Skip to main content

चालू घडामोडी । मे २०२६ । वैशाख अधिक ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी शुक्रवार, 01/05/2026 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

"जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" असे राज्यगीत असलेल्या आपल्या मराठी राज्याची स्थापना होऊन आज ६६ वर्षे पूर्ण झाली.

आज जागतिक कामगार दिन आहे. पांढरे, निळे, करडे - सर्व प्रकारचे श्रमिक, हे जग निर्माण करण्यासाठी जे कष्ट उपसतात त्यांच्या श्रमाचा हा गौरव दिन.

आज वैशाखी पौर्णिमा आहे. भगवान विष्णूंनी आजच्या दिवशी गौतम बुद्धांच्या रूपाने भूतलावर अवतार घेतला होता. केवळ हिंदूंनाच नाही, अवघ्या मानव जातीला शांतीचा संदेश त्यांनी दिला.

या महिन्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक पातळीवर अनेक घडामोडी होणार आहेत.

तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, पश्चिम बंगाल, असम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. सोमवार, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील. यावर मिपाकरांची मनमोकळी चर्चा / काथ्याकूट अपेक्षित आहे.

दर अडीच-तीन वर्षांनी येणारा, हिंदूंचा पवित्र महिना - अधिक ज्येष्ठ मास रविवार १७ मे रोजी सुरू होत आहे. नाना व्रतवैकल्ये करून पुण्य प्राप्त करण्याची ही पर्वणी आहे.

या अधिक मासात (म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात!) जावयांचा यथाशक्ती आदर-सत्कार करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. मिपाकर जावयांना त्यानिमित्त आगाऊ शुभेच्छा! ;-)

 


वाचने 157
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंक चे आज उद्घाटन आहे.

हा मार्ग पूर्णत: लहान वाहने आणि बसेस याम्च्या साठी ठेवावा. 

लोणावळा घाटात वहातूक गुंता होण्याचे मुख्य कारण आहे ते अवजड ट्रक. 

हे ट्रक संथ गतीने चालतात पण ते इतरांची वाट देखील  अडवतात


In reply to by कंजूस

मिसिंग लिंक प्रोजेकटसाठी आणखी काही  हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याची बातमी गेल्या दोन दिवसांत वाचली होती. ती आता दिसत नाही.

प्रचंड हाल झाले नाहीत तर जनतेला या दुसऱ्या  प्रकल्पाचे महत्त्व कसे पटेल? 
तथाकथित इन्फ्रामॅनला व कंत्राटदारांची भूक...


किंवा डिजिटल पडदा ओढायचा होता आणि एकदा फावल्या वेळात ड्राइविंगची हौस भागवायची होती. डिजिटल युग आलंय ना मग करा की अमलबजावणी सगळीकडे.

........

मागच्या आठवड्यात कर्नाटकात  धारवाडकडे होतो. रस्त्यांवर, गावांत एकसुद्धा राजकीय फलक ( बॅनर) दिसला नाही . पण बेळगाव आल्यावर फलकच फलक वाढदिवसाच्या शुभेच्छा .