्टिव्हा? मागे बुवांनी एलिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा पेप्रात झळकलेला फटू चिकटवला होता. @ब्याट - आरती फक्कड जमलीये!

In reply to by आदूबाळ

लिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा
आमच्या हत्तीला रानटी म्हंटल्याबद्दल जोरदार निषेध

In reply to by बॅटमॅन

लय भारी ! आता संमंने "आखिल वैश्विक मिपा शीघ्रकवी संमेलन" संयोजित करण्याचे मनावर घेतलेच पाहिजे ! =))

In reply to by बॅटमॅन

ही आर्ती फुड्च्या येळच्या आर्ती संग्रात छापणेत येइल. कल्जी नसावी.

In reply to by बॅटमॅन

गलत... आधी लाडू आणि मग थोडे दिवसांनी, चिचा आणि बोरे.

In reply to by मुक्त विहारि

>>आधी लाडू आणि मग थोडे दिवसांनी, चिचा आणि बोरे. नोत नेचेस्सर्य

कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी केलेले काव्य !! >>फिरला तांब्या,जिल्बी झाली! अच्छा!! मला अजूनपर्यंत वाटत होतं की चकली बिघडली की कडबोळं करतात तसं काव्य बिघडलं की जिल्बी होते.

In reply to by सूड

@तसं काव्य बिघडलं की जिल्बी होते.>>> बास की आता!!!!!!!!!! :p

In reply to by प्रचेतस

@ तांब्या गरागरा फिरवून पाडलीत म्हणे?>>> http://www.sherv.net/cm/emoticons/playful/making-bronx-cheer-smiley-emoticon.gif निरर्थकतेचा ...................

विजय असो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

http://www.sherv.net/cm/emoticons/playful/making-bronx-cheer-smiley-emoticon.gif

आजकाय शिघ्रकवितेचा व्हायरस जोरात पसरला आहे.... डेंगीला टक्कर देऊन आहे असे समजते ! =)) गुर्जी तुमाला पण चावला काय ? लय भारी कविता !

" अशी पाखरे येती, आणिक जिलबी पाडूनी जातीईईई, दोन टग्यांची भांडणे होता दोन टग्यांची भांडणे होता बघे खदखदुनी हसती, अशी पाखरे येती..... ||क्रमश:||

आहे तृप्त तरी तयास म्हणती, अत्रुप्त किं कारणी दर्पण सर्पण अर्पणोनि अवघे, पाडीत जिल्ब्या झणीं.