Skip to main content

हिंदीतून मराठीकडे

लेखक विश्नापा यांनी मंगळवार, 24/08/2010 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतून हिंदी चित्रपटांची गाणी तयार करता येतील काय? उदा तुला पाहिले तर जाणवले मला सजणी, प्रेम असते हे वेडे सजणी (तुझे देखा तो ये जाना सनम) बघा प्रयत्न करुन......
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 15173
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

१. आपणासारखा कोणी माझ्या आयुष्यात आले तर बात होऊन जाईल - तर बा-आ-आत होऊन जाईल. - - - २. जूलीऽऽ आय लव्ह यूऽऽ - - -

In reply to by धनंजय

बा आत होऊन जाईल? हाहाहा! असे आहे काय? हल्ली मला झक्कत हिंदी सिरिअल्स बघाव्या लागतात. त्यांना मी मराठीत भाषांतरीत करते तारक मेहताचा उलटा चष्मा थोडे आहे थोड्याची गरज आहे सासर झेंडूचे फूल वगैरे वगैरे चालू द्या.

In reply to by प्रियाली

ह्यावरून तुम्ही मागे एकदा मराठीचं हिंदी केलेलं आठवलं... "बुगडी मेरी सांड गई, जाते सातारेकू..जाते सातारेकू" :)

In reply to by धनंजय

>>>आपणासारखा कोणी माझ्या आयुष्यात आले या वरून आठवले लीला मी लीला अश्शी मी लीला जर भेटावेसे वाटले भेटा एकटीला --------------------- दुसरे आता जुने पण त्यामानाने नवीन गाणे एकदम आठवले... प्रियतमा प्रियतमा आपुली तू आपण तुझा तुझ्झ्या प्रेमात पडूंदेंत माझे कुटूंब वाढूंदेत हा एव्हढाच विचार आहे आता...

In reply to by विकास

प्रियतमा प्रियतमा आपुली तू यावरून धुमधडाका या आमच्या आवडत्या चित्रपटातील 'प्रियतम्मा प्रियतम्मा दे मला तू चुम्मा' हे गाणं आठवून गेलं.

In reply to by विकास

गाण्याच्या शब्दांचे भाषांतर समजू शकते, पण नावांचेही करणे म्हणजे कहरच...मानलं बुवा! आता काही गाण्यांचं (त्यातल्या नावासह) भाषांतर आमच्या आग्रहाखातर करता का जरा? 'तय्यब अली प्यार का दुश्मन' 'अमर अकबर एंथनी' 'जॉनी मेरा नाम' इ. स्थळाचही करत असाल तर सांगा, तो ही ष्टॉक आहे मंडळाकडे.... भारी समर्थ

पूर्वी इथे एक काका होते, ते हिंदी गाण्यांचे चालीबरहुकुम मराठीकरण करायचे! कुठे गेले ते आता?

अजून नाही आले साजण ग, श्रावण जाई निघून हाय रे, श्रावण जाई निघून.

तसे आमचे मराठी (अन हिंदी) कच्चेच. त्यामुळे आम्ही फार काही मदत करु शकत नाही. (म्हणुन दुसर्‍यांनी केलेली मदत इथे देण्याचा प्रयत्न करतो) हे घ्या एक गाणे मराठीत, अदिती! http://www.youtube.com/watch?v=RHFa3eVdMrc&NR=1 पण जाता जाता, हे फ्रेंड्स मराठीत. http://www.youtube.com/watch?v=2J5vaI2DGYo बाकी चुकुनही पर्‍याला विचारु नका म्हणजे झालं!

जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया चे भाषांतर - जिथे फांदीफांदीवर सोन्याच्या चिमण्या करतात निवारा तो भारत देश आहे माझा (भारतीय)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

बेलाशेट, अहो त्याला काही यमक, प्रास? समोरच्या कोनाड्यातील व्हीन्दमातेची आठवण झाली. (पहिल्या वाक्याची courtesy पुलं ) ह. घ्या (किंवा घेऊ नका, कसेही)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

निवारा आणि माझा यांत 'आ' हे आकारान्त स्वरयमक आहेच. शिवाय योगेशनी म्हटल्याप्रमाणे चालीत म्हणता येतेच आहे. (तंत्रशुद्ध)बेसनलाडू

ह्या धाग्याची खफक्षमता खूप आहे, हा धोका पत्करून (कधी नव्हे ते) गंभीर प्रतिसाद देतोय. हिंदी गाण्यांचे मराठीकरण डोंबिवलीपासून सॅन होजे पर्यंत बर्‍याच लोकांनी करून हसे करून घेतले आहे. भाषांतर कसे असावे ? जे भाषांतर वाटत नाही, ते. "सारे जहांसे अच्छा" चे भाषांतर शांताराम नांदगावकरांनी केलेले आहे: "सार्‍या जगी सुरम्य, हा हिंददेश अमुचा". तसे.

In reply to by मिसळभोक्ता

हिंदी गाण्यांचे मराठीकरण डोंबिवलीपासून सॅन होजे पर्यंत बर्‍याच लोकांनी करून हसे करून घेतले आहे.
डोंबिवलीपासून सॅन होजे की मनोगतापासून मिपापर्यंत? मनोगतावर "ओह रे ताल मिले नदी के जलसे" गाण्यातील "है रे" या बैलांना हाकारण्याच्या आवाजाचे मराठी भाषांतर "खैर रे खैर रे" असे झाल्याने गो. रा. खैरनार आणि बाकीचे समस्त खैरे स्वप्नात एकत्र झिम्मा फुगडी घालताना दिसले होते त्याची आठवण झाली.

In reply to by प्रियाली

डोंबिवले ते सॅन होजे, म्हणजेच गोळे ते सामंत असे लिहायला हवे होते. शब्दशः भाषांतराची ही खुमखुमी वाढत्या वयानुसार तेज होते की काय, ह्यावर कुणीतरी संशोधन करायला हवे. असो. सध्या : आम्ही होऊ स फ ल आम्ही होऊ स फ ल आम्ही होऊ स फ ल एक दिवस हो हो हो मनात आहे विश्वास पूर्ण आहे विश्वास आम्ही होऊ स फ ल एक दिवस एवढेच म्हणतो.

In reply to by मिसळभोक्ता

भाषांतराची ही खुमखुमी वाढत्या वयानुसार तेज होते की काय, ह्यावर कुणीतरी संशोधन करायला हवे.
असावे. पुरावा: आम्ही होऊ स फ ल* * मी पहिल्यांदा आम्ही हाऊसफुल असे वाचले.

In reply to by प्रियाली

मी पहिल्यांदा आम्ही हाऊसफुल असे वाचले. टॉप २५ चा अंमल अजून उतरला नाही वाट्ट !

In reply to by मिसळभोक्ता

"वुई शाल ओव्हरकम"... हे मूळ गाणे आहे. मूळ हिंदी गाण्याचे डोंबिवली-सानहोसे भाषांतर अपेक्षित आहे. (कायद्याचे पत्र नव्हे, तर कायद्याचा मद्यार्क पाळा!)

In reply to by धनंजय

रडत रडत येती सगळे हसत हसत जो जाईल तो नशीबाचा सम्राट प्रिये म्हणवला जाईल पुढे ?

In reply to by मिसळभोक्ता

तो शिकंदर काय होता ज्याने जुलूम करून जिंकले जिथे (जहाँ) प्रेमाने जिंकतो हृदयांना तो झुकवेल आकाशाला जो सतारींवर कहाणी प्रेमाची लिहून जाईल तो नशिबाचा शिकंदर जाणतो, मन म्हणवला जाईल. (अथवा : तो नशीबाचा सम्राट प्रिये म्हणवला जाईल)

In reply to by धनंजय

बेईमान हे जीवन ठोकरेल एके दिवशी मृत्यू जणू प्रेयसीच माझी सोबत नेईल खाशी मरणातुन जगण्याची अदा जो शिकवी ह्या दुनिये तोच शिकंदर म्हणवे अपुल्या नशिबाचाच प्रिये चतुरंग बक्षी

In reply to by मिसळभोक्ता

नसलो तरी तुमचे कौतुक सन्मानपूर्वक स्वीकारतो! ;) (कौतिकराव)चतुरंग पाटील

In reply to by चतुरंग

ज्येष्ठ म्हणजे डॉन ब्रॅडमन, विरेंदर सेहवाग, ब्रायन लारा... आपल्यातुपल्यासारख्या सटरफटर वयोमानाबद्दल नाही बोलत आहेत मिसळभोक्ते... आपल्यातुपल्यासारख्यांच्या घाईगर्दीचा वाहातुक मुरंबा होऊ दे, पण तशा खर्‍या ज्येष्ठत्वाची सर नाही यायची.

In reply to by चतुरंग

चोता दोन ने सदस्य परिचयाचा चान चान धागा काढला होता. त्यात आम्ही काही लिहिले नाही, पण लिहायचेच असते, तरः मी भोक्ता, मिसळ भोक्ता. चांगल्या सर्जनशील लोकांकडून वाट्टेल ते करवून घेण्यात हातखंडा. असे लिहिले असते.

पूर्वी शेमारूच्या विडियो कॅसेटवर येणार्‍या इंग्लिश सबटायटलची आठवण आली!

समुद्रात आंघोळ केल्यानी .... अजून खारट झालीयेस........ (समंदर में नहाके और भी नमकीन हो गयी हो )

ह्या माझ्याकडून ;) माझे कुठलेसे सामान तुझ्या घरी पडून आहे अरे, पावसाचे काही ओले दिवस ठेवलेत रे... हो अजून माझ्या पत्रात लपवलेली एक रात्र आहे ती रात्र विसर, माझे सामान परत दे रे --------------------- क्षण क्षण हृदयाजवळ तू राहतेस गं जगणे म्हणजे गोड तहान असे (काहीसे) म्हणतेस गं ----------------------- बहुतेक माझ्या लग्नाचा विचार डोक्यात आला आहे म्हणून की काय माझ्या आईने तुला आज चहाला बोलावले आहे असो. :-)

In reply to by विकास

>> बहुतेक माझ्या लग्नाचा विचार डोक्यात आला आहे म्हणून की काय माझ्या आईने तुला आज चहाला बोलावले आहे नव्हे तर चहापाण्याला असे योग्य वाटले असते. तोडपाण्याला तर अजून संयुक्तिक वाटले असते.

In reply to by विकास

माझं काही सामान तुझ्याजवळ पडून आहे... ह्या भाषांतराने खुद्द गुलजार हे हताश होऊन पुढल्या सगळ्या कविता स्वतःच फाडून टाकतील! ;)

In reply to by चतुरंग

आपण संपलो! ठार मेलो राव... अरे काय उतमात चाललाय? =))

In reply to by धमाल मुलगा

हे गाणे (वास्तवीक आवडते आहे पण) ऐकताना मला गुलजार पेक्षा दादा कोंडक्यांचा "बोट लावीन तिथे गुदगुल्या" आठवतो. ;) आणि त्यांना काही प्रश्न येईल असे वाटत नाही. :-)

In reply to by विकास

माझे कुठलेसे सामान तुझ्या घरी पडून आहे अरे, पावसाचे काही ओले दिवस ठेवलेत रे... हो अजून माझ्या पत्रात लपवलेली एक रात्र आहे ती रात्र विसर, माझे सामान परत दे रे या पुढे... एका एकट्या छत्रीमधे अर्धे अर्धे भिजत होतो... अर्धे ओले, अर्धे सुकले सुकलेले घेऊन आले... ओले मन बहुतेक पलंगाशेजारी पडलेय ते पाठव रे.. माझे सामान परत दे रे...

ठो देऊन ज्या साऱ्या समाजाला बनून जाईल जो आपला निशाना कारण की, सगळीच्या सगळी ही दुनिया माझ्या खीशात... प्रियाली के पाससे बुगडीपेसे प्रेरणा लेकर.... अडगुला मडगुला सोने का कडगुला रुपे का वाला नन्हे बच्चे को टीका लगाऊ.... ले जा मुझको लेजा वापिस मातृभूमी को ओ सागर मेरा प्राण तलमल्या, तलमल्या, ओ सागर एक खास प्रियालींसाठी (त्या नाराज असताना त्यांना मनवण्यासाठी) लिहिलेलं, मराठी भाषांतर (ओळखणं कठीण करण्यासाठी शब्द थोडे बदललेलं...) अंदाज माझा मस्ताना नेहमीच अचूक निशाणा जरा समजून भीडव डोळे कोणासमोर तुझे हे चाळे? कारण मी इथे आहे आणि मी तिथे आहे मग नको असं म्हणूस माझा आय्डी कुठे आहे? माझा आय्डी कुठे आहे? उड्लानाSSSS!

In reply to by राजेश घासकडवी

>> ओ सागर मेरा प्राण तलमल्या, तलमल्या, ओ सागर फु... ट.... लो.... हसून गडबडा लोळलो ठार मेलो शेजारी धावत आले, काय झाले ते बघायला.... अजून येऊ द्या गुर्जी..................

In reply to by राजेश घासकडवी

उड्लानाSSSS!
सर्वांना क्रमवार लावले आहे. तुमचा नं. पहिला. ;) आता याला कुणी संपादकीय धमकी म्हटले तर तो गैरसमज आहे. मराठीचे हिंदी रुपांतर करायला अधिक मजा येते मेरेकु लगी किसिकी हिचकी किसकी किसकी? इस्की या उस्की! शर्माना नै! शर्मांना नै! शर्माना नै|

In reply to by प्रियाली

ह्या गाण्यावर ओरीजिनल नटीचा नाच सुरु आहे असे डोळ्यांसमोर आले आणि पडालो!! =)) =)) =)) (हिचकिचणारा)रंगा

डोळ्यात डोळ्यात इशारा झाला हो .. बसल्या बसल्या जीवनाचा आधार मिळाला ...

हे माझ्या प्रिये, प्रिये गं प्रिये तुला जायचं तर तु जा तुझी मर्जी मला काय....! पण तु अशी रागावून निघून जाशील तर, तुझ्याबरोबर माझ्या मरण्याची खबर येईल. हे माझ्या प्रिये, प्रिये गं प्रिये... -दिलीप बिरुटे

मराठी ते इंग्रजी चालेल का? हेय सन ऑफ अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफ राम विथ वन माऊथ टॉक, टॉक विन विन हनूमान..!!

In reply to by योगी९००

ह्याचंच हिंदी संस्करण बघा अंजनीके पुत्तर, तुझे राम का वरदान सबजन मिलके बोलो, बोलो जय जय हनुमान!! दिव्य तेरी रामभक्ती, भव्य तेरी काया, बचपनमेंही सूरजसे तू मिलने को आया कांप उठी ये धरणी, कांप उठा आसमान सबजन मिलके बोलो, बोलो जय जय हनुमान!! (बजरंगभक्त)चतुरंग

In reply to by योगी९००

हेय सन ऑफ अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफ राम विथ वन माऊथ टॉक, टॉक विन विन हनूमान..!! हे जबराच! ते महेंद्र कपूरच्या तोंडून असं ऐकू येतंय हेय सहन ऑफह अंजनी, यु हॅव ब्लेसिंगस ऑफह राहम विथ वनह माऊथह टॉहक, टॉहक विन विन हनूहमाहान..!!

पलभर में ये क्या हो गया चे मराठीकरण पळभरात हे काय झालं? ती मी गेले आणि ते मनही गेलं ओढणी म्हणते, "ऐक रे वार्‍या, पाउस घेउन आला, या वर्षी साजण" क्षणभरच मला असा त्रास देतो, (पण्)त्यांच्याशिवाय आता राहणे शक्य नाही.

मराठीतून हिंदीकडे मुक्तपणे ;) रेशमियॉ रेघोंसे लाल काले धागोंसे कर्नाटकी कशिदा आया काढनेको, हाथ मत लगाओ मेरे साडीको| नयी कोरी साडी लाखमोलकी एब्रॉयडरी कि है मैने फुलबेली की| (बेली कि बै बेली कि);) क्या कहू मै बाई, बाई तुम्हारे इस खोडीको हाथ मत लगाओ मेरे साडीको|

धनी वेतन 'सहावे' घरी आणती , महागाई सटवी काशी घालती !

चैत पुनवकी रात, आयी है ..., धकधक मेरे कलिजेमे ... .... .... (fill the blanks) मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा.. मुझको जाने दो ना घर अब बज गये बारा.. हेय ऐसा क्यू पिडते, पिछे पिछे घुमते, ऐसा क्यू करते जिजाजी उसको मिलोना अगले बाजारी... ऊ आ आ.. छे बजे की गाडी गयी, नौ की भी गयी अब बारा की गाडी निकलली..

ह्र्दय हरवले... झाले ....कोणाचे.. आणि रस्ता भेटला ...खुशीचा.. डोळ्यात स्वप्न आहे रे ....कोणाचे आणि रस्ता भेटला ...खुशीचा.. नाते नवे देवा ...ह्रदयाला भिडतंय.. खेचतेय मला कोणी दोरी..तुझ्या दारी... तुझ्या दारी... तुझ्या दारी...तुझ्या दारी...अरे देवा.. तुझ्या दारी... तुझ्या दारी...तुझ्या दारी....

कुणाची ही चाहुल कुणाची ही छाया ह्रुदयावरही टकटक इथे कोण आsला माझ्यावर कुणी हा हिरवा रंग टाकला सुखानेच कसा हा माझा जीव घेतला जीsव घेतला, जीsव घेतला, माsssझा जीsव घेतला हातावर कधी ना चंद्र रेखटला तारकांशी कधी ना संवाद केला देवापाशी कधी ना गार्‍हाणं मांडल देवापाशी कधी ना गार्‍हाणं मांडल दु:खालाही कायम लपवून ठेवल अन्याय्ही अन मुकाट गिळला काट्यांनाही अलिंगनं दिली आणि फुलांकडून मात्र जखमा खाल्ल्या... हां , देवाकडे मात्र जेंव्हा मी हात पसरले वर म्हणून फक्त तुलाच मागितले तुलाच मागितले , तुलाच मागितले , तुsलाच माsगितले अल्ला जीsssव घेतला