Skip to main content

'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..?

लेखक मोदक यांनी शनिवार, 19/01/2013 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
******************************************************* धनाजीरावांनी कुठूनतरी "धनाजीराव आणि पार्टी" चा उल्लेख करून सखूची आठवण काढली. सखूचा धागा वर आला नाही पण त्या गीताच्या (?) तालावर आम्हाला बरेच काही सुचत गेले.. सखूचे विडंबन समजणार असलात तर जरूर समजावे, मात्र कुणा व्यक्ती / पात्राशी सांधर्म्य आढळयास योगायोग समजण्याची चूक करू नये. ******************************************************* शब्द खरडतो 'मी' घाई घाई, अर्थाची आठवण राहीलीच नाही बुध्दी, ज्ञान, मती सर्व 'माझ्याच' ठायी, आजही तू सहमत होशील ना? 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? संस्थळांवर उडवलाय धुरळा, 'मीच' काढलाय 'माझाच' गळा 'मी' सांगतो तीच पूर्व दिशा, 'मी' सांगतो तोच अर्थ खरा 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? जगातले सर्व ज्ञान आहे 'मला', तुझे बरोबर मुद्दे पण पटेनात 'मला' 'मी', 'माझे' मत, 'माझे' प्रतिसाद, 'माझे' विचार, 'माझे' ज्ञान.. पण आज्जिबात अहंकार नाही 'मला' 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? सांगत असतात बरेच जण 'मला', सांभाळून वाग बोल रे मित्रा 'मी' म्हणतो 'माझ्या' ज्ञानाचा ते तिरस्कार करतात, सतत 'मलाच' टारगेट करतात 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? तू कसे काय म्हणतेस 'मी' चुकलो, छे छे नाहीच्च 'मी' चुकलो. बरोबर असले मुद्दे तुझे तरी, अंतीम सत्य नेहमी 'मीच' बोलतो 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तू ऐकशील का..? "आजपण ऐकशील ना..?" मध्ये दिसते विनंती, आज्ञा सोडायची सवय 'माझ्या' ठायी . 'मी' आता त्या विनंतीला आज्ञेमध्ये बदलतो, आजच्या दिवसातला एक विजय (?) प्राप्त करतो. 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल. कदाचित तू असशील बरोबर, मुद्देही असतील लॉजीकल, पण ते 'मी' मान्य कसे करेन?? तुला माझ्यासारखे वागायचेय? मग सभ्यता, मर्यादा, संकेत सर्व विसरावे लागेल. 'माझा' 'मी' 'मी' 'मी' चा पाढा, आजपण तुला ऐकावाच्च्च्च्च्च्च्च्च्च्च लागेल.

वाचने 51180
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

In reply to by इनिगोय

पेठकर काकांशी आणि तुमच्याशी सहमत. धनाजीरावांच्या खांद्यावर मी ठेवलेल्या बंदुकीतून पब्लीकने आपापल्या गोळ्या मारून घेतल्यात. :-D बघू काही फरक पडतो आहे का.. पडला तर आनंदच आहे. (या धाग्यामुळे कुणाचा मिपासन्यासाचा धागा आलाच तर त्याचेही विडंबन करण्यास तयार असलेला :-D) मोदक

In reply to by स्पा

उगा बळे बळे विनोद निर्मिती सुरुये> स्पारायण जी, तुम्हाला इनोद कळत नाहीत असं कबूल केलत तर तुम्हाला कुणीही हसणार नाहीत इथे. उलट समजावूनच सांगतील अवांतरः तुम्ही विनोद प्रत्यक्ष पाहिला आहे का?

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा... माझ्या प्रतिसादाला जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याच्या चिमुकल्या कुर्‍हाडीच्या कथेचा संदर्भ होता. त्याची स्मायली मिळवून टाका की प्लीज. :-D

In reply to by मोदक

माझ्या प्रतिसादाला जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्याच्या चिमुकल्या कुर्‍हाडीच्या कथेचा संदर्भ होता.
कोण जॉर्ज वॉशिंग्टन? आम्हाला कुर्‍हाड म्हटलं की फक्त लाकुडतोडयाचीच कथा आठवते.

आत्ताच धनाजीरावांचा मेसेज आल्याप्रमाणे ते संध्याकाळशिवाय मिपावर उपलब्ध नसणार आहेत. तस्मात त्यांच्या सखूच्या विडंबनावरून आम्ही तात्पुरती रजा घेतो आहोत. अजून कोणाला रंगपंचमी खेळायची असेल तर खेळ सुरू राहूदे.. आम्ही संध्याकाळी कंटिन्यू करू. धनाजीरावांच्या खिलाडूवृतीचा पंखा - मोदक.

डोकं गरगरायला लागलाय. मी कोण आहे ? मोदक कोण आहे ? मी मोदकाला भेटलो होतो की त्याच्या शरिराला ? जर मी त्याच्या शरिराला भेटलो असेन तर मोदकाचे मन / आत्मा वगैरे कुठे होता ? जर तो त्याच्या शरिरातच आहे असं म्हणायचं तर त्याला पुरावा काय ? मी त्याला भेटलो असेन पण माझं मन पण त्याला भेटलं त्याचा पुरावा काय ? ही प्रतिक्रिया मी लिहिलेय त्याचा पुरावा काय ? आयपी अ‍ॅड्रेस बघ असे बाष्कळ उत्तर देऊ नये.

In reply to by कवितानागेश

तोच तर गोंधळ आहे ना. मनाला पाहायचं कसं ? (मी काही इगतपुरीपर्यंत जाणार नाहीये हं) आणि तेच मन आहे कशावरुन ? मोदक तरी मोदक आहे कशावरुन ? तो लाडु/करंजी/ चिवडा कशावरुन नाही ? म्हणजे तो स्वतःला मोदक म्हणतो पण तो पण एक भासच आहे ना. तो पुरणपोळी वगैरे पण असु शकतो ना. मी त्याला मोदक म्हणतो पण तो तर आइस्क्रीम पण असु शकतो ना. आईस्क्रीमचे व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, मँगो, राजभोग, सिताफळ असे अनेक प्रकार असतात. पुर्वी वाडिलाल होते, नंतर अमुल आलं आता हॅवमोर म्हणुन पण आलाय. जास्त आईस्क्रीम खाऊन सर्दी होते. सर्दी झाली तर क्रोसिन घ्यावी. क्रोसिन नसेल तर गरम पाण्याची वाफ घ्यावी. पाणी तानसा, वैतरणा तलावातुन येतं. त्यावर भांडुप येथे प्रक्रिया करुन ते शुद्ध केले जाते. पुर्वी एक तुरटी घोटाळा म्हणुन पण काहीतरी झालं होतं.... (असं बरच लिहु शकेन....."बदक" ह्या तुफ्फान गाजलेल्या लेखाची आठवण झाली, म्हणुन ट्राय केला. =)) )

In reply to by अमोल खरे

अमोला, शुद्धिवर ये बाळा! तरी सांगत होते काहीही ट्राय करण्याचं वय नाही तुझं अजून.

In reply to by रेवती

खरे तर बरेच काही ट्राय करायचे वय आहे. ते ट्राय कर म्हणावे. उगाच त्या मोदकाच्या नादी लागू नकोस. घरी भरपूर अभ्यास करून कॉलेजात टाईमपास करणारी काही मुले असतात. तू फक्त टाईमपास करशील आणि नापास होशील आणि तो तिथे ४-५ विषयात डीसटिंक्शन काढणार.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

घरी भरपूर अभ्यास करून कॉलेजात टाईमपास करणारी काही मुले असतात. तू फक्त टाईमपास करशील आणि नापास होशील आणि तो तिथे ४-५ विषयात डीसटिंक्शन काढणार.
मोदक, हलकट तू अभ्यास सुरु केला हे मुंबईला विमेलासुद्धा कळलं. आणि आम्ही विचारलं की म्हणतोस बाहेर काम आहे त्यामुळे नाही जमणार कटट्याला यायला. ;)

ऑ..??? तिसरा प्रतिसाद कोणता उडाला? मला दोनच अपेक्षीत होते. :-\

मोदका आजकाल तुझा टारगटपणा वाढत चाललाय. दोन चार प्रतिसाद संमं ने उडवले तर वाईट वाटून घेऊ नकोस. एकंतरीतच दंगा घालणे यासाठीच ही कविता लिहिली आहेस. माझे आनखीही प्रतिसाद या धाग्यावर आहेत याची कल्पना आहे. तूही साधा नाहीस हे दाखवण्यासाठी हा पुरावा आहे.