✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गुप्तकाशीतील योगी 2

य
यकु यांनी
गुरुवार, 05/31/2012 - 04:50  ·  लेख
लेख
गुरुमाऊली नवरत्न नाथांनी माझ्या दीक्षेचा वृत्तांत कोणताही आडपडदा न ठेवता कथन करण्‍यास परवानगी दिली आहे. कारण जे काही त्यांच्याकडे आहे ते परोपकारार्थ वापरलं जावं असं त्यांनी सांगितलंय. तर काल ज्या ठिकाणी थांबलो होतो तिथून सुरु करु. विलासराव आणि मी त्या राजराजेश्वर मंदीराच्या प्रांगणात सॅक टाकून निवांत बसलो. मस्त वारा सुटला होता, विलासराव म्हणे आपल्याला झोपायला हीच जागा मस्त आहे. म्हटलं बरंय - इथेच झोपू. पण पिडा अशी झाली की मला लागली होती उन्हाळी! विलासरावला मी ते आधीच सांगितलं होतं आणि त्या टॉकीज जवळ एकदा जाऊन आल्यानंतरही चार-पाच वेळा जाऊन यावं लागलं होतं. एरव्ही मला कधी उन्हात फिरायची सवय नाही. कंपनीत जाताना रिक्षावाल्याला वीस रुपये गेले तर गेले, पण भर दुपारी उन्हातून चालत जायला जीवावर येतं. सकाळी कधी जाग आलीच तर दहा वाजता मात्र रिक्षाने जात नाही, आणि रात्री परत येतानाही रिक्षा नसला तरी चालतो. मग आधीच्या रात्री झोप झालेली नसताना दिवसभरात डांबरी रोडवरुन 14 किलोमीटर तंगडेतोड केल्यावर आम्हाला उन्हाळी लागणारच! विलासरावलाही रोज-रोज उन्हातून 25-30 किलोमीटर चालून माझ्यापेक्षाही जबरदस्त उन्हाळी लागली होती. उठून लघवीच्या जागी जाईपर्यंतही तो त्रास सहन होत नव्हता म्हणे. पण त्यांनी कुठल्यातरी गावात मेडीकलवाला गाठला आणि औषध घेतलं; पण ते घेऊनही फरक पडला नाही वाटतं, कारण त्यांनी दुसर्‍या एका माणसाने दिलेली आणखी एक गोळी घेतली, कारण हे जबरदस्त औषध आहे आणि उन्हाळी एका फटक्यात थांबेल असा छातीठोक विश्वास त्यांना भेटलेल्या कुठल्यतरी अस्सल एमपीवाल्यानं दिला होता - आणि ते घेतल्यानंतर त्यांची उन्हाळीही थांबली. त्यांची रोजची नर्मदा पूजा झाल्यानंतर त्यांनी सॅकमधून ती दोन्ही औषधं काढली आणि दोन्ही घ्‍यायला सांगितली, कारण विलासरावचा गुरुमंत्र ! आपल्याला काय कळतं? नेमक्या कोणत्या औषधामुळं आपल्याला गुण आलाय दोन्ही औषधं घेतली असतील तर नक्की कळू शकत नाही. मी ही उन्हाळीनं बेजार असल्यानं काही समजून घ्‍यायच्या मूडमध्‍ये नव्हतोच, उन्हाळी थांबण्‍याशी मतलब ;-) तर त्यांनी दिलेली ती औषधं घेतली आणि निवांत आडबाजूला जाऊन मोकळा होत राहिलो. चालून चालून पाय बधीर झाले होते, झोप नसल्यानं मेंदू नीट काम करीत नव्हता. विलासराव म्हणाले चला घाटावर जाऊन येऊ. तो घाट, तो महेश्वरचा अभेद्य स्‍थापत्य आणि आत कितीतरी प्राचीन सुंदरतम् ईमारती असलेला किल्ला किती जुना आहे देवजाणे. महिरपदार कमानीनंतर नर्मदेच्या पात्रात उतरलेल्या लाल दगडांच्या पायर्‍यांवरुन खाली गेलो. घाटाच्या दगडावर बसून थेट नर्मदेत पाय सोडले - त्वदीय पाद पंकजम् नमामि देवि नर्मदे! नर्मदा एवढी जीवंत आहे, की माणसात असलेल्या एकन् एक गुणाचं दर्शन ती तिच्यासोबत चालणार्‍या लोकांना घडवते. नर्मदेनं माझ्या पायाला केलेल्या, जगातल्या मी तोपर्यंत अनुभवलेल्या शीतलतम् मालिशनं पायांचा बधीरपणा कुठल्याकुठे पळून गेला. नर्मदेत पाय सोडून विलासराव आणि मी खूपवेळ गप्पा मारत राहिलो. आत्मशून्य कुठे थांबला होता देवजाणे. नर्मदेवर कितीतरी घाट आणि कितीतरी आश्रम. घाट चढून परत वर आलो. खाली जातानच माझं लक्ष घाटाच्या उजव्या बाजूस उभ्या खडेसर योग्याकडे गेलं होतं आणि तो विचार माझ्या मनात राहिला होता. असं वाटलं कशाला हे लोक शरीराला इतके कष्‍ट देतात? म्हणजे एकदा ह्यांनी ठरवलं की उभंच रहायचं, तर कित्येक महिने उभेच रहातात. एवढी नर्मदा समोर वाहतेय - मस्त ती देते ते खावं, प्यावं - तिच्याच मांडीवर बसावं-उठावं, हसावं, रडावं तर ते नाही! हे हट्‍टाने उभेच रहाणार, हे हठयोगी. सिद्धीबिद्धी, तंत्रमंत्र, साम-दाम-दंड-भेद यांच्याकडे असायचेच. च्यायला आपण कुणासारखाही एक साधाच माणूस - काहीच मिळालं नाही आपल्याला, आणि काही मिळवण्याचीही गरज नाही, उलट जे जे जमवलंय ते आपोआप सुटतंय, हे बरंच आहे - वगैरे विचार माझ्या मनात आले होतेच. वर राजेश्वर मंदीरासमोर सॅक टाकून दिल्या होत्या तिथे आलो. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो. चित्रगुप्तांनी मागे अहिल्याबाईंच्या काळातील कागदपत्रांचा धागा मिपावर टाकला होता, तर ते अहिल्याबाईंचे वंशज कोण रॉबर्ट की कोण ते कुठे भेटू शकतील ते विचारावं म्हणून जानव्यानं पाठ खाजवत मंदीराच्या पायरीवर पुजारी महाराज बसले होते त्यांच्या खालच्या पायरीवर जाऊन बसलो. हो ना! उगाच त्यांना अपमान झाला असं वाटायला नको. त्यांना विचारलं तर त्यांना आधी मी काय विचारतोय ते लक्षातच येईना. पुन्हा पुन्हा 'अहिल्याबाई के वंशज, रॉबर्ट कुछ नाम है ना' वगैरे सांगितल्यावर ते म्हणे 'हां, हां, वो - वो है, लेकीन उनका नाम राजा शिवाजीराव है.. क्या करना है उनसे मिलके?' म्हटलं बुवा अशी अशी कागदपत्रं नर्मदेत बुडवणार आहेत असं ऐकलंय, त्याबाबतीत होतं. तर ते म्हणे 'वो अमरिका में रहते है..' म्हटलं मग इथं कधी येतात? तर ते म्हणे 'आते है कभी कभार आठ दिनों के लिये, और वापिस जाते है.. लेकीन ज्यादातर अ‍मेरिका में ही रहते है..' म्हटलं ग्रंथ मिटला! मग आमच्या सॅक टाकल्या होत्या तिथे परत येऊन बसलो. विलासराव कुठेतरी गायब झाले होते. ते फ्रिझरकडून येताना दिसले. म्हणे, कुठे जाऊन बसले होते? म्हटलं तो असा असा धागा मिपावर आला होता, तर ते म्हणे जाऊ द्या ना राव - ते मिपावरचे धागे वाचणार आणि तुम्ही इकडं परेशान होणार, इथे आहात तर आनंद घ्या. म्हटलं खरंय, पण आता आलोच आहोत तर काहीच विचारपूस केली नाही असं व्हायला नको. तेवढ्यात एक मुलगा सांगत आला - 'अरे, आप यहां रुकें है? मैने तो गुप्ताजी को फोन करके बागडी आश्रम में आपके रहने की व्यवस्‍था की है.. उधर चलिए ना..वहां पंखे वगैरा है, यहां रातको मच्छर काटेंगे' वगैरे. एकूण इथे थांबू नकाच. ते ऐकून विलासराव म्हणे इथंच बरंय, मोकळी हवा आहे, झोप मस्त लागेल. त्या पोराला म्हटलं, 'हमारा एक दोस्त खोजना है, उसको मिल आते है, और आ जाते है.. किधर है वो आश्रम?' तर तो खालच्या बाजूला हात करुन म्हणे, 'ये क्या, यहीं नीचे है.. देखो, इतनी अच्छी व्यवस्‍था है वहां, आ जाना उधर.' विलासरावांना त्या मंदीराचं ते प्रांगण आवडलं होतं, आणि आम्ही रात्री तिथेच झोपणार होतो, पण आता कुणी एवढ्या प्रेमानं स्वत: येऊन व्यवस्‍था करीत असेल तर काय बोलणार. तरी पण 'बट व्हाय?' हे वाटलंच होतं. विलासरावांनाही मी हे विचारलं होतं - ते म्हणे आता आपली वृत्तीच अशी असते त्याला काय करणार? आणि त्यांनाही कुणीतरी येऊन सांगितलं होतं की रात्री फार डास चावतील इथे झोपू नका. म्हणून त्याला म्हटलं, 'हमारा एक दोस्त परिक्रमा में है, यहां कोई पंढरीनाथ आश्रम है, वहां रुका है.. उसको पहले मिल आना है.. वो आश्रम किधर है?' तर सोनू म्हणे 'अरे वो घाट पर बहोत दूर है..' म्हणून तो निघून जाऊ लागला. त्याला म्हटलं, थँक्यू सोनूभैय्या..मिल आते है उसको. हा सोनूभैय्या म्हणजे कोण ते लक्षात आलं ना? तोच तो, आम्ही महेश्वरमध्‍ये प्रवेश केल्यानंतर ज्याला पत्ता विचारला होता आणि ज्यानं 'जल्द ही मिलते है' म्हटलं होतं तो! विलासरावांनी त्यांच्यासोबत बाटलीत असलेल्या नर्मदेची आरती वगैरे केली, मलाही आग्रहानं नर्मदेची आरती म्हणायला लावली. ते झालं की मी आत्मशून्याला पाहून येतो म्हणून पुन्हा घाटाखाली गेलो. सायंकाळनंतरचं प्रसन्न वातावरण होतं. घाटावर हॅलोजनचे मोठ्ठे लाइट लागले होते. लोक मस्त मजा करीत होतो, पोरी फुगड्या, शिवाशिव खेळत होत्या, काही यात्रेकरु लोकांची जेवणखाणं सुरु होती. आता इथे पंढरीनाथ आश्रम शोधणे आले! विचारत विचारत पुढे जाऊ लागलो. कुणीतरी काहीतरी खूण सांगितली, त्या दिशेने दूरपर्यंत जाऊन आलो, पण जिकडेतिकडे शुकशुकाट, आणि अंधार, तरी बरं रामदासकाकांनी दिलेली, विलासरावचा फार जीव असलेली बॅटरी हातात होती. त्या जुन्यापुराण्‍या घाटावरच्या नेमक्या कुठल्या आश्रमात आत्मशून्य थांबला असेल देवजाणे! निराश होऊन परत आलो. तरी परत येताना एकजण तिथे निवांत बसलेला दिसला. त्याच्याजवळ जाऊन बसलो आणि पंढरीनाथ आश्रमाबद्दल विचारलं, तर ते म्हणे 'मैं पंढरीनाथ आश्रम में ही रहता हूं.. किसे खोजना है?' म्हटलं बुवा असा असा मित्र परिक्रमेला आला आहे, धामणोदमध्‍येच भेट घेता आली असती, पण तो पुढे निघून आला आणि इथे पंढरीनाथ आश्रमात थांबलाय. ते म्हणे दिखने में कैसा है? म्हटलं 'है मेरे जैसा ही, लेकीन अब परिक्रमा में है तो आधा भी नहीं रहा होगा..' ते म्हणे 'महाराष्‍ट्र के चार लोग आश्रम में रुके है, लेकीन आप बता रहें है वैसा वहां कोई नहीं है. मै आश्रम में ही जा रहां हूं.. फिर एकबार पूछताछ करता हूं..' म्हटलं, 'मिला तो देखीए, उसको बताना तुम्हारे दोस्त तुम्हें खोज रहें है और राजराजेश्वर मंदीर में रुकें है' ते माझ्याकडं पाहून गोड हसले, त्यांना धन्यवाद!' म्हणून तिथून उठलो आणि नर्मदेच्या घाटावरची शोभा पहात-पहात परत येऊ लागलो.. भूक लागली होती पण घाटावर खाण्‍यापिण्याचं दुकान दिसत नव्हतं. रंगबिरंगी बर्फगोळ्याचे गाडे होते, तिथेच एक खाल्ला आणि एक विलासरावसाठी द्रोणात घेऊन राजराजेश्वर मंदीराकडे परत आलो. ते म्हणे इथे नकोच राव, रातच्याला डास झोपू देणार नाहीत असं सगळे लोक म्हणत आहेत. म्हटलं चला! बागडी आश्रम जिंदाबाद. ते म्हणे तुम्हाला माहित आहे तो आश्रम? म्हटलं त्याला काय, सोनू म्हणाला ना इथेच खाली आहे म्हणून. जाऊन पाहू. ते म्हणे चला. पुन्हा खाली आलो. सोनू कुठे गायब झाला होता देवजाणे. विलासरावला म्हटलं तुम्ही वरच थांबा. आत्मशून्याला शोधून घाट चढून वर येताना सोनू त्या योगी महाराजांसोबत गप्पा मारत उभा होता. खाली गेलो तर ते एकटेच उभे असलेले दिसत होते. त्यांना विचारलं, 'सोनू कहां है?' त्यांचं अवधान तीव्रतम होऊन नजर माझा वेध घेत असल्याचं दिसलं आणि नजर तशीच माझ्यावर खिळलेली राहून ते देत असलेल्या उत्तरावर लक्ष न देता ते म्हणून गेले, 'बाजार में जाने की बात कर रहा था..' परत वर विलासरावांकडे आलो. म्हटलं चला, आपणच शोधू, सोनू कुठेतरी गेलाय. सॅक वगैरे घेऊन खाली आलो, तो बागडी आश्रम तिथेच खाली होता, पण दार बंद दिसत होतं. एक कुणीतरी बाई हातात पुजेचं साहित्य हातात घेऊन घाट चढून आमच्याकडे येताना दिसल्या. आम्ही विचारी होऊन तिथे उभे असलेले पाहुन त्यांनी आम्हाला विचारलं, 'यहां क्यों खडे, है, क्या चाहिए?' विलासराव त्यांच्याशी बोलले. परिक्रमेत आहोत, इथे आत झोपायचं थांबायचं आहे, पण आश्रम बंद दिसतोय. त्या बाईंनी स्वत: गेट वाजवलं, आतल्या बाईंना उठवलं आणि हे लोक आलेत, यांना इथे झोपायचं आहे वगैरे सांगितलं. आत गेलो. आश्रमाच्या आत एक आरसीसीचं घर होतं, आणि एका बाजूला एक मठी टाईप जागा होती, तिचा दरवाजा बंद. ते दार वाजवलं. आतून कुणीतरी उघडलं. आम्ही तिथे थांबायला येणार असल्याचं त्यांना सोनूने आधीच सांगितलं असावं. कारण त्यांनी फार आगतस्वागत केलं. तिथे एक अगदी शरीराची काडी शिल्लक राहिलेले, जटासंभार, दाढी मोकळी सोडलेले एक संन्यासी, दुसरे एक परिक्रमी आराम करीत होते. त्या आश्रमातल्या दर्भांपासून तयार केलेल्या गादीवर निवांत बसलो. हे कोण, ते कोण झालं. त्यातल्या एकाने जेवण झालंय का, की करायचं आहे हे विचारलं. विलासराव म्हणे, जेवण नकोय आज, आमच्याकडे खरबूज आहे, सब मिलके खायेंगे. त्यांनी पुन्हा आग्रह केला, फिर भी, कुछ चाहिए तो बता दिजीए, अभी बनाते है..चाय वगैरा कुछ? मी म्हटलं सब के लिये बन रही है तो बनाईये, हमारे लिये स्पेशल मत बनाओ.. मग ते उठले आणि आतल्या बाजूला असलेल्या स्वयंपाक घरात गेले. आम्ही बसलो होतो तिथून गॅस वगैरे दिसत होता. विलासरावांनी मला सॅकमधून खरबूज काढायला लावलं. त्या चहा बनवत असलेल्या रामभक्त माणसाला बतई कुठेय ते विचारलं आणि दरडावून बाहेर बोलावलं, 'गॅस बारीक करुन चहा बनत राहू द्या, इकडे या खरबूज खाऊ' तिथेच शेजारी ठेवलेल्या करंडीत दोनचार बतया पडलेल्या होत्या, विलासरावांनी त्यातलीच एक उचलून टरबूज कापायला सुरु केलं होतं. त्या रामभक्ताने बाहेर येऊन चांगली धार असलेली बतई दिली आणि विलासरावांनी आधीची बतई खाली ठेऊन टरबूजाच्या दहा बारा फोडी केल्या आणि त्या संन्याशाला दोन आणि दुसर्‍या माणसाला दोन दिल्या. विलासराव आणि मी एकाच ताटात ठेवलेल्या खरबूजाच्या फोडी खात होतो. चहा बनून बाहेर आला. त्या रामभक्तालाही विलासरावांनी दोन फोडी दिल्या, मला आग्रह करुन शिल्लक राहिलेली फोड खायला लावली. म्हटलं बास ! पोट भरलंय. ते म्हणे घ्या हो, पुन्हा भूक लागेल रात्री, मग मी त्या फोडीचे आणखी दोन भाग केले, एक त्यांना दिला एक मी खाल्ला. विलासराव म्हणे तुमचं आमच्यावर भलतंच प्रेम! मग झोपण्‍याच्या तयारीला लागलो. मी पँट वगैरे काढून बर्म्युडा घातली. जीन्सची पँट काढताना बघून ते संन्यासीबाबा हसून म्हणे, 'अंदर हवा नहीं जाता है.' दर्भांच्या गाद्यावर निवांत पसरलो आणि थोड्यावेळ गप्पा हाणत बसलो. विलासरावांनीही तिथेच थप्पी लावलेल्या दर्भाच्या गाद्यांतून एक गादी काढून त्या मठीतल्या देवघरासमोर टाकली, त्यावर त्यांची सतरंजी टाकली आणि आडवे झाले. रामभक्त बाबाच्या मोबाईलवर गाणी सुरु होती, त्यांना मध्‍ये एकदोन वेळा फोन येऊन गेला - आलेत का ते लोक, जेवणखाण्याची व्यवस्‍था केलीय ना? वगैरे. मग त्यांनी फोनवर अपडेट दिले. सगळे निद्रादेवीच्या आराधनेला लागले. मी पण या कुशीवरुन त्या कुशीवर होऊ लागलो. होत होत रात्रीचा एक-दीड वाजला. सगळे झोपले होते. मला काही झोप येईना. शेवटी उठलो आणि सिगारेट, तंबाखू, बॅटरी बर्म्युडाच्या खिशात टाकली, पाण्याची बाटली घेतली. त्या मठीचं दार उघडून बाहेर पडून लाऊ लागलो तर लागेचना. मग दगड उचलला आणि बाहेरुन दाराला लावला. तरी मध्‍येच त्या रामभक्ताला जाग आलीच ! 'कौन है?' मी म्हटलंच मीच आहे, जरा हो आता हूं. बाहेर पडलो आणि मठी‍ बाहेरच्या ओट्यावर येऊन बसलो. एवढी शांत रात्र पडलेली! महेश्वर किंवा गुप्त काशी म्हणतात ते पुरातन शहर. आजूबाजूला नुसत्या प्राचीन ईमारती आणि शांतपणे हलणारे महावृक्ष. थोडावेळ बसून राहिलो आणि खाली घाटावर गेलो. सायंकाळी खळखळाट करीत वाहणारी नर्मदा आता गंभीर होऊन शांत वाहात होती. वीतभर लांब मासे अगदी काठापर्यंत येऊन परत जात होते. मध्‍येच डुबूक! करुन वर उडी घेत होते. मांडी घातली आणि डोळे मिटून घेतले. आतही नर्मदाच वाहात होती. अर्धा पाऊण तास बसून राहिलो. डोळे उघडल्यानंतर पुन्हा निरीक्षण करीत बसलो. वर परत जावं वाटेना. घाटावर जटाभार वाढलेले, अस्ताव्यस्त संन्यासी तुरळक पडून होतेच. मला वाटलं हीच माझी झोपण्‍याची जागा. तिथेच अंग टाकलं. शांऽऽऽत! अर्धापाऊण तास गेला असेल की विलासराव मला शोधत आलेच! म्हणे काय यकु? मला वाटलं गेलात काय की नर्मदेमध्‍ये. ते जवळ येऊन बसले. त्यांना म्हणालो विलासराव, योगी आहोत हो आपण पूर्वजन्मीचे. ते म्हणे, आपल्याला हे काही समजत नाही बाबा. ते म्हणे मलाही तिथं झोप येत नव्हतीच. म्हटलं इथेच मस्त आहे, झोपा निवांत. थोडावेळ गप्पा केल्या, झोप आपोआप उतरली. गरमी नहीं, ठंड नही, मच्छर नहीं कुछ नहीं. सकाळी साडेपाचला जाग आली असेल. घाटावरुन वरुन खाली उतरताना उजव्या बाजूला उभ्या असणार्‍या योगी महाराजांचा विषय कसाकाय निघाला माहित नाही. मी म्हटलं प्रॅक्टीकल करुन पहाणार्‍या लोकांना बरीच माहिती असते. त्यांच्यासोबत बोलून पहायला पाहिजे. असं काहीबाही बरंच बोलून वर मठीत गेलो. कपडे वगैरे घेतले आणि स्नानासाठी परत घाटावर आलो. नर्मदेत मस्त लांबपर्यंत हात मारत जाऊन परत आलो - नर्मदेच्या पाण्यानं अंग स्वच्छ केलं. घाट चढून वर येत असताना बहुतेक विलासराव त्या योगी महाराजांसोबत बोलत बसले आणि मी वर मठीत गेलो आणि थोड्या वेळात परत विलासराव शेजारी येऊन बसलो. त्या दोघांचं काय बोलणं सुरु होतं माहित नाही कारण मी घाटावर बसून नर्मदेचं निरीक्षण करीत होतो. ते नाथपंथीय योगी असून परिक्रमेतच आहेत असं ते म्हणाले. शरीराचं संतुलन गेल्यानं महिनाभरापासून उभेच असून एकूण पाच महिनेपर्यंत उभंच रहायचं आहे वगैरे. ते झोपही गळ्यापर्यंत असलेल्या ओट्यावर काही कपडे ठेऊन त्यावर उभ्यानंच डोकं ठेऊन घेत असावेत, कारण मी रात्री दीड वाजता ध्‍यानासाठी घाट उतरत होतो तेव्हा ते झोपल्यासारखे तर दिसत होते पण झोपले होते की जागे ते त्यांनाच माहित. ते सिल्व्हासा की कुठे नोकरी करीत होते तेव्हा काहीतरी वाचून की कुठल्या घटनेमुळे तीन दिवस सतत रडत राहिले आणि त्यांना उपरती झाली. मग सगळं सोडून ते तिथून शिर्डीला चालत आले. विलासराव अहमदनगर जिल्ह्यातलेच असल्याने त्या दोघांतच संवाद चालला होता. शिर्डीपासून जवळच असलेल्या कोकणखार गावाबद्दल बोलणं सुरु होतं. बहुतेक जनार्दन स्वामी त्यांचे गुरु. कारण जनार्दन स्वामींचा सगळ्यात अव्वल पट्‍टशिष्य होऊन दाखवीन असं काहीतरी त्यांच्या बोलण्‍यात आलं होतं. परिक्रमेबद्दल वगैरे बराच वेळ बोलणं सुरु होतं. शहरात जाऊन चहा, नाष्‍टा करुन येण्याचा विषय निघाला. ते म्हणे चला, मी पण येतो. मग त्यांनी आधी बहुतेक आम्हाला विश्वेश्वराच्या मंदीरात नेलं. तिथे दर्शन वगैरे घेऊन मंदीरातूनच वर गेलेल्या रस्त्याने आम्ही आम्ही थांबलो होतो त्या मठीत आलो. मी तिथे त्यांचे आणि त्यांच्या पायाचे फोटो काढले. विलासराव म्हणे, झालं! हे लिहिणार आता तुमच्याबद्दल इंटरनेटवर. म्हटलं हो, आपल्याला प्रॅक्टीकल करुन पहाणारी माणसं आवडतात. योगी महाराज हसले.
त्या रामभक्त माणसानं सगळ्यांसाठी चहा केला. योगी महाराजांना चिलीम प्यायची असावी, म्हणून आमच्या मठीतूनच मागच्या बाजूला जाणार्‍या दारातून विश्वेश्वर मंदीराच्या शिखराला भिडूनच असलेल्या माळवदावर ते, तो रामभक्त, गांजा वगैरे आणणारा पोरगा, मी आणि मागून विलासरावही येऊन बसले. कुठल्याही प्रकारचा नशा माणसाच्या जाणीवेवर परिणाम करु शकत नाही हे मी भांग खाऊन स्वत: अनुभवलं होतं. माणसाची जाणीव तशीच अभंग रहाते. जाणीव in the sense, whatever drugs you may consume, you cannot get out of this whole business. शरीर काही काळ निष्क्रिय होऊन पडेल, पण आत जाणीव तशीच कार्यरत असते. शरीर आणि जाणीव एकात एक गुंतलेल्या दोन गोष्‍टी असल्या तरी त्या स्वतंत्रपणे ऑपरेट होतात, ही शरीर आणि जाणीव ऑपरेट करणारा सोर्स जाणून घेणं बुद्धीच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्‍ट आहे, आणि ते जाणून घेण्यापूर्वीच You become formless still in form, thoughtless still with thoughts. योगी लोक गांजा, भांग वगैरे नेहमी घेतात ते त्यातल्या नशेच्या आनंदासाठी नव्हेच, जाणीवेचा शरीराशी संबंध तुटावा म्हणून. हा वेगळा भाग झाला. पण मी जेव्हा भांग खाऊन रस्त्याने फिरत होतो तेव्हा माझ्या त्या नशेतल्या बोलण्‍या, चालण्‍यात आणि नॉर्मल बोलण्‍या चालण्‍यात काहीच फरक वाटत नव्हता, काही लोक म्हणे भांग खाल्ली की लोक विचित्र वागायला लागतात, भांगेमुळे मला अवधान केंद्रित करण्‍यासाठी जास्त मदत झाली. मागे गवि म्हणाले होते की भांग खाल्ली की लोक तीच-तीच गोष्‍ट पुन्हा पुन्हा करतात, हे मात्र खरं असलं तरी एरव्हीही नॉर्मल असताना आपण त्याच गोष्‍टी पुन्हा पुन्हा करीत असतोच की, फक्त आपल्याला त्या रिपीट होत आहेत याचं भान नसतं. भांग, पिल्यानंतर काही लोकांचं शरीरावरचं नियंत्रण जात असेल, सुरुवातीला माझंही गेलंच होतं, पण भांग खाऊन शरीर आणि मनाचं अवधान साधलं तेव्हा जाणवलं की जाणीव तीव्र होतेय in the sence you can beat anybody intellectually.पण हे एका मर्यादेपर्यंतच मजा देतं. तुम्ही दुसर्‍यांना इंटलेक्चुअली किंवा दुसर्‍या कोणत्याही प्रकारे मात देऊन काय करणार? कोणताही प्रश्न आपला स्वत:चा असतो, आपलं त्याबद्दल काहीतरी इंटरप्रिटेशन असतं आणि आपण ते लोकांवर थापत असतो. Why? एकमेव कारण म्हणजे आपल्याला आतून त्या उत्तराबद्दल Recognition आलेलं नसतं, म्हणून तीच गोष्‍ट आपण बाहेर सांगून बाहेरुन Recognition मिळण्याचा प्रयत्न करतो. बाहेरुन कुणी दिलेलं रेकग्नीशन, तुमची दुसर्‍याने तयार केलेली कुठलीही ओळख बोगस असते. उदाहरणार्थ यकु चांगला आहे, यकु चांगलं लिहितो, यकु डोकं आऊट करणारं लिहितो, यकु वाईट आहे, यकु गांजेकस आहे, यकु अमका, यकु ढमका काहीही म्हटलं तरी त्याचा माझ्यावर कसाकाय परिणाम होऊ शकतो? Whoever gives me any recognition, that is their own problem - because I don't know how I am & there is no need to know. उदाहरणार्थ मला फार दिवसांपासून प्रश्न पडला होता की लैंगिकतेकडे ओढा का निर्माण होतो? मला असं आढळलं की पूर्ण शरीरभर, नव्हे माणसाच्या अस्तित्वभर संवेदना निर्माण करु शकणारा शरीरातला एकमेव शक्तीशाली पॉइंट म्हणजे शिस्न. जेवढ्या तीव्र संवेदना शीस्नाच्या घर्षणातून उत्पन्न होतात, तेवढ्‍या इतर कुठल्याच मानवी इंद्रियाच्या वापरातून होत नाहीत. So we use that organ again & again to sensitize ourself! बाकी मग त्यामधून निर्माण होणारी पुढची लफडी आपण पाडलेली अर्भकं अमानवी पद्धतीने नष्‍ट करणार्‍या डॉक्टरच्या रुपात समाजात पहातोच. आता हे सगळं लिहितोय याचा अर्थ सगळ्या लोकांनी भांग खाल्ली पाहिजे, आणि गांजा ओढला पाहिजे असं माझं म्हणणं नाही. फक्त हे असं केल्यानंतर काय झालं ते मी सांगतोय. भांगेच्या चारपाच गोळ्या गादीखाली पडून आहेत, पण आता त्याची गरज राहिलेली नाही, आणि गांजाची तर नाहीच. असो. अवांतर झालं.
तर या सगळ्या गोष्‍टीमुळं आज चिलीम ओढून पहाण्याची संधी आली होती तर ती मी सोडणार नव्हतो. चिलीम वगैरे तयार होईपर्यंत ते योगीमहाराज बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो. चिलीम तयार होऊन ते झुरका मारत असताना मला जाणवलं की चिलीम हाताच्या पकडीत पकडून श्वास आत घेत असताना कुंडलिनी त्यांच्या डोळ्यांतून ब्रह्मांडात जात आहे, कारण मी पण इकडे काही न करता ते अनुभवत होतो. कुंडलिनी डोळ्यातूनच ब्रह्मांडात जात असेल असं काही नाही, पण तेव्हा डोळे जबरदस्त दिसत होते. आता कुंडलिनी ब्रह्मांडात जात होती म्हणजे नेमकं काय, तर मला जे अनुभवाला येत होतं ते म्हणजे बसलेल्या स्थितीत असताना जमीनीला शरीराच्या जेवढ्या भागाला स्पर्श होतो तेवढीच या जगातली अनुभूती शिल्लक उरलीय, बाकी शरीर नाहीच, सगळं केवळ दृश्य, ते दृश्य पहाणारा अस्तित्त्वात नाही. मी घाबरुन गेलो. आणि पटकन हात जमिनीवर टेकले, सगळं ओके होतं. शरीर होतं, मी होतो, माझे विचार होते, सगळं होतं. पण पुन्हा त्यांनी झुरका मारला तेव्हा तीच अनुभूती. मग माझ्याकडंही चिलीम देण्यात आली. मी ओढून पाहिली तेव्हा तोच अनुभव. काहीच फरक नाही. पण एक जाणवत होतं, की ते माझ्‍यात चालू असलेला विचार वाचत आहेत. माझ्या मनात विचार येऊन गेला हे सगळं इंटरनेटवर लिहायला पाहिजे, क्षणात त्यांनी इंटरनेटवर हा अनुभव लिहिण्याबद्दल बोलायला सुरुवात केली. मला वाटतं मी चिलीम ओढत असताना विलासरावांनीच त्या योगी महाराजांना माझ्यामागे उभं राहून आशीर्वादाचा हात वर केलेला फोटो काढला आहे.
आम्ही खूपवेळ चिलीम ओढत बसलो. आम्ही म्हणजे विलासराव वगळता. विलासरावांनाही नवरत्न महाराजांनी चिलीम ऑफर केली होती, पण ते म्हणे मी बिडी, सिगरेट, चिलीम काहीही ओढत नाही. मात्र गांज्याच्या नशेनं माझे डोळे जडावले, डोळे म्हणजे फक्त डोळेच, जाणीव नव्हे. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी परत आम्हाला घाटाजवळच्या त्यांच्या मठीत गेलो. तिथेही बराच वेळ ते माझ्याच मनातले विचार पुढे नेत आहेत हे जाणवलं. विलासरावही येऊन बसले होतेच. मध्‍येमध्‍ये मी त्यांना नेमकं काय चाललंय ते सांगत होतो, तर विलासरावचं ते ठरलेलं उत्तर 'आपल्याला काही कळत नाही.' ते आपले डोळे मिटून विपश्यना करीत होते. मग योगी महाराजांनी आम्हाला चला काही खाऊन येऊ म्हणून बाहेर काढलं. This is something quiet interesting for you to know. प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्‍येत झाला, मग त्यांचं काही नामोनिशाण आज अयोध्‍या म्हणून जे शहर ओळखलं जातं तिथे असायला पाहिजे वगैरे सब झूठ है. प्रभू रामचंद्राचा जन्म महेश्वर किंवा गुप्त काशीत झाला. एकही दगड न भंगलेला, अगदी अक्षत, आत्ता कालपर्वा बांधून काढलाय असं वाटावा एवढा सुंदर राजवाडा आजही महेश्वरमध्‍ये आपल्याला पहायला मिळू शकतो. मी पाहिलाय, म्हणजे माझे गुरु नवरत्न नाथ यांनी तो मला दाखवलाय. तुम्ही तिथं पहायला गेलात तर त्या राजवाड्यावर पाटी आहे 'राम मंदीर' आणि गाभार्‍यात शिव पिंड आहे.
आता हे गौडबंगाल समजूनच घेता येणार नाही, त्यासाठी भारतीय संस्कृती काय चीज आहे ते आधी नीट पहावं लागेल. इतिहास संशोधकांना थोडे कष्‍ट घेऊन या दाव्याबद्दल खरंखोट करता येईल. चित्रगुप्तांनी मिपावर टाकलेल्या धाग्यानुसार, अहिल्याबाईंच्या काळातील जुनीपुराणी कागदपत्रे नर्मदेत बुडवली जाणार आहेत, तत्पूर्वी ते रॉबर्ट किंवा राजा शिवाजीराव या अहिल्याबाईंच्या संपर्क साधून ती कागदपत्रे हस्तगत करावीत आणि ते राम मंदीर अहिल्याबाईंनी बांधलं का ते तपासून पहावं. They will not find any record. अहिल्याबाई या फक्त त्या मंदीराच्या संरक्षक होत्या, कारण basically she was Shiv Yogini. काळाच्या दृष्‍टीनं विचार करायचा तर भगवान शंकर आधीचे, राम त्यांच्या नंतरचे, आणि त्यांच्या नंतरच्या अहिल्याबाई. त्यामुळं ते बांधकाम अहिल्याबाईंनीच केलंय असं म्हटलं जाणार. आता कदाचित रामाच्या मंदीरात शिव पिंड आणि तो राजवाडा अहिल्याबाईंनी बांधलेल्या किल्ल्यात का त्याची संगती लागली असेल.
हा राजवाडा पाहिला आणि नंतर त्यांनी आम्हाला एका शक्तीपीठाचं दर्शन करुन आणलं.
यानंतर त्यांनी ते ज्या स्‍थळी साधना करत होते ते स्‍थान दाखवलं. तिथे सेम ते जसे उभे रहातात तशीच एक मूर्ती आहे - त्या दैवताचं नाव बटलेश्वर.
त्यानंतर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या शरीरात परकाया प्रवेश केला आणि मला हे सगळं काय आहे त्याचं उत्तर विचारलं. वरुन चिलमीच्या फेर्‍यावर फेर्‍या चालूच होत्या. म्हणजे थेट आव्हानच! ते म्हणे हे सगळं काय आहे ते तू मला समजून सांग, मी तुझा शिष्य बनतो, नाहीतर मी तुला समजून सांगतो - तु माझा शिष्‍य बन. मी म्हटलं येताना मी काहीच सोबत आणलेलं नाही, काहीच नव्हतं. मै जब नहीं था तो मै बना कैसै? असं काहीतरी बोललो आणि म्हटलं मला काही विचारु नका. ## वर लाथ मारुन इथून हाकलून दिलंत तर जास्त बरं, पण अशी परिक्षा पाहू नका. दुसर्‍याच्या शरीरात शिरण्‍याचे हे प्रकार मला समजूच शकत नाहीत. या उत्तराने कदाचित त्यांचं समाधान झालं असावं. त्यांनी आडबाजूला जाऊन मला दीक्षा देण्यासाठी त्यांनी त्यांच्या गुरुंची प्रार्थना करुन परवानगी घेतली आणि मी दिलेलं उत्तर ऐकून त्यांचे गुरु 'अवघड काम आहे! देऊन टाक!' म्हणाल्याचं त्यांनी दीक्षा झाल्यानंतर आम्हाला सांगितलं. त्या स्‍थानाहून परत येत असताना एका पाणथळ जागी चार की पाच कुत्रे डुंबत होते त्यांचं दर्शन घ्यायला लावलं. ते भैरव आहेत असं त्यांनी सांगितलं. परत आम्ही त्या भवानीच्या किंवा शक्तीच्या मंदीरात आलो. तेव्हा तेच भैरव भवानीच्या मंदीराजवळ येऊन बसले होते. तिथे थोडावेळ थांबलो. निघताना रस्त्यात त्यांनी मला सांगितलं 'माझं मागून दर्शन घेणारा माणूस भाग्यवान बनतो.' मी घेतलं. त्यानंतर आमची पदयात्रा एका कटींग सलूनमध्‍ये गेली. तिथल्या न्हाव्याला सांगितलं इसके बाल कटवाओ. पोलीस कट रखो. इथेही परकाया प्रवेश चालूच होता. पोलीसकट मला आवडतो. माझ्या सिनीयर पोलीस प्रॉसीक्यूटर राहिलेल्या आजोबांना पाहून पाहून मला तसे केस ठेवणं खूप लहानपणापासून आवडतं. अर्थात ते स्वत: काही पोलीस नव्हते, पण पोलीसात निवड झालेल्या लोकांना कायदा शिकवणार्‍या निवासी पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य होते, मग त्यांच्याही केसांची स्टाइल पोलीसांसारखी असणार आणि मलाही पोलीस कट आवडणार. पोलीस कट सांगूनही न्हावी कायच्या काय कटींग करतात ते सोडून द्या! मग आम्हाला त्यांनी एका हॉटेलमध्‍ये नेलं. तिथे विलासराव आणि मी मस्त दाबून जिलब्या, कचोर्‍या हाणल्या. नवरत्न नाथांनी फक्त चहा घेतला. बील मी दिलं - तेव्हा विलासराव 'ये राजा आदमी है' म्हणाल्याचं मला आठवतंय. त्यांना मोबाईलचं एक रिचार्ज कार्ड पाहिजे होतं, ती त्यांनी मला आणायला सांगितली. मी एका ऐवजी चार आणली. एक कुठेतरी पडलं असं ते म्हणत होते, मी तरी जेवढी आणली तेवढीच त्यांच्या हवाली केली. मी माझी सँडल भवानीच्या मंदीरात गेलो असताना तिथेच विसरुन आलो होतो. मग परत त्यांच्या मठीत येईपर्यंत पुन्हा एकदा माझी सत्वपरिक्षा सुरु! ते अनवाणी पुढे आणि मी मागे - वर दुपारचा तळपता सूर्य. जमीन असली तापली होती की ज्याचं नाव ते, निखार्‍यावरुनच चालत होतो म्हटलं तरी चालेल. रस्ताभर नुसता ठणाणा बोंबलत होतो - बस करो! बस करो! वरुन पुन्हा विलासरावांचे पायाखालचा ताप आणखी वाढवणारे प्रश्न! नवरत्न नाथ पुढे निघून गेले की गुप्त झाले पत्ता नाही, पण विलासराव सोबत होते. राजराजेश्वराच्या मंदीरापर्यंत आलो तेव्हा विलासराव त्या पुजार्‍याचं निमित्त करुन प्रेमळपणे उखडले. ही झोपायला चांगली जागा आहे काय? झोपा आता जाऊन तिथे. म्हटलं मरण जवळ आलं! एवढ्या उन्हात त्या तापलेल्या फरशीवर झोपायचं? विलासरावला पुन्हा विचारलं, झोपू का? ते म्हणे काही गरज नाही, चला पुढे! शेवटी पुन्हा नवरत्न नाथांच्या मठीत येऊन पोचलो. तिथे त्यांनी त्यांच्याकडंचं जानवं काढलं. सध्‍या तीनच तारा देतो म्हणे. त्या जानव्यात त्यांनी त्यांच्या गळ्यातल्या रुद्राक्षाच्या माळेतला एक रुद्राक्ष ओवला. माझं नाव काय आहे ते विचारलं. तोपर्यंत नाव, गाव काही विचारलं नव्हतं. हे जानवं हातात धर आणि सूर्याकडं एकटक पाहून दहा वेळा गायत्री मंत्र म्हण म्हणाले. मी ते जानवं चुकीचं पकडलं होतं. दोन्ही हाताच्या तर्जनी व अंगठ्यात जानवं लांबवून त्यातून सूर्याकडे पहायचं अशी पद्धत त्यांनी सांगितली. बाहेर गेलो. सूर्य अगदी डोक्यावरच होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणं कृती केली आणि गायत्री मंत्र म्हणत गेलो तेव्हा वरच्या सूर्याचं तेज खाली फाकत येऊन माझ्या त्रिनेत्रावर आदळलं, आणि आत सावलीत आलो तरी जिकडे नजर जाईल तिकडे झगझगीत प्रतिबिंब बराच वेळ चमकत राहिलं. आत आलो तेव्हा ते म्हणाले - देखो, चेहरा भी बदल गया है. पुढेही पुन्हा पझल सॉल्व्हींग होतंच. बहुतेक विलासरावांनी येताना दोन खरबूजं घेतली होती. नवरत्न नाथांनी त्यापैकी एक कापायला लावलं. अर्धं भक्कल मला दिलं आणि अर्धं विलासराव आणि नाथांचा कुणीतरी शिष्‍य आला होता त्यांना दिलं. नाथ म्हणे हे न तोडता खा. टरबूजाचं ते भक्कल मी न तोडता तसंच कोरुन कोरुन खाल्लं. ते म्हणे तु ब्राह्मणाच्या कुळातला म्हणजे तुमचं खापर निर्गुण ब्रह्म भोगणारं. आता हे सुलट ठेऊन नर्मदेत सोडून दे आणि म्हण की नर्मदे मला हा धर्मलाभ झाला आहे, मला हे जे मिळालं आहे त्याचागैरवापर न करण्‍याची बुद्धी दे, हे तुझं तुला अर्पण असो. हे झाल्यानंतर नवरत्न नाथ म्हणे यानं स्वत: काही गोष्‍टी समजून घेतल्या होत्या, हे सगळं प्रकृती ठरवते. पात्र तयार असेल तर त्यात पडतंच अशा अर्थानं काहीतरी. मला आज खूप चांगलं वाटलं. एरव्ही मी कधी बाहेर जात नाही, पण आज फिरल्यानं खूप बरं वाटलं. यानं मला ओळखलं आणि मी याला ओळखलं. विलासराव आणि मी खाली नर्मदेकडे गेलो. ते टरबूजाचं भक्कल त्यांनी सांगितल्याप्रमाणं नर्मदेत सोडलं, स्नान केलं. विलासराव नर्मदेचं पाणी हातात घेऊन खाली नर्मदेत सोडत म्हणाले ही गोष्‍टी एवढी सोपी आहे. पुन्हा मठीत आलो. पुन्हा गप्पा होत राहिल्या. पुन्हा नाथांनी चिलीम पेटवली. त्यांनी ओढली. माझ्याकडं दिली तेव्हा ती विझली होती. मला ते म्हणे पेटव आणि ओढ. यावेळी बहुतेक विलासराव मठीत नव्हते, ते आम्ही थांबलो होतो तिकडे गेले होते. विलासराव मला महेश्वरहून पुढे मंडलेश्वरपर्यंत सोबत चला म्हणत होते. मला इंदूरला परतावं वाटत होतं. नवरत्न नाथांनी विलासरावांना त्यांच्या चातुर्मासासाठी काही पत्ते सांगितले. काहीही ओळख सांगण्याची गरज नाही म्हणे. मी परत वर गेलो, सँडल दिसत नव्हती. नाथ म्हणे तु भवानीच्या मंदीरात विसरुन आलास. म्हटलं तिकडे जावं लागणार. ते म्हणे काही गरज नाही, साडेसहा वाजता मिळून जाईल. मागे कधीतरी किडा म्हणून दोस्तांसोबत चिलीम ओढली असली तरी स्वत: हातात धरुन पेटविण्याची ही पहिलीच वेळ होती. मी ती सिगारेटसारखी थेट तोंडात पकडली तेव्हा ते जे भडकले, सांगता सोय नाही! तुझ्या मनात काहीतरी वेगळं आलं म्हणून ते तुला देत नाहीयेत असं ते म्हणाले. दोन-तीन दिवसात तुझ्या तोंडावर काळिमा पसरेल वगैरे काहीतरी बोलले, डोळे तप्त! मी म्हणालो काय चुकलं माहित नाही, हे असंच आहे, हवंतर मारुन टाका - पण असं काही बोलू नका. मग त्यांनी माझ्या तोंडावरुन हात फिरवला. म्हणे - बस्स! बस्स! आजच दीक्षा झाल्यानं त्यांनी तुला पुन्हा एकदा दिलं नसेल. जेवढं मिळालंय तेवढ्यावर समाधान मान. गोल श्रीयंत्र वगैरे असतं तसं काहीतरी काढलं आणि ते माझ्या कपाळावर लावलं. ते त्यांच्या पूजेतल्या नर्मदेच्या फोटोकडं बघून म्हणाले - आई याला अक्कल दे - अभी समझता नहीं है. वीर्य व्यर्थ घालवणं बंद कर. लग्न होईल तेव्हा पहिली तीन वर्षे बायको आणि तु दगडाच्या मूर्तींसारखे झोपा. तीन वर्षांनंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा एकच थेंब वीर्य सोडून मूल जन्माला घाल. मी म्हणालो पण मला लग्न करायचं नाहीय. ते म्हणाले, तिची काळजी करायचं तुला कारण नाही, तिची ती समर्थ असेल. मला ब्रह्मसंकर हवाय. या देशाला तु काही देणं लागतो की नाही? बराच वेळ ते नर्मदेशी बोलत राहिले, मला वाटलं मलाच काहीतरी बोलतायत म्हणून मी काय? म्हणून परत त्यांच्याकडे गेलो तर त्यांचा नर्मदेसोबतचा संवाद सुरु होता. वर आलो, विलासराव सॅक भरुन तयार होते. मी पण पँट वगैरे घातली, आवराआवर केली आणि दरवाजात आलो तर सँडल तिथे पडलेली दिसली. विलासरावांना चालत मंडलेश्वरपर्यंत जायचं होतं. किमान थोडावेळ सोबत चला. मग एका पुलापर्यंत त्यांच्यासोबत गेलो. आता थांबतो म्हटलं. गळाभेट घेतली आणि परत फिरलो. बस स्टँड कुठेय ते रस्त्यात कुणालातरी विचारलं. तिथे गेलो. एका मुलाला इंदूरच्या गाडीबद्दल विचारलं तर तो म्हणे पौने पाँच बजे इंदूर जानेवाली व्हाइट सिद्धीविनायक आयेगी, ये ड्राइवर कुछ भी बतायेंगे, अंदर जा के धर्मशाला में बैठ जाओ. गुपचूप आत जाऊन बसलो. पावणेपाच वाजता बस आली. विलासरावचा निरोप घेण्‍यापूर्वी काढलेला फोटो
(समाप्त) -------------------------------------------------------- रजनीश असोत की युजी, मुजी की पुंजाजी की एकहार्ट टुली की गोयंकाजी - की मानसशास्‍त्रावर काम करणारा ब्रायन वीइस सारखा सायकॅट्रिस्ट, कितीही आणि कोणत्याही क्षेत्रातील नावं घ्‍या - They are talking same thing! म्हणून युजीसारखं अँण्‍टीगुरुचं वाचून अनुभवत असताना गुरु कसा मिळाला यात आश्चर्य नाही, because what we are dealing with is HUMAN race & everything is only HUMAN creation.

Book traversal links for गुप्तकाशीतील योगी 2

  • ‹ गुप्तकाशीतील योगी 1
  • Up
  • गुप्तकाशीतील योगी ३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
संस्कृती
नाट्य
धर्म
इतिहास
वाङ्मय
प्रेमकाव्य
मुक्तक
व्युत्पत्ती
समाज
जीवनमान
रेखाटन
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा
माध्यमवेध
लेख
अनुभव
माहिती

प्रतिक्रिया द्या
34747 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

+१ गणेशा

पप्पुपेजर
गुरुवार, 05/31/2012 - 15:34 नवीन
+१ गणेशा

हे सगळं पटवून

इष्टुर फाकडा
गुरुवार, 05/31/2012 - 15:40 नवीन
हे सगळं पटवून घ्यावसं वाटतंय पण सोसत नाहीये. किंवा कळतही नाहीये आणि वळतही नाहीये. मधेच 'माझं मागून दर्शन घेणारे भाग्यवान होतात' अशी वाक्ये हे सगळं समजायला अवघड करताहेत. तीन वर्षे लग्नानंतर पाषाणमूर्ती सारखे झोप वगैरे तुमच्या बायकोला कसे शक्य आहे? का ती collateral damage ? एक थेंब वीर्य! - कसं काय? गांजा ने जी तुम्ही वर्णन केलीये ती अनुभूती मलाही आली होती. त्याकडे बघण्याचा माझा अप्प्रोच वेगळा होता. माझा त्यानंतरचा निष्कर्ष असा होता कि गांजा ओढायचं 'Intention' हे त्याच्या नशेवर जबरदस्त परिणाम करत असतं. कारण ती नशा करताना जो विचार तुमच्या मध्ये घोळत असतो तो जबरदस्त Intensify होतो. असं काही तुमच्या बाबतीत झालं असेल का? कारण तुम्ही जे नशेतल्या जाणीवेबाबत बोललात ते अगदी अनुभवसिद्ध आहे आणि इथे मी मांडलेल्या मुद्द्याशी सुसंगत आहे. अर्थात मी या सगळ्याबाबत फक्त तर्कच करू शकतो. तुमचे हे सगळे अनुभव वाचून शहारायला झालं एवढं नक्की.

स्मिता, गणेशा, सागर, ढब्बू

आंबोळी
गुरुवार, 05/31/2012 - 19:49 नवीन
स्मिता, गणेशा, सागर, ढब्बू पैसा, ५० फक्त या सर्वांशी सहमत. हे सगळं पटवून घ्यावसं वाटतंय पण सोसत नाहीये. किंवा कळतही नाहीये आणि वळतही नाहीये. मधेच 'माझं मागून दर्शन घेणारे भाग्यवान होतात' अशी वाक्ये हे सगळं समजायला अवघड करताहेत. तीन वर्षे लग्नानंतर पाषाणमूर्ती सारखे झोप वगैरे तुमच्या बायकोला कसे शक्य आहे? का ती collateral damage ? एक थेंब वीर्य! - कसं काय? शब्दा-शब्दाशी सहमत. यक्कुशेठ खुप डिट्टेलवारी लिहिलय... लिखाण उत्तमच झालय. (आधी थोडी शंका आली की जालिंदरबाबांची आवृत्ती तर नव्हे.) पण आमच्यासारख्या यःकस्चीत (आरे हा शब्द कसा ल्ह्यायचा रे?) पामरांना ते खुपच विस्कळीत आणि आगा-पिछा गायब करून लिहिल्यासारखे वाटतय... सध्या काय चालू आहे? इंदौरातल्या बर्‍याच लोकांमार्फत नाथांनी तुमच्याशी संपर्क साधला म्हणजे काय केले? कसे केले ? त्यांचे समाधान झाले हे तुम्हाला कसे कळाले? त्यांनी तुमच्या लग्नाबाबत जो आदेश दिलाय त्यावर तुमचे मत काय? तुम्ही तो पाळणार आहात कि फाट्यावर मारणार आहात? फाट्यावर मारणार आहात तर कसा? लग्न करुन पाषाणवत न रहाता की लग्नच न करता? फाट्यावर मारणार नसाल तर लग्न करून ३ वर्ष पाषाणवत राहुन आपण एखाद्या मुलीवर अन्याय करतोय असे वाटत नाही का? लग्न करायच्या आधी त्या मुलीला विश्वासात घेउन हे सगळे सांगणार आहात का? १ थेंब कसा कंट्रोल करणार आहात? आणि मुख्य म्हणजे विलासरावांची यासगळ्यावर काय प्रतिक्रीया आहे? अजुनही बरेच प्रश्न घोंगावतायत. शब्दात बांधता आले की विचारतोच.
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

आता बस झालं.

यकु
गुरुवार, 05/31/2012 - 20:57 नवीन
आता बस झालं.
↩ प्रतिसाद: आंबोळी

स्मिता, गणेशा, सागर, ढब्बू

यकु
गुरुवार, 05/31/2012 - 18:43 नवीन
स्मिता, गणेशा, सागर, ढब्बू पैसा, ५० फक्त यांचे प्रतिसाद पूर्णतः फाट्यावर मारण्यात येत आहेत.

च्यायला यक्कुलाच का असले सगळे

पिंगू
गुरुवार, 05/31/2012 - 18:56 नवीन
च्यायला यक्कुलाच का असले सगळे बाबा भेटतात? मला का भेटत नाहीत.. ;) बाकी यक्कु लेका, तुझी मर्जी. तू वाट्टेल ते करायला मोकळा आहेस.. - (त्रासून गेलेला) पिंगू

वोक्के !

इष्टुर फाकडा
गुरुवार, 05/31/2012 - 18:58 नवीन
हरकत नाही. दुखावण्याचा हेतू न्हवता.

०

पैसा
गुरुवार, 05/31/2012 - 19:03 नवीन
०

० = ?

कवितानागेश
गुरुवार, 05/31/2012 - 23:44 नवीन
शून्य बाकी राहिला का गं? :P
↩ प्रतिसाद: पैसा

सतत बाकी शून्यच आहे.

यकु
गुरुवार, 05/31/2012 - 23:48 नवीन
सतत बाकी शून्यच आहे.
↩ प्रतिसाद: कवितानागेश

:)

पैसा
Fri, 06/01/2012 - 08:55 नवीन
:)
↩ प्रतिसाद: यकु

सागर किंवा वर नावे लिहिलेल्या

यकु
गुरुवार, 05/31/2012 - 19:38 नवीन
सागर किंवा वर नावे लिहिलेल्या कुणाच्याही प्रतिसादामुळे दुखावला गेलेलो नाहीय, पण सगळी कर्म कहाणी इत्थंभूत लिहूनही तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या, कुणावर तरी अन्याय करणार्‍या वाटत असतील तर मग त्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय पर्याय नाही.

यकु,

इष्टुर फाकडा
गुरुवार, 05/31/2012 - 19:53 नवीन
तुम्ही भारी लिहिता पण तुमची लेखणी एवढीही सिद्धहस्त नाही कि तुम्ही जे असामान्य अनुभव घेतले आहेत ते जसे च्या तसे आम्हाला; निदानपक्षी मलातरी पूर्ण समजून घेता येतील :) त्यात तुमच्या बाकीच्या लेखापेक्षा हा लेख थोडासा संदर्भ लावण्यामध्ये जड जातोय. यात योगीबाबांच्या काही विधानांवर शंका येणं हे अज्ञानी लोकांसाठी स्वाभाविक नाही काय (तुमच्या लेखी जरी कर्म कहाणी इत्थंभूत असली तरी)?
↩ प्रतिसाद: यकु

अरे दोस्ता, तु तुझ्या

शिल्पा ब
गुरुवार, 05/31/2012 - 22:02 नवीन
अरे दोस्ता, तु तुझ्या आयुष्याचं काय वाटेल ते केलं तरी तो पुर्णपणे तुझा निर्णय असेल. पण एखाद्या मुलीशी लग्न करुन तिला संसारसुखापासुन केवळ अमका बाबा/ साधु म्हणाला म्हणुन वंचित ठेवणे हा तिच्यावरचा अन्यायच झाला ना!
↩ प्रतिसाद: यकु

सगळाच प्रॉबलेम सॉल्व्ह होईल

jaypal
गुरुवार, 05/31/2012 - 22:11 नवीन
जर त्या अथवा ईतर बाबा/महराजांकडुन उर्ध्वरेतन प्रक्रिया शिकता आली तर सगळ्यांचा सगळाच प्रॉबलेम सॉल्व्ह होईल. काय म्हणता? ;-)
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

बैल डोळा !

इष्टुर फाकडा
गुरुवार, 05/31/2012 - 23:29 नवीन
बेष्ट उपाय :)
↩ प्रतिसाद: jaypal

बैल डोळ्यानं करुन पाहिलं..

यकु
गुरुवार, 05/31/2012 - 23:33 नवीन
बैल डोळ्यानं करुन पाहिलं.. होतंय.. एका मर्यादेपर्यंत. डावीकडे उजवीकडे फिरतंय ते तुटलं पाहिजे म्हणजे स्‍फोट होतो असं ऐकलंय. खरंय का?
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

कल्पना नाही.

इष्टुर फाकडा
Fri, 06/01/2012 - 14:45 नवीन
माफी असावी .
↩ प्रतिसाद: यकु

यकु साहेब , लेख आवडला पण....

निश
Fri, 06/01/2012 - 12:05 नवीन
यकु साहेब , लेख आवडला पण.... नर्मदे मातेची परिक्रमा करायची ती , माता वहाताना ज्या रीतीने लोकांचे आयुष्य फुलवते आहे , आनंदी करत आहे . ते बघण्यासाठी. तिच्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी. आपल्या मनाला मी पणाचा जो मैल चिकटलेला असतो, तो तिच्या पाण्यात धुऊन मन स्वच्छ करण्यासाठी . व हे करत असताना देहाची रोजची काम ही पार पाडावयाची आहेत हे ही भान ठेउन. मुळात नर्मदे सारखा खरा गुरु असताना तुम्हाला दुसरा गुरु करायला लागला म्हंजे तुमची नर्मदेची वारी फुकट गेली. आपल्या शिष्यावर नको ती बंधन ती दिक्षा आहे अस सांगणारा गुरु व ती बंधन पाळताना सारासार विवेकाचा विचार न करता ती बंधन गुरु दिक्षा म्हणुन पाळणारा शिष्य (तुमच्या लग्न व त्यानंतरच्या तीन वर्षे ह्या बद्दल बोलतो आहे.) तुम्ही दोघही तितकेच दोषी आहात. नर्मदे माते रुपी स्त्रि शक्तिच्या पाया पडायला जात असताना लग्न करुन घरी येणार्‍या लक्ष्मी रुपी स्त्रि शक्तिचा अपमान कर अस सागणार्‍या तुमच्या गुरु ला मला नाही वाटत कोणी देव प्रसन्न होईल म्हणुन . स्वताच्या देहाला यातना देउन देव भेटत नसतो तर दुसर्‍याना होणार्‍या यातना त्रास दुर केल्याने देव भेटतो. असो.

स्वताच्या देहाला यातना देउन

यकु
Fri, 06/01/2012 - 12:16 नवीन
स्वताच्या देहाला यातना देउन देव भेटत नसतो तर दुसर्‍याना होणार्‍या यातना त्रास दुर केल्याने देव भेटतो.
येस्स!!

स्वताच्या देहाला यातना देउन

५० फक्त
Fri, 06/01/2012 - 14:24 नवीन
स्वताच्या देहाला यातना देउन देव भेटत नसतो तर दुसर्‍याना होणार्‍या यातना त्रास दुर केल्याने देव भेटतो. - पण म्हणजे यासाठी आधी दुस-याला वेदना झाल्या पाहिजेत, तर आपल्याला देव भेटणार. मग त्या ' सर्वेपि सुखिनं सन्तु ' किंवा ' जो जे वांछील तो ते लाहो ' याचं काय ?
↩ प्रतिसाद: यकु

५० फक्त साहेब, हो जिथे मानव शरीर आहे तिथे यातना आहेतच.

निश
Fri, 06/01/2012 - 14:54 नवीन
५० फक्त साहेब, हो जिथे मानव शरीर आहे तिथे यातना आहेतच. देव कुठे असतो तर तो बाबा आमटे रुपी देवमाणसात होता. हजारो पिडित कुष्ठ रोगी लोकांची सेवा करणार्‍या ह्या महामानवात होता. तसाच तो देव तुमच्या आमच्यातही आहे. पण आपण बर्‍याच वेळा तो शोधतच नाही आपल्यात. मग जातो शोधायला बाहेर. मानव काय किंवा ईतर प्राणी काय ज्याना , भुक लागते त्या प्रत्येकाला यातना ह्या आहेतच . मी भुक हा शब्ब्द फक्त अन्न ह्या एका साठी न वापरता, प्रत्येक गोष्टी साठी वापरला आहे जसे, अन्नाची भुक , संपत्तीची भुक, शारीरीक वासनेची भुक. त्यामुळे जिथे भुक आहे व मानवी शरीर आहे तिथे यातना दु:ख वेदना आहेतच.
↩ प्रतिसाद: ५० फक्त

जाणीव-नेणीव

विसुनाना
Fri, 06/01/2012 - 13:23 नवीन
यशवंतराव कुलकर्णी, वर्तमानकालात तुम्हाला जे योग्य वाटत आहे ते तुम्ही करत आहात. शेवटी मी आणि हे समस्त चराचर विश्व - जाणीव-नेणीव म्हणजे माझा मेंदूच असतो. त्यापलिकडे काही नाही. इतकेच म्हणतो. बाकी, तुम्हाला आलेल्या अनुभवांबद्दल वाचताना असेच इतर अनुभवही आठवले. लेखन अत्यंत मनोज्ञ झाले आहे.

प्रामाणिक प्रयत्न!

सुधीर
Fri, 06/01/2012 - 13:26 नवीन
सत्य शोधण्याचे तुमचे (तुम्ही, अतृप्तआत्मा, विलासराव ई.) प्रयत्न प्रामाणिक आहेत. तुमचा स्वतःचा व्यासंग तर उत्तम आहेच. खुद्द स्टीव्ह जॉब्स साहेब "नीम करोली बाबा" यांना भेटायला भारतात आले होते. त्यांना स्वतःपुरता जे काही उमजायचं होतं ते उमजलं असेलच! त्यानंतरचा इतिहास जगाला माहीत आहे. एनीवे सध्या एवढच म्हणेन, तुम्हा सर्वांचे प्रयत्न प्रामाणिक आहेत! फक्त पोटाची खळगी भरण्यापुरता जगायला आलेल्यांकडून "टुकार विडंबनच" बाहेर पडू शकतं.

अतृप्तआत्मा???? हे 'सद-आत्मे

प्यारे१
Fri, 06/01/2012 - 14:29 नवीन
अतृप्तआत्मा???? हे 'सद-आत्मे ' मनसोक्त खादाडी नंतर त्यांचं फेव्हरीट 'पान खाऊन' सत्य शोधतात नी ते त्यांना लगेच सापडतं देखील असा आमचा अनुभव आहे. ;) तुम्हाला आत्मशून्य म्हणायचे आहे हे ठाऊक आहे पण आम्ही देखील 'फक्त पोटाची खळगी भरण्यापुरता जगायला आलेले'. ;) ह घ्यालच. :)
↩ प्रतिसाद: सुधीर

यशवंत,१ आपण जे लिहिले आहे ते

जयंत कुलकर्णी
Fri, 06/01/2012 - 14:22 नवीन
यशवंत, १ आपण जे लिहिले आहे ते अजिबात पटले नाही. २ आपल्याकडून अशी वहावत जायची अपेक्षा केली नव्हती ३आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायची वृत्ती होती ती कुठे गेली ? असो. पण आम्हाला आपला प्रामाणिकपणा अत्यंत आवडला नाहीतर आजकाल जे वाटले, भोगले, उपभोगले त्याबद्दल मनात येणार्‍या खर्‍याखुर्‍या विचारांबद्दल प्रामाणिकपणाने लिहिणारा माणूस विरळाच..... याच, याच प्रामाणिकपणामुळे मला खात्री आहे जेव्हा तुम्हाला या सगळ्यातील फोलपणा समजेल तेव्हा तुम्ही परत स्वतःच्या आनंदात मग्न व्हाल.... त्यासाठी तुम्हाला आशिर्वाद. व शुभेच्छा....

याच, याच प्रामाणिकपणामुळे मला

यकु
Fri, 06/01/2012 - 14:25 नवीन
याच, याच प्रामाणिकपणामुळे मला खात्री आहे जेव्हा तुम्हाला या सगळ्यातील फोलपणा समजेल तेव्हा तुम्ही परत स्वतःच्या आनंदात मग्न होशील.... त्यासाठी तुम्हाला आशिर्वाद. व शुभेच्छा....
:) :) :) :) तसंच झालंय. मला मिपावर मिळालेला हा दुसरा आशिर्वाद.. पहिला चिंतामणी काकांचा.

ट्रेडमिल

श्रावण मोडक
Fri, 06/01/2012 - 14:46 नवीन
पहिल्या भागावर मी म्हटलं होतं की ट्रेडमिल वॉक ठरायचं हे लेखन. तसंच झालं. जे लिहिलं आहे ते सारं खरंच आहे, असं म्हटलं तर, प्रचंड कल्लोळ आहे. प्रचंड संभ्रमही आहे. तो सोडवायच्या प्रयत्नांना शुभेच्छा. अर्थात, तो कल्लोळ नीटपणे मांडला आहे हे निश्चित. हा कल्लोळ या लेखनाच्या टॅगमध्येही दिसून येतो. नाट्य, प्रेमकाव्य, मांडणी, संस्कृती, धर्म, इतिहास, मुक्तक, वाङ्मय, व्युत्पत्ती, समाज, जीवनमान, रेखाटन, स्थिरचित्र, लेख, माध्यमवेध, अनुभव, माहिती, प्रतिक्रिया, आस्वाद, समीक्षा - हे इतके टॅग ज्याअर्थी लेखकाला नीट निवडता आले, त्याअर्थी आता यकु नॉर्मल आहे. त्याची उगाच काळजी करण्याची गरज नाही. या सगळ्या टॅगना बांधून ठेवणारा एक धागा म्हणजे कल्लोळ! :-)

हे इतके टॅग ज्याअर्थी लेखकाला

यकु
Fri, 06/01/2012 - 14:51 नवीन
हे इतके टॅग ज्याअर्थी लेखकाला नीट निवडता आले
श्रामो मर्मभेद न करतील तो सुदिन! :p :p :p

अर्र...

श्रावण मोडक
Fri, 06/01/2012 - 15:41 नवीन
अर्र... लेखन आवडले (त्यातला आशय आवडला पाहिजेच असे काही नाही). त्या आनंदात प्रतिसाद लिहिला. आता त्यातून हे असं काही होईल याचा अंदाजच नव्हता. :-)
↩ प्रतिसाद: यकु

नाही नाही हो, काही झालं नाही

यकु
Fri, 06/01/2012 - 15:43 नवीन
नाही नाही हो, काही झालं नाही :)
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

मी ती सिगारेटसारखी थेट तोंडात

कवटी
Fri, 06/01/2012 - 15:05 नवीन
मी ती सिगारेटसारखी थेट तोंडात पकडली तेव्हा ते जे भडकले, सांगता सोय नाही! तुझ्या मनात काहीतरी वेगळं आलं म्हणून ते तुला देत नाहीयेत असं ते म्हणाले. दोन-तीन दिवसात तुझ्या तोंडावर काळिमा पसरेल वगैरे काहीतरी बोलले, डोळे तप्त! मी म्हणालो काय चुकलं माहित नाही, हे असंच आहे, हवंतर मारुन टाका - पण असं काही बोलू नका. मग त्यांनी माझ्या तोंडावरुन हात फिरवला. म्हणे - बस्स! बस्स! आजच दीक्षा झाल्यानं त्यांनी तुला पुन्हा एकदा दिलं नसेल. जेवढं मिळालंय तेवढ्यावर समाधान मान. याची काही टोटल लागली नाही. चिलीम तोंडात धरल्याने ते का भडकले? त्याचा तुझ्या मनात काही वेगळे आलेचा काय संबंध? आजच दीक्षा झाल्याने कुणी पुन्हा काय दिल नसेल? यकु आरे डोके आउट झालय... काय कळेना... निट समजाउन सांग ना ... बाकिच्या चहा , उन्हाळीच्या गोष्टी डिटेलवारी टाकतो आणि हेच क्रिप्टीक का?

अजूनही

मन१
Fri, 06/01/2012 - 15:07 नवीन
अजूनही लेख वाचतोच आहे. ;) तो झाल्यावर प्रतिसाद वाचावेत म्हणतोय, आणि तेही झाले की/तर माझा प्रतिसाद देइन म्हणतोय; तोवर ही फक्त पोच. ;)

वा गुरू वा

राम श्रोत्री
Fri, 06/01/2012 - 15:10 नवीन
आपले शिष्यत्व स्वीकारायची लई इच्चाय

चिलीम तोंडात धरल्याने ते का

यकु
Fri, 06/01/2012 - 15:11 नवीन
चिलीम तोंडात धरल्याने ते का भडकले? त्याचा तुझ्या मनात काही वेगळे आलेचा काय संबंध? आजच दीक्षा झाल्याने कुणी पुन्हा काय दिल नसेल?
मी तिथे उगी शानपणा दाखवत असलो तरी ते सगळं पाहून आतून टरकलो होतो. बस तेवढंच. हा असला अनुभव आयुष्‍यात पहिलाच होता.

मस्तं लेख. शेवटी ज्याची

llपुण्याचे पेशवेll
Fri, 06/01/2012 - 16:19 नवीन
मस्तं लेख. शेवटी ज्याची त्याची अनुभूती. आणि अनुभूतीच श्रेष्ठ; शब्दांचे बुडबुडे जिथे संपतात जिथे खरंच निशब्द म्हणतात. आजि आनंदू रे एकी परमानंदू रे| तया श्रुति नेति नेति म्हणति गोविंदू रे|| असा आनंद मिळाला का? शेवटी नशिबात असेल तर गुरु कुठे कसे भेटतिल काही सांगता येत नाही.

काय बोलावं कळेना...

राघव
Fri, 06/01/2012 - 18:43 नवीन
हे म्हणजे भलतंच काहीतरी झालं माझ्या कल्पनेपेक्षा. तू हा अनुभव लिहित असतांना ते सर्व परत अनुभवत असल्यासारखं लिहिलं आहेस.. त्यामुळे मधूनच संगती न लागता विस्कळीत झाल्यासारखं वाटतं. अनुभव सत्य असेल तर बाकी गोष्टी क्षुद्र ठरतात. पण तुझा अनुभव हा गांजाच्या नशेत असतांना आलाय तुला.. त्यावर काय बोलणार.. कारण मला आजवर असल्या कोणत्याही गोष्टीच्या नशेची गरजच पडली नाही.. असो. तू कितीही आदळआपट केलीस तरी हे सहज कळतं की तू विचारांच्या बाबत अत्यंत संवेदनशील आहेस.. सतत विचार करून नसता गुंता करून घेतोस अन् मग त्रागा होतो..शांत हो. काळजी घे. राघव

गांजां सत्यम जगन मिथ्थ्या!

कवटी
Tue, 06/12/2012 - 15:43 नवीन
पण तुझा अनुभव हा गांजाच्या नशेत असतांना आलाय तुला.. त्यावर काय बोलणार.. +१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
↩ प्रतिसाद: राघव

एक मात्र नक्की !!

अर्धवटराव
Fri, 06/01/2012 - 21:04 नवीन
बाकी काहिही असो, एक गोष्ट मात्र नक्की रे यकु... तुझी साडेसाती उतरली बहुतेक. बघ ना, काहि दिवसापुर्वी पब्लीक यकुशी वाद घालायचे, चर्चा करायचे, किंवा यकुला फट्यावर मारायचे... पण नवरत्न महाराज गुरु म्हणुन काय भेटले, यकु चे मिपावर असंख्य स्वयंघोषीत गुरु तयार झाले... कोणि तुला "हा सर्व भांगेचा/चिलिमीचा प्रभाव" हे पटवुन देतय, कुणी खरा देव/गुरु म्हणजे काय हे समजुन सांगतय, कुणी नोकरीधंदा कसा करावा याचा उपदेश करतय, कुणी समाजसेवा हीच ईश्वरसेवा या अर्थाचे डोज पाजतय, लग्न वगैरे संबंधी बोधामृताच्या धारा प्रसवताहेत , कुणी विडंबने करुन यकुच्या डोक्यावर पडल्याची खात्री पटवुन देतय ... आणि मुख्य म्हणजे हे सगळं यकु ला माहेश्वरला नेमका काय आणि कसा अनुभव आला याचा ओ का ठ्ठो विचार न करता... हुश्श्श् किती भाग्यवान रे यकु तु...

हा हा हा सहमत आहे. सर्वांनी

नाना चेंगट
Sat, 06/02/2012 - 14:29 नवीन
हा हा हा सहमत आहे. सर्वांनी यकुला "आपलं" म्हटलंय... ;)
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

च्यायला, ह्ये कसलं अ

प्यारे१
Sat, 06/02/2012 - 14:59 नवीन
च्यायला, ह्ये कसलं अ र्धवटराव???? आवो, अशी ट्रेड शिक्रेटं फोडू नका की यक्याची! ट्यार्पी खाली जाईल अशानं. :)
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ईतके दिवस परदेशी लोक भारतातील

निनाद मुक्काम …
Sun, 06/03/2012 - 15:57 नवीन
ईतके दिवस परदेशी लोक भारतातील तीर्थ क्षेत्री परिक्रमा करतांना पहिले होते: त्यांच्या विषयी कौतुकाने वाचले सुद्धा होते: पण आपल्यातील एक मिपाकर जेव्हा असा अगम्य ;अद्भुत अनुभव घेऊन त्यांचे यथासांग वर्णन करतो: तेव्हा गुरु ह्या शब्दाचा महिमा आपल्याला उमजतो: उगाच नाही परदेशात सुद्धा गुरु हि डेफिनेशन तेथे नेहमीच्या बोलीभाषेत वापरली जाते

च्यायला ...

विटेकर
Tue, 06/12/2012 - 15:33 नवीन
खरे तर मी यकु चा पं खा आहे .. त्यातून नर्मदा मय्या च्या गोष्टी ... पण काहीही टोटल लागत नाही...! कुणी उलगडून सांगेल का? हल्ली जी. ए . गेल्यापासून गूढ काही सोसवतच नाही ...!
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा