याहून चांगला प्रतिशब्द हवा आहे. खूप डोके खाजवूनही सुचला नाहीं म्हणून हा वापरला आहे. शोध चालू आहे! आपल्याला सुचल्यास जरूर सांगावा म्हणजे 'सकाळ'ला पाठवतांना बदलेन!!
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत !
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
सुंदर लेख. बरीच माहिती मिळाली.
काका तुम्ही एके ठिकाणी अस ननुद केल आहे की
ही विमाने रेगन-झिया करारातील एकूण ४० विमानविक्रीच्या कराराचा भाग होती व ती पाकिस्तानने सोविएत सैन्याबरोबरचे युद्ध चालूच ठेवण्यासाठी दिली गेली होती
पण पाकिस्तानच आणि रशियाच कधीच युद्ध झाल नव्हत. अफगाण आणी रशिया युद्धा त्यांनी अप्रत्यक्षपणे अफगाणिस्तानला मदत केली होती. मग असे असताना एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट यांनी अस का लिहिल?
पाकिस्तानातील अशा टोकाला गेलेल्या अस्थिरतेची भारताला कल्पनाच नव्हती कां? अशा अस्थिरतेचा फायदा घेऊन कहूताप्रकल्प बेचीराख करण्याची सुवर्णसंधी भारताकडे होती! वाटल्यास इस्रायलची मदतही मागता आली असती. मग आपण या संधीचा फायदा कां घेतला नाहीं?
आपण अजुन एक संधी सोडली ती म्हणजे कारगील युद्धात LOC क्रॉस करुन सर्व अतिरेकी तळ उद्वस्त करण्याची.
भारत आणि पाकिस्तान हा ईश्यु किती दिवस रहाणार आहे काय माहित.
१) पाकिस्तान (व पाकिस्तानमार्फत अमेरिका) अफगाणिस्तानमध्ये ज्याला proxy war म्हणतात तसले युद्ध लढत होते. म्हणजे "मी कुठं कांहीं केलं" असं म्हणत म्हणत अप्रत्यक्ष युद्ध करायचं. (असंच युद्ध पाकिस्तान आपल्याबरोबर अतिरेक्यांमार्फत खेळत आहे.)
जोवर पाकिस्तान यात होता तोवर अमेरिकन रक्त न सांडता परस्पर सोविएत महासंघाची वाट लावायची असा अमेरिकेचा plan होता. म्हणून पाकिस्तानला लढत ठेवण्यासाठी लागतील तशा तडजोडी (compromises) रेगननी केल्या व आज पाकिस्तानला अमेरिकेच्या छाताडावर नाचण्यायोग्य बनवला.
मी जे पहातो ते हे कीं पाकिस्तानच्या थेट/छुप्या (बिचार्या) 'शिपुरड्यां'नी रक्त सांडले, त्यांच्या (अक्षरशः) जिवावर अमेरिकेचे ३० टक्के पैसे लष्करी अधिकार्यांनी 'खाल्ले' (हे पुढे या पुस्तकात आले आहे), बरेचसे पाकिस्तानने भारताशी लढण्याची बरोबरी करण्यासाठी वापरले व उरलेले खर्या कारणासाठी वापरले.
२) खरं तर आपण जात्याच भित्रे आहोत. म्हणून तर जिवावर येईपर्यंत शांतीची जपमाळ ओढत बसतो. पाकिस्तानला हे माहीत आहे म्हणूनच ते अशी शिरजोरी करतात. २६/११ नंतरचा भारताचा भ्याडपणा हा त्यातलाच एक भाग. त्यावेळी भारताने कांहींही केले असते तरी ते जगाने मान्य केले असते!
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
वा... हा भाग वाचतानाही बरीच माहिती कळाली. :)
बार्लोंचा nervous breakdownच व्हायचा बाकी होता!
प्रामाणिकपणे काम करणार्या लोकांची अशीच वाट का लागते हे मला अजुन कळाले नाहीये... :(
आयएसआय नक्की काय चीज आहे हे मला अजुन कळाले नाही...म्हणजे कोण त्यांना फंडींग करतो ? ह्यांचे अधिकारी कोण निवडतो ? इ.
मदनबाण.....
When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss
ISI म्हणजे एक विलक्षण प्रकार आहे. त्याचा प्रमुख लष्करशाहीत लष्करप्रमुख नेमतो व मुलकी सरकार असताना लष्करप्रमुख ज्याला निवडतो त्याला(च) पंतप्रधान नेमतो असा माझा कयास आहे. विकास यांनी पाठविलेला दुवा अजून वाचला नाहींय्. वाचून नक्कीच जास्त माहिती मिळेल.
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
प्रतिक्रिया
हा दुवा
क्रांतीकारी रक्षक?
याहून चांगला प्रतिशब्द हवा आहे
सुंदर लेख.
पाकिस्तान व अमेरिका अफगाणिस्तानमध्ये proxy war लढत होते!
वा...
ISI म्हणजे एक विलक्षण प्रकार आहे