✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ?

T
Trump यांनी
गुरुवार, 12/02/2021 - 13:34  ·  लेख
लेख
तुम्ही डावीकडुन -> उजवीकडे का आलात ? आयुष्यात आपले विचार सतत बदलत असतात; नवीन माहिती मिळते, नवीन व्यवहारीक अडचणी येतात. अशी कितीतरी कारणे असतात. मी महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाल्यानंतर साधारणतः सौम्य डाव्या विचारांनी प्रभावित झालो होतो. जसे जसे वाचन, प्रवास आणि संशोधन वाढत गेले तसे तथाकथीत डाव्या विचारातील (प्रचारातील ?) फोलपणा जाणवत गेला. काही प्रचलित कारणे खालीलपैकी आहेत. १. सतत एक बाजु दुसर्‍यावर अन्याय करते आहे. २. अतिशय निवडक आणि खोट्या बातम्या पसरवणे. ३. दांभिकपणा. तुमचाही असाच वैचारीक प्रवास झाला आहे का? असेल तर कारणे जाणुन घ्यायला आवडतील...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52853 वाचन

💬 प्रतिसाद (149)

प्रतिक्रिया

इंदिरांनी ढापलेल्या बँकांचे

आग्या१९९०
Sat, 12/04/2021 - 18:05 नवीन
इंदिरांनी ढापलेल्या बँकांचे संस्थापक हयात असतील त्यांनाही असेच अपार दु:ख झाले असेल यात शंका नाही. बँक मालकांना त्याबदल्यात मोबदला दिला होता. एखाद दुसरा अपवाद वगळता विनातक्रार सर्वांनी स्वीकारला. सुस्थापित खाजगी बँकांसमोर सरकारी बँकांना तग धरणे कठीण झाले असते. जे केले ते योग्यच केले. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अनेक सरकारी प्रकल्पात गेल्या. त्यांचेही कष्ट होतेच की. शेतकऱ्यांकडून पंतप्रधान पीकविमा योजनेखाली विमाहप्ते गोळा करणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्सने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना हात वरती केले. राज्य शासनाने केंद्राकडे तक्रार केल्याने कंपनीने नमते घेतले. खाजगीकरणाचे धोकेच जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

:)

चंद्रसूर्यकुमार
Sat, 12/04/2021 - 18:24 नवीन
बँक मालकांना त्याबदल्यात मोबदला दिला होता. एखाद दुसरा अपवाद वगळता विनातक्रार सर्वांनी स्वीकारला.
:) सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून त्यांना तो स्विकारावा लागला. देशातील १४ मोठ्या बँकांचे १००% शेअर बाजारभावाने विकत घेणे भारत सरकारला आजही परवडणार नाही. तेव्हा कुठचे परवडणार होते? एच.डी.एफ.सी बँकेचे मार्केट कॅपिटलायझेशन ८ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. सरकारला परवडणार आहे का ती एक बँक विकत घेणे? ८ लाख कोटीची एक बँक सोडा- २ लाख कोटीची जरी एक बँक असेल तरी ती विकत घेणे तरी परवडणार आहे का? सगळ्या १४ बँका मिळून २ लाख कोटींच्या असतील तरी सहजपणे परवडणार आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हे नेहमीच आर्ग्युमेन्ट केले

आग्या१९९०
Sat, 12/04/2021 - 13:53 नवीन
हे नेहमीच आर्ग्युमेन्ट केले जाते. पण प्रश्न हा की आर.बी.आय ने नियमांमध्ये बदल करून हे सगळे बदल करता आले असते. खाजगी बँका नियम पाळून सेवा देतीलच ह्याची काय खात्री? उगाच कालापव्यय करण्यात काहीच अर्थ नव्हता. जे केले ते योग्यच केले. फालतू रिस्क घेऊन गरीब जनतेचे हाल केले नाही. हरितक्रांतीमुळे आज आपण बव्हंशी आत्मनिर्भर झालोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

??

