Skip to main content

ताज्या घडामोडी ऑगस्ट २०२५ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 12/08/2025 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. एका प्लंबरच्या घरी १० फूट लांब नाग घुसला होता. प्लंबरने अक्कल हुशारीने नागाला पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना नक्की कुठे घडली याची कल्पना नाही. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/viral/viral-news/plumber-catches-10-foot… वर

वाचने 25152
प्रतिक्रिया 173

प्रतिक्रिया

In reply to by चंद्रसूर्यकुमार

UPA चे GST बिल हे बऱ्याच प्रमाणात अप्रत्यक्ष कर सुटसुटीत करणारे होते. उगाच काहीतरी आश्वासने देऊन नंतर एंट्री सारखे कर GST चा मूळ उद्देशाला हरताळ फासणारे नव्हते. कमी उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या सरकारला आर्थिक अडचणीच्या काळात राज्यांना कर नुकसान भरपाई देण्याऐवजी कर्ज काढायला सांगण्याची पाळी आली. GST मध्ये अनेक गोंधळ घातल्याने दहशत निर्माण करण्यासाठी उद्योजकाला काचेच्या केबिनमधील दमदाटीचा व्हिडिओ अर्थमंत्र्यांना व्हायरल करावा लागला. लाल किल्ल्यावरून दिवाळी भेटीची ( भेट म्हणायला लाज वाटायला हवी ) घोषणा केली गेली. हा निर्णय GST परिषदेचे घ्यायचा असतो ना?

In reply to by आग्या१९९०

हा निर्णय GST परिषदेचे घ्यायचा असतो ना?
म्हणजे गब्बरसिंग टॅक्स ज्याला म्हटले तो टॅक्स मोदींचा पण आता टॅक्स कमी करायचा उल्लेख आल्यावर ते श्रेय जीएसटी काऊंसिलचे? ऐसा कैसा चलेगा कालिया?
GST मध्ये अनेक गोंधळ घातल्याने दहशत निर्माण करण्यासाठी उद्योजकाला काचेच्या केबिनमधील दमदाटीचा व्हिडिओ अर्थमंत्र्यांना व्हायरल करावा लागला.
जीएसटीचे सगळे मेकॅनिझम सर्वानुमते जीएसटी काऊंसिलमध्ये ठरले असेल तर मग गोंधळ फक्त सरकारने घातला? ऐसा कैसा चलेगा कालिया? प्रबोधन मंच म्हणून मुंबईतील आमच्या बाजूची संस्था आहे त्या संस्थेच्या दुमाही लेक्चर सिरीजमध्ये केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार संजीव संन्याल यांनी २०१८ मध्ये एक भाषण दिले होते. ते भाषण पार्ल्यातील दिनानाथ नाट्यगृहात मी बघितले होते. पूर्ण भाषण https://www.youtube.com/watch?v=Etz-WFwoO9M वर पाहता येईल. त्या भाषणात त्यांनी एक उल्लेख केला होता. समजा आपण आपल्या पाळीव कुत्र्याबरोबर फ्रिस्बी खेळत आहोत- आपण ती तबकडी लांबून हवेत टाकणार, ती तो श्वान उडी मारून पकडणार आणि आपल्याकडे आणून देणार. समजा आपला श्वान पारंपारीक पध्दतीतला असेल तर तो काय करेल? आपण कोणत्या दिशेने, कोणत्या कोनात आणि किती वेगाने तबकडी हवेत टाकत आहोत आणि वार्‍याचा वेग आणि दिशा बघून एक गणिती मॉडेल तयार करेल आणि जशी आपण तबकडी हवेत टाकू तसा तो श्वान त्या मॉडेलने ती तबकडी जिथे आणि जेव्हा पडेल असे सांगितले आहे तिथे आणि तेव्हा पोचायचे या उद्देशाने पळेल. प्रत्यक्षात काय होईल? तर ती तबकडी भलतीकडेच कुठेतरी जाऊन पडेल. आपला श्वान असे करतो का? तर अजिबात नाही. प्रत्यक्षात तो काय करतो? तर जशी तबकडी हवेत झेपावते तेव्हा आपले स्थान आणि तबकडी कुठे जात आहे याचा फिडबॅक घेऊन त्या दिशेने आणि त्या वेगाने जातो. जीएसटीच्या अंमलबजावणीत नेमके तेच केले. सुरवातीच्या काळात जीएसटीच्या अंमलबजावणीत अनेक गोंधळ नक्कीच होते. त्याचे कारण उघड आहे. इतक्या लाखो-कोट्यावधी गोष्टी विकल्या जात असतात, त्यात एक गोष्ट दुसर्‍यात कच्चा माल म्हणून, एखाद्या मोठ्या वस्तूत सुटे भाग वेगवेगळ्या जीएसटी ब्रॅकेटमध्ये वगैरे शेकडो नानाविध गुंतागुंती होत्या. त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज डिझाईन करताना येणे शक्य नाही. मग काय करायचे? तर आपल्याला सगळ्यात उत्तम पध्दत डिझाईन करता येईल तशी करायची आणि मार्केटमध्ये उतरायचे. पण मार्केटकडून फिडबॅक घ्यायचा- म्हणजे कुठे कुठे अडचणी येत आहेत ते बघायचे आणि त्या अडचणी दूर करत जायचे. भारतासारख्या अवाढव्य मोठ्या अर्थव्यवस्थेत जर असे गणिती मॉडेल बनवून एकदम परफेक्ट जीएसटीची अंमलबजावणी करायची पध्दत डिझाईन करायचे म्हटले असते तर अजूनही त्या पध्दतीचे डिझाईनच सुरू असते आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी झालीच नसती. इतकी विलक्षण गुंतागुंतीची पध्दत प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करायच्या आधी १००% परफेक्ट डिझाईन करता येणे अशक्य. म्हणून जितकी निर्दोष पध्दत डिझाईन करता येईल तितकी करा आणि अंमलबजावणी सुरू करा पण कुठे पेन पॉईंट्स आहेत ते बघून ते दुरूस्त करा हाच सर्वोत्तम उपाय. जीएसटीची अंमलबजावणी सुरू व्हायच्या महिनाभर आधी मिपावर पण त्यावर घमासान झाले होते. संजय क्षीरसागर यांचा वेगळा परिचय द्यायची गरजच नाही. त्यांनी अंमलबजावणीत अमुक अडचणी येणार, तमुक होईल वगैरे बरेच डूम्सडे सिनॅरीओ लिहिले होते. नुसते रिटर्न फाईल करत राहिले तर मग प्रत्यक्ष बिझनेस कधी करणार वगैरे प्रश्नही काहींनी विचारले होते. पहिले दोनतीन महिने खरोखरच जीएसटीच्या अंमलबजावणीत बर्‍याच अडचणी होत्या पण त्यानंतर सगळे सुरळीत झाले. मला वाटते आपण असे काही लिहिले होते हे संक्षी पण विसरले असतील :) भारतासारख्या गुंतागुंतीच्या देशात जीएसटीसारखी एक करपध्दती अंमलात आणणे ही एक अपूर्व आणि ऐतिहासिक घटना आहे आणि ते मोठे यशही आहे. सगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांसाठी एकच ईनव्हॉईसची पध्दत ठेवणे, देशातील लाखो व्यवसाय त्यांचे रिटर्न अपलोड करणार , कोणी कोणाला काय विकले, कोण कोणाकडून जीएसटी क्रेडिट घेत आहे वगैरेंची नोंद ठेवणारी प्रचंड मोठी आयटी सिस्टीम बॅकएंडला ठेवणे, रिटर्न भरताना योग्य ते आणि योग्य तेवढेच क्रेडिट क्लेम केले जात आहे हे पाहणे आणि प्रत्येक बिझनेसची उलाढाल किती तितक्या प्रमाणात जीएसटीमध्येही उलाढाली दिसत आहेत की नाही हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करपध्दतींमधील इंटिग्रेशन करणे वगैरे वगैरे. हे केवढे मोठे शिवधनुष्य होते/आहे हे त्याविषयीचा विचार केला की जाणवते. ते सगळे मोदी सरकारचेच नाही तर सगळ्यांचे सामूहिक यश आहे. वाजपेयी आणि युपीए सरकारच्या काळात बंगालचे अर्थमंत्री असिम दासगुप्तांनी कम्युनिस्ट असूनही या पध्दतीच्या डिझाईनविषयी खूप चांगले काम केले होते. पण २०११ मध्ये ते बंगालच्या अर्थमंत्रीपदावरून दूर झाले आणि पुढे त्याविषयी काही करू शकले नाहीत. सगळ्या गोष्टींवर जीएसटी काऊंसिलमध्ये चर्चा झाली होती आणि निर्णय सर्वानुमते घेतला गेला होता. त्या घटनादुरूस्तीला कोणत्याही पक्षाच्या राज्य सरकारनेही विरोध केला नव्हता. इंटिग्रेटेड जीएसटी, कॉम्पेन्सेशन सेस वगैरे गोष्टी आणून सगळ्या राज्यांचे आक्षेप त्यात दूर केले गेले. राजकीय मतभेद असले तरी सगळ्यांनी भारतीय म्हणून एकत्र काम करून एवढी गुंतागुंतीची प्रणाली अंमलात आणली. तेव्हा विरोधी पक्षांनीही 'हो जीएसटीमध्ये आमचेही योगदान आहे' असे म्हणत त्या प्रणालीचे श्रेय घ्यायचा प्रयत्न केला असता तर ते कोणीच नाकारू शकले नसते. पण नेहमीप्रमाणे राहुल गांधींनी त्याला गब्बरसिंग टॅक्स वगैरे म्हटले. सुरवातीच्या काळात अंमलबजावणीत ज्या अडचणी आल्या त्याचे खापर फक्त मोदी सरकारवर फोडायचा प्रयत्न झाला. त्यातून झाले असे की जीएसटी ही सामुहिक नाही तर केवळ मोदी सरकारची कामगिरी आहे असे लोकांना वाटावे असे वातावरण विरोधी पक्षांनीच तयार केले. मोदींसारखा मुरब्बी राजकारणी असा टाकलेला फुलटॉस थोडीच वाया जाऊ देणार आहे? तो त्यावर सिक्सर मारणारच. ३० जून २०१७ च्या रात्री १२ वाजता विशेष कार्यक्रम घेऊन जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली तेव्हा माजी पंतप्रधान म्हणून मनमोहनसिंग आणि देवेगौडांनाही मानाने व्यासपीठावर आमंत्रण होते. पण काँग्रेसने त्या कार्यक्रमावर बहिष्कारच घातला आणि 'हो जीएसटी बिल पहिल्या स्वरूपात आम्ही संसदेत आणले होते त्यातच पुढे बदल करून आताचे बिल आणले गेले आहे' असे म्हणत श्रेय आपल्याकडे घ्यायची चांगली संधी व्यर्थ दवडली. तेव्हा... आता जीएसटीमध्ये कपात होत असेल तर ते श्रेय जीएसटी काऊंसिलचे असे म्हणत पुढे आलात तर ते कसे चालेल? ऐसा कैसा चलेगा कालिया? सगळ्यांचा त्यात सहभाग असला तर तुम्ही दोष देताना सगळे केवळ दोष मोदी सरकारच्या माथी मारलेत ना? मग आता सगळे श्रेयही मोदी सरकारच घेणार.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद! GST परिषद सरकारचे कळसूत्री बाहुले आहे. मोदींसारखा मुरब्बी राजकारणी असा टाकलेला फुलटॉस थोडीच वाया जाऊ देणार आहे? एखादी खुली पत्रकार परिषद घेऊन मारून दाखवावी सिक्सर. तिकडे अब्बा डब्बा चब्बा. GST कशाशी खातात हे तरी माहित असेल का शंका आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

@ चं सू कु छे छे हे काहींच्या काही समर्थन आहे मोदींनी देश रसातळाला नेऊन ठेवलाय निवडणूक अयोग्य त्यांची बटीक आहे आणि जी एस टी कौन्सिल त्यांची दासी झालेली आहे. मोदींनी राजीनामा दिल्याशिवाय देश गाळातून ( सॉरी गोबर मधून) बाहेर येणं अशक्यच आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंसूकु प्रतिसाद आवडला. संगणकीकरणामुळे चुका लवकर लक्षात आल्या. संगणकीकरणामुळे त्या कमी वेळात दुरस्त करण्यात आल्या. सगळीच प्रगती वेगवान होती. पंचवार्षिक योजनांच्या काळात संगणकीकरण शून्य होते. पाच वर्षांनतर यशापयश मोजायला सुरवात व्हायची. त्याचा अहवाल येईपर्य़ंत दोन अडीच वर्षे लागायची. तोपर्यंत नविन पंचवार्षिक योजना निम्मी संपलेली असायची. मग त्यापुढच्या पंचवार्षिक पंचयोजनेत चुकांची दुरूस्ती व्हायची. सुधारणा तेंव्हाही होत्या पण लागणारा कालखंड खूप मोठा होता. संगणीकरणाचा किंवा एकूणच प्रगत तंत्रज्ञानाचा योग्य फायदा मोदींना उठवता आला हे मान्य. जसे की नंदन निलकेणींची उपयोग कॉंग्रेसपेक्षा मोदींना जास्त चांगल्या प्रकारे करून घेता आला. राजकारण बाजूला ठेवले तरी एवढे तरी मान्य करायलाच लागते की, उपलब्ध संसाधनाचा उत्तम उपयोग करण्यात मोदींचा हातखंडा आहे.

