मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
2 Sep 2014 - 7:32 pm
गाभा: 

मिपा नोड क्र. 28707 अन्वये समीरसूर यांचा मंदिर काढा.. एका प्रस्तावावर चर्चा चालू आहे. धार्मीकस्थानांच्या मर्यादांबद्दल त्या चर्चेत उमटणार्‍या सूरांपेक्षा माझा सूर काही निराळा असतो असे नाही. पण त्याचवेळी चुकत माकत का असेना भारतीय मंदिरांनी स्थानिक संस्कृतींच्या वैवीध्यपूर्ण जोपासनेत मोलाचा हातभार लावला आहे. अर्थात भारतात नवीन मंदिरे बनवण्यात फारसे काही नवीन साधेल असे नाही. माझा मंदिर काढण्याचा प्रस्ताव गंभीर असला तरी तो भारतात मंदिर काढण्याबद्दल नाही तर भारतीय उपखंडाबाहेर पुरेशी धार्मीक सहीष्णूता असलेल्या देशांमध्ये तिथल्या चांगल्या स्थानीक परंपरांचा दैवतांचा आणि जनतेचा आतंर्भाव करून चांगली स्वच्छ आणि जातीयता विहीन, वर्णवाद विहीन, उच्च नीचता विहीन मंदिरे उभारण्याचा विचार जरूर केला जावयास हवा असे वाटते. भारतीय तत्व़ज्ञानातील जातीयता विहीन, वर्णवाद विहीन, उच्च नीचता अंधश्रद्धा अस्वच्छता इत्यादी पाने वगळून इतर साहित्य तेथे उपलब्ध करावे.

अशी मंदिरे खासकरून उंच टेकड्यांवर बांधणे चांगले म्हणजे सर्व साधारण पणे विध्वंसक प्रवृत्ती पासून अधीक सुरक्षीत असू शकतील.

एक प्रस्ताव असाकी टेकड्यांवर मंदिर बांधू देतील असे देश माहित असल्यास तेथील लोकपरंपरांवर आधारीत शिवमंदिरे (शिवमंदिर का तर त्याच्या मूर्त असतानाच अमुर्त फॉर्म बद्दलचा माझा व्यक्तीगत सॉफ्ट कॉर्नर)

(अर्थात हा प्रस्ताव लिहितानाच मी व्यक्तीगत स्तरावर क्षणागणिक आस्तीक ते नास्तीक नास्तीक ते आस्तीक असा बदलत असतो त्यामुळे प्रस्तावावरुन कृपया माझ्या व्यक्तीगत मतांचा आदमास लावण्याचा प्रयत्न करुन शिक्के मारु नये ही नम्र विनंती)

प्रतिक्रिया

काय कळ्ळ नाय बुवा .बाकी

मीच पयला (कायम)

कंजूस's picture

2 Sep 2014 - 8:24 pm | कंजूस

विडंबन /विरोधी पक्ष /श्रेयलाटूपणा नक्की काय ?

माहितगार's picture

2 Sep 2014 - 8:43 pm | माहितगार

दुर्दैवाने उपरोक्त आपण निर्देशीत करु इच्छिता त्या तिन्ही पैकी एकही उद्देश नाही.

बहाई टेंपल सारखं देऊळ उभं करावं आणि तिथे कोणत्याच देवाचं किंवा धर्माचं अधिष्टान नसावं. अर्थात अशा देवळात 'देऊळ' म्हणून कोणी येणार नाही. फार फार तर पर्यटक येतिल.

विकास's picture

2 Sep 2014 - 8:39 pm | विकास

संयुक्त राज्य अमेरीकेत ४००+ हिंदू मंदीरे आहेत. त्या व्यतिरीक्त कॅनडात आहेत ती वेगळी. आमच्या जवळच्या गावात एक चर्च विकायला काढले होते. ते आपल्या (प्रामुख्याने) गुर्जर बंधूंनी विकत घेतले आणि "मंदीर यही बनाएंगे" केले. ;) मराठी माणसे प्रामुख्याने देवळात जास्त इन्व्हॉल्व्ह नसतात.

रामकृष्ण मठाच्या स्वामी परमानंदांनी १९१० साली बॉस्टनमधे वेदीक सेंटर चालू केले, ते अमेरीकेतले पहीले हिंदू मंदीर समजले जाते. आज देखील तेथे (चर्च स्टाईल मधे) रविवारी कार्यक्रम असतो. ज्यात आत्ताच्या स्वामींचे प्रवचन असते, आरती असते. बर्‍याचदा तेथे जास्त करून अभारतीय, गोरे अमेरीकन्स असल्याचे पाहीले आहे.

गेल्या काही दिवसात ऐकले आहे की स्वामी नारायण संस्थेने न्यूजर्सीत जगातले सगळ्यात मोठ्ठे स्वामी नारायण मंदीर बांधले आहे. (बरोबर आठवत असेल तर १४० एकर्स). तेथे ते इतर शिक्षणापासून ते आरोग्यसेवे पर्यंतच्या सुविधा पण चालू करत आहेत.

मला वाटते जॉर्जियात एका माणसाने देवळाच्या नावावर मिलियन्स $$ गोळा करून अफरातफर केली आणि आता अटकेत आहे का अटकेच्या मार्गावर आहे. आपली माणसे या देशात देखील व्हाईट कॉलर अफरातफरी (उदा. मेकँझीचे जुने बॉस, रजत गुप्ता) ते धार्मिक अफरातफरी मधे पुढे आहेत! ;)

तुम्ही येथे शिवमंदीर म्हणालात म्हणूनः हवाईस "सद्गुरू शिवया सुब्रम्हण्यम स्वामी" नामक गोर्‍या अमेरीकन स्वामींनी आणि त्यांच्या संस्थेने काढलेले हवाईचे शिवमंदीर बघण्यासारखे आहे असे म्हणतात. खालील देवळाचे अजून बांधकाम पूर्ण होयचे आहे...

Shiva Temple

माहितगार's picture

2 Sep 2014 - 8:50 pm | माहितगार

सुरेख आणि छान. अर्थात धागा लेख लिहिताना माझ्या डोळ्या समोर अद्याप भारतीय खूप प्रमाणात गेले नाहीत असे दक्षीण आमेरीका, आफ्रीका इत्यादी खंडातील देश आणि ज्युडायिक धर्मपरंपरांच्या पुर्वीच्या परंपरा आणि स्वतःच्या परंपरा जपणार्‍या समुदायांशी नाळ जुळवणे असा (अलिखीत) दृष्टीकोणही आहे.

आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

विकास's picture

3 Sep 2014 - 1:04 am | विकास

अफ्रिका आणि द. अमेरीकेतला काही भाग असा आहे की जिथे हिंदू पिढ्यान् पिढ्या रहात आहेत... तिथे मंदीरे दिसतात. तरी देखील त्यातील एक त्या मानाने अनोळखी ठिकाण असलेल्या भागातील एक देऊळ...
Victoria Hindu Temple, Mahé, Seychelles:
Hindu Temple

तसेच द. अमेरीकेतील सुरीनाम येथील एक देऊळः (त्याचा कळस बघा! :) )

Surinam Hindu Temple

पैसा's picture

2 Sep 2014 - 9:12 pm | पैसा

पण सहसा सगळ्याचे व्यापारीकरण केले जाते. इथे एका योग शिकवणार्‍या संन्याशाने आश्रम उभा केला, तिथे ते कलकत्त्याहून येऊन दर वर्षी योगासने, क्रियायोग शिकवत असत. ते इथे नसताना आश्रमाची व्यवस्था बघण्यासाठी त्यांनी स्थानिक लोकांची एक कमिटी तयार केली होती. आश्रमाची जमीन आणि इमारत वगैरे रजिस्टर्ड ट्रस्टच्या नावे केले होते, मात्र पैसे स्वामीजींनीच गोळा केले होते.

स्वामीजी भयंकर फटकळ असल्याने कमिटीच्या सदस्यांबरोबर त्यांचे पटेनासे झाले. तसेच कमिटीच्या लोकांचे उद्देश योगाचा प्रसार करणे हे दुय्यम आणि इतर व्यापारीकरण प्रमुख असे होते. अखेर कमिटीने स्वामीजींना इकडे यायला बंदी घातली. आता ही कमिटी आश्रम चालवण्यासाठी त्यांचे ऐकेल अशा कळसूत्री स्वामीजीच्या शोधात आहे असे ऐकले! =))

काही वर्षांपूर्वीची गोष्टः आमच्या इथे (बॉस्टनच्या जवळपास) एक असाच संन्यस्त बाबा होता. त्याचे नाव क्रिपालू. त्याने अमेरीकेतील सगळ्यात मोठे योगा सेंटर काढले. त्याला त्यांनी "रिलिजिअस ऑर्डर" (मला वाटते म्हणजे "पंथ") ही संज्ञा प्राप्त करून घेतली. त्याला अनेक (गोरे) फॉलोअर्स होते. सगळेजण या क्रिपालू बाबांकडून सेलीबसीची (ब्रम्हचर्य व्रताची) दिक्षा घेऊन मनापासून पाळायचे. हे महाराज या साठी ८०च्या दशकात $३५०,००० ते $४५०,००० इतके वार्षिक उत्पन्न घेयचे! मग एक दिवस भांडे फुटले. बाकीचे सेलीबसी पाळताहेत आणि हे त्यातील काहीजणींबरोबर खाजगीत सेलिब्रिटी होत आहेत! ;)
त्यातील प्रामाणिक योगा करणार्‍यांना धक्का बसला. असे ऐकले आहे, की हे महाशय चांगले बोलू शकत आणि प्रवचन देऊ शकत. म्हणून लोकांचा विश्वास होता त्याचाच विश्वासघात झाला. त्यात भर नंतर बाहेर आले की हे त्या सेंटरच्या कर्मचार्‍यांचे पैसे देत नसत. (रहाण्यास जागा देत आणि फुकटचे काम करून घेत... असे काहीसे). मग तुरूंगाची हवा लागू शकते हे समजल्यावर आउट ऑफ कोर्ट $२.५ मिलियन्सला प्रकरण मिटवले.

जे सेंटरमधे नेमाने येत असत त्यांना ते या एका गोष्टीमुळे सोडावेसे वाटले नाही की योगसाधना भ्रष्ट अथवा चुकीची वाटली नाही. म्हणून त्यांनी त्यातील रिपिजिअस ऑर्डर प्रकरण काढून टाकले आणि एक सेक्यूलर संस्था म्हणून योगसाधाना नविन कमिटी आणून चालू ठेवली.

जगात करण्यासारखं आणि बांधण्यासारखं अजून इतरही बरंच काही आहे. हेच कशासाठी?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2014 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

कमीत कमी श्रमात जास्तित जास्त पैसे ! शिवाय धार्मिक कार्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर मिळकत कर नसतो ! अजून काय पाहिजे आहे ?! :)

एस's picture

2 Sep 2014 - 11:50 pm | एस

पैशांसाठी हेच का? त्याचे दुसरेही बरेच मार्ग आहेत. आणि फक्त पैसे हाच उद्देश का ठेवावा? त्याला जगणे म्हणता येईल का? कितपत? कुठल्या निकषांवर? निकष आणि निष्कर्ष यांच्या परस्परसंबंधांची योग्यायोग्यता कशी आणि कुणी ठरवायची?

कवितानागेश's picture

3 Sep 2014 - 9:40 am | कवितानागेश

हे बरोबरच आहे.
पण पैशाचीसुद्धा एक नशा असते, ती नकळत येत जाते. त्यापासून वाचणं फार कठीण आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2014 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे तुमचं मत झालं. पण "जगात सगळ्यांची मतं सारखी ... आणि स्वच्छ असतात" असं म्हणणं वास्तवाला धरून होईल का ?

एस's picture

3 Sep 2014 - 1:15 pm | एस

हे स्वत:ला कळत्या वयापासून विचारत आलोय. तुमच्याबरोबर शेअर केले कारण तुम्ही आमच्यासारखेच वाटत आलात म्हणून. सगळ्यांची मतं आणि मूल्यसंस्था सारखी व स्वच्छ नसतीलच. पण म्हणून आपण स्वतःला कितपत अधःपतित होऊ द्यायचं हा मूलभूत प्रश्न मला सतत भेडसावत राहतो.

आय ट्रूली बिलिव्ह दॅट वुइ ऑल हॅव चॉइस. प्रश्न केवळ योग्य निवड करण्याचे धाडस दाखवण्याचा असतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2014 - 1:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

लैच सिरेस झालात ! इथे मूळ लेखापासून शेवटच्या प्रतिसादापर्यंत उपहासच उपहास भरलाय... आणि दुर्दैवाने त्याला सद्य वस्तूस्थिती कारण आहे !!

"या लेखावरच्या प्रतिसादातील मते ही प्रतिसादकाची खरी वैयक्तीक मते असतीलच असे नाही."
(आता तरी गैरसमज टळावा :) )

एस's picture

3 Sep 2014 - 3:23 pm | एस

मिपावर शिरेसनेस होन्यात काय अर्थ नाय ह्ये खरं हाय... :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2014 - 5:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

तसं नाय काय ! उपहासामागेसुध्द्दा लय शिरेसनेसपना असतुया. व्यंगाचा उपयोग समाजाच्या व्यंगावर हसरे बोट ठेवण्यास उत्तम उपयोग होतो. मात्र, समाजात खूपच व्यंगे असली तर तो असे व्यंगलिखाण/चित्रे केवळ विनोद समजून हसून विसरून जातो, हे एक दुर्दैवी सत्य आहेच म्हणा.

कवितानागेश's picture

2 Sep 2014 - 11:56 pm | कवितानागेश

हे सिरियस असेल तर 'जिथे काहीही, कुठल्याही स्वरुपातली देणगी ठेउन घेतली जात नाही', असं उपासना मंदीर चालू करावं..

श्रीरंग_जोशी's picture

3 Sep 2014 - 12:25 am | श्रीरंग_जोशी

ऑनलाइन का असेना, आपलं मिपा यापेक्षा वेगळं काय आहे :-).

अजय देशपांडे's picture

3 Sep 2014 - 12:23 am | अजय देशपांडे

वेरुल जवळ असेच एक मारुति चे देवूळ आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Sep 2014 - 9:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि या मंदिराचं काय वैशिष्ट्ये ?

-दिलीप बिरुटे

ते खुल्दाबादचं भद्रा मारुती म्हणायचंय वाट्टं त्यांना.
बाजार आहे हो तिकडे.

अजय देशपांडे's picture

3 Sep 2014 - 11:20 pm | अजय देशपांडे

हो तेच प्रचंड पैसा आहे व जमीन खुप मोठी जागा व्यापली आहे हायवे ट्च

धन्या's picture

3 Sep 2014 - 5:10 pm | धन्या

झोप्या मारुती असावा. ;)

इरसाल's picture

3 Sep 2014 - 10:03 am | इरसाल

मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा यांवर टॅक्स लावायला सुरुवात केली तर.

दादानूं टॅक्स लावला जातोच त्यावर.

माम्लेदारचा पन्खा's picture

3 Sep 2014 - 1:01 pm | माम्लेदारचा पन्खा

फायदे बरेच होतील… एक म्हणजे मिपाच्या मेम्ब्रांना कायमचा कट्टा मिळेल. मंदिरात येणारा विविध प्रसाद 'स्वाहा' करण्याचे काम योग्य त्या लोकांना मिळेल.तिथे कारखान्यासारख्या शिफ्ट डूट्या लावू… बेरोजगारांना काम मिळेल …. रोजगारी लोकांना अर्थार्जनाची नवीन संधी उपलब्ध होईल ….सर्वात महत्वाचे म्हणजे सगळ्यांच्या पुढच्या ७ पिढ्या बसून खाण्याची सोय होईल.

नाहीतरी ह्या देशात फक्त राजकारणी,गुंड,चलती असलेल्या मंदिरांचे ट्रस्टी आणि साधू संन्याशीच आरामात जगू शकतात …. बाकीचे शहाण्यासारखे सरळ देश सोडतात…. ज्यांना काहीच जमत नाही (म्हणजे अस्मादिक ) ते इथे सुखाने जगायची आशाच सोडून देतात….

देश कशाला सोडायचा? गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके वाचून तुम्हीही प्रवचन दयायला सुरुवात करा. हाय काय आनी नाय काय.

प्यारे१'s picture

3 Sep 2014 - 5:38 pm | प्यारे१

तेवढी एकच माहितीये काय रे? ;)

प्रसाद गोडबोले's picture

3 Sep 2014 - 5:43 pm | प्रसाद गोडबोले

गीता प्रेस गोरखपूरची पुस्तके

गीताप्रेसची सगळीच पुस्तके वाईट नसतात .... केवळ एका प्रवचनकाराच्या पुस्तकाचा अनुभवावरुन जनरलायझेशन करु नये व गीताप्रेसला बदनाम करु नये ही णम्र इणंती !! *stop*

प्यारे१'s picture

3 Sep 2014 - 6:37 pm | प्यारे१

आणुमोदण!

प्रसाद गोडबोले's picture

3 Sep 2014 - 5:45 pm | प्रसाद गोडबोले

मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव

ह्म्म...मंदिर ...माहितगार तुमची जात काय हे जर इथे सांगितलेत तर किमान २०० प्रतिसाद सहज स्कोर कराल *biggrin*

प्रसाद गोडबोले's picture

3 Sep 2014 - 5:49 pm | प्रसाद गोडबोले

ऑन अ सीरीयस नोट

>>> पांडुरंगाचे एक सुंदर मंदीर... अगदी जुन्याकाळी पंढरपुरचे असेल तसे ... बांधावे अशी माझी फार इच्छा आहे तिथे विठ्ठलाची अगदी सेम तशीच मुर्ती असावी अन पुर्वीच्या काळी जशी विठ्ठलाला गळाभेट देता यायची तशी परत एकदा गळा भेट देता यावी !!

क्षेमालागी जीव उतावीळ माझा | म्हणऊनी स्फुरताती बाहु |
क्षेम देवु गेले तव मीची मी एकली | आसावला जीव राहो ||

*i-m_so_happy*