Skip to main content

चालू घडामोडी । मे २०२६ । वैशाख अधिक ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी शुक्रवार, 01/05/2026 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

सर्व मिपाकरांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

"जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" असे राज्यगीत असलेल्या आपल्या मराठी राज्याची स्थापना होऊन आज ६६ वर्षे पूर्ण झाली.

आज जागतिक कामगार दिन आहे. पांढरे, निळे, करडे - सर्व प्रकारचे श्रमिक, हे जग निर्माण करण्यासाठी जे कष्ट उपसतात त्यांच्या श्रमाचा हा गौरव दिन.

आज वैशाखी पौर्णिमा आहे. भगवान विष्णूंनी आजच्या दिवशी गौतम बुद्धांच्या रूपाने भूतलावर अवतार घेतला होता. केवळ हिंदूंनाच नाही, अवघ्या मानव जातीला शांतीचा संदेश त्यांनी दिला.

या महिन्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक पातळीवर अनेक घडामोडी होणार आहेत.

तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, पश्चिम बंगाल, असम या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदान पार पडले आहे. सोमवार, ४ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील. यावर मिपाकरांची मनमोकळी चर्चा / काथ्याकूट अपेक्षित आहे.

दर अडीच-तीन वर्षांनी येणारा, हिंदूंचा पवित्र महिना - अधिक ज्येष्ठ मास रविवार १७ मे रोजी सुरू होत आहे. नाना व्रतवैकल्ये करून पुण्य प्राप्त करण्याची ही पर्वणी आहे.

या अधिक मासात (म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात!) जावयांचा यथाशक्ती आदर-सत्कार करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. मिपाकर जावयांना त्यानिमित्त आगाऊ शुभेच्छा! ;-)

 


वाचने 4166
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

निवडणुक आयोगाकडून राबविल्या गेलेल्या एस.आय.आर प्रक्रीयेला सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. बिहारमध्ये ६५ लाख मतदारांची नावे कमी केली, बंगालमध्ये एखाद कोटी मतदारांची नावे कमी केली म्हणून विरोधी पक्ष आणि डापु गॅंग उपाख्य जमात-ए-पुरोगामींकडून बराच आरडाओरडा केला गेला होता. त्यांच्यापैकी कोणीतरी त्या प्रक्रीयेला आव्हान द्यायला न्यायालयात गेले असावे. इतकेच नाही तर एस.आय.आर प्रक्रीयेतून "Breathes Life Into Constitution" असे होते असेही न्यायालयाने म्हटले. https://www.ndtv.com/india-news/supreme-court-says-sir-exercise-breathes-life-into-constitution-11553085 


मोदींनी सर्वोच्च न्यायालय सुद्धा हॅक केलंय  त्यामुळे असा निर्णय येणारच.

आणि मोदींनी निवडणूक आयोग सुद्धा हॅक केलाय मग ते निवडणूक सुद्धा जिंकणारच.  


In reply to by सुबोध खरे

अमेरिकेने तर भारत सरकार हाॅक केले आहे. व्हेनेझुलाचे हंगामी अध्यक्ष पुढील आठवड्यात भारत  भेटीवर येणार हे अमेरीकेच्या   Rubio ने भारतात येऊन घोषणा केली. आपल्या सरकारला हे माहीतच नव्हते.


In reply to by आग्या१९९०

हे व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना माहिती नसणार. 

 

भारताने रशियाकडून तेल घेणे कमी केले आहे, भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले आहे, भारत-पाकिस्तान युद्धात ४-५ विमाने पडली (नंतर ६-७, नंतर ८-९, नंतर १०-११), इराणने आपले समृद्ध युरेनियम अमेरिकेला द्यायचे मान्य केले आहे, रशिया -युक्रेन युद्ध थांबले आहे, रशियाकडून तेल घेण्यासाठी आम्ही अजून ३० दिवसांसाठी भारताला अनुती दिली आहे, भारत अमेरिकेत ५०० अब्ज डॉलर्स गुंतविणार आहे .  .  .

 

आचरटासारखे व मुर्खासारखे बरळणे, इतर देशांच्या नावाने वाटेल ते पसरविणे हे ट्रंपचे व्यसन आहे. त्याच्या बरळण्याकडे जगातील कोणताही देश लक्ष देत नाही. त्याच्या बरळण्यास कोणीही गांभीर्याने घेत नाही. व्हेनेझुएला आणि भारताने रूबिओकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. ट्रंप व त्याचे मंत्री जगभर हास्याचा विषय बनले आहेत.  संपूर्ण जग त्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करते.

