✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपाकरांच्या वाचनखुणा.

ट
टर्मीनेटर यांनी
Wed, 03/31/2021 - 20:10  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. पंधरा वर्षांच्या मिपाच्या यशस्वी वाटचालीत अनेक लेखक/लेखिकांनी उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, लेख, लेखमालिका लिहून मोलाचे योगदान दिले आहे. मिपावरच्या एकूण धाग्यांची संख्या आता पन्नास हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. इतक्या मोठ्या साहित्य खजिन्यात दडलेली/कालौघात विस्मृतीत गेलेली कित्येक मूल्यवान रत्ने शोधून काढून वाचणे हि नवीनच नाही तर जुन्या वाचकांसाठीही गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या एवढी कठीण गोष्ट आहे. आपल्यापैकी अनेकांना आवडलेल्या लेखनाची वाचनखूण साठवून ठेवण्याची सवय आहे तेव्हा आपली व्यक्तिगत आवड म्हणून जपून ठेवलेला हा ठेवा प्रतिसादातून लिंक रूपाने अन्य वाचकांबरोबर वाटून त्यांनाही वाचनानंदाची अनुभूती द्यावी अशी सर्व मिपाकरांना आग्रहाची विनंती सुरुवात म्हणून मी सगळ्या नाही पण माझ्या तींन वाचनखुणा खाली देत आहे. १) इब्न बतूत - भाग १ जयंत कुलकर्णी साहेबांनीं लिहिलेली १२ भागांची लेखमालिका. २) मोसाद - भाग १ कै.बोका-ए-आझम यांनी लिहिलेली १४ भागांची लेखमालिका. ३) मक्केतील उठाव १ हुप्प्या यांनी लिहिलेली ७ भागांची लेखमालिका. वरील तीनही अभ्यासपूर्ण लेख मालिका मला खूप आवडतात. अजूनही बऱ्याच वाचनखुणा आहेत त्या नंतर शेअर करतो! आता तुमची पाळी! चला तर मग आता पटापट तुमच्या वाचनणखुणा शेअर करा 🙂 आपल्या सर्वांनी प्रतिसादातून शेअर केलेल्या वाचनखुणा सूचिबद्ध करून स्वतंत्र धागा रूपाने ('मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांक) ह्या वर्षीच्या मिपा वर्धापनदिनी म्हंणजेच गणेश चतुर्थीला श्री गणेश लेखमालेच्या बरोबर प्रकाशित करावा अशी विंनंती मिपा प्रशासनास करण्याचा मानस आहे, जेणेकरून ह्या वर्धापनदिनी आपल्या सर्वांना श्री गणेश लेखमालेत नवीन लेखन आणि 'मिपा हॉल ऑफ फेम' विशेषांकात आत्तापर्यंतचे वाचकांच्या पसंतीस ऊतरलेले जुने पण दर्जेदार लेखन वाचण्याची दुहेरी मेजवानी मिळेल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
58819 वाचन

💬 प्रतिसाद (158)

प्रतिक्रिया

अफाट आहे ती मालिका

प्रचेतस
Fri, 04/02/2021 - 14:41 नवीन
हा गवि नामक इसम हल्ली लिहित का नाही हे समजेनासं झालंय. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

दास्ताए ए आवारगी..

Bhakti
Fri, 04/02/2021 - 15:45 नवीन
दास्ताए ए आवारगी.. सिनेमा पाहतेय असंच वाटल..खुपचं छान गवि!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

दास्तान.. ए.. आवरगी

ॲबसेंट माइंडेड…
Sun, 04/04/2021 - 11:13 नवीन
दास्तान.. ए.. आवरगी कथा आवडली. गवि साहेबांना एक प्रश्न विचारावासा वाटतोय. फॅाक्सीलेडी म्हणजे समंथा बाई का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - १ व २

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/02/2021 - 20:35 नवीन
जयंत कुलकर्णी यांचा धागा http://www.misalpav.com/node/12910 http://www.misalpav.com/node/12927
  • Log in or register to post comments

दोन भाग वाचले.

