✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Sat, 03/01/2025 - 22:52  ·  लेख
लेख
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/ https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
65469 वाचन

💬 प्रतिसाद (548)

प्रतिक्रिया

हो

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 03/23/2025 - 08:42 नवीन
महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनचे संस्थापक बहुदा. Lieutenant Colonel (retired) Jayant Rao Chitale on Thursday clarified he has formed a 'Hindustan suicide squad' and not a 'Hindu suicide squad' dismissing reports that his outfit has links with the Shiv Sena. इकडे मात्र हसू आवरेना "I have been requesting the government for the last three years to form this suicide squad," he said. "I have sent letters to the Prime Minister Atal Bihari Vajpayee, President Abdul Kalam and the army chief about the formation of these suicide squads, but there was no response. So, I started the training programme." म्हणजे वाजपेयी/कलाम आत्मघातकी पथकासाठी मान्यता देतील अशी जयंतरावांची अपेक्षा होती. असो. https://m.rediff.com/news/2002/nov/14fird.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

२००२ मधील शिळी बातमी आहे. या

श्रीगुरुजी
Sun, 03/23/2025 - 09:10 नवीन
२००२ मधील शिळी बातमी आहे. या प्रकारात पुढे काय झाले ते माहिती नाही. या बातमीतील खालील ओळी रोचक आहेत. Media reports had said the 'suicide squad' drew its inspiration from the recent call of the Sena chief to form 'Hindu suicide squads' to tackle terrorism in India. स्वतः व स्वत:चे कुटुंब घरात आरामात बसणार आणि बाहेर पाऊल ठेवणार नाही आणि इतरांनी सर्व काही करायचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अरुण भाटिया, अविनाश

रामचंद्र
Sun, 03/23/2025 - 18:45 नवीन
अरुण भाटिया, अविनाश धर्माधिकारी, खैरनार, किरण बेदी ही मंडळी प्रसिद्धीच्या झोतात होती त्याच काळात चितळेसाहेब पुण्यात रान उठवू पहात होते. मात्र पुणेकरांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. भिडेगुरुजींना जशी सांगलीची भूमी 'लाभली' तशी व्यवहारी पुण्यात कर्नलसाहेबांना काही अनुभूती आली नाही. त्यांची 'योजना' यशस्वी झाली असती तर खरोखरच भारताचा इतिहासच बदलला असता. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

अमित

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 03/23/2025 - 16:21 नवीन
२००५/६ मध्ये सोहरबुद्दिन,कौसरबी आणि तुलसीराम प्रजापती ह्याना खोट्या चकमकीत मारल्याच्या प्रकरणातअमित शहा ह्यांना क्लीन चीट देणारे न्यायाधीश मदन गोसावी सध्या कुठे आहेत हे जाणुन घेण्यासाठी इंटरनेटवर शोधले. आता हे गोसावी संत साहित्याचे अभ्यासक झाले आहेत. आता त्यांचा उल्लेख ह.भ.प. मदन महाराज गोसावी असा होतो. अपेक्षेप्रमाणे ते सत्ताधार्यांच्या आसपासही अधुन मधुन फिरकत असतात. https://www.youtube.com/watch?v=hficKtnREaE अमित शहा आणि त्यानंतर अनेक पोलिस अधिकार्यांना न्यायाधीश गोसावी ह्यांनी क्लीन चीट दिली होती. https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/sohrabuddin-encounter-ips-officer-2-others-get-clean-chit/
  • Log in or register to post comments

२००५ साली सोहरबुद्दिन मेला

रात्रीचे चांदणे
Sun, 03/23/2025 - 17:03 नवीन
२००५ साली सोहरबुद्दिन मेला होता तर केंद्रातील काँग्रेस सरकारने चौकशी करून अमित शहांना जेल मध्ये पाठवायला पाहिजे होते. नऊ वर्ष काही कमी काळ नाही. कमीत कमी खालच्या न्यायालयात तरी गुन्हा सिद्ध व्हायला पाहिजे होता.
  • Log in or register to post comments

