Skip to main content

चालू घडामोडी । मे २०२६ । वैशाख अधिक ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी शुक्रवार, 01/05/2026 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

"जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" असे राज्यगीत असलेल्या आपल्या मराठी राज्याची स्थापना होऊन आज ६६ वर्षे पूर्ण झाली.

आज जागतिक कामगार दिन आहे. पांढरे, निळे, करडे - सर्व प्रकारचे श्रमिक, हे जग निर्माण करण्यासाठी जे कष्ट उपसतात त्यांच्या श्रमाचा हा गौरव दिन.

आज वैशाखी पौर्णिमा आहे. भगवान विष्णूंनी आजच्या दिवशी गौतम बुद्धांच्या रूपाने भूतलावर अवतार घेतला होता. केवळ हिंदूंनाच नाही, अवघ्या मानव जातीला शांतीचा संदेश त्यांनी दिला.

या महिन्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक पातळीवर अनेक घडामोडी होणार आहेत.

तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, पश्चिम बंगाल, असम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. सोमवार, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील. यावर मिपाकरांची मनमोकळी चर्चा / काथ्याकूट अपेक्षित आहे.

दर अडीच-तीन वर्षांनी येणारा, हिंदूंचा पवित्र महिना - अधिक ज्येष्ठ मास रविवार १७ मे रोजी सुरू होत आहे. नाना व्रतवैकल्ये करून पुण्य प्राप्त करण्याची ही पर्वणी आहे.

या अधिक मासात (म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात!) जावयांचा यथाशक्ती आदर-सत्कार करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. मिपाकर जावयांना त्यानिमित्त आगाऊ शुभेच्छा! ;-)

 


वाचने 2376
प्रतिक्रिया 62

प्रतिक्रिया

मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंक चे आज उद्घाटन आहे.

हा मार्ग पूर्णत: लहान वाहने आणि बसेस याम्च्या साठी ठेवावा. 

लोणावळा घाटात वहातूक गुंता होण्याचे मुख्य कारण आहे ते अवजड ट्रक. 

हे ट्रक संथ गतीने चालतात पण ते इतरांची वाट देखील  अडवतात


In reply to by कंजूस

मिसिंग लिंक प्रोजेकटसाठी आणखी काही  हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याची बातमी गेल्या दोन दिवसांत वाचली होती. ती आता दिसत नाही.

प्रचंड हाल झाले नाहीत तर जनतेला या दुसऱ्या  प्रकल्पाचे महत्त्व कसे पटेल? 
तथाकथित इन्फ्रामॅनला व कंत्राटदारांची भूक...


In reply to by कांदा लिंबू

बातमी खरी असावी. काल गुगल मॅप घाटात लाल रेष दाखवत होती. पण अशा सुट्या आल्या की दोन तासाचा टॅफीक जॅम हा आता नॉर्मल म्हणायला पाहीजे. 
पण त्याचा उपयोग फडणवीसांविरूध्द करता येत असेल तर ती संधी कोण सोडेल?😀 त्यामुळे त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. शेवटी ते राजकारण आहे. 


किंवा डिजिटल पडदा ओढायचा होता आणि एकदा फावल्या वेळात ड्राइविंगची हौस भागवायची होती. डिजिटल युग आलंय ना मग करा की अमलबजावणी सगळीकडे.

........

मागच्या आठवड्यात कर्नाटकात  धारवाडकडे होतो. रस्त्यांवर, गावांत एकसुद्धा राजकीय फलक ( बॅनर) दिसला नाही . पण बेळगाव आल्यावर फलकच फलक वाढदिवसाच्या शुभेच्छा .


 

 

पश्चिम आशियातील युद्ध सुरू झाल्यापासून क्रूड ऑइल च्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांचे मतदान पार पडले.‌ आता अनेक प्रकारचे व्यवसायिक इंधन - आंतरराष्ट्रीय वाहतूक विमान इंधन, व्यावसायिक डिझेल, व्यावसायिक १९ किलो व ५ किलो एलपीजी, यांच्या दरात ४०% वाढ करण्यात आली आहे.‌ 

 

केवळ किरकोळ पेट्रोल डिझेल व घरगुती १४ किो  एलपीजी यांचेच भाव वाढविलेले नाहीत. पश्चिम आशियातील युद्ध लवकर संपले नाही तर येत्या काळामध्ये तेही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

निवडणुकांपर्यंत इंधन दरवाढ रोखून धरणे हे प्रकार सगळीच सरकारे करतात त्यात केवळ मोदींना दोष देऊन उपयोग नाही. खरं तर कुणालाही दोष देऊन उपयोग नाही. क्रूड ऑइल च्या किमती वाढल्या तर इंधनाच्या किमती वाढणे हे नैसर्गिकच आहे. त्यांना कृत्रिम रित्या रोखून धरणे हेच अनैसर्गिक म्हणावं लागेल.

 


In reply to by श्रीगुरुजी

तो माणूस लोकांची हातात आधी सापडला, मग त्याला
पोलिसांकडे सोपवण्यात आले. आता म्हणत आहेत आमच्या ताब्यात द्या! माग आधी लोकांच्याच ताब्यात होता ना? त्याचे अजून वर्षभर तरी काही वाकडे होत नाही. मालेगाव केस मधील आरोपी अजूनही जेल मधे आहे, त्याला सरकारी वकील देण्यात आलाय, जिल्हा न्यायालय मग राज्य न्यायालय मग सर्वोच्च न्यायालय असे प्रकरण वर जाईल तो पर्यंत १० वर्षे निघून जातील, मधे कदाचित त्याला जामीनही मिळेल. भारतात जिवाला किंमत नाही त्यातही स्त्री असेल तर नी लहान मूल असेल तर आजिबातच किंमत नाही. :(


 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक, चंद्रनाथ रथ, यांची बुधवारी रात्री कोलकाताच्या उत्तर उपनगरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून तणाव वाढला आहे.

https://m.economictimes.com/news/elections/assembly-elections/west-bengal/bjp-leader-suvendu-adhikaris-personal-assistant-shot-dead/articleshow/130866607.cms 

निवडणुकांच्या निकालानंतर आतापर्यंत किमान चार राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत.


जागतिक कीर्तीचे, जगर चर्चिल जाणारे ख्यातनाम विनोदमूर्ती श्री. रा. रा. संजयराव राऊत यांनी थेट डोनाल्डतात्यांना पत्र लिहिले आहे. बंगालमधील निवडणुकीत प्रचंड प्रमाणात लबाडी, धाकदपटशा, पक्षपातीपणा करून भाजपने निवडणूक जिंकल्याने लोकशाहीवर प्रचंड आघात झाल्याचे नमूद करून सर्व लोकशाहीप्रेमी जागतिक नेत्यांनी या अन्यायाविरुद्ध हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे. 

 

लोकशाही वाचविण्याचे राऊतांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. भारतात २ दशकांपासून मतयंत्रात गडबड केली जात आहे हेसुद्धा त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

 

२ दशकांपासून म्हणजे अंदाजे २००६ पासून. २००६ ते २०१४ या काळात तर कॉंग्रेसचे सरकार होते. 

 

ज्या डोनाल्डतात्यांना हे पत्र लिहिलंय त्यांनी तर २०२० च्या निवडणुकीत निर्णायक पराभवानंतरही अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला होता व समर्धक जमवून दंगल करण्याचा प्रयत्न केला होता.

 

जर चुकुनमाकून तात्यांनी पत्र वाचले तर ते गडाबडा लोळत हसत राहतील. समजा वाचले किंवा नाही वाचले तरी हे पत्र ते वाया घालविणार नाहीत. उद्या सकाळी नेहमीच्या "सामना"ऐवजी हे पत्र "त्या" कामासाठी वापरतील.

 

_________________

 

हेच ते राऊतांचे ट्विट व पत्र.

I had written an open letter to President Trump,

as he has always spoken about democracy and fair elections, and wanted to bring the truth to his attention. As a responsible Indian, and Member of Parliament, it is my duty to shed light on the fact that this election was carried out in an absolute lopsided manner.

 

To  begin with, the Opposition Parties that represent more than half of India’s vote share officially in 2024, have raised doubts over the fairness and neutrality of the Chief Election Commissioner and his motives. The Election Commission, under the CEC’s guidance has barred 9 million voters from voting overnight, without a fair appeal or any further justice. More so, even while Manipur burnt with violence, this election saw the deployment of central forces in millions, including tanks and encounter specialists, as a mark of force.

 

It is my duty, to ensure that everyone is aware, the world over (be it a president of an important democracy or a citizen of any country) that the elections haven’t been as free and fair as shown by sections of media to the world. The disenfranchised voters, and those who faced fear while casting their vote raise questions even today. EVMs have been doubted for 2 decades and rigging issues have been raised by India’s leader of opposition. I strongly believe that leaders of democracies around the world cannot be kept away from the fact that the institutions that once ensured our elections to be free and fair, are now being questioned.

 


In reply to by श्रीगुरुजी

राऊत ह्यांच्या लेखाने वॉशिंग्टन हादरले, इतके हादरले कि तिथल्या परावर्तित जलाशय मधील पाणी गायब झाले आहे अशी बातमी आहे. 


उघडले डिजिटल पेटारे 

कमळाबाईचे वारेन्यारे

झाली दिदीची विदाई 

शुभेंदूला मिष्टीदोई 

बेतुक्या म्हणे............

जशी दहा रू ची झालमुरी

तशी पराठे लस्सी भारी

आता भगवंताची बारी

बेतुक्या म्हणे..........

आमी भालो तुमी भालो

 XXको गढ्ढे मे डालो

आता,बल्ले बल्ले, शावा शावा

नकळे गनिमी कावा

बेतुक्या म्हणे..........

अश्वमेधाचा वारू

गंगोत्री ते गंगासागरू

पादाक्रांत हिन्दमहासागरू

सकल जनांसी आधारू

बेतुक्या म्हणे............


शुभहिंदू अधिकारी यांना भाजपने मुख्यमंत्री म्हणून निवडले हे चांगले झाले. 

नाहीतर त्यांनी यावेळी तमिळनाडूमध्ये अण्णा मलाई यांचा व मागच्या मधल्या वेळी महाराष्ट्रात फडणवीस यांचा गेम केला होता.


माजपा चे राजकारण नक्की कसे चालते ? म्हणजे पडध्या मागे हात ठेवून सोशल मिडियाचा  वापर करून काय केले जाते ?   हे अनेक जणांना माहित नसते.

१] भाडोत्री पाळलेले असतात.यांचे एकच काम असते, दिवस रात्र प्रत्येक सोशल मिडियावर राजकीय कोलांट्या उड्या मारून प्रत्येक निवडणुकी आधी हा पक्ष कसा हिंदुत्ववादी आहे हे जनमानसावर बिंबवत राहायचे. [ नाहीतर भाडोत्रीपणाचे पैसे कसे मिळतील? ]
२] पक्षाच्या अधिकृत हॅडल वरून ज्या ज्या नेत्या विरुद्ध भूमिका घेतली असेल त्याच्या विरुद्ध रान पेटवायचे मग तो व्यक्ती पक्षात आला की कोलांटी उडी मारायची. त्याची कशी गरज आहे हे आता सगळीकडे सांगत सुटायचे. [ अगदी ताजे ताजे उदाहरण बंगालचे ]

३] निवडणूक झाली की जातीयवादी राजकारण सुरु करायचे आणि चुकीच्या निर्णया बद्धल सोयीस्कर मौन बाळगायचे.

सोशल मिडिया वर एक भाडोत्री आहे, जो पक्षात नाही आणि ढोंगी हिंदुत्ववादी संघात नाही, पण कोबीजी त्याच्यावर मेहरबान असल्याने त्याला चक्क पद दिले आहे.

त्याची कथा खाली देत आहे.
 

कथा : 

 BJP Says Brahmins & Muslims Didn't Let Them Win | Bengal Results | Dilip Mandal | Ajeet Bharti

 

 

विशेष गंमत : सुधांशु त्रिवेदी आणि गाय

 

जाता जाता : कथा वाचकाला युजीसी  आंदोलनाच्या वेळी त्याच्या घरात नजर कैदेत ठेवले होते. [हेच ते अच्छे  दिन! बरं का मंडळी ]

दिल्ली मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आंदोलनाला परवानगी दिली जाते मात्र जेव्हा सामान्य वर्गातील हिंदूंनी युजीसी विरोधात पुन्हा शातंतापूर्ण आंदोलनाची तयारी केली असताना बहुतेक आंदोलन दिनाच्या आधीच्या दिवशी परवानगी नाकारली गेली .जर तुम्ही खरंच हिंदू म्हणून जगत असाल तर हिंदू म्हणून एकत्र रहा आणि सर्व प्रकारच्या जातीयवादी राजकारणाला विरोध करा.

 

मदनबाण.....

आजची बदललेली स्वाक्षरी: Jaan Se Guzarte Hain (Live at Dhurandhar The Revenge -Music Album Launch)


श्री.रा.रा.अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. एक गोष्ट कळत नाही. डापु गॅंग उर्फ जमात-ए-पुरोगामींना औरंगजेबाविषयी प्रेम असते, केजरीवालांविषयी तर प्रेम उतूच जात असते आणि मोदींविषयीचा द्वेषही तसाच उतू जात असतो. आता आली की पंचाईत. ज्याच्याविषयी प्रेम उतू जाते अशा व्यक्तीने ज्याच्याविषयी द्वेष उतू जातो अशा व्यक्तीची तुलना ज्याच्याविषयी प्रेम वाटते त्या व्यक्तिबरोबर केली. आता काय करायचे? औरंगजेब वाईट होता हे मान्य करायचे का? तसे मान्य केल्यास मग औरंगजेबाने आमच्या शंभूराजांना मनुस्मृतीतील आज्ञेप्रमाणे हाल हाल करून ठार मारले असला गुडघ्यातला नरेटीव्ह चालविला जात होता त्याचे काय? आणि औरंगजेब थोर पुण्यात्मा सुफी संत असेल आणि ती तुलना मान्य करायची तर मग मोदी पण पुण्यात्मा आहेत हे मान्य करायचे का?आणि तेही करायचे नसेल तर मग औरंगजेब आपल्याबरोबर ठेऊन केजरीवालांना आपल्या मनात दिलेले अढळपद काढून घ्यायचे काय?

 

जामच पेचात टाकले की केजरीवालांनी डापु गॅंगच्या उर्फ जमात-ए-पुरोगामीच्या लोकांना.

 

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

जशी पंजाबची विधानसभा निवडणूक जवळ येते आहे, तसा गेले वर्षभर भूमिगत झालेला केजरू आता परत उचल घ्यायला लागलाय. नाटकीपणा पुन्हा एकदा जोरात सुरू झालाय. 


कसा झाला? त्यामागे काही गडबडगुंडा असणार तोही पत्रातून कळवला पाहिजे ट्रंपबाबांना राष्ट्रीय पत्रकारांनी. तिकडेही लोकशाहीचा खून पडला. 

स्टेजवर वन्दे मातरम ऐकताना राहुलबाबा फारच गंभीर झाले. ये क्या हुआ इधर? कैसे हुआ?


मोदींनी 10 तरखेला डिझेल-पेट्रोल कमी वापरायचा सल्ला दिला आणि दुसऱ्या दिवशी स्वतः सोमनाथ मध्ये मोठ  रोड शो करून सोमनाथाचे आशीर्वाद घेतले.


In reply to by रात्रीचे चांदणे

महात्मा गांधी स्वतः अर्मानी चा सूट आणि पाटेक चे घड्याळ घालून लोकांना खादी घालण्याचा सल्ला नव्हते देत काय ? 


मिरच्या वाटपकेंद्र बंद पडले काय.

इतकी लिपापोती केलीय तर शाणपण येत नाही.

शेठ जबरदस्त तोंडावर पाडणार एक दिवस.


 सोने खरेदी टाळा हे  एकवेळ ठीक आहे पण रासायनिक खते कमी वापरा असे आवाहन करणे  हे बौध्दिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. 


क्रूडचे भाव प्रचंड वाढलेत. अरबी देशात होणारी निर्यात पणं युद्धा मुळे मंदावाली असेल. आपले डॉलर्स वाचावेत हा चांगला उद्धेश असावा. अर्थव्यवस्थे साठी हें चांगल आहे का ते माहिती नाही. पणं त्यासाठी स्वतः तस अचरण पणं करणे गरजेचं आहे.

बंगाल मध्ये एखादी सभा कमी घेतल्याच ऐकलं नाही. बरं ते एक वेळ ठीक आहे कारण निवडणूक पण महत्वाची आहे. पणं रोड शो कशाला ते पणं गुजरात मध्ये.


बंगालचे मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारींनी बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी बंगालच्या सीमावर्ती भागातील जमीन बी.एस.एफच्या ताब्यात द्यायची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकाधिक प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर भारतात यावेत आणि आपली व्होटबॅंक बनावेत या उद्देशाने डापु गॅंग उर्फ जमात-ए-पुरोगामींच्या लाडक्या ममता दिदीने ती जमीन बी.एस.एफ कडे हस्तांतरीत करायचे कटाक्षाने टाळले होते. हा निर्णय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत झाला. सुरवात तरी ठीक झाली आहे. पुढे काय होते ते बघू. सगळ्यात मोठा प्रश्न हा की आधीच घुसलेल्या बांगलादेशींना कसे हाकलायचे हा. ते बोलतात बंगालीच, दिसतातही बंगालच्या लोकांप्रमाणेच आणि ममता दिदींच्या कृपेने त्यांच्याकडे आधार कार्ड वगैरे आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेने त्यांना हाकलणे कठीण दिसते. दुसरा कोणता मार्ग काढता येतो का हे बघायचे. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

बंगाल आणि आसाम निवडणुका कदाचित भारत देश आणि त्या भागासाठी अत्यंत सुखद आणि महत्वाच्या घटना आहेत. SIR च्या अंमलबजावणीसाठी भारतीय गृहखाते आणि  निवडणूक आयोगाचे कौतुक करावेच लागेल. ममता ह्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी अमेरिकन आणि इस्राएली एजन्सी खूपच उत्सुक होत्या पण त्या सर्व तोंडघशी पडल्या. बांगलादेशी अमेरिकन लोकांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांच्या मते भारतांत बेकायदेशीर पणे जाणे अत्यंत सोपे होते. BSF मध्ये भ्रष्टाचार माजला होता. काही बांगलादेशी तर चक्क बंगाली सरकारी नोकऱ्यांत होते. असंख्य लोक म्हणे घाबरून परत आले. ममता ह्यांनी अश्या अफवा पसरवल्या कि भाजप निवडून आले तर ह्या लोकांना गोळ्या घातल्या जातील वगैरे, ह्यामुळे कदाचित हि मंडळी आणखीन घाबरून काढता पाय घेत झाली.

बांगलादेश हे अमेरिकन सत्ताबदलू लोकांचे नवीन केंद्र होणार आहे त्यामुळे बंगाल, आसाम, नागालँड इत्यादी भागांत सुरक्षा व्यवस्था वाढणे गरजेचे आहे. म्यानमार मध्ये चिनी लोकांचा हस्तक्षेप वाढत आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन ह्या भागांत शस्त्रास्त्रे पसरवत आहेत. हि आग कधी ना कधी वणव्याचे रूप घेईल . 


मिपा तांत्रिक अडचणींमुळे बंद होण्यापूर्वी एका लेखात लिहिले होते की या युद्धामुळे ट्रंप व नेतानयाहू यांची अवस्था पाचरीत शेपूट अडकलेल्या माकडासारखी झाली आहे. त्यातून नेतानयाहूने आपली शेपटी अलगद सोडवून घेतली आहे. परंतु ट्रंपची शेपटी घट्ट अडकली आहे. शेपूट सोडविली नाही तर माकडाचा मृत्यू अटळ आहे. अन्यथा शेपूट तोडली तरच माकड सुटू शकेल.

 

हे युद्ध पुढे सुरू ठेवता येत नाही कारण इराण जोरदार प्रतिकार करतोय आणि युद्ध थांबविले तर नामुष्की पदरी पडते. इराणच्या हातात अजूनही हुकुमाची काही पाने शिल्लक आहेत.

 

आता ट्रंपकडे ३ पर्याय आहेत.

 

१) इराणशी बोलणी करून दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या काही अटी मान्य करून युद्धविराम करणे.

 

- असे करणे म्हणजे अमेरिकेसाठी नामुष्की आहे. लष्करीदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, तंत्रज्ञानदृष्ट्या एका तुलनेने बऱ्याच दुर्बल देशासमोर मान झुकवली अशी अमेरिकेची प्रतिमा जगभर होऊन अमेरिकेचा दरारा खूप कमी होईल.

 

२) आपणास हवे ते साध्य झाले, आमचा विजय झाला असे जाहीर करून युद्ध थांबविणे. हा दावा अर्थातच असत्य आहे हे जग ओळखते व पहिल्या पर्यायाप्रमाणेच जगभर नामुष्की होईल.

 

३) एक जोरदार आक्रमण करून इराणला पूर्णपणे शरण आणणे हा तिसरा पर्याय. हा पर्याय वापरला तरीही इराण अनेक दिवस झुंज देईल ज्यात इराणच्या बरोबरीने अमेरिकेचेही प्रचंड नुकसान होईल. अरब देशांनाही मोठी झळ पोहोचेल. अंतिमतः अमेरिका जिंकेल परंतु तोपर्यंत अनेक देशांचे प्रचंड नुकसान झाले असेल. जगभर इंधन तेलाची तव्र टचाई होल व प्रंड महााई होईल. चीन व रशिया सुद्धा इराणच्या बाजूने युद्धात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात ट्रंप हा अत्यंत अहंमन्य, घमेंडखोर व पराकोटीचा हेकेखोर असल्याने कोणत्याही परिणामांची पर्वा न करता, विचार न करता तो हा पर्याय रेटून नेईल.

 

सद्यपरिस्थितीत पर्याय क्र. ३ ची शक्यता जास्त वाटते. मोदींना कदाचित तिसऱ्या पर्यायाची कुणकुण लागली असावी. त्यामुळेच अचानक सलग दोन दिवस ते काटकसर करण्यास सांगत आहेत. अर्थात इंधन तेल कमी वापरा हे १९८९-९० मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मधू दंडवतेंनीही सांगितले होते.‌ सोने खरेदी करू नका हे अर्थमंत्री चिदंबरम् यांनीही सांगितले होते. त्यामुळे मोदींनी असे सांगणे यात नवल नाही.‌


परम ढोंगी मोगली जी यांनी देशात वायु प्रदुषण चिंताजनक पातळीवर पोहचले आहे, तेव्हा नागरिकांनी कमी श्वास घ्यावे असे सांगितले नाही हीच मोठी गोष्ट आहे.

जगात आणि आपल्या देशात एवढे मोठे उर्जा संकट असताना आणि रुपया प्रदिर्घ काळ पडत असताना आसाम आणि बंगालच्या निवडणुका पार झाल्या नंतरच मोगलीजींना जनतेला परिस्थीची जाणीव करुन द्यायची उसंत मिळाली. [ एक नागरिक म्हणुन मी त्यांच्या आव्हानास सकारत्मक प्रतिसाद देइन. ]

आता मोगलीजीं नी स्वत: जनतेला काय करायचे सांगुन सगळी जवाबदारी त्यांच्यावर ढकलुन मोकळे झाले [ तरी नशीब, यावेळी हे संकट घालवण्यासाठी त्यांनी थाळ्या बडवण्यास सांगितले नाही. ] पण त्यांच्या स्वत:च्या जवाबदारीचे काय?

