✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

म
माईसाहेब कुरसूंदीकर यांनी
Sat, 03/01/2025 - 22:52  ·  लेख
लेख
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले. https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/ https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
65467 वाचन

💬 प्रतिसाद (548)

प्रतिक्रिया

अग माई! अमेरिका सारख्या

अमरेंद्र बाहुबली
Mon, 03/10/2025 - 21:11 नवीन
अग माई! अमेरिका सारख्या देशांना उत्तर द्यायला देशप्रेम असावे लागते, भाजपेयी देशप्रेमी नाहीत. त्यांच्या आडात देशप्रेम नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

उतावळा नवरा आणि गुडघ्याला

श्रीगुरुजी
Mon, 03/10/2025 - 21:22 नवीन
उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी या उतारवयात माईची अवस्था झालीये. काळजी घे गं माईडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

कुलभूषण जाधवांना पकडून

रात्रीचे चांदणे
Mon, 03/10/2025 - 21:24 नवीन
कुलभूषण जाधवांना पकडून देणाऱ्या ISI एजंटांचा अज्ञाताने गोळ्या घालून पाकिस्तानात खात्मा केला तरी संरक्षण मंत्री, पंतप्रधान यांचं एक स्टेटमेंट नाही. देशप्रेमी असले असते तर काहीतरी बोलले असते.
  • Log in or register to post comments

अज्ञाताने!

श्रीगुरुजी
Mon, 03/10/2025 - 21:28 नवीन
अज्ञाताने! सूज्ञ मुत्सद्दी न बोलता कृती करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

जशी कॅनडात केली नी नंतर

अमरेंद्र बाहुबली
Mon, 03/10/2025 - 22:27 नवीन
जशी कॅनडात केली नी नंतर तोंडावर पडले तशी का? #गावठीchankya!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माझ्या माहीतीप्रमाणे ह्यात

सुक्या
Tue, 03/11/2025 - 00:06 नवीन
माझ्या माहीतीप्रमाणे ह्यात कॅनडा तोंडावर पडले नाही तर थोबाड फोडुन घेतले आहे. ३ वर्षे झाली तरी अजुन त्यांची गाडी क्रेडीबल अलीगेशन च्या पुढे सरकली नाहेये. जरा माहीती घ्या. उगा आपले नेहेमीचे डायलॉग मारु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खूपच जास्त अपेक्षा. या

श्रीगुरुजी
Tue, 03/11/2025 - 08:13 नवीन
खूपच जास्त अपेक्षा. या माणसाची समज ती किती, अभ्यास तो किती, माहिती ती किती. निज्जर हत्येसंदर्भात भारताचा हात असल्याचा कोणताही पुरावा नाही असे ट्रुडोनेच ३ महिन्यांपूर्वी मान्य केले होते. पण हे समजण्यासाठी वाचन करावे लागते आणि थोडी तरी समज असावी लागते. या माणसाच्या बाबतीत तर सगळाच आनंद. अर्थात त्यात नवल नाही. चिवशेणासारख्या घाणीचा समर्थक असण्यासाठी मेंदू घोट्यात असणे सक्तीचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

नक्की का? अटक

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/11/2025 - 08:16 नवीन
नक्की का? अटक झालेल्यांसंदर्भात काय? खटले दाखल झाले त्याचे काय? बऱ्याच गोष्टी आहेत, पण एकदा का आपण खोट बोलणाऱ्या नेत्याचे समर्थक झालो की सगळी तथ्ये सहज दुर्लक्षित करता येतात नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

स्वत:चं अजून किती हसू करून

श्रीगुरुजी
Tue, 03/11/2025 - 09:02 नवीन
स्वत:चं अजून किती हसू करून घ्यायची इच्छा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

भाउबली सायेब,

सुक्या
Tue, 03/11/2025 - 10:20 नवीन
भाउबली सायेब, जरा ऐकता का? मी जिथे राहतो तिथुन वान्कुवर २ तासावर आहे. २ महिन्यातुन एकदा तरी मी तिथे जेवण करायला जातो. इतकेच काय ज्या दिवशी निज्जर निजधामास गेला त्या दिवशी मी सरे ह्या गावातच होतो (खादाडी करायला). माझे अनेक मित्र कॅनेडीयन सिटीझन आहेत. तेव्हा मला ह्या प्रकरणाची तुमच्यापेक्षा जरा जास्तच माहीती आहे. उगा आपले व्हाट्सअ‍ॅप छापील प्रश्न विचारु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मूर्ख आहे तो. कधी अक्कल येणार

श्रीगुरुजी
Tue, 03/11/2025 - 12:29 नवीन
मूर्ख आहे तो. कधी अक्कल येणार देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

खरे आहे तुमचे. मुर्खांना ते

सुक्या
Tue, 03/11/2025 - 14:42 नवीन
खरे आहे तुमचे. मुर्खांना ते मुर्ख आहेत हे माहीतच नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कुठे त्या भुजबळां च्या

सुबोध खरे
Wed, 03/12/2025 - 19:16 नवीन
कुठे त्या भुजबळां च्या नादाला लागतांय? हातात कळफलक आहे म्हणून बडवायचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/11/2025 - 12:54 नवीन
सर्वज्ञानी लोकांनी ट्रुडो नेमके काय बोलला ते सांगावे, भारताविरुद्ध पुरावेच नाहीत की पुरेसे पुरावे नाहीत? गावठी चाणक्य नी त्याच्या आकाच्या अंधभक्तीत वस्तुस्थिती काय तेही पाहावे! खर तर असे मर्डर करायला जी सफाई लागते ती दाखवता आलेली नाही! निझरची हत्या झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावे वगैरे पण भारताची जी जायची ती गेलीच! आणी अटक झालेल्यांवर अजूनही चौकशी सुरुय! पुढे मागे (आले तर) सत्य बाहेर येईल, पण ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहे. असो! देशभक्त बना अंधभक्त नको इतकेच म्हणेन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

खरे आहे

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/11/2025 - 13:10 नवीन
https://www.youtube.com/watch?v=pCVq0KfkDDU त्यांचे पोलिस कमीशनर थेट सांगतात की भारतिय अधिकार्यांविरुद्ध पुरावे मिळाले, ते त्यांनी भारत सरकारला पाठवले. ते त्यांच्या वेबसाईटवर देखील हेच लिहितात. अशी ही बदनामी दुसर्या देशाने खपवुन घेतली असती का? "माफी मागा" असे जाहीररीत्या सांगायला हवे भारताने. आता कॅनडाचे गुप्तचर प्रमुख एका परिषदेसाठी दिल्लित येत आहेत. संबंध पुर्ववत होत असतील तर भारताने त्यांना कमीशनरांचे हे वक्तव्य/वेबसाईट वरील बदनामी थांबवा अशी ताकीद दिली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

माई हे तुला मला माहीत! पण

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/11/2025 - 13:16 नवीन
माई हे तुला मला माहीत! पण अंधभक्त त्यांचा गावठी चाणक्य आणी अडाणी आका ह्यांच्या समर्थनात सगळ्यानाच मूर्ख ठरवू लागतात त्याला काय करणार? अंधभक्तीला काहीही सीमा नसते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

नंतर राजनैतिक पातळीवर

सुक्या
Tue, 03/11/2025 - 14:40 नवीन
नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावे आपली कल्पनाशक्ती आचाट आहे. माझी बोलती बंद केलीत तुम्ही ... (हे परमेश्वरा काय काय वाचावे लागते आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

कपाळावर हात मारून घ्यावा

श्रीगुरुजी
Tue, 03/11/2025 - 14:57 नवीन
कपाळावर हात मारून घ्यावा लागतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

कुठे त्या भुजबळां च्या

सुबोध खरे
Wed, 03/12/2025 - 19:17 नवीन
कुठे त्या भुजबळां च्या नादाला लागतांय? हातात कळफलक आहे म्हणून बडवायचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

निझरची हत्या झाल्या झाल्या

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/13/2025 - 08:56 नवीन
निझरची हत्या झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! नंतर राजनैतिक पातळीवर ट्रुडोला मॅनेज केले असावे वगैरे पण भारताची जी जायची ती गेलीच! आणी अटक झालेल्यांवर अजूनही चौकशी सुरुय! पुढे मागे (आले तर) सत्य बाहेर येईल, पण ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहे आगगाडीचे अपहरण झाल्या झाल्या लगेच आरोप भारतावर लागले, गावठी चाणक्य तेव्हाच उघडा पडला! भारताची जी जायची ती गेलीच! ह्यात भारतावर थेट शिंतोडे उडणे जगात नाचक्की होण्यास कारणीभूत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