तत्कालिन

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 03/23/2025 - 17:44 नवीन
तकालिन सरकारचा उद्देश विरोधकांना जेलमध्ये घालणे, जुन्या केसेस उकरुन ई.डी./आयकर खात्याची भीती दाखवणे हा नव्हता. २००५ साली सोहराबुद्दिनचे एन्काउंटर झाले, आणि नंतर लगेच त्याच्या पत्नीला जाळुन मारण्यात आले. तिचा मृतदेहही सापडला नाही. एक वर्शाने तुलसीराम प्रजापती ह्यालाही चकमकीत मारण्यात आले.असो. ह्या न्यायाधीश यशवंत वर्माच्या घरी १५ कोटीची रोकड सापडली आहे. ई.डी./आयकर खात्याचे अधिकारी सध्या दुबई/सिंगापूर्/युरोप फिरायला गेले आहेत का ? कारण निवडणुकपूर्व काळात ह्यांना २५-३० वर्षे जुन्या फायली काढुन त्याचा राजकीय पक्षांना हिशोब विचारण्यासाठी वेळ होता. इकडे तर घबाड सापडलय. पण काहीच हालचाल दिसत नाही. हे न्यायाधीश जेथे राहतात त्या भागात सुऱक्षा असते, सी सी टी.व्ही कॅमेरेही असतात. गेल्या १/२ महिन्यातले फूटेज तपासले तर किती जणांनी न्यायाधीशांना माल आणुन दिला हे कळेल. 'ना खाउंगा ना खाने दूंगा ' म्हणणार्यानी आतातरी पुढाकार घ्यायची किमान हिंमत दाखवावी. ट्रम्पसमोर नुसतेच हसणे,मिठ्या मारणे एकवेळ क्षम्य, कारण अमेरिका देश खूप बलवान आहे. पण निदान अशा ठिकाणी तरी हिंमत दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

माईडे कुंपणच शेत खातय!

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/23/2025 - 17:47 नवीन
माईडे कुंपणच शेत खातय! चौकीदारही चोर है असे राहुल गांधी उगाच बोलले होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

कसं पाठविणार? काही सबळ पुरावे

श्रीगुरुजी
Sun, 03/23/2025 - 17:56 नवीन
कसं पाठविणार? काही सबळ पुरावे हवे ना? सगळेच असत्य आरोप. मोदींना गुजरात दंगलीत गुंतविण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले. परंतु ते जमलं नाही. नंतर इशरत जहां प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झाला. इशरत जहाच्या घरी जाऊन जित्याने तिच्या कुटुंबाला १ लाख रूपयांची मदत दिली. एका अँब्युलन्सला शहीद इशरत जहा असे नाव दिले. औरंग्याच्या पित्त्यांना पाकिस्तानी अतिरेकीच जवळचे वाटतात. नंतर सोहराबुद्दिन प्रकरणात. मोदी नाही तर निदान त्यांचा सहकारी अमित शहांना तरी अडकवू म्हणून शहांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. तो प्रयत्नही फसला. नंतर न्यायमूर्ती लोयांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्यावरही संशयाचे वादळ उठवून शहांना पुन्हा एकदा अडकविण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो सुद्धा अपयशी ठरला. जसे कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, दयानंद पांडे अश्या ८-९ जणांना, मूळ गुन्हेगारांना सोडून, मालेगाव प्रकरणात सक्तीचे अढकविण्यात आले होते, अगदी तसेच मोदी-शहांना अडकविण्याचे असंख्य प्रयत्न झाले. अनेक असत्य प्रकरणे निर्माण करून असत्य पुरावे निर्माण केले गेले. परंतु ते या सर्व देशद्रोह्यांना पुरून उरले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 03/23/2025 - 18:33 नवीन
"नंतर सोहराबुद्दिन प्रकरणात. मोदी नाही तर निदान त्यांचा सहकारी अमित शहांना तरी अडकवू म्हणून शहांना अडकविण्याचा प्रयत्न झाला" सोहराबुद्दीन कोण होता माहित आहे का ? जरा गुजरातमधील ज्येष्ट नागरिकांशी(निवृत्त सरकारी अधिकार्यांशी) गप्पा मारुन बघा. सगळे डीटेल्स कळतील. हा गुजरात/राजस्थानमधील गुंड.मार्बल व्यावसायिकांकडुन खंडणी गोळा करुन ती सत्ताधार्यांना पोचवायची कामे करायचा. हरेन पंड्या ह्या भाजपाच्या मंत्र्याची २००३ साली हत्या का झाली होती? कोणी केली होती? हत्या करण्यार्याची हत्या मग पोलिसांतर्फे एन्काउंटर का करण्यात आले.? हे सगळे कोणी केले? पाकिस्तान? काँग्रेस? हरेन पंड्या ह्या मंत्र्याला मारुन पाकिस्तानला काय मिळणार होते? हरेन पंड्या कोणाच्या विरोधात अय्यर आयोगासमोर साक्ष देणार होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

या संदर्भात राणा अयूब यांचं

रामचंद्र
Sun, 03/23/2025 - 18:49 नवीन
या संदर्भात राणा अयूब यांचं पुस्तक भलतंच सनसनाटी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

त्यातील

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 03/23/2025 - 22:14 नवीन
पुस्तकातील कोणती घटना खोटी आहे हे म्हणण्याची हिंम्मत अजून झाली नाही.८०च्या दशकापासुन गुजरात्यांची डोकी भडकावण्याचे काम सुरू होते. त्याचा तो परिणाम होता. "मुसलमानाच्या दुकानातून सामान घेउ नका" हे वाक्य गुजरातमध्येच ३/४ वेळा मी ऐकलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

माई, डोके भडकावून आपली पोळी

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/23/2025 - 22:19 नवीन
माई, डोके भडकावून आपली पोळी शेकणे, सत्ता मिळवणे नी भ्रष्टाचार करणे हाच काय तो भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे, नैतिकतेचं आव आणणाऱ्या संघ सारख्या संघटना असल्या लोकाना पाठिंबा देतात! कुणे एकेकाळी संघात जाऊन कुठलातरी वर्ग पूर्ण केला होता ह्याची आता लाज वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

गल्लीगल्लीत कुत्री भुंकत

श्रीगुरुजी
Sun, 03/23/2025 - 22:42 नवीन
गल्लीगल्लीत कुत्री भुंकत असतात. अश्या किती कुत्र्यांना हाड् म्हणायचं? एकदा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर अशी लाखो पुस्तके आली तरी सूज्ञ दुर्लक्ष करतात. पवारांनी ९-१० वर्षांपूर्वी लिहिलेल्या आत्मचरित्रात सोनिया गांधींवर टीका केली होती. परंतु आजतागायत सोनिया गांधींनी त्यावर अवाक्षर प्रतिक्रिया न देता अनुल्लेखाने मारले. पुस्तक लेखिका किंवा पुस्तकावर विश्वास ठेवणारे न्यायालयात का जात नाहीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

न्यायालयात न्याय मिळतोच असे

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/23/2025 - 22:44 नवीन
न्यायालयात न्याय मिळतोच असे नाही, न्यायालय जो निर्णय देईल त्याला न्याय म्हणायचे असते. - असे डॉ. सुबोध खरेनी मिपावरच लिहिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सोहराबुद्दीन कोण होता माहित

श्रीगुरुजी
Sun, 03/23/2025 - 18:49 नवीन
सोहराबुद्दीन कोण होता माहित आहे का त्याच्या एनकाऊंटरमागे अमित शाह असते तर जास्त आनंद झाला असता. हरेन पंड्यांच्या हत्येनंतरही मोदींना अडकविण्याचा प्रयत्न झाला होता, कारण गुजरात दंगलीमागे मोदी असल्याचे कोणतेही पुरावे मिळू शकले नव्हते. अर्थात या प्रकरणातही मोदी अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाले. गुजरात दंगल, हरेन पंड्या, इशरत जहा, सोहराबुद्दिन, ती गुजरातमधील पाळत ठेवण्यात आलेली मुलगी, न्यायमूर्ती लोया अश्या अनेक प्रकरणात जाणूनबुजून मोदी-शाहंना अडकविण्याचा आटोकाट प्रयत्न सोनिया गांधी सरकारने केला. परंतु प्रत्येक वेळी ते अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मध्यंतरी उभाटा सरकार सत्तेत

रात्रीचे चांदणे
Sun, 03/23/2025 - 18:43 नवीन
मध्यंतरी उभाटा सरकार सत्तेत आल्यावर तरी न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची चौकशी करायला पाहिजे होती. कारण लोयांचा मृत्यू महाराष्ट्रातच झाला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

तेव्हा टकल्याने एक पुस्तक

श्रीगुरुजी
Sun, 03/23/2025 - 18:56 नवीन
तेव्हा टकल्याने एक पुस्तक लिहून सर्वोच्च न्यायालयात लोयांच्या मृत्युसाठी शाहंना दोषी धरावे यासाठी दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सर्व पुरावे, डॉक्टरांची साक्ष, ४ सहकारी न्यायाधीशांची साक्ष, शवविच्छेदनाचा अहवाल, त्यांच्या आजारांचा इतिहास अश्या सर्व गोष्टी तपासून लोयांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा निर्णय दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

कौसरबी

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 03/23/2025 - 19:42 नवीन
कौसरबीवर बलात्कार करुन तिला जाळण्याचे आदेश कुणी दिले? ती जीवंत असती तर कोण अडचणीत येणार होते?तिच्या नावावर गुन्हे नव्हते. हरेन पंड्या ह्यांना ठार मारुन कुणाला राजकीय फायदा होणार होता? हरेन पंड्या कुणाला अडचणीत आणु पाहत होते? ह्या प्रश्नांची उत्तरे खरे तर सर्वाना माहित आहेत. ईशरत जहाचे एन्काउंटर फेक होते हे सर्वानाच माहित आहे. एल ई टी/पाकिस्तान हे शब्द घुसडले की काहीही खपवता येते. आधी गुजरात्यांच्या डोक्यात धर्माचे खूळ घातले. उत्तर प्रदेशच्या लोकांची डोकी फिरवणे तुलनेने सोपे होते. आता लक्ष महाराष्ट्रावर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हरेन पंड्या ह्यांना ठार मारुन

श्रीगुरुजी
Sun, 03/23/2025 - 20:16 नवीन
हरेन पंड्या ह्यांना ठार मारुन कुणाला राजकीय फायदा होणार होता? पाकिस्तानचा म्हणजे पर्यायाने कॉंग्रेसचा. ईशरत जहाचे एन्काउंटर फेक होते हे सर्वानाच माहित आहे. इशरत आपली हस्तक होती हे लष्करेतोयबानेच आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते. आधी गुजरात्यांच्या डोक्यात धर्माचे खूळ घातले. चालायला, बोलायला यायच्या आधीपासून गुजराती डोक्यात व्यवसाय, पैसे कमावणे, समभाग वगैरे शिकतात. असले व्यवहारी धर्म वगैरे खूळ डोक्यात घेत नाहीत. आपला लाभ असल्याशिवाय ते काहीही करीत नाहीत. इशरत जहा, सोहराबुद्दिन, हरेन पंड्या यांच्या मृत्युसंबंधी अजूनही मनात शंका असतील तर न्यायालयात जाऊ शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

आणि

माईसाहेब कुरसूंदीकर
Sun, 03/23/2025 - 21:10 नवीन
आणि अशा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना केक भरवायला पंतप्रधान गेले. Image removed. न खाउंगा ना खाने दूंगा असे म्हणायचे आणि न्यायाधीशांच्या घरात कोट्यावधीची रोकड. साधन शुचितेच्या गप्पा संघाने मारायच्या आणि ह्यांच्या मंत्र्यांची अंतर्वस्त्रे फाटलेली. ती महिला कस्तीपटू ओरडुन सांगते, त्या मंत्री ब्रीजभूषण सिंगवर लैंगिक शोषणाचा सरळ आरोप करते . ह्या ब्रीज्भूषण सिंगवर ३० हुन अधिक गुन्हे. हा माणुस स्व्तःच टीव्हीवर सांगतो की त्याने खून केला आहे. गोरक्षणाच्या नावाखाली बोंब मारायची आणि ह्यांचेच समर्थक भारतातुन बीफ निर्यात करणार. मेक-इन-इन्डिया म्हणायचे आणि ट्रम्प जे बरळेल त्याला 'येस सर' म्हणायचे. सगळीकडेच ढोंगबाजी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१ माई!

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/23/2025 - 20:47 नवीन
+१ माई! पण २०१४ साली आमच्या डोक्यात “अच्छे दिन” घुसले होते अच्छे दिन तर आले नाहीत पण बुरे दिन मात्र सुरू झाले! हिरा मिळवायच्या नादात मनमोहनसिंह ह्यांच्यासारखे अस्सल सोने. मात्र गमावले! आता पदरी कोळसा घेऊन फिरतोय! आता ह्यांनी यंत्रणा सडवलीय, निवडणूक आयोग ह्यांच्या ताब्यात आहे, ६ महिन्यात अचानक ४० लाख मतदार वाढतात, ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत कमळाच्या बिल्ल्याचे डायरेक्टर आहेत, म्हणून सर्वांना सारखेच १ लाख १५ हजार मते पडतात, नी मुस्लिम लोकसंख्येपेक्षा जास्ती मते mim पक्षाला पडतात! आता ह्यांना हटवणे भारतीयांच्या दृष्टीने फार कठीण आहे! गोबरयुग गं गोबरयुग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मोदींना विरोध करायला कितीतरी

रात्रीचे चांदणे
Sun, 03/23/2025 - 21:17 नवीन
मोदींना विरोध करायला कितीतरी चांगले मुद्दे मिळतील. पण काँग्रेस सारखे पक्ष आणि त्यांच्या समर्थकांनी अतिशय चुकीचे मुद्दे निवडले आणि अजूनही निवडत आहेत. लष्करेतोयबा सारख्या आतंकवादी संघटनेने आपल्या वेब साईट वर नाव प्रसिद्ध केलेली महिला आतंकवादी इशरत जहाँ सारख्याला समर्थन करून फार फार तर आव्हाडांसारख्यांना फायदा झाला असेल. बाकी कितीतरी मते कमी झालेली असतील. राफेल डील ला, राम मंदिर, ३७० कलम अशा कितीतरी गोष्टींना विरोध करून काँग्रेसने आपल्याच पायावर दगड मारून घेतलेला आहे
  • Log in or register to post comments

बाडिस.

श्रीगुरुजी
Sun, 03/23/2025 - 21:30 नवीन
बाडिस. कालौघात केव्हाच बंद झालेल्या इशरत जहा, सोहराबुद्दिन, राफेल वगैरे निरर्थक मुद्दे तेव्हाही निरर्थक ठरले आणि आजही निरर्थक आहेत. विशेषतः या सर्व आरोपांसाठी मोदी-शाहंनी अग्निपरीक्षा देऊन त्यातून ते झळाळून बाहेर आले आहेत. परंतु मूर्ख विरोधक अजूनही ते मुद्दे सोडण्यास तयार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

अखिल भारतीय मराठा शिक्षण

श्रीगुरुजी
Sun, 03/23/2025 - 21:46 नवीन

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या ११७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माझी संस्थेच्या अध्यक्षपदी पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा एकमताने निवड झाली याबद्दल संस्थेच्या सर्व सन्माननीय सभासदांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. संस्थेच्या इतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे देखील हार्दिक अभिनंदन !

— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 23, 2025
अवघे चौऱ्याऐशी वयमान! यावच्चंद्रदिवाकरौ आसन सोडणार नाही.
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/23/2025 - 21:57 नवीन
+१ ह्यांनी आपले शिष्य श्री नरेंद्र मोदी ह्यांचा आदर्श घ्यावा! ते ७५ पूर्ण झाले की रिटायर्ड होणार आहेत गेला बाजार मनोहर पर्रीकर ह्यांचा तरी आदर्श घ्यावा, आपण आजारी आहोत म्हणून त्यांनी पैड सोडले पण आजारपणातच बाटल्या वगैरे घेऊन विधानसभेत गेले नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

अमरेंद्र बाहुबली
Sun, 03/23/2025 - 21:58 नवीन
+१ ह्यांनी आपले शिष्य श्री नरेंद्र मोदी ह्यांचा आदर्श घ्यावा! ते ७५ पूर्ण झाले की रिटायर्ड होणार आहेत गेला बाजार मनोहर पर्रीकर ह्यांचा तरी आदर्श घ्यावा, आपण आजारी आहोत म्हणून त्यांनी पद सोडले पण आजारपणातच बाटल्या वगैरे घेऊन विधानसभेत गेले नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भारताने चीनमधून येणाऱ्या ५

श्रीगुरुजी
Mon, 03/24/2025 - 08:52 नवीन
भारताने चीनमधून येणाऱ्या ५ वस्तूंवर अँटी डम्पिंग शुल्क लावले.
  • Log in or register to post comments

उत्तम

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 03/24/2025 - 09:47 नवीन
उत्तम निर्णय. देर आये दुरुस्त आये. सौदी अरेबिया,मलेशिया वगैरे देशांनी जानेवारीपासूनच अँन्टी डंपिंग शुल्क चीनला लावायला सुरुवात केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माईडे,

श्रीगुरुजी
Mon, 03/24/2025 - 10:03 नवीन
माईडे, स्टारलिंक, टेस्ला भारतात यायला अनुमती दिली आहे या फेकाफेकीचे पुरावे कधी देणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

उत्तम निर्णय.

आग्या१९९०
Mon, 03/24/2025 - 11:09 नवीन
उत्तम निर्णय. देर आये दुरुस्त आये. सरकारने कांद्यावरील २०% निर्यात शुक्ल काढून टाकले. गेले दीड वर्ष कांदा उत्पादकांना सरकारने जेरीस आणले होते. देशाला कांदा खाणारा अर्थमंत्री हवाय, डोक्यात कांदे असलेला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

कुणाल कामराच प्रकरण ताणायची

रात्रीचे चांदणे
Mon, 03/24/2025 - 17:17 नवीन
कुणाल कामराच प्रकरण ताणायची काहीही गरज नव्हतं. आता तर तो स्टुडिओ पण पाडणार आहेत. सत्ता आहे म्हणून किती मजुराडे पणा.
  • Log in or register to post comments

- आणिबाणी लादून सर्व देशाचे

श्रीगुरुजी
Tue, 03/25/2025 - 09:41 नवीन
- आणिबाणी लादून सर्व देशाचे कारागृह करणारे, - किशोरकुमारच्या गीतांना आकाशवाणीवर प्रतिबंध घालणारे, - हृदयनाथ मंगेशकरांची आकाशवाणीतून हकालपट्टी करणारे, - ऑंधी व किस्सा कुर्सी का चित्रपटावर बंदी आणणारे, - मांग भरो सजना चित्रपटातून शत्रुघ्न सिन्हाची दृश्ये काढून टाकणारे, - झी स्टुडिओची तोडफोड करणारे, - 'सोबत' साप्ताहिकाच्या कार्यालयाची तोडफोड करणारे, - निखिल वागळेला बदडायला गुंड पाठविणारे, - मुका व्यंगचित्र छापल्याने सामना कार्यालयाची तोडफोड करणारे, - बाळ ठाकरेंचे थंड स्वागत अशी बातमी देणाऱ्या बातमीदाराला मरेस्तोवर मारणारे, - व्यंगचित्र समुहात टाकणाऱ्या अनंत करमुसेला १०-१२ माणसे पाठवून घरी उचलून आणून रात्रभर बदडणारे, - व्यंगचित्र समुहात टाकणाऱ्या नौदल अधिकाऱ्याला डोळा फुटेस्तोवर मारणारे, - असंतांचे संत अग्रलेख मागे घेऊन क्षमा मागणारे, - कविता प्रसिद्ध करणाऱ्या एका सामान्य महिलेचा विनयभंग करून ४० दिवस तुरूंगात डांबणारे, - २ ओळींचे ट्विट करणाऱ्याला ४० दिवस तुरूंगात डांबणारे, . . . आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी टाहो फोडत आहेत.
  • Log in or register to post comments

सामान्य माणसांनी असल्या

रात्रीचे चांदणे
Tue, 03/25/2025 - 10:06 नवीन
सामान्य माणसांनी असल्या तोडफोडीच समर्थन नाही केलं पाहिजे. आज कामरा उद्या मिसळ पाव वरती टिका केली म्हणूनही तोडफोड केली जाऊ शकते.
  • Log in or register to post comments

सहमत

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/25/2025 - 10:29 नवीन
आता कुणाल कामरा घटनेची प्रत हातात घेउन दाखवतोय. २०१९ पर्यंत आपली मीडिया शिवसेनेचा उल्लेख 'कम्युनल पार्टी' म्हणून करायची. १९९२ च्या दंगलीचा उल्लेख २०१९ पर्यंत यायचा. शिवसेनेची कॉन्ग्रेसबरोबर युती झाली आणि हे सगळे उल्लेख गायब झाले. म्हणजे आपली मीडियाही खर्या अर्थाने सेक्युलर नाही. किरीट सोमैय्यांच्या गाडीवर दगडफेक करणारे उद्धवसेनेचे होते ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

सध्या मिडिया पूर्ण पने

रात्रीचे चांदणे
Tue, 03/25/2025 - 10:52 नवीन
सध्या मिडिया पूर्ण पने भाजपच्या आधीन आहे. त्यामुळे त्यांना सोयीच्या बातम्या फक्त दाखवल्या जात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बिच्चारे मिडीयावाले

चंद्रसूर्यकुमार
Tue, 03/25/2025 - 12:12 नवीन
बिच्चारे मिडीयावाले दोन्ही बाजूंकडून शिव्या खातात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

रात्रीचे चांदणे ह्यांचा काल

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/25/2025 - 12:16 नवीन
रात्रीचे चांदणे ह्यांचा काल भाजप समर्थनाकडे असतो, त्यांनीच हे सत्य सांगितले असल्याने मिडिया भाजपच्या ताटाखालचे मांजर झालाय हे कळते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

माईडे मीडिया जाऊदे खड्ड्यात,

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/25/2025 - 11:19 नवीन
माईडे मीडिया जाऊदे खड्ड्यात, खुद्द श्रीगुरुजी शिवसेनेला गुंड लोकांचा पक्ष वगैरे म्हणायचे! पण भाजप सोबत त्यातले ६० टक्के लोक आले तर आता खोटी शिवसेना गुरुजींच्या मते साधू संतांचा पक्ष झाला असावा नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

कोणीही केलेल्या कोणत्याही

श्रीगुरुजी
Tue, 03/25/2025 - 13:15 नवीन
कोणीही केलेल्या कोणत्याही मारहाणीचे, मुस्कटदाबीचे, दढपशाहीचे, तोडफोडीचे मी समर्थन करीत नाही।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/25/2025 - 18:57 नवीन
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार राजधानी दिल्लीतील निझामुद्दीन येथून मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सौगात ए मोदी या कीटचे वाटप करण्यास सुरूवात होणार आहे. https://marathi.abplive.com/news/politics/bjp-distributes-32-lakh-saugat-a-modi-kits-across-the-country-visits-muslim-brothers-on-the-occasion-of-ramadan-eid-mubark-1351017?fbclid=IwY2xjawJPjFpleHRuA2FlbQIxMQABHXo5W23Y4WR-fRO4mVq0bIRl-y7Cx6LKVJpTexEsq9ibIEv1_S4wuvrQLA_aem_OqZhxHls7MZSNTEcKMH01Q&sfnsn=wiwspwa
  • Log in or register to post comments

छान

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 03/26/2025 - 16:08 नवीन
महाराष्ट्रात 'सागुती ए देवेंद्र' कीट देण्यात यावे. मट्ण खीमा-४ पाव-खजूर-काजू महिलांना देण्यात येणाऱ्या कीटमध्ये सूटचे कापड असणार असून पुरुषांच्या कीटमध्ये कुर्ता-पायजमाचा कपडा असेल. . आणि ह्याचा खर्च ?एज्युकेशन सेस सारखा, सौगात ए सेस?
  • Log in or register to post comments

हाजला जायला दिलेल्या सवलतीचा

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 16:32 नवीन
हाजला जायला दिलेल्या सवलतीचा खर्च कोठून येत होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

पण

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 03/26/2025 - 17:13 नवीन
सरकारी तिजोरीतून 'ह्या लोकांचे' लाड कशासाठी? असा प्रश्न भाजपवालेच तर विचारत होते ना? म्हणून २०१८ साली मोदी सरकारने हज सबसीडी बंद केली होती. https://timesofindia.indiatimes.com/india/haj-subsidy-ends-funds-to-go-into-minority-education/articleshow/62531624.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

सरकारी तिजोरी या लोकांवर

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 17:15 नवीन
सरकारी तिजोरी या लोकांवर उधळून टाकलेल्यांना हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मुळात हा अधिकार कोणालाच नाही.

आग्या१९९०
Wed, 03/26/2025 - 17:24 नवीन
मुळात हा अधिकार कोणालाच नाही. नवीन लोकशाहीत जनतेला अधिकार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

प्रत्येक नागरिकाला

स्वधर्म
Wed, 03/26/2025 - 23:24 नवीन
सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असलाच पाहिजे. अपवाद फक्त राष्ट्रीय सुरक्षेबाबत असेल तरच सरकार उत्तर द्यायचे नाकारू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

जर सरकारी योजना किंवा निर्णय

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/27/2025 - 07:07 नवीन
जर सरकारी योजना किंवा निर्णय असेल तर सरकारला प्रश्न विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

नेमकं बोट ठेवलंय

स्वधर्म
Wed, 03/26/2025 - 23:22 नवीन
खरोखर भाजप बोलते एक आणि वागते दुसरेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हे लोकानी कधीच ओळखले आहे,

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/26/2025 - 23:29 नवीन
हे लोकानी कधीच ओळखले आहे, त्यामुळेच भाजपला मते मिळत नाही, निवडणूक आयोग नी इव्हियन बनवणाऱ्या कंपनीतील कमळाच्या बिल्ल्यावाले डायरेक्टर भाजपला जिंकवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

माईडे,

श्रीगुरुजी
Wed, 03/26/2025 - 23:49 नवीन
माईडे, तुला आणि तुझ्या 'ह्यां'ना पण किट मिळणार बरं का. 'ह्यां'च्या किटात धोतरजोडी, बाह्यांचे दोन बनियन, गांधी टोपी, कवळी साफ करण्यासाठी ब्रश आणि पावडर असेल. तुझ्या किटात गर्भरेशमी नऊवारी, पावडर, स्नो असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा