Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मितान on Sat, 12/05/2015 - 22:14
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!

Submitted by मितान on Mon, 12/07/2015 - 06:25

In reply to काकू, वाढदिवसाच्या हार्दिक by बिपिन कार्यकर्ते

Permalink

आपला वरदहस्त डोक्यावर असताना

आपला वरदहस्त डोक्यावर असताना अाम्हास काहीही लिहिणे अशक्य नाही! तुम्ही फक्त पेर्णा द्या आजोबा ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 12/07/2015 - 05:12

Permalink

शब्दकळा आणि प्रतिमासृष्टी फार

शब्दकळा आणि प्रतिमासृष्टी फार आवडली!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 12/07/2015 - 10:09

Permalink

क्खगघ

कखगघङ चछजझ टठडढण तथदधन पफबभम यरलवश षसहळ क्षज्ञ
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 12/07/2015 - 10:15

In reply to क्खगघ by पैसा

Permalink

अतिशय सुंदर प्रतिसाद. आवडला.

अतिशय सुंदर प्रतिसाद. आवडला. कवयित्रीच्या भावना अचूक पकडल्यात... :-)
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on Mon, 12/07/2015 - 10:58

In reply to क्खगघ by पैसा

Permalink

स्वर वर्ज्य असणं साहजिकच!

स्वर वर्ज्य असणं साहजिकच!
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on Mon, 12/07/2015 - 10:59

In reply to क्खगघ by पैसा

Permalink

कवितेचे अंतरंग उलगडून

कवितेचे अंतरंग उलगडून दाखवणारा रसाळ प्रतिसाद.. 'ञ' मुळे उगाच होऊ शकणारा फापटपसारा वगळून जी चतुराई केलेली आहे, तिला तोडच नाही. धन्यवाद पैसाताई!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Mon, 12/07/2015 - 15:47

In reply to कवितेचे अंतरंग उलगडून by पिशी अबोली

Permalink

गूगल इंडिक कृपा आहे ती

सगळी अक्षरे शोधली पण बेटा 'ञ' मिळाला नाही मग मरो मेला म्हटले! नाहीतरी 'त्र' सोबत भांडतो तो!
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 05/28/2018 - 22:36

In reply to गूगल इंडिक कृपा आहे ती by पैसा

Permalink

=)) =)) =))

=)) =)) =)) ही वाखू साठवल्याचे सार्थक झाले. आज लै बोर झाल्तं ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 12/07/2015 - 12:44

In reply to क्खगघ by पैसा

Permalink

कवितेचे या धाग्यावरील

कवितेचे या धाग्यावरील सर्वोत्तम रसग्रहण. अगदी मितानतैंनी स्वतः केलेल्या रसग्रहणापेक्षासुद्धा चांगले. पण कवितेत दडलेल्या अव्यक्त भावना वरच्या रसग्रहणातुन पुरेपुर उतरत नाहित असे नमूद करु इच्छितो. या निमित्ताने या काव्याची तुलना गुंडा या चित्रपटाशी करु इच्छितो. कितीही सविस्तर परीक्षणे केली तरी गुंडा दशांगुळे उरतोच तसेच या काव्याचे झाले आहे. त्यासाठी दमामितैंचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Mon, 12/07/2015 - 15:31

In reply to कवितेचे या धाग्यावरील by मृत्युन्जय

Permalink

तुम्हाला कविता वाचून जो धक्का

तुम्हाला कविता वाचून जो धक्का बसलाय याची जाणीव आहे मृत्युंजयदादा !! पण असे गोंधळू नका. हे बघा - कविता कोणी केली ? मितान ने ! रसग्रहण कोणी ? दमामि ने गुंडांगुळे काय उरलं ? कविता अभिनंदन कोणाचं ? मितानचं !!! =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 12/07/2015 - 21:34

In reply to तुम्हाला कविता वाचून जो धक्का by मितान

Permalink

काय की दमामि मधला मि मितान चा

काय की दमामि मधला मि मितान चा आहे असे कोणीतरी म्हणताना ऐकले त्यामुळे गोंधळ उडाला.
  • Log in or register to post comments

Submitted by pacificready on Mon, 12/07/2015 - 21:41

In reply to काय की दमामि मधला मि मितान चा by मृत्युन्जय

Permalink

मि=मितान तर द=? मा=?

मि=मितान तर द=? मा=?
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता श्रीपाद on Mon, 12/07/2015 - 11:09

Permalink

साकल्यसूक्त >> हे सायकलसुक्त

साकल्यसूक्त >> हे सायकलसुक्त असं वाचलं ..... मग पहिली ओळ वाचल्यावर अजुनच कन्फ्युजन झालं...मग पुढचं काई वाचलच नाई... ( आधीच सोमवार सकाळ त्यात आणि ..... ) ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/07/2015 - 13:18

Permalink

कविता शष्पाइतकीच कळाली. बाकी

कविता शष्पाइतकीच कळाली. बाकी सगळे डोक्यावरून गेले. (शष्पप्रेमी) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Mon, 12/07/2015 - 14:28

In reply to कविता शष्पाइतकीच कळाली. बाकी by बॅटमॅन

Permalink

ब्याटण्णा

बाकी सगळे डोक्यावरून गेले म्हणताना ते सगळे म्हणजे 'शष्प' असे तुम्हाला म्हणावयाचे नसावे असे समजतो. अन्यथा अनर्थशास्त्रास फारच प्रत्ययवाही न्याय दिल्यासारखे होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/07/2015 - 14:31

In reply to ब्याटण्णा by घाटावरचे भट

Permalink

ही ही ही =))

ही ही ही =))
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 12/07/2015 - 13:26

Permalink

वा वा.

वा वा. सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन ऑकल्ट एक्स्पिरियन्स आला हे वाचून. आता "इन ट्यून विथ द ट्यून" वाचायला घेतोच..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 12/07/2015 - 14:00

In reply to वा वा. by गवि

Permalink

ही कविता समजून घ्यायला, "इन

ही कविता समजून घ्यायला, "इन ट्युन विथ द टून" वाचायची गरज लागेल ;) :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/07/2015 - 14:03

In reply to वा वा. by गवि

Permalink

सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन

सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन ऑकल्ट एक्स्पिरियन्स आला हे वाचून.
म्हणजे तुमचं पूर्वपुण्याई ग्रेटच असलं पाहिजे हो.... (बॅटकिणी ब्रूसाळराव.)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 12/07/2015 - 14:05

In reply to सुप्राकॉन्शसच्या पातळीवरुन by बॅटमॅन

Permalink

आक्क्क्क्क्................छी

आक्क्क्क्क्................छी.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/07/2015 - 14:31

In reply to आक्क्क्क्क्................छी by अभ्या..

Permalink

अभ्या भिंगार्डे ;) की ते

अभ्या भिंगार्डे ;) की ते "हीक् छ्याक्" होतं? =))
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 12/07/2015 - 14:41

In reply to अभ्या भिंगार्डे ;) की ते by बॅटमॅन

Permalink

..

ठ्याँ छिक असावं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Mon, 12/07/2015 - 15:54

In reply to .. by गवि

Permalink

नशीब आवाजाकडे लक्ष गेले.

नशीब आवाजाकडे लक्ष गेले. सतरंजीचे सूत अन धोतराचा सोगा अन गौरांगाकडे असलेले लक्ष नाही दिसले. ;) " भिंगार्ड्या कंडम माणूस एकदम"
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 12/07/2015 - 15:58

In reply to नशीब आवाजाकडे लक्ष गेले. by अभ्या..

Permalink

चवळीच्या शेंगेशेजारचा सुरणाचा

चवळीच्या शेंगेशेजारचा सुरणाचा गड्डा =))
  • Log in or register to post comments

Submitted by पालीचा खंडोबा १ on Mon, 12/07/2015 - 13:55

Permalink

क्या बात है . मस्तच

क्या बात है . मस्तच
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 12/07/2015 - 14:21

Permalink

ह्म्म्म!!

ह्म्म्म!!
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 12/07/2015 - 19:57

Permalink

साकल्यसूक्त अब समझा.

साकल्यसूक्त अब समझा.
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on Mon, 12/07/2015 - 20:20

In reply to साकल्यसूक्त अब समझा. by आदूबाळ

Permalink

एपिक लोल!!

एपिक लोल!!
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 12/07/2015 - 23:07

Permalink

मितानतै

छान हो मस्तच हो कसं जमतं हो? डोळे पाणावले हो! शरुमौशींचा वारसा जिवंत ठेवल्याबद्दल अश्रुभरे मेघविव्हळ धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

Submitted by सानझरी on Wed, 05/31/2017 - 23:30

Permalink

साकल्यसूक्त आणि सगळे प्रतिसाद

साकल्यसूक्त आणि सगळे प्रतिसाद डोक्यात.. च् च्.. आपलं ते डोक्यावरून गेले.. पैसातैंचा प्रतिसाद तेवढा आवडला, कविता उलगडत गेली.. =))
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on गुरुवार, 06/01/2017 - 00:21

In reply to साकल्यसूक्त आणि सगळे प्रतिसाद by सानझरी

Permalink

ही कविता अशी उलगडायची नाहीये.

ही कविता अशी उलगडायची नाहीये. त्यात साकल्याने गुरफटून घ्यायचं आहे. उलगडताना ती शिवायला घेतलेली गोधडी असते, आणि गुरफटताना शिवून पूर्ण झालेली. हा बेसिक गोंधळ जोपर्यंत मनातून निघत नाही, तोपर्यंत कविता समजण्याइतकी आध्यात्मिक उन्नती होणार नाही तुमची. रोज बे ते एकोणतीस पाढे म्हणत जा. तिशीपर्यंत साकल्य करायचं नाही, हे साधनेने समजेल. साधना कट करू नये. तूर्तास इतकेच. तूरडाळीचे घोटलेले वरण सप्लिमेंट म्हणून खावे.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on गुरुवार, 06/01/2017 - 00:40

In reply to ही कविता अशी उलगडायची नाहीये. by पिशी अबोली

Permalink

संधिवाताला तूरडाळ वर्ज्य

संधिवाताला तूरडाळ वर्ज्य असतें. तेंव्हा मूगडाळीचें वरण बरें.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on गुरुवार, 06/01/2017 - 13:50

In reply to संधिवाताला तूरडाळ वर्ज्य by एस

Permalink

मूगडाळीने साकल्य साधता येते

मूगडाळीने साकल्य साधता येते का॑ पण?
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 06/02/2017 - 22:59

In reply to मूगडाळीने साकल्य साधता येते by प्रीत-मोहर

Permalink

साकल्याच्या शोधात 'वाकल्य'

साकल्याच्या शोधात 'वाकल्य' आलें नाही म्हणजें मिळविलीं. :-D
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 06/01/2017 - 12:58

Permalink

कविते वरचे प्रतिसाद वाचून

कविते वरचे प्रतिसाद वाचून खासकरून पैतैंचे अ ते ज्ञ रसग्रहण वाचून ज्ञ ते अ च्या मार्गे वाचन करुन रसग्रहणाचा मोह होतो आहे. त्या आधी साकल्य, गायी आणि पार्थ बाणांच्या रुपकांना पुन्हा अभ्यासेन आणि नंतर रसग्रहणासाठी नक्कीच येईन.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Fri, 06/02/2017 - 13:37

Permalink

खोखो खेळूया

डोईवरी भुई आदळतां मारिली बेंबीदेठीची बोंब एक पेग अधिक ढोसतां फुटे नवप्रतिभेस कोंब -गा.पै.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Log in or register to post comments
  • 39643 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: अभिशेक पाटिल 2
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:14
  • सदस्य: Abhishek C
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:05
  • सदस्य: देव@मिसलपाव
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 08:44
  • सदस्य: आम्ही कोण म्हण…
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:38
  • सदस्य: मिपाखरु
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:36

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com