गलगोटीयाचा जो जागतिक तमाशा होऊन सगळ्या जगात आपली एआय युक्त नाचक्की झाल्याचे तुम्हा सर्वांना आठवतच असेल, तर याच गलगोटीयाच्या विध्यार्थांना एक दिवशाची रजा / हजेरी मान्य करवुन त्यांना बसेस मध्ये भरुन मोगलीजींनी त्यांच्या सभेस आणले होते. [अजुन तरी बऱ्याचश्या बसेस डिझेलवरच चालवल्या जातात आणि सध्य परिस्थीत डिझेल हे सर्वाधीक अमुल्य आहे. ] म्हणजे युजीसी आणुन या आत्ममग्न माणसाने कॉलेज मध्ये शिकणाऱ्या जनरल कॅटेगरीच्या विध्यार्थांचे आयुष्य उद्वस्त केलेच वर जे बिचारे त्या गलगोटीया मध्ये शिकत आहेत त्यांनाही आपल्या सभेत गर्दी म्हणुन कामास लावले.

३०० डिझेल बसेस यासाठी वापरल्या गेल्या! संपुर्ण निवडणुकीच्या काळात किती कोटींचे महत्वपूर्ण डिझेल इंधन फुकले गेले असेल याची तुम्ही कल्पना करुन पहा!

संदर्भ: 

https://www.youtube.com/shorts/K9L8mRMtUQY

https://www.youtube.com/shorts/PLp0GJj7324

 

मोठ्या मोठ्या पोकळ घोषणा देण्यात मोगलीजींचा हात कोण धरु शकेल?

अशीच एक घोषणा होती, देश कभी झुकने नही दुंगा...

प्रत्यक्षात: India Rejects Russian LNG Under Sanctions

मोगली जी सातत्याने तुम्हाला स्वदेशी चा आग्रह करतात पण त्यांच्या गॉगल पासुन पेना पर्यंत आणि गाडी पासुन कॅमरा पर्यंत सर्वकाही विदेशी वापरतात. [ त्यांना फोटोग्राफीची,फोटो काढुन नौटंकी करण्याची आणि सगळीकडे अगदी रेड कार्पेट टाकवुन त्यावर चालत जाऊन दाखवण्याची फार हौस आहे. मंदीरात भक्तीला महत्व असते तिथे रेड कार्पेट कशाला हवे? असे मोगलीजींना कोण विचारणार? ] 

चीन मधुन आयात केलेल्या युरिच्या पिशवीवर मोगलीजींचा फोटो प्रिंट असतो आणि खाली लिहलेले असते सशक्त किसान,आत्म निर्भर भारत! ही यांच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेची कहाणी.

तुम्हाला अहमदाबादची विमान अपघाताची अत्यंत दुर्दैवी घटना माहित असेल, तिथे देखील त्यांनी आपली फोटो काढुन घ्यायची विकृत हौस भागवुन घेतली! 

[ ॲगल मत्वाचा बरं का, लोगों के जिंदगी की क्या किमत? ]

 

 

आजची स्वाक्षरी:  PHIR SE (Full Video) | Dhurandhar The Revenge |

 

 

 

 

 

 

 

 


सोने खरेदी वर्षभर टाळा, पर्तयटन काही काळ टाळा, कमी खाद्यतेल वापरा, इंधन कमी वापरा हे पंतप्रधानांनी केलेले आवाहन ऐच्छिक आहे. कोणावरही सक्ती नाही.

 

ज्यांना हे मान्य नाही त्यांनी भरपूर सोने खरेदी करावे, अमेरिका -युरोपच्या सहली काढून परदेशात सर्वाधिक महागड्या पर्यटन वसतिस्थानात वास्तव्य करावे, आपली वाहने भरपूर वापरावी आणि घरी असताना सुद्धा वाहनाचे चलतयंत्र सुरू ठेवावे, घरातील प्रत्येकाने वेगळ्या वाहनातून प्रवास करावा, भरपूर खाद्यतेल वापरून स्वयंपाक करावा, सप्ताहातील सातही दिवस वाहनाने कार्यालयात जावे. 

हे सर्व करून मोदींचे आवाहन पराभूत करावे.‌


In reply to by श्रीगुरुजी

>> युरोपच्या सहली काढून परदेशात सर्वाधिक महागड्या पर्यटन वसतिस्थानात वास्तव्य करावे,

बाकी कोणी नाही, तरी प. पू. मोदीजींनी ऐकला. अ बिग अचिव्हमेंट!


मोठा गाजावाजा करून, जवळपास २५-३० मोठ्या उद्योगांचे सर्वोच्च अधिकारी व ३ वरिष्ठ मंत्री बरोबर घेऊन मोठ्या ताठ्यात ट्रंप ३ दिवस चीनभेटीवर गेले आणि अक्षरशः रिकामा वाडगा घेऊन परतले. ना या भेटीत मोठे करार झाले, ना चीनने होर्मुझ खाडीची बंदी तोडण्यासाठी काही मदत दिली. उलट चीनने डोळे वटारून ट्रंपना बजावले की तैवानपासून दूर रहा.

 

जगभर कोणीही अमेरिकेला किंमत द्यायला तयार नाही. एकही देश अमेरिकेबरोबर इराण युद्धात सामील होण्यास तयार नाही. अनेक देशांनी अमेरिकेच्या लष्करी विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनचा सध्याचा राजा अमेरिकेत ट्रंपना भेटला. तेव्हाही ट्रंपने चार्ल्सला सांगितले की पंतप्रधान स्टार्मरला सांगा की युद्धात सहभागी व्हा. यावर चार्ल्सने कोणतेही आश्वासन दिले नाही. 

 

इराण चार दिवसात शरण येईल हा ट्रंपचा भ्रम होता. इराणमध्ये सैन्य घुसवून जमिनीवर युद्ध करणे अमेरिकेसाठी आत्मघातकी ठरेल. इराणचे प्रचंड नुकसान होऊनही इराण झुकत नाही. इराणने होर्मुझ खाडी बंद केल्याने जगाची वाट लागली आहे व अमेरिका परत वाहतूक सुरू करू शकत नाही. अमेरिकेच्या धमक्यांना इराणने काडीचीही किंमत दिली नाही. 

 

जगभर ट्रंप व अमेरिका हास्यास्पद झालेत. ट्रंपचा अहंकार, उर्मटपणा, इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती, बढाया, सात्याने धमक्या देणे यात कणभरही बदल नाही. 

 

 


In reply to by श्रीगुरुजी

बरोबर आहे. 

तरीही या युद्धात इराण हरायला हवा नाहीतर जगभरात इस्लामिस्ट दहशतवादी पुन्हा डोके वर काढतील.


साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात ट्रंपने धमकी दिली होती की आज रात्री आम्ही इराणवर हल्ला करणार व एक प्राचीन संस्कृती कायमस्वरूपी संपणार.

 

इराणने या धमकीला काडीचीही किंमत दिली नाही व हल्ला करण्याची ट्रंपची हिंमत झाली नाही.

 

आता ट्रंपने नवीन धमकी दिलीये. लवकरात लवकर करार करा, तुमच्यासाठी वेळ निघून जात आहे. अन्यथा तुम्ही शिल्लक राहणार नाही.

 

इराण अर्थातच ट्रंपकडे दुर्लक्ष करतोय. 

 

चीनला जाऊन जोडे खाऊन रिकामा वाडगा घेऊन परतल्यानंतरही ट्रंपचा माज व मूर्खपणा थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही.

या मूर्ख माणसाचे जगभर हसू होत आहे. 

 

जाता जाता - अमेरिकेचे नागरिकत्व घेतलेले भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आपल्या मूर्ख अध्यक्षावर टीका करण्याऐवजी तेथे बसून सातत्याने मोदींवर असभ्य टीका करीत आहेत. साहजिकच आहे. ट्रंपवर टीका केली तर ट्रंप त्यांना अमेरिकेतून पार्श्वभागावर लत्ताप्रहार करून हाकलून देईल. पण अजिबात टीका सहन न होणारे मोदी (हा यांनीच पसरविलेला अपप्रचार) यांना भारतात परत घेतीलच. 

 

 


In reply to by श्रीगुरुजी

ट्रंम्प ह्यांचे गर्वहरण होणे गरजेचे आहे. श्रीइच्छेने ते होईल.

इराण युद्धापेक्षा सध्या केंटकी प्रदेशांतील ०४ तालुक्यांत रिपब्लिकन प्राथमिक निवडणूक आहे. ह्यांत सध्याचे सभासद थॉमस मासी ह्यांना इस्रायली लॉबी ने उभ्या केलेल्या माणसाने आव्हान दिले आहे. मासी ह्यांनी ट्रम्प ह्यांच्या विविध धोकादायक कायद्यानं विरोध केला आणि लोकांच्या पुढे अत्यंत प्रभावी पणे त्याचा विरोध केला. त्याशिवाय एप्सटिन प्रकरण मासी आणि आपले रो खन्ना  ह्या दोघांनी जबरदस्तीने उघड करायला लावले.

मासी ह्यांनां मी खूप आधीपासून फॉलो करीत आले आहे. हि व्यक्ती अत्यंत principled आहे. पण ट्रम्प ह्यांची हांजी हांजी न केल्याने आणि इस्राएल ला विरोध केल्याने आता अमेरिकेच्या इतिहासांतील सर्वाधिक महाग अशी हि प्राथमिक निवडणूक आहे. इस्राएल लॉबी ने ३० दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत. हर प्रकारचे शेळके आरोप मासी ह्यांच्यावर केले आहेत. आता हार्ट सेलर कायदा झुगारून ट्रम्प ह्यांनी आपले रक्षा मंत्री हेगशेठ ह्यांना प्रचाराला पाठविले आहे.

त्यामुळे मासी हि निवडणूक जिंकले (आणि जिंकण्याची पूर्ण शक्यता आहे) तर ट्रम्प ह्यांचा प्रचंड अपमान तर होणार आहेच पण त्याशिवाय इतर काँग्रेस मंडळी सुद्धा ट्रम्प च्या दबावाला बळी पडणार नाहीत. इस्राएल आणि यहुदी लॉबी साठी सुद्धा हि एक प्रचंड मोठी हार ठरणार आहे.

--

इराण युद्ध

इराण इथे underdog असल्याने आणि ट्रम्प ह्यांचा तिटकारा असल्याने इराण विषयी काहींना सहानभूती असणे शक्य आहे. पण, इराण इथे जिंकण्याची शक्यता शून्य आहे. ट्रम्प हे आत्ममुग्ध असले तरी, अमेरिकन कायदे आणि व्यवस्था काही प्रमाणात तरी चालते. त्यामुळे इराण मध्ये अत्याधिक हिंसा अमेरिकन नेतृत्वाला नको आहे. इराण ला बेचिराख करून इराणी मुल्ला मंडळींचे नुकसान होत नाही. उलट हि मंडळी बलिदान द्यायला उत्सुक असतात. सामान्य लोकांचे प्रचंड नुकसान होणार आहे.

ट्रम्प ह्यांना ह्या युद्धांतून माघार घ्यायचि आहे पण किमान होर्मूझ उघडल्याशिवाय ते शक्य नाही. होर्मूझ उघडण्यासाठी दोन पर्याय आहेत. होर्मूझ उघडण्याचा सराव अनेकदा अमेरिकन आणि मित्र नौदलाने केला आहे. पण, युद्धाच्या सुरवातीला ह्यांना ट्रम्प ह्यांनी विश्वासात घेतले नाही, उलट शिवीगाळ केली. जपान सोडून आणखीन कुणीच इथे भाग घेण्यास तयार नाही. युरोप मध्ये इस्राएल ला विशेष विरोध आहे. त्याचे पडसाद सुद्धा इथे दिसून येतात.

दुसरा पर्याय हा इराण बेचिराख करणे आहे आहे. ट्रम्प कदाचित हा पर्याय वापरू शकतात पण तो कितपत शक्य आहे हे ठाऊक नाही. पण इराण चे प्रचंड नुकसान नक्की आहे.

तिसरा पर्याय आहे इस्राएल. इस्राएल चे वैशिष्ट्य म्हणजे ह्यांना युद्धाचे नियम वगैरे लागू होत नाही. सर्वप्रथम लहान मुले, वृद्ध, कुटुंबे, इस्पितळे ह्यांना टार्गेट करायचे, नंतर शेती, पाणी ह्यांना टार्गेट करून प्रचंड प्रमाणात जनसंहार घडवून आणायचा हे ह्यांचे नेहमीचे तंत्र आहे. ट्रम्प कदाचित अमेरिकेला बॅकसीट देऊन इस्राएल ला ह्या संहारात भाग घेऊ लावू शकतात. इस्राएल ह्यासाठी आधीपासून उत्सुक आहे.

 

साहजिकच आहे. ट्रंपवर टीका केली तर ट्रंप त्यांना अमेरिकेतून पार्श्वभागावर लत्ताप्रहार करून हाकलून देईल

 

अमेरिकन नागरिकांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष टीका केली म्हणून हाकलून लावतील ? कुठे ? 


सतलज, झेलम, सिंधू इ. पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या ६ नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यासाठी १९६० मध्ये एक करार केला होता जो पाकिस्तानसाठी प्रचंड लाभाचा होता. पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी हा करार कचराकुंडीत टाकून दिला व भारतातून वाहणारे पाणी अडविण्यासाठी अनेक प्रकल्पांना चालना दिली. अजून काही वर्षांनी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाण्यावर भारताचे पूर्ण नियंत्रण असेल.

 

पाकिस्तानने याविरोधात आरडाओरडा करून हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्या न्यायालयाच्या लवादाने पाकिस्तानच्या बाजूने निर्णय दिला. 

 

भारत सरकारने हा निर्णय सुद्धा कचराकुंडीत टाकला असून कराराचे पुनरुज्जीवन करण्यासाठी व प्रकल्प थांबविण्यासाठी नकार दिला आहे.

 

रशियाकडून तेल घेण्याचा निर्णय असो वा  पाणीवाटप करार वा दहशतवादी हल्ला, मोदींनी अत्यंत ठाम भूमिका घेतली आहे. कणखर नेतृत्व असते ते असे. अन्यथा त्यापूर्वी कडक इशारा, कठोर निंदा, कडक निषेध यापलिकडे गाडी जात नव्हती.


In reply to by श्रीगुरुजी

सतलज, झेलम, सिंधू इ. पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या ६ नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यासाठी १९६० मध्ये एक करार केला होता जो पाकिस्तानसाठी प्रचंड लाभाचा होता.

तत्कालीन पंतप्रधान मोदींचा तीव्र निषेध!

 

पाकिस्तानने याविरोधात आरडाओरडा करून हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. त्या न्यायालयाच्या लवादाने पाकिस्तानच्या बाजूने निर्णय दिला. 

विद्यमान पंतप्रधान मोदींचा तीव्र निषेध! 

 

 

 


In reply to by श्रीगुरुजी

हे दुसऱ्यांदा झाले आहे ...  भारत त्या निकालाला तर भिक घालतच नाही, वरुन त्या न्यायालयाला "तुम्ही कोण?" असे विचारुन "तुम्ही कायपण म्हना आमी तुमाला वळखतच नाय" असे बोलुन कोलवले आहे ... 


त्या न्यायालयाच्या लवादाने पाकिस्तानच्या बाजूने निर्णय दिला. 

 

या लवादाला हक्कच (JURISDICTION)  नाही. त्यामुळे आम्ही त्याला कचऱ्याचीही किंमत देत नाही असे भारताने स्पष्ट केले आहे.  


लोकसत्ताच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात काळी जादू करून पैशाचा पाऊस पाडू असे आमिष देऊन आर्थिक फसवणूक आणि बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा दिली ही बातमी देताना ए.आय ने 'नजरचुकीने' तो भोंदूबाबा म्हणून राहुल गांधींची प्रतिमा वापरली. त्यानंतर झालेल्या प्रकाराबद्दल लोकसत्ताने तो फोटो ऑनलाईन आवृत्तीमधून मागे घेतला आणि दिलगिरी व्यक्त केली आहे.

काहीही म्हणा पण अग्रलेखवापसीची सर या प्रतिमावापसीला नाही. अग्रलेखवापसी ती अग्रलेखवापसी. तसे करणारे गिकुकाका जगातील एकमेव संपादक असतील. अग्रलेख मागे घ्यायचे, झारखंडमध्ये अजित जोगींना कॉग्रेसने नेता म्हणून पाठवले तिथेच चुकले हे भारतीय राजकारणाचा थोडाफार अभ्यास असलेल्यालाही चुकीचे विधान आहे हे कळेल अशी विधाने अग्रलेखात छापून आणायची, लोकसभा निवडणुक जवळ आली असताना भारतीय रूपया पडतो हे समजा निरीक्षण असेल तर लोकसभा निवडणुक जवळ आली आहे म्हणून पडतो (कोरीलेशन = कॉजेशन) असली मूर्खासारखी विधाने करत असतानाही आपण फार मोठे विद्वान आहोत असा आव आणायचा, मोनेटरी पॉलिसी कमिटीची नेमणूक म्हणजे रिझर्व्ह बॅंकेचे पंख छाटायचा प्रयत्न असले पूर्णपणे अज्ञानमूलक विधान करायचे ॲन्ड्र्यू लिलिको या परदेशी लेखकाच्या ब्लॉगवरील लेख भाषांतरीत करून मूळ लेखकाच्या नावाचा उल्लेखही न करता सरळ आपला म्हणून खपवायचा- म्हणजे सरळ सरळ प्लेजिॲरीझम करायचे असले प्रकारही या गिकुकाकांनी पूर्वी केले आहेत. पण कसे असते मोदींवर टीका करत आहे ना मग त्याचे हजार गुन्हे क्षम्य ठरतात असे डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामींना वाटत असते बहुदा म्हणून तेच गिकुकाका त्या जमातीच्या गळ्यातील ताईत आहेत. याच गिकुकाकांचे वरीष्ठ कुकेकाकांना कॉग्रेसने राज्यसभेत पाठवले तसे आपल्यालाही पाठवतील अशी अपेक्षा गिकुकाकांना असावी म्हणून ते असले  प्रकार करत असतील. समजा कुकेकाकांप्रमाणे गिकुकाका पण राज्यसभेत गेले तरीही त्यांच्या नावाने पंचारत्या ओवाळणाऱ्या डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामींच्या हातात धुपाटणे तरी येईल की नाही शंकाच आहे.   


In reply to by चंद्रसूर्यकुमार

 

ही बातमी मी सकाळी वाचली होती; पण फोनवरून फोटो लिंक टाकता येत नव्हती. तुम्ही बातमी टाकली ते चांगले झाले.

BTW, तो जो मागे घेतलेला फोटो आहे (किंवा होता) तो कुठे पाहायला मिळेल का ? मज्जा येईल पाहायला. अर्थात या सगळ्या मजकुरावरून पुन्हा जनरेट करता येईल पण वरजिनल ते वरजिनल; डुपलीकेटला वरजिनलची सर थोडीच येणार


बाकी त्या असंतांच्या संतांची सर या किरकोळ उसंतीला येणार नाही. तिथेही वरजिनल ते वरजिनल; डुपलीकेटला वरजिनलची सर थोडीच येणार?

 

 


In reply to by कांदा लिंबू

BTW, तो जो मागे घेतलेला फोटो आहे (किंवा होता) तो कुठे पाहायला मिळेल का ?

तो फोटो माझ्याकडे आहे. मी इमेजबीबी वर अपलोड केलाही होता आणि सुरवातीला इथे दिला होता. पण जर तो फोटो डिलीट केला गेला असेल तर पब्लिक फोरमवर देणे योग्य नाही, त्यातून विनाकारण मिपाला अडचण निर्माण होऊ शकेल हे ध्यानात आल्याने तो फोटो इथून हटविला. इमेजबीबी वर अपलोड केला होता त्याची लिंक आता माझ्याकडे नाही. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

पण मी काय म्हणतो, हागरंलेख लिहिणारे गिकु, ते परत घेणारे गिकु. गिकुंचं गिकु पाहून घेतील; त्याने मिपाकरांच्या पोटात का दुखावे? एटा चॉलबे ना! 
 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

१२ मार्च १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांबद्दल याकूब मेमनला २०१५ मध्ये फाशी दिल्यानंतर या गिकुकाकांच्या प्रतिभेला इतके पंख फुटले की काही विचारू नका. याकूब मेमनचा उल्लेख वारंवार सनदी लेखापाल म्हणून करत होते. दुसरे म्हणजे टायगर मेमन, याकूब मेमन वगैरे आपल्या पोरट्यांनी बॉम्बस्फोट करून २५०-३०० निष्पाप लोकांना ठार मारले याचा त्यांचे वडील अब्दुल रझाक मेमन यांनी खडसावून जबाब विचारला होता असले ठोकून दिले होते. वास्तविकपणे त्या दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट झाले दुपारी एक-सव्वा ते साडेतीन-चार या वेळात. टायगर मेमन त्याच दिवशी पहाटेच्या विमानाने दुबईला पळून गेला होता आणि बॉम्बस्फोट झाले तेव्हा तो मुंबईत हजर नव्हता हे त्यावेळेसच स्पष्ट झाले होते. मग त्याच्या वडीलांनी त्याला खडसावून जाब नक्की कुठे आणि कधी विचारला होता हे ते गिकुकाकाच जाणोत. आणि जर आपल्या पोरट्यांनी असले घृणास्पद कृत्य केले याचे त्याच्या वडिलांना वाईट वाटत असेल तर मग ते नुसते खडसावून जाब विचारूनच का थांबले- आपले दिवटे नक्की कुठे आहेत हे पोलिसांना का कळविले नाही हा साधा प्रश्न गिकुकाकांच्या तल्लख बुद्धीमत्तेला पडला नाही. त्यावेळेस गिकुकाकांनी जी अग्रलेखाची जिलबी पाडली होती त्यानंतर कोणीतरी एक उपहासात्मक टिप्पणी केली होती- हे सगळे वाचून माझे डोळेच पाणावले. असे वाटले श्यामची आई प्रमाणे मी टायगरचे अब्बा हे पुस्तक वाचत आहे 😃

 

बादवे, सप्टेंबर (की ऑक्टोबर) २०१८ मध्ये गिकुकाकांनी 'तर्काच्या खुंटीला टांगलेला रूपया' अशी अग्रलेखाची आणखी एक जिलबी पाडली होती. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुक जवळ आली की रूपया पडतो हे निरीक्षण असेल तर ते बिनदिक्कतपणे लोकसभा निवडणुक जवळ आल्यामुळे रूपया पडतो असे ठोकून दिले होते. म्हणजे कोरीलेशनला कॉजेशन करून टाकले. त्याचा तर्क काय दिला होता तर जशी लोकसभा निवडणुक जवळ येते त्याप्रमाणे परदेशातून डॉलर भारतात प्रचारासाठी येतात आणि रूपया पडलेला असला की जास्त रूपये प्रचारासाठी उपलब्ध होतात!! त्यावर १९९८ पासूनच्या लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर रूपया कसा पडला याची आकडेवारी दिली होती. फक्त २००४ च्या निवडणुकांच्या आधी रूपया पडायच्या ऐवजी वधारला त्याचे कारण दिले होते की तेव्हा वाजपेयींना आपण जिंकणारच ही खात्री होती म्हणून त्यांना रूपया पाडायची गरज लागली नाही!! हे असले तारे तोडणारे लोक मोठे अर्थतज्ञ म्हणून गौरवले जातात. त्यातील एकेक मुद्द्याचा समाचार घेणारी प्रतिक्रिया (खरं तर तीन वेगळ्या प्रतिक्रियांमध्ये विभागून- कारण प्रत्येक प्रतिक्रियेला किती शब्द वापरता येतील याची मर्यादा होती) मी लिहिली होती. १९९८ च्या लोकसभा निवडणुका झाल्या फेब्रुवारी-मार्च १९९८ मध्ये. त्याच्या काही महिने आधी दक्षिण पूर्व आशियात- थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये आर्थिक संकट आले होते. त्यानंतर भारतातूनही एफ.आय.आय नी डॉलर बाहेर नेले होते कारण अस्थिरतेच्या काळात एफ.आय.आय इतर कुठे डॉलर गुंतविण्यापेक्षा अमेरिकेत गुंतविणे पसंत करतात. गिकुकाकांच्या त्या अग्रलेखाच्या जिलबीत त्या आर्थिक संकटाचा उल्लेखही नव्हता. त्यानंतर १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान आपल्या पोखरण अणुचाचण्या आणि त्यानंतर आलेले आर्थिक निर्बंध, कारगील युध्द वगैरे महत्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. त्याचा रूपयाशी दुरान्वयानेही संबंध असेल असे त्यांना वाटले नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी काही महिने अमेरिकेत आर्थिक संकट आले होते तेव्हाही असेच डॉलर भारतातून बाहेर गेले होते त्यामुळे नोव्हेंबर २००७ मध्ये ३८.१६ वर असलेला डॉलर मार्च २००९ मध्ये ५२ पर्यंत महागला. तसे काही झाले होते याची दखलही गिकुकाकांनी त्यांच्या अग्रलेखरूपी जिलबीत घेतली नव्हती. तसेच २००१-०२ मध्ये पाकिस्तानशी असलेला तणाव तेवढ्यापुरता निवळल्यानंतर वाजपेयी सरकारने नक्कीच उत्तम आर्थिक निती अवलंबल्या होत्या. त्यातून भारतात गुंतवणुक केल्यास परतावा चांगला मिळेल ही शक्यता परदेशी वित्तसंस्थांना वाटल्यानंतर त्यांनी भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक करायला सुरवात केली. त्यातून भरपूर डॉलर देशात आले म्हणून रूपया वधारला. पण गिकुकाका त्याचा संबंध २००४ च्या निवडणुकांमध्ये आपण जिंकणारच ही खात्री वाजपेयींना होती म्हणून त्यांनी रूपया पडू दिला नाही या अजब तर्कटाशी लावतात. असते समज एकेकाची. 

 

बरं माझ्या त्या प्रतिक्रियेचे काय झाले? ती गिकुकाकांनी प्रसिध्द केली का? अर्थातच नाही. असते समज एकेकाची एवढा एक शब्दप्रयोग समजा आक्षेपार्ह वाटला तरी बाकी सगळी प्रतिक्रिया पूर्णपणे आर्थिक विश्लेषणावर आधारीत होती. तरीही त्यांनी ती प्रतिक्रिया प्रसिध्द करायचे सौजन्य दाखवले नव्हते. आणि असेच लोक सध्याच्या काळात परमतसहिष्णुता संपली आहे म्हणून गळे काढतात. आहे की नाही मज्जा?

 

अर्थात गिकुकाकांच्या डोक्यात तितका भुसा भरलेला नसावा. २०१६ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांच्या आधी गिकुकाका महिना-दीड महिना अमेरिकेत होते आणि प्रिन्सटनमधील अविनाश दिक्षित यांच्यासारख्या ऋषितुल्य प्राध्यापकाबरोबर वावरले. गिकुकाकांच्या डोक्यात पूर्ण भुसा भरलेला असता तर प्रा.अविनाश दिक्षितांनी त्यांना बाजूला उभेही केले असते असे वाटत नाही. 

 

पण मग डोक्यात मसाला भरलेला असला तरी त्याचा वापर ते असा का करतात? की कोणाच्या तरी सांगण्यावरून हे आपली बुध्दी गहाण ठेऊन असले प्रकार करत असतात? बरं मनमोहन सिंगांनी तरी दुसरे काय केले होते? तेच मनमोहनसिंग आणि हे गिकुकाका आपल्या डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामींना आदर्श वाटतात यात काही नवल आहे का? इथेही आहेत असे लोक.

 

असो.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

बाडिस.

 

एक वेगळेपण आहे. अधर्मयुद्ध, एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे ही गिकुलिखित पुस्तके नक्कीच माहितीपूर्ण व वाचनीय आहेत. त्या क्षेत्रात ते अभ्यासू आहेत. पण नंतर भरकटलेले दिसतात. अग्रलेखातून वारंवार असत्य आरोप करीत असतात (उदाहरणार्थ मोदींनी १५ लाखांचे आश्वासन दिले होते ते पूर्ण केले नाही, भाजप स्थानिक पक्षांचे बोट धरून राज्यात घुसतो व व नंतर तो स्थानिक पक्ष गिळंकृत करतो, राज्यात शून्य स्थान असलेल्या भाजपला शिवसेनेने मोठे केले इ.). कॉंग्रेस किंवा विरोधी पक्षांनी असत्य आरोप करणे समजू शकते, परंतु पत्रकार असलेल्यांना वस्तुस्थिती माहीत असते पण तरीही असत्य आरोपांची री ओढणे शोभत नाही. 

 

 

 

 


गिकुंचं गिकु पाहून घेतील.

लोकांना शहाणपण शिकवणाऱ्यानी स्वतः च्या चुकांकडे लक्ष द्यायला हवे कि नाही?

सर्वोच्च न्यायालयाला कायद्याचे शहाणपण शिकवणाऱ्यानी अशा क्षुल्लक चुका करून कसे चालेल?  

आपण लिपस्टिक लावून खिडकीत बसलं तर खालून जाणारा सौम्य गोम्या पण शुकशुक करणारच.    


हिंदू जोडप्यास क्षुल्लक कारणावरून मुस्लिमांकडून मारहाण; FIR दाखल 

 

केंद्रात भाजप, राज्यात भाजप, पालिकेत भाजप असा ट्रिपल इंजिनचा सपोर्ट मुस्लिमांना असताना हिंदूंचे हेच हाल होणार नाही का?

 

https://x.com/subhi_karma/status/2056557553438662895 

 

संघ भाजप मोदी फडणवीस यांची गजवा-ए-हिंद-२०४७ कडे वेगाने वाटचाल सुरू आहे.‌ हिंदू जेवढ्या लवकर शरणागती पत्करतील तेवढे चांगले.


सरन्यायाधीशांनी कुठे नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या पण उगीच आंदोलने, ॲक्टिव्हिजम अशा प्रकारांमध्ये पुढे असलेल्या तरूणांना झुरळाची उपमा दिल्यानंतर महाराष्ट्रातील अभिजीत दिपके नावाच्या तरूणाने झुजप (झुरळ जनता पक्ष- कॉकरोच जनता पार्टी)ची स्थापना केली. अर्थात हा काही राजकीय पक्ष नव्हे तर स्वत:ला धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी वगैरे म्हणविणाऱ्या तरूणांचा आंतरजालावरील फोरम आहे. त्याला तीनचार दिवसात ट्विटरवर एक कोटी फॉलोअर मिळाले. खुद्द भाजपचे ८८ लाख फॉलोअर असताना तीनचार दिवसात त्यापेक्षा जास्त फॉलोअर झुजपच्या ट्विटरवरील अकाऊंटला मिळाले. काही वेळापूर्वी अभिजीत दिपकेने म्हटले की झुजपचा ट्विटर अकाऊंट प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसे झाले आहे याची खात्री मी ट्विटरवर करून घेतली.  ट्विटरवर पुढील येत आहे-

Account Withheld

@CJP_2029

has been withheld in IN in response to a legal demand.

 

म्हणजे कायदेशीर मागणीवरून हा अकाऊंट प्रतिबंधित करण्यात आला आहे असे दिसते. ही कायदेशीर मागणी कोणी केली याची कल्पना नाही. पण काहीही असले तरी आता डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामींना अभिजीत दिपके हा नवा आयकॉन मिळाला आहे. कन्हैय्या कुमार वगैरे टोणग्यांप्रमाणे त्यालाही डोक्यावर घेतले गेले तर आश्चर्य वाटू नये. आणि तो अकाऊंट प्रतिबंधित करा असे कोणीही (अगदी न्यायालयाने जरी) ट्विटरला कळविले असले तरी नेहमीप्रमाणे डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामी त्याचे खापर मोदींवर फोडणार- की बघा मोदींना टीका सहन होत नाही वगैरे वगैरे. हा अकाऊंट प्रतिबंधित करण्यामागे मोदी सरकारचा हात आहे की नाही कल्पना नाही. कदाचित हा नवा खुळखुळा डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामींच्या हातात देऊन त्यांना त्या खुळखुळ्यात गुंतवून ठेऊन मोदी पडद्याआड वेगळेच काहीतरी साध्य करायच्या मागे असले तरी आश्चर्य वाटू नये.

 

बघू काय होते ते.
 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

सरन्यायाधीशांनी कुठे नोकरी-व्यवसाय न करणाऱ्या पण उगीच आंदोलने, ॲक्टिव्हिजम अशा प्रकारांमध्ये पुढे असलेल्या तरूणांना झुरळाची उपमा दिल्यानंतर

 

सत्यपरिस्थिती कटू शब्दांत व्यक्त केल्या बद्दल न्यायाधीशांचे आभार !

 


पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड हमजा बुरहानला पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी ७२ अप्सरांकडे रवाना केले. अज्ञात व्यक्ती भलत्याच क्युट आहेत असे नेहमी वाटते ते उगीच नाही.

https://timesofindia.indiatimes.com/india/pulwama-mastermind-hamza-burh…


२१ तारखेला दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील फालटा या विधानसभा मतदारसंघात फेरमतदान घेण्यात आले. त्याची मतमोजणी आज होत आहे. मतमोजणीच्या २१ पैकी १८ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि भाजप उमेदवार देबांग्शू पांडा ९१,८८९ मतांनी आघाडीवर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंभूनाथ कुर्मी आहेत. तृणमूल कॉग्रेसचे उमेदवार आणि ममतांचा भाचा 'भाईपो' अभिषेक बॅनर्जीचा चमचा जहांगीर खान चौथ्या क्रमांकावर आहे. 

 

फालटामधील फेरमतदानाविषयी मिपावर २ मे रोजी पुढील लिहिले होते: https://www.misalpav.com/comment/1204888#comment-1204888 

 

"फालटा हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. जून १७५६ मध्ये बंगालचा नवाब सिराज उद्दौलाने कलकत्त्यावर हल्ला करून इंग्रजांचे फोर्ट विलियम या किल्ल्यावर विजय मिळवला होता. त्यावेळेस त्या किल्ल्यात असलेले इंग्रज पळून फालटा (त्यावेळेस फुलटा) या ठिकाणी गेले होते. तिथून त्यांनी मद्रासच्या इंग्रज गव्हर्नरला मदत करायची मागणी केली. त्यावेळेस त्या मद्रासच्या गव्हर्नरने रॉबर्ट क्लाइव्हला बंगालला पाठविले. तो त्या इंग्रजांना फालटा या ठिकाणी जाऊन भेटला. फालटामध्येच नंतर इंग्रज गव्हर्नर जनरल झालेला वॉरन हेस्टिंग्ज पण होता. ते सगळे इंग्रज तिथे ४-५ महिने होते. त्या काळात वॉरन हेस्टिंग्जचे तिथे लग्नही झाले होते. म्हणजे फालटामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉरन हेस्टिंग्ज हे दोन हरामखोर दरोडेखोर लुटेरे क्रूरकर्मे होते. नंतर रॉबर्ट क्लाइव्ह सगळ्यांना घेऊन पहिल्यांदा कलकत्त्यावर चाल करून गेला आणि फोर्ट विलियम जिंकले. त्यातूनच पुढे प्लासीची लढाई झाली.

 

अशा ऐतिहासिक ठिकाणी ममता आणि तृणमूल ही दुर्गंधी बंगालमधून कायमची गाडली जावी ही सदिच्छा."

 

फालटामध्ये ६९% हिंदू आणि ३१% मुस्लिम मतदार आहेत. इतकी वर्षे तृणमूल या मुस्लिम मतदारांच्या आणि दहशतीच्या जोरावर हिंदू मतदारांवर दमदाटी करून मोठ्या मतांनी निवडून येत असे. आता तिथे तृणमूलच्या उमेदवाराला त्यांची इतक्या वर्षाची हक्काची व्होटबॅंक पण मते देताना दिसत नाहीये- तृणमूलला पूर्वी मिळणारी मते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे जाताना दिसत आहेत. तसे होत असेल तर कदाचित २०११ पासून कम्युनिस्ट पक्षातून तृणमूलमध्ये गेलेले केडर आणि बरीच मते स्वगृही परतून कम्युनिस्टांना बंगालमध्ये नवसंजीवनी मिळू शकेल ही शक्यता आहे. तसे असेल तर तृणमूलला वाईट दिवस येतील ही पण शक्यता आहे. मात्र त्या भानगडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ही दुसरी दुर्गंधी पुनरज्जीवीत होणार का? कदाचित भविष्यात भाजप विरूध्द कम्युनिस्ट अशी लढत होणार का? बघू काय होते ते.

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

फालटा विधानसभा मतदारसंघ 'भाईपो' अभिषेक बॅनर्जी लोकसभेवर निवडून गेला त्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात येतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाईपो डायमंड हार्बरमधून तब्बल ७ लाख मताधिक्याने जिंकला होता. भाईपोचा कलकत्त्यात शांती निकेतन म्हणून एक आलिशान बंगला आहे. ४ मे नंतर काही दिवस सामान्य लोक त्या बंगल्यासमोर जाऊन 'चोर चोर...' अशा घोषणा देत होते. आपला राजा आहे असे समजलेला आणि त्यामुळे त्याला वचकून असलेला ओंडका प्रत्यक्षात जागचा हालत पण नाही हे लक्षात आल्यावर बेडूक त्याच ओंडक्यावर उड्या मारू लागतात आणि त्याची टर उडवायला लागतात अशी पंचतंत्रात की अन्य कुठे गोष्ट आहे म्हणे. त्या ओंडक्याप्रमाणे या तृणमूलच्या लोकांची अवस्था झाली आहे. इतकी वर्षे लोकांना आपल्या दहशतीखाली ठेवले पण ज्या सत्तेच्या जोरावर आणि माजावर ती दहशत ठेवली होती ती नाहिशी झाल्यावर ज्या सामान्य लोकांना दहशतीखाली ठेवले होते तेच आता चवताळून उठले आहेत. मागे महुआ मोईत्रा या नालायक बाईला पण विमानात 'चोर चोर..' या घोषणांना सामोरे जावे लागले होते. इतकेच काय तर दस्तुरखुद्द ममता बॅनर्जी कलकत्ता उच्च न्यायालयात गेलेल्या असतानाही तोच प्रकार घडला.


फालटा मतदारसंघात २९ एप्रिल या निवडणुकीच्या दिवशी अनेक मतकेंद्रावर मतयंत्रावर भाजपच्या उमेदवाराच्या नावावर चिकटपट्टी लावून ठेवल्याचे मतदारांना दिसले जेणेकरून मतदारांना भाजपच्या उमेदवाराला मत देता येऊ नये. अश्या अनेक तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष तपासणी करून पाहिले व तेथील निवडणूक रद्द करून काल घेण्यात आली.

 

भाजप मतयंत्रात लबाडी करून जिंकतो असा वारंवार आरोप करणाऱ्या एकाही विरोधी पक्षाने या पट्टी लावण्याच्या लबाडीविरोधात तोंड उघडले नाही. 

 

एका बाजूने कोणतेही पुरावे न देता वारंवार भाजपवर निराधार आरोप करायचे व दुसरीकडे लबाडीचा धडधडीत पुरावा असताना तोंडांत गुळणी घेऊन गप्प बसायचे हे विरोधी पक्षांचे व मिपावरील कांगावखोरांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.