ॲबसेंट माइंडेड…
Mon, 04/05/2021 - 13:55 नवीन
दोन भाग वाचले. भाषा बोजड वाटल्याने ब्रेक घेतला आहे. सावकाशीने पुढचे भाग वाचीन नाहीतर सगळे डोक्यावरून जाइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

माझ्या वाचनखुणा

तुषार काळभोर
Sat, 04/03/2021 - 17:18 नवीन
मागील चार एक वर्षात वाखु साठवण्याची सवय जवळजवळ मोडलीच आहे. ज्या काही ५०-६० खुणा आहेत त्या २०१७ पुर्वीच्या. अगदी २००८ पर्यंत. त्यापूर्वीच्या पैकी, निम्म्या वाचनखुणा पाककृतींच्या आहेत. इतर धाग्यातील जे लेख आणि/किंवा प्रतिसाद वाचनीय, संग्रहणीय असतात ते साठवले आहेत. काही धाग्यातून अन प्रतिसादातून 'कसं जगायचं, कसं वागायचं, कुणी सांगेल का मला?' या प्रश्नाचं उत्तर मिळून जातं. बालगंधर्व.... भाग - २ शेवटचा... - जयंत कुलकर्णी तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१ - खेडूत भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट - प्रचेतस जागो ग्राहक जागो.... - मोदक खुशबू की दुनिया - आवडते परफ्यूम्स - वेल्लाभट चोरी करावी, आत्महत्या करावी कि निर्लज्ज व्हावे? - संदीप डांगे अफगाणिस्थान.......... - जयंत कुलकर्णी ब्रह्मांड - मराठे एक लघुकथा.....अमान - जयंत कुलकर्णी लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग दोन - टूथपेस्ट आणि ब्रशिंग - अजया एक विलक्षण अनुभव - सुबोध खरे ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये? - स्वमग्नता एकलकोंडेकर एक झुंज तणावाशी! - वेल्लाभट रेजोल्यूशन - वेल्लाभट मांडवाखालून !! - सूड आपण असं विचित्र का वागतो? - मन पुत्र व्हावा ऐसा गुंडा... - पिलीयन रायडर पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास : ०१ : प्रस्तावना - डॉ सुहास म्हात्रे निमित्त कॉफीचं - आतिवास गेटींग थिंग्स डन - डेव्हीड अ‍ॅलन - सुधीर पर बंदे अच्छे है .......... १ - सुहास.. कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध) - लाल टोपी अहो चहा घेताय ना? (कथा) - मी_देव दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा - स्पा आन्जी: शतशब्दकथा: पैला नंबर - आतिवास चला "मायक्रोसॉफ्ट एक्सेल" शिकूया.. - मोदक यु आर लेट यु फुल - मिसळलेला काव्यप्रेमी त्रागा धागा... वैताग..... - मन ४८ तास - सुबोध खरे धोबीपछाड - स्पंदना आज तो जीने की तमन्ना है........... - विजूभाऊ विजयनगरच्या साम्राज्याचा थोडक्यात इतिहास व त्याला भेट देणारे परकीय प्रवासी.-२ - जयंत कुलकर्णी मूलांची शेती....भाग १ ...तोंडओळख.. - मुक्तविहारी "......आर्जव ....." - जेनी राजा शिवछत्रपती - भवानी तलवार आणि जीवनपट ! - मालोजीराव सरस्वती-१ - शरद ग्रो अप बेब्ज..!! - गवि मनस्वी - परीकथेतील राजकुमार सौदागर - फारएण्ड मराठा लाईट इनफंट्री - भाग - १ - जयंत कुलकर्णी आय पील - विनायक प्रभू एक शृंगारीक कविता - रामदास मिपा संपादकीय - "अब और कितना गिरना बाकी है "? - भडकमकर मास्तर
  • Log in or register to post comments

त्याशिवाय

तुषार काळभोर
Mon, 04/05/2021 - 06:09 नवीन
वरील वाचनखुणा मिपावरील 'वाचनखूण साठवा' सोय वापरून केलेल्या आहेत. त्याशिवाय काही गुगल शीट मध्ये ठेवलेल्या मिपाच्या वाचनखुणा - https://www.misalpav.com/node/18782 ६) एका खेळियाने - वन ब्रिक अ‍ॅट अ टाईम ! https://misalpav.com/node/16844 विश्वचषकाचे उर्मटशिरोमणी - पुष्प तिसरे - सचिन https://www.misalpav.com/comment/564228#comment-564228 मिपावरील क्रिकेटचे उत्तम लेख https://misalpav.com/user/994/authored जे पी मॉर्गन यांचे लेखन. मुख्यत्वे खेळ. https://www.misalpav.com/user/185/authored रामदास यांचे लेखन https://misalpav.com/node/21004 एक होता राजा https://www.misalpav.com/comment/351564#comment-351564 गवि यांच्या कोकण सहलीच्या टिप्स https://www.misalpav.com/user/4013/authored आळश्यांचा राजा यांचे लेखन https://www.misalpav.com/user/3288/authored?page=1&order=comment_count&sort=asc फारएन्ड यांचे लेखन movies special https://misalpav.com/user/9199/authored जयंत कुलकर्णी यांचे सर्व लेखन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

अफगाणिस्थान.....

ॲबसेंट माइंडेड…
Sun, 04/04/2021 - 12:51 नवीन
अफगाणिस्थान..... उत्कंठावर्धक मालीकेचे पुढचे भाग नाही सापडले. लिंक्स द्याल का प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

नथ

तुषार काळभोर
Mon, 04/05/2021 - 06:08 नवीन
https://misalpav.com/node/29054
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

नथ.. खुप आवडली.

Bhakti
Mon, 04/05/2021 - 10:20 नवीन
नथ.. खुप आवडली. जबरदस्त लेखमालिका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

नथ

ॲबसेंट माइंडेड…
Mon, 04/05/2021 - 12:12 नवीन
नथ झपाटल्यासारखी एका दमात वाचुन काढली कथा. या सुंदर लेखनाचे कौतुक करावे तेवढे कमीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सौदागर

ॲबसेंट माइंडेड…
Sun, 04/04/2021 - 21:09 नवीन
सौदागर कहर आहे हे समीक्षण. वाक्या वाक्याला हसलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …

ॲबसेंट माइंडेड…
Wed, 04/07/2021 - 00:23 नवीन
तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … फार छान आहे ही मालीका. खेडुत साहेबांनी CBSE आणी ICSE वरतीही अशीच वास्तवदर्शी मालीका लिहावी अशी विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

जयंत कुलकर्णींचा फोटो

शशिकांत ओक
Sat, 04/03/2021 - 21:28 नवीन
जयंत जी नेहमी सुंदर सुंदर फोटो, लेख सादर करतात. पण कधी त्यांचा फोटो पाहण्यात येत नाही. सहज पाहता पाहता एक मिळाला... अगदी गुडघ्यावर बसून शरण आलेल्या स्थितीत महा दैत्य म्हणून जगात दरारा असलेला वाघ - इदि अमिन आपल्या पुर्ण आर्मीच्या वेषात बसलेले, त्यांच्या सह जयंतजी? सत्य साईबाबांच्या सिंहासनाच्या सभोवती... दोघांनी आपले हात साईबाबांच्या पंजात धरून आपुलकी व्यक्त करताना दादा इदी अमिन अगदी मांजर होऊन वसलेला पाहून जयंतजीं बद्दल दरारा वाढला...! त्यांना ओळखणाऱ्यांपैकी कोणी या फोटोबद्दल अधिक माहिती काढून सांगितली तर आवडेल Image removed.
मराठा लाईट इनफंट्री - भाग - १ - जयंत कुलकर्णी
  • Log in or register to post comments

????

प्रकाश घाटपांडे
Sat, 04/03/2021 - 21:44 नवीन
समजल नाहि काही??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

काही तरी गडबड वाटतेय.

तुषार काळभोर
Sat, 04/03/2021 - 21:58 नवीन
१. इदी अमीन ला भारतीय वंशाच्या (भारत - पाकिस्तान - बांगलादेश) लोकांचा तितकाच तिटकारा होता जितका हिटलर ला ज्यू विषयी होता. २. इदी अमिन भारतात आल्याचे ज्ञात नाही. ३. इदी अमीन चा मृत्यू २००३ मध्ये, अठरा वर्षांपूर्वी झाला. फोटोतील डावीकडील व्यक्ती फोटोत किमान ६५-७० वर्षांची वाटते. म्हणजे आता ८३-८८. जयंत कुलकर्णी इतक्या वयाचे नक्की नसावेत. ४. सत्य साईबाबा यांनी युगांडाच्या गुजराती वंशीय जनतेसाठी १९६८ मध्ये युगांडा ला भेट दिली होती. त्याला ही आता ५३ वर्षे होतील. फोटोतील व्यक्ती विशीतील असेल तर आता सत्तरीत असेल. पण ती व्यक्ती विशीतील वाटत नाही. आणि जयंत कुलकर्णी शतकोत्तर नक्की नसावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

करेक्ट

प्रकाश घाटपांडे
Sun, 04/04/2021 - 20:12 नवीन
करेक्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

६.

गणेशा
Sun, 04/04/2021 - 11:43 नवीन
http://misalpav.com/diwali2012/baap बाप - रामदास
  • Log in or register to post comments

बाप..

ॲबसेंट माइंडेड…
Sun, 04/04/2021 - 12:06 नवीन
बाप.. कथा खुप आवडली. हायक्लास लेखनशैली आहे रामदास साहेबांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

रामदासजींच्या या हायक्लास

चौथा कोनाडा
Mon, 04/05/2021 - 18:06 नवीन
रामदासजींच्या या हायक्लास कथेचा मी केलेला अभिवाचनाचा प्रयत्न इथे ऐकायला मिळेल. कथा : बाप ( कथावाचन / ऑडियो) : https://misalpav.com/node/47321
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

There was a problem playing

रंगीला रतन
Mon, 04/05/2021 - 18:23 नवीन
There was a problem playing this audio file असा मेसेज येतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

मला एरर नाही येत पण ॲाडीओ

ॲबसेंट माइंडेड…
Mon, 04/05/2021 - 20:10 नवीन
मला एरर नाही येत पण ॲाडीओ प्ले हेत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

हे वाक्य मी वाचन खूण म्हणून

सतिश गावडे
Mon, 04/05/2021 - 23:58 नवीन
हे वाक्य मी वाचन खूण म्हणून साठवून ठेवणार आहे, कसलं भारी वाक्य आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

Mi लिंक देताना तुमच्या

गणेशा
Mon, 04/05/2021 - 18:35 नवीन
Mi लिंक देताना तुमच्या धाग्याची आठवण आलेली.. आणि हा धागा मी नंतर देणार होतोच..पाहिल्यान्दा दोन्ही एकत्र नको द्यायला म्हणुन थांबलेलो... आणखिन करा असे प्रयोग वेळ असेल तर.. आम्ही ऐकायला तयार आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

:-)

चौथा कोनाडा
Tue, 04/06/2021 - 17:19 नवीन
धन्यवाद गणेशा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

रंगीला रतन, ॲबसेंट माइंडेड ..

चौथा कोनाडा
Mon, 04/05/2021 - 20:29 नवीन
रंगीला रतन, ॲबसेंट माइंडेड ... थोडा वेळ लागतो, मग ऑडियो बार दिसायला लागतो आणि मग प्ले होईल किंवा चित्रात दाखवलेले पॉपअप बटन (उजव्या बाजुस वर) क्लिक केल्यास नविन टॅब मध्ये ऑडियो प्ले होईल. Image removed.

प्लिज प्रयत्न करा अन सांगा, (माझ्या इथे प्ले करायला काहीच अडचण येत नाहीय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

नविन टॅब मध्ये वरील प्रमाणे

ॲबसेंट माइंडेड…
Mon, 04/05/2021 - 20:44 नवीन
नविन टॅब मध्ये वरील प्रमाणे एरर येतोय आणी डाउनलोडचा ॲाप्शन येतो. पण डाउनलोड होत नाही आणी प्ले पण होत नाहीये. तुम्ही गुगलचे तुमचे लॅागीन नसलेल्या डीव्हाइसवर तपासुन बघा एकदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

अ‍ॅमा, गुगलचे लॅागीन नसलेल्या

चौथा कोनाडा
Tue, 04/06/2021 - 17:18 नवीन
अ‍ॅमा, गुगलचे लॅागीन नसलेल्या डीव्हाइसवर तपासुन पाहिले, प्ले होतेय. गणेशा म्हणतोय त्या प्रमाणे "थोडावेळ थांबल्यावर mp३ player बार येतो " तुमच्या इथे वेगळा इश्यू असावा, तपासून पहायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

मला error येत नाही आणि play

गणेशा
Mon, 04/05/2021 - 21:09 नवीन
मला error येत नाही आणि play पण होते आहे.. थोडावेळ थांबल्यावर mp३ player बार येतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

७.

गणेशा
Sun, 04/04/2021 - 12:21 नवीन
७. https://misalpav.com/node/15493 एका हरंण्याची गोष्ट - नीधप ( लेख लिहितोय सो आता वाचली नाही.. सन्ध्याकळी वाचेल पुन्हा)
  • Log in or register to post comments

एका हरण्याची गोष्ट

ॲबसेंट माइंडेड…
Sun, 04/04/2021 - 13:38 नवीन
एका हरण्याची गोष्ट वा. कमाल लिहीतात या नीधप. त्यांची वाचलेली ही दुसरी कथाही आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

या

प्रसाद_१९८२
Sun, 04/04/2021 - 20:23 नवीन
धाग्याच्या निमित्ताने बरेचशे माहितीपूर्ण लेख वाचायला मिळाले, जे आधी वाचले नव्हते. --- हा धागा काढल्याबद्दल, धागालेखकाचे आभार.
  • Log in or register to post comments

८.

गणेशा
Mon, 04/05/2021 - 00:32 नवीन
http://misalpav.com/node/16063 चल चांदण्यात जाऊ.. अरुण मनोहर हि माझ्या आवडत्या कथेपैकी एक कथा..चित्रदर्शी कथा..
  • Log in or register to post comments

चल चांदण्यात जाउ...

ॲबसेंट माइंडेड…
Mon, 04/05/2021 - 14:20 नवीन
चल चांदण्यात जाउ... कथा चागली आहे पण आवडली असे म्हणता येत नाही. संमिश्र भावना आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

एक नंबर धागा!

रंगीला रतन
Mon, 04/05/2021 - 12:31 नवीन
एक नंबर धागा! मोसाद वाचली आहे. बाकीचे सर्व वाचायला किती दिवस लागतील या विचारात पडलोय :)
  • Log in or register to post comments

वाचत रहा

मुक्त विहारि
Mon, 04/05/2021 - 16:52 नवीन
मिपा, आयुष्यभरासाठी चिकटलेले व्यसन आहे ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रंगीला रतन

बरोबर आहे मु वि साहेब !

