तसेही एकदा आरोपी केल्यावर मधूनच सुटण्यापेक्षा पूर्ण निकाल लागून निर्दोष म्हणून सुटणे चांगलेच.
मग कॉग्रेस तरीही त्यांना गांधीवधात का दोषी मानते? हा आकसच नव्हे काय?
लियाकत खानच्या भारत भेटीच्या पूर्वसंध्येला 'खबरदारीचा उपाय' म्हणून सावरकरांना अटक झाली होती
सुर्हावर्दी स्वातंत्र्यानंतर (१-२ वर्ष) भारतातच होता त्याला कधी खबरदारीचा उपाय म्हणून अट़क नाही झाली. तत्कालीन कॉग्रेजीं चा खबरदारीचा दुहेरी मापदंड नव्हे काय?
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
सावरकरांविषयी अशी आपल्याकडे काय माहिती आहे की जी मिसळपाववर पचणार नाही असे आपणास वाट्ते ?
नितिन थत्तेंना मी इथे जाहिर विनंती करतो की त्यांनी ती इथे द्यावी, माझ्यासारख्याच इतरांनाही ते जाणुन घ्यायची इच्छा असेलच.
थांबायचे ठरवले आहे म्हणून लिहिणार नाही.
मिसळपाववर पचणार नाही हे स्वानुभवाने म्हणत आहे.....
पूर्वी गांधींच्या अहिंसेसंबंधी पुराव्यानिशी लेखन केल्यावर मालकांना "गांधींविषयी मिपावर काहीही लिहिण्यास बंदी" घालावीशी वाटली होती.
नितिन थत्ते
आजच्या मिपावर असे काही होईल असे वाटत नाही. अर्थात मी इथे तसे लिहु शकत नाही, मी नीलकांतलाही ह्याबाबत विनंती करेन. मिपावरच्या क्राउडचा आपल्याला प्रॉब्लेम असल्यास मी काही करु शकत नाही पण बाकी काही अडचण असेल तर नक्की आपण मार्ग काढुयात. आपण लिहावे अशी पुन्हा विनंती करतो.
जाणून घ्यायची इच्छा तर मलासुद्धा आहे. थत्तेकाका व पवारकाका, दोघांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी ही माहिती वेगळ्या धाग्यात घ्यावी. (मालक-संपादक यांची हरकत नसावी असे वाटते.)
१) पटेलांबद्दल पुरेसा पुरावा नसेल, आणि सुधारणा केली असेल किंवा नेहरुंचे नाव घेतल्यावर त्या बाजूचे सर्व लोक आले असे ग्रुहीत धरले गेले असेल.
२) तो खुलासा लेखकाबद्दल
३) ५५ कोटीचे प्रकरण खोटे कसे ? मी तर आत्तापर्यंत त्याच्या बाजुचेच सगळे वाचले/ ऐकले आहे. तुम्हाला ही नविन माहिती कुठे मिळाली ?
५) विरोधी गटातील सर्वात मोठा नेता हे माहित नाही पण महरष्ट्रातील सशस्त्र लढ्याचा पुरस्कार करणार्यांचे आदर्श होते हे नक्की. आणि ते कॉग्रेसच्या विरोधात होते.
७) अ)१ देशद्रोही आणि १ देशभक्त यांना एकाच रांगेत बसवु नका.
ब) भोपटकरांनी लिहिलेले काल्पनिक आणि त्या कपूर यांनी लिहिलेले खरे असे का ?
८) सारासार विचार करणार्या* कोणीही विरोध केला असता. काँग्रेस नेहमिच, प्रो-अल्पसंख्यांक नाही, प्रो-मुस्लिम धोरणे स्वीकारते.
उदा. वाटेल तेवढी.
(तुमचे क्र. चुकलेले आहेत. त्यामुळे माझेही चुकले. ते दुरुस्त करा म्हणजे जोड्या जुळतील)
शेवटी:
१) नेहरू आणि सावरकर यांच्यात स्वातन्त्र्यप्रप्ती आणि त्यानंतरच्या गोष्टी याबद्दल टोकाचे मतभेद होते.
२) इतका मोठा आरोप ठेवून एकही पुरावा नसल्याने सावरकरांची निर्दोष मुक्तता झाली.
यावरून असे सिद्ध होते की "आकसाने खटल्यात गोवले" होते.
य दि फडक्यांसारख्या गांधीप्रेमाने आंधळ्या झालेल्या लोकांनी पंचावन्न कोटी प्रकरण खोटे असल्याचे म्हटले आहे. म्हणजे गांधीने उपास करण्याचे कारण भारताने ते पैसे द्यावेत म्हणून नाहीच मुळी असे म्हटले आहे.
याउलट गांधींचा तिटकारा असणारे छातीठोकपणे सांगतात की या कारणाकरताच गांधींने उपोषण केले. आता खरे खोटे कसे सिद्ध करणार?
नेहरू आणि अन्य तात्कालिन मंडळी ही सावरकरद्वेष्टी होती हे अनेकदा दिसून आलेले आहे.
नेहरूंना सावरकर व अन्य हिंदुत्ववादी धोकादायक वाटत होते ह्याला एक उदाहरण. नथुराम गोडशांना फाशी दिल्यावर त्यांचे शव नातेवाईकांना न देता गुपचूपपणे जाळून टाकले. नंतर कुणीतरी ती जागा शोधून तेथील राख एका कलशात भरून आणली. जर थ्रेट वाटत नसती तर शवाची अशी विल्हेवाट लावायचे काय कारण?
बाकी काँग्रेस आणि गांधीवाद जेते असल्याने सगळा इतिहास तेच लिहिणार आणि बहुसंख्य जनतेला तेच खरे वाटणार हेही खरेच.
यापुढेही खूप काही लिहिता येण्यासारखे आहे. पण जागा भयास्तव इथेच थांबतो.
इथे नाही तर तुमच्या ब्लॉगवर वगैरे कुठेही लिहा, पण लिहा. आम्हाला वाचायचे आहे. टंकण्याचा कंटाळा असेल तर ध्वनिमुद्रित करा आणि rapidshare etc. वर टाकले तरी चालेल (पळेल).
थँक्स पेन... सुचनेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... दिलेल्या विकल्पांचा नक्की विचार करून आपणास कळवितो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
पवार साहेब,
अतिशय तटस्थ उत्तराबद्दल अभिनंदन !
मी ह्यासंबंधी अनेक मत-प्रवाह, बातम्या, डॉ. आंबेडकरांचे मत वगैरे पूर्वी वाचलेले आठवतंय.
पण स्वातन्त्र्यवीर सावरकरांना "शनिवार्-नारायण्-सदाशिव पेठेतील सिंह" असं म्हणून हिणवणार्या "सुकुमारांना" कोणीतरी ठोस उत्तर द्यायला हवेच होते. अर्थात ह्या मॅडमभक्त सुकुमार कडे माध्यमाचा ताबा असल्यामुळे तो अशा कोणत्याही समर्पक उत्तराची दखल घेणार नाहीच ...
दोघांच्या प्रतिसादातून बरीच नवीन माहिती मिळत आहे...
दोघांनी संयमाने लिहिले आहे आणि योग्य पद्धतीने संवाद सुरू आहे असे माझे मत आहे...
