✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

साकल्यसूक्त

म — मितान, Sat, 12/05/2015 - 22:14
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!

प्रतिक्रिया द्या
39643 वाचन

💬 प्रतिसाद (136)

कविता आवडली

कविता१९७८
Sun, 12/06/2015 - 09:11 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments

सखोल जाणिवेच्या

सस्नेह
Sun, 12/06/2015 - 09:13 नवीन
अव्यक्त अवकाशातील अमूर्त संवेदनांची प्रच्छन्न स्त्रीसापेक्ष अभिव्यक्ती ! आशय कळल्यासारखा वाटत असतानाच तो मनवर्तुळाला भेदून न जाता निसटता स्पर्शून जातो हे या काव्याचे यश ! मितान कसं गं सुचतं तुला ?
  • Log in or register to post comments

खिक्क !!!! ;)

मितान
Sun, 12/06/2015 - 09:22 नवीन
खिक्क !!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मराठीत टँजंट म्हणायचे आहे का

अजया
Sun, 12/06/2015 - 09:26 नवीन
मराठीत टँजंट म्हणायचे आहे का आपणांस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

आपल्या मराठीइतकीच आपली जाणीव

सस्नेह
Sun, 12/06/2015 - 11:56 नवीन
आपल्या मराठीइतकीच आपली जाणीव साकल्ययुक्त आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

@अव्यक्त अवकाशातील अमूर्त

अत्रुप्त आत्मा
Sun, 12/06/2015 - 09:28 नवीन
@अव्यक्त अवकाशातील अमूर्त संवेदनांची प्रच्छन्न स्त्रीसापेक्ष अभिव्यक्ती ! >> वारलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

फक्त तुला कळली आहे ही

स्रुजा
Sun, 12/06/2015 - 09:31 नवीन
फक्त तुला कळली आहे ही कविता .. लोल.. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वा!सुरेख विवेचन स्नेहाकिता.

इशा१२३
Sun, 12/06/2015 - 09:45 नवीन
वा!सुरेख विवेचन स्नेहाकिता. प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

स्नेहाकिता..महालोल

Maharani
Sun, 12/06/2015 - 11:10 नवीन
स्नेहाकिता..महालोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सखोल

मित्रहो
Sun, 12/06/2015 - 11:11 नवीन
सखोल जाणिवेच्या अव्यक्त अवकाशातील अमूर्त संवेदनांची प्रच्छन्न स्त्रीसापेक्ष अभिव्यक्ती ! आशय कळल्यासारखा वाटत असतानाच तो मनवर्तुळाला भेदून न जाता निसटता स्पर्शून जातो
धन्यवाद, आजतागायत कुठलीच कविता अशी समजली नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ही कविता तुमची वाटत नाही

कवितानागेश
Sun, 12/06/2015 - 10:16 नवीन
ही कविता तुमची वाटत नाही मितानताई...
  • Log in or register to post comments

होक्का ???

मितान
Sun, 12/06/2015 - 11:12 नवीन
होक्का ??? मग कोणाची वाटते म्हणे ? इथे प्रतिभेचा आदर करण्याची पद्धतच दिसत नाही. !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

मला असे म्हणायचे आहे की

कवितानागेश
Sun, 12/06/2015 - 11:31 नवीन
मला असे म्हणायचे आहे की एखाद्या महान कवीची वाटतेय! .... तुमच्यासारख्या कवयित्रीची वाटत नाही. फार छान उतरलिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

हे म्हणजे, आप पुरूष नही बल्की

जातवेद
Mon, 12/07/2015 - 14:17 नवीन
हे म्हणजे, आप पुरूष नही बल्की महापुरूष हो टैप झालं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तुमच्या शैलीवर एका विशिष्ट

कवितानागेश
Sun, 12/06/2015 - 11:34 नवीन
तुमच्या शैलीवर एका विशिष्ट कवीचा प्रभाव जाणवतोय. कवितेला जी लय आहे ती विशेषतः त्याच कवीकडून उचलल्यासारखी भासतेय.
  • Log in or register to post comments

पहिली चार कडवी समजली असं वाटत

जव्हेरगंज
Sun, 12/06/2015 - 11:36 नवीन
पहिली चार कडवी समजली असं वाटत असतानाच शेवटची तीन कडवी डोक्यावरुन गेली. म्हणून पहिली चारच कडवी आवडली!
  • Log in or register to post comments

काव्यरस:

जव्हेरगंज
Sun, 12/06/2015 - 11:38 नवीन
काव्यरस: अनर्थशास्त्र इशारा फ्री स्टाइल भूछत्री मुक्त कविता विराणी सांत्वना लेखनविषय:: पाकक्रिया वाङ्मय कविता क्रीडा>>>>>>> अर्रर, असं आहे का हे ??? मग लगे रहो!!!;-)
  • Log in or register to post comments

मितान जी

मारवा
Sun, 12/06/2015 - 11:41 नवीन
कस हो सुचत तुम्हाला कस हो सुचत तुम्हाला ? आम्हाला तर एकही प्रतिसाद पण नाही कळला. कस हो सुचत तुम्हाला कस हो सुचत तुम्हाला ? ग्रेस चा प्रभाव आहे हे पुर्णपणे चुकीचे विधान आहे. उद्या तुम्ही घर थकेला संन्यासी भित बी हलु हलु खचरेयली है या पपन च्या ग्रेसच्या कवितेचा बिहारी मित्राला समजावुन सांगण्यासाठी केलेल्या अनुवादावरही आक्षेप घ्याल
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिता आहात आपण.

रातराणी
Sun, 12/06/2015 - 11:42 नवीन
खूप छान लिहिता आहात आपण. चिकित्सा करणाऱ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करा. त्याना लिहिता येत नाही म्हणून असे प्रतिसाद देतात. कसलीही स्पष्टीकरण देत बसू नका. तुमच्यासारख्या प्रतिभावान पक्षी आपलं ते हे कवयित्रीला ते कराव लागतय हे अत्यंत केविलवाण आहे.एक मिपाकर म्हणून शरम वाटली आज. इथे चिकित्सा करणाऱ्या सर्वांना एकच प्रश्न विचारतो आपलं ते हे विचारते शाळेत कधी कवितेच्या कवीला यातून काय सुचवायचे आहे इ प्रश्नांना पैकेच्या पैकी गुण मिळाले होते का तुम्हाला? आपण लिहीत रहा बिनधास्त. कुणी त्रास दिला तर म्हणा गोली मार भेजेमे. येत रहा. _/\_
  • Log in or register to post comments

शाळेत कधी कवितेच्या कवीला

संदीप डांगे
Sun, 12/06/2015 - 11:54 नवीन
शाळेत कधी कवितेच्या कवीला यातून काय सुचवायचे आहे इ प्रश्नांना पैकेच्या पैकी गुण मिळाले होते का तुम्हाला? त्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळतील ह्याचे मार्गदर्शन आमचे मास्तर गाईड नामक बुकातून करत असत. ;-) त्यामुळे चिकित्सा करण्याचा चान्स तिथे मिळाला नव्हता तो राग इथे उपटून काढतोय आम्ही... काय समजलात....? अशा चिकित्सा करुन करून कवीच्या प्रतिभांना मारायचा आमचा प्लान आहे. जेणेकरून पुढच्या सगळ्या मानवी पिढ्या ह्या अत्याचारापासून दूर राहून आमचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवतील...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

आँ अच्च्च जालं तर..

रातराणी
Sun, 12/06/2015 - 11:58 नवीन
आँ अच्च्च जालं तर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

:) किती तो चिकित्सेवर राग !

माहितगार
Sun, 12/06/2015 - 12:08 नवीन
:) किती तो चिकित्सेवर राग ! चिकित्सेची चिकित्सा करणार्‍यांसाठी पूर्ण गुण ! :) (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्यामुळे चिकित्सा करण्याचा

मितान
Sun, 12/06/2015 - 12:12 नवीन
त्यामुळे चिकित्सा करण्याचा चान्स तिथे मिळाला नव्हता तो राग इथे उपटून काढतोय आम्ही... काय समजलात....? अशा चिकित्सा करुन करून कवीच्या प्रतिभांना मारायचा आमचा प्लान आहे. जेणेकरून पुढच्या सगळ्या मानवी पिढ्या ह्या अत्याचारापासून दूर राहून आमचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवतील...>>>>>>> असं नै ! असं नै रागवायचं. राग आला ना की छोटा मेंदू मोठ्या मेंदूवर आदळतो आणि मग स्पंदनं निर्माण होतात असं दामोदरपंत म्हणायचे !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

हैला, भारी लिहीलयं की आपलं ते

जव्हेरगंज
Sun, 12/06/2015 - 12:12 नवीन
हैला, भारी लिहीलयं की आपलं ते हे रातराणी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

हैला, भारीच लिहीलयं की आपलं

जव्हेरगंज
Sun, 12/06/2015 - 12:12 नवीन
हैला, भारीच लिहीलयं की आपलं ते हे रातराणी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

कसचं कसचं. खरे धन्यवाद त्या

रातराणी
Sun, 12/06/2015 - 12:27 नवीन
कसचं कसचं. खरे धन्यवाद त्या माउलीचे जिच्यामुळे मला पुन्हा प्रतिसाद प्रसव संवेदना झाली. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

छान पाकृ.

pacificready
Sun, 12/06/2015 - 11:46 नवीन
छान पाकृ. घरी आलो असल्यानं करुन पाहता येईल.
  • Log in or register to post comments

हाफशेंच्युरी...

जेपी
Sun, 12/06/2015 - 11:49 नवीन
हाफशेंच्युरी... होऊ द्या सत्कार
  • Log in or register to post comments

सत्कार करायचा का ओटी भरायची?

रातराणी
Sun, 12/06/2015 - 11:52 नवीन
सत्कार करायचा का ओटी भरायची? अशा चुका नाही करायच्या जेपी भाऊ. संपादक व्हायचय की नाही तुम्हाला? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

प्रतिभा लिंगसापेक्ष नसते.

pacificready
Sun, 12/06/2015 - 11:55 नवीन
प्रतिभा लिंगसापेक्ष नसते. सत्कार करायचा तो आविष्करणाचा. - 2 3 असेच लेख कविता वाचल्यावर मैं कहां हूँ वाटू शकेल असा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

ब्वार्र प्यारेकाका. ब्रोब्र

रातराणी
Sun, 12/06/2015 - 12:02 नवीन
ब्वार्र प्यारेकाका. ब्रोब्र आहे तुमचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

अहो

मारवा
Sun, 12/06/2015 - 11:57 नवीन
ओटी भरायला हे अनाहिता आहे का ? हा मेन बोर्ड आहे मेन बोर्ड इथे होणार फक्त सत्कार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

मेन बोर्ड अनाहिता नाही असं

रातराणी
Sun, 12/06/2015 - 12:00 नवीन
मेन बोर्ड अनाहिता नाही असं म्हणता? चश्मा बदला मारवाजी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

शी बै ! ओटी की सत्कार वगेरे

मितान
Sun, 12/06/2015 - 12:09 नवीन
शी बै ! ओटी की सत्कार वगेरे टिपिकल मिडिऑकर चर्चांसाठी दुसरा धागा काढा बाई ! इथे या धाग्यावर केवळ प्रतिभेच्या उच्च आविष्करणाबद्दल आपल्या संवेदनशील जाणिवांमधुन प्रसृत झालेल्या चमत्कृतीजन्य संकल्पनांवर चर्चा व्हावी !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

होऊ द्या खर्च!

रातराणी
Sun, 12/06/2015 - 12:21 नवीन
होऊ द्या खर्च!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

इथे कवयित्रीला रुपकं व्यवस्थित समजलेली आहेत !

नीलमोहर
Sun, 12/06/2015 - 12:17 नवीन
त्यांनी फक्त वाट्टेल ते नवनवीन शब्द काढून एकापुढे एक जोडले नाही आहेत. सुसंबद्ध कविता लिहीण्यासाठी काव्यविषयाच एकसंध भान, अनुभवाची प्रगाढता आणि प्रतिभा लागते. मुळात या गोष्टी अतिप्रचंड प्रमाणात अंगी असतील तर अभिव्यक्ती पोकळ ठरत नाही. अर्थात इतक्या लोकांनी भयंकर कंफ्यूजन केल्यावरही कवितेचा फोलपणा न दाखवणं साहसाचं होतं पण कोणतीच कविता सखोल अभ्यासली नसल्यानं ते सोपं होतं. मुळात 'बसलं' की काहीही अर्थ निघू शकतात, पण आपण कधीच 'बसत' नसल्याने अर्थ काढण्यात खूप कमी पडतो ;)
  • Log in or register to post comments

ह्याला पण असू दे ह्या धाग्यावर...

संदीप डांगे
Sun, 12/06/2015 - 12:19 नवीन
म्हणजे कवयित्री का कवियत्री च्या अमुर्त अपेक्षांची पुर्तता करण्याची जाणीव रसिकांमधे जागृत राहील... Image removed.
  • Log in or register to post comments

एकदम फ्रेस आहे कविता.

आदूबाळ
Sun, 12/06/2015 - 12:20 नवीन
एकदम फ्रेस आहे कविता.
  • Log in or register to post comments

अंगावरून झुरळ फिरताना त्याची

पिशी अबोली
Sun, 12/06/2015 - 13:00 नवीन
अंगावरून झुरळ फिरताना त्याची फिरण्याची जागा काही सेंटीमीटरपुरती मर्यादित असली, तरी त्याची जाणीव साकल्याने होते. सृष्टीच्या चराचरात एक साकल्यभाव त्याच्या गूढ अस्तित्वाने एक रंजकता निर्माण करत असतो. पूर्णत्वाची आस असणे, त्यासाठी एवढा सारा पसारा मांडणे आणि नंतर त्यातील फोलपण लक्षात येणे, म्हणजे कायमचीच अतृप्ती. अशा उकळत्या पाण्यासारख्या भावनांची त्या झुरळाच्या संकल्पनेशी ओळख झाली की अशी नवीन रसाची पाकसिद्धि होणे साहजिकच आहे. अमूर्त अशा संकल्पनांची तेवढीच कुठेशी अमूर्त तर कुठेशी त्या झुरळाइतकीच मूर्त अशी ही अभिव्यक्ती मनाला स्पर्शून गेली. (^_^)
  • Log in or register to post comments

एक नं झुरळपूर्ण प्रतिसाद _/\_

अजया
Sun, 12/06/2015 - 14:25 नवीन
एक नं झुरळपूर्ण प्रतिसाद _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

अशा उकळत्या पाण्यासारख्या

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/06/2015 - 14:35 नवीन
अशा उकळत्या पाण्यासारख्या भावनांची त्या झुरळाच्या संकल्पनेशी ओळख झाली की अशी नवीन रसाची पाकसिद्धि होणे साहजिकच आहे. ही बहुतेक चिनी पाकृ असावी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

@पूर्णत्वाची आस असणे,

अत्रुप्त आत्मा
Mon, 12/07/2015 - 18:27 नवीन
@
पूर्णत्वाची आस असणे, त्यासाठी एवढा सारा पसारा मांडणे आणि नंतर त्यातील फोलपण लक्षात येणे, म्हणजे कायमचीच अतृप्ती. अशा उकळत्या पाण्यासारख्या भावनांची त्या झुरळाच्या संकल्पनेशी ओळख झाली की अशी नवीन रसाची पाकसिद्धि होणे साहजिकच आहे. अमूर्त अशा संकल्पनांची तेवढीच कुठेशी अमूर्त तर कुठेशी त्या झुरळाइतकीच मूर्त अशी ही अभिव्यक्ती मनाला स्पर्शून गेली.
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

झुरळाय विन्महे काॅक्रोचाय

बोका-ए-आझम
Mon, 12/07/2015 - 23:13 नवीन
झुरळाय विन्महे काॅक्रोचाय धीमहि तन्नो छपडे प्रचोदयात्!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

साकल्याने विचार केल्यावरच

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/06/2015 - 13:22 नवीन
साकल्याने विचार केल्यावरच समजते ते साकल्यसुक्त. तसे न केल्यास ते नुसतंच सुकतं... सुकून सगळा रस निघुन गेल्यावर रसभंग होणारच. सो, कल्ला न करता सुमडीत रसास्वाद घ्या, भोहो :)
  • Log in or register to post comments

अहाहा! काय ती काव्यप्रतिभा!

विशाखा पाटील
Sun, 12/06/2015 - 14:08 नवीन
अहाहा! काय ती काव्यप्रतिभा! केवढं 'अर्थपूर्ण' काव्य... ही कविता आणि वाचकांच्या प्रतिक्रिया समिक्षेतली 'reader's response theory' अभ्यासण्यासाठी उत्तम उदाहरण ठरेल. पुढची कविता कधी पाडतेयेस, सॉरी करतेयेस?
  • Log in or register to post comments

साधु.... साधु.... साधु..........

ज्ञानोबाचे पैजार
Sun, 12/06/2015 - 15:41 नवीन
कधीकधी उन्मुक्त आणि प्रच्छंन्न आनंदाच्या, एखाद्या उन्मादामधे, तिव्र मध्यमलयीत, धावणार्‍या आपल्या मन्श्वाच्या आयाळीच्या, गर्द गुंतवळ्यामधुन, एका बेसावध क्षणी, आपण अचानक आपल्या मनीच्या गुढगर्भ डोहात, उघड्या डोळ्यांनी फेकले जातो आणि आपल्याच मनःसागरात असलेल्या अमर्याद व अनंत अशा आर्याष्टाङ्गमार्गाच्या तेजाने आपण उजळुन निघतो आणि मग परमेश्वराच्या त्या सन्धावेणिके पुढे आपण नतमस्तक होतो. तसा काहिसा अनुभव हे अपराधभञ्जनस्तोतत्र वाचल्यानंतर प्रवाचकांना येतो. लघुखट्विके मधे उत्तेजक रस प्राशन करत असताना, मक्षीकाप्रपात झाला, तर आपण जसे उव्दीग्न होतो, तशी काहीशी वैचक्षण रसानुभूती आपल्याला मधली काही कडवी वाचताना आली, तरी एकंदर हा अनुभव आपल्या अंतरात्म्याच्या अत्यंत निकटतम असलेल्या त्या सहृद आणि स्वयंप्रकाशीत आनंदपुरुषाच्या संस्थिती प्रसज्यप्रतिषेध करुन जातो. अत्यंत रसाळ माधुर्यपुर्ण आणि बहुआयामी असे बहुअर्थगर्भी काव्यपुप्ष प्रसवल्या बद्दल कक्षावेशीकेच्या कवित्वैशिष्ट्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

--/\--

माहितगार
Sun, 12/06/2015 - 15:57 नवीन
--/\--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पैजार गुरुजी

मितान
Sun, 12/06/2015 - 20:16 नवीन
साष्टांग प्रणिपात --/\-- !!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

किती सुंदर, सरळ समीक्षा! असे

पिशी अबोली
Mon, 12/07/2015 - 10:54 नवीन
किती सुंदर, सरळ समीक्षा! असे कमीतकमी आणि अंतःकरणाला भिडतील अशा शब्दांमधून लिहिणारे समीक्षक विरळाच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

काकू, वाढदिवसाच्या हार्दिक

बिपिन कार्यकर्ते
Sun, 12/06/2015 - 22:34 नवीन
काकू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! कधी आमच्यासाठी पण लिहा हं!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा