Skip to main content

सहज सुचलं म्हणून

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 20/12/2024 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो. खरडफळ्यावर चर्चा लांबल्या तर इथे टाकता येतील. _______________________________________________ * कालपासून एक पुस्तक वाचत आहे. # शेक्सपीअरची शोकनाट्ये - लेखक परशुराम देशपांडे. काॅन्टिनेण्टल प्रकाशन. आतापर्यंत शेक्सपिअरचे सुबोध केलेले लेखन असलेली इंग्रजी पुस्तके वाचली पण काही कळले नव्हते ते आता यातून कळायला लागले. पहिल्या चाळीस पानांच्या प्रकरणात शोकांतिका लेखनाचे विश्लेषण आहे. ते समजलं. एकूण चांगलं पुस्तक आहे. कढीतली भजी :- या प्रकारातली पाककृती https://youtu.be/FU2JCUT-7bw?si=IkPFb2ZC9RXKU0eM या विडिओतल्या कृतीप्रमाणे करून पाहिली. बरोबर झाली. ही भजी कढीतही टाकता येतील.( मेथीना गोटानी कढी - मेथीच्या भाजीची कढी.)आता थंडीत बाजारात मेथी येत आहे. खरं म्हणजे मेथा. खरी कसुरी मेथी क्वचितच येते. ती पराठ्यातही घालता येते. कमी कडू असते आणि हलका पोपटी रंग असतो.

वाचने 27193
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

In reply to by वामन देशमुख

हैदराबादी चाय रेसिपी त्यातील एक https://youtu.be/6tKZtRxNdaY?si=RSw8F9q2VDCb5R6O

In reply to by कंजूस

फस्क्लास ! पण मिल्क पावडर अन कन्डेस्न्ड मिल्क आणुन ठेवावे लागेल घरी !

अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

. कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली ह्यांनी घोडपाण्याची नाळ हा ट्रेक पूर्ण केला.

श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

In reply to by वामन देशमुख

श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌
=)) हसुन हसुन पुरेवाट झाली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌
=)) हसुन हसुन पुरेवाट झाली.
तुमच्याकडून दुसरी अपेक्षा काय असणार? इथे सगळी मिपाखरे गुरुजींचा आयडी बॅन केल्याबद्दल नापसंती व्यक्त करत आहेत, त्यांचे ससंदर्भ लेखन, विस्तृत माहिती, ऐतिहासिक दाखले हे सर्व acknowledge करत आहेत आणि तुम्ही मात्र... असो, मिपावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.

हल्ली गवि यांनी मिपासन्यास घेतलेला दिसतोय. गोव्याचे लेख लिहिले की ते हटकून हजेरी लावतात. पण ते कुणी लिहित नाही.

Starlink - elan musk - satellite internet हे कसे काम करते याचा (अमेरिकेतल्या एक विडिओ) https://youtu.be/Vh5cDulKvZ8?si=DVOI113Bq-_2_-Bm हल्लीच दोन दिवसांपूर्वी इलान मस्कच्या स्टारलिंक कंपनीस भारतात सटेलाइटमधून इंटरनेट देण्याचे लायसन्स मिळाले. यांचे स्पेसएक्सचे जे उपग्रह आहेत त्यातून इंटरनेट देता येते. ( साधारणपणे अडीचशे टीवी चानेल्स देणाऱ्या उपग्रहांकडून आपण डिश टीव्ही पाहातोच आहोत). इंटरनेट देणारे वेगळे असतील. या कंपनीशी एअरटेल आणि जियो यांनी अगोदरच करार केले आहेतच. नेट स्पीड किती मिळू शकतो ते वरच्या व्हिडिओत दिले आहेच. आणखी काही वर्षांनी पुढची पिढी डोक्यावरच्या टोपीवर अँटेना बसवून आणि एका जागी बसून कुठेही इंटरनेट वापरणारी असेल. एक दोन वर्षांत यांचे रेटही आवाक्यात येतील सामान्य माणसाच्या.

आमचा पंधरा - सोळा जणांचा फॅमिली ग्रुप १ ५ ऑगस्टला माळशेज MTDC येथे मुक्कामी जात आहे . दुसऱ्या दिवशी नाणेघाट येथे जायचे आहे . जुन्नर बाजूने गाडी जाऊ शकते असे वाचले आहे . माळशेज घाटातून नाणेघाट येथे ट्रॅव्हलर गाडी जाऊ शकेल असा रस्ता आहे का आणि असल्यास रस्त्याची सद्यस्थिती कशी आहे याबद्दल माहिती हवी . नुकतेच कोणी तेथे जाऊन आले असल्यास मार्गदर्शन करावे. गाडीतून उतरल्यावर किती अंतर चालावे लागते व कठीण श्रेणी काय ? ग्रुपमध्ये ३ ते ६५ वयोगटातील पर्यटक आहेत म्हणून विचारणा .

In reply to by गोरगावलेकर

माळशेज घाट चढून आल्यावर चूल फाटा-गणेश खिंड - जुन्नर असा रस्ता आहे. ट्रॅव्हलर आरामात जाईल. दुसरा अजून लांबचा रस्ता म्हणजे ओतूर - जुन्नर. गाडी पार नाणेघाटाच्या नळीपर्यंत जाते. जेमतेम 100 मीटर फ्लॅट वॉकने उतरंड सुरू होते. अजिबात सवय नसलेल्यांना नळीचे प्रथम दर्शन भयप्रद वाटू शकते मात्र प्रत्यक्षात सोपे आहे. बिनधास्त जावा.

In reply to by प्रचेतस

एक सुचवतो. घाट चढल्यावर खूबि फाटा, पिंपळगाव बसवंत धरणाची भिंत आणि त्यावरचा रस्ता( डावीकडे) खिरेश्वर गाव आणि मंदिराकडे नेतो. फंड्री सिनेमातलं चित्रीकरण झालेला रस्ता. येताना अथवा जाताना इकडे वळून बघता येईल.

In reply to by कंजूस

वेळ मिळाला तर निश्चितच जाऊ . ते पिंपळगाव बसवंत नसून पिंपळगाव जोगा आहे बहुतेक . शक्य झाल्यास ओझरच्या गणपतीचेही दर्शन घ्यायचे आहे .

माथेरानला एक दिवस भटकून आलो. त्यातील क्षणचित्रे 1) माथेरान क्षणचित्रे १७ जानेवारी२०२६ https://youtu.be/R94HlpnUGLg 2) Matheran videos 2026_01_17 https://youtu.be/FWV-sRTrOaM

In reply to by कंजूस

बरेच दिवस झाले माथेरानला जाऊन . जायला हवे एकदा . तशी तर नववर्षात मुंबई आणि मुंबईजवळच्या ठिकाणांची उजळणी सुरु झाली झाली आहे . नातीला प्राणी - पक्षांची ओळख व्हावी म्हणून राणीच्या बागेला भेट देऊन झाली .

In reply to by टर्मीनेटर

नात खूप गोड आहे तुमची हो , आहेच गोड. थोडा वेळ लागतो नवीन लोकात मिसळायला पण नंतर खूप बडबड करते.

In reply to by गोरगावलेकर

वाघाचे फोटो छान मिळाले आहेत. विशेष म्हणजे पेन्ग्विनचे फोटो काढू देत नाहीत तरी कसे मिळाले?

In reply to by कंजूस

बंदी आहे पण मोबाईलचा फ्लॅश बंद ठेवून फोटो काढायला देत होते. मला एक सांगा याच धाग्यावर मी किंवा आणखी कोणी फोटो चढवत गेले तर धागा उघडायला जड जाईल का ? आणि असे होणार असेल तर ठराविक काळाने नवीन धागा काढा

In reply to by गोरगावलेकर

बरोबर आहे परंतू आतापर्यंत तुमच्याकडूनच आले आहेत फोटो. अजून टाकू शकता. धागा उघडेल सहज. मी म्हणतो की मिपाने हे एक सदरच चालू करावे त्यात { राजकारण सोडून} काही गंमतीशीर लिहिता येईल किंवा फोटोही देता येतील. काही वेळा दोन चार फोटोंसाठी नवीन धागा काढता येत नाही परंतू या सदरात करता येईल. मी भूजमध्ये मागच्या महिन्यात जाऊन आलो त्याचे काही फोटो टाकण्याचा विचार आहे. तिकडे रण पाहिले पण तंबुंमध्ये राहिलो नाही. खूप महाग आहे. भूजमध्येच राहिलो. मी स्लाइडशोची लिंकच देणार आहे. मोबाईलमध्ये मी ही apps वापरतो. विडीओ क्लिप्स जोडण्यासाठी ... VN - AI Video Editor ( Ubiquity Labs L.L.C.) https://play.google.com/store/apps/details?id=com.frontrow.vlog विडिओ किंवा ओडिओमध्ये काटछाट करण्यासाठी.... Video to Audio - MP3 Cutter ( InShot Inc https://play.google.com/store/apps/details?id=mp3videoconverter.videoto… फोटोंचे स्लाईडशो करण्यासाठी... Video Editor and Maker - Inshot ( InShot Video Editor) Video Guru https://play.google.com/store/apps/details?id=com.camerasideas.instashot

In reply to by गोरगावलेकर

मस्त फोटो. आवडले. राणीच्या बागेतील वाघ मस्त आहे. मधून मधून दर्शन द्यायला आल्यासारखा काचेजवळ येतो :)

१.हल्ली मी कुटुंबाचे फोटो अगदी निवडून त्यातले दहा बारा प्रिंट मारतो. एका पिडीएफ पेजवर दोन फोटो आणतो आणि त्याची फोटोग्राफिक पेपरवर प्रिंट काढून आणतो. ( वीस रुपये/पेज). माझ्याकडे एक app आहे ( होतं) त्यात दहा बारा mb size ची पीडीएफ करता येत असे. प्रिंटसाठी चांगली. पण ते app आता play store वरून गायब झाले. App चं नाव Print Adjuster. याची apk file करून नवीन फोनात टाकली पण मूळ app सारखं काम होत नाहीये. सगळ्या चांगल्या appची अशीच वाट लागते. २. हेच काम word >> pdf करता येतं पण रेझलूशन फार कमी होतं. ३. गूगल फोटोज् मधून चांगल्या फुल साईजची पीडीएफ करता येते ही एक चांगली गोष्ट आहे ....पण एका पेजवर एकच मोठा फोटो टाकता येतो. ४. इतर साध्या फोटोंच्या slideshow करून यूट्यूबवर टाकतो. विडिओ सर्व किंवा पाच पाच जोडून तेही यूट्यूबवर टाकल्यावर फोनची मेमरी रिकामी करता येते. करून पाहा. हल्ली मेमरी कार्ड्स महाग होत आहेत आणि फोटो/ मिडिया स्टोरेज फ्री ( १५जीबी) देणारी फक्त गूगल उरली आहे. एक विडिओ राहिला ... 3) Matheran videos ( part 2) 2026_01_17 https://youtu.be/8MJF1pfdOyc