जीएसटीच्या अंमलबजावणीत नेमके तेच केले. सुरवातीच्या काळात जीएसटीच्या अंमलबजावणीत अनेक गोंधळ नक्कीच होते. त्याचे कारण उघड आहे. इतक्या लाखो-कोट्यावधी गोष्टी विकल्या जात असतात, त्यात एक गोष्ट दुसर्‍यात कच्चा माल म्हणून, एखाद्या मोठ्या वस्तूत सुटे भाग वेगवेगळ्या जीएसटी ब्रॅकेटमध्ये वगैरे शेकडो नानाविध गुंतागुंती होत्या. त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज डिझाईन करताना येणे शक्य नाही. मग काय करायचे? तर आपल्याला सगळ्यात उत्तम पध्दत डिझाईन करता येईल तशी करायची आणि मार्केटमध्ये उतरायचे. पण मार्केटकडून फिडबॅक घ्यायचा- म्हणजे कुठे कुठे अडचणी येत आहेत ते बघायचे आणि त्या अडचणी दूर करत जायचे. भारतासारख्या अवाढव्य मोठ्या अर्थव्यवस्थेत जर असे गणिती मॉडेल बनवून एकदम परफेक्ट जीएसटीची अंमलबजावणी करायची पध्दत डिझाईन करायचे म्हटले असते तर अजूनही त्या पध्दतीचे डिझाईनच सुरू असते आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी झालीच नसती. इतकी विलक्षण गुंतागुंतीची पध्दत प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करायच्या आधी १००% परफेक्ट डिझाईन करता येणे अशक्य. म्हणून जितकी निर्दोष पध्दत डिझाईन करता येईल तितकी करा आणि अंमलबजावणी सुरू करा पण कुठे पेन पॉईंट्स आहेत ते बघून ते दुरूस्त करा हाच सर्वोत्तम उपाय.
हे एखाद्या सर्जनने रुग्णाचे भूल न देता ऑपरेशन करून, कोणत्या कोणत्या टप्यावर रुग्णाला अधिक वेदना होतात, रुग्ण वेदना असह्य झाल्यावर शरीराला झटके देऊन शस्त्रक्रियेला बाधा आणू शकतो, त्याला नियंत्रणात आणण्यासाठी किती मनुष्यबळ लागेल, शेवटी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यावर त्यावर अभ्यास करून निरीक्षण नोंदवून निष्कर्ष काढणे की भूल देऊन शस्त्रक्रिया केल्यास रुग्णास त्रास होत नाही, अतिरिक्त मनुष्यबळ लागत नाही. हा सगळा अनुभव कोणाच्या जीवाला त्रास देऊन मिळवला तर रुग्णाच्या. रुग्णाच्या त्रासाबरोबर कालापव्ययही झाला. हे सर्व टाळण्यासाठी यूपीए ने GST बिलात १८% हा सर्वोच्च कर टप्पा सुचवला होता. त्यासाठी मी वरील एका प्रतिसादात एक लिंक दिली होती. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की ती लिंक बघा.

धुळ्यात नागाचा वाढदिवस साजरा करून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकल्याची घटना झाली आहे. तो नाग घरी पाळलेला असावा नाहीतर त्याचा वाढदिवस कसा माहित झाला असावा? घरी असले प्राणी पाळणे हा गुन्हा आहे असे दिसते. त्यामुळे राज वाघ या तरूणाला पोलिसांनी वन्यप्राण्यांसंबंधीचा कायदा मोडल्याबद्दल अटक केली आहे. अधिक माहिती https://marathi.ndtv.com/maharashtra/dhule-news-snake-birthday-celebrat… वर cobra

In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्याला नागडा करून हाणला पाहिजे!
म्हणजे समजा घरी वाघ पाळला असता तर त्याला वाघडा करून हाणला पाहिजे अशी मागणी केली असती का?

एन.डी.ए ने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिली आहे. २०२२ मध्ये जगदीप धनखड विरूध्द मार्गारेट अल्वा या लढतीत एन.डी.ए कडे लोकसभेत ३४० च्या आसपास खासदार होते. त्यामुळे जगदीप धनखड आरामात जिंकले होते. यावेळेस लोकसभेतील एन.डी.ए खासदारांचा आकडा ५० ने कमी आहे. त्यामुळे राधाकृष्णन जिंकले तरी तितक्या आरामात जिंकायचे नाहीत ही शक्यता आहे. बहुदा म्हणून तामिळ व्यक्तीला उमेदवारी दिली असावी असे वाटते. त्याचे कारण तामिळनाडूतील स्थानिक पक्षांना तामिळ उमेदवाराला विरोध करणे तितके सोपे जाणार नाही. त्यांनी पाठिंबा दिला नाही तरी ते तटस्थ राहिले तरी राधाकृष्णन यांचे काम अधिक सोपे होईल. सी.पी.राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदावर निवडून गेले तर शंकर दयाळ शर्मांनंतर उपराष्ट्रपतीपदावर निवडून जाणारे महाराष्ट्राचे दुसरे राज्यपाल होतील. २००२ मध्ये पी.सी.अलेक्झांडर यांना एन.डी.ए राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देणार अशी बातमी होती. वाजपेयी सरकारकडून त्यांना तसे सूचितही करण्यात आले होते. पण त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसने विरोध केला आणि तेव्हा एन.डी.ए कडे आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे समर्थन नव्हते म्हणून पी.सी.अलेक्झांडर राष्ट्रपती बनू शकले नव्हते. सी.पी.राधाकृष्णन हे नाव तसे माझ्या परिचयाचे आहे. १९९८ मध्ये ते कोईमतूरमधून लोकसभेवर भाजपचे उमेदवार म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या प्रचारासाठी लालकृष्ण अडवाणी कोईमतूरमध्ये सभा घ्यायला येणार होते. त्या सभेच्या ठिकाणी अडवाणी पोचायच्या आधी बॉम्बस्फोट झाले आणि ५०+ लोक त्यात दुर्दैवाने मारले गेले होते. १९९८ मध्ये तामिळनाडूत जयललितांच्या आघाडीला (त्यात भाजप होता) ३९ पैकी ३० जागा असे चांगले यश मिळाले त्यात या घटनेचा वाटा होता असे म्हटले गेले. तसेच त्या बॉम्बस्फोटांमध्ये रा.स्व.संघाचा हात आहे आणि त्याचा पुरावा आपल्याकडे आहे असे विधान तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरींनी केले होते. ते ऐकून त्यावेळेस हसायलाच आले होते. रा.स्व.संघाचा हात त्या घटनेत होता की नव्हता हा पुढचा प्रश्न. पण काहीही असले तरी त्याचा पुरावा केसरींना कुठून मिळणार होता? त्यानंतर संघाने त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. इतका क्लोज अ‍ॅन्ड शट खटला दुसरा नसेल असे वाटले होते. कारण केसरींकडे जो कोणता पुरावा होता तो त्यांनी दिला असता की मग ते सुटले असते. इतकेच नाही तर संघावरही दहशतवादी संघटना म्हणून बंदी आली असती. आणि तसा पुरावा त्यांना देता आला नसता (कुठून देणार होते?) तर मग त्यांना शिक्षा झाली असती. त्यामुळे चाचा केसरी तुरूंगात जाणार म्हणून मी सुखावलो होतो. पण कुठचे काय. संघाने त्यांना नुसत्या माफीवर सोडून दिले. तसे केजरीवालांनाही अरूण जेटली आणि नितीन गडकरींनी असे स्वस्तात सोडले. उजव्या गटाचे लोक बहुतेक वेळा भोळ्या सांबाचे अवतार होतात. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

विरोधी आघाडीने मुळचे आंध्र प्रदेशचे बी.सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. विरोधी आघाडीचे हे पाऊल एन.डी.ए च्या खेळीला प्रत्युत्तर आहे असे म्हणायला हवे. एन.डी.ए ने सीपी राधाकृष्णन हा तामिळ उमेदवार देऊन विरोधी आघाडीतील द्रमुक या तामिळनाडूतील मोठ्या घटकपक्षाला त्यांना विरोध करायला कठीण केले. त्यालाच प्रत्युत्तर आता विरोधी आघाडीने तेलुगू उमेदवार देऊन केले आहे. आता तेलुगू देसम हा एन.डी.ए चा आंंध्र प्रदेशातील महत्वाचा मित्रपक्ष त्या उमेदवाराला विरोध कसा करणार? पण एन.डी.ए साठी एक समाधानाची गोष्ट ही की इतर कोणत्याही राज्यापेक्षा तामिळनाडूत कितीतरी जास्त भाषिक अभिमान आहे. त्यामुळे तेलुगू देसमने रेड्डींना विरोध करण्यामागे आहे त्यापेक्षा द्रमुकने राधाकृष्णनना विरोध करण्यामागे अधिक अडचण असेल असे वाटते. बघू काय होते ते.

ग्यानेश कुमार प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणतात की मतदानाच सीसीटीव्ही फुटेज देऊ शकत नाही कारण आयाबहिणींची प्रायव्हसी महत्त्वाची आहे. एकच नंबर त्या फूटेजचे काय करणार आहेत मग? केले कशाला? दोनच शक्यता वाटतात. एक म्हणजे ते धाक वाटावा म्हणून सध्या फेक कॅमेरे मिळतात तसे केले असावे किंवा दोन निवडणूकींच्या मधल्या काळात टाईमपास म्हंणून आयोगाला बघायला.

CCTV footage असं share करण कसं शक्य आहे. कोणाला पाहिजे असेल तर निकालानंतर ४५ दिवसाच्या आत कोर्टा मार्फत मिळवू शकतो. ४५ दिवसानंतर ते नष्ट करण्याचा कायदा आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

हो असा कायदा आहे खरा! परंतु आयाबहिणींची प्रायव्हसी कशी जपणार ? त्यांचे चेहरे ब्लर करणार का?

In reply to by आग्या१९९०

गरज असेल तर करतील ही ब्लर. पण कोर्टात जाऊन होईल हे. CCTV मागितलं आणि दिलं अशी गोष्ट नाही. मतदान केंद्रावर नक्की कुठं कॅमेरे असतात? कधी दिसलें तर नाहीत. पुढच्या वेळी बघावं लागेल.

In reply to by रात्रीचे चांदणे

४५ दिवसानंतर ते नष्ट करण्याचा कायदा आहे. हो, ते चंदीगडचे निर्लज्ज प्रकरण घडले, उघडकीला आले आणि त्यानंतर एका अ‍ॅडव्होकेट महमूद प्राचाने हरियाणा असेंब्ली निवडणूकीतले फूटेज, व्हिडिओग्राफि, १७ सी चे १ आणि २ फॉर्म्स मागणीसाठी पंजाब हरियाणा हायकोर्टात पिटिशन टाकली मग आयोग हुशार झाला. डायरेक्ट कायदाच करुन टाकला. आता झाला कायदा तर..... शहरात रस्तोरस्ती आणि गावात सरकारी हपिसात, शाळांत, मॉलमध्ये, चौकात, दुकानांत असणारे सीसीटिव्ही प्रायव्हसी जपतात का आयाबहिणींची? प्रत्येक पक्षाला दिल्या जाणार्‍या मतदार सूचीवरुन आणि आंतरजालाचा वापर करणार्‍यांना आणि आतातर ए आय हाताशी असताना कुणाची निदान इलेक्शनातली प्राय्व्हसी जपली जाणारे असे वाटते का खरेच तुम्हाला? मग आता हे लंगडया सबबीचे अधिक लंगडे समर्थन ह्या सदरात धरुयात काय?

In reply to by अभ्या..

४५ दिवसांत फूटेज नष्ट करण्याचा कायदा आयोगाने चंदीगड प्रकरणात नाचक्की झाल्यामुळेच आणला आहे. तसलीच फालतू सबब इलेक्ट्रॉनिक मतदान याद्या न देण्याबाबत. नेमक्या अनुराग ठाकूर यांना मात्र त्या मिळाल्या बरं. आयोगाचा निर्लज्ज पक्षपातीपणा इतका उघड आहे की त्याचे समर्थन करणारे कसे करत आहेत तेच कळत नाही. आयोगाच्या बौध्दिक आणि नैतीक दिवाळखोरीवर भाष्य करणारा आजचा लोकसत्ताचा अग्रलेख खूपच नेमका आहे: https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-electi…

In reply to by स्वधर्म

भारतीय लोकशाहीचा गळा आवळायचे काम भाजपेयी निवडणूक आयोग नी इडी ह्यांचा गैरवापर करून करताहेत! नीतिमत्ता ह्या शब्दाशी भाजपेयींचे काहीही घेणेडदेणे नाही.

In reply to by स्वधर्म

४५ दिवसांत फूटेज नष्ट करण्याचा कायदा आयोगाने चंदीगड प्रकरणात नाचक्की झाल्यामुळेच आणला आहे.
हे नक्की का? केंद्रीय निवडणुक आयोग नक्की कोणत्या निवडणुका घेते हे माहित आहे ना? फक्त लोकसभा, विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या निवडणुका केंद्रीय निवडणुक आयोग घेते. त्याखालील निवडणुकांचा केंद्रीय निवडणुक आयोगाशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे मुळात चंदिगड महापालिकेची निवडणुक केंद्रीय निवडणुक आयोगाने घेतलीच नव्हती. केंद्रीय निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर आयोगाने आतापर्यंत घेतलेल्या सगळ्या निवडणुकांच्या निकालांचे पीडीएफ बघायला मिळतात. चंदिगड महापालिकेच्या निवडणुकांचे पीडीएफ मिळते का ते बघा तिथे आणि मिळाल्यावर लिंक द्या. नाहीच मिळायचे. कारण मुळात त्यांनी ती निवडणुक घेतलीच नाहीये. चंदीगड प्रकरण म्हणजे काय? २०२४ मध्ये चंदीगडमध्ये महापौर निवडणुकीत तिथल्या प्रिसायडिंग ऑफिसरने काही नगरसेवकांची मते रद्दबादल ठरवली होती त्यामुळे तिथे भाजपचा महापौर निवडून आला. ते प्रकरण कोर्टात गेले आणि मग तो निकाल फिरला. ती गोष्ट २०२४ मधील. चंदिगड महापालिका निवडणुक झाली होती २०२१ मध्ये. म्हणजे जे प्रकरण कोर्टात गेले त्यात मतदार सामान्य मतदार नव्हते तर चंदिगड महापालिकेतील नगरसेवक होते. मुद्दलात चंदिगड महापालिका निवडणुका घेण्याशी केंद्रीय निवडणुक आयोगाचा काहीही संबंध नाही तर त्यावर चढलेल्या या व्याजाशी- म्हणजे महापौर निवडणुकीशी कसा असणार? आणि त्या निवडणुकांमध्ये जे काही झाले त्याचा संबंध निवडणुक आयोगाशी जोडत आहात? कमाल आहे. बादवे, २०२५ मध्ये तसले काहीही न होता चंदिगडमध्ये भाजपचाच महापौर निवडून आला आहे बरं का. बाकी ४५ दिवसात फुटेज नष्ट करणे लॉजिकल आहे. त्याचे कारण निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला किंवा कोणाही मतदाराला मतमोजणी झाल्यापासून ४५ दिवसात कोर्टात त्या निवडीला आव्हान देता येते. निवडणुक झाल्यावर दोन वर्षांनी कोणी म्हणाले की मला त्या निवडीला आव्हान द्यायचे आहे तर ते देता येत नाही. त्यामुळे असे कोणी आव्हान ४५ दिवसात दिले नाही तर कोणतेही कोर्ट मतदानाचे फुटेज द्या असे सांगू शकत नाही. मग काय करायचे ते फुटेज ठेऊन? एखाद्या मतदारसंघात असे निवडीला आव्हान दिले गेले तर मात्र सगळे फुटेज जपून ठेवतात कारण सुनावणीच्या दरम्यान ते फुटेज पुरावा म्हणून वापरता येऊ शकते. या सगळ्याचा चंदिगडमधील प्रकाराशी काय संबंध? आता गिरीश कुबेरांच्या नेहमीप्रमाणे दिवाळखोर मुद्द्यांचा समाचार घेतो- १. पहिला मुद्दा हा की मतदारयादीत २० लाख मृत मतदारांचा समावेश होता. ही वजाबाकी गेल्या काही वर्षातील आहे. मग प्रश्न असा की लोकसभा निवडणुका या वीस लाखांच्या कलेवरांना घेऊन झाल्या होत्या का? दोन मुद्दे: अ. समजा लोकसभा निवडणुक अशा सदोष मतदारयादीसह झाली होती ही चूक असेल तर मग ती चूक कधीच दुरूस्त करायची नाही का? हे काय लॉजिक झाले? ब. समजा लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारयाद्या स्वच्छ करायला घेतल्या असत्या तर आता विरोधी पक्ष रडत आहेत तसे तेव्हा रडले नसते याची काय खात्री आहे? २. बिहारमध्ये वगळलेल्या ६५ लाखांपैकी कोणी आक्षेप घेतला नाही- यातील ६५ लाखांपैकी कोणी आक्षेप घेतला नाही हा शब्दप्रयोग गिकुंचा खोडसाळपणा किंवा फाजीलपणा आहे. ६५ लाख मतदार वगळले असतील तर त्याविषयी कोणीही आक्षेप घेतला नाही याचा अर्थ वगळलेल्या ६५ लाखांनी आक्षेप घेतला नाही असा होतो का? तो अर्थ आपल्या दिवाळखोर अग्रलेखात गिकुंनी लावला आहे. आता असा आक्षेप कोण आणि कसा घेऊ शकतो? मतदारयाद्यांमध्ये असे बदल करायची ही काही पहिली वेळ नाही. आणि तसे बदल करायची निवडणुक आयोगानेच आखून दिलेली प्रक्रिया आहे- बर्‍याच पूर्वीपासून. त्या अंतर्गत विविध राजकीय पक्षांचे बूथ लेव्हल एजंट्स (बी.एल.ए) या कामात इन्व्हॉल्व्ह करून घेतले जातात. त्याचे कारण काय? तर निवडणुक आयोगाचा स्वतःचा कर्मचारीवर्ग थोडा असतो. मतदारयाद्यांची तपासणी आणि बदल यासाठी कोट्यावधी लोकांपर्यंत जायचे असेल तर त्यासाठी लागणारे कर्मचारी आयोगाकडे नसतात आणि आयोग त्यासाठी राज्य सरकारच्याच कर्मचार्‍यांचा उपयोग करून घेते. प्रत्येक मतदानकेंद्रनिहाय (बूथ) मतदारयाद्या असतात त्यात बदल करताना योग्य ते बदल केले गेले पाहिजेत. जर काही आक्षेप असतील तर हे बी.एल.ए आपले आक्षेप नोंदवू शकतात. हे बी.एल.ए विविध राजकीय पक्षांनीच नियुक्त केलेले असतात. बिहारमधील एस.आय.आर मध्ये दीड लाखाहून जास्त बी.एल.ए सगळ्या राजकीय पक्षांनी मिळून नियुक्त केले होते. अधिक माहिती https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2149091 वर. हे ६५ लाख मतदार वगळले याविषयी कोणी आक्षेप घेतला नाही याचा अर्थ त्या त्या बूथमधील बी.एल.एनी आक्षेप घेतला नाही. त्याचा अर्थ गिकुंनी त्या ६५ लाखांपैकी कोणी आक्षेप घेतला नाही असा लावत आहेत. गिकु या मनुष्याने गेल्या काही वर्षात जे एकेक अकलेचे तारे तोडले आहेत ते पाहता असला आणखी एक तारा त्यांनी तोडला तर त्यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखे नाही. ३. राहुल गांधींनाच प्रतिज्ञापत्र सादर करायला का सांगता? त्याच्यावर खटला का भरत नाही? कोणत्याही सरकारी कामाविषयी आक्षेप असेल तर तक्रार करायची एक पध्दत असते. अमुक एक अधिकारी भ्रष्ट आहे असा दावा असेल तर ते पत्रकार परिषदेत सांगितले तर त्याविषयी चौकशी होत नाही. तर नियमाप्रमाणे तक्रार दाखल करावी लागते. तशीच याविषयी काही तक्रार असेल तर विहित तक्रार दाखल करा हे सांगणे काय चुकीचे आहे? दुसरे म्हणजे त्याच्यावर खटला का भरत नाही हा प्रश्न. परवाच आयोगाने राहुलला सात दिवसात तुमच्या सहीने तक्रार दाखल करा नाहीतर माफी मागा हे आव्हान दिले आहे. सात दिवस पूर्ण व्हायची वाट तर बघा. मग बघू निवडणुक आयोग त्याच्यावर खटला भरते की नाही. समजा खटला भरला तरी मग दुसर्‍या बाजूनेही रडारड होणार हे लिहून घ्या. २०१७ मध्ये अमित शहांच्या मुलाविरूध्द असेच बिनबुडाचे आरोप कोणी केले होते त्याच्यावर त्याने खटला दाखल केला. मग अभिव्यक्तीस्वातंत्र्याची कशी गळचेपी होत आहे म्हणूनही रडारड झाली होती. एकूणच गिकु या मनुष्याचे अग्रलेख आणि संजय राऊतनी अग्रलेख यात फार फरक नसतो. त्या कागदांचा उपयोग एकाच गोष्टीसाठी. ती गोष्ट कोणती हे चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात येईलच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

>> ४५ दिवसांत फूटेज नष्ट करण्याचा कायदा / निर्णय आयोगाने चंदीगड प्रकरण झाल्यानंतर घेतला आहे की आधी एवढाच मुद्दा आहे. चंदीगडची निवडणूक ही निवडणूक आयोगाने घेतली असा दावा कोणीही करत नाही, परंतु त्या प्रकरणामुळे आयोगाला सीसीटीव्ही फूटेज ठेवले तर आपले गैरप्रकार व अकार्यक्षमता सहज उघड होऊ शकते अशी भीती वाटल्याने त्यांनी हा नियम आणला असावा. ही शक्यता संपूर्णपणे दुर्लक्षून आपण फक्त ती निवडणूक आयोगाने घेतली नाही, सबब त्या नियमाशी आयोगाचा संबंधच नाही अशी भूमिका घेत आहात. हा वकीली युक्तीवाद झाला ज्याचा सत्याशी/ नैतिकतेशी संबंध नाही. ती निवडणूक आयोगाने घेतली नव्हती, या एकाच फटीत बोट घालून ती कितीही मोठी करायचा प्रयत्न केला तरी, आयोगाची पक्षपाती भूमिका दाखवणारी ही एकच गोष्ट नाही. असंख्य आहेत. उदा. इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या देणार नाही, कागदीच याद्या देणार, हा नियम आयोगाची कोणती वृत्ती दाखवतो? तो मुद्दा अलगद सोडून देऊन तुंम्ही खूप मोठा प्रतिसाद लिहिला आहे, पण या दोन्ही दाखल्यांमुळे मूळ मुद्दा खोडला गेला नाही हे नम्रपणे दाखवून देतो. बाकी कुबेर यांच्याबाबत प्रतिवाद करायचा तर मोठेच विषयांतर होईल.

In reply to by स्वधर्म

आयोगाने चंदीगड प्रकरण झाल्यानंतर घेतला आहे की आधी एवढाच मुद्दा आहे. चंदीगडची निवडणूक ही निवडणूक आयोगाने घेतली असा दावा कोणीही करत नाही, परंतु त्या प्रकरणामुळे आयोगाला सीसीटीव्ही फूटेज ठेवले तर आपले गैरप्रकार व अकार्यक्षमता सहज उघड होऊ शकते अशी भीती वाटल्याने त्यांनी हा नियम आणला असावा. ही शक्यता संपूर्णपणे दुर्लक्षून आपण फक्त ती निवडणूक आयोगाने घेतली नाही, सबब त्या नियमाशी आयोगाचा संबंधच नाही अशी भूमिका घेत आहात. हा वकीली युक्तीवाद झाला ज्याचा सत्याशी/ नैतिकतेशी संबंध नाही.
त्याच धर्तीवर मी म्हणतो की राहुल गांधींची ७ ऑगस्टची पत्रकार परिषद सय्यारा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर झाली होती की आधी एवढाच मुद्दा आहे. असे म्हटल्यास सय्यारा चित्रपटाचा आणि राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा संबंध काय हे किमान प्रायमा फॅसी दाखवून द्यायची जबाबदारी माझी होणार नाही का? नाहीतर जसा काळ पुढे जातो तशा घटना घडतच असतात. उदाहरणासाठी समजा जर्मनीतील एखाद्या राज्यात नवा मुख्यमंत्री आला आणि त्याच्याच दुसर्‍या दिवशी राहुल गांधींची पत्रकार परिषद झाली असे म्हटले तर मग त्या नव्या मुख्यमंत्र्याचा आणि राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा संबंध काय हा प्रश्न येणारच. तद्वतच चंदीगड प्रकरणानंतर आयोगाने हा निर्णय घेतला की आधी घेतला असा प्रश्न तुम्ही विचारलात तर मग चंदिगडचा आणि निवडणुक आयोगाचा संबंध काय हा पुढचा मुद्दा येणारच. त्यावर माझे भाष्य असे मुळात ती निवडणुक आयोगाने घेतलीच नसल्याने तसा काही संबंध असायचा प्रश्न नाही. दुसरे म्हणजे सीसीटीव्ही फुटेज घेणे ही त्यामानाने नवी प्रगती असल्याने १९५१-५२ मध्ये पहिली निवडणुक झाली तेव्हा आणि त्यानंतर अनेक वर्षे तसे फुटेज घेतले जायचा प्रश्नच नव्हता. निवडणुक आयोगाच्या परीपत्रकात मे २००९ मध्ये असे फुटेज ६ महिन्यात डिलीट करावे असा उल्लेख सापडला. https://hindi.eci.gov.in/files/file/2164-use-of-videography-and-digital… चंदिगड प्रकरण झाले जानेवारी २०२४ मध्ये. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये चंदिगडमध्येच महापौरपदासाठी वार्षिक निवडणुक झाली आणि त्यात भाजपचाच उमेदवार निवडून आला- कसलाही गदारोळ न होता. https://www.ndtv.com/india-news/bjp-wins-chandigarh-mayor-election-upse… निवडणुक आयोगाने ४५ दिवसात सीसीटीव्ही फुटेज डिलीट करा असा निर्देश दिला जून २०२५ मध्ये: https://www.ndtv.com/india-news/election-commission-to-poll-officers-de… बरं जून २०२५ मध्ये म्हणजे जुन्या ६ महिन्याच्या आदेशाप्रमाणे जायचे झाले तर २०२४ च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचेही फुटेज डिलीट झालेच असेल. तसेच जानेवारी २०२४ मध्ये चंदिगड प्रकरण झाल्यावर इतक्या घटना घडल्या- लोकसभा निवडणुक, हरियाणा- जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुक, महाराष्ट्र-झारखंड विधानसभा निवडणुक, दिल्ली विधानसभा निवडणुक, पहलगाम प्रकरण, ऑपरेशन सिंदूर वगैरे वगैरे. त्यानंतर निवडणुक आयोगाचा ४५ दिवसात फुटेज डिलीट करायचा आदेश. पहलगाम, ऑपरेशन सिंदूर जाऊ दे त्यामुळे देश ढवळून निघाला असला तरी त्याचा निवडणुक आयोगाशी थेट संबंध काहीच नाही म्हणून त्या दोन घटना सोडून देऊ. पण निवडणुक आयोगाशी थेट संबंध असलेल्या लोकसभा आणि हरियाणा-जम्मू काश्मीर-महाराष्ट्र-झारखंड-दिल्ली या विधानसभा निवडणुका जानेवारी २०२४ नंतर झाल्या तरी निवडणुक आयोगाशी काहीच संबंध नसलेल्या चंदिगड प्रकरणाशी या आदेशाचा संबंध जोडत आहात याचा अर्थाअर्थी काहीच संबंध लागत नाही. तिसरे म्हणजे ६ महिने फुटेज ठेवायचा पूर्वी आदेश निवडणुक आयोगाने दिला होता खरा पण ६ महिने हा तसा लॉजिकल कालावधी नाही आणि ४५ दिवसच लॉजिकल कालावधी आहे. त्याचे कारण याच चर्चेत कुठेतरी दिले होते. तरी परत लिहितो. जनप्रतिनिधी कायद्याप्रमाणे मतमोजणी झाल्यानंतर ४५ दिवसात निवडून गेलेल्या उमेदवाराच्या निवडीला आव्हान देता येते. त्यामुळे कोणी निवडीला आव्हान दिले नसेल तर ४५ दिवसात फुटेज डिलीट करणे हा लॉजिकल कालावधी आहे. त्यानंतर कोणी म्हटले की मला फुटेज बघायचे आहे तर ते तसे मागायला काही कायदेशीर आधार आहे असे वाटत नाही. जर ४५ दिवस झाल्यानंतर कोणी निवडीला आव्हान देऊ शकत नसेल तर मग आणखी साडेचार महिने उगीचच फुटेज जपून ठेवायचे तसे काहीच कारण नाही.
आयोगाची पक्षपाती भूमिका दाखवणारी ही एकच गोष्ट नाही. असंख्य आहेत. उदा. इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या देणार नाही, कागदीच याद्या देणार, हा नियम आयोगाची कोणती वृत्ती दाखवतो? तो मुद्दा अलगद सोडून देऊन तुंम्ही खूप मोठा प्रतिसाद लिहिला आहे, पण या दोन्ही दाखल्यांमुळे मूळ मुद्दा खोडला गेला नाही हे नम्रपणे दाखवून देतो.
इलेक्ट्रॉनिक मतदार याद्या देणार नाही म्हणजे काय? त्या असतातच आणि कोणालाही डाऊनलोडही करता येतात. दोन मिनिटांपूर्वी उगीचच गया जिल्ह्यातील एका मतदानकेंद्रावरील मतदारांची यादी https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S04 वरून डाऊनलोड केली. जी गोष्ट आधीपासूनच ऑनलाईन आहे ती परत द्या अशी मागणी कशाकरता? बाकी आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मतदानकेंद्रावरील मतदारयाद्या तयार करायच्या कामात विविध पक्षांनी नेमलेले बी.एल.ए असतातच. त्याविषयी कोणी बी.एल.ए ने तक्रार केली नाही असे म्हटले गेले असेल तर त्यानंतरही एकही बी.एल.ए- हो मी तक्रार केली होती असे म्हणत पुढेही आलेला नाही. असल्यास ती बातमी दाखवून द्यावी. मग निवडणुक आयोग पक्षपाती आहे हे कशावरून?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

निवडणुक आयोग पक्षपाती आहे हे कशावरून? जिकडे तिकडे मोदी जिंकतात याचा अर्थच तो आहे कोण रे तो कर्नाटक पंजाब तेलंगण बद्दल म्हणतोय? जरा गप्प बस पाहू

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तुम्ही कायच्या काय अ‍ॅनॉलॉजी देत आहात असं नाही का वाटंत? राहूल गांधी यांची पत्रकार परिषद आणि सैयारा हा चित्रपट! तुमचा प्रतिसाद खूप मोठा आहे. जणू काहीही करून तो मुद्दा सिध्द झालाच पाहिजे असा अट्टाहास त्यातून दिसून येतो. जर मूळ मुद्द्यात दम नसेल, तर हे करावंच लागतं, त्यामुळे समजू शकतो. आयोगाला लोकांनी, स्वयंसेवी संस्थांनी, निष्पक्ष स्वयंसेवी संस्थांनी प्रश्न विचारायला सुरूवात केली तसा आयोग अधिकाधिक अपारदर्शक होत गेल्याचे सहज दिसून येते. तुंम्हाला वाटते की चंदीगड निवडणूकीचा या निर्णयाशी संबंध नाही, तर ठीक आहे. पण तो सगळा निवडणूक अधिकारी मसीह यांचा पक्षपात फक्त आणि फक्त सीसी टीव्ही फुटेज उपलब्ध झाल्यामुळेच उघडकीला आला हे विसरता येत नाही. तरीही तुमचे मत मान्य करूया. पण महमूद प्राचा यांच्या हरियाणा निवडणुकीच्या संदर्भातील खटल्याचा संबंध अभ्या यांनी दाखवून दिला होता त्याचे काय? तो संबंध अधिक स्पष्टपणे समोर येतो तो असा की ९ डिसेंबर २०२४ ला प्राचा यांच्या तक्रारी संदर्भात कोर्टाने आयोगाला सीसी टीव्ही फूटेज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर लगेच म्हणजे डिसेंबर महिन्यातच आयोगाने हे फूटेज न देण्याचा नियम केला. तो तेंव्हाच का केला? आयोग जनतेच्या पैशावर चालतो आणि तरी जनतेलाच जनतेचीच माहिती उपलब्ध न करुन देण्याबद्दल नियम बनवतो, त्या आयोगाची आपण कितीही मोठा प्रतिसाद लिहिला तरी कशी भलामण करु शकता? दुवा: No access to CCTV footage after 45 days, rules Election Commission EC's latest decision to destroy all CCTV footage, webcast records and photos 45 days after poll results are declared raises tricky questions The Election Commission of India and the elections it conducts are indeed funded by the people of India, the taxpayers. The ECI, however, seems to be taking unilateral decisions without engaging in consultations with the stakeholders. In December 2024, a week after the Punjab and Haryana High Court directed the commission to hand over CCTV footage of polling booths to a candidate, it urged the government to change rules and restrict access to such footage. Overnight, Rule 93 of the Conduct of Election Rules was changed to make footage inaccessible for public scrutiny. Earlier, Rule 93(2)(a) of the Conduct of Election Rules, 1961, stated that “all other papers relating to the election shall be open to public inspection”. राहूल गांधी यांनी मतदार याद्यांचे ७ फूट उंचीचे कागद दाखवले, व विश्लेषण करायला सहा महिने लागले असे पत्रकार परिषदेत सांगितले. तुंम्ही इलेक्ट्रॉनिक याद्या सर्वांना उपलब्ध आहेत म्हणत आहात, पण आयोगाने ताबडतोब राहूल गांधी यांच्या या मुद्द्याचे खंडन केल्याचे मला तरी आढळले नाही. आयोगाने आणि तिथे असलेल्या पत्रकारांनी लगेचच हा मुद्दा उडवून लावला असता की. आयोग विनाकारण टिका ऐकत गप्प का बसला? बाकी राहूल गांधी बरोबर चूक काही असले तरी शेकडो पत्रकारांच्या समोर जाऊन प्रश्नांना उत्तरे देतात. असे धाडस अजून मन की बात वाल्यांच्यात नाही.

In reply to by स्वधर्म

तुम्ही कायच्या काय अ‍ॅनॉलॉजी देत आहात असं नाही का वाटंत? राहूल गांधी यांची पत्रकार परिषद आणि सैयारा हा चित्रपट!
का? तुम्ही जर चंदिगड महापौर निवडणुक आणि ४५ दिवसात फुटेज नष्ट करायच्या आदेशाचा बादरायण संबंध जोडत असाल तर मग असा बादरायण संबंध मी का जोडू नये? मी काय घोडं मारलंय?
जर मूळ मुद्द्यात दम नसेल, तर हे करावंच लागतं, त्यामुळे समजू शकतो.
अगदी असेच तुमच्या प्रतिसादालाही लागू होते.
तो संबंध अधिक स्पष्टपणे समोर येतो तो असा की ९ डिसेंबर २०२४ ला प्राचा यांच्या तक्रारी संदर्भात कोर्टाने आयोगाला सीसी टीव्ही फूटेज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
तो आदेश एक विधानसभा मतदारसंघापुरता होता- फरीदाबाद जिल्ह्यातील बडखल. https://timesofindia.indiatimes.com/city/chandigarh/punjab-and-haryana-… तो आदेश निवडणुक आयोगाने पाळला नव्हता का?
a week after the Punjab and Haryana High Court directed the commission to hand over CCTV footage of polling booths to a candidate, it urged the government to change rules and restrict access to such footage.
ही लिंक नॅशनल हेराल्डवरील आहे म्हणजे कुठची ते वेगळे सांगायलाच नको. त्यांनी मुद्दामून अर्धीच बातमी दिलेली दिसते. आता जरा https://timesofindia.indiatimes.com/india/government-amends-election-ru… वरील पण बातमी बघा. त्यातील एक वाक्य- "All such material is available to candidates, including footage. After amendment, too, it will be available to them. However, others can always approach the courts to access such electronic records." याचा अर्थ काय? डिसेंबर २०२४ मधील आदेश काय म्हणत होता? तर उमेदवार सोडून अन्य कोणाला फुटेज हवे असेल तर ते कोर्टाच्या आदेशाने मिळू शकेल. अर्थातच कशाकरता हवे आहे हे कोर्टाला सांगावे लागेल आणि कोर्ट त्या बाबतीत कन्व्हिन्स झाले तर तो तसा आदेश देईल. पण त्या मुळातल्या नॅशनल हेराल्डमधील लिंकमध्ये आणि तुमच्याही प्रतिसादात असे चित्र उभे केले आहे की कोर्टाने तो बडखल संदर्भातील आदेश दिला आणि मग लगेच फुटेज देणेच बंद झाले. तसे अजिबात नाही. तर उमेदवार सोडून इतरांना कोर्टाच्या परवानगीने ते फुटेज मिळू शकणार. फुटेज ही गोष्ट अशी आहे की खोडसाळ उद्देशाने त्यातील व्हिडिओत काहीही मॉर्फ करून त्याचा दुरूपयोग होऊ शकेल. तो व्हायला नको म्हणून कोर्टात जा- कोर्टाला फुटेज नक्की कशाकरता हवे आहे ते सांगा आणि कोर्टाचा आदेश घेऊन या मग फुटेज मिळेल इतकाच त्याचा अर्थ आहे. डिसेंबर २०२४ मध्येही फुटेज ६ महिने ठेवायचाच आधीचा आदेश व्हॅलिड होता. तो ४५ दिवसांवर आणला जून २०२५ मध्ये. म्हणजे डिसेंबर २०२४ मधील नियमबदल आणि जून २०२५ मधील नियमबदल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्या एकच आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे असे म्हणत नाही. पण भविष्यात कोणी ही चर्चा वाचली तर सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यात हवा म्हणून हे लिहित आहे.
राहूल गांधी यांनी मतदार याद्यांचे ७ फूट उंचीचे कागद दाखवले, व विश्लेषण करायला सहा महिने लागले असे पत्रकार परिषदेत सांगितले.
७ फूट काय ७० फुटाचे कागद दाखवा हो. त्याने काय फरक पडतो? आदित्य श्रीवास्तवचा मुद्दा चॅनेलवाल्यांनी लगेच चघळला आणि स्वतः आदित्य श्रीवास्तवने नक्की काय झाले ते सांगितले. एकाच पत्त्यावर बरेच मतदार होते तो मुद्दा पण अशाच कोणत्यातरी चॅनेलवाल्यांनी त्या पत्यावरील घराच्या मालकाला गाठून क्लॅरीफिकेशन आणले. मी मागे कोणत्यातरी प्रतिसादात म्हटले होते त्याप्रमाणे त्या घरी हातावर पोट असलेले मजूर वगैरे लोक भाड्याने राहात होते आणि पूर्वीच्या काही वर्षात एक गेला, दुसरा आला असे चालू होते पण सगळ्यांचे पत्ते एकच होते कारण नंतर कोणी मतदारयादीतील पत्ते बदलायच्या भानगडीत पडले नाही. एकाच माणसाची ४०-४५ मुले कशी त्याचे पण स्पष्टीकरण आले की तो पत्ता म्हणजे एक मठ होता आणि त्या मठातील सगळे शिष्य आपल्या गुरूलाच आपले वडील मानत होते आणि तेच मतदारयादीत गेले. त्यामुळे एसी केबिनमध्ये बसून असले विश्लेषण केले पण जमिनीवर नक्की काय चालू आहे हेच बघितले नाही की मग असले कल्पनेतले मनोरे रचता येतात. याचा अर्थ मतदारयाद्यांमध्ये दोष नाहीत असे मी नक्कीच म्हणत नाही. पण त्यावरून व्होटचोरी आणि भाजपने निवडणुक ढापली वगैरे जे पुढचे तर्क लढविले आहेत त्याला आक्षेप आहे.
तुंम्ही इलेक्ट्रॉनिक याद्या सर्वांना उपलब्ध आहेत म्हणत आहात, पण आयोगाने ताबडतोब राहूल गांधी यांच्या या मुद्द्याचे खंडन केल्याचे मला तरी आढळले नाही.
राहुलने त्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्दे मांडले त्या सगळ्याला एकत्रित उत्तर आयोगाने पत्रकार परिषदेत दिलेच. आणि इलेक्ट्रॉनिक मतदारयाद्या सगळ्यांना उपलब्ध असतात हे अगदी कॉमन नॉलेज आहे. मतदारयादीत सगळी नावे झाल्यानंतर त्या मतदानकेंद्रावरील कोणाकोणाची नावे नव्याने जोडली आणि कोणाकोणाची नावे काढली हे पण असते. त्याचे कारण मतदार कधीही असे बदल करण्यासाठी अर्ज देऊ शकतात. ते बदल मतदारयाद्या अद्ययावत करेपर्यंत असे शेवटी असतात. अशाच काढलेल्या नावांमध्ये मी माझे नाव सांगलीच्या मतदारयादीत आणि नव्याने जोडलेल्या नावांमध्ये मी माझे नाव नवी मुंबईच्या मतदारयादीतही बघितले होते. ही गोष्ट माझ्यासारख्या सामान्याला माहित असेल तर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला माहित नाही असा त्याचा दावा असेल तर प्रत्येक वेळेस ताबडतोब त्याच्या वेडगळ दाव्यांचे खंडन करायचे का? आणि मग मी त्याच धर्तीवर म्हणतो की पुण्याच्या भाषेत हगल्यापादल्या कोर्टात धाव घेणारे अनेक लोक देशात आहेत- प्रशांत भूषण, असीम सरोदे, प्रकाश आंबेडकर वगैरे. असल्या लोकांनी ३७०, राफेल, सीएए वगैरे जवळपास प्रत्येक निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. मग निवडणुक आयोगाने डिसेंबर २०२४ आणि जून २०२५ मध्ये घेतलेल्या निर्णयाविरोधात कोणी कोर्टात गेले होते का? मला माहित नाही म्हणून विचारत आहे. कोणीच गेले नसेल तर मग सगळ्यांनी तो निर्णय मान्य केला असा अर्थ घ्यायचा का? आणखी एक- बिहारमध्ये जे दीड लाख+ बी.एल.ए होते त्यापैकी कोणीच मतदारयाद्यांसंबंधी जे एस.आय.आर अलीकडे झाले त्याला आक्षेप घेतला नव्हता तर मग आता केलेले काम सगळ्यांनी मान्य केले असा घ्यायचा का?
बाकी राहूल गांधी बरोबर चूक काही असले तरी शेकडो पत्रकारांच्या समोर जाऊन प्रश्नांना उत्तरे देतात. असे धाडस अजून मन की बात वाल्यांच्यात नाही.
मोदींनी पत्रकार परिषद घेतली नाही तरी देशातील ९९% लोकांना कसलाही फरक पडेल असे वाटत नाही. आणि या लोकांचे पत्रकार परीषदेविषयीचे एकदा ऐकले की मग पुढच्या पुढच्या मागण्या सुरू होणार आणि टीका करायचे ते लोक टीकाच करत राहणार. मोदी असल्यांकडे ढुंकूनही बघत नाहीत. एकदा पत्रकार परीषद घेतली की मग अमुक पत्रकारांना का बोलावले नाही किंवा अमुक एकाला मागची जागा दिली किंवा अमुक एक उत्तर असेच का दिले आणि तसेच का दिले वगैरे वगैरे. पंतप्रधानांची संवैधानिक जबाबदारी असते संसदेत चर्चांना उत्तर देणे. मोदी ते करतात ना? मग कोणा संजय राऊत फेम पत्रकाराकडे अजिबात ढुंकूनही बघितले नाही तरी शष्प फरक पडत नाही. एकूणच काय की ईव्हीएम हॅक केल्याचा मुद्दा लोक गांभीर्याने घेत नाहीत, गेल्या ११ वर्षात विरोधी पक्षांनी मांडलेले जवळपास सगळे मुद्दे पूर्ण फेल गेले. म्हणून आता या मुद्दयावर गदारोळ सुरू झाला आहे. तो पण लवकरच फेल जाईल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंद्रसूर्यकुमार, तुमचा प्रतिसाद वाचला आणि तुमचे मुद्दे समजून घेतले. काही उदाहरणं उपहासात्मक वाटली, पण चर्चेचा मूळ हेतू लक्षात घेऊन मी मुद्द्यावर राहतो. तुम्ही म्हणता की चंदीगड महापौर निवडणुकीचा आणि आयोगाच्या निर्णयाचा संबंध नाही — ठीक आहे, मान्य. पण माझा मुद्दा 'कारण-परिणाम' सिद्ध करणे नव्हता, तर संशय उपस्थित करणे होता. महमूद प्राचा यांच्या खटल्यात कोर्टाने आयोगाला CCTV फूटेज देण्याचे निर्देश दिले आणि त्याच महिन्यात आयोगाने नियम बदलला — ही वेळेची जुळवणी सहज दुर्लक्ष करता येत नाही, नाही का? तुम्ही उमेदवारांना फुटेज मिळते, इतरांना कोर्टाच्या आदेशाने मिळू शकते, हे स्पष्ट केलंत — त्याबद्दल आभार. पण पूर्वी Rule 93 अंतर्गत ही माहिती सार्वजनिक निरीक्षणासाठी खुली होती, आणि आता ती कोर्टाच्या परवानगीशिवाय मिळत नाही — हे बदल लोकशाही पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून चिंताजनक आहेत. इलेक्ट्रॉनिक याद्यांऐवजी मी मशिन रिडेबल याद्या म्हणायला हवे होते. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आयोगाने पण राहूल गांधी यांनी आयोगाने मशिन रिडेबल याद्या न देऊन कसे असहकार्य केले ते सांगितले. त्यांचे विश्लेषण करायला सहा महिने लागले. तर मशिन रिडेबल याद्याच दिल्या होत्या असे आयोगाने म्हणून आयोगाने रागा यांचे म्हणणे कधीही खोटे का पाडले नाही? त्यावरून आयोगाचा हेतू 'माहिती मिळवून तक्रार करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ, कष्ट लागावेत व पुरावे तक्रार करण्याच्या कालमर्यादेत गोळाच करता येऊ नयेत' असा होता की काय असा प्रश्न पडतो. याद्या व सीसी टीव्ही फूटेज साठी कोर्टात जावे लागणे यावरून माहीती खुली करण्यापासून माहिती जास्तीत जास्त लपवणे. नियम बदलून ती अधिकाधिक अप्राप्य करणे असाच आयोगाचा प्रवास दिसून येतो. तो निश्चितच निरोगी लोकशाहीसाठी मारक आहे. तुम्ही कोर्टात कोणी गेले का, असा प्रश्न विचारला — योग्य आहे. पण लोकशाहीत प्रश्न विचारणे हेही एक महत्त्वाचे साधन आहे. प्रत्येक वेळी कोर्टात जाणे शक्य नसते, आणि सार्वजनिक चर्चेचा उद्देशच तो असतो — की निर्णय घेणाऱ्या संस्थांना उत्तरदायित्वाची जाणीव करून देणे. मोदींच्या पत्रकार परिषद न घेण्यावर तुमचे मत वेगळे असू शकते, आणि ते मान्य आहे. पण लोकशाहीत संवाद, पारदर्शकता आणि प्रश्नांना उत्तर देणे — हे मूल्य महत्त्वाचे आहेत, हे आपण दोघंही मान्य करू. एकूणच, तुमचे विश्लेषण तपशीलवार आहे, आणि प्रत्येक मुद्द्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करणारे, माहिती संपृक्त आहे. तथापि ते माझ्या आशिलाने काहीही गुन्हा केला असला तरी तो सुटलाच पाहिजे याप्रकारचे वकीली व तर्क दुष्ट वाटते. कारण आयोगाचा प्रवास पारदर्शकता कमी करून प्रश्न विचारण्याला डिस्करेज करण्याकडेच दिसतो आहे.

In reply to by स्वधर्म

महमूद प्राचा यांच्या खटल्यात कोर्टाने आयोगाला CCTV फूटेज देण्याचे निर्देश दिले आणि त्याच महिन्यात आयोगाने नियम बदलला — ही वेळेची जुळवणी सहज दुर्लक्ष करता येत नाही, नाही का?
मला वाटते त्याचे कारण हे की माझ्या माहितीप्रमाणे महमूद प्राचा हे हरियाणा विधानसभा निवडणुकीत उमेदवार नव्हते. त्यांनी पूर्वी २०२४ ची लोकसभा निवडणुक लढवली होती ती उत्तर प्रदेशातून पण हरियाणा निवडणुक त्यांनी लढवली नव्हती. एकदा त्यांनी व्हिडिओ फुटेजची मागणी केल्यानंतर हरियाणा विधानसभा निकाल अपेक्षेविरोधात लागल्यामुळे अनेक वेगवेगळे लोक तशी मागणी करायला पुढे येतील ही शक्यता वाटली असेल. निवडणुकीसंदर्भात सगळ्या गोष्टी पब्लिक डोमेनमध्ये हव्यात हे मान्य पण तरीही मतदानाचे व्हिडिओ फुटेज हे मतदारांचे चेहरे त्यात दिसत असल्याने ते पण पब्लिक डोमेनमध्ये असावे का? उद्या कोणी म्हटले की कोणीकोणी मतदान केले त्यांचे फोन नंबर (जे आयोगाकडे रजिस्टर्ड असतात) ते पण पब्लिक डोमेनमध्ये हवेत तर ते योग्य ठरेल का? ते नसेल तर मग त्यांचे चेहरे दिसणारे व्हिडिओ फुटेज पण पब्लिक डोमेनमध्ये ठेवावे का? १९६१ चा जो कोणता कायदा/नियम केले तेव्हा व्हिडिओ फुटेज घेतले जात नव्हते तर त्यानंतर बर्‍याच वर्षांनी तसे फुटेज घेणे सुरू केले. त्यामुळे तेव्हाचे नियम जर म्हणत असतील की निवडणुक संबंधी सगळे डिटेल पब्लिक डोमेनमध्ये असावेत तर त्या सगळ्या डिटेलच्या व्याख्येत नंतर सुरू झालेले व्हिडिओ फुटेजही येणार. तसेच गेल्या २-३ वर्षात ए.आय मध्ये खूप प्रगती झाली आहे त्यामुळे व्हिडिओ फुटेज घेऊन त्याचा गैरवापर करायचा असेल तर त्यासाठी खूप काही किचकट गोष्टी याव्या लागतात असे नक्कीच नाही. हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल असे अनपेक्षित झाल्यानंतर आणि महमूद प्राचांनी ती मागणी केल्यावर एक पॅन्डोराचा डबा उघडला जाऊन तशा मागण्या अनेक ठिकाणी होतील ही शक्यता ध्यानात आली असेल- जी पूर्वी आली नव्हती. त्यामुळे कोणीही सोम्यागोम्या येऊन आम्हाला निवडणुक फुटेज पाहिजे असे म्हणत कोणत्याही खोडसाळ उद्देशाने मागू लागला तर त्याला नाही कसे म्हणणार? तसेच कोण जेन्युईन उद्देशाने आणि कोण खोडसाळ उद्देशाने फुटेज मागत आहे हे फुटेज देणारी आणि फुटेजची मालकी असलेली संस्थाच ठरवू शकत नाही- कारण त्यात कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट झाला. त्यामुळे कोर्टात जा, तुम्हाला कशाला फुटेज हवे आहे हे कोर्टाला सांगा आणि कोर्टाचा आदेश घेऊन या मग फुटेज देतो असे नियमात बदल केले गेले. ते केले नसते तर बाय डिफॉल्ट निवडणुकीशी संबंधित सगळे काही पब्लिक डोमेनमध्ये आहे असे व्हिडिओ फुटेज म्हणजे काय याची कल्पनाही केली नव्हती अशा काळात बनविलेल्या जुन्या नियमांप्रमाणे असेल तर त्यात ते फुटेजही येणार. त्यामुळे ते नियम बदलणे गरजेचे वाटले असावे. रस्ता पब्लिकचा असल्याने त्यावर म्हस येईल किंवा रेडा येईल- कोणीही येईल. त्यामुळे सिग्नलच्या तिथे असलेल्या कॅमेर्‍यांमधील फुटेज आम्हाला पाहिजे अशी कोणी मागणी करायला गेला तर तुला कशाकरता फुटेज पाहिजे आहे हा प्रश्न येणार की नाही? तोच प्रश्न याबाबतीतही. कारण त्या फुटेजमध्ये लोक दिसतात आणि एकदा लोक दिसले तर वाईट उद्देशाने- एखाद्याला (खरं तर एखादीला) बदनाम करायच्या उद्देशाने कोणीही काहीही फार काही किचकट गोष्टी न शिकता आणि फार पैसेही खर्च करावे न लागता करू शकतो. असे फुटेज इतर कुठूनही मिळवता येईल म्हणून फुटेज ज्याच्याकडे असते त्याने कोणाही सोम्यागोम्याला नक्की उद्देश काय हे जाणून न घेता फुटेज देणे योग्य नाही.
त्याबद्दल आभार. पण पूर्वी Rule 93 अंतर्गत ही माहिती सार्वजनिक निरीक्षणासाठी खुली होती, आणि आता ती कोर्टाच्या परवानगीशिवाय मिळत नाही — हे बदल लोकशाही पारदर्शकतेच्या दृष्टिकोनातून चिंताजनक आहेत.
वर उत्तर दिले आहे.
इलेक्ट्रॉनिक याद्यांऐवजी मी मशिन रिडेबल याद्या म्हणायला हवे होते. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आयोगाने पण राहूल गांधी यांनी आयोगाने मशिन रिडेबल याद्या न देऊन कसे असहकार्य केले ते सांगितले.
निवडणुक हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असल्याने निवडणुकांशी संबंधित ऑनलाईन उपलब्ध असलेल्या अनेकविध गोष्टी मी करून बघितल्या आहेत. त्यामुळे त्या पीडीफ मशीन रिडेबल नसतात म्हणजे त्यात कंट्रोल फ चालत नाही हे मी पण बघितले आहे. पण आयोगाने त्या मतदारयाद्या अशा उपलब्ध करायला लागल्यापासून कधीच त्या मशीन रिडेबल नव्हत्या. तसे असेल तर मग राहुल गांधींना त्या तशा हव्यात म्हणून आयोगाने का म्हणून द्यायच्या? सामान्य माणसाने तशी मागणी केली असती तर आयोगाने तशा त्या दिल्या असत्या का? मग राहुल गांधींना का म्हणून अशी सवलत द्यायची? दुसरे म्हणजे त्या समजा मशीन रिडेबल असत्या तर मग मला निवडणुक आयोगाने एक्सेलमध्ये मतदारयाद्या दिल्या नाहीत- माझे सहा महिने त्याचे एक्सेलीकरण करण्यात गेले असे राहुल गांधी कशावरून म्हणाले नसते? म्हणजे या माणसाला पाहिजे म्हणून सगळ्या संस्थांनी त्यांचे नेहमीचे सगळे नियम बदलायचे आणि वाट वाकडी करायची का? तिसरे म्हणजे कोणतीही इमेज असेल तर त्यातील टेक्स्ट काय आहे हे संगणकात घेणे इतके कठीण आहे का? आता तर ओसीआर सॉफ्टवेअर घ्यायचीही गरज नाही. मी चॅट जीपीटी वापरून अगदी दररोज नाही तरी दोन दिवसातून एकदा तरी माझ्या कामासाठी ते करतो.
तर मशिन रिडेबल याद्याच दिल्या होत्या असे आयोगाने म्हणून आयोगाने रागा यांचे म्हणणे कधीही खोटे का पाडले नाही?
वर उत्तर दिले आहे.
प्रत्येक वेळी कोर्टात जाणे शक्य नसते, आणि सार्वजनिक चर्चेचा उद्देशच तो असतो — की निर्णय घेणाऱ्या संस्थांना उत्तरदायित्वाची जाणीव करून देणे.
उत्तरदायित्व कितीही असले तरी कोणाची खाजगी माहिती अशी कोणालाही देणे अयोग्य आहे. निवडणुक आयोगाने वेबसाईटवर कोणत्या मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली हे दिलेले असते. कोणत्या मतदानकेंद्रात कोणाला किती मते मिळाली हे पण शोधून काढणे फार अवघड नसते. पण त्या पलीकडे जाऊन कोणाची खाजगी माहिती आम्हाला पाहिजे असे म्हणायचा कोणाला अधिकार नाही. तरीही हे निवडणुकांशी संबंधित असल्याने मग कोर्टात जा आणि आम्हाला जेन्युईन कारणाने माहिती हवी आहे हे कोर्टाला कन्व्हिन्स करा हाच एक मार्ग.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मला वाटते की कुणी काहीही सांगितले, कितीही मुद्दे मांडले तरी तुमच्या मते निवडणूक आयोग बरोबरच आहे, आयोगाची भूमिका कधीही भाजपास मदत करणारी नाही. कोणताही स्बयंस्पष्ट मुद्दा मांडला तरी त्यावर तुंम्ही लांबलचक प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे. एकच उदा. >> मी: इलेक्ट्रॉनिक याद्यांऐवजी मी मशिन रिडेबल याद्या म्हणायला हवे होते. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत त्यांनी आयोगाने पण राहूल गांधी यांनी आयोगाने मशिन रिडेबल याद्या न देऊन कसे असहकार्य केले ते सांगितले. >> >> तुंम्ही: निवडणुक हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असल्याने निवडणुकांशी संबंधित ऑनलाईन उपलब्ध असलेल्या अनेकविध गोष्टी मी करून बघितल्या आहेत. त्यामुळे त्या पीडीफ मशीन रिडेबल नसतात म्हणजे त्यात कंट्रोल फ चालत नाही हे मी पण बघितले आहे. पण आयोगाने त्या मतदारयाद्या अशा उपलब्ध करायला लागल्यापासून कधीच त्या मशीन रिडेबल नव्हत्या. तसे असेल तर मग राहुल गांधींना त्या तशा हव्यात म्हणून आयोगाने का म्हणून द्यायच्या? सामान्य माणसाने तशी मागणी केली असती तर आयोगाने तशा त्या दिल्या असत्या का? मग राहुल गांधींना का म्हणून अशी सवलत द्यायची? दुसरे म्हणजे त्या समजा मशीन रिडेबल असत्या तर मग मला निवडणुक आयोगाने एक्सेलमध्ये मतदारयाद्या दिल्या नाहीत- माझे सहा महिने त्याचे एक्सेलीकरण करण्यात गेले असे राहुल गांधी कशावरून म्हणाले नसते? म्हणजे या माणसाला पाहिजे म्हणून सगळ्या संस्थांनी त्यांचे नेहमीचे सगळे नियम बदलायचे आणि वाट वाकडी करायची का? तिसरे म्हणजे कोणतीही इमेज असेल तर त्यातील टेक्स्ट काय आहे हे संगणकात घेणे इतके कठीण आहे का? आता तर ओसीआर सॉफ्टवेअर घ्यायचीही गरज नाही. मी चॅट जीपीटी वापरून अगदी दररोज नाही तरी दोन दिवसातून एकदा तरी माझ्या कामासाठी ते करतो. तुमचा सगळा प्रतिसाद आयोगाने मतदार याद्या का नाहीत द्यायच्या यावर आहे. का नाही मशीन रिडेबल याद्या द्यायच्या? आमच्या पैशावर आयोग चालतो, आमचा डेटा गोळा करतो, त्याच्या आधिकार्‍यांना तो सर्व खाजगी डेटा सर्व उपलब्ध, पण नागरिकांना मात्र कोर्टात गेल्याशिवाय मिळणार नाही. डिजीटल इंडीया साठी आमच्या करातील हजारो कोटी रू. सरकार खर्च करते पण लोकांना त्यांचाच डेटा देणार नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे. तुंम्हाला पारदर्शकता, लोकशाहीच मान्यच नाही असा त्याचा अर्थ होतो. भाजपा सरकार आल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाला निवडणूक आयोगाच्या निवड समितीतूनच काढून तिथे कायदा मंत्र्याची नियुक्ती करण्याचा कायदेबदल केला. म्हणजे सत्ताधारी (म्हणजे भाजप) पक्षाचेच बहुमत सदैव राहील व ज्याला मुख्य निवडणूक आयुक्त हा सत्ताधारी पक्षाला कायम पक्षपातीच राहील याची काळजी घेतली आहे. पण असे मी कितीही मुद्दे मांडले, तरी तुमच्या मतात फरक होण्याची शक्यता दिसत नाही. शिवाय इतर कोणीही आता या चर्चेत आता भाग घेत नाहीए कारण की आता मी किंवा कोणीही काहीही सांगितले तरी तुंम्हाला पटणे शक्य नाही, अशी सर्वांची खात्रीच पटली आहे. त्यामुळे थांबूया.

In reply to by स्वधर्म

अगदी असेच उलट्या बाजूनेही म्हणता येऊ शकते नाही का?
मला वाटते की कुणी काहीही सांगितले, कितीही मुद्दे मांडले तरी तुमच्या मते निवडणूक आयोग बरोबरच आहे, आयोगाची भूमिका कधीही भाजपास मदत करणारी नाही. कोणताही स्बयंस्पष्ट मुद्दा मांडला तरी त्यावर तुंम्ही लांबलचक प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे.
मला वाटते की कुणी काहीही सांगितले, कितीही मुद्दे मांडले तरी तुमच्या मते निवडणूक आयोग चुकीचाच आहे, आयोगाची भूमिका कधीही नि:ष्पक्ष करणारी नाही. कोणताही स्बयंस्पष्ट मुद्दा मांडला तरी त्यावर तुंम्ही लांबलचक (की लहानसा) प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे.
का नाही मशीन रिडेबल याद्या द्यायच्या? आमच्या पैशावर आयोग चालतो, आमचा डेटा गोळा करतो,
अगदी रास्त मागणी आहे. इतकी वर्षे मशीन रिडेबल याद्या का देत नाहीयेत हे मला माहित नाही. जे काही कारण असेल ते पण एक खासदार, विरोधी पक्षनेता आणि सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता म्हणून अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे असते. मला पाहिजे म्हणून मशीन रिडेबल याद्या लगेच मिळाल्या पाहिजेत, मला पाहिजे म्हणून एक्सेल शीटमध्ये याद्या मिळाल्या पाहिजेत अशी अपेक्षा कशी करता येईल? सामान्य माणसाला तसे लगेच मिळेल का? तुम्ही का मशीन रिडेबल याद्या देत नाही याचा आर.टी.आय अर्ज स्वतः नाही तरी कोणी विश्वासातल्या माणसाकडून फाईल केला होता का? तरी राहुलचे एक आवडले. ते भरपूर धुराळा उडवितात पण नाक कापून घ्यायला इतर लोक पुढे जातात. राफेल प्रकरणात लोकसभेत बरेच काही बोलून झाले पण कोर्टात नाक कापून घ्यायला गेले होते यशवंत सिन्हा आणि अरूण शोरी. रागांच्या नादी लागल्यास आपणच तोंडघशी पडतो हा अनुभव असूनही अनेक लोक स्वतः तोंडघशी पडायला तयार होतात. अर्थात आमच्यासारख्यांना मजाच आहे की. जे काही फुकटातले मनोरंजन चालू असते ते पॉपकॉर्न खात खात बघायचे.
आमचा डेटा गोळा करतो, त्याच्या आधिकार्‍यांना तो सर्व खाजगी डेटा सर्व उपलब्ध,
यात नवीन काय आहे? सरकारी ऑफिसच नाही तर बँका, टेलिकॉम कंपन्या वगैरे अनेक ठिकाणी तसेच असते. पण त्या सेवा देण्यासाठी ते नेसेसरी इव्हिल असते. नाहीतर बँका वगैरे कशा चालणार? चेक क्लिअर करायचा असेल तर बँकेतल्या कोणालातरी खात्यात किती पैसे आहेत हे कळणारच.
पण नागरिकांना मात्र कोर्टात गेल्याशिवाय मिळणार नाही.
हे बोलणं कसं झालं? बँकेतल्या कर्मचार्‍यांना सगळ्यांच्या अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत हे माहित असते ना? मग मला पण माझ्या शेजार्‍याच्या अकाऊंटमध्ये किती पैसे आहेत हे कळले पाहिजे.असं कसं चालणार?
डिजीटल इंडीया साठी आमच्या करातील हजारो कोटी रू. सरकार खर्च करते पण लोकांना त्यांचाच डेटा देणार नाही,
त्यांचाच नाही हो. इतरांचा. आणि इतरांचा खाजगी डेटा आपल्याला मिळावा ही मुळातच अपेक्षा का? तरीही निवडणुक म्हणजे देशाच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने इतरांचा खाजगी डेटा हवा असेल तर जरूर घ्या- पण प्रोसेस पाळून. मनात आले म्हणून मला इतरांचे फुटेज बघायचे आहे असा उथळपणा चालणार नाही. बाकी डिजिटल इंडिया म्हणजे अनेक ठिकाणी ओटीपी पाठवून आधार ऑथेंटिकेशन लगेच होते, डिजीलॉकर वगैरे वगैरे. ते सगळे आपला डेटा लागेल तिथे आपल्यालाच सुलभपणे देता यावा म्हणून आहे. इतरांचा डेटा मला बघायला मिळावा म्हणून डिजीटल इंडिया नाही.
भाजपा सरकार आल्यावर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाला निवडणूक आयोगाच्या निवड समितीतूनच काढून तिथे कायदा मंत्र्याची नियुक्ती करण्याचा कायदेबदल केला.
त्याचे कारण काय? पूर्वी न्यायाधीशांची नियुक्ती सरकार करत असे. पण १९९८-९९ च्या सुमारास सुप्रीम कोर्टाने कॉलेजिअम ही पध्दत आणली आणि सुप्रीम आणि हाय कोर्टात कोण न्यायाधीश पाहिजेत ते आपणच ठरवायचे हा प्रकार सुरू केला. घटनासमितीत चर्चा झाली होती की चेक्स अ‍ॅन्ड बॅलन्सेस हवेत म्हणून संसद, सरकार आणि न्यायव्यवस्था यांचे एकमेकांवर तसे बॅलन्सेस पूर्वी होते. पण आता न्यायाधीश नियुक्तीत कोर्ट इतर कोणालाही सहभागी करून घ्यायला तयार नाही. २०१४ मध्ये सत्तेत आल्यावर कॉलेजिअम पध्दत बंद करायचा कायदा मोदी सरकारने केला होता तो असंवैधानिक म्हणून कोर्टाने रद्द केला. ठीक आहे. तुम्हाला इतर कोणाचाही तुमच्या नियुक्तीत सहभाग नको ना? मग इतर नियुक्त्यांमध्ये तुम्हाला सहभागी करून घेतले जाईल ही पण अपेक्षा करायची नाही इतके साधे ते आहे.
पण असे मी कितीही मुद्दे मांडले, तरी तुमच्या मतात फरक होण्याची शक्यता दिसत नाही.
एक शब्द विसरला बहुतेक. पण असे मी कितीही मुद्दे मांडले, तरी तुमच्या मतात फरक होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.
शिवाय इतर कोणीही आता या चर्चेत आता भाग घेत नाहीए कारण की आता मी किंवा कोणीही काहीही सांगितले तरी तुंम्हाला पटणे शक्य नाही, अशी सर्वांची खात्रीच पटली आहे. त्यामुळे थांबूया.
अ‍ॅज यू विश..

गरज असेल तर करतील ही ब्लर. पण कोर्टात जाऊन होईल हे.
कोणाला गरज वाटल्यास? ४५ दिवसात जमेल हे ? ब्लर व्हिडिओ कोण मागेल असे वाटते?

मग काय ठरलं? निवडणूक आयोग मोदींना सामील आहे? झालं तर मग संपला प्रश्न २०२९ च काय २०३४ आणि २०३९ मध्ये पण भाजप येणार. चला दुसरा विषय घेऊ चघळायला

In reply to by सुबोध खरे

मग काय ठरलं?
जे काही ठरवायचं होतं ते आधीच ठरलेलं होतं. लिहिलेल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या मुद्दलावर चढलेले व्याज होतं.

In reply to by आग्या१९९०

इनो घ्यायला कोणी ही डॉक्टर सांगत नाही. तो वैद्यकीय सल्ला नाही एवढं हि फारच बाळबोध बाब आपल्याला समजू नये याचं आश्चर्य वाटतं. बाकी इनो घ्या हा वाक्प्रचार मिपाच्या जन्मापासून येथे प्रचलित आहे. तो हि आपल्या विस्मृतीत गेला कि काय? अरे अरे जळजळ आणि चिडचिड डोक्यात गेलेली दिसते. सांभाळा

पण येणार मोदीच म्हणजे मजबूत असे नेतृत्व देशाला मिळणार नाहीच? पाकड्यांकडू नाचक्की होतच राहणार? :(

२०२४ मधील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ नंतर ७६ लाख जणांनी बोगस मतदान केले आहे अशा एका वर्तमानपत्रातील कसलाही आगापिछा नसलेल्या बातमीवर विसंबून राहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक रद्द करावी ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच लोकनिती सी.एस.डी.एस या पोलिंग संस्थेच्या संजय कुमारांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधील मतदारसंख्येवर एक ट्विट केले होते. पण आपण चुकीचे आकडे वाचले असे म्हणत त्यांनी ती ट्विट काढून टाकली आहे. असल्या लोकांवर रागा विसंबून राहतात की काय समजत नाही? आणि म्हणून स्वतःच्या सहीने अ‍ॅफिडेव्हिट देऊन आपल्या आरोपांमध्ये चौकशीची मागणी करत नाहीयेत कारण तसे केल्यास आपणच अडचणीत येऊ हे त्यांना समजत आहे? https://timesofindia.indiatimes.com/india/misread-data-psephologist-san…

स्वतःच्या सहीने अ‍ॅफिडेव्हिट देऊन आपल्या आरोपांमध्ये चौकशीची मागणी करत नाहीयेत कारण तसे केल्यास आपणच अडचणीत येऊ हे त्यांना समजत आहे त्यांना स्वतः विचार करायची आवश्यकता नाही. त्यांना समजावणारे अभिषेक मनू सिंघवी, कपिल सिब्बल सारखे दिग्गज लोक आहेत त्यांच्या मागे.

विरोध व्हायलाच पाहिजे. आणि ज्या बेकायदेशीर गोष्टी सापडतात त्यांचे खटले दाखल व्हायला हवेत. मग त्यावर वाच्यता न करता थेट कोर्टातच पुराव्यांच्या भेंडोळ्या सादर करा. भुसा पाडा. सरकारला नाकी दम आणलात की ते लोकसभा विसर्जित करतीलच. बाकीच्या बाबतीत सभागृहात आवाज उठवा. सभागृहातून बाहेर पडू नका.( वाकाऊट नको). तसं केलं की सरकारला फायदा होतो. चर्चा करून भुसा पाडला पाहिजे. वर्तमानपत्रांत भरपूर बातम्या यायला हव्यात.

In reply to by कंजूस

अगदी पूर्ण सहमत. पण विरोधी पक्ष तसे करत नाहीत/ करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे व्हॅलिड मुद्देच नाहीत. नुसते र्‍हेटॉरीक फार काळ चालत नाही.

In reply to by कंजूस

बाकीच्या बाबतीत सभागृहात आवाज उठवा.
मला समाजवादी आणि कम्युनिस्ट मंडळींचा मनस्वी तिटकारा आहे हे वेगळे सांगायलाच नको. पण उत्तम संसदपटूंची यादी काढली तर त्यात तेच लोक जास्त दिसतील. संसदेच्या डिजिटल लायब्ररीवर लोकसभेत पूर्वी झालेल्या चर्चा आणि भाषणे आहेत. ती मी कधीकधी वाचत असतो. त्यात ए.के.गोपालन, समर गुहा, ज्योतिर्मय बसू, सोमनाथ चॅटर्जी, इंद्रजीत गुप्ता वगैरे कम्युनिस्ट सदस्यांची आणि मधू लिमयेंसारख्या समाजवादी सदस्यांची भाषणे मुद्दामून वाचावीत अशी आहेत. त्यांचे विचार अर्थातच पटत नाहीत पण ते मुद्दे कसे मांडायचे हे मुद्दामून समजून घ्यावे असे आहे. स्वतंत्र पक्षाचे मिनू मसानी आणि पिलू मोदी पण तसेच. काही प्रमाणात अटलबिहारी वाजपेयींची भाषणे पण तशी होती पण त्यांची भाषणे जास्त सेनटिमेन्टल असत असे माझे वैयक्तिक मत आहे. नेहरू आणि इंदिरांच्या काळात विरोधी सदस्यांची संख्या फार नसायची. तरीही सरकार अशा सदस्यांना टरकून असायचे. आता मुद्देसूद बोलून सरकारला टरकायला भाग पाडतील असे सदस्य विरोधी पक्षात आहेत त्यांना त्या पक्षाचा राजपुत्र असलेला नेता सभागृहात बोलायची परवानगीच देत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुद्देसूद बोलून सरकारला टरकायला भाग पाडतील आणी नंतर त्यांच्यावर इडी सोडली जाईल, त्यामुळे असे सदस्य बोलू दिले तरी काही बोलतील ह्याची शंका आहे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण अनिल अंबानीवरही ईडी सोडली आहे. इडीच्या चौकशीत येऊ शकतील असे बरेच जण असले तरी काहींच्या मागेच सोडली जाते असं म्हणणं योग्य ठरेल.

In reply to by कंजूस

काहींच्या मागेच सोडली जाते जे भाजपात नाहीत किंवा भाजपात ज्याना आण्याचे आहे त्यांच्या!

राहुल गांधींचा खोटारडेपणा परत एकदा उघडकीला आला आहे. बिहारमधील रंजू देवी म्हणून एका स्त्रीने राहुल गांधींचा खोटारडेपणा बाहेर आणला आहे. ही स्त्री बिहारमधील एक गावात राहते. तिचे नाव मतदारयादीतून काढले असे सांगत काही लोक तिच्याकडे आले आणि तिला राहुल गांधींना भेटायचा सल्ला दिला गेला. त्याप्रमाणे ती राहुल गांधींना भेटली आणि त्यांच्यातील संवाद तथाकथित व्होट अधिकार यात्रेत आणि अन्यत्र व्हायरल झाला. प्रत्यक्षात त्या स्त्रीचे आणि तिच्या कुटुंबियांची नावे मतदारयादीत आहेत आणि तिचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे हे स्पष्ट झाले. गावातील साध्या कोणाही व्यक्तीला तुझे नाव मतदारयादीत नाही असे सांगितले तर त्यावर विश्वास बसू शकतो. https://www.indiatoday.in/india/story/rahul-gandhi-voter-adhikar-yatra-… कालच सी.एस.डी.एसच्या संजय कुमारचा खोटारडेपणा उघड झाला. आणि आता राहुल गांधींचाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तिचा बोलविता धनी कोणीतरी वेगळा आहे हे स्पष्ट झाले राहुल गांधींचा खोटारडेपणा परत एकदा उघडकीला आला आहे. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सोनिया गांधींचे भारतीय नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नाव नोंदवले गेले होते ह्याचा पुरावा अनुराग ठाकूर यांनी दिला होता. त्याचे पुढे काय झाले ? ही बातमी खरी होती की खोटी?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कालच सी.एस.डी.एसच्या संजय कुमारचा खोटारडेपणा उघड झाला. आणि आता राहुल गांधींचाही.
काय संबंध सीएस्डीएस आणि राहुल गांधींचा? बर संजयकुमारचा ट्वीट राहुल गांधीच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर १० दिवसानी केलेला. राहुल गांधीचा दावा कर्नाटकतला. संजयकुमारचा ट्वीट महाराश्ट्रातल्या २ असेंब्लीच्या आकडेवारीचा. तो आला तेंव्हा काहीही चर्चा झाली नाही की आरोप नाही, ४० तासाने त्यांनीच आकडेवारीत चूक झाली हे सांगून ट्वीट डिलिट केले. बरं संजय्कुमार हे काही सर्वेसर्वा नाहीत सीएसडीएस चे तरीही तेंव्हा भाजपाला जाग आली. आणी संजयकुमार खोटारडे असा आलाप सुरु झाला. सोबतच सीएस्डीएस चे फंडींग, त्यांचा अजेंडा ही चर्चा सुरु झाली. बरं त्याचा आणि राहुल गांधींचा काही संबध नसताना लगेच राहुल ला खोटे ठरवायची घाई. आणि तेही त्या बाईच्या साक्षीने. वाह ग्यानेशकुमार.

In reply to by आग्या१९९०

खोटारडेपणा काय असतो ना तो असा असतो. दिल्लीच्या सीएम मॅडम रेखा गुप्तांना जनसुनवाईमध्ये एका माथेफिरु गुजराती इसमाने थप्पड मारली म्हणे. ह्या घटनेचा अर्थात निषेधच आहे पण ह्यातही राजकारण करतील तेच अस्सल भाजपा. भाजपाचे अगदी जुने जाणते नेते स्व. मदनलाल खुरानांचे सुपुत्र हरीश खुराना ह्यांनी त्या माथेफिरुचा संबंध लगेच आप शी लावला. त्याचा आपच्या गुअरातमधल्या एका नेत्यासोबतचा गोपाल इतालिया सोबत फोटोशॉप केलेला फोटो ट्वीट केला. a ट्वीटरने ही लबाडी मॉर्फड इमेज असा शेरा मारुन ठेवली, ओरिजिनल फोटो दुसर्‍या कोणासोबत आहे तेही प्रसिध्द झाले असता तरी भाजपा नेते म्हणत आहेत की करा मग एफआयआर. ह्याला म्हणतात चोर ते चोर......

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खोटे पण रेटून बोला असे भाजपेयीना त्यांच्या मातृसंस्थेनेच शिकवून ठेवले आहे!
म्हणून तर पत्रकार परिषदेपासून चार हात दूर राहतात. गृहमंत्र्यांना पत्रकाराने अडचणीचा प्रश्न विचारला तर निर्लज्जपणे, उत्तर देणार नाही असे म्हणून दुर्लक्ष करू लागले. पत्रकाराने चिकाटीने तोच प्रश्न पुन्हा विचारला तर केविलवाणे चेहरा करून म्हणतात " असे प्रश्न विचारायचे नसतात ".

In reply to by आग्या१९९०

असे लोक सत्तेत असल्याने भारताचे नुकसान होत आहे, भारतीय जनता सुज्ञ आहे पण अडवणूक आयोगाच्या बळावर फेरफार करून निवडून येतात!

बेस्टची पतपेढीची निवडणूक एकत्र लढले आणि पडले ठाकरे. १. इविएमने परत दगा दिला? २. महापालिका निवडणुकीची नांदी?

In reply to by कंजूस

बेस्ट पतपेढीची निवडणुक त्यामानाने खूपच कमी मतदारांची निवडणुक होती. त्यावरून महापालिका निवडणुकांचा अंदाज बांधायला नको. तसेही या निवडणुकीत शरद रावांचे पुत्र शशांक राव यांचे पॅनेल जिंकले आहे. अनेक वर्षे शरद राव मुंबई महापालिका कर्मचार्‍यांच्या युनियनचे नेते होते आणि त्यांच्यात बर्‍यापैकी लोकप्रियही होते. ती सगळी मते शशांक रावांना मिळाली असतील. शशांक राव भाजपमध्ये आहेत पण या निवडणुका त्यांनी स्वतःचे पॅनेल करून लढवली होती. तरीही उबाठा आणि मनसेसाठी एक धोक्याचा इशारा नक्कीच आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता कित्येक दशकांपासून होती. त्या काळात ड्रायव्हर आणि कंडक्टर या पदांवर कोकणातून आलेले लोक भरती केले होते. नारायण राणे अनेक वर्षे बेस्ट समितीचे प्रमुख होते. त्यात त्यांचा मोठा सहभाग होता. अनेक वर्षे कोकणातील- रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मतदार ही शिवसेनेची भक्कम मतपेढी होती. आपल्या हक्काच्या मतदारांनी उबाठा आणि मनसेला एकही जागा दिली नसेल तर त्या दोन सेनांसाठी नक्कीच तो धोक्याचा इशारा आहे. तसेच शशांक राव आणि त्या कोकणी माणसांना बेस्टमध्ये नोकरीला लावणारे दोघेही भाजपमध्ये आहेत.

मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना सलग ३० दिवसांसाठी अटक झाल्यास त्यांना पदच्यूत करण्याची तरतूद असलेली घटनादुरुस्ती यासह एकून तीन विधयके लोकसभेत मांडण्यात आली. प्रचंड गदारोळात ही विधयके संयुक्त छाननी समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभेच्या गदारोळात आणि कायम टीकेचा विषय असलेला अमित शहा गुजरात मधे असतांना त्यांना अटक झालेला विषय काँग्रेसचे वेणुगोपाल यांनी घेतला. त्यावर शहा म्हणाले, 'मी अटक होण्याआधी राजीनामा दिला होता. न्यायालयाने मला निर्दोष सोडेपर्यंत मी कोणतेही पद भूषविले नाही' त्यानंतर लोकसभेत अजून गोंधळ उडाला. ( संदर्भ - मटा ) कायदा सर्वांसाठी समान आहे. वगैरे इ. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राज्यराज्यातील मुख्यमंत्र्याना त्रास देणे तसेच भीती बसवणे हा हेतू ह्या कायद्यामागे आहे! मागे केजरीवालांनी केलेली फजिती लक्षात असल्यामुळे असले कायदे करावे लागताहेत!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

यात एक बारीकसा तपशील विसरला आहात का? ३० दिवसात कोर्टाने जामीन दिला नाही तर संबंधित मंत्री/मुख्यमंत्री/पंतप्रधान पदावरून जाणार. कोर्टाने ३० दिवसात जामीन दिला नाही तर त्याचा अर्थ प्रकरण पुरेसे गंभीर आहे हे कोर्टालाही वाटते.
मागे केजरीवालांनी केलेली फजिती लक्षात असल्यामुळे असले कायदे करावे लागताहेत!
कसली डोंबलाची फजिती?

केजरीवालांनी केलेली फजिती ?? अमेरिका जर्मनी युनो पासून सर्वत्र त्यांच्या "बोलावित्या धन्यांची" काव काव चालू असताना केजरीवाल एकंदर ५ महिने तुरुंगात बसले होते यात त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी अटी घालून जामीन दिला होता. शेवटी पाच महिन्यांनी त्यांना नियमित जामीन मिळाला तोसुद्धा त्यांच्या विरुद्ध पुरावा नाही असे नव्हे तर "जामीन हा नियम आहे आणि अटक हा अपवाद" या न्यायिक तत्वामुळे शेवटी जनतेच्या न्यायालयात निकाल लागून त्यांना घरी बसवण्यात आले आहे. आता त्यांच्या काचेच्या महालाच्या भ्रष्टाचाराचे खटले चालवत हरी हरी म्हणत घरी बसले आहेत.

In reply to by सुबोध खरे

शेवटी जनतेच्या न्यायालयात निकाल लागून त्यांना घरी बसवण्यात आले आहे.
त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊन शिक्षा झाली लवकरात लवकर व्हायला पाहिजे. कमकुवत पुरावे किंवा अजित पवारांसारखी " शिक्षा " अपेक्षीत नाही.

In reply to by सुबोध खरे

शेवटी जनतेच्या न्यायालयात निकाल लागून त्यांना घरी बसवण्यात आले आहे. . नक्की का? की तिथेही “महाराष्ट्र पॅटर्न” राबवला असावा! जनतेने काहीही दाबू द्या! जिंकणार कमळच!