दोघांनी या विषयासंदर्भात अधिक लिहावे , अशी माझी तरी विनंती आहे...
धागाकर्त्यालाही धन्यवाद
असेच म्हणतो.
@नितिन थत्ते: तू जरूर लिही. मी मागच्यावेळी (ज्यावेळचा संदर्भ तू दिला आहेस तेव्हाही) तुला लिही असेच म्हणले होते. आजही म्हणतो. शिवाय, आज मिसळपावावर अधिकृत बंदी अशी कोणत्याच विषयावर नाही. फारतर तुझे लेखन लोकांना पटणार नाही / आवडणार नाही. पण त्यामुळे गप्प बसणार्यातला तू नाहीस. मग एकदम असे का?
लिहिच.
बिपिन कार्यकर्ते
नितीन थत्ते यांनी अतिशय मुद्देसूद प्रतिसाद दिलेला आहे. पवार यांनीही सुरेख माहिती दिलेली आहे. दोघांना या विषयातील चांगली माहिती दिसत आहे. असहमती असेल दोघांच्या विचारांत. याचा अर्थ असा नाही की कटुता यावी. नितीन थत्ते काही कडवट बोलल्याचं दिसलं नाही. पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही. परंतु, धागा घरगुती सावरकर या विषयावर असल्यामुळे ही चर्चा धाग्याच्या विषयाला धरून नाही, असं वाटतं. पवार किंवा थत्ते यांनी पुढाकार घेऊन एखादा नवीन धागा काढावा ही विनंती.
या ठिकाणी बरीच बुद्धीमान मंडळी येतात असं दिसतं. पण बर्याच वेळा टवाळीचे आणि टाईमपास करणारे धागे वरती असतात. हरकत नाही. टवाळीमध्ये पण बुद्धीचा स्पार्क दिसतो, आणि चांगली करमणूक होते. मी कुणाला ओळखत नसूनही इथे जी धमाल खेचाखेची चालते ती आवडते आपल्याला. पण अधून मधून गंभीर चर्चांच्या धाग्यांना दखल घेऊन 'जिवंत' ठेवायला हरकत नाही.
आळश्यांचा राजा
"...पवारांनी असहमतीला कडवटपणा मानण्याचं कारण नाही....."
नाही.... असहमतीला कडवटपणा मी बिलकुल मानत नाही; किंबहुना तर असे मानतो की ज्ञान मिळविण्याची ज्याला आस लागून राहीली आहे त्याने कोणताही वाद हा खेळकरपणे घेतला तरच त्याच्या जाणीवेच्या कक्षा रूंदावतील. इतिहासातील घटना आणि व्यक्ती यांच्याविषयी बोलताना/लिहिताना हे भान ठेवणे फार जरूरीचे असते. मी "कटुता" शब्द एवढ्यासाठीच वापरला होता की, मला माझ्या येथील एका मित्राने मेलद्वारे "इशारा" दिला की, यापूर्वी "गांधी" विषयामुळे बर्याच सदस्यामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्थात "त्या" धाग्याप्रसंगी मी इथला सदस्य नसल्याने मला त्या घडामोडीबद्दल काहीच माहिती नाही. तथापि मित्राचा "कटुता" टाळण्याचा सल्ला मी मानला, इतकेच.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
मी सध्या ऑन साईट आहे. त्यामुळे या विषयावर काही लिहिण्यासाठी लागणारे संदर्भ, पुस्तके आत्ता माझ्याकडे नाहीत. सावरकरांच्या विषयी लिहिताना नुसत्या आठवणीतून लिहिणे योग्य होणार नाही. कोणी मी लिहिलेल्या गोष्टीस संदर्भ मागितला तर तो देता लगेच येईल असे नाही. म्हणून आत्त या विषयावर लिहिण्याची इच्छा नाही. आनंदयात्री यांच्या खरडवहीत आत्ताच लिहिल्याप्रमाणे मी सावरकर द्वेष्टा नाही. त्यामुळे नुसते बदनामीकारक मला काही लिहावयाचे नाही.
सावरकर देशभक्त होते का? हा माझ्यापुढचा प्रश्न नाही. ते तर ते होतेच. माझी मते वेगळी आहेत ती फक्त गांधी आणि सावरकर यांच्या मार्गापैकी कुठला मार्ग श्रेयस्कर आणि कुठल्या मार्गाने स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता होती/असते; या मार्गांचा एकूण स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग किती आणि कोणता मार्ग स्वातंत्र्य मिळण्यास किती कारणीभूत याबाबतच आहेत.
सावरकर हे फार थोर नेते होते आणि गांधी नेहरू यांच्या कारस्थानामुळे ते मागे/बाजूला पडले हे मी कदापि मान्य करणार नाही.
पण आत्ता संदर्भासह लेखन करणे शक्य नाही. म्हणून थांबतो. वेगळा धागा नंतर कधीतरी काढायला हरअत नाही. या धाग्यवर तर नकोच.
नितिन थत्ते
मूळ धागा कर्ते श्री. भोचक, आणि धाग्याला अभ्यासपूर्ण लिखाणासाठी श्री. नितिन थत्ते यांना, तसेच या दरम्यान चर्चा आवडल्याचे कळवून या विषयावर आम्ही (पक्षी श्री.थत्ते आणि मी...) ती पुढेही न्यावी अशी आग्रहाची विनंती करणारे विविध सदस्य या सर्वांना एकत्रीत मी सांगू इच्छितो की,
...गांधी आणि सावरकर या दोघांचे "स्वातंत्र्य" मिळविण्याचे मार्ग जरी भिन्न असले तरी त्यांच्या कट्टर देशभक्तीबाबत आपणच काय पण त्यांचे शत्रुदेखील शंका घेणार नाहीत. पुढील कित्येक पिढ्या असाच इतिहास वाचणार आहेत की, "म.गांधी नावाच्या महामानवाने अहिंसेच्या मार्गाने भारत ब्रिटिशांपासून मुक्त केला..." आणि त्यात अतिशयोक्ती बिलकुल नाही. परंतु त्यामुळे इतरांनी केलेले प्रयत्न हे जिल्हा परिषदेची एखादी बी-बियाणे योजना फसली की करा केस फाईल या धर्तीवर शून्य किंमतीची होत नाही.
...आजही ज्या ज्या वेळी मी दिल्लीत जातो त्या त्या वेळी दहा मिनिटासाठी का होईना राजघाटावर जाऊन त्या महान आत्म्याला मनोभावे वंदन करून येतो. ते थोरच होते. पण म्हणून विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा आमच्या मनातुन काढून टाकण्याचे कोणतेही प्रयोजन माझ्याकडे नाही.
...परंतू काहीवेळा असेही होते की, भावनेच्या भरात एखाद दुसर्या शब्दामुळे आंतरसालीला धक्का बसतो व मन नकळत हळवे बनते...मग सुरु होतो तो शब्दखेळ जिथे चंद्रापेक्षा त्यावरील डागांना महत्व प्राप्त होते आणि मूळ प्रश्न बाजुला राहून त्यात सामील होणार्यांच्याच डोळ्यात अबीरबुक्का जातो.