 

भारत ट्रंपच्या मागण्यांना, बरळण्याला काडीचीही किंमत न देता दुर्लक्ष करतो व हे अत्यंत योग्य धोरण आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

एक शुद्धीकरण - 

 

ट्रंपला व त्याच्या सहकाऱ्यांना जगात कोणीही गांभीर्याने घेत नाही ही जरा अतिशयोक्ती झाली. 

 

भारतातील निरूपयोगी, निरूद्योगी, भ्रमिष्ट विरोधी पक्ष व मिपावरील मोदीद्वेष्टे्यांसाठी 'ट्रंप वाक्यम् प्रमाणम्' हे धोरण आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

भारत ट्रंपच्या मागण्यांना, बरळण्याला काडीचीही किंमत न देता दुर्लक्ष करतो व हे अत्यंत योग्य धोरण आहे. 

जर त्याच्या प्रत्येक बरळण्याची दखल घेऊन प्रतिक्रिया दिली असती तर मग मोदी ट्रम्पच्या प्रत्येक वक्तव्याला इतके महत्त्व का देतात- अनुल्लेखाने मारत का नाहीत अशी बोंब झाली असती. या लोकांचा अजेंडा एकच आहे- मोदींनी काहीही केले तरी त्याला विरोध करायचा. भौतिकशास्त्रात घर्षणबल असते ते एखादी वस्तू कोणत्याही दिशेला जाऊ लागली तर त्याच्या विरोधात काम करते. वस्तू पूर्वेला जायला लागली तर हे बल पश्चिमेला, वस्तू उत्तरेला तर हे बल दक्षिणेला वगैरे. तसे या लोकांचे आहे. मोदी बरळणाऱ्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करतात- मग असे बरळणारे अमेरिकेचे अध्यक्ष असतील किंवा भारतातील विकाऊ पत्रकार आणि आपल्याला करायचे तेच करतात.


 


In reply to by श्रीगुरुजी

हे व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना माहिती नसणार.

व्हेनेझुएला आणि भारताला दोघांनांही ते कशाला सांगणार ? ते तर त्यांचे गुलाम . चीनमध्ये जावून असे चाळे अमेरीकेने करून दाखवावे.  

 


In reply to by आग्या१९९०

या मर्कटचाळ्यांकडे भारताने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे कारण मर्कटाकडून दुसरे काही अपेक्षित नाही. भारतातील मोदीद्वेष्टे मात्र हे मर्कटचाळे अत्यंत गांभीर्याने घेतात कारण देशातही त्यांचा नेता असलेच चाळे करतो. 


In reply to by श्रीगुरुजी

अमेरिकेने भारतावर 3% असलेले टेरीफ १८% केले.  तरी भारत गप्प . भारतात निर्यातही वाढवून घेतली तरी चूप . त्यात कृषी उत्पादने सामील केली तरी भारत चूप. ह्याला दूर्लक्ष करणे म्हणत असाल तर भारताचे नेतृत्व डरपोक आहे हे सिद्ध होते.  


In reply to by आग्या१९९०

आपल्यावर कोणत्या देशाने किती आयातकर लावायचा यावर भारताचे नियंत्रण नाही. तो निर्णय प्रत्येक देशाचा वैयक्तिक निर्णय असतो. अमेरिकेने केवळ भारतावरील आयातकर वाढविला नसून चीनसहीत अनेक देशांवर तो वाढविला आहे. भारतानेही काही चिनी उत्पादनांवरील आयातकर वाढविला आहे.  सर्व प्रमुख अन्नधान्ये, दुग्ध उत्पादने अमेरिकेतून आयात करण्यास भारताने नकार दिला आहे. अमेरिका भारताबरोबर व्यापार करार करण्यास उत्सुक आहे, परंतु हा करार अजून दृष्टीपथात नाही.

 

मुळात अमेरिका किंवा ट्रंप जे दावे करतात त्यास शष्प महत्त्व नाही कारण इतर देशांच्या नावाने फेकाफेकी करण्याचे ट्रंपला व्यसन जडले आहे. म्हणून जगभरात कोणीही ट्रंपला गांभीर्याने घेत नाही. अपवाद भारतातील निष्क्रिय, निरूपयोगी, निरूद्योगी विरोधी पक्ष आणि मोदीद्वेष्टे.

 

जोपर्यंत भारत अधिकृत भूमिका स्वतः जाहीर करीत नाही तोपर्यंत ट्रंपचे दावे ऐकून केवळ करमणूक करून घ्यायची.  

 

अनेक माध्यमांनी ११-१२ मे पासून उठवायला सुरूवात केली होती की १५ मे या दिवशी अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल ३० दिवसांसाठी घेण्यासाठी दिलेली अनुमती संपत आहे. भारताने या अपप्रचाराकडे संपूर्ण दुर्लक्ष केले व एकदाच ठामपणे सांगितले की भारत पूर्वीही रशियाकडून तेल घेत होता, आजही घेत आहे व पुढेही घेत राहील. 

 

दुर्दैवाने मूर्ख विरोधी पक्षांचा ट्रंप नावाच्या आंतरराष्ट्रीय विदुषकावर पूर्ण विश्वास आहे आणि आपल्या सरकारवर पूर्ण अविश्वास आहे. साहजिकच आहे. एक राष्ट्रीय विदूषक त्यांचा नेता आहे. तस्मात् ट्रंप हाच त्यांचा आंतरराष्ट्रीय विश्वासाचा नेता आहे.

 

 


In reply to by श्रीगुरुजी

आपल्यावर कोणत्या देशाने किती आयातकर लावायचा यावर भारताचे नियंत्रण नाही. तो निर्णय प्रत्येक देशाचा वैयक्तिक निर्णय असतो

भारताने ह्याच्या उलट केले. घाबरून अमेरीके वरील टेरीफ कमी केले. US ने ३ वरून १८% केले. हा फरक आहे. आपला गडी compromised आहे.  

 


In reply to by आग्या१९९०

अजून १ वर्षं प्रतीक्षा करा. नंतर सत्ताबदल होणार असे एका प्रकांड सर्वज्ञानी ज्योतिषाचार्याने भाकीत केले आहे.


In reply to by श्रीगुरुजी

जून महिन्यात अमेरिकेत सॉकर विश्वचषक स्पर्धा आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी इराणचा संघही पात्र ठरला आहे. ट्रंपला इराणचा संघ अमेरिकेत येऊन द्यायचा नव्हता. परंतु इराण सहभागी होणार हे समजल्यानंतर ट्रंपने सांगितले की इराण अमेरिकेत सामने खेळू शकेल पण त्यांच्या संघाला स्पर्धाकाळात अमेरिकेत राहून दिले जाणार नाही.

 

अश्यावेळी मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लॉडिया शीनबॉम यांनी इराण संघाच्या निवासाची व्यवस्था मेक्सिकोतील तिवाना येथे करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे प्रत्येक सामन्यापूर्वी इराणचा संघ मेक्सिकोहून अमेरिकेत सामन्याच्या ठिकाणी जाणार व सामना संपल्याक्षणी वास्तव्यााठी  अमेरिकेतून मेक्सिकोत जाणार. तिवाना हे ठिकाण अमेरिकेतील सॅन दिएगो शहराजवळील सीमेपासून अगदी जवळ मेक्सिकोत आहे. 

 

क्लॉडिया शीनबॉम ज्यू असल्याने त्या आपली तळी उचलून धरतील या भ्रमात ट्रंप होते. परंतु शीनबॉम यांनी ट्रंपच्या मूर्खपणात सहभागी न होता दडपणाखाली न येता आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घेऊन ट्रंपचे तोंड काळे केले. 

 

मेक्सिको, भारत, चीन, युरोपियन देश, इराण, रशिया, क्यूबा अश्या अनेक देशांनी ट्रंपला धुडकावून लावले आहे. 


In reply to by सुबोध खरे

हो ना, लोकांना बोलेायला काय जाते...

हे ज्ञानेश कुमार म्हणाले असतील "मी माझी ड्युटी केली. कट केलेली नावे झुरळांची होती. "

मग आपले चंद्रकांतसूर्यकांत म्हणाले असतील " ओके, माझेही तेच मत आहे. लोकशाही लोकांसाठी असते, झुरळा साठी नाही. त्यांना श्वास घ्यायचा अधिकार नाही. वासमारे घाणेरडे कुठले झुरळे. त्यांना उडवून लोकशाहीला श्वास दिला तुम्ही. "

.

जय हो.......

झुरळ पार्टी चे प्रेरणा स्थान चंद्रसूर्य आणि माँ बहनो के फोटो के रखवाले ज्ञानेश कुमारचा वीिजय असो...


In reply to by कंजूस

थांबा जरा . अडाणी  तयारी करत आहे . अमेरीकेत जाण्यासाठी सध्या पैशाची जमवाजमव करत आहे. आपण पेट्रोल , सोने आणि खाद्यतेल वर्षभर कमी  करून त्याला मदत करावी. 


कुर्बानीसाठी कर्ज काढून वाढवलेल्या गाईंना बंगालमधील  बाजारात गिन्हाईक नसल्याने हिंदू गो उत्पादक आर्थिक संकटात सापडले.  


In reply to by श्रीगुरुजी

प्रयोग  म्हणून  त्यांच्याकडील एक  गाय दूधविक्रीसाठी  विकत घेऊन  बघा. श्रमाच्या तुलनेत किती नफा मिळतो तो काढा. दिवसातून वेळा दूध काढायचे , त्याला ऑप्शन नसतो. प्रत्येक गाय वर्षभर दूध देत नाही परंतू खाद्य द्यावेच लागते. बघाच एकदा हा प्रयत्न करून. 


महान देशभक्त क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर लेखक कवी कै. तात्याराव उपाख्य विनायक दामोदर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!  🙏🙏🙏 

 

 


देशाच्या सीमा चरख्याच्या सुताने नव्हे तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात

हे सांगणारे द्रष्टे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त साष्टांग अभिवादन   


नुकतीच दिल्ली चंदिगढ शिमला,कुलू  मनाली आणी रोहतांग ला अशी भरभक्कम दहा दिवसाची भटकंती बाय रोड केली.

 

कुठेही पेट्रोल डिझेल  करता रांगा दिसल्या नाहीत. पेट्रोल नाही असे कुठेही बोर्ड लावून  पंप बंद दिसले नाहीत.  गॅस तुटवड्यामुळे एकही ढाबा,टपरी,किंवा विवीध तारांकित, अतारांकित  भुवने ओसाड,बंद पडलेली दिसली  नाहीत. 

 

पर्यटकांनी भरपूर गर्दी केल्याने स्थानिक आनंदी दिसले. शिमला,मनाली,रोहतांग ला पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी  अनुभवत होते. परंतू याला येथील  भौगोलिक स्थिती सुद्धा एक महत्वाचे कारण आहे. 

 

या सर्व भागात विकास कामे जोरदार चालू आहेत. दळणवळण व जनसामान्यांचे जीवन सुखकर दिसत आहे. 

 

महागाई पेक्षा शिमलावाले उकाड्याने त्रस्त  दिसले. पुणेकर व इतर परप्रांतीय  मात्र कोट,स्वेटर घालून फिरताना दिसले.

 

पर्यटकांनी गर्दी केली असली तरी स्थानिक प्रशासन आणी स्वराज्य संस्था कचरा नियोजन व्यवस्थित ठेवत स्वच्छता ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. 

 

मनालीच्या माल रोडवर मराठी उद्योजक  श्री कुलकर्णी यांचे दुकान आहे. ते स्वता दुकानात भेटले.

 

पर्यटक भरपूर खरेदी करत होते. अर्थिक चणचण  वगैरे दिसली नाही. 

 

 

 

 


>>> कुठेही पेट्रोल डिझेल  करता रांगा दिसल्या नाहीत. पेट्रोल नाही असे कुठेही बोर्ड लावून  पंप बंद दिसले नाहीत.  गॅस तुटवड्यामुळे एकही ढाबा,टपरी,किंवा विवीध तारांकित, अतारांकित  भुवने ओसाड,बंद पडलेली दिसली  नाहीत. 

 

तुम्ही अंधभक्त आहात हे सिद्ध झालंय. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा थेंब मिळत नाही. जनता जेमतेम एक वेळ जेवते. पण तुम्ही डोळ्यांवर कातडं ओढून बसले आहात.

 

 

 


नाही हो गुरूजी...

 

घरात बाबाची शपथ.  बघितल तसच लिवलय. 

 

रोहतांग ला वर दररोज फक्त  एक हजार  गाड्या, तीनशे डिझेल व सातशे पेट्रोल वर जाण्यासाठी परवानगी आहे. वाकडातिकडा रस्ता होता तरी बॅक 2 बॅक गाड्यांची मुंग्या सारखी रांग होती.

 

 


In reply to by कर्नलतपस्वी

तुम्ही काय अनुभवलंय त्याला काडीचीही किंमत नाही. भक्त थापा मारताहेत. 

आम्ही म्हणतोय ना महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल थेंबभरही नाही. म्हणजे ते नाहीच. विश्वास नसेल तर काही मिपाकरांना विचारा. ते मोटरसायकलवर बसून सर्व पंप पाहून आलेत. 


In reply to by श्रीगुरुजी

हो, उगाच नाही सांगत, ग्राउंड रीपोर्ट आहे. इतकेच काय, २६ दिवसांपूर्वी स्वर्गासारखा असणारा बंगाल आज जेमतेम २६ दिवसात नर्क झाला आहे. पुरावा आहे, आपले मीपाकरच ग्राउंड रीपोर्ट घेउन आले आहेत.


In reply to by कर्नलतपस्वी

पंजाब मधे आपचे सरकार  तर हिमाचल मधे काँग्रेस चे सरकार  आहे.

 

त्यांच्या चागंल्या गोष्टी सांगत असताना मी अंधभक्त कसा काय?

 

याचा अर्थ  राज्यसरकारे इतर राज्यात पेट्रोल, गॅस ची बोंबाबोंब असताना सुद्धा एकल इंजीन वाले कुशल प्रशासक  साबीत होत आहेत.

 

डबल इंजीन फेल होतय का,असा विचार  मनात  येतो. अर्थात, पुण्यात मला तरी पेट्रोल, गॅस ची टंचाई  टिव्हीवर आणी इतर माध्यमातून कळाली. मला वैयक्तिक पातळीवर अजिबात आडचण आलेली नाही.

 

 


 

 

बकरी ईद च्या दिवशी हिंदू युवकाची गाजियाबाद मध्ये मुस्लिमांकडून कत्तल 

Uttar Pradesh: Nawab and his aides invite Hindu youth Surya Chauhan to ‘Bakrid party’ in Ghaziabad, then slaughters victim with a knife 

https://www.opindia.com/news-updates/uttar-pradesh-nawab-and-his-aides-invite-hindu-youth-surya-chauhan-to-bakrid-party-in-ghaziabad-then-slaughters-victim-with-a-knife/ 

 

केंद्रात राज्यात वर्षांनुवर्षांपासून मोदी योगी यांची सरकारे आहेत. 


In reply to by कांदा लिंबू

७२ तासात योगींनी न्यायनिवाडा केला.

 

दुर्दैवाने २०१४ पासून  कॉंग्रेस काळापेक्षाही वाईट गृहमंत्री महाराष्ट्राच्या कपाळी आलाय. पालघर येथे साधूंची समूहहत्या करणारे, अनंत करमुसेला घरी उचलून आणून मरेस्तोवर मारणारा इशरत जहाचा समर्थक, दाऊदची मालमत्ता सरकारजमा होण्यापासून  वाचविणारा मुंबईतील दाऊदचा सहकारी सकार  कृपेने  अजूनही मोकाट आहेत. 


In reply to by श्रीगुरुजी

खरंच वाईट बातमी.‌ लता मंगेशकर यांच्या काळात त्यांचं करिअर काहीच झाकोळलं जरी असलं तरी त्यांची प्रतिभा खरंच अद्वितीय होती. 

त्यांच्या मधुर स्वरातलं अवीट गोडीचं आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे घेऊन एकतारी गातो कबीर दोहे हे गाणे मी अगणित वेळ ऐकलं आहे. 

तुम्हीही ऐका -

https://youtu.be/7tS-5kR5XuQ?si=e74KUnvKeMmlmaRB 

 

त्यांनी इतरही असंख्य लोकप्रिय गीते गायली आहेत.


मंगेशकर घराण्यातील दिग्गजांच्या समकालीन युगात  अपले वेगळे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या सिद्ध हस्त गायिका. यांची एक एक गाणी म्हणजे कोहिनूर ञाहेत. ती गाणी त्यांनीच गावी किंबहुना त्यांच्याशिवाय इतरांनी गायली असती तर गाण्यांना न्याय मिळाला नसता.

 

माझे सर्वात आवडते गाणे

केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर

https://youtu.be/H1YJoYUhOEs?si=apdnLZb87GkNysFk

 

लिंबोणीच्या झाडा मागे...

 

https://youtu.be/VP3fvoSG9vY?si=Yyv9fTOYHu3CD-jJ

 

भावपूर्ण द्धांजली. 

 

लिहावे तेव्हढे थोडेच आहे. 

 

ऐकाले किती तरीही कान माझे अतृप्त  आहे

सुमनांच्या गर्दीतले एक सुमन  वेगळेच  आहे....


मागे सुद्धा निवड्णुकीत पराभूत झाल्यानंतर १९ डिसेंबर रोजी कराडच्या बाबांनी मोट्टा  राजकीय भूकंप होणार अशी घोषणा करुन प्रसिद्धीची भूक भागवून घेतली होती. प्रत्यक्षात काहीही झाले नाही. कदाचित कोणत्या साली हा भूकंप होणार हे सांगावयास ते विसरले असावेत.