एका मानसच्या द्वेषपाई लोक

विवेकपटाईत
Sat, 03/15/2025 - 19:08 नवीन
एका मानसच्या द्वेषपाई लोक बुद्धी गहाण का ठेवतात. कॅनडाची जगात हंसी झाली आहे. बाकी आपले पंत प्रधान जे बोलतात ते करून दाखवितात. दहा वर्षांत भारतात भूतो न भविष्यती विकास झाला आहे. हे जगाला दिसत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

खिक्क! एखाद्याची sarcasm

अमरेंद्र बाहुबली
Sat, 03/15/2025 - 21:09 नवीन
खिक्क! एखाद्याची sarcasm द्वारे इतकीही खिल्ली उडवू नये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/19/2025 - 10:48 नवीन
आपले पंत प्रधान जे बोलतात ते करून दाखवितात. दहा वर्षांत भारतात भूतो न भविष्यती विकास झाला आहे.
=)) हसुन हसुन पुरेवाट झाली. चालू ठेवा करमणूक. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 03/10/2025 - 23:30 नवीन
"तरी संरक्षण मंत्री, पंतप्रधान यांचं एक स्टेटमेंट नाही" मारले ही चांगले झाले पण "आम्ही पाकिस्तानच्या एका नागरिकाला मारले" असे विधान करणे मूर्खपणाचे झाले असते. आठवणी प्रमाणे कुलभुषणच्या विरोधात कथित पुरावे सापडले होते. तेथील न्यायालयाने ते तपासले होते. ही केस आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालु होती/आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

माईडीत सुधारणा दिसते. किती

श्रीगुरुजी
Tue, 03/11/2025 - 00:05 नवीन
माईडीत सुधारणा दिसते. किती दिवस टिकेल कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हे

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/11/2025 - 12:53 नवीन
"३ वर्षे झाली तरी अजुन त्यांची गाडी क्रेडीबल अलीगेशन च्या पुढे सरकली नाहेये." कॅनडाच्या संसदीय कमीटी मधील नोट्स मधुन- Indian Government Agents’ Involvement in Violent Criminal Activity in Canada On October 14, the RCMP took the unprecedented step of publicly disclosing the threat posed by Government of India actions that have come to light through various law enforcement operations, including ongoing RCMP investigations. https://www.publicsafety.gc.ca/cnt/trnsprnc/brfng-mtrls/prlmntry-bndrs/20250226/08-en.aspx इकडे पोलिस कमीशनर काय म्हणतात पहा- https://www.youtube.com/watch?v=pCVq0KfkDDU म्हणजे ते त्यांच्या साईटवर भारतावर आरोप करतात,पुरावे आहेत म्हणुन सांगतात, मुलाखतीतही तेच सांगतात. This evidence was presented directly to Government of India officials, along with a request for their cooperation in stemming the violence and that our law enforcement agencies work together to address these issues. कॅनडाचे अधिकारी थेट बोलत आहेत इकडे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे.
  • Log in or register to post comments

माईडे,

श्रीगुरुजी
Tue, 03/11/2025 - 13:19 नवीन
माईडे, देशाचा पंतप्रधान प्रगट सांगतोय की निज्जरच्या हत्येत भारताचा हात नाही आणि तू पोलीस कमिशनर घेऊन बसलीस. म्हणजे पोलिस हवालदार सांगतोय अमुक एकाने चोरी केली आणि पोलीस आयुक्त न्यायालयात सांगतोय त्याने चोरी केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे,

श्रीगुरुजी
Tue, 03/11/2025 - 13:47 नवीन
माईडे, निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत हे ट्रुडोने सांगितल्यानंतर कॅनडाचे पोलीस आयुक्त, अधिकारी इ. जे म्हणतात त्यास शष्प महत्त्व नाही. अबाच्या संगतीने तुझी अवस्था ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला . . . अशी झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब,