...सबब या विषयावरील "पॅन्डोरा बॉक्स" सीलबंद असलेलीच बरी !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. तस्मात अशा चर्चांचं फलित काहीच निघत नाही. दुसरी गोष्ट अशी की दोन्ही बाजू आपापल्या जागी घट्ट असल्यावर त्यातून निर्णय निघण्यापेक्षा केवळ कटूताच निर्माण होत असते हेही तेवढेच ढळढळीत वास्तव आहे.
मला असं प्रामाणिकपणाने वाटतं की...कोण मोठा/कोण छोटा , कोण दोषी/कोण निर्दोषी ह्यावर चर्चा करण्याऐवजी आपल्याला ज्यांचे विचार पटतात अशा मोठ्या माणसांच्या एखाद्या गुणाचे जरी आपण हेतूत: अनुकरण करू शकलो तरी खूप आहे...एरवी प्रत्यक्षात अहम-अहमिकेने चर्चा करण्या व्यतिरिक्त दुसरे काहीच न करणे म्हणजे आपले वकिली पांडित्य जगासमोर मांडणे ह्यापेक्षा जास्त काही नसावे...असाच अर्थ निघतो.
प्रमोद जी...
"...किमान दोन बाजू ह्या असतातच...आणि त्यामुळे कधीही त्यावर एकमत होणे शक्यच नसते....हेही तितकेच खरं आहे. ..."
हे सूत्र सार्वजनीक क्षेत्राशी निगडित असणार्या घडामोडीतील व्यक्तींना (भारतातीलच काय तर जगाच्या इतिहासातील जवळपास सर्वच नामवंताना...) लागू होते. पण नेहमी अंधार्या बाजुवर विजेरी टाकून आपण तेच सत्य एकमेव आणि अंतिम म्हणून ढोल बडवू लागलो तर कोणताही "आदर्श आरसा" आपणापुढे राहणारच नाही.
सावरकरांच्या ज्या कंगोर्यामुळे ते मला आणि माझ्यासारखी विचारसरणी ठेवणार्यांना आवडतात, त्याचप्रमाणे त्यांच्यातील ज्या काही "नावडत्या" गोष्टी आहेत (त्या मलाही माहित आहेत...) त्यांच्या तुलनेत मी गेलो तर या जगात काहीच चांगले नाही असा सिद्धांत मनी ठेवूनच आयुष्याची वाटचाल आपण करायला हवी.
आज "शिवाजी" हे नाव तमाम महाराष्ट्राला देवाहून प्रिय आहे...आणि ते याव्वच्चंद्रदिवाकरो तसेच राहणार आहे.... पण उद्या मी किंवा दुसर्या कुणी "महाराजांनी आठ बायका केल्या होत्या..." या मुद्द्यावर दळण सुरु करून "महाराज चुकले का?..." हे लिहित बसलो तर ते स्वीकृत व्हावे का? शिवाजीची योग्यता पटवून घेण्यात या घटनेला कितपत महत्व द्यावे?
काळाच्या कसोटीवर काही घटना तपासल्या तर इतिहासाची पाने विचित्र दिशेने आपणासमोर फडफडू लागतात; पण ते इतिहास संशोधन म्हणजेच "रोखठोक इतिहास दर्शन" ही बाहुली आपण मनी वसविली तर आपले राज्य केवळ लिलिपुटीयन्स यांनीच भरलेले दिसेल....आणि येणार्या पिढीला गलिव्हर शोधायला अन्यत्र जावे लागेल.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
व्यक्तीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मुद्दे सांगण्याबद्दल.
निगेटिव्ह मुद्दा सांगताना तो सांगितल्या जात असलेल्या गुणाच्या संदर्भात असेल तर तो सांगणे योग्यच. पण संबंध नसलेला मुद्दा सांगणे चूक.
उदा शिवाजी महाराजांचे कर्तृत्व सांगताना शिवाजीला आठ बायका होत्या हे सांगणे चुकीचेच. पण कोणी शिवाजीमहाराज एकपत्नी होते असे म्हणत असेल तर मात्र आठ बायका सांगणे गरजेचे.
गांधींच्या अस्पृश्यता धोरणाबाबत बोलताना त्यांचे धोरण कणवयुक्त असून अस्पृष्य हे खालचे आहेत पण आपण त्यांना चांगले वागवले पाहिजे अशा स्वरूपाचे होते हे नोंदवणे गरजेचे. जरी त्यांचे कार्य पॉझिटिव्ह असले तरी.
नितिन थत्ते
म्हणजे गांधींच्या ब्रम्हचार्यपालन, साधेपणा या बद्दल कोणी सांगु लागले तर
तेही खोडुन काढावेत काय? कारण वरील बाबत खुप सारी नावडती माहीती उपलब्ध आहे
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
गांधी हत्या प्रकरणात तत्कालीत सरकारने (विशेषतः) नेहेरूंनी आकसाने सावरकरांना गोवले होते, ह्यात फारसे तथ्य वाटत नाही.
पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे.
१८ जुलै १९४८ रोजी सरदार पटेल ह्यांनी जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले होते -
There is no doubt in my mind that the extreme section of the Hindu Mahasabha was involved in this conspiracy. The activities of the RSS constituted a clear threat to the existence of government and state.(प्रत्यक्ष पत्र मला मिळाले नसले तरी, त्यासंबंधीचे भरपूर पुरावे जालावर उपलब्ध आहेत.)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
>>पकडले गेलेले बहुसंख्य संशयीत ज्या संघटनेचे सभासद आहेत, त्या संघटनेच्या प्रमुखाकडे संशयाची सुई वळणे हे स्वाभाविकच आहे.
यावरून आठवले : मधे मनसेचेही बरेच कार्यकर्ते वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकले होते....
