✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन

अ — अत्रुप्त आत्मा, Sun, 09/21/2014 - 23:53
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, कर्तन करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण पैसा ताई फू...फुंकरुनी निखार्‍यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ ) मम हाती तो तांब्या-कसला जिल्बी पडता जीवच घेई दुष्ट हत्ती तो काड्या लावी संधी कधिही सोडत नाही स्वतःच देतो तांब्या भरुनी आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ ) धन्या वाकडू सामिल यांना हल्ली तो ही काड्या सारी धन्या वा कडू... असला तरिही दगड मारण्या तयार भारी खाटुक म्यानी भाषाSभक्षी मधेच येऊन तांब्या ओढी शब्द प्र'भावी असले तरिही मनात याच्या अट्टल खोडी =)) कसे दुष्ट हे सारे जमले मम आत्म्याला क्लेशच देती परस्परांच्या संगनमतीने खरड्वहीतुन दगड मारती मी ही आता कवने रचुनी तैय्यारी ती पुरती केली बघता बघता शब्द जुळोनी फिरला तांब्या,जिल्बी झाली! =)) ======== lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif

प्रतिक्रिया द्या
27406 वाचन

💬 प्रतिसाद (108)

अ आ

भिंगरी
Sun, 09/21/2014 - 23:58 नवीन
कित्ती कित्ती त्रास हो तुम्हाला?
  • Log in or register to post comments

बुवा लै भारी!

पैसा
Mon, 09/22/2014 - 00:08 नवीन
=)) =)) =)) तुम्ही एवढे खिलाडूपणाने घेता म्हणून तुम्हाला छळतात सगळे! जिल्बी मस्त झालीय एकदम, फर्मास!!
  • Log in or register to post comments

जिल्बी मस्त झालीय एकदम,

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/22/2014 - 00:12 नवीन
जिल्बी मस्त झालीय एकदम, फर्मास!! Image removed. ==================== सं'तुष्ट आत्मा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

असहमत.

धन्या
Mon, 09/22/2014 - 00:16 नवीन
या काव्यात सातवाहन आणि अ‍ॅक्टिव्हावाहन हे दोन व्यवच्छेदक शब्द नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ते तुम्हाला सुडंबनात वापरायला

कवितानागेश
Mon, 09/22/2014 - 00:52 नवीन
ते तुम्हाला सुडंबनात वापरायला राखून ठेवलेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ह्या... ह्या... ह्या...

धन्या
Mon, 09/22/2014 - 00:11 नवीन
एकदा एक भटजी बघायला* गेला कुणीच दिसले नाही परत फिरुन आला * पुन्हा एकदा ह्या... ह्या... ह्या...
  • Log in or register to post comments

धन्या....

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/22/2014 - 00:16 नवीन
Image removed. धन्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

>> धन्या....

धन्या
Mon, 09/22/2014 - 01:12 नवीन
>> धन्या.... यापुढचा "डोसाखाऊ" शब्द राहीला काय लिहायचय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आणि ते 'भटजी' नसून 'भडजी' आहे

प्रचेतस
Mon, 09/22/2014 - 14:26 नवीन
आणि ते 'भटजी' नसून 'भडजी' आहे निरिक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बेक्कार हसतोय हापिसात

टवाळ कार्टा
Mon, 09/22/2014 - 14:39 नवीन
बेक्कार हसतोय हापिसात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

त्य "भडजी" शब्दाचे उद्गाते

धन्या
Mon, 09/22/2014 - 15:54 नवीन
त्य "भडजी" शब्दाचे उद्गाते आम्हीच असून केवळ सार्वजनिक मंचावर सांसदीय भाषा वापरण्याचा संकेत पाळावा म्हणून आम्ही त्या मुळ चारोळीला फाटा दिला. ईच्छुकांनी श्री होयंका* गुरुजींची भरडवही* पाहावी. * श्रेयः वल्ली ** श्रेय: खुद्द श्री. होयंका गुरुजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ती चारोळी व्यनी करणार का

टवाळ कार्टा
Mon, 09/22/2014 - 16:00 नवीन
ती चारोळी व्यनी करणार का ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आँ आत्मांन्या पण छळता येतं??

दिपक.कुवेत
Mon, 09/22/2014 - 00:21 नवीन
कस कसं कसं???
  • Log in or register to post comments

वा वा वा, झकास

श्रीरंग_जोशी
Mon, 09/22/2014 - 01:56 नवीन
वा वा वा, झकास. काव्य असावे तर असे.... :smile: . बादवे अनेक वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो आहे. त्याचा नेमका अर्थ काय हो?
  • Log in or register to post comments

गुर्जी

जुइ
Mon, 09/22/2014 - 02:48 नवीन
छान जमली आहे हो अगदी!!
  • Log in or register to post comments

दुष्ट हत्ती तो काड्या लावी

खटपट्या
Mon, 09/22/2014 - 02:50 नवीन
दुष्ट हत्ती तो काड्या लावी संधी कधिही सोडत नाही
हे नक्की कोण ?
  • Log in or register to post comments

@वर्षांपासून तुमच्या लेखनात

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/22/2014 - 06:36 नवीन
@वर्षांपासून तुमच्या लेखनात हे 'दू..दू..' वाचत आलो >> दू...दू... मंजे दुष्ट..दुष्ट..! =============== @हे नक्की कोण ?>>> ज़रा वेळ थांबा,येइलच इतक्यात! :-D मग प्रतेक्षच दाखिवतो! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अच्छा!!

श्रीरंग_जोशी
Mon, 09/22/2014 - 06:56 नवीन
मी दुष्ट दुर्जन किंवा दुष्ट दुराचारी असे समजत होतो :smile: .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अन्दाज आलाय तसा. पण तुम्हीच

खटपट्या
Tue, 09/23/2014 - 09:43 नवीन
अन्दाज आलाय तसा. पण तुम्हीच स्पष्ट केलेलं बरं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बोडण

चित्रगुप्त
Mon, 09/22/2014 - 06:33 नवीन
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, बोडण करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण
  • Log in or register to post comments

बोडणात जिल्बी सयुक्तिक वाटणार

सूड
Mon, 09/22/2014 - 15:39 नवीन
बोडणात जिल्बी सयुक्तिक वाटणार नाही आणि पुरणपोळी मीटरमध्ये बसणार नाही म्हणून कर्तन वापरलेलं दिसतंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

कवितेचा विषय कशावर बेतलाय?.

आनन्दिता
Mon, 09/22/2014 - 06:45 नवीन
कवितेचा विषय कशावर बेतलाय?. कोण कोणाला त्रास देतं.. ? मला तर काहीही कळ्ळ्ळ्ल नै. संदर्भ समजवा. :-D =D :biggrin:
  • Log in or register to post comments

खूप सारे "ण" जमवले की तुम्ही

मनीषा
Mon, 09/22/2014 - 07:58 नवीन
खूप सारे "ण" जमवले की तुम्ही . जिलबी छानच बरं ़ का! मिपावर गेले काही दिवस धर्मं, कर्म,मंत्र्, तंत्रं , साधना, परिक्र्मा, इतिहास-भूगोल-ना. शास्त्रं, चूक, बरोबर - असं जड जड वाचून वाचून दमायला झालं होतं अगदी. बरं वाटलं !
  • Log in or register to post comments

उगीच नाही तुम्हाला बुवेश

प्रचेतस
Mon, 09/22/2014 - 08:15 नवीन
उगीच नाही तुम्हाला बुवेश जिल्बीपाडवी म्हणत. =)) बाकी सुचतं कसं ओ असं लिहायला???
  • Log in or register to post comments

खाटुक म्यानी भाषाSभक्षी

प्रचेतस
Mon, 09/22/2014 - 08:16 नवीन
खाटुक म्यानी भाषाSभक्षी मधेच येऊन तांब्या ओढी
इथे खाटुक म्यानी भाषाSभक्षी हळूच लपवलेले भांडे शोधी असं पायजे ना?
  • Log in or register to post comments

कसले भांडे ? ताकाचे का ?

धन्या
Mon, 09/22/2014 - 08:38 नवीन
कसले भांडे ? ताकाचे का ? भांडे का लपविता...???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@खाटुक म्यानी भाषाSभक्षी

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/22/2014 - 10:21 नवीन
@खाटुक म्यानी भाषाSभक्षी हळूच लपवलेले भांडे शोधी असं पायजे ना? >>> जिल्बीत हात-भार लाऊन स्वयं"सिद्ध असल्याचे जाहिर केल्या बद्दल धन्यवाद! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

याची आठवण झाली.

अन्या दातार
Mon, 09/22/2014 - 09:20 नवीन
याची आठवण झाली. :)
  • Log in or register to post comments

भाग २

नाखु
Mon, 09/22/2014 - 09:53 नवीन
मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! दु.दु.भारी खट्याळ ! दिसे जरी मवाळ! हुर्यो करी असा !मी अडवू तरी कसा !! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! बॅट्या-धन्या जोडीने बघतात (काडी) सारून माझ्याकडे कसा ! जीव हो वेडापीसा ! वाटे द्यावा ठोसा (स्माईलीचा) कसा देऊ रे!! मी कशाला भांड्याला लपवू रे!मी कशाला तांब्याला थोपवू रे! मीच माझ्या जिल्बीचा स्वामी रे!!ध्रू!! === अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर
  • Log in or register to post comments

अगागा... चांगलाच षटकार मारलात

धन्या
Mon, 09/22/2014 - 10:24 नवीन
अगागा... चांगलाच षटकार मारलात का का. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

अच्च जालं तर

स्पा
Mon, 09/22/2014 - 10:22 नवीन
अच्च जालं तर
  • Log in or register to post comments

खिक्क

किसन शिंदे
Mon, 09/22/2014 - 10:45 नवीन
खिक्क :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@आनन्दिता

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/22/2014 - 12:36 नवीन
@आनन्दिता कवितेचा विषय कशावर बेतलाय?. कोण कोणाला त्रास देतं.. ? मला तर काहीही कळ्ळ्ळ्ल नै. संदर्भ समजवा.>>> Image removed. हेच्च..हेच ते!!! सर्व माहित असूनंही.. =)) म्हणूनच नेहमी म्हणतो:- छळू आगोबा हत्तीची बहीण- दुत्त दुत्त आ...नन्दिता! =)) ================= @अगोबाच्या मागे लपलेला ना.खु.खुड्बूड्कर >>> Image removed. बरीच चांगली खुडबुड करिता वो टुंम्ही! Image removed. ================= @स्पा Image removed. अच्च जालं तर>>> :-/ तू गप रे हलकटा!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

=)) =))

बॅटमॅन
Mon, 09/22/2014 - 13:35 नवीन
=)) =)) =)) =)) =)) सध्या काव्यबद्धकोष्ठ झालाय. तो मोकळा झाला की जिल्ब्या पाडायला हाजीर हायेच!!!!! आत्मूसची ही जिल्बी न्हेमीप्रमाणेच मस्त ;)
  • Log in or register to post comments

चान चान!

प्यारे१
Mon, 09/22/2014 - 14:04 नवीन
चान चान!
  • Log in or register to post comments

चान चान!>> आणि आपण महान!

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/22/2014 - 14:57 नवीन
चान चान!>> आणि आपण महान! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कविता बिघडली जिल्बी झाली छान,

प्यारे१
Mon, 09/22/2014 - 16:03 नवीन
कविता बिघडली जिल्बी झाली छान, आम्हाला लागला गुर्जींचा वाण. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आयला. प्यारेगुर्जींनी पाडलेली

बॅटमॅन
Mon, 09/22/2014 - 16:05 नवीन
आयला. प्यारेगुर्जींनी पाडलेली जिल्बीसुद्धा चक्क आध्यात्मिक आरतीच्या चालीत म्हणता येते. धन्य _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

दत्ताची आरती काय रे?

प्यारे१
Mon, 09/22/2014 - 16:12 नवीन
दत्ताची आरती काय रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कुठलीही जण्रल आरती. तिची एक

बॅटमॅन
Mon, 09/22/2014 - 16:20 नवीन
कुठलीही जण्रल आरती. तिची एक पेट्ट चाल असते. काही आरत्या विशेष फेमस इ. झाल्या की लोक चाल बदलतात तरी किंवा उगा लाडिक गायकी ढंगाची चाल तरी बशिवतात. पण अगोदरची बेशिक चाल तीच असते. उदा. च पायजे तर 'सुखकर्ता' ची नॉन गायकी वाली चाल- जी घरोघरी म्हटल्या जाते ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

.............................

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/22/2014 - 16:54 नवीन
.................................एक आरती-खाटुक-म्यानी!!! आरती खाटुक म्याना तुझी नामे किती ना..ना आंम्ही केवळ शब्द'धारी नुसत्या डोलवितो माना॥धृ॥ संस्कृत असो कन्नड तामिळी,तिथे मेंदुत बसे गोळी अजब हा खाटुकम्यान,भाजतो कुठेही ती पोळी॥१॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ व्याकरणाचे शिक्रण ते, केवळ ऐकू'लागे ग्वाड खाटुक हा पुढे तिथेही,आहे पक्का शब्द'द्वाडं॥२॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ वृत्तातही परंफेक्टं हा,नाही अक्षरांशी-मोड आमचा मामला अर्थवाही,फक्त आशयाची जोड॥३॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ मेंदूची हार्ड-डीस्स्स्स्स्स्स्कं...पाहू आहे किती ज..ड आम्ही लक्षात ठेऊ जाता,लावे आंम्हा मेली थ...ड :-/ ॥४॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ करवावे सम-रूप, खाटुकम्याना - संस्कृतात पाहू आम्म्हा जिल्बि'कांना,किती मार्क पडतातImage removed.॥५॥ ..........आरती खाटुक म्याना॥धृ॥ ============================= Image removed. ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

.. ..=))

प्रचेतस
Mon, 09/22/2014 - 16:58 नवीन
=)) .. =)) ..=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बॅट्याला अम्मळ उंच स्थानी

प्यारे१
Mon, 09/22/2014 - 17:01 नवीन
=)) बॅट्याला अम्मळ उंच स्थानी ठेवून बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/22/2014 - 17:13 नवीन
@बुवा त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहेत असे दृश्य डोळ्यापुढे आले>>> आक्षी बराब्बर वळिकलं बगा तुमी! ;) फकस्त आरती'चा संकल्प तुमच्या णावाणी सोडिला होता...तुमाला ण सांगताच! =)) तेची पावती मिळाली तुमच्या परतीसादानी! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

म्हंजे प्यारेकाका अजून थोडं

प्रचेतस
Mon, 09/22/2014 - 17:21 नवीन
म्हंजे प्यारेकाका अजून थोडं पुण्येवंत झालं म्हणायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

सूड
Mon, 09/22/2014 - 17:13 नवीन
*HELP* *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अत्रुप्त आत्मा ऐसे लेवुनिया

बॅटमॅन
Mon, 09/22/2014 - 18:27 नवीन
अत्रुप्त आत्मा ऐसे लेवुनिया नाम संचारी त्रिलोकी आणिक चारी धाम ||धृ.|| कार्य करी, बोध सवे, करी खादाडी रांगोळीही काढी लेखनजिल्बी पाडी ||१|| पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|| दु दु आगोबा, धन्या आणि सूड पेटविति सदा त्यामागे चूड ||३|| आणिक सदस्य ऐसे- उदा. हा स्पांडू, खोडी काढी, बुवा म्हणे मारिन हां दांडू ||४|| खोड्या काढुनिया लोक ते हसती आत्म्याची परी आगळी आहे महती ||५|| पौरोहित्य करी, परी पुरोगामी कैक गोष्टींत पुरता मूलगामी ||६|| पाहुनि आत्म्याची शीघ्ररचित आरती बॅटमॅन म्हणे, भेट तुजप्रती ||७|| देववाणी राहो, सध्या मायभाषा मानुनि घ्याल गोड हीच बहु आशा ||८||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवाला अम्मळ उंच स्थानी ठेवून

प्यारे१
Mon, 09/22/2014 - 18:31 नवीन
बुवाला अम्मळ उंच स्थानी ठेवून बॅटमॅन त्याच्यासमोर ताट ओवाळत ही आरती म्हणत आहे असे दृश्य डोळ्यापुढे आले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

@पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/22/2014 - 19:16 नवीन
@पुण्यक्ष्रेत्री मार्गी गर्दी बसली बोकांडी अ‍ॅक्टिव्हावरि तरी स्थितप्रज्ञ मांडी ||२|>>> =)) अफा ....ट !!! __/\__ =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

_/\_ महान आहे बाट्या

प्रचेतस
Mon, 09/22/2014 - 21:38 नवीन
_/\_ महान आहे बाट्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा