Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/12/2025 - 17:24
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. एका प्लंबरच्या घरी १० फूट लांब नाग घुसला होता. प्लंबरने अक्कल हुशारीने नागाला पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना नक्की कुठे घडली याची कल्पना नाही. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/plumber-catches-10-foot-king-cobra-inside-a-house-shocking-wildlife-video/articleshow/123254987.cms?story=1 वर
  • Log in or register to post comments
  • 23936 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 08/12/2025 - 17:53

Permalink

हे धागे म्हणजे वंध्यामैथुन

हे धागे म्हणजे वंध्यामैथुन आहेत. ह्यातून फक्त टाइमपास होतो, काही नवीन काही सुंदर उत्पन्न होत नाही. लोकं ओढून ताणून राजकारणावर येतात अन् नेहमीचेच तेच ते चर्वितचर्वण करत राहतात. 2029 पर्यंत निवडणूक होणार नाहीयेत, हे लोकं स्वतः ला का उगाच त्रागा करून घेतात देव जाणे. मिपावरील लेख वाचून , लिहून काही क्रांती होणार आहे का ? शिवाय सर्वांना माहिती आहे की स्वधर्म , कपिलमुनी, आग्या, बाहुबली हे आयडी काय प्रतिसाद देणार , अन् डॉक्टर खरे , गा.पै , मुवि, चंसुकु किंवा श्रीगुरुजी काय प्रतिसाद देणार ! आणि संपादक मंडळ कोणाचे प्रतिसाद उडवणार अन् कोणाचे प्रतिसाद दुर्लक्षित करणार . लोकांना आपापले गट चांगले कळून चुकले आहेत. आणि संपादकांचे बायस देखील ! शश्प काही उपयोग नाही ह्या चर्चांचा. # आज फ्री वेळ आहे म्हणून प्रतिसाद टाकला. न पटल्यास दुर्लक्षित करणे :))))
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 08/13/2025 - 09:51

In reply to हे धागे म्हणजे वंध्यामैथुन by प्रसाद गोडबोले

Permalink

सहमत आहे

हे धागे म्हणजे वंध्यामैथुन आहेत.
सहमत आहे. खरं तर मिपावरील सगळेच धागे- खरं तर जगातील सगळेच वंध्यामैथुन आहेत.
ह्यातून फक्त टाइमपास होतो, काही नवीन काही सुंदर उत्पन्न होत नाही.
सहमत आहे.
लोकांना आपापले गट चांगले कळून चुकले आहेत. शश्प काही उपयोग नाही ह्या चर्चांचा.
नसतोच. दुसर्‍या एका धाग्यात तुम्ही बालविवाहाचे समर्थन केलेत त्यातून किती जणांची मते बदलली?तुमचा तो प्रतिसाद वाचून मिपावर एखाद्या जरी सदस्याचे मतपरीवर्तन झाले असले तरी मला आश्चर्य वाटेल.
2029 पर्यंत निवडणूक होणार नाहीयेत,
नाही कशा? आता काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या आणि बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत. मे २०२६ मध्ये आसाम,पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ विधानसभांच्या, मार्च २०२७ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गोवा विधानसभांच्या, डिसेंबर २०२७ मध्ये गुजरात विधानसभांच्या आणि डिसेंबर २०२८ मध्ये मध्य प्रदेश, छत्तिसगड आणि राजस्थान विधानसभांच्या निवडणुका आहेत की. तसेच उत्तर पूर्व भारतातील काही राज्यांच्या निवडणुका पण होणार आहेत पण आसाम वगळता अन्य राज्यांविषयी मला फारशी माहिती नसल्याने त्या निवडणुका फॉलो करत नाही. अशा निवडणुका मधूनमधून कुठेकुठे होतच असतात. मग २०२९ पर्यंत निवडणुक कशी होणार नाही? निवडणुकांमध्ये प्रचंड रस घेत असल्याने अशा निवडणुका मधूनमधून झालेल्या मला तरी आवडतातच. या कारणासाठी वन नेशन वन इलेक्शन व्हायला नको असे मला वाटते :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 08/13/2025 - 10:17

In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार

Permalink

उगाचच

उगाचच ओढून ताणून द्यायचा म्हणून प्रतिसाद दिलाय का तुम्ही ? बेकार हसतोय :))) सगळेच वंध्या मैथुन नसते. मिपावरील कित्येक लेख निखळ आनंद देणारे असतात. कित्येकदा त्यातून नवीन समविचारी लोकांची गाठभेट होते, mipa बाहेर ट्रिप , ट्रेक , कट्टे, खादाडी वगैरे आनंददायक गोष्टी घडतात ! सर्वच लेखन वंध्या मैथुन नसते. माझ्या कित्येक मित्रांच्या कविता अशा आहेत की ज्या आयुष्यावर कायमचा प्रभाव टाकून गेल्या आहेत.
तुम्ही बालविवाहाचे समर्थन केलेत
मी निसर्गानुसार वयात आलेल्या, निसर्गाच्या अनुसार प्रजोत्पादनासाठी तयार झालेल्या लोकांना रीतसर संतती उत्पन्न करण्याची अनुमती असावी, आणि त्यासाठी आधीपासूनच विवाहादी कृत्रिम संस्कारांची तयारी करावी असे माझे वैयक्तिक मत मांडले आहे. उगाच गैरसमज नको म्हणून स्पष्टीकरण देत आहे. निसर्गाच्या नियमाने वयात आलेल्या व्यक्तींना बाल म्हणणे हा लोकांचा अभिनिवेश आहे , दुसरं काही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Wed, 08/13/2025 - 11:31

In reply to उगाचच by प्रसाद गोडबोले

Permalink

श्री० गोडबोले यांचा वैचारिक गोंधळ

नामस्मरणाचे माहात्म्य सांगणार्‍या व्यक्तीच्या विचारात स्पष्टता येणं अपेक्षित आहे (कारण नामस्मरणाने बुद्धीला स्थैर्य येणं अभिप्रेत आहे) पण इथे तसं झालेलं दिसत नाही. शरीराने मुलं करण्यासाठी तयार झाल्याने एखादी व्यक्ती आई-वडील होण्यासाठी *सर्व बाजूंनी* तयार झाली आहे, आणि समाजाने बनवलेले नियम (वयोमर्यादा, लग्न) हे फक्त अनावश्यक अडथळे आहेत" हे म्हणणे तर्कशुद्ध नाही. शरीराची तयारी ही फक्त एक पायरी आहे. त्याव्यतिरिक्त मेंदूची परिपक्वता, भावनिक स्थिरता, आर्थिक सामर्थ्य, सामाजिक जबाबदारी आणि जीवनाचा अनुभवयांचीही तितकीच गरज असते, जी केवळ वयात आल्याने मिळत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 08/13/2025 - 13:14

In reply to श्री० गोडबोले यांचा वैचारिक गोंधळ by युयुत्सु

Permalink

इथं नामस्मरणाचा काय संबंध =))

इथं नामस्मरणाचा काय संबंध =)))) आता जिथल्या तिथं प्रतिसाद द्यायचं ठरवलं आहे मी . नाहीतर लोकं म्हणतील "हमारे धागे का TRP चुराया है." तस्मात् तुमच्या धाग्यावर बोलू ह्या विषयी.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 08/13/2025 - 15:07

In reply to श्री० गोडबोले यांचा वैचारिक गोंधळ by युयुत्सु

Permalink

=))

नामस्मरणाचे माहात्म्य सांगणार्‍या व्यक्तीच्या विचारात स्पष्टता येणं अपेक्षित आहे =)) काहीही हं..हहपुवा झाली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Tue, 08/12/2025 - 20:27

Permalink

माणसं च्युईंग गम का खातात?

माणसं च्युईंग गम का खातात? कितीही चघळलं तरी पोटात काहीही जात नाही काही काळाने त्याचा स्वाद हि राहत नाही. असं झालं कि ते थुकून टाकायचं. मी काही प्रतिसाद टाकतो त्यावर आपले नेहमीचेच, मोरू ( मोदी रुग्ण), गोबर भक्त, खांद्याखाली बळकट इ लोक हिरीरीने प्रतिसाद देतात. ते लोक किती खालच्या पातळीवर उतरू शकतात याची मी गम्मत बघतो. आणि ,मग सोडून देतो. चार घटका बऱ्या जातात. त्यांचे मतपरिवर्तन होणारच नाही हेही माहिती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 08/13/2025 - 11:19

Permalink

हे धागे म्हणजे वंध्यामैथुन

हे धागे म्हणजे वंध्यामैथुन आहेत. ह्यातून फक्त टाइमपास होतो,
वंध्यामैथुन काय असते ते नेमके माहीत नाही. तुम्हाला असे म्हणायचे असावे की स्वसुख मिळवण्यासाठी एकतर्फी मैथुन (!) किंवा ज्यातून गर्भधारणा होणार नाही असे मैथुन. आंतरजालीय चर्चा या अशाच "काहीही ठोस निष्पन्न होऊ न शकणाऱ्या" किंवा "कोणतेही सोल्युशन निघू न शकणाऱ्या" कोणतीही पावर हातात नसलेल्या कोणीतरी (आमाला पावर नाय फेम आर्डरली साहेबांनी) केलेल्या पंचनामा चौकशी सदृश असतात. इथवर अतीव सहमत आहे. ह्यातून फक्त टाइमपास होतो यांच्याशीही अतीव सहमत आहे. पण पण पण.. अशा मैथुनातून देखील एक उत्कटबिंदू (यासाठी मिपावर कोणीतरी एकदम भारी शास्त्रीय शब्द काढला होता) गाठला जातो (किंवा जात असू शकतो). अन्यथा लोक ते करते ना. किंबहुना जगात आजकाल बरीच मैथुने अपत्यप्राप्तीस नेणारी नसलेली असतात, ज्यामुळे जग टिकून आहे. टाइमपास हा वाटतो तितका वाईट नसतो. टाइमपास होत असेल तर मी तसे होण्यास शंभरपैकी शंभर गुण देईन. एरवी कितीही काहीही केले तरी विश्वाच्या हिशोबात तो आपले स्टेशन येईपर्यंतचा टाइमपासच असतो. मग त्याला उत्पादक कार्य म्हणा, कलेची साधना म्हणा, सरकारी नोकरी म्हणा किंवा आयटीत करिअर म्हणून यश म्हणा.. टाइमपास वेगवेगळ्या दर्जाचे असतात इतकेच म्हणता येईल. तेव्हा वंध्यत्वास कमी लेखून किंवा अपत्यसंभव न होणाऱ्या मैथुनास टाइमपास समजून कमी लेखण्याशी व्यक्तिगत असहमती. क्लिंटन यांची प्रतिक्रिया वेगळ्याच लाईनवर गेली. त्यामुळे ते बालिष्टर म्हणून नाव काढण्यास अपात्र आहेत असे मत. ;) प्रगोशेठ आणि क्लिंटन.. हलके घ्या असे तुम्हाला काय सांगायचे. जुने जाणते तुम्ही. बाकी राजकारण हा विषय आला की जी कटुता, व्यक्तिगत वैर असल्यागत एकमेकांचे चावे घेणे, ओरखडे काढणे, चिखलफेक, अजीर्ण होईल इतके अजेंडासदृश लिहिणे, ट्रोलिंगचे हाताबाहेर चाललेले प्रमाण, ....,..., याची अलर्जी होऊन तशा चर्चांबद्दल अलिप्तता ऑलरेडी आली आहे. शेवटी कोणीतरी चावी मारणार, काडी सारणार, ढणढणे पेटवून देणार.. आणि मन आवरता न येणारे चांगले चांगले आयडी पतंगाप्रमाणे त्या आगीकडे झेप घेऊन भस्म होणार. शेवटी एकच कळकळीची विनंती.. राजेश घासकडवी यांच्या लेखाचे शीर्षक उसने घेऊन.. "डू नॉट फीड द ट्रोल्स"...
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 08/13/2025 - 13:18

In reply to हे धागे म्हणजे वंध्यामैथुन by गवि

Permalink

सहमत सहमत गवी सर.

सहमत सहमत गवी सर. मला फक्त राजकारण आणि गट 1 वि गट 2 अशी जी सतत तुंबळ हाणामारी चाललेली दिसते मिसळपाव वर ते पाहून वीट आला. काहीतरी नवीन लिहा असे सुचवायचे होते. खाली लगेच बाहुबली ह्यांनी सुरुवात केलेलीच आहे पहा =)))) बाकी वंध्या मैथुन ह्याला कमी लेखलेले नाही. उलट अपत्य प्राप्तीची रिस्क नसल्याने वंध्या मैथुन हा जास्त रिलॅक्स ,टेन्शन फ्री असतो असे मत जाताजाता नोंदवून ठेवतो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 08/13/2025 - 13:27

In reply to सहमत सहमत गवी सर. by प्रसाद गोडबोले

Permalink

खाली लगेच बाहुबली ह्यांनी

खाली लगेच बाहुबली ह्यांनी सुरुवात केलेलीच आहे पहा =)))) धागा वाचायची सक्ती आहे का? मी आणी माझ्यासारखे अनेक मीपाकर तुमचे धागे न वाचता स्कीप करतोच की, तुम्हाला किंवा मिपावर कुठे आम्ही हे सांगितले का? तुमच्या धाग्यांचे शीर्षक वाचले तरीही एखाद्याला भोवळ येईल, फक्त दगडाच्या काळजाचे लोकच ते धागे उघडून वाचू शकतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 08/13/2025 - 13:34

In reply to खाली लगेच बाहुबली ह्यांनी by अमरेंद्र बाहुबली

Permalink

स्पष्ट कबुली दिल्याबद्दल

स्पष्ट कबुली दिल्याबद्दल धन्यवाद =))))
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 08/13/2025 - 14:04

In reply to खाली लगेच बाहुबली ह्यांनी by अमरेंद्र बाहुबली

Permalink

सहमत आहे

धागा वाचायची सक्ती आहे का?
सहमत आहे.
मी आणी माझ्यासारखे अनेक मीपाकर तुमचे धागे न वाचता स्कीप करतोच की, तुम्हाला किंवा मिपावर कुठे आम्ही हे सांगितले का?
मी पण त्यातलाच.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 08/13/2025 - 15:12

In reply to सहमत आहे by चंद्रसूर्यकुमार

Permalink

हाहा! मुळात ज्याना

हाहा! मुळात ज्याना राजकारणाच्या चर्चा आवडत नाही, करायच्या नसतात त्यांनी ह्या धाग्यावर यावेच का? येऊन वर उपदेश करायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 08/13/2025 - 14:09

In reply to सहमत सहमत गवी सर. by प्रसाद गोडबोले

Permalink

नवीन गोष्टी

काहीतरी नवीन लिहा असे सुचवायचे होते.
तशा नवीन गोष्टी मी पण लिहित असतो. मागे फराह खानच्या घरच्या स्व्यंपाकघरात झुरळे जास्त झाली होती ती बातमी लिहिली होती. आज ३५ लाखांच्या पर्सविषयी पण लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Wed, 08/13/2025 - 14:46

In reply to नवीन गोष्टी by चंद्रसूर्यकुमार

Permalink

तुम्ही हे लेख विनोदी ढंगाने

तुम्ही हे लेख विनोदी ढंगाने लिहिता का ? तसे असल्यास ठीक आहे , आम्हीही मजा मजा करू मग =))))
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 08/13/2025 - 12:54

Permalink

शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठी

शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्याना पोलिसांकडूंन धक्काबुक्की करण्यात आल्याची बातमी आहे तर कोर्टाच्या आदेशाला झुगारून कबूतरखान्याची तोडफोड ताडपत्रीचे नुकसान करणाऱ्या जैन समुदायातील लोकांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र मराठी माणसाचा राहिलाय का? महाराष्ट्रात मराठी माणसावरच अन्याय सुरू झाला आहे, भाजपच्या राज्यात मराठी माणसावर त्याचार सुरू झाले आहेत असे दिसते. https://marathi.abplive.com/photo-gallery/news/mumbai-what-happened-with-marathi-ekikaran-samiti-s-govardhan-deshmukh-see-in-photos-1376858/amp
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 08/13/2025 - 12:56

In reply to शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठी by अमरेंद्र बाहुबली

Permalink

जर जैन समुदायाला पारव्यांची

जर जैन समुदायाला पारव्यांची इतकीच काळजी आहे तर जैन मंदिरात कबुतरखाने का सुरू करत नसावेत? सामान्य माणसाच्या आरोग्याशी कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन शस्त्र उचलण्याची भाषा करून का खेळले जात आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Wed, 08/13/2025 - 13:00

Permalink

वंध्यामैथुनाचे फायदे

मी काही डॉक्टर नाही, तरीपण थोडेफार वाचन आणि डॉ. शी झालेल्या चर्चेतुन समजते की वंध्यामैथुनाचे फायदेही आहेत. १. कोणत्याही वयात हस्तमैथुन करत राहण्याने प्रोस्टेट्च्या व्याधीपासुन दूर राहणे सोपे जाते २. आजकाल हृदयाशी संबंधित समस्या/ ब्लॉकेज वगैरे असल्यास डो. लोक ईरेक्शन कितपत येतेय हेही पाहतात( ब्लड पंपिंगशी संबंध असलयाने) @कॉलिंग कुमार सर
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 08/13/2025 - 13:27

In reply to वंध्यामैथुनाचे फायदे by राजेंद्र मेहेंदळे

Permalink

असे कसे

अरे.. वंध्यामैथुन ही तर इंडस्ट्री आहे. कित्येकाना वंध्यामैथुन करुण आणंद प्लस पैसा प्लस प्रसिध्दी मिळते. कित्येकांना वंध्यामैथुन दाखवूण पैसा प्लस प्रसिध्दी मिळते. कित्येकांना वंध्यामैथुन बघून लाखमोलाचा आणंद मिळतो. . आ. सण्णी लिओणी
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 08/13/2025 - 13:30

In reply to असे कसे by अभ्या..

Permalink

खिक्क. वंध्यामैथून पाहनारे

खिक्क. वंध्यामैथून पाहनारे लोक “दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधतात.” :)
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 08/13/2025 - 14:02

Permalink

Louis Vuitton ची ३५ लाखांची पर्स

एका तरूणीने Louis Vuitton या जगप्रसिध्द कंपनीच्या ३५ लाखांच्या पर्सची हुबेहुब प्रतिकृती अगदी दोन हजारात बनवली आहे. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/louis-vuitton-autorickshaw-bag-replica-made-for-only-2000-video-goes-viral/articleshow/123275488.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines वर. ३५ लाखांची पर्स? बोंबला. आणि त्या पर्सचे डिझाईन कसले? तर रिक्षाचे. खर्‍या रिक्षाच्या अनेक पटींनी जास्त महाग त्या रिक्षाच्या डिझाईनची पर्स :) कंपनीला कसले भीकेचे डोहाळे लागले आहेत? ३५ लाखाची पर्स विकायचीच असेल तर किमान बी.एम.डब्ल्यू, मर्सिडिज वगैरेंच्या डिझाईनची तरी विकायची ना. रिक्षाचे डिझाईन? या कंपनीचे शॉप मुंबईत जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये आहे. तो प्लाझा उघडून काही दिवसच झाले असताना बायकोच्या आग्रहाखातर आम्ही दोघे तिथे बघायला गेलो होतो. तिकडचे मार्बल फ्लोरींग बघून 'अबब' हा शब्द पहिलीत ऐकला होता त्यानंतर पहिल्यांदाच उच्चारला असेल. डोंबिवली-कल्याण यासारख्या ठिकाणी घरांच्या प्रति स्क्वेअर फूट किंमती असतील त्यापेक्षा ते मार्बल महाग असतील असे वाटून गेले. सगळेच शॉप्स म्हणजे माझ्यासारख्यांनी बाहेरून सुध्दा बघू नयेत असे. एका बाहेरच्या दुकानातून बायकोने एक टॉप घेतला होता तो फार तर ८००-९०० रूपयात घेतला होता. साधारण तसाच टॉप तिथल्या एका दुकानात फक्त २६ हजार रूपयांना होता. तिथल्या दुकानांमध्ये बघायला जायचे असेल तर आधी आपले नाव द्यायचे आणि थांबून राहायचे. आतमधले कर्मचारी एका वेळेस किती लोकांना 'एंटरटेन' करू शकतील त्याप्रमाणेच ग्राहकांना आत सोडतात. तर त्या Louis Vuitton कंपनीचे शॉप की शोरूम की म्हणतात ते तिथे आहे. तिथेही अशी ३५ लाखांची पर्स बघितल्याचे लक्षात नाही. कुठे मिळतात असल्या गोष्टी काय माहिती? :)
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 08/13/2025 - 14:32

In reply to Louis Vuitton ची ३५ लाखांची पर्स by चंद्रसूर्यकुमार

Permalink

खिक्क. आजच बातमी वाचली की

खिक्क. आजच बातमी वाचली की रोनाल्डोचे लग्न ठरले आहे त्याच्या रॉड्रिग्स नावाच्या गर्लफ्रेंडला त्याने ४२ कोटींची अंगठी गिफ्ट केली आहे. रोड्रिग्ज वरून आठवले की धुळ्यात २००८ साली सेम नावाचा उमदेवार नगरसेवक साठी उभा होता त्यांचे नाव लोकाना बोलता येईना म्हणून लोक रोडरोगीज, रिंगरोड, रोडरोगी वगैरे बोलायचे. आता रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडची बातमी तिकडे पोहोचली नसेल अशी अपेक्षा. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 08/13/2025 - 14:44

In reply to खिक्क. आजच बातमी वाचली की by अमरेंद्र बाहुबली

Permalink

हैला

रोनाल्डोचे लग्न ठरले आहे त्याच्या रॉड्रिग्स नावाच्या गर्लफ्रेंडला त्याने ४२ कोटींची अंगठी गिफ्ट केली आहे. हायला. आपल्या बिपाशाने त्यावेळी जरा हालचाल केली असती तर ४२ कोटी बोटात घातली असती. ती जॉन्याला धरुन बसली. जॉन्या तिलाही सोडून पहिली बायको सोडून दुसरे लग्नात सुखी आहे. जॉन्याने लै लै झाले तर यामाहा दिली असती एखादी ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडर म्हणून फुकटात मिळालेली.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 08/13/2025 - 15:16

In reply to हैला by अभ्या..

Permalink

बिपाशा नी रोनाल्डो? :(

बिपाशा नी रोनाल्डो? :(
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 08/13/2025 - 18:57

In reply to Louis Vuitton ची ३५ लाखांची पर्स by चंद्रसूर्यकुमार

Permalink

३० एक वर्षांपूर्वी हेमा

३० एक वर्षांपूर्वी हेमा मालिनी अशाच एका ब्रॅण्डच्या शोरूम मध्ये गेली होती तिथे तिने पर्स पाहिली आणि तिची किंमत विचारली. दुकानदाराने पस्तीस हजार रुपये सांगतली. त्यावर हेमामालिनी आपल्या जाड मद्रासी हिंदी भाषेत त्याला विचारती झाली. कि इतना पैसा पर्स के लिये देंगे तो पर्स मे क्या रखेंगे?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 08/13/2025 - 19:00

In reply to ३० एक वर्षांपूर्वी हेमा by सुबोध खरे

Permalink

नही.....

त्यावर हेमामालिनी आपल्या जाड मद्रासी हिंदी भाषेत त्याला विचारती झाली. कि इतना पैसा पर्स के लिये देंगे तो पर्स मे क्या रखेंगे? आधी "नह्ह्ह्ह्ही" असे म्हणली असेल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 08/13/2025 - 15:16

Permalink

श्रीगुर्जींची आठवण येतेय.

श्रीगुर्जींची आठवण येतेय. महायुद्धात नी फुटबॉलच्या विश्वचषकात जर्मनीशिवाय मजा नाही तसेच मिपावर नी राजकीय धाग्यांवर श्रीगुरजींशिवाय मजा नाही. मागच्या वेळी त्याना मिपावर पुन्हा लिहिते मीच केले होते, अनेकवेळा गळ घातली तेव्हा ते येथे आले होते, आणि नंतर माझ्यावर टीका केली म्हणूनच त्यांचा आयडी बैन झाला होता, (माझा कशामुळे झाला होता हे आज पर्यंत कळले नाही.) आता पुन्हा श्रीगुरूजीना बोलवायला गेलो तर मला जोड्याने बडवतील. :( श्रीगुरूजीना जो पुन्हा इथे लिहिते करेन त्याला श्रीकृष्ण भुवनची मिसळ, एकवाटो रस्सा + खरवस माझ्याकडून!
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 08/13/2025 - 19:05

Permalink

दिवसेन्दिवस

दिवसेंदिवस निवड्णुक आयोगाच्या अब्रुची लक्तरे बाहेर येत आहेत. Yogendra Yadav Appears In Supreme Court With Two Persons Deleted As Dead By ECI Debby Jain 12 Aug 2025 7:32 PM (9 mins read ) https://www.livelaw.in/top-stories/bihar-sir-is-intensive-deletion-exercise-yogendra-yadav-appears-in-supreme-court-with-two-persons-deleted-as-dead-by-eci-from-draft-300679
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 08/13/2025 - 19:29

In reply to दिवसेन्दिवस by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

दिवसेंदिवस काय माई? पुण्यात

दिवसेंदिवस काय माई? पुण्यात आजारी असतानाही गिरीष बापटाना कसबा पोटनिवडणूकीत व्हीलचेअरवर फिरवण्यात आले, त्यानंतर ते वारले. त्यांच्या टर्म ला एक वर्ष बाकी होते तरीही पुण्यात “भाजप” हरेल ह्या भीतीने निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेतली नाही पण त्याचवेळी पंजाबात एक खासदार वारले होते त्यांच्या जागी पॉट निवडणूक घेण्यात आली. निवडणूक आयोग इतका उघडपणे भाजपसाठी काम करत असताना लोकशाही जिवंत आहे असे म्हणवत नाही. ह्याविरुद्ध कुणीतरी कोर्टात गेले होते, तोथेही निवडणूक आयोगाने थातुर मातुर उत्तरे दिली. तेव्हाच निवडणूक आयोगाची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. आधी म्हटल्या जायचे की बांगलादेश ते इस्राईलच्या मध्ये फक्त भारतात लोकशाही आहे, आता म्हणावे बांगलादेश ते इस्रायल दरम्यान कुठेही लोकशाही नाही. भाजपने निवडणूक आयोग आणी लोकशाही यंत्रणा सडवली असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 08/13/2025 - 19:52

Permalink

दिवसातून मर्यादित वेळेसाठी

दिवसातून मर्यादित वेळेसाठी (दोन तास) कबुतरखाने चालू ठेवण्याबद्दल प्रस्ताव, महानगरपालिकेकडून. अशी बातमी लोकसत्तामध्ये वाचली. कसे चालू बंद करतात कबुतरखाने रोज थोडा वेळ ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 08/13/2025 - 19:53

In reply to दिवसातून मर्यादित वेळेसाठी by गवि

Permalink

आव्/फुर्र्र

कसे चालू बंद करतात कबुतरखाने रोज थोडा वेळ ? आव.. आव.. फुर्र... फुर्र..
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Wed, 08/13/2025 - 20:13

In reply to आव्/फुर्र्र by अभ्या..

Permalink

ठ्ठो....

ठ्ठो.... लई भारी. ह ह पु वा.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 08/14/2025 - 11:59

Permalink

कसे चालू बंद करतात कबुतरखाने रोज थोडा वेळ ?

गुजराती / जैन आले की चालू करायचे. मराठी आणि इतर भाषिक आले की बंद करायचे. हाय काय अन नाय काय.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 08/14/2025 - 12:46

In reply to कसे चालू बंद करतात कबुतरखाने रोज थोडा वेळ ? by धर्मराजमुटके

Permalink

कबुतरखाना तुम्ही पहिला आहेच

कबुतरखाना तुम्ही पहिला आहेच असे गृहीत धरून.. तो बंद किंवा चालू कसा करतात ही उत्सुकता. कोणत्या वेळी तो प्रश्न नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on गुरुवार, 08/14/2025 - 13:07

In reply to कबुतरखाना तुम्ही पहिला आहेच by गवि

Permalink

शटर

तो बंद किंवा चालू कसा करतात ही उत्सुकता.
दुकानांना असतात तशी शटर कबुतरखान्याला लावतात. पाहिजे तेव्हा उघडायची पाहिजे तेव्हा बंद करायची. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 08/14/2025 - 13:19

In reply to शटर by चंद्रसूर्यकुमार

Permalink

तेवढा चौथरा किंवा रिंगण बंद

तेवढा चौथरा किंवा रिंगण बंद केले म्हणजे पक्षी यायचे थांबणार का? त्यांना कळेल का की झाकण आहे किंवा शटर बंद आहे म्हणजे या परिसरातून काढता पंख घ्यायचा? की ते आसपासच्या इतर गोष्टींवर, जसे फुटपाथ, छपरे, तारा, गच्ची, प्राची.. यांवर गर्दी करतील? सवय परिसराची असते. रिंगणाची नव्हे.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on गुरुवार, 08/14/2025 - 13:36

In reply to तेवढा चौथरा किंवा रिंगण बंद by गवि

Permalink

इमेज

कबुतरखाना असा खरोखर शटर लाऊन बंद करतात असे मला म्हणायचे असे वाटले का? एआयकडून इमेज जनरेट करून घेतली आहे ती :)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 08/14/2025 - 14:11

In reply to इमेज by चंद्रसूर्यकुमार

Permalink

ओह नो..

ओह नो.. AI चा काही भरोसा राहिला नाही. अर्थात तुम्ही म्हणता तत्सम एक ताडपत्री लावणे प्रकार बातमीत खरोखर वाचला होता. त्यामुळे खरेच वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on गुरुवार, 08/14/2025 - 22:46

In reply to ओह नो.. by गवि

Permalink

दादर कबूतर् खाना

Image removed. हायला कॉलेजात असताना १००० वेळा बसने ईथुन गेलो असेन, पण या जागेची कधीतरी ईतकी बातमी होईलसे वाटले नव्हते. बाकी आजकाल हत्ती,कबूतरे,कुत्रे वगैरेच फार चर्चेत आहेत माणसापेक्षा, नाही का? त्यांच्या आडुन स्कोर सेटल करायचे राजकारण चालु आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 08/14/2025 - 12:40

Permalink

आज पाकिस्तानच स्वातंत्र्य

आज पाकिस्तानच स्वातंत्र्य दिवस. पाहुया त्यांचे पंप्र काय नव्या घोषणा करतात ते. बाकी बिलावल ने बोलायचे आणी त्याचे उत्तर ओवेसी ने द्यायचे. ही एक भारी गम्मत आहे
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on गुरुवार, 08/14/2025 - 20:27

Permalink

एका ठिकाणी हे वाचायला मिळाले.

एका ठिकाणी हे वाचायला मिळाले. चंद्रसूर्य, श्रीरंग वगैरेंच्या यावरच्या टिपण्या आणखीन छान असतील. स्वित्झर्लंडने नुकतेच दशकांमधील सर्वात धक्कादायक पाऊल उचलले आहे. जगातील सर्वात विश्वासार्ह बँकिंग राष्ट्राने शांतपणे अमेरिकन डॉलर सोडून त्याच्या जागी शुद्ध सोने आणण्यास सुरुवात केली आहे. आणि येथे स्वित्झर्लंड एकटा नाही. ब्रिक्स राष्ट्रे - ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका - आपल्याकडचे अमेरिकन डॉलर कमी करून सोने घेत आहेत व सोन्यावर आधारित व्यापार प्रणाली आणण्याची पूर्वतयारी करत आहेत. त्यांचे स्वतःचे जागतिक पेमेंट नेटवर्क तयार करत आहेत. तेलाने समृद्ध मध्य पूर्वेतील राज्ये, आफ्रिकेतील संसाधन-शक्तीगृहे आणि आशियातील उदयोन्मुख दिग्गजांसह - 40 हून अधिक देश या चळवळीत सामील होण्यासाठी रांगेत उभे आहेत. एकत्रितपणे, ते एक नवीन आर्थिक व्यवस्था तयार करत आहेत. यामुळे जागतिक व्यापारावरील डॉलरची लोखंडी पकड संपू शकते. चीनने विक्रमी प्रमाणात सोन्याचा साठा करण्यापासून, रशियाने आपले चलन वस्तूंशी जोडण्यापर्यंत, ब्राझीलने डॉलरला स्पर्श न करता थेट चीनशी व्यापार करण्यापर्यंतच्या घटनांना योगायोग म्हणून सोडून देता येत नाहीत. वॉशिंग्टन आणि वॉल स्ट्रीटपासून जागतिक शक्ती दूर करण्याच्या समन्वित योजनेचे ते तुकडे आहेत. ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक आधीच अमेरिकेच्या सहभागाशिवाय अब्जावधी प्रकल्पांना निधी देत आहे आणि त्यांच्या सोन्या-समर्थित चलन योजना आयुष्यात एकदाच येणारा आर्थिक भूकंप घडवू शकतात. आपण ज्या आर्थिक व्यवस्थेसह वाढले आहोत, त्या आर्थिक व्यवस्थेच्या अंताची ही सुरुवात आहे... आणि पुढे जे घडत आहे ते आपले जीवन कायमचे बदलून टाकण्याचीही शक्यता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/17/2025 - 15:32

In reply to एका ठिकाणी हे वाचायला मिळाले. by शाम भागवत

Permalink

डिडॉलरायझेशन

आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरऐवजी अन्य कोणत्या चलनात करणे (डिडॉलरायझेशन) केल्यास अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का बसेल त्यामुळे अमेरिका या बाबतीत खूप जास्त सेन्सिटिव्ह असते. १९७३ मध्ये गोल्ड स्टॅन्डर्ड गेल्यावर खरं तर आंतरराष्ट्रीय व्यापार कोणत्याही चलनात करता आला असता. पूर्वी अमेरिकन डॉलर सोन्याने बॅक्ड असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये होणे क्रमप्राप्त होते. ते डॉलरचे स्थान जाऊ नये म्हणून १९७४ मध्ये रिचर्ड निक्सननी सौदी अरेबियाशी करार केला. त्या कराराप्रमाणे अमेरिका सौदीला संरक्षणाची हमी देणार आणि त्या बदल्यात सौदीने तेलासाठी पेमेंट केवळ अमेरिकन डॉलरमध्ये स्विकारावे असे ठरले. तो होता पेट्रोडॉलर करार. सौदीसारखा तेलसंपन्न देश तेलासाठी डॉलरमध्येच पेमेंट घ्यायला लागल्यावर इतर ओपेक देशांनी पण तसेच केले. यामुळे झाले काय? तर तेलाची गरज सगळ्याच देशांना असते. त्यामुळे तेल विकत घेण्यासाठी डॉलर जमा करणे सगळ्यांना क्रमप्राप्त झाले. आणि त्यामुळे सगळाच आंतरराष्ट्रीय व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये व्हायला लागला. सगळ्यांनी डॉलर कसे जमा करायचे? एक तर थेट अमेरिकेला निर्यात करून किंवा दुसर्‍या कोणत्या देशाला निर्यात करून (जो देश अमेरिकेला निर्यात करून डॉलर जमा करत असेल). समजा चीनमध्ये तयार झालेला लॅपटॉप आपण विकत घेत असू तर आपण पैसे रूपयातच भरतो. पण त्याचे पुढे काय होते? तर ते आधी डॉलरमध्ये बदलायचे- ते कोण बदलणार? तर रिझर्व्ह बँकेच्या वतीने स्थानिक बँका. मग ते डॉलर चीनमधील बँकेला द्यायचे. ते कसे द्यायचे? तर अमेरिकेच्याच स्विफ्ट या मेकॅनिझमचा वापर करून. मग ते डॉलर चीनच्या सेंट्रल बँकेकडे जाणार आणि सेंट्रल बँक युआनमध्ये पैसे तो लॅपटॉप विकणार्‍याला देणार. कोणतीही आयात केलेली वस्तू आपण विकत घेतो तेव्हा आपले पैसे इलेक्ट्रॉनिक मार्गाने अमेरिकेच्या किनार्‍याला जातातच. जर कार्ड वापरून पेमेंट असेल तर त्यात व्हिसा/मास्टरकार्ड ही अमेरिकन यंत्रणा त्यात येणार. म्हणजे झाले काय? तर व्यापार करा अमेरिकेच्या चलनात आणि अमेरिकन मेकॅनिझम वापरून. म्हणजे सगळ्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर अमेरिकेचेच एका अर्थी नियंत्रण झाले. त्यामुळे झाले काय? तर अमेरिकेला कुठून तरी निर्यात केल्याशिवाय डॉलर मिळणार नाहीत म्हणून अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर निर्यात झाली आणि सगळ्या जगातील सर्वोत्तम वस्तू अमेरिकन्सना मिळायला लागल्या. अमेरिका सरकार पाहिजे तितके डॉलर छापून (प्रत्यक्षात छापून नाही तर इलेक्ट्रॉनिक एन्ट्री करून) इतर देशांना देऊ लागले आणि अमेरिका वर्षानुवर्षे ट्रेड डेफिसिटमध्ये राहू शकली. इतर कोणताही देश असे करू शकणार नाही- कोणत्या ना कोणत्या मार्गाने डॉलर इतर देशांना मिळवावेच लागतात. पण अमेरिकन डॉलर हे रिझर्व्ह चलन असल्याने अमेरिकेला कित्येक दशके निर्यातीपेक्षा आयात खूप जास्त असून चालले. २०१७-१८ पासूनच आपण काही प्रमाणात (भले थोड्या) आपल्या व्यापारासाठी रूपयाचा वापर करणे सुरू केले. रशिया, इराण वगैरे देशांशी केलेल्या व्यापारासाठी. तसे झाल्यास काय होईल? तर अमेरिकन डॉलरला बायपास करता येईल. पण फंड ट्रान्सफरसाठी अमेरिकन मेकॅनिझम (स्विफ्ट) वापरावेच लागेल. दुसरी अडचण ही की आपण रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आणि शस्त्रास्त्रे घेतो. त्याचे पेमेंट समजा रूपयात केले तर रशियाकडे भरपूर रूपये जमतील. त्याचे रशिया काय करणार? आपण तितकी निर्यात रशियाला करत असू तर तेच रूपये रशिया आपल्याला परत करू शकेल. तशी परिस्थिती नाही. त्यामुळे रशियाकडे भरपूर रूपये आहेत पण त्याचे काय करायचे हा प्रश्न आहे. मग काय करायचे? तर समजा ब्रिक्स देशांचे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सोन्याने बॅक्ड असे चलन असेल तर ते चलन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सगळ्या देशांना वापरायला काहीच हरकत नाही- जर ते सोन्याने बॅक्ड असेल तर. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. दुसरे म्हणजे आपल्याकडे जसे युपीआय आहे तसे रशियात मीर आहे. युक्रेन युध्द सुरू झाल्यानंतर अमेरिकन व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांनी रशियात आपली सेवा बंद केली. फेब्रुवारी-मार्च २०२२ मध्ये मॉस्कोत ए.टी.एम चालत नाहीत, मॉस्को मेट्रोसाठी डेबिट कार्डने पेमेंट करता येत नाहीये वगैरे बातम्या आल्या होत्या. आपल्याकडे युपीआय २०१७ पासूनच सुरू झाले होते पण कोविडकाळात त्याला खरी चालना मिळाली. तसेच रशियाच्या मीरविषयी युक्रेन युध्दामुळे झाले. आता समजा आपली युपीआय आणि रशियाची मीर हा पध्दती इंटिग्रेट केल्या तर? आता आपले युपीआय इतर काही देशांमध्ये वापरायला सुरवात झाली आहे पण त्यात भारतीय रूपया आणि त्यांची चलने इंटिग्रेट केली आहेत असे वाटत नाही. तसे भविष्यात झाले तर? तसे झाले तर अमेरिकेच्या व्हिसा, मास्टरकार्ड, स्विफ्ट वगैरे मेकॅनिझमवरही अवलंबून राहायची गरज नाही. समजा दुसर्‍या देशातील कोणी पर्यटक भारतात आला आहे. त्याला एटीएममधून त्याच्या अकाऊंटमधून पैसे काढायचे असतील तर आता जसे अमेरिकेच्या व्हिसा-मास्टरकर्डवर अवलंबून राहावे लागते ती गरजच असे इंटिग्रेशन केल्यास संपेल. पुढील काही वर्षात ते पण होईल असे वाटते. म्हणजे एकूणच काय? तर ब्रिक्स देशांचे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सोन्याने बॅक्ड चलन असेल आणि युपीआय सारख्या यंत्रणा वेगवेगळ्या देशांनी इंटिग्रेट केल्या तर नुसते अमेरिकन डॉलरवर नाही तर अमेरिकन पेमेंट मेकॅनिझमवरही अवलंबून राहायची गरज नाही. मोदींची पावले हळूहळू त्या दिशेने पडत आहेत हे अमेरिकन्सच्या लक्षात आले नाहीये असे वाटत नाही. म्हणूनच जो बायडन अध्यक्ष असतानाच शेतकरी आंदोलनाला फूस द्या, बांगलादेशात हातपाय पसरा असे करून भारताला- खरं तर मोदींना डोकेदुखी निर्माण करायचे प्रयत्न झाले. तसा अमेरिका भारताचा मित्र म्हणावा तर कधीच नव्हता. फक्त १९९८ च्या पोखरण अणुचाचण्या झाल्यानंतर त्यांच्याशी वाकडे व्हायची वेळ आली नाही म्हणून वरकरणी संबंध चांगले वाटावेत असे वातावरण होते. अशा सगळ्या गोष्टी अमेरिकेच्या ताब्यात नाही तरी नियंत्रणात असल्या तर ते धोकादायक आहे- आयत्या वेळेस अमेरिकन पेमेंट कंपन्यांनी रशियात सेवा देणे बंद केले आणि त्यांना अडचणीत आणले, अमेरिकन सरकारने स्टेट बॅंकेकडून नायराचे पेमेंट क्लिअर करण्यावर निर्बंध आणले, मायक्रोसॉफ्टने नायराला मध्यंतरी असेच अडचणीत आणले होते. जर सगळी क्लाऊड सिस्टीम कोणत्या ना कोणत्या अमेरिकन कंपनीने नियंत्रित केली असेल आणि आयत्या वेळेस त्यांनी ते बंदच करून टाकले तर विमानतळांपासून स्टॉक एक्स्चेंजपर्यंत कित्येक सेवा कोलमडतील. हा धोका मोठा आहे. अगदी कारगील युध्दाच्या वेळेस अमेरिकेने आपल्याला जीपीएसवरून माहिती दिली नव्हती तेव्हा इस्राएल आपल्या मदतीला आला होता. आता निदान भारतापुरती आपली नाविक सेवा आहे. ती पुढील काळात अजून प्रिसाईज होईलच. पेमेंट मेकॅनिझममध्ये आपण अमेरिकेवरील अवलंबून राहणे कमी करत आहोत आणि काही वर्षात इतर देशांची प्रणाली आणि आपले युपीआय इंटिग्रेट झाले तर अमेरिकन पेमेंट मेकॅनिझमवर अजिबात अवलंबून राहणार नाही. आपण ब्रिक्समध्येही सक्रीय आहोत. पुढील काही वर्षात सोन्यावर आधारीत चलन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आले तर अमेरिकन डॉलरच्या मक्तेदारीला आव्हान मिळेल. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की काही काही गोष्टींमध्ये आपण आपले अमेरिकेवरील अवलंबून राहणे कमी केले आहे. अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे पण निदान थोडी तरी सुरवात झाली आहे. नायराने आयटी सिस्टीम रेडिफकडून घेतल्या अशी बातमी आली होती. आपल्याकडे भारतासारख्या अवाढव्य अर्थव्यवस्थेतील सगळ्या बिझनेसना आय.टी सिस्टीम द्यायची कपॅसिटी याक्षणी आहे असे वाटत नाही. पण त्या दृष्टीनेही पावले उचलली जातील असे वाटते. म्हणजेच काय? तर मोदी अमेरिकेचे ऐकत नाहीत आणि आपली स्वतंत्र वाट धरायचा प्रयत्न करत आहेत. असे नेते अमेरिकेला आवडत नाहीत. सध्या ट्रम्पतात्या पिसाळले आहेत त्यामागे हे एक मोठी कारण आहे असे वाटते. रशियन तेल हे निमित्त झाले- मुख्य म्हणजे सिग्नलिंग की आम्ही अमेरिकेचे ऐकणार नाही. त्यात ऑपरेशन सिंदूरमध्ये अगदी पिनपॉईंटेड अ‍ॅक्युरसीने आपण हल्ले करू शकलो. म्हणजे तितकी पात्रता आपल्या संरक्षणसिध्दतेकडे आहे हे सिध्द झाले. हे सगळे अमेरिकेची शस्त्रास्त्रे आपल्याकडे फारशी नसताना. जर अमेरिकेची अपेक्षा असेल की भारत ही शस्त्रास्त्रांसाठी मोठी बाजारपेठ बनेल तर त्याची शक्यता कमी झाली. अमेरिका पेट्रोडॉलरसाठी खूप म्हणजे खूप सेन्सिटिव्ह असते. सद्दाम हुसेनने नोव्हेंबर २००० मध्ये जाहीर केले की इराक तेलासाठी डॉलरऐवजी युरोतही पेमेंट स्विकारेल. म्हणजे पेट्रोडॉलरला अल्प प्रमाणात का होईना आव्हान निर्माण झाले. जानेवारी २००१ मध्ये बुशबाबा सत्तेत आल्यानंतर लगेच सद्दामकडे अती संहारक शस्त्रे आहेत हा अपप्रचार सुरू झाला तो पूर्ण योगायोग होता असे वाटत नाही. जुलै २००९ मध्ये बराक ओबामा आणि लिबियाचा मुअम्मर गद्दाफी यांची भेटही झाली होती. त्यानंतर काही महिन्यातच (मला वाटते जानेवारी २०१० मध्ये) गद्दाफीने आफ्रिकेतील तेलसंपन्न देशांचे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सोन्यावर बॅक्ड दिनार हे चलन ठेवावे असे सूतोवाच केले. त्यानंतर दोन वर्षाच्या आत गद्दाफीला ठार मारण्यात आले. तो पण योगायोग होता असे वाटत नाही. हे सगळे पाहता अमेरिका आपल्याला अधिकाधिक त्रास देणार हे आता गृहितच धरायचे. एक गोष्ट चांगली की अमेरिकेने इराकवर प्रत्यक्ष आणि लिबियावर अप्रत्यक्ष हल्ला केला तसे भारतात करता येणे अशक्य कारण भारत बराच मोठा देश आहे. पण अमेरिका कुठे पाकिस्तानला आणखी चुचकार, बांगलादेशलाच पाठिशी घाल वगैरे प्रकार अधिक जास्त करणार हे आता गृहितच धरायचे. यातील काही गोष्टींचा परामर्श घेणारा एक लेख मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांपूर्वी लिहिला होता. तो हवा असल्यास व्य.नि वर संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Sun, 08/17/2025 - 16:15

In reply to डिडॉलरायझेशन by चंद्रसूर्यकुमार

Permalink

अभ्यासपूर्ण विवेचन अतिशय

अभ्यासपूर्ण विवेचन अतिशय आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Sun, 08/17/2025 - 21:45

In reply to अभ्यासपूर्ण विवेचन अतिशय by युयुत्सु

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by सौंदाळा on Mon, 08/18/2025 - 10:51

In reply to +१ by शाम भागवत

Permalink

+२

+२
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 08/19/2025 - 11:16

In reply to डिडॉलरायझेशन by चंद्रसूर्यकुमार

Permalink

ही एकत्रित माहिती मराठीत

ही एकत्रित माहिती मराठीत दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Tue, 08/26/2025 - 12:39

In reply to डिडॉलरायझेशन by चंद्रसूर्यकुमार

Permalink

एक प्रकारचे गुप्त युद्ध

सोन्यावर आधारित ब्रिक्स देशांचे चलन हा विचार खूपच दूरदृष्टीचा आहे. जर असे चलन प्रत्यक्षात आले, तर त्याचे अनेक फायदे होऊ शकतात. हे पाऊल सोपे नाही, कारण त्यासाठी सर्व ब्रिक्स देशांमध्ये एकमत आणि मजबूत आर्थिक एकमत आणि त्यास लागणारी व्यवस्था असणे आणि निर्माण होणे आवश्यक आहे. त्याला प्राणपणाने विरोध केला जाईल यात शंका नाही. तुम्ही नमूद केल्याप्रमाणे, UPI (यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आणि रशियाची MIR (मीर) पेमेंट सिस्टिम एकमेकांमध्ये एकत्रित करणे हा एक क्रांतीकारक बदल ठरू शकतो. पण लक्षात घ्या हे घडत नाहीये. म्हणजे काही अज्ञात अडचणी निर्माण केल्या जात असाव्यात अशी मला शंका आहे. म्हणजे एक प्रकारचे गुप्त युद्ध खेळले जात आहे. ब्रिक्स देशांचे सोन्यावर आधारित चलन आणि विविध देशांच्या स्थानिक पेमेंट प्रणालीचे एकत्रीकरण या दोन गोष्टींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्वरूप पूर्णपणे बदलू शकते. यामुळे अमेरिकेचे जागतिक अर्थव्यवस्थेवर असलेले वर्चस्व कमी होईल. पण खरे सांगायचे तर हे नजिकच्या काळात घडेल असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Tue, 08/26/2025 - 12:50

In reply to डिडॉलरायझेशन by चंद्रसूर्यकुमार

Permalink

या शिवाय

भारत केवळ डॉलरला बायपास करण्याचा विचार करत नाही, तर रुपयाला जागतिक व्यापाराचे एक महत्त्वाचे चलन बनवण्याचेही, रुपयाला आंतरराष्ट्रीय चलनाच्या रूपात प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत आहे. २०२२ मध्ये RBI ने एक विशेष व्यवस्था सुरू केली. यानुसार, परदेशी बँकांना भारतीय बँकांमध्ये विशेष व्होस्ट्रो रुपया खाती उघडता येतात. यामुळे, भारतासोबत व्यापार करणाऱ्या देशांना त्यांच्या व्यापाराचे व्यवहार रुपयामध्ये करता येतात. आतापर्यंत रशिया, श्रीलंका, मलेशिया, मॉरिशस, बांगलादेश, म्यानमार, सिंगापूर, यूके आणि जर्मनीसह सुमारे २२ देशांनी अशी खाती उघडली आहेत. यामुळे, व्यापारासाठी डॉलरची गरज मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे! भारत अनेक देशांशी थेट चलन विनिमय करार करत आहे. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार त्यांच्या स्वतःच्या चलनात होऊ शकतो. भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ने UPI ला जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक विशेष शाखा स्थापन केली आहे असे ऐकले आहे. भारत आणि सिंगापूरने त्यांचे पेमेंट सिस्टिम्स (UPI आणि PayNow) एकमेकांशी जोडल्या आहेत. पॅरिसमध्ये भारतीय पर्यटकांसाठी यूपीआय पेमेंटची सुविधा सुरू झाली आहे. आयफेल टॉवरमध्ये QR कोड स्कॅन करून पैसे देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. UAE, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मॉरिशस: या देशांमध्येही UPI पेमेंट स्वीकारले जात आहे - ही ऐकीव माहिती आहे खखोदेजा! भारताचा e₹ आणि चीनचा e-yuan असे डिजिटल चलनांचे परस्पर एकत्रीकरण झाल्यास आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आणखी एक शक्तिशाली पर्याय उपलब्ध होईल. हे कसे करता येईल - होईल का हे माहीत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 08/15/2025 - 13:02

Permalink

शुभेच्छा.

R
जय हिंद

विविध भाषा,विविध धर्म, पंथ,जाती, रंग आणि विविध संस्कृती असूनही एकता अखंडता जपणा-या सर्व भारतीयांसाठी आजचा आनंदाचा दिवस. भारताची एकता आणि अखंडता कायम जपली पाहिजे. आपण सर्व त्यासाठी प्रयत्न करुया. भारतीय लोकशाही मजबूत करणा-या, एकता आणि अखंडता जपणा-या, सर्व भारतीयांना आजच्या १५ ऑगष्ट स्वातंत्र्यदिनाच्या खुप खुप शुभेच्छा. लब यू ऑल. ः) -दिलीप बिरुटे

  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 08/15/2025 - 16:12

Permalink

ईव्हीएम घोळ

सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमचा निकाल फिरला समर्थक जाहीर हो !
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com