आंबोळी
श्री. पंडित गागाभट्ट यांनी "कुराण" आणि "सावरकर" यांच्या संदर्भात एक शंका उपस्थित केली होती तिचा थोडक्यात मतितार्थ असा की, मूळ कुराण हे अरेबिक भाषेत असून, सावरकरांनी उर्दू भाषेत ते जाणून घेतले, मग तसे असेल तर उर्दू भाषेतील कुराणावर ते अधिकारवाणीने कसे सटीक व्याख्यान देत? हा प्रश्न किंवा शंका चांगलीच असल्याने ती मी टिपून घेतली आणि "कुराण" या विषयावर लिहिणे/बोलणे यासाठी जे शिक्षक (मौला) येथे आहेत व ज्यांना इस्लामिक बोर्डाची "कुराण पठण" मान्यता आहे अशा दोघांना एका मुस्लीम मित्रासमवेत मी काल रविवारी व परत आज सोमवारी दुपारी भेटलो... या संदर्भात चर्चा केली अन काही टिपणे काढली... त्याचा सारांश खालीलप्रमाणे :
कुराणाचा रचनाक्रम अशा पद्धतीने झाला होता की प्रेषित मुहम्मद पैगंबर जेव्हा "सूरत" (शब्दश: अर्थ "तटबंदी" पण अरेबिक भाषेत इथे "गट, विभाग, वचन, चरण") सांगत तेंव्हा ती त्यांचा सहकारी/अनुयायी लिहून घेत असे व नंतर ती अचूकपणे उतरवून घेतली आहे की नाही हे कटाक्षाने पाहत. त्यांनी सांगितलेल्या अशा सुरतींचेच पुढे कुराण स्वरुपात त्यांच्या प्रचंड संख्येने असलेल्या अनुयायात वितरण झाले. अनुयायी नमाज (प्रार्थना) वेळी या सुरती तोंडपाठ करीत. त्यावेळी कुराणाची सुरक्षितता केवळ खजूरांच्या पानावर आणि हाडे व कातडीच्या तुकड्यावरच अवलंबून होती. पण प्रामुख्याने अनुयायी त्याच्या पाठांतरावर भर देत. पुढे प्रेषित मुहम्मदांच्या निर्वाणानंतर अरबस्तानात रक्तरंजित लढाया कराव्या लागल्या आणि तीत असे हजारो मारले गेले ज्यांना कुराण तोंडपाठ झाले होते. पुढील पिढीतील हजरात उमर आणि हजारात अबुबकर यांच्या लक्षात आले की "कुराण" हे कायमस्वरूपी असे लिखाणबध्द करून ठेवणे इस्लामच्या दृष्टीने फार गरजेचे आहे व त्यासाठी त्यांनी हजरात अन्सारी यांना अधिकृत "कुराण" लिहिण्यासाठी नियुक्त केले. पुढे सर्व धर्मपंडितांनी त्या कुराणाच्या अचूकतेतीची खात्री पटवून घेतली आणि जनतेला अशी मुभा दिली की त्या प्रमाणसिद्ध प्रतीची नकल उतरवून घ्यावी. भारतासारख्या खंडप्राय देशात जसे जिल्ह्या जिल्ह्यातून भाषेची ढब, उच्चारण बदलत जाते त्याचप्रमाणे अरबस्तानातही होत गेले; त्यामुळे शेवटी असा निर्णय घेण्यात आला की मूळ कुराण "मक्का" या पवित्र शहरातील "कुरेश" लोक जी बोली बोलत असत त्या भाषेतील "प्रमाण" म्हणून मानले जावे आणि त्यानुसार तसा फतवा सर्वत्र गेला, अन तो मान्यही झाला. "मक्का" या ठिकाणाचे धर्म बोर्ड जगात ज्या ज्या भाषेत "कुराण" पोचले आहे त्या त्या भाषेतील तज्ज्ञांना त्यांच्यासमोर आलेल्या त्यांच्या भाषेतील कुराणाची प्रत ही "कुरेशी" प्रत आहे की नाही हे कटाक्षाने पाहण्यास सांगतात. अर्थात भाषांतर करणे वा केलेले भाषांतर तपासणे हे काम जी व्यक्ती करते तिला अग्रक्रमाने "मक्का" प्रत अस्खलितरित्या आली पाहिजे हे आलेच. त्यानुसारच जगभरातील ज्या ज्या भाषेत कुराणाचे अनुवाद झाले ते मूळ प्रतीबरहुकुम आहे अशी मोहोर त्यावर बोर्ड कडून दिली जाते. भारतातच काय पण युरोप आणि अमेरिका येथे देखील इंग्रजी भाषेतील कुराणाच्या ज्या प्रती उपलब्ध आहेत ते या प्रक्रियेतून गेल्या आहेत हे ओघाने आलेच. आजही ही प्रथा अव्याहत चालू आहे.
हीच गोष्ट उर्दू, बंगाली, हिंदी, मराठी आदी भारतीय भाषांतील कुराणाच्या अनुवादित प्रतीबाबत म्हणता येते. त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या.
एक लक्षात घेणे फार जरूरीचे आहे की, विनायक दामोदर सावरकर ही व्यक्ती अतिशय "भाषाप्रेमी" होती. मराठी भाषेतील त्यांच्या कविता पाहिल्या तर ही बाब प्रकर्षाने जाणवते की त्यांनी केलेल्या रचना आपल्या जिभेने सरळ उच्चारणेदेखील हे एक तारेवरची कसरत ठरेल. आचार्य अत्रे यांनी "कर्हेचे पाणी" या त्यांच्या आत्मचरित्रात "वीर सावरकर" यांच्याबद्दल जे काय आदराने लिहिले आहे त्यात अन्य बाबीपेक्षा त्यांनी मराठी भाषेला जे सौंदर्यलेणे दिले त्याचा उल्लेख प्रामुख्याने आहे.... तो जरूर वाचावा.
("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !)
धन्यवाद.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
त्यामुळे इंग्लंड मध्ये असताना वीर सावरकर यांनी उर्दू भाषेतील ज्या कुराणाचा (ती भाषा शिकून....ते उर्दूमध्ये लिहुदेखील शकत होते....) अभ्यास केला (तसेच त्यावर ते जे व्याख्यान देत...) त्याला वरील प्रथा आणि पद्धतीचा आसरा होता असे म्हणू या.
याबद्दलच जाणून घ्यायचे होते.
माहिती काढण्याचे कष्ट घेऊन लिहिलेल्या प्रदीर्घ आणि तपशीलवार प्रतिसादाबद्दल आभार.
("कवी सावरकर..." असा एक धागा मिपा वर द्यावा असे वाटू लागले आहे. पाहु या !)
आगाऊ (म्हणजे इन अडव्हान्स / बिफोर द फॅक्ट) स्वागत आहे.
- पंडित गागाभट्ट.
"....आता खरे खोटे कसे सिद्ध करणार?...."
ज्यावेळी एखादा चरित्रकार त्याच्या मनी असलेल्या व्यक्तीबद्दल लिहिण्यास घेतो त्यावेळी "त्याला" जे वाटत असते त्याचेच प्रतिबिंब त्याच्या लिखाणात उमटते. आपण "खरे खोटे कसे सिद्ध करणार?" असे म्हटले आहे. त्यासाठी आपणास (शक्य असल्यास....)"टाईम्स ऑफ इंडिया" मुंबईच्या लायब्ररीत जावे लागेल व खालील तारखेचे अंक पाहावे लागतील.... (ही सोय तिथे उपलब्ध आहे...). या तारखेच्या या बातम्या अंकाच्या मुखपृष्ठावर ८ कॉलमरितीने प्रकाशीत झाल्या आहेत. ::
१. गुरुवार दि. १ जानेवारी १९४८
NO PAYMENT TO PAKISTAN
Supply of Military Stores Stopped
India against implementation of financial settlement. Demand to give up Kashmir Adventure.
२. मंगळवार दि. १३ जानेवारी १९४८
MAHATAMA GANDHI STARTING FAST FROM TODAY
Surprising Delhi Announcement
३. शुक्रवार दि. १६ जानेवारी १९४८
‘INDIA’s GESTURE TO PAKISTAN”
Immediate Payment of Cash Balances.
Bid to Remove Cause of Suspicion.
New Delhi, January 15 : The Government of India have decided to implement immediately the financial agreement with Pakistan in regard to the cash balances with a view to removing “the one cause of suspicion and friction” between Pakistan and India.
“This decision,” says a communiqué issued by the Prime Minister’s Secretariat late tonight, “is the Government’s contribution to the best of their ability to the non-violent and noble effort made by Gandhiji in accordance with the glorious traditions of this great country for peace and goodwill."
The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.”
(या बातमी शेजारीच "महात्मा गांधी ३ दिवसांच्या उपोषणानंतर थकले असल्याचे म्हटले आहे....)
