✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी: जानेवारी २०२६

क
कांदा लिंबू यांनी
गुरुवार, 01/01/2026 - 00:06  ·  लेख
लेख
सर्व मिपाकरांना नववर्षाच्या शुभेच्छा! सर्वांना नवीन वर्ष सुख समाधान समृद्धीचे जावो ही श्री चरणी प्रार्थना. या महिन्यात महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणूक होत आहेत. त्यांत नेहमीप्रमाणे "स्थानिक निवडणुकांत उमेदवारांना व मतदारांना पक्ष-आघाडी-युती यांचे अडथळे नसतात" ही बाब ठळक करणाऱ्या घटना घडत आहेत. तीन वर्षांपूर्वी चॅटजीपीटीच्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वसामान्यांच्या पुढ्यात अवतरली होती; आता तिचे स्वरूप अधिकच व्यापक झाले आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात त्याबद्धल काही नवे बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे. यावर्षीच्या दिवाळीआधी सोने दोन लाखांचा आकडा पार करून जाईल हे नक्की. * कांदा लिंबू
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21217 वाचन

💬 प्रतिसाद (228)

प्रतिक्रिया

परंतु अभ्यास असेल आणि थोडा

सुबोध खरे
Tue, 01/13/2026 - 19:29 नवीन
परंतु अभ्यास असेल आणि थोडा धोका पत्करण्याची तयारी असेल तर, कमोडिटी, एक्विटी डेरीवेटीव , आणि क्रिप्टो करन्सी ह्यात सट्टा लावून थोडेफार पैसे कमावता येतील. दीर्घकालीन मंदी असताना derivatives मधून पैसे कमावणे फार कठीण नसते. हे म्हणजे नेसूचे सोडून डोक्याला गुंडाळणे आहे. असे केवळ डोक्यावर पडलेली माणसे करू शकतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

ते तर सध्याच्या केंद्र

आग्या१९९०
Tue, 01/13/2026 - 20:05 नवीन
ते तर सध्याच्या केंद्र सरकारने कधीच केले आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सोने? स्थावर मालमत्ता?

स्वधर्म
Tue, 01/13/2026 - 20:06 नवीन
सोनेही खूप महाग झालेले आहे. राहता राहिले फ्लॅट किंवा जागेतील गुंतवणूक. सगळीकडून आत आलेल्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूकीचे पर्याय काय असतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

दीर्घकालीन मंदीत सोने ठीक आहे

आग्या१९९०
Tue, 01/13/2026 - 20:26 नवीन
दीर्घकालीन मंदीत सोने ठीक आहे, फ्लॅट किंवा जागेतील गुंतवणूक फार काही परतावा देऊ शकत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

मागील दहा वर्षापासून आपल्या

आग्या१९९०
Fri, 01/16/2026 - 20:58 नवीन
मागील दहा वर्षापासून आपल्या केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल मी कायम साशंकच होतो, आता जवळजवळ खात्रीच झाली आहे की हे सरकार चालत नसून दुसरेच कोणी चालवत आहे. इराणच्या चाबाहर बंदर योजनेतून भारत माघार घेत आहे. कोणाच्या दबावाखाली ही माघार घेत आहे सरकार? कोण चालवत आहे भारत सरकार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

इराणच्या चाबाहर बंदर योजनेतून

सुबोध खरे
Sat, 01/17/2026 - 12:58 नवीन
इराणच्या चाबाहर बंदर योजनेतून भारत माघार घेत आहे. हे कोणी तुमच्या कानात सांगितलं? India Says Exiting Iran's Chabahar Port Is "Not An Option" https://www.ndtv.com/world-news/india-says-exiting-irans-chabahar-port-is-not-an-option-why-it-matters-10767752
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

विगुंनी सांगितले. रशियन तेल

आग्या१९९०
Sat, 01/17/2026 - 14:04 नवीन
विगुंनी सांगितले. रशियन तेल आणि चाबाहर बंदरचे डमरू ट्रम्प वाजवत आहे. आपला नागोबा डसायचे सोडून त्यावर नाचत आहे. एप्रिल अखेरपर्यंत हा नाच चालू राहील. :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

व्हेनेझ्येलाचे कित्येक टन

विजुभाऊ
गुरुवार, 01/08/2026 - 17:16 नवीन
व्हेनेझ्येलाचे कित्येक टन सोने इबँक ऑफ इंग्लंड मधे पडून आहे. त्याची मालकी कोणाची यावर आता वाद सुरू आहेत
  • Log in or register to post comments

वसाहती करण्याचा नवा प्रकार

कंजूस
गुरुवार, 01/08/2026 - 18:37 नवीन
वसाहती करण्याचा नवा प्रकार आणि उद्योग.
  • Log in or register to post comments

हे जर खरं असेल तर आज माझ्या

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/08/2026 - 18:51 नवीन
हे जर खरं असेल तर आज माझ्या इतका आनंदी कुणीही नाही! अन्याय विरुद्ध लढणाऱ्या ममता बनर्जींबद्दल आणखी आदर वाढला! उद्धव ठाकरेंनी वेळीच अशी पाऊले उचलली असती तर त्यांच्या विरुद्ध अनैतिक लोक जिंकू शकले नसते! जशा तसे उत्तर देण्याची धमक ममता बॅनर्जींमध्ये आहे हे पाहून ममतांबद्दल अभिमान वाटला. जिओ ममता दीदी! धाडी वर धाड आज बंगाल मध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या आयटीसेल ऑफिस वर इडीने रेड टाकली. काहीही करुन, जमल्यास #घरेलु_युद्ध करून, भाजपच्या पश्चिम बंगाल मध्ये सत्ता पाहिजे आहे त्या साठी ते पुरावे शोधत आहेत दहशत पसरवत आहेत. ममता पण काही कमी नाही, तिने रेड चालु असताना 25000 हजार पक्ष कार्यकर्ते 100 गाड्या आणि 2000 हत्यारबंद पोलीस घेऊन, ज्या दोन बिल्डींग मध्ये रेड चालली होती, त्याना घेराव घातला. ती स्वतः आत गेली आणि इडीने ताब्यात घेतलेले रेकॉर्ड ताब्यात घेऊन इडी कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परत पाठवल. या **व्याना जशास तसेच उत्तर दिले पाहिजे परिणामांची तमा बाळगुन उपयोग नाही. (आधारित) Arun Dixit https://www.facebook.com/share/1D8RWQr2Wo/
  • Log in or register to post comments

छान. :)

शाम भागवत
गुरुवार, 01/15/2026 - 10:37 नवीन
छान. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ममता दिदिंना सुप्रिम कोर्टाने

शाम भागवत
गुरुवार, 01/15/2026 - 22:20 नवीन
ममता दिदिंना सुप्रिम कोर्टाने वैयक्तिक नोटीस पाठवण्याचा आदेश दिलाय. काही पोलीस अधिकाऱ्यांनाही नोटीसा जारी होणार आहेत. परिणामांची तमा न बाळगता ममतादीदी या नोटीसा कचऱ्याच्या टोपलीत टाकणार का? ते आता बघायचं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ममता दीदीनी निवडणूक रणनीती

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/15/2026 - 22:41 नवीन
ममता दीदीनी निवडणूक रणनीती चोरण्याचा डाव उधळून लावला, अश्या नोटिसीना घाबरणाऱ्या त्या नाहीत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

छान.

शाम भागवत
गुरुवार, 01/15/2026 - 22:52 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

इराण मधील घडामोडी?

कांदा लिंबू
Sun, 01/11/2026 - 20:51 नवीन
इराणमधल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खालील बातमी वाचनात आली. इराणमधल्या घडामोडींची वास्तव माहिती देऊ शकणाऱ्या मिपाकरांनी इथे लिहावे ही विनंती. AppBodies Piling Up, Morgues Full: Iran's Hospitals Under Pressure Amid Protests
  • Log in or register to post comments

इराणमधल्या {आणि जगातल्या}

कंजूस
Wed, 01/14/2026 - 05:44 नवीन
इराणमधल्या {आणि जगातल्या} घडामोडींची वास्तव माहिती देणाऱ्या...... या साईट्सवर भरपूर माहिती मिळते. यांचे टीवी चानेल्सही आहेत. France 24 site https://www.france24.com/en/ Al Jazeera site https://www.aljazeera.com/ Hindustan Times app सुद्धा पाहता येईल. निवडक बातम्या भारतातील आणि जगातील सर्व क्षेत्रातील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कांदा लिंबू

वास्तव

निनाद
Fri, 01/16/2026 - 07:55 नवीन
वास्तव माहिती च्या यादीत Al Jazeera चे नाव पाहून अं गमत वाटली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

महापालिका निवडणूक

चंद्रसूर्यकुमार
Wed, 01/14/2026 - 21:00 नवीन
उद्या महापालिका निवडणुकांसाठी मतदान आहे. राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या मुंबई महापालिका सगळ्यात महत्वाची. माझे स्वतःचे मतदार म्हणून नाव मुंबईत नाही. तरीही त्या कारणाने मला आमच्या मनपापेक्षा मुंबई मनपामध्ये जास्त रस आहे. मुंबई महापालिकेत कोणीही निवडून आले तरी कंत्राटे देताना कमिशन खाणे, बिल्डरांशी संगनमत करून बेसुमार अनधिकृत बांधकामे करणे वगैरे प्रकार चालूच राहणार आहेत. महापालिकेत कोणीही निवडून आले तरी मुंबई शहर ४०-५० वर्षात बुडणार आहे असे म्हणतात ते काही बदलेल असे वाटत नाही. तरीही २०१९ मध्ये उबाठा सेनेने केलेला विश्वासघात पुढच्या जन्मीही विसरणे अशक्य असल्याने दोन्ही ठाकर्‍यांच्या सेनांचा पुरता धुव्वा उडावा अशी मनोमन इच्छा आणि उबाठासेना आणि मनसे ही दुर्गंधी महाराष्ट्रातून कायमची हद्दपार व्हावी ही सदिच्छा. १६ तारखेला मतमोजणीत मला जे व्हायला हवे ते झाल्यास अन्यथा भरपूर पेढे आणले असते. पण गेल्या आठवड्याभरापासून आमचा बोका हरवला आहे. आजूबाजूला सगळीकडे शोधूनही तो मिळालेला नाही. तो आमच्या घरचा एक सदस्य असल्याप्रमाणेच असल्याने तो हरविल्याचे अपार दु:ख आहे. तो जर आज रात्री-उद्यापर्यंत परतला नाही तर मात्र पेढे आणणार नाही :(
  • Log in or register to post comments

पण गेल्या आठवड्याभरापासून

अमरेंद्र बाहुबली
Wed, 01/14/2026 - 21:50 नवीन
पण गेल्या आठवड्याभरापासून आमचा बोका हरवला आहे. मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

:)

शाम भागवत
Wed, 01/14/2026 - 21:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बोका सुखरूप घरी परतला

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 01/15/2026 - 15:49 नवीन
ईश्वरकृपेने आमचा बोका थोड्या वेळापूर्वी सुखरूप घरी परतला आहे. तो ७ तारखेला संध्याकाळी हरवला होता म्हणजे जवळपास ८ दिवस तो बाहेर होता. अर्थात ही काही ताज्या घडामोडींमध्ये लिहायची बातमी नाही पण तो हरविल्याचा उल्लेख वर केला होता आणि त्यावर थोडीफार हलकीफुलकी चर्चा झाली म्हणून इथे लिहित आहे. आता उद्या मनासारखे निकाल लागल्यास पेढे आणायचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेही पेढे आणणारच आहे- बोका परत आल्याचे. मनासारखे निकाल लागल्यास दुप्पट पेढे :)
मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल.
नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे असते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

नक्की कोणाला मत दिले हे

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/15/2026 - 16:53 नवीन
नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे असते :) निदान बोक्यासाठी का होईना, पण तुम्ही सत्याची साथ धरली, मशाल पंजा इंजिनाला साथ दिली त्यामुळे बोका परत मिळाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

:)

शाम भागवत
गुरुवार, 01/15/2026 - 17:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

नक्की कोणाला मत दिले हे सांगणार नाही कारण आपले मत गुप्त ठेवायचे

धर्मराजमुटके
गुरुवार, 01/15/2026 - 19:25 नवीन
चंद्रसुर्यकुमार, मतदान गुप्त असले तरी आपण कोणाला मत दिले हे सांगणे म्हणजे कायद्याचे उल्लंघन नसावे असा माझा समज आहे. (तो चुकीचा देखील असू शकेल.) ज्याला आपण कोणाला मत दिले हे सांगण्याची भिती वाटत असेल त्याने नाही सांगीतले तर समजण्यासारखे आहे. मी नगरभक्षक पदाच्या निवडणूकीत नेहमी नोटा ला मतदान करतो आणी शक्यतो त्याचा प्रचार देखील करतो. एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या डबल पेढे वाटपाला अनुमोदन देत आहेत. उद्या काय ते समजेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सहमत! मतदान विचारू नये

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/15/2026 - 20:01 नवीन
सहमत! मतदान विचारू नये म्हणतात, पण आपण कुणाला मत दिले हे सांगू शकतो की, मागे मला सांगू नये असा संकेत आहे असे कुणीतरी सांगितले होते, पण असे संकेत मी पायदळी तुडवतो. आता हेच पहा ना. ह्यावेळी मी ४ वेगवेगळ्या पक्षांना मत दिले, १) घड्याळ २) मशाल, ३ ) पंजा चौथे कुणाला द्यावे हे सुचत नव्हते धनुष्यबाण नी कमळ दाबणार नव्हतोच मग गैस सिलेंडर दाबायला बोट सरसावले पण त्याच्या वरच झाडू दिसला, केजरीवाल आठवले नी चौथे मत झाडूला दिले. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/15/2026 - 20:03 नवीन
एक्झिट पोल सध्या तरी तुमच्या डबल पेढे वाटपाला अनुमोदन देत आहेत. 'फुल घोटाळा चालू आहे' घड्याळचं बटण दाबलं अन् कमळासमोर..., पिंपरीतला VIDEO व्हायरल https://dhunt.in/138L16 By News 18 लोकमत via Dailyhunt गडबड??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

बातमी पाहिली पण

धर्मराजमुटके
गुरुवार, 01/15/2026 - 22:42 नवीन
बातमी पाहिली पण घड्याळाचं बटन दाबल्यावर कमळाला मत जातयं अस काही दिसलं नाही. एखादी चित्रफीत असती तर काही जास्तीची माहीती मिळाली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बोका सापडावा

कपिलमुनी
Wed, 01/14/2026 - 22:39 नवीन
बोका सापडावा ही सदिच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

भाजप व शिंदे सेना या दोघांना

शाम भागवत
Wed, 01/14/2026 - 22:50 नवीन
भाजप व शिंदे सेना या दोघांना उबाठा मनापासून संपवायची आहे. शिंदेंना उबाठा परत उभी राहिली तर भविष्य फारसं राहाणार नाही. तर भाजपाला आपली हिंदू व्होट बॅंक वाढवायची फार मोठी संधी उबाठानी मिळवून दिली आहे. त्यामुळे शिंदेची मते भाजपाला व भाजपाची मते शिंदेंना परफेक्ट हस्तांतर होणार यात वाद नाही. परिणामी शिंदेसेना व भाजपाचा स्ट्राईक रेट जबरदस्त असणार आहे. जर मतदान टक्केवारी वाढली तर अफलातून निकाल येतील असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

भाजप व शिंदे सेना

कपिलमुनी
गुरुवार, 01/15/2026 - 09:04 नवीन
भाजप व शिंदे सेना या दोघांना उबाठा मनापासून संपवायची आहे. चूक भाजपला सेना, शिंदे सेना, आपा राष्ट्रवादी, श प राष्ट्रवादी हे सगळ संपवायचा आहे हा बकासुर आहे . याला सगळच खायच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

हो:)

शाम भागवत
गुरुवार, 01/15/2026 - 10:35 नवीन
हो:) पण सध्याची प्रायोरिटी उबाठा एकावर एक फ्री योजनेत मनसेपण संपणारेय. बाकीचं बघू पुढच्या निवडणुकांत. काय घाई आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मशाल किंवा रेल्वे इंजिन किंवा पंजा दाबा बोका परत येईल.

धर्मराजमुटके
Wed, 01/14/2026 - 22:03 नवीन
नाही बरंका. त्यांचा बोक्याला राजकीय समज असेल तर तो नक्कीच भाजपा नाहितर शिंदेसेनेच्या वळचणीला जाऊन सत्तेचे लोणी खाईल. सो कॉल्ड मराठी असेल तर उबाठा आणी मनसे कडे गेल्याची शक्यता आहे. १६ तारखेनंतर बोक्याची घरवापसी होईल असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

जो पंजा, मशाल किंवा रेल्वे

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/15/2026 - 01:01 नवीन
जो पंजा, मशाल किंवा रेल्वे इंजिन दाबेल त्याचा बोका परत येईल, जो दाबणार नाही त्याची मांजर पळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

खिक्क.

कंजूस
गुरुवार, 01/15/2026 - 11:15 नवीन
खिक्क.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

बोका नवा घरोबा करेल आणि बोकी

कंजूस
गुरुवार, 01/15/2026 - 11:15 नवीन
बोका नवा घरोबा करेल आणि बोकी पिल्ले घालायला नवीन घर शोधेल. टोपली तयार ठेवा.
  • Log in or register to post comments

महाराष्ट्रात काही ठिकाणी

आग्या१९९०
गुरुवार, 01/15/2026 - 13:25 नवीन
महाराष्ट्रात काही ठिकाणी मतदारांच्या बोटाला शाईऐवजी मार्करनी शाई लावली जाते, जी सहज पुसली जाते. चांदी महाग झाल्याने हा निर्णय घेतला की काय अशी शंका येतेय. " आमची श्याई " :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आधी त्यानी विकास करू सांगून

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 01/15/2026 - 17:00 नवीन
आधी त्यानी विकास करू सांगून जनतेला चूना लावला, मग निवडणूक आयोगाचा अध्यक्ष नेमायची पद्धत बदलून “आपला माणूस” बसवला, तरीही हरू लागल्या मूळ गुजरातहून मागवलेली मतदान यंत्रे सेट केली, मतदान यंत्र बनवणाऱ्या कंपनीत आपले डायरेक्टर बसवले व निवडणूक जिंकल्या, विरोधक हुशार झाले व मतदान यंत्रणांवर लक्ष देऊ लागले, मतदान यंत्रे ठेवलीत तिथे पहारा देऊ लागले, मग मतदान यंत्रे सेट करणे जमेना, मग आता तलवारीने हल्ला, गोळीबार, करोडोंची ऑफर अश्या प्रकारे विरोधक संपवू लागले, तरीही विरोधक लढलेच, मग शाई ऐवजी मार्कर आणला म्हणजे पुसून डुप्लिकेट वोटिंग करता यावी, हाही प्रयत्न विरोधक हाणून पाडतील. आता नवीन काय आयड्या आणतात पाहूयात! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

एखाद्या अशिक्षित माणसाने असा

विवेकपटाईत
Fri, 01/16/2026 - 17:09 नवीन
एखाद्या अशिक्षित माणसाने असा प्रतिसाद दिला असता तर काहीही वाटले नसते. ईव्हीएम मध्ये काहीही गडबड करता येत नाही. मतदान पूर्वी पन्नास पन्नास शंभर शंभर मते एजंट टाकून पाहतात. सर्वपक्षीय एजंट संतुष्ट झाल्यानंतरच वटिंग होते. वोटिंग झाल्यावर पुन्हा सील होते. ईव्हीएम मध्ये गडबड करणे अशक्य आहे. खरे कारण लोकांना विकास दिसतो. नागपूर मध्ये झालेला विकास लोकांना दिसत होता म्हणून तिथे 20% मुस्लिम असूनही भाजपला मतदान केले. मुंबईमध्ये मेट्रो जाणारे मध्यमवर्गीय मराठी लोक भाजपाला मत देतील किं ज्याने मेट्रो थांबून ठेवली त्यांना मत देतील. तुम्हीच विचार करा. जर मुंबईकरांनी 50 टक्के ऐवजी 60 टक्के मतदान केले असते तर महायुतीला १७५ जागाही मिळाल्या असत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

ईव्हीएम मध्ये काहीही गडबड

अमरेंद्र बाहुबली
Fri, 01/16/2026 - 17:23 नवीन
ईव्हीएम मध्ये काहीही गडबड करता येत नाही. तसे आहे तर भाजप नेत्यांच्या गाड्यांमध्ये ईव्हीएम का सापडतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

आदरणीय ईव्हीएमची आठवण म्हणून

कंजूस
Fri, 01/16/2026 - 17:39 नवीन
आदरणीय ईव्हीएमची आठवण म्हणून बॅटऱ्या तशा दिसणाऱ्या करून घेतल्या असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कुठे त्या भुजबळांच्या नादाला

सुबोध खरे
Sat, 01/17/2026 - 13:02 नवीन
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय? कळफलक दिसला कि बडवायलाच पाहिजे अशी वृत्ती असलेल्या माणसाशी कशाला वितंडवाद घालण्यात कालापव्यय करताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

खरं बोलल की सख्या आईलाही टॅग

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/17/2026 - 13:12 नवीन
खरं बोलल की सख्या आईलाही टॅग येतो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरं बोलल की सख्या आईलाही राग*

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/17/2026 - 13:12 नवीन
खरं बोलल की सख्या आईलाही राग* येतो! :) डॉक साहेब, तुम्ही तर भाजप समर्थक आहात! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्ही सुज्ञ आहात असं

सुबोध खरे
Sat, 01/17/2026 - 18:35 नवीन
तुम्ही सुज्ञ आहात असं तुम्हाला वाटतंय ना? मग हे इ व्ही एम, इ डी, निवडणूक आयोग, मत चोरी, पक्षपाती सर्वोच्च न्यायालय याचं तुणतुणं वाजवणं बंद करून स्वच्छ मनाने विचार करा कि श्री मोदी गेली २५ वर्षे सलग का जिंकून येत आहेत. भाजपच्या १०५ आमदार पैकी एकही फुटला नाही पण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष का उभे फुटले? एवढा गंभीर विचार झेपत नसेल तर इ व्ही एम, इ डी, निवडणूक आयोग, मत चोरी, पक्षपाती सर्वोच्च न्यायालय याचं तुणतुणं चालू द्या. नाही तरी संजय राऊत यांनी शिवसेनेला रसातळाला नेण्याचा पण केला आहे त्या सारखं मिपाला तुम्ही रसातळाला नेण्याचा पण केला आहेच. ते चालू द्या. मला आपल्या बदल अजिबात राग नाही. कारण मी आपल्याला मुळात सिरियसली घेतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भाजपच्या १०५ आमदार पैकी एकही

अमरेंद्र बाहुबली
Sat, 01/17/2026 - 20:40 नवीन
भाजपच्या १०५ आमदार पैकी एकही फुटला नाही कारण त्यांना इडी त्रास देत नव्हती. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष का उभे फुटले? इडी, निवडणूक आयोग, भाजप ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन नी त्रास देऊन फोडले.
एवढा गंभीर विचार झेपत नसेल तर इ व्ही एम, इ डी, निवडणूक आयोग, मत चोरी,
कारण ईव्हीएम सेट केले जातात, निवडणूक आयोग पक्षपाती पण करतो, (भाजप हरेल म्हणून गिरीश बापट गेल्यावर वर्षभर पुणे लोकसभेची निवडणूक घेतली नाही पण पंजाबमध्ये घेतली होती) अनेक उदाहरण आहेत, मत चोरी केली जाते हे खोटे का? नाही तरी संजय राऊत यांनी शिवसेनेला रसातळाला नेण्याचा पण केला आहे संजय राऊतनी शिवसेना वाचवली नाहीतर शिवसेनेची गोमंतक पार्टी, आसाम गण परिषद, अकाली दल, जनता दल झाली असती! मिपाला तुम्ही रसातळाला नेण्याचा पण केला आहेच निवडणूक आयोग नी भाजप बद्दल चार खर्या गोष्टी लिहिल्या तर मिपा कसे रसातळाला जाते ब्वा? लॉजिक हम शरमिंदा है, तेरे कातिल जिंदा है. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

इराणच्या बँकांनी मोठ्या

मदनबाण
गुरुवार, 01/15/2026 - 15:15 नवीन
इराणच्या बँकांनी मोठ्या प्रमाणात अर्थिक सतर्केता वाढवण्यास सुरुवात केल्याची बातमी माझ्या नजरेस आली होती,इराण मध्ये बदल घडणार!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Powerhouse... : | Coolie |
  • Log in or register to post comments

संभाजीनगर आत एका केंद्रावर

कंजूस
गुरुवार, 01/15/2026 - 18:09 नवीन
संभाजीनगर आत एका केंद्रावर साडेपाच नंतर मतदार आले आणि आता सोडा म्हणू लागले. फाटक बंद झाले आणि बाचाबाची. मग आतमध्ये दाखवले तर शंभरेक मतदार होते. त्यांचं मतदान होणार साडेसहा पर्यंत. मुंबईत कुलाब्यालाही खूप मतदार साडेपाचच्या अगोदर आलेले दाखवले. शेवटच्या तासात बरेच मतदान होणार आहे. यावेळी पुण्यात लढाई भाजप विरुद्ध राष्ट्रवादी ( अजित पवार गट) अशी झाली असं ndtv मराठी चानेल ( राहुल कुलकर्णी)सांगतो आहे.
  • Log in or register to post comments

तशीच होणार होती.

शाम भागवत
गुरुवार, 01/15/2026 - 19:26 नवीन
तशीच होणार होती. शिंदे, मनसे व उबाठा यांचा भविष्यकाळ फक्त आणि फक्त बीएमसी वर अवलंबून आहे. नाही म्हणायला शिंदेंकडे ठाणे हे एक जास्तीचे भांडवल आहे. अजितदादा, शरद पवार व सुप्रियाताई या सगळ्यांचा आधार पुणे व पिंपरी चिंचवड आहे. तो गेला तर भविष्य फारसे उज्वल असणार नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

मनकर्णिका घाट

कपिलमुनी
गुरुवार, 01/15/2026 - 23:12 नवीन
अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला ऐतिहासिक मनकर्णिका घाट अधर्मी , हिंदू द्वेषी सरकारने तोडला. मंदिरे, मूर्ती यांची तोडफोड केली. आता तिथे टाईल्स बसवतील.
  • Log in or register to post comments

अर्र

शाम भागवत
Fri, 01/16/2026 - 00:27 नवीन
अर्र हे मतदान संपायच्या अगोदर यायला पाहिजे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा