सध्या खंडोबाची षष्ठी सुरु आहे.त्यानिमित्याने हा प्रश्न सुचला आहे.
एखाद्या घराण्याचे कुलदैवत कसे ठरवले गेले असेल? कारण कुलदैवतं ही ठरविक आहेत.शिवाय काहीजणांची कुलदैवतं ही पिढ्यानपिढ्या ज्या ठिकाणी ती कुटूंबं रहात आलेत त्या ठिकाणापासून बर्यापैकी लांब अंतरावर अाहेत.अगदी उस्मानाबाद पर्यंत कर्नाटकातील बदामीची बनशंकरी कुलदैवत असणारी घराणी आहेत;किंवा मंगसुळीचा खंडोबा हे मध्य महाराष्ट्रात राहणार्या लोकांच कुलदैवत आहे.जेजुरीचा खंडोबा कर्नाटकातल्या लोकांचं कुलदैवत आहे,विदर्भातल्या लोकांचं आहे.अनेक कोब्रांचं कुलदैवत मराठवाड्यात आंबेजोगाई इथं आहे.
आज दळणवळणाच्या चांगल्या सोयींमुळे जरी ही अंतरं खुप लांब वाटत नसली तरी शेकडो वर्षांपूर्वी ही सहजसाध्य नसतील.
साधारणपणे आपल्याला ज्या ठिकाणी सहज जाता येईल असे कुलदैवत कोणीही ठरवेल ना?त्या निमित्याने लांबचा प्रवास घडावा अशी इच्छा असं जरी समजलं तरी तो प्रवास पूर्वी बैलगाडीतून व्हायचा.म्हणजे अंगाची बरीच मोडतोड करुन लांबचा प्रवास करण्याची ही सोय(?) का करुन ठेवली असेल?
मराठवाड्यातल्या बर्याचशा देशस्थांचं कुलदैवत मंगसुळीचा खंडोबा असेल तर एवढ्या लांबचं कुलदैवत का निवडलं असेल? हे सगळे लोक पूर्वी मंगसुळी किंवा अासपासच्या प्रदेशात रहात असण्याची शक्यता किती? कोकणात राहणार्या कितीतरी कोब्रांची कुलदेवता मराठवाड्यात का असावी? कोकणातच का असू नये?झाडून सगळे कोब्रा आंबेजोगाईच्या परिसरात तर राहत असणं शक्य नाही.मराठवाड्यात अन्नधान्य भरपूर कोकणाच्या तुलनेत.मग समृध्द भाग सोडून कोकणात का जातील?
कोल्हापुरातल्या काही देशस्थांची कुलदेवता तुळजापूरची तुळजाभवानी आहे.गावातच अंबाबाई असताना तुळजाभवानी कुलदेवता म्हणून का स्विकारली असेल?
ही कुलदैवतं कशी ठरवली गेली असतील? याबद्दल कोणी कुठे वाचलंय का?काही माहिती आहे का?
वर्गीकरण
वाचने
7388
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुणाकडे 'भारतीय संस्कृतीकोश
अजून जराशी धागा जाहीरात
In reply to कुणाकडे 'भारतीय संस्कृतीकोश by माहितगार
हे बहुतेक शिवाजीच्या /
कुलदैवत संकल्पना ऋग्वेदीय
In reply to हे बहुतेक शिवाजीच्या / by कंजूस
कंकाका, आयडिया वाईट नाही.
In reply to हे बहुतेक शिवाजीच्या / by कंजूस
विषय रोचक आहे. अशा दृष्टीने
माझ्या माहितीनुसार वेगवेगळे
एक जरा ताणलेली कल्पना अशी की
शक्यता असू शकतात
In reply to एक जरा ताणलेली कल्पना अशी की by गवि
पोर्तुगिजांच्या जाचामुळे
In reply to शक्यता असू शकतात by माहितगार
रा ची ढेरे यांची पुस्तके