आता पंतप्रधानाचे कार्यालयच जर ही बातमी अधिकृत स्वरूपात मिडियाला देत असेल तर "उपोषण हे ५५ कोटीसाठी नव्हते" असे म्हणणे केवळ आत्मवंचना ठरेल.
असो.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
सर्वप्रथम इंद्रराज पवार यांनी चर्चा थांबवण्याची विनंती केली. मीही या धाग्यावर (घरगुती सावरकर असा विषय असलेल्या) ही चर्चा अवांतर आहे हे समजूनच चर्चा थांबवण्याची विनंती मान्य केली आणि नंतर अनेकांनी विनंती करूनही येथे प्रतिसाद देण्याचे नाकारले. त्यात सावरकरांविषयी नकारात्मक गोष्टींची यादी सादर करण्यासारखा मी सावरकरद्वेष्टा नाही तसेच संदर्भ देणे वगैरे गोष्टींमधील अडचणी ही कारणे काही सदस्यांच्या खरडवहीतून आणि व्यनितून सांगितल्या होत्या.
त्यानंतरही काही सदस्य प्रतिसाद देत राहिले. तरीही मी काही लिहिले नाही.
इंद्रराज पवार यांनी मात्र आज स्वतःहून (मी उत्तरे देत नाही असे पाहून?) पुन्हा चर्चेत उडी घेतली आहे त्याबद्दल त्यांचा सौम्य निषेध.
५५ कोटींविषयी चा एक दुवा.
http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm
इंद्रराज पवार यांनी दिलेल्या टाइम्सच्या बातम्यांवरूनही सरकारी प्रेस रिलीज मध्ये निर्णयाचे कारण 'संशयाचे निराकरण' असे दिले आहे.
नेहरूंच्या वक्तव्यात "भारताचे उच्च आदर्श आणि गांधीजींचे उदात्त मानदंड यांना अनुसरून घेतलेल्या या निर्णयामुळे आमच्या शांततेच्या आणि सदिच्छेच्या हेतूंबाबत जगाची खात्री पटेल".
गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते.
"गांधींनी उपोषण करणे आणि सरकारने ५५ कोटी द्यायचा निर्णय घेणे" तसेच "नथुराम हिंदुमहासभेचा सदस्य असणे आणि सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष असणे" या दोन्ही गोष्टी बहुधा सारख्याच योगायोगाच्या असाव्यात.
(असो जगन फडणीस यांच्या पुस्तकात गांधींवर पूर्वीही १९३७? खुनाचा प्रयत्न झाला होता असा उल्लेख आहे. १९३७ मध्ये फाळणीही झालेली नव्हती आणि ५५ कोटींचे प्रकरणही नव्हते. तरी खुनाचा प्रयत्न झालाच होता- संदर्भ आता देणे शक्य नाही. २०-२५ दिवसांनंतर देऊ शकेन).
इंद्रराज पवारांना टाइम्सचे अंक पाहणे शक्य आहे असे दिसते. त्यांनी मणिभवन च्या दुव्यावर दिलेल्या संदर्भातल्या बातम्या मिळतात का हे पहावे....उदा. गांधींच्या उपोषणासाठी त्यांनी दिलेली कारणे..... १२ जानेवारीला व्यक्त केलेला निर्धार....१३ जानेवारीच्या भाषणातील वक्तव्ये.....तत्कालीन नेत्यांनी केलेले प्रयत्न....राजेंद्रप्रसाद यांच्या समितीने गांधींना दिलेली आश्वासने वगैरे.
या दुव्यावर गांधींच्या १२ जानेवारीच्या भाषणाची प्रत आहे. त्यात कोठेही ५५ कोटी पैकी 'प' सुद्धा नाही.
नितिन थत्ते
गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते.
------------------------------------------------------
मला वाटतं, नेहरूंनी कुठले शब्द वापरावेत कुठले नाही हे स्वातंत्र्य नेहरूंना असायला हवं. त्या परिस्थीत त्यांना जे शब्द योग्य वाटलेत त्यांचा वापर त्यांनी केला.
--
The Prime Minister of India, Pandit Jawaharlal Nehru in a separate statement said, “We have come to this decision in the hope that this gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast.”
---------------------------------------------------------------
मला तरी वाटतं की ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट आहे की, ५५कोटी रूपये देण्याच्या निर्णया मागे महात्मा गांधींचे उपोषण बर्याच अंशी कारणीभूत आहे.
राहीला प्रश्न तो "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते. याबद्दलचा तर "टाईम्स ऑफ इंडिया" मधील ह्या स्टेटमेंट वरून स्पष्ट होतं की हे स्टेटमेंट प्रसार माध्यमांना देण्यामागचा प्रधानमंत्री कार्यालयाचा उद्देश, भारत सरकार ५५कोटी रूपये पाकिस्तानला देत आहे ही घोषणा करण्याचा होता. ह्या स्टेटमेंटचा उद्देश महात्मा गांधींना उपोषण सोडण्याकरीता आवाहन देण्याचा नव्हता. (नेहरू आणि महात्मा गांधींमधील संबंध काय एवढे खराब झाले होते की, त्यांनी उपोषण सोडण्याकरीता वर्तमानपत्रां मधून आवाहन करण्याची पाळी नेहरूंवर यावी???? हे न पटण्या सारखे आहे :?
तरीपण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महात्मा गांधींनी १३ जानेवारी ला उपोषण सुरू करण्यामागे काय कारणे होती(महात्मा गांधींजींच्याच शब्दात) जाणुन घेण्याचा प्रयत्न करावा लागेल.
http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm
वरील लिखाणाचा सरळ सरळ अर्थ असा पाकीस्तानातील हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रिया भारतात उमटु लागल्या वर गांधीजी उपोषणाला बसले
म्हणजे हिंदुंवर अत्याचार चालु असतांना गांधीजी उपोषणाला बसले नाहीत तर हिंदुंवरील अत्याचाराची प्रतिक्रीया उमटली तेव्हा उपोषण चालु झाले.
तेच तर नथुराम म्हणत होता
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
गांधींचे उपोषण जर ५५ कोटींसाठी असते तर "गांधींना उपोषण सोडण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीनेही ही कृती खूपच मदत करील". असे न म्हणता "आता गांधींनी त्वरित उपोषण सोडावे अशी विनंती मी त्यांना करतो" असे नेहरूंनी म्हणायला हवे होते.
नितिन, तू जी दोन वाक्ये लिहिली आहेस, त्याचा अर्थ तुला वेगळा वाटतो? मला तरी नाही वाटत. उपोषण सोडावे ही डायरेक्ट विनंति झाली, आणि आता तरी त्यांना उपोषण सोडायला हरकत नाही ही इनडायरेक्ट विनंति झाली. भावार्थ / अन्वयार्थ यात काय फरक आहे? शिवाय, प्रत्येक पेशाची के भाषा असते. तशीच राजकारणाची / डिप्लोमसीचीही एक भाषा असते. आपण दैनंदिन व्यवहारात जसे बोलतो तसे तिथे बोलले जात नाही. अजून एक गोष्ट लक्षात घे. नेहरू भारतिय असले तरी ब्रिटिश राहणीमान, आचारविचार त्यांनी मनोमन स्वीकारले होते. ब्रिटिश लोक 'अन्डरस्टेटमेंट' साठी प्रसिद्ध आहेत. त्यालाच अनुसरून नेहरूंनी असे शब्द वापरले असतील.
बाकी अदितिप्रमाणेच मलाही ५५ कोटी आणि उपोषण यांच्या वेळा सारख्याच असल्याच्या योगायोगाचे आश्चर्य वाटते.
बिपिन कार्यकर्ते
दोन वाक्यात खूपच फरक आहे. नेहरूंनी म्हटलेल्या वाक्यात "....यांना हवे तसे केले...." हा टोन अजिबात दिसत नाही. कारण गांधींना हवे होते ते हे नव्हतेच हे नेहरूंना माहिती होते.
उपोषण ५५ कोटीसाठी असते तर उपोषण १६ जाने ला संपले पाहिजे होते. ते १८ जाने पर्यंत चालू होते.
नितिन थत्ते
हे स्वतः थेट कोणत्याही वादग्रस्त ठरु शकेल अशा गोष्टीत पडत नसत ते दरवेळी नेहरुंना पुढे करत. मोतीलाल नेहरुंना आपला मुलगा जवाहर हाच पुढे भारताचे नेतृत्त्व करायला यावा आणि त्याला गांधींचा पाठिंबा असावा हीच आस होती. तसे त्यांनी गांधींजवळ बोलूनही दाखवले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना यथास्थित डावलण्यात जी काही कारस्थाने गांधींनी केली तशीच कारस्थाने त्यांनी ५५ कोटीच्या बाबतीतही केली. उपोषण नेमके त्याच वेळी व्हावे हा काही योगायोग खचितच नाही! जवाहरलाल नेहरुही पट्टीचे राजकारणी होतेच. भाषा वापरतानाच संदिग्ध वापरायची की सोयिस्कर अर्थ काढायला सोपे जाते हा हेतू. गांधीच्या पाठिंब्याशिवाय आपल्याला जनमताचा आधार नाही हे जवाहरलाल ह्यांना माहीत होते. आपण नेतेपदी असलो तरी खरा करविता गांधीजी आहेत हे ते पक्के जाणून होते त्यामुळे त्यांना दुखावण्याची चूक करणे शक्यच नव्हते.
आपल्या मनात जे काही खरे आहे त्याचा उच्चारच करायचा नाही, समोरची व्यक्ती त्या विषयाला तोंड फोडायला अगदी आतुर असताना त्या व्यक्तीला केवळ झुलवत, ताटकळत ठेवायचे, हा मार्ग गांधीनी अनेकदा स्वीकारला आणि मग वेळ येताच अवसानघात करणे ही गांधींची खासियत होती, कारण त्यांच्याच मनात असलेला जबरदस्त आंतर्विरोध!
अहिंसेपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारणारा तो काट्यासारखा काढलाच गेला पाहिजे हे मूलतत्त्व. कारण त्या मार्गाने जाऊन कोणी लोकप्रिय झाला तर मला कोण विचारणार?
(ही मते माझी मनची नाहीत अनेक अभ्यासकांनी ही अनेकदा सिद्ध केली आहेत. विश्वास पाटलांचे 'महानायक' हे पुस्तक वाचताना इतक्या ठिकाणी मी ठेचकाळलो की मन रक्तबंबाळ झाले. आपण ज्या व्यक्तींना पूजनीय मानतो त्या व्यक्ती इतक्या टोकाच्या नीचपणाला जाऊ शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशा हकीगतींनी हे पुस्तक भरले आहे. तेव्हा गंधीजींनी ५५ कोटींसाठीच हे उपोषण केले ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही.)
चतुरंग
प्रतिसाद आवडला.
थत्ते साहेबांकडे आता तसे काही मुद्दे रहिले नाहित वरील विधान खोडून काढायला. त्यामुळे उगाच शब्दखेळ करीत आहेत असे वाटू लागले आहे.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
नितिन
खर तर मला या वादात काही लिहायचं नव्हतं पण
जसे सावरकर देव नव्हते तसे गांधीही देव नव्हते (मोठे माणुस नक्कीच होते).
थोडे गुगुलल्यावर हा पूर्ण उतारा मिळाला
NEHRU’S speeches on KASHMIR
PLEDGE TO KASHMIR
(A statement from New Delhi, January 15, 1948.)
From, Independence and After, A collection of the more important speeches of Jawaharlal Nehru from September 1946 to May 1949. The Publications Division, August, 1949
(India very generously agreed to allocate Rs. 75 crores to Pakistan out of the cash balances to help the latter to make a start. It was felt that the ArbitraI Tribunal should not have allocated so big an amount to Pakistan, and it was hoped that this generosity on the part of the Indian Union would have reciprocal response. The Deputy Prime Minister, Sardar Patel, made it clear that this financial deal was linked with the overall settlement of all outstanding issues. But in the meantime, in Kashmir Pakistan waged virtually an undeclared war against India; and lest the Rs. 55 crores (Rs. 20 crores having already been paid out of the 75 crores ) should be spent against India in Kashmir, it was withheld pending the settlement of the Kashmir issue. It became another cause of bitterness between India and Pakistan. When Mahatmaji began his fast an January 13 and appealed to the nation to remove ill-will, prejudice, and passion which poisoned the relations between India and Pakistan, the Government of India decided to pay the amount due, namely, Rs. 55 crores to Pakistan immediately as a gesture of goodwill to that State and as their contribution “to the non-violent and noble effort made by Gandhiji.” On January 18, Mahatma Gandhi terminated his fast in response to the pledge given by the citizens of Delhi through the peace committees that they would banish communalism from their hearts and from the country.)
The Government’s decision in regard to the payment of the cash balances to Pakistan has been taken after the most careful thought and after consultation with Gandhiji. I should like to make it clear that this does not mean any change in our unanimous view about the strength and validity of the Government’s position as set out in various statements made by distinguished colleagues of mine. Nor do we accept the facts or arguments advanced in the latest statement of the Finance Minister of Pakistan.
We have come to this decision in the hope that this generous gesture, in accord with India’s high ideals and Gandhiji’s noble standards, will convince the world of our earnest desire for peace and goodwill. We earnestly trust also that this will go a long way towards producing a situation which will induce Gandhiji to break his fast. That fast, of course, had nothing to do with this particular matter, and we have thought of it because of our desire to help in every way in easing the present tension.
Six months ago we witnessed a miracle in Calcutta where ill-will changed overnight into goodwill, through the alchemy of a similar fast. The alchemist who worked this change was described by our Governor-General as the one-man boundary force which succeeded when the boundary force of 50,000 men in West Punjab did not succeed in keeping the peace. This unarmed knight of non-violence is functioning again. May the same alchemy work again in India and elsewhere! We have sought to remove one major cause of dispute an argument between India and Pakistan and we hope that other problems will also be resolved. But let it be remembered that the people of Kashmir are suffering from a brutal and unprovoked invasion, and we have pledged ourselves to help them to gain their freedom. To that pledge we shall hold and we shall do our utmost to redeem it. We seek their freedom not for any gain to us, but to prevent the ravishing of a fair country and a peaceful people.
उपोसषण 'प' साठी नसले 'प' साठी सहमती नक्कीच होती (अथवा त्यांच्या सहमतिनुसारच हे झाले होते)
Dipankar हे गांधींचे एका प्रार्थनेतले विचार
Hindus and Sikhs must see that there is no retaliation, whatever Muslims elsewhere may do. Some say I am fasting only for the Muslims. That is true only in part. I fast to purify myself. How long will I fast? Until I am satisfied that the people of all religions in India mix like brothers and move without fear. Otherwise my fast can never end."
He broke his fast only when leaders of both the Hindu and Muslim communities assured him that they would restore communal harmony and implored him to end the fast.
चेतन
किती वेळा तेच?
१. >>उपोसषण 'प' साठी नसले 'प' साठी सहमती नक्कीच होती
५५ कोटी पाकिस्तानला द्यावेत हे गांधींचे मत होतेच. हे कुणीही नाकारलेले नाही.
२. On January 18, Mahatma Gandhi terminated his fast in response to the pledge given by the citizens of Delhi through the peace committees that they would banish communalism from their hearts and from the country.
He broke his fast only when leaders of both the Hindu and Muslim communities assured him that they would restore communal harmony and implored him to end the fast.
५५ कोटी दिले म्हणून उपोषण सोडले नाही म्हणजेच उपोषणाचे कारणही ५५ कोटी नव्हते हे यातून स्पष्ट होते.
आता पुरे झाले असे वाटते.
नितिन थत्ते
अहो थत्ते साहेब,
तुम्ही तुम्हाला अनुकूल असे उत्तर देवून "आता पुरे झाले असे वाटते" असे का म्हणता?
पुढील अनेक पिढयांचा 'बुद्धीभेद' करणे हे तर राजकारण्यांचे आवडते उद्योग असतात. कदाचित ह्याचसाठी त्यांनी उपोषण थोडे लांबवले नसेल कशवरून?
>>पुढील अनेक पिढयांचा 'बुद्धीभेद' करणे हे तर राजकारण्यांचे आवडते उद्योग असतात. कदाचित ह्याचसाठी त्यांनी उपोषण थोडे लांबवले नसेल कशवरून?
मग पुढे चर्चाच कशाला करायची?
आत्तापर्यंत इंद्रराज पवार यांनी आकाशवाणीवरील बातमी म्हणून जे सांगितले त्याखेरीज कोणताही रिझनेबल डायरेक्ट पुरावा कोणी दिलेला नाही. ती बातमी सुद्धा चुकीची असू शकते.
बाकी कोणत्याही दुव्यांमधून/पुराव्यामधून ५५ कोटीसाठी उपोषण केले हे सूचित होत नाही.
गांधींनीच नथुरामला सांगून स्वतःचा खून करवला असे म्हणून मोकळे होऊया.
नितिन थत्ते
धन्यवाद इन्द्रराजसाहेब.
बरीचशी माहिती जी पुर्वी माझ्या वाचण्यात आली होती ती काहीशी विस्कळीत स्वरुपात आणि तुकडयांमधे होती. या धाग्याच्या निमीत्ताने बरीचशी माहिती एकाच ठिकाणी सलगपणे वाचायला मिळतेय. त्याबद्दल तुम्हाला आणि थत्तेसाहेबांना धन्यवाद :)
सावरकर, सावरकरांचं हिंदुत्व, महात्मा गांधींची हत्या आणि त्या घटनेशी असलेला/नसलेला सावरकरांचा संबंध, सावरकरांचे महात्मा गांधींशी असलेले वैचारीक मतभेद, महात्मा गांधीं/नेहरुं यांचा सावरकरांच्या हिंदुत्त्वाला असलेला विरोध, महात्मा गांधींमुळे पाकीस्तानला देण्यात आलेले किंवा न देण्यात आलेले ५५ कोटी रुपये या बद्दल दोन्ही बाजूंचे मुद्दे/विचार, पुरावे सादर करण्याचे प्रयत्न हे बर्यापैंकी संतुलीत आहेत आणि विशेषकरून जास्त माहिती मिळवण्याचे तुमचे कष्ट आणि उपस्थीत केलेल्या शंका/प्रश्न/विरोधी मुद्दे यांना उत्तरे देण्याचा केलेला प्रयत्न हे वाखाणण्याजोगे आहेत.
कोणाही एका बद्दल पराकोटीचं प्रेम किंवा द्वेष न ठेवता, मला व्यक्तीशः तरी ह्या घटना आणि त्यामागील कारणे तसेच कारणीभुत असलेल्या व्यक्तीं बद्दल आणखी विस्तृतपणे जाणुन घ्यायला आवडेल(अर्थातच मिळतील तेव्हढया पुराव्यानींशी :) )
माझी तुम्हाला आणि थत्तेसाहेबाना विनंती आहे की इथेच न थांबता ही चर्चा पुढे सुरू ठेवावी आणि काय खरं काय खोटं हे समोर आणण्याचा प्रयत्न करावा.
"...इंद्रराज पवार यांनी मात्र आज स्वतःहून (मी उत्तरे देत नाही असे पाहून?) पुन्हा चर्चेत उडी घेतली आहे त्याबद्दल त्यांचा सौम्य निषेध...."
नितिन जी ~~ तुमच्यासारख्या अभ्यासू व्यक्तीने केलेले सौम्य निषेध माझ्या दृष्टीने नेहमीच स्वागतार्ह राहील. हे मी अशासाठी म्हणतो की मी "निषेध" करण्याच्या तरी पातळीचा आहे हे तुम्ही मान्य करत आहात, अन्यथा तुम्ही मला सहज "दुर्लक्ष" करू शकला असता.
या निमित्ताने मी काही गोष्टी स्पष्ट केल्या तर तुम्ही त्या आपुलकीने स्वीकाराव्यात ही आग्रहाची विनंती :
१. "थांबावे" हे ठरले होते हे मान्यच होते. त्यानंतर मी फक्त दोन प्रतिसाद लिहीले आहेत, त्यापैकी एक ~ श्री.गागाभट्ट यांनी उपस्थित केलेला "सावरकर यांनी उर्दु भाषा शिकून केलेले कुराणाचे अध्ययन...." ज्याचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी वा गांधी-नेहरू वादाशी कोणताही संबंध नसून एक अभ्यासू वृत्ती आणि भाषातज्ज्ञ म्हणून त्यांच्याकडे असलेली शिकायची चिकाटी या बाबी मला व त्यांना अभिप्रेत होत्या.... त्याबद्दल श्री. पंगा यांनी आभार मानले. तो विषय संपला.
२. ~~ दोन : श्री.हुप्प्या यांनी लिहिलेली ५५ कोटीची शंका. याला उत्तर देणे मी जरूरीचे एवढ्यासाठी समजले की, "याने सांगितले, त्याने सांगितले, ते असे म्हणतात... त्यांचे असे मत आहे..." अशा पध्द्तीने गोंधळाचे धुके अधिकच दाट होत जाते. त्यापेक्षा त्या दिवसांच्या घडामोडीचा अधिकृत माध्यमातून आलेल्या तत्संबंधी बातम्या आणि शासकीय पातळीवरून झालेले खुलासे (ज्यांचा "रेकॉर्ड" म्हणून अभ्यासकांना वापर करण्याची मुभा असते...) हे अधिक प्रकाश टाकू शकतात, म्हणून माझ्याकडे असलेल्या टाईम्सच्या त्या तीन चार दिवसातील बातम्या देणे मी उचीत मानले. इथे आपल्या त्या विषयाचा दुरान्वयेदेखील संबंध नाही.
नेहरूनी पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचे मान्य करणे आणि त्याच संध्याकाळी गांधीनी उपोषण सोडणे याची काहीतरी तर्कसंगती आहे की नाही, हे तुम्हीच सांगा. असे असूनही गांधीनी "हिंदु मुस्लिम एकोप्यासाठी उपोषण केले" असे समजणे म्हणजे स्वतःचीच फसगत करणे होय.
आचार्य अत्रे यांनी तर "नवयुग" मधुन या ५५ कोटीबद्दल गांधी-नेहरु-पटेल यांच्यावर काय हल्ले (आणि कोणत्या भाषेत...) केले आहेत ते सांगण्याची गरज नाही. अत्रे यांचे नाव मी इथे एवढ्यासाठी घेत आहे की, या तिघांबद्दल त्यांच्या मनात नीतांत आदर होता, आणि गांधीना तर ते देवच मानत.
भारत सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्याची दिल्ली येथील "बहादुरशाह जफर मार्ग" वर असलेल्या युजीसीच्या लायब्ररीत तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या लायब्ररीत अधिकृत असे "ट्रान्सफर ऑफ पॉवर" चे ग्रंथ आहेत जे अभ्यासकांना उपलब्ध करून दिले जातात. त्यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही...मात्र एखाद्या खासदाराचे (ओळखीबाबत...)शिफारसपत्र लागते. (मी एकदा श्री. सुशीलकुमार शिंदे व दुसर्यांदा श्री. पृथ्वीराज चव्हाण यांचे तसे पत्र मिळविले होते. दोघांशी माझा बिलकुल परिचय नसतानदेखील ज्या कारणासाठी मी त्यांच्याकडे आलो आहे, हे समजलेवरून त्यांनी पटकन तसे पत्र दिले... इतकेच नव्हे तर श्री.शिंदे यांनी तर आपल्या असिस्टंटला सांगून जेएनयूच्या ग्रंथपालाशी माझी भेट घालून देण्यास सांगितले.... असो...).
मुद्दा असा की, जर भारत सरकारनेच हे रेकॉर्ड अधिकृत मान्यता म्हणून स्वीकृत केले असेल तर त्याचा आधार आपण घेतला तर सत्य-असत्यतेचा गुंता राहणार नाही.
यात १ जानेवारी ते ३१ जानेवारी १९४८ या कालखंडाचे सविस्तर वर्णन आहे. लॉर्ड माऊंटबॅटन हे या काळात दिल्लीतच होते आणि काश्मिर प्रश्नावरून झालेला वाद शमविण्याचा ते प्रयत्न करीत होते. त्यांचे सहकारी सर कॅम्पबेल-जॉन्सन या दोघांनीही आपापल्या डायरीत ज्या नोंदी केलेल्या आहेत त्यानुसार काश्मिरचे राजे सर हरी सिंग यांच्या धरसोड वृत्तीमुळे जिना आणि कं.चे फावले होते व व्हॅलीमध्ये आगडोंब उसळला होता. अशा स्थितीत जो पर्यंत पाकिस्तानी घुसखोर तिथून हलत नाहीत तो पर्यंत रिझर्व्ह बँकेतील पाकचा ५५ कोटीचा वाटा त्यांना बिल्कुल देता येणार नाही अशी ठाम भूमिका नेहरूंनी घेतली व तिला सरदार पटेलांनी पाठींबा दिला. पैशासाठी आलेल्या पाकिस्तानच्या प्रतिनिधींना त्यांनी ठामपणे सांगीतले की, "India would never agree to any payment until the Kashmir affair was settled." (हे माझे शब्द नसून सरकारी रेकॉर्डमधील आहेत.)
आता इथे कॅम्पबेल जॉन्सन यांची नोंद पहा :
Hon. Lord (i.e. Mountbatten) told me, ‘A step both unwise and unstatesmanlike’. (म्हणजे नेहरु-पटेल यांनी ५५ कोटीच्या बाबतीत घेतलेली...). He discussed this issue with Gandhi on the same evening who not only agreed with Lord but found the whole thing morally wrong ~~~ “Like an elder brother hanging on to the rightful share of the patrimony of the younger.” Before the closing of the meeting, Gandhi told Mountbatten that he would take up the matter with Nehru and Patel and something about settling the issue.
या अधिकृत नोंदीनुसार जर खुद्द गांधीच असे म्हणतात की, "हा नकार म्हणजे थोरल्या भावाने धाकट्या भावास वाडवडिलांच्या इस्टेटीतील न्याय्य वाटा न देण्यासारखे आहे..." आणि नंतरचे "समथिंग अबाऊट सेटलिंग द इश्शु..." म्हणजे त्यांचे निर्वाणीचे "उपोषणा"चे शस्त्र.... ज्याचा रास्त उल्लेख "टाईम्स" च्या त्या तीन दिवसांच्या अंकात आहे.
इन्द्र
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
>>नेहरूनी पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचे मान्य करणे आणि त्याच संध्याकाळी गांधीनी उपोषण सोडणे
उपोषण त्याच दिवशी सुटले नाही. किंबहुना १६ जाने ल पैसे दिले गेले तरीही ते सुटले नाही. ते १८ जाने ला सुटले.
मी नेहरू-पटेल यांच्याशी बोलतो वगैरे जे कॅम्पबेल यांच्या नोंदीतील म्हणणे आहे ते कोणत्या तारखेचे हे स्पष्ट होत नाही.
तुमच्या टाइम्सच्या नोंदीप्रमाणे १ जाने ला पैसे न देण्याचा निर्णय झाला. उपोषण १३ जाने ला चालू झाले. कँपबेल यांची नोंद कधीची? ते जाणणे महत्त्वाचे.
नितिन थत्ते
प्रतिक्रिया
तसेही एकदा
थांबायचे
विनंती
नाही लिहिणार
आजच्या मिपावर
जाणून
नितिन थत्ते
पंचावन्न कोटींचे प्रकरण खोटे?
५५ कोटी.....खरे खोटे...!!
इन्द्र्राज पवार
लिहिण्यासारखे....!!
"अभिनंदन" पवार साहेब
नक्की लिहा....
दोघांच्या
असेच
कसली कटुता?
+१
कडवटपणा...!
मी सध्या
हळवा विषय....!!!
प्रत्येक गोष्टीला...
चर्चेची पाऊले.....!!!
शेवटचे
म्हणजे
तथ्य वाटत नाही
>>पकडले
नितिन थत्ते
छान चर्चा
सावरकर आणि त्यांचा "कुराणा" चा अभ्यास....!!
धन्यवाद
५५ कोटी..... खरे खोटे !!!
उत्तर
अवांतर
नेहरूंनी
http://www.gandhi-manibhavan.
हा हा हा
गोल पोष्ट
गांधींचे
फरक
गांधीजी
प्रतिसाद
नितिन
किती वेळा
आता पुरे झाले असे वाटते....
मग
आकाशवाणी,
धन्यवाद
सावरकर यांच्याबद्दल बरेच चुकिचे समज आहेत.
गांधी-नेहरू-पटेल-माऊंटबॅटन....५५ कोटी..!!
>>नेहरूनी