Skip to main content

अरविंद बरोबर दीड तास!

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 20/03/2014 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही. स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं. प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं. या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्‍या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 80440
प्रतिक्रिया 219

प्रतिक्रिया

अरविंद केजरीवाल इतका प्रामाणिक आणि तळमळीचा नेता भारताला लाभलाय हे भारताच मोठ भाग्य. त्याचा विरोधासाठी विरोध करण हे भारतीय लोकशाही च सर्वात मोठ दुर्देव! विशेषतः इतर सर्व नेत्यांचा इतका भयावह अनुभव घेतल्यानंतरही कीमान केजरीवाल सारख्या चांगल्या हेतु असलेल्याला तरी एकदा संधी दिलीच पाहीजे. त्यांनी केलेल्या चुका तरी ते प्रांजलपणे मान्य करतात. सुधारण्याची कायम तयारी दाखवितात. उलट बाजुने विचारायच तर याहुन चांगला नेता आणि पक्ष सर्व चुका कंसीडर करुनही दुसरा कोण आहे ? मग या पक्षाला तरी का संधी देउ नये? का याचा ही जीझस बनवायचाय ? संजय क्षीरसागर यांच्याशी १०० % सहमत.

In reply to by मारवा

= दिली होती ना संधी दिल्ली मधे. काय केलं त्या संधीचं त्यांनी ? नुसतं लोकपाल लोकपाल ओरडत बसले आणि त्या संधीची माती केली. तो मुद्दा एकदा सत्तेत यायला ठीक होता. त्यानंतर एफेक्टीव अ‍ॅडमीनीस्ट्रेशन द्यायला नको का ? सत्तेत आले म्हणजे काहीही करु शकतात असा आणि विचार त्यामागं. हातात सत्ता असताना कोण धरणे धरतं का रस्त्यावर ? का लोक विश्वास ठेवतील परत ? आणि आव असा आणायचा की मसीहा (कि मसायाह ? ) आहे आणि इकडं तर अगदी नाटकीपणानं म्हणायचं, "मै तो बोहोत छोटा आदमी हुं, मेरी तो कोइ औकात ही नही है".

In reply to by मारवा

= दिली होती ना संधी दिल्ली मधे. काय केलं त्या संधीचं त्यांनी ? नुसतं लोकपाल लोकपाल ओरडत बसले आणि त्या संधीची माती केली. तो मुद्दा एकदा सत्तेत यायला ठीक होता. त्यानंतर एफेक्टीव अ‍ॅडमीनीस्ट्रेशन द्यायला नको का ? सत्तेत आले म्हणजे काहीही करु शकतात असा आणि विचार त्यामागं. हातात सत्ता असताना कोण धरणे धरतं का रस्त्यावर ? का लोक विश्वास ठेवतील परत ? आणि आव असा आणायचा की मसीहा (कि मसायाह ? ) आहे आणि इकडं तर अगदी नाटकीपणानं म्हणायचं, "मै तो बोहोत छोटा आदमी हुं, मेरी तो कोइ औकात ही नही है".

In reply to by उन्मेष दिक्षीत

नका इतका तळतळाट करु. केजरीवाल बनेल आणि ड्यंबिस आहे तो तसाच राहणार. असले पन्नास व्हीडीओ बनवेल आणखी लोकांना फसवायला. लोक येडे नव्हेत आता. एकदा बनले दिल्लीत आता नाही फसणार.

In reply to by नानासाहेब नेफळे

कोण घाबरतंय. प्रत्येक पक्ष व नेत्याची स्वतःची स्ट्रॅटेजी असते त्याप्रमाणे वागतात. अनेक नेते अनेक ठिकाणाहून उभे राहतात.

In reply to by मंदार दिलीप जोशी

इमानदारी के शेर की दहाड सुनकर बेईमानी की लोंबडीया भाग खडी होती है'अशी आपची वैचारीक स्ट्रटेजी असावी..

In reply to by नानासाहेब नेफळे

लिहीण्याचे स्वातन्त्र्य आहे म्हणुन असली बिनडोक विधाने करु नयेत, मोदी गेली ४० वर्षे समाज व राजकारणात आहेत, गेली १२ वर्षे मुख्यमन्त्री आहेत, त्याना तुमच्यापेक्षा जास्त राजकारण समजते व करता येते, सबब आपल्यापेक्षा अक्कल त्याना असल्याने ते त्यान्च्या द्रुष्टीने जे योग्य तेच करतील. बरे तुमचा हा गजकर्णी अरविन्द कसला आलाय 'शेर' ??? ५० दिवस धड दिल्ली साम्भाळु शकला नाही आणि चाललाय 'दिल्ली'वर झेन्डा लावायला, देश चालविणे म्हणजे मिडीयासमोर बकवास करण्याइतके सोपे आहे का ?? तेव्हडा मगदुर आणि कुवत अजुन तरी दिसली नाही....... विनोद१८

In reply to by विनोद१८

त्याना तुमच्यापेक्षा जास्त राजकारण समजते व करता येते, पण मोदींना धरणे धरता येतात का? थयथयाट करता येतो का? मग? असो, जोक अपार्ट... गेल्या १-२ दिवसांत कधीतरी चेतन भगतचे एक चांगले निरीक्षण वाचले. दिल्लीतून पळ काढल्यानंतर माध्यमांना सामोरे जाणार्‍या एकेंनी माध्यमांच्या विरोधात आक्रस्ताळेपणा चालू केला. मोदींनी म्हणे माध्यमांना विकत घेतले. सत्तेवर आल्यावर त्यांना तुरूंगात टाकण्याची भाषा केली... या उलट १२ वर्षे माध्यमांनी मोदींना छळले, राक्षस असल्याची प्रतिमा तयार केली. पण त्यांनी कधी आक्रस्ताळेपणा केल्याचे देखील ऐकलेले नाही.

In reply to by विनोद१८

कारण तुम्हाला सगळ्यात पहिली संधी दिली होती दिल्लीत सरकार बनवण्याची तेव्हा तुम्ही तर १३च दिवसात पळून गेलात! ;) आणि तुमचंच (गंडलेलं) लॉजिक तुम्हालाच लावायचं म्हटलं तर काँग्रेसवाले गेली १३० वर्षे राजकारणात आहेत आणि ६५+ वर्षे सत्तेत आहेत- त्यामुळे त्यांना तुमच्या पेक्षा जास्त राजकारण समजते व करता येते- सबब आपल्यापेक्षा अक्कल जास्त असल्यामुळे त्यांना जे पाहिजे ते करतील, तुम्ही कोण त्यांना शिकविणार? देश चालवणे म्हणजे "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" करण्याइतके सोपे आहे का? >>>

In reply to by बाळकराम

देश चालवणे म्हणजे "दक्ष-सावधान", "अग्रेसर-पुरस्सर" करण्याइतके सोपे आहे का? >>> केजरीवाल ने तेव्ढे सुद्धा करुन दाखवले नाही :D

In reply to by बाळकराम

कारण तुम्हाला सगळ्यात पहिली संधी दिली होती दिल्लीत सरकार बनवण्याची तेव्हा तुम्ही तर १३च दिवसात पळून गेलात!
बहुधा तुमचे इतिहासाचे ज्ञान कच्चे दिसतेय.. जरा शिकवणी लावा चांगली.

In reply to by सव्यसाची

वा वा..!! Sherlock Holmes: [to Watson] Never theorize before you have data. Invariably, you end up twisting facts to suit theories, instead of theories to suit facts.

In reply to by हाडक्या

मी पहिल्यांदाच याचे ओरिजिनल व्हर्जन ऐकतो आहे. पण सारांश तोच आहे असे वाटते.

In reply to by सव्यसाची

शेरलॉक पहाच मग तुम्ही.. सहा वर्षात नऊ भाग केलेत फक्त. पण जवळपास सगळेच उत्तम आहेत..!

थांकू

ह्या निमित्ताअने आठवले युट्युब वर "नायक २" चा व्हिडीयो नक्की पहा =)))) अरे तुम आयायती से हो , कोई युथ ओरीयंटेटेड घिसिपिटी बूक क्यों नही लिखते =))

Feuds and barbs spoil AAP party EW DELHI: The party with a difference has been besieged with problems faced by traditional ones. With the Aam Aadmi Party's eighth list on Wednesday taking the number of candidates named so far to 287, allegations of bribery, favoritism and in-fighting refuse to die down. The latest being Kerala-based social activist Aswathy Nair who withdrew her candidature accusing the party of feudalism and corruption. The allegations, though denied by the state unit, have found echoes in Uttar Pradesh, Delhi, Punjab and Bihar. Just a day earlier, candidate from north-west Delhi Mahender Singh had alleged that former Delhi minister and party colleague Rakhi Birla had demanded Rs 7 lakh to campaign for him. In the last few weeks, allegations have swirled around Khaled Parvez , the party's Moradabad candidate. Parvez was found to be a bank defaulter just as Singh was found to have served a jail term on a fake currency case only after his candidature was announced. While dismissing Singh's allegations, AAP leader Manish Sisodia said, "Singh raised these issues only after his candidature was cancelled. He should have spoken earlier if Birla had made such demands. But looking at the past few cases I do feel that we have lacked in public scrutiny. Our internal scrutiny based on the candidate's papers and testimonies is fair but due to lack of time, we have not been able to make names public before finalizing them like we did in the Delhi elections.'' Sisodia said the party would cancel ticket of any candidate if a case of corruption or lack of probity was found even on the last day. There have been unsubstantiated allegations that a senior political affairs committee member has sold the Lok Sabha seats of Sitapur, Jaunpur, Machhalishahar, Mohanlalganj and Mishrikh, which have been rubbished by the party for lack of evidence. But this is not all. There are others like Savita Bhatti who bowed out of the race in Chandigarh citing lack of cooperation from party volunteers. Earlier, national executive member Ashok Agrawal resigned from the party alleging that it was run by elites while prominent singer Jaspinder Narula too turned her back on the party.

In reply to by मंदार दिलीप जोशी

हे असं बोलू- लिहू नये, मंदारराव.. आप आरोप करते, ते पुराव्याविनाही खरे, कळकळीचे आणि जनतेच्या हिताचेच असतात. आपवर आणि निर्मोही, निर-अहंकारी केजरवाल ह्यांच्याविरोधात बोललेला प्रत्येक शब्द अथवा आरोप हा खोटा, बीनबुडाचा आणि पाॅलिटीकली मोटीव्हेटेडच असतो.. तुमचा निषेध !!

त्या दिल्ली त राज्य करण्याची संधी दिली जीथे राज्य सरकार ला अगदीच कमी अधिकार काहीही कायदा करायचा म्हटल तर केंद्राची परवानगी लागते. अशा अर्धवट अधिकार देउन काय अपेक्षा करता? पुर्ण सत्ता मिळायला हवी होती. तरीही इतक्या मर्यादीत अधिकारातही आणि इतक्या बंधनातही विज कंपन्याचे ऑडीट चा निर्णय घेतला ( आजपर्यंत कोणाची हींमत झाली नव्हती हे एकच उदाहरण पुरेसे आहे) आणि मुकेश अंबानी विरोधात तर भले भले शेपुट आत घालतात त्याच्या विरोधात बोलण्याची हिंमत तर दाखविली.

In reply to by मारवा

ज्यांच्या विरोधात बोलायचे नंतर त्यांचीच मदत घ्यायची असा आपचा जुना शिरस्ता आहे. कोंग्रेसविरुद्ध आंदोलन करुन आणि त्यांची मदत घेणार नाही असे सांगून यु टर्न (या संज्ञेवर आपने प्रताधिकार घ्यावा) घेऊन त्यांचाच पाठींबा घेतला. समजा अरविंद पंतप्रधान झालाच, तर "तो क्या है, फाईन मारा उनको और अब वो स्वच्छ हैं, अंबानी हुए तो क्या हुआ, उनको भी एक मौका और मिलना चाहीये ना" असं म्हणून पलटी मारेल याची खात्री आहे.

In reply to by मंदार दिलीप जोशी

अरविंदकडे नैतिकता आहे जोशीबुवा ,तो अदाणीच्या आणि अंबानिच्या इमानातुन फिरत नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

नेफळेचाचा, अरविंदच्या नसलेल्या नैतिकतेचे सगळीकडे वाभाडे निघत आहेत. हे पहा. याप्रश्नांची उत्तरे आहेत का त्याच्याकडे? आपच्या आमदारावर विनयभंगाचा गुन्हा नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाकडून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्र सिंह कोली यांच्या विरोधात पराभूत कॉंग्रेस उमेदवाराच्या पत्नीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. --------- आम आदमी पार्टीच्या केजरीवालांना काही प्रश्न (१) भ्रष्टाचाराविरोधात तथाकथित लढाई लढणार्‍या अरविंद केजरीवाल व त्यांच्या पत्नीची दिल्लीतून एकदाही बदली झाली नाही. पण अशोक खेमका व दुर्गा शक्ती यांच्या सारखी त्यांच्यावर एकदाही कारवाई झालेली नाही असे का? (२) प्रशांत भूषण यांच्या टिप्पण्यांच्या संदर्भात आपची काश्मीर, भारतीय सेना, व तथाकथित हिंदू दहशतवाद यांच्या विषयी काय मते आहेत? (३) आम आदमी पक्षाची रामजन्मभूमी या प्रश्नावर काय भूमिका आहे? (४) बाटला हाऊस एनकाउंटरमधे हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी मोहनचंद शर्मा यांच्या हौतात्म्याविषयी आपचे काय मत आहे? (५) आप केंद्रात सत्तेवर आल्यावर शीखविरोधी दंगलींतल्या आरोपींचे काय करणार? (६) बिनायक सेन हा कोर्टाने शिक्षा सुनावलेला माओवादी नेता आप मधे कसा? (७) भारतात इस्लामी सत्ता यावी म्हणून जाहीरपणे बोंबलणारा आणि ज्याच्या विरोधात डझनावारी वॉरंट्स आहेत अशा इमाम बुखारी या इसमासोबत केजरीवाल अनेक वेळा दिसलेले आहेत. यावर त्यांचे काय म्हणणे आहे? त्या दोघांतल्या संबंधांबाबत केजरीवाल यांच्याकडे काय स्पष्टीकरण आहे? (८) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले पवन बन्सल आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात केजरीवाल काहीच कसे बोलत नाहीत? (९) उपोषणादि कार्यक्रमात आधी भारतमातेचे चित्र लावणार्‍या आपने नंतरच्या आपल्या कार्यक्रमांतून ते चित्र अचानक का गायब केले? (१०) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीच्या एका उपोषणाच्या कार्यक्रमात अन्न वाढण्याच्या प्रकाराबद्दल केजरीवाल यांना विचारले असता मीडियाला बाईट देताना म्हणाले "आम्हाला जातीयवादी (communal) लोकांकडून समर्थन नको". मग याच आम आदमी पार्टीचे लोक उत्तराखंड कधे बाबा रामदेवांच्या लोकांनी चालवलेल्या रिलीफ कँपमधे (जे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी होते) ते जेवण हादडताना दिसले होते, त्याचे काय? फुकटचे गिळताना रामदेव बाबा सेक्युलर झाले का? (११) हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या विरोधातल्या अनेक गंभीर आरोपांबद्दल केजरीवाल शांत का? (१२) बाटला हाऊस एनकाउंटर हा फेक होता आणि इशरत जहां अगदी गोड गोजिरी लाज लाजिरी अशी भोळीभाबडी मुलगी होती आणि तो एनकाउंटरही फेक होता असे एका पत्रात केजरीवाल यांनी मुसलमान संघटनांना लिहीण्याचे काय कारण? (१३) दहशतवाद विरोधी एनकाउंटरांची यादी देताना केजरीवाल यांना नेहमी गुजरात कसे आठवते? आणि तेही हे सत्य असताना की काँग्रेसशासित महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश तसेच पूर्वोत्तर राज्ये आणि उत्तर प्रदेश यांत हा आकडा/यादी कितीतरी मोठी आहे. (१४) उत्तर प्रदेशातल्या दंगलींबाबत बोलताना केजरीवाल यांनी मोदी आणि अमित शहा यांचा ठळक उल्लेख करुन समाजवादी पक्षाचा अगदी जाता जाता पुसटसा उल्लेख का केला? या दोघांचा आणि उत्तर प्रदेशातल्या दंगलींचा काय संबंध? आणि तेही हे सत्य असताना की २ काँग्रेसचे माजी खासदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आणि काही बसपा आणि सपा खासदारांवर दंगली भडकावल्यचा आरोप आहे. काँग्रेसविषयी इतका सॉफ्ट कॉर्नर का? (१५) भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मयंक गांधी आणि दमानिया या आम आदमी पार्टीच्या सदस्यांची चौ़कशी करायला केजरीवाल यांनी अंतर्गत लोकपाल नियुक्त करणे आणि सीबीआयने काँग्रेसची चौ़कशी करणे यात विनोदाचा भाग वगळला तर फरक काय? (१६) सरकारी सेवेत असताना जास्त पगार लाटल्याचा केजरीवाल यांच्यावर आरोप होता. आपण कोणताही भ्रष्टाचार केला नाही असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यांनी अतिरिक्त पगार परत केला. त्यांनी बेकायदेशीररित्या जास्त पगार ढापला नव्हता तर त्यांनी तो जास्तीचा पगार परत का केला? (१७) माहिती अधिकाराचा डंका पिटणार्‍या आम आदमी पार्टीच्या Core Reforms team मधल्या सदस्यांवरच भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन अनेक माहिती अधिकारात अनेक अर्ज दाखल झाले आहेत. त्या अर्जांना आप उत्तर द्यायला टाळाटाळ का करत आहे?

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> अरविंदकडे नैतिकता आहे जोशीबुवा ,तो अदाणीच्या आणि अंबानिच्या इमानातुन फिरत नाही. अरविंदकडे नैतिकता आहे म्हणूनच तो 'इंडिया टुडे'च्या विमानातून फिरतो.

In reply to by श्रीगुरुजी

इंडीया टुडेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तो त्यांच्याच व्यवस्थेने जाणार ना! उद्या महाराष्ट्र मंडळ USA ने श्रीगुरुजीना भाषण द्यायला बोलावले तर ते स्वतःच्या खर्चाने जाणार की मंडळाच्या खर्चाने.? 'विका'सपुरुष कोणत्या न्यायाने अदाणीचे हेलिकॉप्टर वापरतात ते ही सांगा..कि दिले तर घ्या असा प्रकार आहे..

In reply to by नानासाहेब नेफळे

ग्रेटथुंकर नामांतर करून परत आलेले दिसताहेत. डिसेंबर २०१३ मधील निवडणुकांच्या निकालानंतर ते उद्विग्न होऊन परागंदा झाले होते. आता नामांतर करून परत आलेले दिसत आहेत. पण नाव बदलले तरी विचार कसे बदलणार? असो. एकतर इंडिया टुडे या कॉर्पोरेटचा कार्यक्रम घेऊन त्यांच्याशी जवळीक कशाला साधायची? आणि जर घेतला तर कार्यक्रमाच्या दिवशी दिल्लीत हजर न राहता जयपूरमध्ये का भटकायला गेले? आणि समजा गेले तर तिथून स्वतःची वाहनव्यवस्था (म्हणजे आम आदमी वापरतो ती रेल्वे, बस, टमटम, वडाप सारखी सार्वजनिक वाहतूक) का नाही केली? कॉर्पोरेटच्या चार्टर्ड विमानातून स्वतः जायचं, नंतर 'विमानात केजरीवाल बसला नव्हता, तर आम आदमी बसला होता' ('आज केजरीवाल मुख्यमंत्री नही बना है, आज हर आम आदमी मुख्यमंत्री बना है' च्या धर्तीवर) अशी मखलाशी करायची आणि शेवटी इतर लोकं कशी उद्योगपतींची हेलिकॉप्टर्स वापरतात म्हणून दुगाण्या झोडायच्या! बादवे, इंडिया टुडे च्या कार्यक्रमात भाषण करू का नको? आणि नंतर त्यांचे विमान वापरू का नको? या प्रश्नांवर अरविंदने लोकांकडून एसेमेस मागवून त्यांचे मत मागविल्याचे ऐकले नाही. तसे काही केले असल्यास लिंक द्या.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> अरविंदकडे नैतिकता आहे जोशीबुवा ,तो अदाणीच्या आणि अंबानिच्या इमानातुन फिरत नाही. वाचून खूप हसायला आलं. केजरीवाल संबंधात आपणच काही दिवसांपूर्वी काय लिहिलं होतं ते विसरलेले दिसतंय. तुमच्या आठवणीसाठी ते खाली देत आहे. (http://www.misalpav.com/node/26781). जरा विचारात सातत्यता तरी राखा. ________________________________________________________________________________ केजरीवाल हा खोटारडा आहे हे टॉपगिअर्ड फिलोसॉफर - Sat, 18/01/2014 - 21:32 केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा .... सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं। सदा सर्वदा सत्यवादी विवेकी॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा। जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा॥५३॥ .उत्तर द्या ____________________________________________________________________________

In reply to by मंदार दिलीप जोशी

आपचा जुना शिरस्ता आहे
बळंच???? काँग्रेस/भाजप इ. चा जुना शिरस्ता आहे म्हटलं तर ठीक, आप तर परवापरवा स्थापन झाली.

हा फोटो दाखवितो की मोदी कधीही मुकेश अंबानी चा विरोध करु शकणार नाहीत. मोडुन पडलेला कणा ! यात जणु मोदी अंबानींना म्हणत आहेत पाठीवर हात ठेवुन नुसते लढ म्हणा ( निवडणुक )

नुसत्या गप्पा मारून, टी व्ही समोर पत्रकार परिषदा करून आणि मेण बत्त्या मोर्चे काढून सरकार चालवता येत नसते. दैव देतं आणि कर्म नेतं हेच खरं. आपला मिळालेल्या अनपेक्षित जागा पाहून वाढलेल्या अपेक्षा आणि आता त्या लोकान्चे रोजचे नौटन्कि प्रकार पाहून लोक स्वत:च्याच थोबाडित मारून घेत असतील.

'आप'ले मरण : लोकसत्ता "आप' काय करू पाहतो, याचा अंदाज येण्यासाठी त्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील मुद्दय़ांकडे लक्ष वेधायला हवे. सर्वप्रथम म्हणजे सत्तेवर आल्यावर केजरीवाल विजेच्या दरात पन्नास टक्क्य़ांनी कपात करणार आणि सर्व ग्राहकांना दररोज ७०० लिटर पाणी फुकट देणार! याच्या जोडीला भाज्यांच्या दरात ताबडतोब निम्म्याने कपात करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. नवी दिल्लीत जे जे अनधिकृत बांधकाम झालेलं आहे ते सर्वच्या सर्व नियमित करण्याचा केजरीवाल यांचा मानस आहे. (निदान या प्रश्नावर तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याची अपेक्षा ते करू शकतात. असो.) हे सगळं ते कसं करणार? किंबहुना, त्यांना ते करायचंही नसतं. कारण हे सर्व होणार नाही, हे त्यांनाही माहीत असतं. म्हणून मग विरोधाची भूमिका घ्यायची आणि आचरट मागण्या करायच्या किंवा वाह्यात आरोप करायचे. त्यात या निवडणुकीत केजरीवाल यांच्यासाठी आदर्श परिस्थिती होती. ते वाटेल त्याच्यावर वाटेल ते आरोप करू शकत होते आणि त्याला कोणीही प्रत्युत्तर देऊ शकत नव्हते. त्यांच्या विरोधात बाकीचे सगळे हतबल होते. कारण केजरीवाल हे सत्ताखेळातला अनाघ्रात पत्ता असल्यामुळे त्याचं काय करायचं, हेच कोणाला माहीत नव्हतं. आणि त्यात माध्यमांनी- बाकीचे सगळे कसे चोर आहेत, या भावनेला खतपाणी घालायचं ठरवलं असल्यामुळे केजरीवाल यांची ताकद आहे त्यापेक्षा कितीतरी प्रमाणात अधिक वाटू लागली".

‘आप’चे प्रशांत भूषण अडचणीत! १५ एकर जमीन जप्त होणार काश्मीरप्रश्नी बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेणारे आम आदमी पक्षाचे नेते अॅड. प्रशांत भूषण पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. शिक्षण संस्था चालविण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारकडून घेतलेली १५ एकर जमीन भलत्याच कामासाठी वापरल्याचा ठपका भ्रष्टाचारविरोधी पथकाने भूषण यांच्यावर ठेवला असून ही जमीन जप्त करण्याची शिफारस सरकारला केली आहे.

माझी पोस्ट दुपारी १ वाजून २४ मिनीटांनी प्रकशित झालीये. विडिओ जवळजवळ दीड तासाचा आहे. तो शांतपणे पाहून मत बनवायला, पूर्वग्रहरहित मन असेल तर, किमान २ वाजून ५६ मिनीटं (तरी) व्हायला हवी होती! मनपूर्वग्रहदूषित असेल तर वेळेचा प्रश्नच येत नाही (त्याला विडिओ कशाला पाहायला हवा?) घे कि-बोर्ड की दे प्रतिसाद (खरं तर `उचल कॉपी आणि कर पेस्ट', कारण सगळं मटेरीयल जुनंच आहे). इतके दीर्घ प्रतिसाद इतक्या कमी वेळात अशक्य आहेत. It only shows a biased mind. विरोधी मताबद्दल प्रश्न नाही पण त्यामागे विचार हवा. आणि प्रतिसाद देतांना हे देखिल लक्षात येत नाहीये की आपण मांडलेल्या अनेक मुद्यांचा उहापोह विडिओत ऑलरेडी झालायं आणि तो ही समाधानकारकरित्या.

In reply to by संजय क्षीरसागर

बरं :D हा व्हिडीओ आधी पाहीलेला असू शकत नाही का? :P

In reply to by संजय क्षीरसागर

त्याला विडिओ कशाला पाहायला हवा?
>>> करेक्ट ज्यांनी आधीच अभ्यासकरुन मतं बनवली असतील त्यांना व्हिडीयो पहायची गरज नाही. अर्थात आधीअभ्यासकरुन बनवलेल्या मतांना पुर्वग्रहदुषित म्हणु शकता आपण. किंव्वा बायसड माईण्ड म्हणु शकता ! शेवटी सगळा परसेप्शनस चा खेळ आहे ...

अर्थात आधीअभ्यासकरुन बनवलेल्या मतांना पुर्वग्रहदुषित म्हणु शकता आपण. हान तिजायला! ये लग्गा सिक्सर

जर दिड तास वेळ नसला तर १ मिनिट २२ सेकंदांच्या खालच्या चित्रफितीत देखील अरविंदचे दिलखुलास बोलणे बघायला आणि ऐकायला मिळेल. (कुजबुज असल्याने कॅप्शन्स देखील वाचू शकता)....

In reply to by विकास

>>> अरविंदकडे नैतिकता आहे ह्यो विरोध्कांचा कट हाय. आमी आमच्या डोळ्यावर्चा चश्मा, कानात्ला मळ आनी डोस्क्यात्ल खूळ आजाबात काडनार नाय. यकदाच सांगून ठिव्तो. कारन आमाला म्हाय्त हा की, >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D

कंटाळा कसा काय ह्या खेचराना येत नाही ह्याचे आश्चर्य वाटते.बर मोदी भ्रष्टाचारी आहे असे मानले तरी ज्याचा भ्रष्टाचार सिध्द झाला आहे अश्या ए राजाविरोधात ह्याने उमेदवार का उभा नाही केला? महाराष्ट्रात फक्त गडकरी भ्रष्टाचारी आहेत मग शरद पवार काय साधुसंत आहेत काय? हा कधीच सोनिया गांधी किंवा राहुल गांधी विरुध्द बोलत नाही, मग ह्याची शेरकि दहाड आहे कि गधे का गायन?अरविंद हा एक वाघाचे कातडे पाघरलेला गाढव आहे. हा कोणत्या एका तत्वावर घट्ट आहे हे संजय क्षीरसागर तुम्ही आम्हाला आठवुन सांगा.

हा कधीच सोनिया गांधी किंवा राहुल गांधी विरुध्द बोलत नाही
जावयबापूंचा भ्रष्टाचार, हरयाणामधील DLF चे जमीन घोटाळे 'आप'ने बाहेर काढले.जेट्ली वा स्वराज ह्यांनी नाहीत्(वर मुलाखतीत म्हंटल्याप्रमाणे ही सर्व माहिती भाजपवाल्यांनाही होती.)
अश्या ए राजाविरोधात ह्याने उमेदवार का उभा नाही केला
'आप' अर्थातच राजकिय पक्ष आहे.त्यांनी राजकिय फायदा बघू नये अशी अपेक्षा करणे जरा अती वाटते.वरच्याच चालीवर म्हणायचे तर राहूल गांधी,चिदंबरम्,शरद पवार ह्यांच्या विरोधात अडवाणी,स्वराज्,जेटली का नाही उभे रहात?

पण आपचे साधारण 35-40 सिटा लागायचा जर चमत्कार घडला तर मात्र सत्ताधारी 5 वर्षे सुखाने झोप घेऊ शकणार नाही हे नक्की.

In reply to by आत्मशून्य

अनुमोदन, एकदा आप लोकसभेत गेली की मग या काँग्रेस+ भाजप युतीला बरोबर तडा जाईल.आपला निवडुण देणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.जयहिंद.

In reply to by नानासाहेब नेफळे

ही दिल्ली नाहीये, की बहुमत मिळवण्या इतक्या संखेचे उमेद्वार आपकढुन उभे केले जावेत. आपने तेव्हडी संघटना दिल्लीत निर्माण केली होती तसे इतर राज्यांबाबत अजुनही केलेले नाही. इतर राज्यात "आपची" डेवीड वर्सेस गोलायथ मधील डेवीड म्हणूनच "हवा" झाली आहे, एक प्रभावशाली संघटना म्हनुण न्हवे. इन शॉर्ट आप कॅन नॉट बी स्बस्टेनशीअल थ्रेट टु इवन इडिओट्टा, पापे. मान्य आहे राहुल वर टिका म्हणजे त्याचे महत्वच। वाढवण्यासारखे आहे, पण म्हणून इतके टारगेट करायचे केजुला ? करणारच म्हणा कारण तो थ्रेट नाही, त्याचे सगळे उमेदवार जिंकले तरीही तो दिल्ली प्रमाणे सत्ता स्थापना करण्या इतपत मोठा नाही, ही खुणगाठ पक्कि आहेच आणी म्हणूनच फक्त त्याच्यावरच टिका करत राहुन मेडीयामधे अनुल्लेखाने कॉग्रेसची गेम करायची चालही. पण तरीही ताक किती फुंकुन प्यावे याला खरे तर मर्यादा नको काय ? ज्या कोणाला केजरीवाल पंतप्रधान व्हायची स्वप्न बघत आहे असे वाटते अथवा हे खरेच तसे आहे असे वाटते त्याला वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा.

In reply to by आत्मशून्य

ही दिल्ली नाहीये, की बहुमत मिळवण्या इतक्या संखेचे उमेद्वार आपकढुन उभे केले जावेत. आपने तेव्हडी संघटना दिल्लीत निर्माण केली होती तसे इतर राज्यांबाबत अजुनही केलेले नाही.
हे इतक्या खात्रीने कसे बोलावे? सोमवारपर्यंत आपचे ३१७ उमेदवार उभे राहिले होते. महाराष्ट्रात सगळ्या ४८ जागांवर उमेदवार आहेत. नी यापैकी कित्येक उमेदवार आणि त्यांनी राजकारणाबाहेर असताना केलेली समाजसेवा निव्वळ थोर आहे. तरीही इतकी खात्री!?

In reply to by ऋषिकेश

दिल्ली सोडून अन्य राज्यांत आपची अशी काय संघटना आहे ते पहायला आवडेल. त्या त्या ठिकाणचे कामसू इ. लोक आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न आहे, पण दिल्लीच्या तोडीचं काही आहे का? उगा भप्पार्‍यांवर किती विश्वास ठेवायचा?

सर्वांच्या डोळ्यांवरचे झापड मे महिन्या अखेर उघडेलच. पण उशीर झालेला असेल. ज्याला राजा समजले तो प्यादाच निघाला. तवाकी नावाचा तरस

In reply to by विवेकपटाईत

बरोबर आहे तुमचे! खाली बघा- किंग मोदी कोण कुणाला राजा समजतंय ते ही कळेल :)

संजय जी, आपण पंचतंत्र वाचल आहे का? काकोलुकीयम् पंचतंत्रचा तिसरा भाग आहे. मग अरविंद बद्धल लिहा.

In reply to by विवेकपटाईत

ते तवाकीचे सोडा हो. लालकृष्ण आणि अरुण नावाचे रेडे आणि सुषमा नावाची म्हैस महाबलीच्या पाठीत शिंग खुपसण्याच्या तयारीत आहेत ते बघा :)

>>> India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही. तुमच्यासारखे "आप"चे समर्थक केजरीवालांच्या मुलाखती व भाषणेच ऐकतात. त्यांची कृती व त्यांची नाटके एकतर तुम्ही बघत नाही किंवा बघून न समजल्यासारखे करता. त्यामुळेच ते बोलतात त्याच्यावर तुमच्यासारख्यांचा भाबडेपणाने विश्वास बसतो. "आप"च्या दुर्दैवाने इतर जनता केजरीवालांची उक्ती आणि कृती यांची तुलना करत असते. त्यामुळेच ते "आप"विषयी साशंक असतात.

In reply to by विकास

भारतातील पहिलाच मुख्यमंत्री असावा जो ओबामास्टाइल डायरेक्ट लोकांच्यात मिसळुन खुला संवाद साधतोय, ऐकुन घेतोय.मान गये केजरीवाल, गर्मी तो औरोने महसुस की जो मफलर तुमने ओढाथा.