Skip to main content

हिंदीतून मराठीकडे

लेखक विश्नापा यांनी मंगळवार, 24/08/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतून हिंदी चित्रपटांची गाणी तयार करता येतील काय? उदा तुला पाहिले तर जाणवले मला सजणी, प्रेम असते हे वेडे सजणी (तुझे देखा तो ये जाना सनम) बघा प्रयत्न करुन......
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 15173
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by बिपिन कार्यकर्ते

संपलो!!! =)) =)) =)) -अल रंगा

In reply to by पुष्करिणी

फुटलो. एकतर हे गाणे मी "विठ्ठला कोणता झेंडा घेउ हाती" या चालीवर वाचत होतो. शेवटी अल्लाताला अवतरले तेव्हा खुर्चीवरुन पडलो मी हसुन हसुन. आजपासुन हा धागा मी ऑफ्फिसमध्ये उघडणार नाही ब्वॉ.

कुणाची गं बघतेस तू वाट मी आहे ना बघना इकडे एकवेळ मी आहे ना गप्प का गं अशी, काय सांगायचंय ते सांग तुला जेवढं हवं, तेवढं प्रेम माग हो.. तुला मिळेल प्रेम तेवढं, मी आहे ना

मिपाच्या सर्व रसिक लेखकूंना नमस्कार, माझ्या पहिल्यावहिल्या धाग्याला एवढा प्रतिसाद मिळेल असे वाटले नव्हते. धन्यवाद!

पूर्ण पूर्ण रात्र जागवतही हेचं डोळ्यातून झोप उडवतही हेचं हळूहळू प्रेम शिकवतही हेचं हसवतही हेचं, हेचं रडवतही... मन तर वेडं आहे.. मन तर वेडं आहे..

सांभाळून रहा रे सांभाळून तू रहा नाही दुसरी संधी तू सांभाळून रहा कुठेही लपशील तुला तरी शोधेल हे प्रेम आहे करणार तुला आणि तुलाच... खल्लास हे एऽऽऽऽ खल्लास .. एकदम खल्लास!

स्वप्नांचे दिवस आहेत स्वप्नांची रात्री... प्रेमळ प्रेमळ क्षण.. प्रेमळ प्रेमळ बोलणं.. नाचत आहेत सगळे वेडे.... तर नाचुया नाचुया रात्रभर................ कार्याक्रम(party) :~ :-~ :puzzled: कुठे आहे? नाचण्याच्या फरशीवर

तू माझी अर्धवट तहान तहान.. तू आवडली मनाला फार फार..आता तर......... तू माझी अर्धवट तहान तहान.. तू आवडली मनाला फार फार आता तरी ये ना जवळं जवळं .......... आहे इच्छा...) :smile:

लपाछपी पुरे झाली, सामोरा ये आता कुठे कुठे शोधू तुला, थकली रे तुझी माता ये ना सांज झाली, मला चिंता तुझी, गढूळली, पाहा नजर माझी.. ये ना

In reply to by नगरीनिरंजन

स्वामी समर्थांना शोधणार्‍या त्यांच्या आईची आठवण आणलीत राव.... अगदी चपखल बसलय... भारी समर्थ

हसून हसून डोळ्यात पाणी आले. ब्येष्ट!