मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साकल्यसूक्त

मितान · · जे न देखे रवी...
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!

वाचने 39733 वाचनखूण प्रतिक्रिया 136

In reply to by पिशी अबोली

अशा उकळत्या पाण्यासारख्या भावनांची त्या झुरळाच्या संकल्पनेशी ओळख झाली की अशी नवीन रसाची पाकसिद्धि होणे साहजिकच आहे. ही बहुतेक चिनी पाकृ असावी ;)

In reply to by पिशी अबोली

@
पूर्णत्वाची आस असणे, त्यासाठी एवढा सारा पसारा मांडणे आणि नंतर त्यातील फोलपण लक्षात येणे, म्हणजे कायमचीच अतृप्ती. अशा उकळत्या पाण्यासारख्या भावनांची त्या झुरळाच्या संकल्पनेशी ओळख झाली की अशी नवीन रसाची पाकसिद्धि होणे साहजिकच आहे. अमूर्त अशा संकल्पनांची तेवढीच कुठेशी अमूर्त तर कुठेशी त्या झुरळाइतकीच मूर्त अशी ही अभिव्यक्ती मनाला स्पर्शून गेली.
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing021.gif

साकल्याने विचार केल्यावरच समजते ते साकल्यसुक्त. तसे न केल्यास ते नुसतंच सुकतं... सुकून सगळा रस निघुन गेल्यावर रसभंग होणारच. सो, कल्ला न करता सुमडीत रसास्वाद घ्या, भोहो :)

विशाखा पाटील Sun, 12/06/2015 - 14:08
अहाहा! काय ती काव्यप्रतिभा! केवढं 'अर्थपूर्ण' काव्य... ही कविता आणि वाचकांच्या प्रतिक्रिया समिक्षेतली 'reader's response theory' अभ्यासण्यासाठी उत्तम उदाहरण ठरेल. पुढची कविता कधी पाडतेयेस, सॉरी करतेयेस?

कधीकधी उन्मुक्त आणि प्रच्छंन्न आनंदाच्या, एखाद्या उन्मादामधे, तिव्र मध्यमलयीत, धावणार्‍या आपल्या मन्श्वाच्या आयाळीच्या, गर्द गुंतवळ्यामधुन, एका बेसावध क्षणी, आपण अचानक आपल्या मनीच्या गुढगर्भ डोहात, उघड्या डोळ्यांनी फेकले जातो आणि आपल्याच मनःसागरात असलेल्या अमर्याद व अनंत अशा आर्याष्टाङ्गमार्गाच्या तेजाने आपण उजळुन निघतो आणि मग परमेश्वराच्या त्या सन्धावेणिके पुढे आपण नतमस्तक होतो. तसा काहिसा अनुभव हे अपराधभञ्जनस्तोतत्र वाचल्यानंतर प्रवाचकांना येतो. लघुखट्विके मधे उत्तेजक रस प्राशन करत असताना, मक्षीकाप्रपात झाला, तर आपण जसे उव्दीग्न होतो, तशी काहीशी वैचक्षण रसानुभूती आपल्याला मधली काही कडवी वाचताना आली, तरी एकंदर हा अनुभव आपल्या अंतरात्म्याच्या अत्यंत निकटतम असलेल्या त्या सहृद आणि स्वयंप्रकाशीत आनंदपुरुषाच्या संस्थिती प्रसज्यप्रतिषेध करुन जातो. अत्यंत रसाळ माधुर्यपुर्ण आणि बहुआयामी असे बहुअर्थगर्भी काव्यपुप्ष प्रसवल्या बद्दल कक्षावेशीकेच्या कवित्वैशिष्ट्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

पिशी अबोली Mon, 12/07/2015 - 10:54
किती सुंदर, सरळ समीक्षा! असे कमीतकमी आणि अंतःकरणाला भिडतील अशा शब्दांमधून लिहिणारे समीक्षक विरळाच..

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मितान Mon, 12/07/2015 - 06:25
आपला वरदहस्त डोक्यावर असताना अाम्हास काहीही लिहिणे अशक्य नाही! तुम्ही फक्त पेर्णा द्या आजोबा ;)

पैसा Mon, 12/07/2015 - 10:09
कखगघङ चछजझ टठडढण तथदधन पफबभम यरलवश षसहळ क्षज्ञ

In reply to by पैसा

पिशी अबोली Mon, 12/07/2015 - 10:59
कवितेचे अंतरंग उलगडून दाखवणारा रसाळ प्रतिसाद.. 'ञ' मुळे उगाच होऊ शकणारा फापटपसारा वगळून जी चतुराई केलेली आहे, तिला तोडच नाही. धन्यवाद पैसाताई!

In reply to by पैसा

मृत्युन्जय Mon, 12/07/2015 - 12:44
कवितेचे या धाग्यावरील सर्वोत्तम रसग्रहण. अगदी मितानतैंनी स्वतः केलेल्या रसग्रहणापेक्षासुद्धा चांगले. पण कवितेत दडलेल्या अव्यक्त भावना वरच्या रसग्रहणातुन पुरेपुर उतरत नाहित असे नमूद करु इच्छितो. या निमित्ताने या काव्याची तुलना गुंडा या चित्रपटाशी करु इच्छितो. कितीही सविस्तर परीक्षणे केली तरी गुंडा दशांगुळे उरतोच तसेच या काव्याचे झाले आहे. त्यासाठी दमामितैंचे अभिनंदन.

In reply to by मृत्युन्जय

मितान Mon, 12/07/2015 - 15:31
तुम्हाला कविता वाचून जो धक्का बसलाय याची जाणीव आहे मृत्युंजयदादा !! पण असे गोंधळू नका. हे बघा - कविता कोणी केली ? मितान ने ! रसग्रहण कोणी ? दमामि ने गुंडांगुळे काय उरलं ? कविता अभिनंदन कोणाचं ? मितानचं !!! =)) =))

साकल्यसूक्त >> हे सायकलसुक्त असं वाचलं ..... मग पहिली ओळ वाचल्यावर अजुनच कन्फ्युजन झालं...मग पुढचं काई वाचलच नाई... ( आधीच सोमवार सकाळ त्यात आणि ..... ) ;-)

In reply to by बॅटमॅन

घाटावरचे भट Mon, 12/07/2015 - 14:28
बाकी सगळे डोक्यावरून गेले म्हणताना ते सगळे म्हणजे 'शष्प' असे तुम्हाला म्हणावयाचे नसावे असे समजतो. अन्यथा अनर्थशास्त्रास फारच प्रत्ययवाही न्याय दिल्यासारखे होईल.

गवि Mon, 12/07/2015 - 13:26
वा वा. सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन ऑकल्ट एक्स्पिरियन्स आला हे वाचून. आता "इन ट्यून विथ द ट्यून" वाचायला घेतोच..

In reply to by गवि

बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 14:03
सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन ऑकल्ट एक्स्पिरियन्स आला हे वाचून.
म्हणजे तुमचं पूर्वपुण्याई ग्रेटच असलं पाहिजे हो.... (बॅटकिणी ब्रूसाळराव.)

In reply to by गवि

अभ्या.. Mon, 12/07/2015 - 15:54
नशीब आवाजाकडे लक्ष गेले. सतरंजीचे सूत अन धोतराचा सोगा अन गौरांगाकडे असलेले लक्ष नाही दिसले. ;) " भिंगार्ड्या कंडम माणूस एकदम"

बोका-ए-आझम Mon, 12/07/2015 - 23:07
छान हो मस्तच हो कसं जमतं हो? डोळे पाणावले हो! शरुमौशींचा वारसा जिवंत ठेवल्याबद्दल अश्रुभरे मेघविव्हळ धन्यवाद!!

In reply to by सानझरी

पिशी अबोली गुरुवार, 06/01/2017 - 00:21
ही कविता अशी उलगडायची नाहीये. त्यात साकल्याने गुरफटून घ्यायचं आहे. उलगडताना ती शिवायला घेतलेली गोधडी असते, आणि गुरफटताना शिवून पूर्ण झालेली. हा बेसिक गोंधळ जोपर्यंत मनातून निघत नाही, तोपर्यंत कविता समजण्याइतकी आध्यात्मिक उन्नती होणार नाही तुमची. रोज बे ते एकोणतीस पाढे म्हणत जा. तिशीपर्यंत साकल्य करायचं नाही, हे साधनेने समजेल. साधना कट करू नये. तूर्तास इतकेच. तूरडाळीचे घोटलेले वरण सप्लिमेंट म्हणून खावे.

माहितगार गुरुवार, 06/01/2017 - 12:58
कविते वरचे प्रतिसाद वाचून खासकरून पैतैंचे अ ते ज्ञ रसग्रहण वाचून ज्ञ ते अ च्या मार्गे वाचन करुन रसग्रहणाचा मोह होतो आहे. त्या आधी साकल्य, गायी आणि पार्थ बाणांच्या रुपकांना पुन्हा अभ्यासेन आणि नंतर रसग्रहणासाठी नक्कीच येईन.