चंद्रसूर्यकुमार
Sat, 12/04/2021 - 14:12 नवीन
खाजगी बँका नियम पाळून सेवा देतीलच ह्याची काय खात्री?
खाजगी बँका नियमांचे पालन करणारच नाहीत याची काय खात्री होती? आर.बी.आयच्या बाकी सगळ्या नियमांचे पालन खाजगी बँका करत होत्या. काही बँकांचे आर.बी.आय ने सक्तीने विलीनीकरण करायचा आदेश दिला तरी तो पण त्यांनी मानला. फक्त हेच नियम खाजगी बँकांनी मानले नसते, बरोबर ना? हरीतक्रांतीमुळे आपण आत्मनिर्भर झालो आहोत त्याचा बँकांच्या राष्ट्रीयीकरणाशी काय संबंध? हरीतक्रांतीची प्रक्रीया शास्त्री पंतप्रधान असताना सी.सुब्रमण्यम कृषीमंत्री होते तेव्हाच सुरू झाली होती. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय जाहीर झाला जुलै १९६९ मध्ये. त्याला खाजगी बँकांच्या मालकांनी कोर्टात आव्हान दिले. त्यानंतर फेब्रुवारी १९७० मध्ये तो निर्णय रद्द केला. त्यानंतर इंदिरांनी संसदेत तो बँक राष्ट्रीयीकरणाचा कायदा १९७० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत करून घेतला आणि तो ३१ मार्च १९७० रोजी अंमलात आला. तोपर्यंत हरीतक्रांतीची प्रक्रीया बरीचशी पूर्ण झाली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हरितक्रांतीचे भीषण परिणाम बघायचे असतील तर...

मुक्त विहारि
Sat, 12/04/2021 - 14:29 नवीन
माननीय सुभाष पाळेकर, यांची भाषणे जरूर ऐका... एक लिंक देतो https://youtu.be/a-HTTMedE0I ---------- आज देशी वाणांची बोंबाबोंब सुरू आहे हायब्रिड वाण, कीटकनाशके आणि रासायनिक खते, यामुळे आपल्या सगळ्यांचे शरीर म्हणजे, रासायनिक झाले आहे .... कॉंग्रेसची देणगी आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

क्रोनोलोजीकडे दुर्लक्ष करा.

आग्या१९९०
Sat, 12/04/2021 - 14:29 नवीन
क्रोनोलोजीकडे दुर्लक्ष करा. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे धोरण कसे योग्य होते हे समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

वा वा. मस्त

चंद्रसूर्यकुमार
Sat, 12/04/2021 - 14:45 नवीन
वा. वा. टाळ्या. म्हणजे धोरण काय होते ते तपासून बघून ते योग्य होते की नाही हे समजून न घेता ते धोरण योग्यच होते हे आधीच ठरवायचे आणि ते योग्य कसे होते हे समजून घ्यायचे? थोडेसे अवांतरः मध्याच्या डावीकडील लोकांची हीच तर खासियत असते. आणि असेच लोक सगळ्या जगाला शास्त्रीय दृष्टीकोनाबद्दल लेक्चर झोडत असतात. आहे की नाही मज्जा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

भारतीय खाजगी विमान कंपन्यांना

आग्या१९९०
Sat, 12/04/2021 - 15:07 नवीन
भारतीय खाजगी विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय सेवा देण्यासाठी देशांतर्गत ५ वर्ष सेवा देणे अनिवार्य होते. नाही परवडले ह्या कंपन्यांना. काय झाले ह्या कंपन्यांचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

नक्की प्रश्न काय आहे?

चंद्रसूर्यकुमार
Sat, 12/04/2021 - 15:17 नवीन
नक्की प्रश्न कळला नाही. भारतीय विमान कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय सेवा दिलीच पाहिजे असे अजिबात नाही. तरीही त्यांना पाहिजे असलेल्या भारतीय विमानकंपन्या आंतरराष्ट्रीय सेवा देतात. ते देणे परवडले नाही तर ते त्या सेवा बंद करतील. हाकानाका. त्यांना नुकसान झाले तर ते नुकसान त्या कंपनीच्या शेअरहोल्डर्सचे असेल. पण आतापर्यंत एअर इंडियाला होणारे नुकसान करदाते- म्हणजे आपण सगळेच भरून देत होतो. हा फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

खाजगी विमान कंपन्यांना किंवा

आग्या१९९०
Sat, 12/04/2021 - 15:28 नवीन
खाजगी विमान कंपन्यांना किंवा बँकांना अमुक अमुक ठिकाणी सेवा देणे बंधनकारक करावे सरकारने.पण त्यांना त्याब्यात घेऊ नये असे मत व्यक्त केले होते. त्यांना ह्या अटी झेपल्या असत्या का? म्हणून वरील उदाहरण दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

मुद्दा

चंद्रसूर्यकुमार
Sat, 12/04/2021 - 15:46 नवीन
या अटी डी.जी.सी.एने घालाव्यात असे म्हणत नाही तर त्या अटी डी.जी.सी.ए घालतेच. सगळ्या कंपन्यांना मुंबई, दिल्ली, गोवा, बंगलोर, हैद्राबाद, जयपूर अशा मोजक्या विमानतळांवरच सेवा द्यायला आवडेल. पण गो एअर पाटणा, रायपूर, भुवनेश्वर वगैरे कमी लोकप्रिय ठिकाणी पण जाते. ते डी.जी.सी.ए च्या नियमांमुळे. तशा अटी १९६९ च्या बँक राष्ट्रीयीकरणाच्या वेळेसही घालून ग्रामीण भागात बँकांच्या शाखा नाहीत यावर उपाय काढता आला असता. म्हणजे मुंबईत एक शाखा हवी असेल तर आधी गावातही शाखा उघडाव्या लागतील अशाप्रकारच्या. पूर्वी भारतात बार्कलेज ही ब्रिटिश बँक होती. त्या बँकेच्या मोजक्या शाखा भारतात होत्या. मुंबईत आणि बंगलोरमध्ये होत्याच. पण त्या बरोबर राजकोटमध्येही एक शाखा होती. आता राजकोटमध्ये शाखा कशाकरता? तर तो रिझर्व्ह बँकेने घातलेला दंडक होता- सगळ्या शाखा मुंबई-बंगलोरमध्ये नाहीत तर इतर ठिकाणी पण शाखा उघडावी लागेल. अन्यथा राजकोटसारख्या ठिकाणी ब्रिटिश बँकेची शाखा उघडली गेली नसती. यात आंतरराष्ट्रीय विमान सेवांचे उदाहरण समकक्ष नाही. याचे कारण भारतात अमुक इतकी वर्षे सेवा द्या मगच आंतरराष्ट्रीय सेवेची परवानगी मिळेल अशा स्वरूपाची ही अट आहे. समजा खाजगी कंपन्यांना ते झेपले नाही तर त्या भारतातच सेवा देतील- आंतरराष्ट्रीय सेवा नाही. त्याप्रमाणे बँकिंगमधले उदाहरण द्यायचे झाले तर ग्रामीण भागात शाखा उघडाव्याच लागतील तरच शहरात नव्या शाखांना परवानगी मिळेल. ग्रामीण भागातील बँकेची शाखा फायद्यात असेल ही शक्यता कमी. मग तो तोटा भरून काढायला त्यांना शहरांवर अवलंबून राहावे लागेल. म्हणजे एका अर्थी शहरी ग्राहक ग्रामीण भागातील ग्राहकांना 'क्रॉस सबसिडाईझ' करतात. तशी स्थिती विमान कंपन्यांमध्ये असते का (म्हणजे आंतरराष्ट्रीय सेवा भारतातील सेवांना क्रॉस सबसिडाईझ करतात) हे मला माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

घोळात घोळ करून गोल गोल लिहिणे

सुबोध खरे
Sat, 12/04/2021 - 19:33 नवीन
घोळात घोळ करून गोल गोल लिहिणे गोलपोस्ट बदलणे आणि शब्दांना फाटे फोडणे हा समाजवादी लोकांचा स्थायीभाव आहे. तुम्ही आपला अमूल्य वेळ असल्या लोकांचे प्रबोधन करण्यात कशाला फुकट घालवता आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

मी SBI आणि BOI अकाउंट बंद केले ...

मुक्त विहारि
Sat, 12/04/2021 - 14:19 नवीन
मुले ICICI आणि HDFC वापरतात... मुलांना तरी खाजगी बॅन्केत, SBI पेक्षा चांगली सेवा मिळाली आणि मला देखील ... हरितक्रांतीमुळे आज आपण बव्हंशी आत्मनिर्भर झालोय. हो ना, खेडेगावातील अल्पभूधारक शेतकरी देखील, मर्सिडीज घेऊन फिरतो आणि बागायती शेतकरी लॅम्बाॅर्गिनी आणि फेरारी घेऊन फिरतो इतकेच कशाला? मायबाख साठी तर, अल्पभूधारक शेतकरी वर्गाला पहिली पसंती असते शिवाय, हरितक्रांती मुळेच, अल्पभूधारक शेतकरी वर्गाला इतका अमाप पैसा मिळतो की ते स्विस बॅन्केत पैसा ठेवतात ... परमपूज्य माणसे, आता असेही सांगतील... तशी मानसिक तयारी करून ठेवली आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

आमची कृषि कर्जे मोठी असतात,

आग्या१९९०
Sat, 12/04/2021 - 14:36 नवीन
आमची कृषि कर्जे मोठी असतात, घाबरतात खाजगी बँका. देत नाय. परंतु शेअर ट्रेडिंगसाठी मार्जिन देतात. घेतो मुकाट्यानो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सरकारी बॅन्का तरी देतात का?

मुक्त विहारि
Sat, 12/04/2021 - 17:54 नवीन
बाय द वे, तुम्ही मोठे शेतकरी असल्याने, फेरारी किंवा गेला बाजार, लॅम्बाॅर्गिनी तरी असेलच आणि तुमचे कामगार ऑडी मधून येत असतील, असा अंदाज आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

विरोधाभास समजला असेल असे

आग्या१९९०
Sat, 12/04/2021 - 18:07 नवीन
विरोधाभास समजला असेल असे समजतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तेच तर समजत नाही

मुक्त विहारि
Sat, 12/04/2021 - 20:45 नवीन
जेमतेम दहावी पास शेतकरी असल्याने, अशा गोष्टी समजत नाहीत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

सरकारी बॅंका

अनिरुद्ध.वैद्य
Sun, 12/12/2021 - 16:20 नवीन
सेवा देतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

सरकारी बॅंका सेवा देतात?

सुबोध खरे
Mon, 12/13/2021 - 10:22 नवीन
सरकारी बॅंका सेवा देतात? सरकारी बॅंका जे देतात, त्याला सेवा म्हणायचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

सहमत आहे ...

मुक्त विहारि
Mon, 12/13/2021 - 17:54 नवीन
दुर्दैवाने, एका सरकारी बॅन्केत खाते आहे तिथे पुस्तक घेऊनच जातो इथेच टाका तंबू, हे गाणे गुणगुणत, पुस्तक वाचायचे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

साम्यवाद म्हणजे ....

मुक्त विहारि
Fri, 12/03/2021 - 17:21 नवीन
माझे ते माझेच आणि तुझे तेही माझेच... सगळ्या साम्यवादी लोकांना, उत्तर कोरिया मध्ये 5-6 वर्षे काम करायला पाठवायला पाहिजे ... आणि उदारमतवादी हिंदूंना सौदीत...
  • Log in or register to post comments

Communist until you get rich.

सुबोध खरे
Sat, 12/04/2021 - 10:38 नवीन

Communist until you get rich. ] Feminist until you get married. Atheist until the airplane starts falling.”

हे वाक्य बहुसंख्य उदारमतवादी दांभिक लोकांची वस्तुस्थिती दर्शवणारे आहे.
  • Log in or register to post comments

मी पूर्वी डाव्या विचारांनी

विजुभाऊ
Sat, 12/04/2021 - 16:05 नवीन
मी पूर्वी डाव्या विचारांनी प्रभावीत होतो. उदा : वारसाहक्काने सम्पत्ती मिळू नये , प्रत्येक श्रीमंतीमागे काहीतरी गैरकृत्य असतेच , श्रीमंत गरीबांची पिलवणूक करतात , प्रत्येकाला अन्न मिळालेच पाहिजे धर्म ही अफूची गोळी आहे, समाजात प्रर्त्येकजण सारखाच आहे , राष्ट्राच्या सम्पत्तीवर सर्वांचा हक्क आहे. संपत्ती म्हणजे सर्वनाश , लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरीबी चांगली वगैरे वगैरे वर माझा ठाम विश्वास होता काळाच्या ओघात यातले धर्माबाबतचे विधान सोडले तर इतर बाकी विधानांतील फोलपणा हळूहळू अनुभवाला येत गेला. कष्ट , बुद्धी यामुळे समृद्धी येते, समृद्धी मुळे चांगले जगणे जगता येते. जे गरीब आहेत त्यांच्याबद्दल वाईट वाटते पण काम न करता जगणारांबद्दल चीड येते. साधनसंपत्ती निर्माण करण्यासाठी श्रीमंती ( भाम्डवल ) हवेच हे पटत गेले. आज मी धार्मीक नाही पण इतरधर्मीयांचा कट्टरपण , शिक्षणाबद्दलची अनास्था , धर्माच्या नावाखाली काहीच न करता सर्वसामान्यांचा बुद्धीभेद करणे हे अनुभवतो. यामुळे मी डावी कडून उजवीकडे येतोय असे मला वाटते. गरीबांना गरीब ठेवण्यापेक्षा त्यांचे कष्ट बुद्धी वापरून त्यामुळे नवे भाम्डवल ( समृद्धी ) निर्माण करण्यात भांडलवदारांचे हीत आहे हे आता पटत चालले आहे. शंतनुराव किर्लोस्करांचे एक वाक्य आठवते. एखाद्या विणकराने कष्ट करून विणलेल्या रेशमी वस्त्राला कोणी विकत घेतले तर त्या विणकराचे पोट भरते. ते वस्त्र कोणी विकत घेतलेच नाही तर केवळ विणकरच नव्हे तर त्याचे कुटुंबीय आणि त्यांवर अवलंबून असणारे सर्वच जण नष्ट होतील. एक अर्थव्यवस्था उध्वस्त होईल.
  • Log in or register to post comments

धर्म ही अफूची गोळी आहे.

Trump
Sat, 12/04/2021 - 16:39 नवीन
धर्म ही अफूची गोळी आहे.
>> भारतीय धर्म आणि अब्राह्मिक रिलिजन ह्यात जमीन - अस्मानाचा फरक आहे. कार्ल मार्क्सचे ते विधान अब्राहमिक रिलिजनसाठी आहे. आणि धर्म आणि रिलिजन ह्यांच्यात फरक आहे. रिलिजन च्या जवळ जाणार शब्द आहे 'जात'. तज्ञांनी ह्यात भर टाकावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

धर्म ही अफूची गोळी आहे.

Trump
Sat, 12/04/2021 - 16:38 नवीन
धर्म ही अफूची गोळी आहे. >> भारतीय धर्म आणि अब्राह्मिक रिलिजन ह्यात जमीन - अस्मानाचा फरक आहे. कार्ल मार्क्सचे ते विधान अब्राहमिक रिलिजनसाठी आहे. आणि धर्म आणि रिलिजन ह्यांच्यात फरक आहे. रिलिजन च्या जवळ जाणार शब्द आहे 'जात'. तज्ञांनी ह्यात भर टाकावी.
  • Log in or register to post comments

ती अफूची गोळी तुम्हाला गुंगीत

विजुभाऊ
Sat, 12/04/2021 - 16:52 नवीन
ती अफूची गोळी तुम्हाला गुंगीत ठेवते. आसपासच्या इतर गोष्टींची जाण तुमच्यापर्यंत पोहोचूच देत नाही
  • Log in or register to post comments

गोळी

चंद्रसूर्यकुमार
Sat, 12/04/2021 - 16:55 नवीन
धर्म ही अफूची गोळी आहे. आहेच. पण कम्युनिझम ही अफू, चरस, गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन आणि आणखी जे काही असेल त्या सगळ्याची एकत्र करून झालेली गोळी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

नाही

प्रसाद गोडबोले
Sat, 12/04/2021 - 19:22 नवीन
धर्म ही अफूची गोळी आहे. आहेच. पण कम्युनिझम ही अफू, चरस, गांजा, ब्राऊन शुगर, कोकेन आणि आणखी जे काही असेल त्या सगळ्याची एकत्र करून झालेली गोळी आहे. :)
नाही नाही , कम्युनिझम AIDS आहे . म्हणजे ज्या देशाला , ज्या "विचारवंताला" झालाय त्याला कळतच नाही , तो बिनधास्त पसरवत रहातो , स्वतः खंगुन खंगुन मरतो अन दुसर्‍यांनाही मारतो ! अन महत्वाचे म्हणजे मेल्यावरही AIDS ने मेलो हे मान्य करत नाही उगाच न्युमोनिया अन ट्युबर किलॉसिस अन अन्य बाकीच्या इन्फेक्शन्स वर खापर फोडत रहातो ! =)))) अवांतर : बाकीच्या गोष्टींच्या नादात उगाच गांजाला बदनाम करु नका , आता तर वर्ल्द हेल्य्थ ऑर्गनायझेशन देखील गांजाला श्येलुल्ड १ ड्रग्स च्या लिस्ट मधुन हटावण्याच्या उंबरठ्यावर आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

कम्युनिझम AIDS आहे .

मुक्त विहारि
Sat, 12/04/2021 - 20:43 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बरोबर.

Trump
Sat, 12/04/2021 - 16:56 नवीन
बरोबर. भारतीय धर्मामध्ये, त्याची चिकित्सा, टिकेला पुर्ण परवानगी आहे. सावरकर स्वतः नास्तिक होते. तो आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

काही लोक उजवीकडे ->

चौथा कोनाडा
Sat, 12/04/2021 - 21:38 नवीन
काही लोक उजवीकडे -> डावीकडुन जाताना दिसतात. रामजन्मभुमी आंदोलनात सहभागी होणार्‍या काही कार्यकर्त्यांचे आत्मकथन वाचण्यात आले होते. या चळवळीतील दांभीकपणा काही वर्षांनंतर लक्षात येऊन ते दुसर्‍या प्रवाहाकडे आकर्षित झाल्याचे म्हटले होते !
  • Log in or register to post comments

रामजन्मभुमी आंदोलनात सहभागी

Trump
Sun, 12/05/2021 - 00:30 नवीन
रामजन्मभुमी आंदोलनात सहभागी होणार्‍या काही कार्यकर्त्यांचे आत्मकथन वाचण्यात आले होते. या चळवळीतील दांभीकपणा काही वर्षांनंतर लक्षात येऊन ते दुसर्‍या प्रवाहाकडे आकर्षित झाल्याचे म्हटले होते !
त्यांचेही विचार वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

इथे तो संदर्भ द्यायचा विचार

चौथा कोनाडा
Sun, 12/05/2021 - 17:27 नवीन
इथे तो संदर्भ द्यायचा विचार होताच, पण नाही सापडले. आणखी उत्खनन करून पाहतो. फेसबुकवर वाचलेले आणि मला आवडलेले चिंतन खाली देत आहे : Image removed.
  • स्वतःचे नुकसान होऊ न देता, आपण टाळलेले प्रत्येक युद्ध हे आपण जिंकलेले असते.
  • युद्धातील सर्वोत्तम विजय हा युद्ध न लढता मिळवता येतो, युद्ध लढावेच लागल्यास ते शक्य तितके मर्यादित ठेवणे व आपले उद्दिष्ट साध्य करणे हा उत्तम मार्ग असतो.
  • युद्ध हा फसलेल्या किंवा अपुऱ्या मुत्सद्देगिरीचा, त्याचबरोबर प्रतिस्पर्ध्याच्या मनात आपल्या सामरिक क्षमतेची धास्ती नसल्याचा परिणाम असतो. 
  • युद्धाची भीती हा युद्ध टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
 
  • शीतयुद्ध शितपेटीत बंद होऊन न लढताच संपले ह्याचे कारण म्हणजे त्या युद्धाची भीती.
    • युद्धामुळे चुकवावी लागू शकेल अशी किंमत वाढत जाते तसतसे शांततेची शक्यता वाढत जाते.
    • युद्ध इतिहासात देखणे असते, त्याला तिथेच ठेवावे..
    • युद्धाची आठवण अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय असेलही पण ते करतांना, त्या आधी *फसलेल्या मुत्सद्देगिरीची, राजकारणाचीही आठवण ठेवायला हवी..
    ===================================================================================== या धाग्याच्या चर्चेच्या संदर्भात हे किती लागू होते हे माहित नाही पण जेव्हा जेव्हा आस्तिक-नास्तिक, हिंसा-अहिंसा, भांडखोर-सहनशील, युद्धखोरी-शांततावादी, डावे-उजवे इ.इ, चर्चा सुरु होतात तेव्हा वरिल विचार मला हमखास आठवतात.
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: Trump

    आज हा धागा वाचला.

    शाम भागवत
    Mon, 12/06/2021 - 17:41 नवीन
    आज हा धागा वाचला. चंसूकू खूप छान मुद्दे मांडले आहेत. चर्चेच्या स्वरूपात मांडलेले मुद्दे जास्त भावतात. असे मुद्दे मांडायची संधी कधी सोडू नका. तुमचे अभ्यासपूर्ण मुद्दे मला वाचायला मिळतात या कारणासाठी मला पुरोगामी, समाजवादी आवडतात. ;)
    • Log in or register to post comments

    चंसूकू म्हणजे काय?

    Trump
    Tue, 12/07/2021 - 13:51 नवीन
    चंसूकू
    म्हणजे काय?
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: शाम भागवत

    म्हणजे

    प्रदीप
    Tue, 12/07/2021 - 14:18 नवीन
    चंद्रसूर्यकुमार हा आय. डी.
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: Trump

    जसा मी "चौको"

    चौथा कोनाडा
    Wed, 12/08/2021 - 12:36 नवीन
    जसा मी "चौको" (घ्या जाहिरात करून :-))
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: Trump

    असमान नागरी कायदा हवा!

    वामन देशमुख
    Mon, 12/06/2021 - 21:55 नवीन
    हा प्रतिवाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही. हिंदूंनी समान नागरी कायद्याचा आग्रह धरणे यावरूनच हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत हे माझे अभ्यासांती बनलेले आणि मी यापूर्वी वेळोवेळी मांडलेले मत योग्यच आहे हे दिसते. खरेतर भारतातील हिंदूंनी, अहिंदूंच्या तुलनेत हिंदूंना अधिक अधिकार देणारा असा असमान नागरी कायदा तयार करून त्याची ताबडतोब अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरायला हवा आणि तो प्रत्यक्षात येईल यासाठी तन मन धन अर्पून प्रयत्न करायला हवेत. तसे झाले नाही तर पुढच्या काही दशकांनंतर, "एके काळी या भूभागावर हिंदू नावाची एक धर्मनिरपेक्ष, सहिष्णू, शत्रूवरही प्रेम करणारी (खरंतर स्वघातक, शहामृगी, कसायाला गाय धार्जिण वृत्तीची) एक जमात राहायची" अशी आठवण देखील कुणी करणार नाही. अशक्य वाटतेय? पर्शिया नामक देशात पहिला मुसलमान आल्यानंतर शंभर वर्षांच्या आत तेथील सर्व पारशींचा समूळ नाश झाला. त्यांची आता तिथे कुणी आठवणही करत नाही.
    • Log in or register to post comments

    रंजक

    तर्कवादी
    Mon, 12/06/2021 - 23:37 नवीन
    मग तुमच्या मते हिंदूचे अधिकार काय असावेत व अहिंदूंचे काय (यात मुस्लिम, ख्रिश्चन तर आलेच पण बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल) असावेत ?
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: वामन देशमुख

    हिंदुनी ख्रिश्चनांबरोबर असा

    Trump
    Tue, 12/07/2021 - 18:59 नवीन
    हिंदुनी ख्रिश्चनांबरोबर असा व्यवहार करावा जसे ते आपल्या बरोबर करतात. हिंदुनी मुस्लिमांबरोबर असा व्यवहार करावा जसे ते आपल्या बरोबर करतात.
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: तर्कवादी

    म्हणजे नेमका कसा ? उदारहण

    तर्कवादी
    Tue, 12/07/2021 - 21:55 नवीन
    म्हणजे नेमका कसा ? उदारहण देवून सांगता येईल का ? शिवाय अहिंदू म्हणजे फक्त मुस्लिम व ख्रिश्चन नाहीत.
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: Trump

    याशिवाय

    तर्कवादी
    Tue, 12/07/2021 - 21:57 नवीन
    (यात मुस्लिम, ख्रिश्चन तर आलेच पण बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल) कोणत्याही धर्माची बांधिलकी वा धर्माचं लेबल ज्यांना अमान्य आहे असे लोक सुद्धा अहिंदूच (मग त्यांचा जन्म कोणत्याही धर्मात झालेला असू शकतो)
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: तर्कवादी

    http://www.misalpav.com

    Trump
    Tue, 12/07/2021 - 23:04 नवीन
    http://www.misalpav.com/comment/1127587#comment-1127587
    हिंदूं = जे अब्राहमिक जातीत (रिलिजनमध्ये) नाहीत ते हिंदु
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: तर्कवादी

    हिंदूं = जे अब्राहमिक जातीत

    तर्कवादी
    Wed, 12/08/2021 - 10:38 नवीन
    हिंदूं = जे अब्राहमिक जातीत (रिलिजनमध्ये) नाहीत ते हिंदु
    असं जबरदस्तीने म्हणणार का ? जो हिंदू धर्मात जन्माला आला नाही (ब अब्राहमिक धर्मातही नाही) त्याला स्वतःला हिंदू म्हणवून घेणे आवडत नसेल तरी त्याला जबरदस्तीने हिंदू म्हणणार का ?
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: Trump

    कोणी स्वतःला काय म्हणावे हा

    Trump
    Wed, 12/08/2021 - 13:26 नवीन
    कोणी स्वतःला काय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कायदेशीदृष्ट्र्या हे योग्य आहे. दुर्देवाने हिंदू शब्द भरपुर बदनाम केला गेला आहे. इतर लोक अब्राहमिक जातीत (रिलिजनमध्ये) जे मी म्हणेल तेच खरे ह्याला कंटाळुन गेली आहेत.
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: तर्कवादी

    कोणी स्वतःला काय म्हणावे हा

    तर्कवादी
    Wed, 12/08/2021 - 16:30 नवीन
    कोणी स्वतःला काय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कायदेशीदृष्ट्र्या हे योग्य आहे.
    हिंदू हा एक धर्म आहे .. ज्याला तो धर्म पाळायचा तो पाळेलच .. आणि ज्याला नाही मानायचा कायदा काय त्याला सक्तीने तो धर्म मानायला भाग पाडणार का ? इतर धर्मीच्या (पारशी, शीख, जैन, बौद्ध ई ) लोकांना जबरदस्तीने हिंदू म्हणणे म्हणजे त्या धर्मांचे स्वतंत्र अस्तित्व अमान्य करणे नाही का ? हा एका अर्थाने त्या धर्मांचा अवमान होईल.
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: Trump

    तुमची हिंदु धर्माची व्याख्येत

    Trump
    Wed, 12/08/2021 - 16:48 नवीन
    तुमची हिंदु धर्माची व्याख्येत गल्लत आहे. असो.
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: तर्कवादी

    तपशील पुढे ठरवता येतील

    वामन देशमुख
    Mon, 12/13/2021 - 14:47 नवीन
    तपशील पुढे ठरवता येतील, पण हेतू असा की हा भूभाग हिंदूंचा आहे आणि तो हिंदूंचाच राहील याची तजवीज करणे.
    मग तुमच्या मते हिंदूचे अधिकार काय असावेत व अहिंदूंचे काय (यात मुस्लिम, ख्रिश्चन तर आलेच पण बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल) असावेत ?
    उदाहरणार्थ - अहिंदूंचे अधिकार - *हिंदू धर्मात प्रवेश केल्यास (प्रवेश न करणाऱ्यांच्या तुलनेत) काही विशेष सुविधा *द्विभार्या प्रतिबंधक कायदा किमान ४९% भागीदारी हिंदूंची असेल तर अहिंदू उद्योजकाला कर आकारणीत सवलत हिंदूंचे अधिकार - *हिंदू धर्माचा त्याग करण्यास बंदी *पुरुषांनी एकाहून अधिक स्त्रियांशी विवाह करण्याची सुविधा १००% हिंदू मालकीच्या उद्योगाला कर आकारणीत सवलत * हे केवळ प्रातिनिधिक उदाहरणे आहेत आणि त्या उदाहरणांची प्रेरणा भारतातील सध्याचे कायदेच आहेत. मुळात भारतातील हिंदूंना, हिंदू म्हणून सध्या काही इन्सेंटिव्हज आहेत का? ते जाऊ द्या, भारतीय कायद्यापुढे हिंदू हे अहिंदूंच्या तुलनेत समान तरी आहेत का?
    बौद्ध, पारशी, जैन, शीख , लिंगायत ईत्यादींचाही सामावेश होईल.
    हिंदू म्हणजे कोण याची एकदा कायदेशीर व्याख्या झाली की मग त्यांचा हिंदूंत समावेश होईल असे पाहू.
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: तर्कवादी

    हिंदू म्हणजे कोण याची एकदा

    तर्कवादी
    Mon, 12/13/2021 - 17:46 नवीन
    हिंदू म्हणजे कोण याची एकदा कायदेशीर व्याख्या झाली की मग त्यांचा हिंदूंत समावेश होईल असे पाहू. जबरदस्तीने ? त्यांना व्हायचे नसले तरी ?
    • Log in or register to post comments
    ↩ प्रतिसाद: वामन देशमुख
    • «
    • ‹
    • 1
    • 2
    • 3

    लेखन करा

    लेखन करा

    मिसळपाव वर स्वागत आहे.

    प्रवेश करा

    • नवीन खाते बनवा
    • Reset your password
    मिसळपाव.कॉम बद्दल
    • 1आम्ही कोण?
    • 2Disclaimer
    • 3Privacy Policy
    नवीन सदस्यांकरीता
    • 1सदस्य व्हा
    • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
    लेखकांसाठी
    • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
    • 2लेखन मार्गदर्शन
    संपर्क
    • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
    • 2अभिप्राय द्या
    • 3संपर्क साधा
    © 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा