Skip to main content

चर्चा:-देव-धर्म-कर्मकांडे

कुलदैवत!

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 12/12/2018 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या खंडोबाची षष्ठी सुरु आहे.त्यानिमित्याने हा प्रश्न सुचला आहे. एखाद्या घराण्याचे कुलदैवत कसे ठरवले गेले असेल?

तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय?

लेखक आनन्दा यांनी शुक्रवार, 19/01/2018 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच दिवस हा धागा काढायचा होताच, पण यनावालांच्या धाग्यावर उठणारी राळ बघून प्रकर्षाने काढावासा वाटला.. तुमची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची व्याख्या काय? माझ्या दृष्टीने श्रद्धा म्हणजे एखादी गोष्ट अजून सिद्ध व्हायची आहे, पण तरीही मला वाटते की ते अस्तित्वात आहे, मी एक उदाहरण देतो... डार्विन ने एक सिद्धांत मांडला, त्याचे नाव उत्क्रांतीवाद.. तो बराच काळ असिद्ध होता.. पण तर्काच्या पातळीवर लोकांना पटत होता, त्यामुळे लोक त्यावर श्रद्धा ठेवत होते.

मानवी ज्ञानभांडार

लेखक यनावाला यांनी मंगळवार, 02/01/2018 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी ज्ञानभांडार: यनावाला पृथ्वीवरील चराचर सृष्टी निसर्गनियमांनुसार निर्माण झाली आहे. सर्व नैसर्गिक घटना या नियमांनुसारच घडतात. हे निसर्गनियम कोणी बदलू शकत नाही. त्यांचे अतिक्रमण म्हणजे उल्लंघन कोणी करू शकत नाही. मात्र हे निसर्गनियम शोधून काढण्याची क्षमता मानवी बुद्धीत आहे. हे निसर्गनियम सर्व ठिकाणी, सर्वकाळी सारखेच असतात. भौतिकी, रसायन, जीवशास्त्र, अशा विविध ज्ञान क्षेत्रांतील संशोधकांनी अथक प्रयत्‍न करून अनेक निसर्गनियम शोधले. त्या नियमांची सत्यासत्यता ठरविण्यासाठी वैज्ञानिक पद्धत विकसित केली . तदनुसार हे नियम तपासले. पुन:पुन्हा पडताळले.