चौथा कोनाडा
Mon, 04/05/2021 - 17:56 नवीन
बरोबर आहे मु वि साहेब !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मिपा, आयुष्यभरासाठी चिकटलेले

रंगीला रतन
Mon, 04/05/2021 - 18:11 नवीन
मिपा, आयुष्यभरासाठी चिकटलेले व्यसन आहे .... +१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मिपाचे, मिपागीत ....मोकलाया दाहि दिश्या

मुक्त विहारि
Tue, 04/06/2021 - 03:18 नवीन
https://misalpav.com/node/6332
  • Log in or register to post comments

मोकलाया दाहि दिश्या

ॲबसेंट माइंडेड…
Tue, 04/06/2021 - 09:23 नवीन
हरे राम. परवा याच कवींची प्राणिपात कोटि कोट ही कवीता वाचली होती. आज मोकलाया दाहि दिश्या वाचली. अत्युच्च विनेदी टायपिंग आणी सवाई विनोदी प्रतिक्रीया वाचुन दिवसाची सुरूवात प्रसन्न झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

९.

गणेशा
Tue, 04/06/2021 - 11:43 नवीन
आता थोड्या अलीकडच्या काळातील आवडत्या धाग्यांच्या ज्या वाचनाखुणा केलत्या त्या देतो.. धग.. http://misalpav.com/node/46931 - रातराणी.. अलीकडच्या काळात मला ४- ५ कथा खुप आवडल्या होत्या.. त्यातील रातराणी ने लिहिलेली हि कथा खुपच मनाला स्पर्श करून जाते..
  • Log in or register to post comments

धग

ॲबसेंट माइंडेड…
Tue, 04/06/2021 - 12:17 नवीन
धग सुरेख कथा. हस्तीदंती मनोरऱ्यात बसुन सामाजीक समस्यांवर लिहीणाऱ्या लोकांचा दांभीकपणा लेखीकेने छान उलगडुन दाखवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

तुम्ही वाचत आहात, म्हणुन

गणेशा
Tue, 04/06/2021 - 12:27 नवीन
तुम्ही वाचत आहात, म्हणुन वाचनखुणा देण्यास छान वाटत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

तुम्ही देत रहा मी वाचत आहे.

ॲबसेंट माइंडेड…
Tue, 04/06/2021 - 12:34 नवीन
तुम्ही देत रहा मी वाचत आहे. मालीका नंतर वाचेन आधी कथा,लेख वाचुन घेतो. खुप काही चांगले वाचायला मीळतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

धग ..मन स्पर्शुन गेली

Bhakti
Tue, 04/06/2021 - 16:55 नवीन
धग ..मन स्पर्शुन गेली.त्यामुळे मला आज माझी "मोबाइलची शाळा " ही लॉकडाऊनवर गोष्ट आठ्वली.मिपावर देणार नव्हते,पण आता दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

१०.

गणेशा
Tue, 04/06/2021 - 11:46 नवीन
http://misalpav.com/node/46922 आरसा - बिपीन सांगळे. आरसा हि सुद्धा अलीकडे मिपावर लिहिलेली एक उत्क्रुष्ट माझ्या आवडीची कथा आहे.. मस्त.. अदा बेगम आजच वाचायला घेतो आहे नुकतीच आलेली..
  • Log in or register to post comments

आरसा

ॲबसेंट माइंडेड…
Tue, 04/06/2021 - 13:56 नवीन
आरसा कथेतला कल्पनाविलास आवडला. आणि तिथे काय मिळत नाही ? एकदा तर रेल्वेचं अख्खं इंजिन आलेलं विकायला. या वाक्याला हसु आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

आता आणखिन एक best कथा देतो

गणेशा
Tue, 04/06/2021 - 14:04 नवीन
आता आणखिन एक best कथा देतो अलीकडची.. आणि पुन्हा आपण जुन्या कथा कडे वळूयात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर

आरसा भारीच आहे !

चौथा कोनाडा
Tue, 04/06/2021 - 22:28 नवीन
आरसा भारीच आहे ! बेगम अदा पण वाचत आहे. बिपिन सांगळे झकासच लिहितात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

काल बऱ्याच येथील कथा वाचल्या.

मोगरा (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 04/10/2021 - 15:19 नवीन
काल बऱ्याच येथील कथा वाचल्या. त्यात धग(आधी वाचली होतीच), आरसा, काटेकोरंटीची फुले आणि बोहेमियम रॅप्सडी ह्या जास्त आवडल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा