सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
"जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" असे राज्यगीत असलेल्या आपल्या मराठी राज्याची स्थापना होऊन आज ६६ वर्षे पूर्ण झाली.
आज जागतिक कामगार दिन आहे. पांढरे, निळे, करडे - सर्व प्रकारचे श्रमिक, हे जग निर्माण करण्यासाठी जे कष्ट उपसतात त्यांच्या श्रमाचा हा गौरव दिन.
आज वैशाखी पौर्णिमा आहे. भगवान विष्णूंनी आजच्या दिवशी गौतम बुद्धांच्या रूपाने भूतलावर अवतार घेतला होता. केवळ हिंदूंनाच नाही, अवघ्या मानव जातीला शांतीचा संदेश त्यांनी दिला.
या महिन्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक पातळीवर अनेक घडामोडी होणार आहेत.
तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, पश्चिम बंगाल, असम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. सोमवार, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील. यावर मिपाकरांची मनमोकळी चर्चा / काथ्याकूट अपेक्षित आहे.
दर अडीच-तीन वर्षांनी येणारा, हिंदूंचा पवित्र महिना - अधिक ज्येष्ठ मास रविवार १७ मे रोजी सुरू होत आहे. नाना व्रतवैकल्ये करून पुण्य प्राप्त करण्याची ही पर्वणी आहे.
या अधिक मासात (म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात!) जावयांचा यथाशक्ती आदर-सत्कार करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. मिपाकर जावयांना त्यानिमित्त आगाऊ शुभेच्छा! ;-)
मिसळपाव
प्रतिक्रिया
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
यमुनेचे त्याला पाणी पाजा.
मुंबई पुणे महामार्गावर…
मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंक चे आज उद्घाटन आहे.
हा मार्ग पूर्णत: लहान वाहने आणि बसेस याम्च्या साठी ठेवावा.
लोणावळा घाटात वहातूक गुंता होण्याचे मुख्य कारण आहे ते अवजड ट्रक.
हे ट्रक संथ गतीने चालतात पण ते इतरांची वाट देखील अडवतात
आज घाटात जबरदस्त ट्रॅफिक जाम…
आज घाटात जबरदस्त ट्रॅफिक जाम आहे. तीन दिवस सलग सुट्या आल्यात.
आज उद्घाटन करण्यापेक्षा काल करायला हवे होते.
In reply to आज घाटात जबरदस्त ट्रॅफिक जाम… by शाम भागवत
चुकीचा दिवस.
उलट एकदम बरोबर दिवस
In reply to आज उद्घाटन करण्यापेक्षा काल करायला हवे होते. by कंजूस
मिसिंग लिंक प्रोजेकटसाठी आणखी काही हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याची बातमी गेल्या दोन दिवसांत वाचली होती. ती आता दिसत नाही.
प्रचंड हाल झाले नाहीत तर जनतेला या दुसऱ्या प्रकल्पाचे महत्त्व कसे पटेल?
तथाकथित इन्फ्रामॅनला व कंत्राटदारांची भूक...
बातमी लोकसत्ताची आहे, खरी…
In reply to आज घाटात जबरदस्त ट्रॅफिक जाम… by शाम भागवत
बातमी लोकसत्ताची आहे, खरी आहे की खोटी माहित नाही. कुणा मिपाकरांचा अनुभव आहे का?
सलग सुट्ट्या, मिसिंग लिंकच्या लोकार्पणामुळे मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा, उकाड्याने प्रवासी त्रस्त
बातमी खरी असावी. काल गुगल…
In reply to बातमी लोकसत्ताची आहे, खरी… by कांदा लिंबू
बातमी खरी असावी. काल गुगल मॅप घाटात लाल रेष दाखवत होती. पण अशा सुट्या आल्या की दोन तासाचा टॅफीक जॅम हा आता नॉर्मल म्हणायला पाहीजे.
पण त्याचा उपयोग फडणवीसांविरूध्द करता येत असेल तर ती संधी कोण सोडेल?😀 त्यामुळे त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. शेवटी ते राजकारण आहे.
प्रवासी मजेत आले गेले असते ना या मोठ्या सुट्टीत
किंवा डिजिटल पडदा ओढायचा होता आणि एकदा फावल्या वेळात ड्राइविंगची हौस भागवायची होती. डिजिटल युग आलंय ना मग करा की अमलबजावणी सगळीकडे.
........
मागच्या आठवड्यात कर्नाटकात धारवाडकडे होतो. रस्त्यांवर, गावांत एकसुद्धा राजकीय फलक ( बॅनर) दिसला नाही . पण बेळगाव आल्यावर फलकच फलक वाढदिवसाच्या शुभेच्छा .
मतदान पेट्या ठेवलेली जागा
दहा वेळा उघडली गेली आहे......बातमी.
व्यावसायिक इंधन दरवाढ
पश्चिम आशियातील युद्ध सुरू झाल्यापासून क्रूड ऑइल च्या किमती प्रचंड वाढल्या होत्या. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकांचे मतदान पार पडले. आता अनेक प्रकारचे व्यवसायिक इंधन - आंतरराष्ट्रीय वाहतूक विमान इंधन, व्यावसायिक डिझेल, व्यावसायिक १९ किलो व ५ किलो एलपीजी, यांच्या दरात ४०% वाढ करण्यात आली आहे.