सुक्या
Tue, 03/11/2025 - 15:23 नवीन
माईसाहेब, विषय आहे तो निज्जर हत्या झाली ती भारतीय एजंट्ने केली व त्या हत्येत भारतीय अधिकारी सामील आहेत हा. तुम्ही दिलेला पब्लीक सेफ्टी दुवा हा त्यांच्या पार्लमेंटरी कमीटी च्या नोट्स आहेत. त्याला शष्प महत्व नाही. ट्रुडो तर पार्लमेंट मधे बोलला होता ही ह्यात भारताचा हात आहे. बाकी जर कॅनडा कडे किंवा फाईव आईज कडे जर सज्जड पुरावे असते तर आतापर्यंत ट्रुडो ने थयथयाट केला असता. उगा आपल्या पंतप्रधान पदाचा बळी दिला नसता. ट्रुडो चा सारा डोलारा जगमित सिन्ग च्या आधारावर होता. निज्जर प्रकरणात काही हाती न लागल्यामुळे जगमित ने पण त्याला डच्चु दिला. फाईव आइज पण आता तेरी भी चुप मेरी भी चुप आहेत. असो. अमेरीका/कॅनडा/ब्रिटन वगेरे वगेरे देश काहीही बोलले की ते खरे(च) आहे असे समजणारा वर्ग अजुनही आहे. व्हाईट सुप्रीमसी / गुलामगिरी चे जोखड ईतक्यात फेकणे अशक्य आहे. बरीच व्रुत्तपत्रे/लोक ही मानसिकता नेहेमी दाखवत असतात. कॅनडाचे अधिकारी जे बोलत आहेत ते खरे आहे व भारतीय अधिकारी जे बोलत आहेत ते खोटे आहे हे तुमचे ग्रुहीतक आहे. त्याला तुम्हीच तोडु शकता. ईतर फक्त प्रयत्न करु शकतात. त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही. परराष्ट्र व्यवहारामध्ये मुसद्देगिरी नावाचा प्रकार असतो, तुमचे चुकले माफी मागा/ कट्टी फु किंवा तु तो मेरा यार है तेरेलिये सब हाजिर है वगेरे भाषण बाजी चालत नाही हे तुम्हाला माहीत आहे. बाकी निज्जर हत्या व नंतर चे झालेले सोहळे याचा आता चावुन चावुन चोथा झाला आहे. त्यामुळे हा शेवटचा प्रतीसाद. तरीही गंमत म्हणुन खालीस्तानी किड्यांचे सिटीझन्स कोर्ट / खालीस्तानी रेफरंडम असल्ये माकड्चाळे बघायला जाईनच. त्यांच्या डोळ्यात बघुन छद्मीपणे हसण्यात कोण आनंद मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

असे

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/11/2025 - 16:27 नवीन
कॅनडाचे अधिकारी जे बोलत आहेत ते खरे आहे व भारतीय अधिकारी जे बोलत आहेत ते खोटे आहे हे तुमचे ग्रुहीतक आहे असे कोणी म्हणत नाही. जे समोर दिसते त्यावरुन अनुमान काढावे लागते. ते आर सी एम पी चे कमीशनर चॅनेलवर येउन सरळ "भारत सरकार विरोधात पुरावे आहेत" असे म्हणतात. "भारत सरकारला पुरावे सादर केले आहेत" असेही म्हणतात. त्यांच्या वेबसाईटवरही तसे लिहिले जाते. आता एवढे झाल्यावर भारत सरकारकडुन अपेक्षा काय असते? पुरावे नसतील तर भारतिय दूतावासाने त्या कमीशनरला सांगणे की "तू पुरावे दिले नाहीस. तू भारत सरकारची माफी माग नाहीतर बदनामीचा खटला दाखल करू" बरोबर ना? भारतिय दूतावासाकडुन तशी कृती झाली का ? "ट्रुडो बोलला आणि विषय संपला" ही पळवाट नाही का? कॅनडाने भारताची जी बदनामी केली त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

आंतरराष्ट्रीय राजकारणात माफी,

श्रीगुरुजी
Tue, 03/11/2025 - 17:37 नवीन
आंतरराष्ट्रीय राजकारणात माफी, अपकीर्तिचा खटला वगैरे नसते, एवढी समज असावी अशी अपेक्षा आहे. ११ सप्टेंबरचा हल्ला बुशने स्वत:च आयोजित केला होता, इस्राएलने केला होता असले अनेक आरोप अनेक इस्लामी देशांनी केले होते. इटालीचा अध्यक्ष तर म्हटला होता की सीआयए व मोसादने संयुक्तपणे ११ सप्टेंबरचा हल्ला योजला होता. ना अमेरिकेने ना इस्राएलने असल्या आरोपांकडे शष्प लक्ष दिले ना ते माफी मागा म्हणून मागे लागले. इंदिरा गांधी तर भारतातल्या सर्व घटनांमध्ये सीआयएचा हात असल्याचा आरोप करायच्या. पाकिस्तान देशातील सर्व घटनांमागे रॉ असल्याचा आरोप करतो. ना असल्या आरोपांमुळे कोणत्या देशाची अपकीर्ति होते ना एखादा देश आमची माफी मागा अशी मागणी करतो ना आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागतो ना आरोप करणारे माफी मागतात. इतकं वय झाले तरी माईडी अजून बाळबोधच राहिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

कॅनडाचे अधिकारी थेट बोलत आहेत

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/13/2025 - 09:00 नवीन
कॅनडाचे अधिकारी थेट बोलत आहेत इकडे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान थेट भारतावर आरोप करीत आहे. हे खोटे असेल तर भारताने "माफी मागा" असे नको का सांगायला? कारण असे देशाचे नाव घेणे म्हणजे भारताची बदनामी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

युक्रेन

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/11/2025 - 17:03 नवीन
झेलिंस्कींची 'आता माझी सटकली"! युक्रेनचा मॉस्कोवर ड्रोन्सनी हल्ला. https://www.theguardian.com/world/video/2025/mar/11/ukraine-drone-attack-moscow-russia-video आता पुतिन काय करतात बघायचे.
  • Log in or register to post comments

हे निमित्त करून पुतिन काका

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/11/2025 - 17:19 नवीन
हे निमित्त करून पुतिन काका युक्रेनची चटणी करतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

असे १७६० हल्ले केले तरीही

अमरेंद्र बाहुबली
Tue, 03/11/2025 - 17:28 नवीन
असे १७६० हल्ले केले तरीही रशियाला फरक पडणार नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

कामाच्या बहाण्याने थायलंड व

श्रीगुरुजी
Tue, 03/11/2025 - 18:00 नवीन
कामाच्या बहाण्याने थायलंड व ब्रह्मदेशात नेऊन अडकवून ठेवलेल्या २८३ भारतीय नागरिकांना भारताने मुक्त करून परत आणले.
  • Log in or register to post comments

आमची

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 03/12/2025 - 15:32 नवीन
"आमची दारू भारताने स्वस्त करावी. बॉर्बॉन व्हिस्कीवरील आयात शुल्क कमी करावे. "तात्यांचे फर्मान. भारताने आयात शुल्क १५०% वरुन १००% केले होतेच. पण आता त्याचे जाहीर वाच्य व्हाईट हाउसने केले- (आयात शुल्क भारताने फेब्रुवारीतच कमी केले आहे) https://www.youtube.com/watch?v=3WWFDXL-juY https://www.reuters.com/business/retail-consumer/india-slashes-bourbon-whisky-tariffs-amid-intensifying-trump-criticism-2025-02-14/#:~:text=NEW%20DELHI%2C%20Feb%2014%20(Reuters,in%20the%20South%20Asian%20market. युरोपियन युनियनचे उत्तर- https://www.youtube.com/watch?v=bMHTNFV9Y6M "अमेरिका जे आयात शुल्क लादु पाहातेय ते न पटणारे आहे." पियुष गोयल ह्यांची पुन्हा अमेरिकावारी होतेय. https://www.ndtvprofit.com/economy-finance/reciprocal-tariffs-piyush-goyal-likely-to-head-to-us-again-with-eye-on-tariff-delays
  • Log in or register to post comments

सल्ला

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 03/12/2025 - 17:10 नवीन
शेवटी पंतप्रधानांच्या कार्यालयातुन कुणीतरी बोलते झाले- Trump tariff threats present opportunity for India, too much protection detrimental to growth: Shamika Ravi(पंतप्रधान सल्लागार समीती) वा, म्हणजे भारत जेव्हा आयात शुल्क जास्त लावत होता तेव्हाही संधी होत्या आणी आता आयात शुल्क कमी केल्यावरही संधी आहेत. !!
  • Log in or register to post comments

माईडे आता आनंदी? सरकारतर्फे

श्रीगुरुजी
Wed, 03/12/2025 - 17:38 नवीन
माईडे आता आनंदी? सरकारतर्फे कोणीतरी बोलावे म्हणून तुझ्या 'ह्यां'नी देव पाण्यात ठेवले होते आणि तू अन्नपाणी सोडलं होतंस. आता देव पाण्यातून काढा, तू उपवास सोड आणि सत्यनारायण घालून उद्यापन कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माईडे, अबा,

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/13/2025 - 08:52 नवीन
Image removed. माईडे, अबा, बलुचिस्तानमधील आगगाडी अपहरण प्रकरणात भारताचा हात आहे या पाकिस्तानच्या आरोपामुळे भारताची जगभर नाचक्की झाली आहे. भारताची मान शरमेने खाली गेली आहे. आधी कॅनडात आणि आता पाकिस्तानात भारत दहशतवादी कृत्ये करीत आहे. भारताला लाज वाटायला हवी. परंतु मोदी-शाह-डोवाल एक शब्द बोलायला तयार नाहीत आणि त्यांचे भक्तही गप्प आहेत. भारताच्या नाचक्कीचे यांना काही पडले नाही. तुम्ही गप्प का? निदान तुम्ही तरी काहीतरी बोला.
  • Log in or register to post comments

अभिमान...

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 03/13/2025 - 09:35 नवीन
जर बलुचिस्तानमधील घटनेत भारताचा हात असेल तर त्याचा आम्हाला अभिमान आहे असे स्वतःच्या बळावर काही नगरसेवक पण निवडून न आणू शकणार्‍या भाजपच्या एखाद्या गल्लीतल्या नेत्याने जाहीर वक्तव्य द्यायला पाहिजे. भविष्यात समजा बलुचिस्तानमध्ये यादवी युद्ध सुरू झाले आणि पाकिस्तानचा तुकडा पडला तर मग 'बघा आम्हीच केलं' असे म्हणत पुढच्या दोन-तीन पिढ्या श्रेय घेऊ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

भक्तुल्यांना अभिमान वाटतोय,

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/13/2025 - 10:53 नवीन
भक्तुल्यांना अभिमान वाटतोय, पण या घटनेमुळे भारताची मान शरमेने खाली गेलीये आणि जगभर भारताची अपकीर्ति झालीये याचे अधभक्तांना ना सोयर ना सुतक. - इति माई, माईंंचे 'हे' आणि अबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

बर, हा आरोप पण कोणी सध्या

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 03/13/2025 - 09:43 नवीन
बर, हा आरोप पण कोणी सध्या माणसाने नाही तर पंत प्रधानाच्या सल्लागाराने केलाय.
  • Log in or register to post comments

जर २०१४ मध्ये मोदी शेठ सत्तेत

विवेकपटाईत
गुरुवार, 03/13/2025 - 10:24 नवीन
जर २०१४ मध्ये मोदी शेठ सत्तेत आले नसते तर भारताचे तुकडे तुकडे झाले असते. महागाई भयंकर वाढली असती. अनेक सरकारी बँकांचे दिवाळे निघाले असते. (दिवाळखोर कायदा बनला नसता). भारताचा कश्मीरचा बराचसा हिस्सा पाकिस्तानला दिल्या गेला असता. ज्या लोकांचे देशावर प्रेम नाही फक्त तेच मोदींचा विरोध करतात.
  • Log in or register to post comments

मग आता

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 03/13/2025 - 11:48 नवीन
"महागाई भयंकर वाढली असती" मग सध्या काय आहे? डिझेल- ५५ रुपयांपासुन ८८ रुपयापर्यंत(२०१४ पासुन २०२४ पर्यंत), पेट्रोल(७३ पासुन ९७ रुपये/लिटर) दूध(३६ रुपये लिटर पासुन ६० रुपये)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

The prices went up again --

सुबोध खरे
गुरुवार, 03/13/2025 - 19:40 नवीन
The prices went up again -- from Rs 44 a litre in March 2011 to Rs 66 in May 2014, followed by a slide to Rs 57 in July 2017. माई तुमच्या "ह्यां"चे निवृत्तीवेतन तेवढेच राहिले का? का त्यात महागाई भत्ता आणि सातव्या वेतन आयोगामुळे भरघोस वाढ झाली? किंवा तुमच्या मुलं नातवंडांचे पगारही तेवढेच राहिले का? का कमी झाले? तुमचं वय झालं हे मात्र खरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

पुरावे

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 03/13/2025 - 11:39 नवीन
" परंतु मोदी-शाह-डोवाल एक शब्द बोलायला तयार नाहीत आणि त्यांचे भक्तही गप्प आहेत. भारताच्या नाचक्कीचे यांना काही पडले नाही.तुम्ही गप्प का? निदान तुम्ही तरी काहीतरी बोला." फरक लक्षात घ्या आदरणीय गुरुजी. निज्जर प्रकरणात कॅनडाने पुरावे दिले होते असे ते म्हणतात. त्यांचे पोलिस अमित शहांचे नाव घेतात. आपल्या राजदूताला भारतात पाठवतात. ते पुरावे पाच देशांना देतात. त्यातले दोन देश ब्रिटन आणि अमेरिका काय म्हणतात ते ही वाचा- the United States and the United Kingdom threw their weight behind Canada, accusing India of not cooperating with the probe into the killing in the North American country and nudging it to do so now. म्हणजे फक्त कॅनडाच नाही तर हे दोन महत्वाचे देश कॅनडाला समर्थन देतात(हे समर्थन पुरावे पाहिल्यावरच दिले असणार. हे दोन देश तेवढे शहाणे निश्चित आहेत). म्हणुन भारताची बाजु येथे दुबळी होते. आणि भारताने ह्यावर उत्तर देणे अपेक्षित असते. पाकिस्तान आगगाडी प्रकरणात पाकिस्तानने पुरावे दिले का? दुसरा कोणता देश त्याच्या बाजुने उभा राहिला का? असेल तर भारत अशा गुप्त कारवायांत कमी पडतो असाच अर्थ काढावा लागेल. https://www.deccanherald.com/world/us-uk-stand-by-canada-ask-india-to-join-probe-into-nijjar-killing-3235543 https://timesofindia.indiatimes.com/india/allegations-extremely-serious-and-what-us-said-on-canadas-charge-against-india-on-nijjar-case/articleshow/114266770.cms
  • Log in or register to post comments

म्हणुन भारताची बाजु येथे

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/13/2025 - 13:12 नवीन
म्हणुन भारताची बाजु येथे दुबळी होते. आणि भारताने ह्यावर उत्तर देणे अपेक्षित असते. यात भारताचा हात नाही हे ट्रुडोनेच मान्य केल्यानंतर कसली दुबळी बाजू आणि कसलं डोंबलाचं उत्तर द्यायचं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मला तर वाटतंय की निज्जर ला

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 03/13/2025 - 12:15 नवीन
मला तर वाटतंय की निज्जर ला भारतानेच मारले असेल. हे कॅनडालाही समजले असेल. पण पुरावे सापडत नसतील. त्यामुळेच त्यांच्या स्टेटमेंट्स मध्ये एक वाक्यता नाही. एकदा म्हणतात पुरावे आहेत दुसऱ्या वेळेस नाही. भारतात दहशतवाद्यांचे आरोप असणाऱ्याला कॅनडाने संरक्षण नाही द्यायला पाहिजे होत. आत्ता कॅनडा ने कितीही आदळआपट केली तरी भारताने दुर्लक्ष केलेलेच बरे.
  • Log in or register to post comments

बरोब्बर

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 03/13/2025 - 12:29 नवीन
"मला तर वाटतंय की निज्जर ला भारतानेच मारले असेल. हे कॅनडालाही समजले असेल. पण पुरावे सापडत नसतील" बरोब्बर. मारले असेल तर उत्तमच आहे पण त्यातुन बाहेर पडण्यात आपण कमी पडलो असे दिसतय. ह्या आधी रॉचे संस्थापक आर एन काओ ह्यांच्या नेत्रुत्वाखाली अनेक कारवाया केल्या आहेत, नामानिराळे राहुन. ७०च्या दशकात Kao as one of the 'five great intelligence chiefs of the 1970s https://en.wikipedia.org/wiki/R._N._Kao ह्यांनी मुलाखतीही फारशा दिल्या नाहीत. ना अजित डोवाल ह्यांच्यासारखे काही विधान केले- You can do one Mumbai, and you may lose Balochistan” - Ajit Doval 9 yrs ago https://www.reddit.com/r/IndianDefense/comments/1f6zoth/you_can_do_one_mumbai_and_you_may_lose/ डोवाल ह्यांच्याबद्दल आदर आहे पण त्यांचे हेच विधान आता बलुचिस्तान ट्रेन प्रकरणानंतर सगळीकडे पुन्हा प्रसिद्ध होतेय. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा