Skip to main content

गप्पा

चालू घडामोडी । मे २०२६ । वैशाख अधिक ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी शुक्रवार, 01/05/2026 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

"जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" असे राज्यगीत असलेल्या आपल्या मराठी राज्याची स्थापना होऊन आज ६६ वर्षे पूर्ण झाली.

आज जागतिक कामगार दिन आहे. पांढरे, निळे, करडे - सर्व प्रकारचे श्रमिक, हे जग निर्माण करण्यासाठी जे कष्ट उपसतात त्यांच्या श्रमाचा हा गौरव दिन.

आज वैशाखी पौर्णिमा आहे. भगवान विष्णूंनी आजच्या दिवशी गौतम बुद्धांच्या रूपाने भूतलावर अवतार घेतला होता. केवळ हिंदूंनाच नाही, अवघ्या मानव जातीला शांतीचा संदेश त्यांनी दिला.

[स्वैर] वाळवी वि० बुरशी

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 19/04/2025 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
उजव्या डाव्यांचा वर्णपट खुप मोठा आहे पण त्यातील उजवेपण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे कदाचीत अपवाद असतील, नियम नसावेत. ज्यांना पोलादी पडद्यात आणि इतरांच्या शोषणात आनंद मिळतो ते सहसा डावीकडे झुकलेले असतात. इतरांचे स्वातंत्र्य हे त्यांना आपल्या सत्तेला आव्हान वाटते. त्यांना समाजातील व्यक्तींच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग शोषक उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे शोषण करते आणि ती तिच्या खालच्या व्यक्तीचे.

लॉकडाऊन: १८५०वा दिवस (भाग २)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 16/04/2025 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
पाच वर्षांपूर्वीचा (भाग १): लॉकडाऊन: तेविसावा दिवस ती: परवा आमच्या थोरलीचा १८ वा वाढदिवस झाला. आम्ही तिला कारची चावी वाढदिवसाची भेट म्हणून दिली. मिळालेल्या surprise ने तिच्या चेहऱ्यावर जे भाव उमलले ते पाहून तिचा पाच वर्षांपूर्वीचा वाढदिवस झर्र्कन डोळ्यासमोरून तरळून गेला. तेंव्हा लॉक डाउन सुरु होते आणि घरी बनविलेल्या केकवर वाढदिवस साजरा झाला होता. पण आता काळ बदललाय. काळाबरोबर खूप काही बदललंय. एकेकाळी तिला दोन वेण्या पाडून द्यायला मी लागायची, आज ती मला हेअर स्टाइल सुचवते.

अ‍ॅबॅकस् चा शोध कसा लागला - एक "कोट्याधीश" धागा ;-)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 13/11/2024 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
गणित सोडवायचं म्हटलं की माणसाला प्रश्न पडतो. मग तो स्वतःशीच म्हणतो, "अब्बा! कसं करायचं हे इतकं अवघड गणित?" पण या प्रश्नातच त्या गणिताचे उत्तर दडलेले असते! हा गणिती प्रश्न आणि त्याचे उत्तर म्हणजे - अब्बा! कसं करायचं हे इतकं अवघड गणित? अब्बा! कसं करायचं हे अवघड गणित? अब्बा! कसं करायचं हे गणित? अब्बा! कसं करायचं हे? अब्बा! कसं करायचं? अब्बा! कसं? अब्बाकसं? अबाकस अ‍ॅबॅकस् या रीतीने मग अ‍ॅबॅकस् या गणिते सोडविण्याच्या पद्धतीचा शोध लागला!