केवळ किरकोळ पेट्रोल डिझेल व घरगुती १४ किो एलपीजी यांचेच भाव वाढविलेले नाहीत. पश्चिम आशियातील युद्ध लवकर संपले नाही तर येत्या काळामध्ये तेही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणुकांपर्यंत इंधन दरवाढ रोखून धरणे हे प्रकार सगळीच सरकारे करतात त्यात केवळ मोदींना दोष देऊन उपयोग नाही. खरं तर कुणालाही दोष देऊन उपयोग नाही. क्रूड ऑइल च्या किमती वाढल्या तर इंधनाच्या किमती वाढणे हे नैसर्गिकच आहे. त्यांना कृत्रिम रित्या रोखून धरणे हेच अनैसर्गिक म्हणावं लागेल.
नि:शब्द 😢😥😡
नि:शब्द
😢😥😡
तो माणूस लोकांची हातात आधी…
In reply to नि:शब्द 😢😥😡 by श्रीगुरुजी
तो माणूस लोकांची हातात आधी सापडला, मग त्याला
पोलिसांकडे सोपवण्यात आले. आता म्हणत आहेत आमच्या ताब्यात द्या! माग आधी लोकांच्याच ताब्यात होता ना? त्याचे अजून वर्षभर तरी काही वाकडे होत नाही. मालेगाव केस मधील आरोपी अजूनही जेल मधे आहे, त्याला सरकारी वकील देण्यात आलाय, जिल्हा न्यायालय मग राज्य न्यायालय मग सर्वोच्च न्यायालय असे प्रकरण वर जाईल तो पर्यंत १० वर्षे निघून जातील, मधे कदाचित त्याला जामीनही मिळेल. भारतात जिवाला किंमत नाही त्यातही स्त्री असेल तर नी लहान मूल असेल तर आजिबातच किंमत नाही. :(
आता काय करायचं....
ममता दीदी सत्ता सोडणार नाहीत?
बंगालातील हत्याकांडांचे सत्र
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच, भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक, चंद्रनाथ रथ, यांची बुधवारी रात्री कोलकाताच्या उत्तर उपनगरात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून तणाव वाढला आहे.
https://m.economictimes.com/news/elections/assembly-elections/west-bengal/bjp-leader-suvendu-adhikaris-personal-assistant-shot-dead/articleshow/130866607.cms
निवडणुकांच्या निकालानंतर आतापर्यंत किमान चार राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत.
जागतिक कीर्तीचे, जगर चर्चिल…
जागतिक कीर्तीचे, जगर चर्चिल जाणारे ख्यातनाम विनोदमूर्ती श्री. रा. रा. संजयराव राऊत यांनी थेट डोनाल्डतात्यांना पत्र लिहिले आहे. बंगालमधील निवडणुकीत प्रचंड प्रमाणात लबाडी, धाकदपटशा, पक्षपातीपणा करून भाजपने निवडणूक जिंकल्याने लोकशाहीवर प्रचंड आघात झाल्याचे नमूद करून सर्व लोकशाहीप्रेमी जागतिक नेत्यांनी या अन्यायाविरुद्ध हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे.
लोकशाही वाचविण्याचे राऊतांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. भारतात २ दशकांपासून मतयंत्रात गडबड केली जात आहे हेसुद्धा त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
२ दशकांपासून म्हणजे अंदाजे २००६ पासून. २००६ ते २०१४ या काळात तर कॉंग्रेसचे सरकार होते.
ज्या डोनाल्डतात्यांना हे पत्र लिहिलंय त्यांनी तर २०२० च्या निवडणुकीत निर्णायक पराभवानंतरही अध्यक्षपद सोडण्यास नकार दिला होता व समर्धक जमवून दंगल करण्याचा प्रयत्न केला होता.
जर चुकुनमाकून तात्यांनी पत्र वाचले तर ते गडाबडा लोळत हसत राहतील. समजा वाचले किंवा नाही वाचले तरी हे पत्र ते वाया घालविणार नाहीत. उद्या सकाळी नेहमीच्या "सामना"ऐवजी हे पत्र "त्या" कामासाठी वापरतील.
_________________
हेच ते राऊतांचे ट्विट व पत्र.
I had written an open letter to President Trump,
as he has always spoken about democracy and fair elections, and wanted to bring the truth to his attention. As a responsible Indian, and Member of Parliament, it is my duty to shed light on the fact that this election was carried out in an absolute lopsided manner.
To begin with, the Opposition Parties that represent more than half of India’s vote share officially in 2024, have raised doubts over the fairness and neutrality of the Chief Election Commissioner and his motives. The Election Commission, under the CEC’s guidance has barred 9 million voters from voting overnight, without a fair appeal or any further justice. More so, even while Manipur burnt with violence, this election saw the deployment of central forces in millions, including tanks and encounter specialists, as a mark of force.
It is my duty, to ensure that everyone is aware, the world over (be it a president of an important democracy or a citizen of any country) that the elections haven’t been as free and fair as shown by sections of media to the world. The disenfranchised voters, and those who faced fear while casting their vote raise questions even today. EVMs have been doubted for 2 decades and rigging issues have been raised by India’s leader of opposition. I strongly believe that leaders of democracies around the world cannot be kept away from the fact that the institutions that once ensured our elections to be free and fair, are now being questioned.
जगर चर्चिल जाणारेजगभर…
In reply to जागतिक कीर्तीचे, जगर चर्चिल… by श्रीगुरुजी
जगभर चर्चिले जाणारे
राऊत ह्यांच्या लेखाने…
In reply to जागतिक कीर्तीचे, जगर चर्चिल… by श्रीगुरुजी
राऊत ह्यांच्या लेखाने वॉशिंग्टन हादरले, इतके हादरले कि तिथल्या परावर्तित जलाशय मधील पाणी गायब झाले आहे अशी बातमी आहे.
मिष्टीदोई....
उघडले डिजिटल पेटारे
कमळाबाईचे वारेन्यारे
झाली दिदीची विदाई
शुभेंदूला मिष्टीदोई
बेतुक्या म्हणे............
जशी दहा रू ची झालमुरी
तशी पराठे लस्सी भारी
आता भगवंताची बारी
बेतुक्या म्हणे..........
आमी भालो तुमी भालो
XXको गढ्ढे मे डालो
आता,बल्ले बल्ले, शावा शावा
नकळे गनिमी कावा
बेतुक्या म्हणे..........
अश्वमेधाचा वारू
गंगोत्री ते गंगासागरू
पादाक्रांत हिन्दमहासागरू
सकल जनांसी आधारू
बेतुक्या म्हणे............
शुभहिंदू अधिकारी यांना…
शुभहिंदू अधिकारी यांना भाजपने मुख्यमंत्री म्हणून निवडले हे चांगले झाले.
नाहीतर त्यांनी यावेळी तमिळनाडूमध्ये अण्णा मलाई यांचा व मागच्या मधल्या वेळी महाराष्ट्रात फडणवीस यांचा गेम केला होता.
माजपा चे राजकारण नक्की कसे…
माजपा चे राजकारण नक्की कसे चालते ? म्हणजे पडध्या मागे हात ठेवून सोशल मिडियाचा वापर करून काय केले जाते ? हे अनेक जणांना माहित नसते.
१] भाडोत्री पाळलेले असतात.यांचे एकच काम असते, दिवस रात्र प्रत्येक सोशल मिडियावर राजकीय कोलांट्या उड्या मारून प्रत्येक निवडणुकी आधी हा पक्ष कसा हिंदुत्ववादी आहे हे जनमानसावर बिंबवत राहायचे. [ नाहीतर भाडोत्रीपणाचे पैसे कसे मिळतील? ]
२] पक्षाच्या अधिकृत हॅडल वरून ज्या ज्या नेत्या विरुद्ध भूमिका घेतली असेल त्याच्या विरुद्ध रान पेटवायचे मग तो व्यक्ती पक्षात आला की कोलांटी उडी मारायची. त्याची कशी गरज आहे हे आता सगळीकडे सांगत सुटायचे. [ अगदी ताजे ताजे उदाहरण बंगालचे ]
३] निवडणूक झाली की जातीयवादी राजकारण सुरु करायचे आणि चुकीच्या निर्णया बद्धल सोयीस्कर मौन बाळगायचे.
सोशल मिडिया वर एक भाडोत्री आहे, जो पक्षात नाही आणि ढोंगी हिंदुत्ववादी संघात नाही, पण कोबीजी त्याच्यावर मेहरबान असल्याने त्याला चक्क पद दिले आहे.
त्याची कथा खाली देत आहे.
कथा :
BJP Says Brahmins & Muslims Didn't Let Them Win | Bengal Results | Dilip Mandal | Ajeet Bharti
विशेष गंमत : सुधांशु त्रिवेदी आणि गाय
जाता जाता : कथा वाचकाला युजीसी आंदोलनाच्या वेळी त्याच्या घरात नजर कैदेत ठेवले होते. [हेच ते अच्छे दिन! बरं का मंडळी ]
दिल्ली मध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आंदोलनाला परवानगी दिली जाते मात्र जेव्हा सामान्य वर्गातील हिंदूंनी युजीसी विरोधात पुन्हा शातंतापूर्ण आंदोलनाची तयारी केली असताना बहुतेक आंदोलन दिनाच्या आधीच्या दिवशी परवानगी नाकारली गेली .जर तुम्ही खरंच हिंदू म्हणून जगत असाल तर हिंदू म्हणून एकत्र रहा आणि सर्व प्रकारच्या जातीयवादी राजकारणाला विरोध करा.
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी: Jaan Se Guzarte Hain (Live at Dhurandhar The Revenge -Music Album Launch)
औरंगजेब
श्री.रा.रा.अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. एक गोष्ट कळत नाही. डापु गॅंग उर्फ जमात-ए-पुरोगामींना औरंगजेबाविषयी प्रेम असते, केजरीवालांविषयी तर प्रेम उतूच जात असते आणि मोदींविषयीचा द्वेषही तसाच उतू जात असतो. आता आली की पंचाईत. ज्याच्याविषयी प्रेम उतू जाते अशा व्यक्तीने ज्याच्याविषयी द्वेष उतू जातो अशा व्यक्तीची तुलना ज्याच्याविषयी प्रेम वाटते त्या व्यक्तिबरोबर केली. आता काय करायचे? औरंगजेब वाईट होता हे मान्य करायचे का? तसे मान्य केल्यास मग औरंगजेबाने आमच्या शंभूराजांना मनुस्मृतीतील आज्ञेप्रमाणे हाल हाल करून ठार मारले असला गुडघ्यातला नरेटीव्ह चालविला जात होता त्याचे काय? आणि औरंगजेब थोर पुण्यात्मा सुफी संत असेल आणि ती तुलना मान्य करायची तर मग मोदी पण पुण्यात्मा आहेत हे मान्य करायचे का?आणि तेही करायचे नसेल तर मग औरंगजेब आपल्याबरोबर ठेऊन केजरीवालांना आपल्या मनात दिलेले अढळपद काढून घ्यायचे काय?
जामच पेचात टाकले की केजरीवालांनी डापु गॅंगच्या उर्फ जमात-ए-पुरोगामीच्या लोकांना.
जशी पंजाबची विधानसभा निवडणूक…
In reply to औरंगजेब by चंद्रसूर्यकुमार
जशी पंजाबची विधानसभा निवडणूक जवळ येते आहे, तसा गेले वर्षभर भूमिगत झालेला केजरू आता परत उचल घ्यायला लागलाय. नाटकीपणा पुन्हा एकदा जोरात सुरू झालाय.
तमिळनाडूतला विजय.....
कसा झाला? त्यामागे काही गडबडगुंडा असणार तोही पत्रातून कळवला पाहिजे ट्रंपबाबांना राष्ट्रीय पत्रकारांनी. तिकडेही लोकशाहीचा खून पडला.
स्टेजवर वन्दे मातरम ऐकताना राहुलबाबा फारच गंभीर झाले. ये क्या हुआ इधर? कैसे हुआ?
आता यावरून वाद झाला.
In reply to तमिळनाडूतला विजय..... by कंजूस
कोणतं गाणं पहिलं गायचं,
वंदे मातरम गायचं का?
विजयचा पहिला दिवस आणि राजकीय वाद.
डिझेल-पेट्रोल कमी वापरा,…
डिझेल-पेट्रोल कमी वापरा, सोने घेऊ नका, WFH सुरु करा वगैरे म्हणे.
Is he serious? Really?
मोदींनी 10 तरखेला डिझेल…
मोदींनी 10 तरखेला डिझेल-पेट्रोल कमी वापरायचा सल्ला दिला आणि दुसऱ्या दिवशी स्वतः सोमनाथ मध्ये मोठ रोड शो करून सोमनाथाचे आशीर्वाद घेतले.
महात्मा गांधी स्वतः अर्मानी…
In reply to मोदींनी 10 तरखेला डिझेल… by रात्रीचे चांदणे
महात्मा गांधी स्वतः अर्मानी चा सूट आणि पाटेक चे घड्याळ घालून लोकांना खादी घालण्याचा सल्ला नव्हते देत काय ?
मिर्च्या
मिरच्या वाटपकेंद्र बंद पडले काय.
इतकी लिपापोती केलीय तर शाणपण येत नाही.
शेठ जबरदस्त तोंडावर पाडणार एक दिवस.
सोने खरेदी टाळा हे एकवेळ…
सोने खरेदी टाळा हे एकवेळ ठीक आहे पण रासायनिक खते कमी वापरा असे आवाहन करणे हे बौध्दिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.
क्रूडचे भाव प्रचंड वाढलेत…
क्रूडचे भाव प्रचंड वाढलेत. अरबी देशात होणारी निर्यात पणं युद्धा मुळे मंदावाली असेल. आपले डॉलर्स वाचावेत हा चांगला उद्धेश असावा. अर्थव्यवस्थे साठी हें चांगल आहे का ते माहिती नाही. पणं त्यासाठी स्वतः तस अचरण पणं करणे गरजेचं आहे.
बंगाल मध्ये एखादी सभा कमी घेतल्याच ऐकलं नाही. बरं ते एक वेळ ठीक आहे कारण निवडणूक पण महत्वाची आहे. पणं रोड शो कशाला ते पणं गुजरात मध्ये.
बांगलादेश सीमेवरील जमीन
बंगालचे मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारींनी बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी बंगालच्या सीमावर्ती भागातील जमीन बी.एस.एफच्या ताब्यात द्यायची प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकाधिक प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर भारतात यावेत आणि आपली व्होटबॅंक बनावेत या उद्देशाने डापु गॅंग उर्फ जमात-ए-पुरोगामींच्या लाडक्या ममता दिदीने ती जमीन बी.एस.एफ कडे हस्तांतरीत करायचे कटाक्षाने टाळले होते. हा निर्णय मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत झाला. सुरवात तरी ठीक झाली आहे. पुढे काय होते ते बघू. सगळ्यात मोठा प्रश्न हा की आधीच घुसलेल्या बांगलादेशींना कसे हाकलायचे हा. ते बोलतात बंगालीच, दिसतातही बंगालच्या लोकांप्रमाणेच आणि ममता दिदींच्या कृपेने त्यांच्याकडे आधार कार्ड वगैरे आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेने त्यांना हाकलणे कठीण दिसते. दुसरा कोणता मार्ग काढता येतो का हे बघायचे.
बंगाल आणि आसाम निवडणुका…
In reply to बांगलादेश सीमेवरील जमीन by चंद्रसूर्यकुमार
बंगाल आणि आसाम निवडणुका कदाचित भारत देश आणि त्या भागासाठी अत्यंत सुखद आणि महत्वाच्या घटना आहेत. SIR च्या अंमलबजावणीसाठी भारतीय गृहखाते आणि निवडणूक आयोगाचे कौतुक करावेच लागेल. ममता ह्यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी अमेरिकन आणि इस्राएली एजन्सी खूपच उत्सुक होत्या पण त्या सर्व तोंडघशी पडल्या. बांगलादेशी अमेरिकन लोकांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांच्या मते भारतांत बेकायदेशीर पणे जाणे अत्यंत सोपे होते. BSF मध्ये भ्रष्टाचार माजला होता. काही बांगलादेशी तर चक्क बंगाली सरकारी नोकऱ्यांत होते. असंख्य लोक म्हणे घाबरून परत आले. ममता ह्यांनी अश्या अफवा पसरवल्या कि भाजप निवडून आले तर ह्या लोकांना गोळ्या घातल्या जातील वगैरे, ह्यामुळे कदाचित हि मंडळी आणखीन घाबरून काढता पाय घेत झाली.
बांगलादेश हे अमेरिकन सत्ताबदलू लोकांचे नवीन केंद्र होणार आहे त्यामुळे बंगाल, आसाम, नागालँड इत्यादी भागांत सुरक्षा व्यवस्था वाढणे गरजेचे आहे. म्यानमार मध्ये चिनी लोकांचा हस्तक्षेप वाढत आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन ह्या भागांत शस्त्रास्त्रे पसरवत आहेत. हि आग कधी ना कधी वणव्याचे रूप घेईल .
मिपा तांत्रिक अडचणींमुळे बंद…
मिपा तांत्रिक अडचणींमुळे बंद होण्यापूर्वी एका लेखात लिहिले होते की या युद्धामुळे ट्रंप व नेतानयाहू यांची अवस्था पाचरीत शेपूट अडकलेल्या माकडासारखी झाली आहे. त्यातून नेतानयाहूने आपली शेपटी अलगद सोडवून घेतली आहे. परंतु ट्रंपची शेपटी घट्ट अडकली आहे. शेपूट सोडविली नाही तर माकडाचा मृत्यू अटळ आहे. अन्यथा शेपूट तोडली तरच माकड सुटू शकेल.
हे युद्ध पुढे सुरू ठेवता येत नाही कारण इराण जोरदार प्रतिकार करतोय आणि युद्ध थांबविले तर नामुष्की पदरी पडते. इराणच्या हातात अजूनही हुकुमाची काही पाने शिल्लक आहेत.
आता ट्रंपकडे ३ पर्याय आहेत.
१) इराणशी बोलणी करून दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या काही अटी मान्य करून युद्धविराम करणे.
- असे करणे म्हणजे अमेरिकेसाठी नामुष्की आहे. लष्करीदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, तंत्रज्ञानदृष्ट्या एका तुलनेने बऱ्याच दुर्बल देशासमोर मान झुकवली अशी अमेरिकेची प्रतिमा जगभर होऊन अमेरिकेचा दरारा खूप कमी होईल.
२) आपणास हवे ते साध्य झाले, आमचा विजय झाला असे जाहीर करून युद्ध थांबविणे. हा दावा अर्थातच असत्य आहे हे जग ओळखते व पहिल्या पर्यायाप्रमाणेच जगभर नामुष्की होईल.
३) एक जोरदार आक्रमण करून इराणला पूर्णपणे शरण आणणे हा तिसरा पर्याय. हा पर्याय वापरला तरीही इराण अनेक दिवस झुंज देईल ज्यात इराणच्या बरोबरीने अमेरिकेचेही प्रचंड नुकसान होईल. अरब देशांनाही मोठी झळ पोहोचेल. अंतिमतः अमेरिका जिंकेल परंतु तोपर्यंत अनेक देशांचे प्रचंड नुकसान झाले असेल. जगभर इंधन तेलाची तव्र टचाई होल व प्रंड महााई होईल. चीन व रशिया सुद्धा इराणच्या बाजूने युद्धात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात ट्रंप हा अत्यंत अहंमन्य, घमेंडखोर व पराकोटीचा हेकेखोर असल्याने कोणत्याही परिणामांची पर्वा न करता, विचार न करता तो हा पर्याय रेटून नेईल.
सद्यपरिस्थितीत पर्याय क्र. ३ ची शक्यता जास्त वाटते. मोदींना कदाचित तिसऱ्या पर्यायाची कुणकुण लागली असावी. त्यामुळेच अचानक सलग दोन दिवस ते काटकसर करण्यास सांगत आहेत. अर्थात इंधन तेल कमी वापरा हे १९८९-९० मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मधू दंडवतेंनीही सांगितले होते. सोने खरेदी करू नका हे अर्थमंत्री चिदंबरम् यांनीही सांगितले होते. त्यामुळे मोदींनी असे सांगणे यात नवल नाही.
परम ढोंगी मोगली जी यांनी…
परम ढोंगी मोगली जी यांनी देशात वायु प्रदुषण चिंताजनक पातळीवर पोहचले आहे, तेव्हा नागरिकांनी कमी श्वास घ्यावे असे सांगितले नाही हीच मोठी गोष्ट आहे.
जगात आणि आपल्या देशात एवढे मोठे उर्जा संकट असताना आणि रुपया प्रदिर्घ काळ पडत असताना आसाम आणि बंगालच्या निवडणुका पार झाल्या नंतरच मोगलीजींना जनतेला परिस्थीची जाणीव करुन द्यायची उसंत मिळाली. [ एक नागरिक म्हणुन मी त्यांच्या आव्हानास सकारत्मक प्रतिसाद देइन. ]
आता मोगलीजीं नी स्वत: जनतेला काय करायचे सांगुन सगळी जवाबदारी त्यांच्यावर ढकलुन मोकळे झाले [ तरी नशीब, यावेळी हे संकट घालवण्यासाठी त्यांनी थाळ्या बडवण्यास सांगितले नाही. ] पण त्यांच्या स्वत:च्या जवाबदारीचे काय?
गलगोटीयाचा जो जागतिक तमाशा होऊन सगळ्या जगात आपली एआय युक्त नाचक्की झाल्याचे तुम्हा सर्वांना आठवतच असेल, तर याच गलगोटीयाच्या विध्यार्थांना एक दिवशाची रजा / हजेरी मान्य करवुन त्यांना बसेस मध्ये भरुन मोगलीजींनी त्यांच्या सभेस आणले होते. [अजुन तरी बऱ्याचश्या बसेस डिझेलवरच चालवल्या जातात आणि सध्य परिस्थीत डिझेल हे सर्वाधीक अमुल्य आहे. ] म्हणजे युजीसी आणुन या आत्ममग्न माणसाने कॉलेज मध्ये शिकणाऱ्या जनरल कॅटेगरीच्या विध्यार्थांचे आयुष्य उद्वस्त केलेच वर जे बिचारे त्या गलगोटीया मध्ये शिकत आहेत त्यांनाही आपल्या सभेत गर्दी म्हणुन कामास लावले.
३०० डिझेल बसेस यासाठी वापरल्या गेल्या! संपुर्ण निवडणुकीच्या काळात किती कोटींचे महत्वपूर्ण डिझेल इंधन फुकले गेले असेल याची तुम्ही कल्पना करुन पहा!
संदर्भ:
https://www.youtube.com/shorts/K9L8mRMtUQY
https://www.youtube.com/shorts/PLp0GJj7324
मोठ्या मोठ्या पोकळ घोषणा देण्यात मोगलीजींचा हात कोण धरु शकेल?
अशीच एक घोषणा होती, देश कभी झुकने नही दुंगा...
प्रत्यक्षात: India Rejects Russian LNG Under Sanctions
मोगली जी सातत्याने तुम्हाला स्वदेशी चा आग्रह करतात पण त्यांच्या गॉगल पासुन पेना पर्यंत आणि गाडी पासुन कॅमरा पर्यंत सर्वकाही विदेशी वापरतात. [ त्यांना फोटोग्राफीची,फोटो काढुन नौटंकी करण्याची आणि सगळीकडे अगदी रेड कार्पेट टाकवुन त्यावर चालत जाऊन दाखवण्याची फार हौस आहे. मंदीरात भक्तीला महत्व असते तिथे रेड कार्पेट कशाला हवे? असे मोगलीजींना कोण विचारणार? ]
चीन मधुन आयात केलेल्या युरिच्या पिशवीवर मोगलीजींचा फोटो प्रिंट असतो आणि खाली लिहलेले असते सशक्त किसान,आत्म निर्भर भारत! ही यांच्या स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेची कहाणी.
तुम्हाला अहमदाबादची विमान अपघाताची अत्यंत दुर्दैवी घटना माहित असेल, तिथे देखील त्यांनी आपली फोटो काढुन घ्यायची विकृत हौस भागवुन घेतली!
[ ॲगल मत्वाचा बरं का, लोगों के जिंदगी की क्या किमत? ]
आजची स्वाक्षरी: PHIR SE (Full Video) | Dhurandhar The Revenge |
सोने खरेदी वर्षभर टाळा,…
सोने खरेदी वर्षभर टाळा, पर्तयटन काही काळ टाळा, कमी खाद्यतेल वापरा, इंधन कमी वापरा हे पंतप्रधानांनी केलेले आवाहन ऐच्छिक आहे. कोणावरही सक्ती नाही.
ज्यांना हे मान्य नाही त्यांनी भरपूर सोने खरेदी करावे, अमेरिका -युरोपच्या सहली काढून परदेशात सर्वाधिक महागड्या पर्यटन वसतिस्थानात वास्तव्य करावे, आपली वाहने भरपूर वापरावी आणि घरी असताना सुद्धा वाहनाचे चलतयंत्र सुरू ठेवावे, घरातील प्रत्येकाने वेगळ्या वाहनातून प्रवास करावा, भरपूर खाद्यतेल वापरून स्वयंपाक करावा, सप्ताहातील सातही दिवस वाहनाने कार्यालयात जावे.
हे सर्व करून मोदींचे आवाहन पराभूत करावे.
तुमचा अमूल्य सल्ला
In reply to सोने खरेदी वर्षभर टाळा,… by श्रीगुरुजी
>> युरोपच्या सहली काढून परदेशात सर्वाधिक महागड्या पर्यटन वसतिस्थानात वास्तव्य करावे,
बाकी कोणी नाही, तरी प. पू. मोदीजींनी ऐकला. अ बिग अचिव्हमेंट!
https://x.com/ravithinkz…
In reply to तुमचा अमूल्य सल्ला by स्वधर्म
https://x.com/ravithinkz/status/2054842861171204597?s=20
रागांच्या परदेश दौऱ्यांच्या…
रागांच्या परदेश दौऱ्यांच्या खर्चाची चर्चा होत आहे. टीव्हीवर तक्रार करणारे कोण तर बीजेपीचे नेते!
मध्यप्रदेशातील भोजशाळा येथील…
मध्यप्रदेशातील भोजशाळा येथील पवित्र वास्तू वाग्देवी सरस्वतीचे मंदिर असून तेथील मशिदीला दुसरीकडे जागा द्या असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.
मोठा गाजावाजा करून, जवळपास…
मोठा गाजावाजा करून, जवळपास २५-३० मोठ्या उद्योगांचे सर्वोच्च अधिकारी व ३ वरिष्ठ मंत्री बरोबर घेऊन मोठ्या ताठ्यात ट्रंप ३ दिवस चीनभेटीवर गेले आणि अक्षरशः रिकामा वाडगा घेऊन परतले. ना या भेटीत मोठे करार झाले, ना चीनने होर्मुझ खाडीची बंदी तोडण्यासाठी काही मदत दिली. उलट चीनने डोळे वटारून ट्रंपना बजावले की तैवानपासून दूर रहा.
जगभर कोणीही अमेरिकेला किंमत द्यायला तयार नाही. एकही देश अमेरिकेबरोबर इराण युद्धात सामील होण्यास तयार नाही. अनेक देशांनी अमेरिकेच्या लष्करी विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनचा सध्याचा राजा अमेरिकेत ट्रंपना भेटला. तेव्हाही ट्रंपने चार्ल्सला सांगितले की पंतप्रधान स्टार्मरला सांगा की युद्धात सहभागी व्हा. यावर चार्ल्सने कोणतेही आश्वासन दिले नाही.
इराण चार दिवसात शरण येईल हा ट्रंपचा भ्रम होता. इराणमध्ये सैन्य घुसवून जमिनीवर युद्ध करणे अमेरिकेसाठी आत्मघातकी ठरेल. इराणचे प्रचंड नुकसान होऊनही इराण झुकत नाही. इराणने होर्मुझ खाडी बंद केल्याने जगाची वाट लागली आहे व अमेरिका परत वाहतूक सुरू करू शकत नाही. अमेरिकेच्या धमक्यांना इराणने काडीचीही किंमत दिली नाही.
जगभर ट्रंप व अमेरिका हास्यास्पद झालेत. ट्रंपचा अहंकार, उर्मटपणा, इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती, बढाया, सात्याने धमक्या देणे यात कणभरही बदल नाही.
बरोबर आहे. तरीही या युद्धात…
In reply to मोठा गाजावाजा करून, जवळपास… by श्रीगुरुजी
बरोबर आहे.
तरीही या युद्धात इराण हरायला हवा नाहीतर जगभरात इस्लामिस्ट दहशतवादी पुन्हा डोके वर काढतील.
दोघेही हरायला हवे.
In reply to बरोबर आहे. तरीही या युद्धात… by कांदा लिंबू
दोघेही हरायला हवे.
साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या…
साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात ट्रंपने धमकी दिली होती की आज रात्री आम्ही इराणवर हल्ला करणार व एक प्राचीन संस्कृती कायमस्वरूपी संपणार.
इराणने या धमकीला काडीचीही किंमत दिली नाही व हल्ला करण्याची ट्रंपची हिंमत झाली नाही.
आता ट्रंपने नवीन धमकी दिलीये. लवकरात लवकर करार करा, तुमच्यासाठी वेळ निघून जात आहे. अन्यथा तुम्ही शिल्लक राहणार नाही.
इराण अर्थातच ट्रंपकडे दुर्लक्ष करतोय.
चीनला जाऊन जोडे खाऊन रिकामा वाडगा घेऊन परतल्यानंतरही ट्रंपचा माज व मूर्खपणा थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही.
या मूर्ख माणसाचे जगभर हसू होत आहे.
जाता जाता - अमेरिकेचे नागरिकत्व घेतलेले भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आपल्या मूर्ख अध्यक्षावर टीका करण्याऐवजी तेथे बसून सातत्याने मोदींवर असभ्य टीका करीत आहेत. साहजिकच आहे. ट्रंपवर टीका केली तर ट्रंप त्यांना अमेरिकेतून पार्श्वभागावर लत्ताप्रहार करून हाकलून देईल. पण अजिबात टीका सहन न होणारे मोदी (हा यांनीच पसरविलेला अपप्रचार) यांना भारतात परत घेतीलच.
ट्रंम्प ह्यांचे गर्वहरण होणे…
In reply to साधारणपणे एप्रिलच्या पहिल्या… by श्रीगुरुजी
ट्रंम्प ह्यांचे गर्वहरण होणे गरजेचे आहे. श्रीइच्छेने ते होईल.
इराण युद्धापेक्षा सध्या केंटकी प्रदेशांतील ०४ तालुक्यांत रिपब्लिकन प्राथमिक निवडणूक आहे. ह्यांत सध्याचे सभासद थॉमस मासी ह्यांना इस्रायली लॉबी ने उभ्या केलेल्या माणसाने आव्हान दिले आहे. मासी ह्यांनी ट्रम्प ह्यांच्या विविध धोकादायक कायद्यानं विरोध केला आणि लोकांच्या पुढे अत्यंत प्रभावी पणे त्याचा विरोध केला. त्याशिवाय एप्सटिन प्रकरण मासी आणि आपले रो खन्ना ह्या दोघांनी जबरदस्तीने उघड करायला लावले.
मासी ह्यांनां मी खूप आधीपासून फॉलो करीत आले आहे. हि व्यक्ती अत्यंत principled आहे. पण ट्रम्प ह्यांची हांजी हांजी न केल्याने आणि इस्राएल ला विरोध केल्याने आता अमेरिकेच्या इतिहासांतील सर्वाधिक महाग अशी हि प्राथमिक निवडणूक आहे. इस्राएल लॉबी ने ३० दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत. हर प्रकारचे शेळके आरोप मासी ह्यांच्यावर केले आहेत. आता हार्ट सेलर कायदा झुगारून ट्रम्प ह्यांनी आपले रक्षा मंत्री हेगशेठ ह्यांना प्रचाराला पाठविले आहे.
त्यामुळे मासी हि निवडणूक जिंकले (आणि जिंकण्याची पूर्ण शक्यता आहे) तर ट्रम्प ह्यांचा प्रचंड अपमान तर होणार आहेच पण त्याशिवाय इतर काँग्रेस मंडळी सुद्धा ट्रम्प च्या दबावाला बळी पडणार नाहीत. इस्राएल आणि यहुदी लॉबी साठी सुद्धा हि एक प्रचंड मोठी हार ठरणार आहे.
--
इराण युद्ध
इराण इथे underdog असल्याने आणि ट्रम्प ह्यांचा तिटकारा असल्याने इराण विषयी काहींना सहानभूती असणे शक्य आहे. पण, इराण इथे जिंकण्याची शक्यता शून्य आहे. ट्रम्प हे आत्ममुग्ध असले तरी, अमेरिकन कायदे आणि व्यवस्था काही प्रमाणात तरी चालते. त्यामुळे इराण मध्ये अत्याधिक हिंसा अमेरिकन नेतृत्वाला नको आहे. इराण ला बेचिराख करून इराणी मुल्ला मंडळींचे नुकसान होत नाही. उलट हि मंडळी बलिदान द्यायला उत्सुक असतात. सामान्य लोकांचे प्रचंड नुकसान होणार आहे.
ट्रम्प ह्यांना ह्या युद्धांतून माघार घ्यायचि आहे पण किमान होर्मूझ उघडल्याशिवाय ते शक्य नाही. होर्मूझ उघडण्यासाठी दोन पर्याय आहेत. होर्मूझ उघडण्याचा सराव अनेकदा अमेरिकन आणि मित्र नौदलाने केला आहे. पण, युद्धाच्या सुरवातीला ह्यांना ट्रम्प ह्यांनी विश्वासात घेतले नाही, उलट शिवीगाळ केली. जपान सोडून आणखीन कुणीच इथे भाग घेण्यास तयार नाही. युरोप मध्ये इस्राएल ला विशेष विरोध आहे. त्याचे पडसाद सुद्धा इथे दिसून येतात.
दुसरा पर्याय हा इराण बेचिराख करणे आहे आहे. ट्रम्प कदाचित हा पर्याय वापरू शकतात पण तो कितपत शक्य आहे हे ठाऊक नाही. पण इराण चे प्रचंड नुकसान नक्की आहे.
तिसरा पर्याय आहे इस्राएल. इस्राएल चे वैशिष्ट्य म्हणजे ह्यांना युद्धाचे नियम वगैरे लागू होत नाही. सर्वप्रथम लहान मुले, वृद्ध, कुटुंबे, इस्पितळे ह्यांना टार्गेट करायचे, नंतर शेती, पाणी ह्यांना टार्गेट करून प्रचंड प्रमाणात जनसंहार घडवून आणायचा हे ह्यांचे नेहमीचे तंत्र आहे. ट्रम्प कदाचित अमेरिकेला बॅकसीट देऊन इस्राएल ला ह्या संहारात भाग घेऊ लावू शकतात. इस्राएल ह्यासाठी आधीपासून उत्सुक आहे.
अमेरिकन नागरिकांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष टीका केली म्हणून हाकलून लावतील ? कुठे ?