Skip to main content

धोकेबाज

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 13/02/2018 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय आई, काय सांगू आणि कुठून सुरुवात करू? कशी आहेस? पाच सहा महिन्यांत एकदा तुझी खुशाली कळते. जग कुठल्या कुठे गेलं पण आपलं गाव अजून तसंच . मोबाईल नेटवर्कच नाही. माणसाने कॉन्टॅक्ट ठेवावा तरी कसा! आणि तू आणि तुझे विचार तर त्या गावापेक्षाही जुने. आठवतं, मी पहिल्यांदी गोव्याला आलो, मला नोकरी मिळाली, तुला गोव्याला घेऊन आलो. तूसुद्धा खूष होतीस पण जेव्हा तुला कळलं की मी बिअर बारमध्ये नोकरीला लागलोय तशी तू त्याच रात्रीच्या एसटीने निघून गेलीस. दारूच्या पैशाने चालणार्या घरात पाणीसुद्धा पिणार नाही म्हणालीस. किती दुखावलंस मला. आजकाल कुणी असं नसतं.

गोव्यातला बसवाला

लेखक पिशी अबोली यांनी मंगळवार, 13/02/2018 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्यातला बस प्रवास, हा एक विशेष विषय आहे. यासंदर्भातला पैसाताईचा भन्नाट लेख माझी प्रेरणा http://www.misalpav.com/node/14121 तर गोव्यात भरपूर सामान असणं हे बसप्रवास न करण्याचं कारण असू शकत नाही. भरपूर गर्दी असणं हे अपेक्षितच असतं. त्यामुळे ट्रेनने सकाळी लवकर पोहोचवल्यावर बस स्टॉपवर उभी राहिले, तेव्हा मी गोंयकाराला(च) शोभणाऱ्या आरामात उभी होते. बस आली, आणि माझ्याकडचं सामान बघून त्या बॅगांना, आणि त्यांच्यानंतर मला अगोदरच सामानाने भरलेल्या केबिनमध्ये कोंबण्याचा सोहळा झाला. त्यानंतर बस आणि ड्रायव्हरच्या तोंडाचा पट्टा एकत्रच सुसाट सुटले.

पुण्याची मुंबई आता झाली की राव...

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 12/02/2018 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल आपले पुणे सुध्दा.. रात्रभर जागे राहून धडधडत असते! कारण आपली सुध्दा मुंबई झाल्याचे.. स्वप्न जागेपणी त्याला पडत असते! पुण्यातील पीएमटी खचाखच गर्दीने भरून.. केविलवाणी धावत रडत असते! मुंबईतील लोकल ट्रेनचा हात हातात धरून.. ती सुद्धा मैत्रीला जागत असते! मुंबईतील मराठीपणा हद्दपार झाल्याचं.. दुःख मुंबई पचवत जगत असते! पुणे सुध्दा तिच्याशी समदुःखी होऊन.. गळ्यात गळा घालून रडत असते! कशापायी आमच्या मुंबईला ठेवता नाव? पुण्याची मुंबई आता झाली की राव! तुमचा आमचा असतो सेम वडा पाव.. दिवसरात्र लोकांची जीवघेणी धावाधाव! - निमिष सोनार (आता पुणेकर पण भूतकाळातील मुंबईकर)

सफर ग्रीसची: अंतिम भाग – राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालय

लेखक निशाचर यांनी सोमवार, 12/02/2018 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ९ - अथेन्समधील पहिला दिवस भाग १० - प्राचीन तंत्रज्ञान प्रदर्शन आणि अक्रोपोलिस संग्रहालय भाग ११ - गूढरम्य डेल्फी १ भाग १२ - गूढरम्य डेल्फी २ भाग १३ – अक्रोपोलिस अथेन्स आणि ग्रीसचा निरोप घ्यायची वेळ आली होती. शेवटच्या दिवशी विमानतळाकडे जाण्याआधी सकाळी मोकळा वेळ होता. त्या वेळात काय पाहायचं हा प्रश्नच आला नाही. अथेन्सच्या इतर पुरातन वास्तू आणि अवशेष किंवा बेनाकी संग्रहालय वगैरे बघण्यात रस होता. पण ग्रीसच्या राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयाला (National Archaeological Museum, अर्थात NAM) अग्रक्रम होता. डेल्फी वा मायसिनी सारख्या प्रसिद्ध पुरावशेषांजवळही संग्रहालये आहेत, तिथे मिळालेल्या काही वस्तू या संग्रहालयांमध्ये पाहता येतात. परंतु सगळ्यांत महत्त्वाचे पुतळे, भांडी, धातूकाम, दागिने हे राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयात मांडून ठेवलेले आहेत.

सोनरंग

लेखक चांदणशेला यांनी सोमवार, 12/02/2018 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
मावळतीच्या डोहात पेटली केशरी लाली क्षितीजाची पाऊले सोनरंगात न्हाली वाऱ्यावर लहरतो पाखरांचा झुला सोनेरी पंखांचा होतो स्वर ओला सावळ्या आभाळी चढल्या ढगांच्या रांगा कोवळ्या पानांत उठल्या पिवळ्या रेघा हिरव्या डोंगरी पसरली धूसर काजळी कलत्या ऊन्हात उतरली सांज निळी
काव्यरस

सुदाम्याचे पोहे

लेखक प्राची अश्विनी यांनी सोमवार, 12/02/2018 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पुन्हा लिहितात, अन पुन्हा पुन्हा खोडतात, दिवसभर मोबाईलशी, हात, खेळत बसतात. मनातले शब्द शेवटी मनातंच रहातात.. माणसं दूर जातात.. पण आठवणी जवळ राहतात टाईमलाईनवर जाऊन, डोळे नुसतेच रेंगाळतात. सुदाम्याचे पोहे कधीकधी कनवटीलाच रहातात..

भूमिका

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 12/02/2018 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
भूमिका घरासमोरची वाट मिट्ट काळोखात बुडली. दूर कुठेसा दिवा दिसायला लागला तस येसू न लाकडी खिडकी ओढून घेतली खूट्टकन. देवाजवळ दिवा लावला आणि पटकन चूल पेटवून घेतली. पेजेवर झाकण ठेवून देवळाशी आली. नेहेमीच्या जागेवर गोप्या दिसला तिला.निजलेला. बेवारशी कुत्र्यासारखा. उठवल्यावर लगेच उठला. अंग मोडून आळस दिला. "अस्स तिन्ही सांजेच्या वेळेला निजू नये रे पूता" तिन त्याला मायेने समजावल. गोप्या हसला लहान मूलासारखा. हसताना लहान मूलासारखी लाळ गळली.पण ती त्यान पूसली नाही.मग येसू नच पदरान ती पूसून काढली. "चल लवकर गरमा गरम पेज खाऊन घे" गोप्या पाय ओढत तिच्या मागे मागे चालू लागला.

बाप रे बाप..

लेखक ss_sameer यांनी सोमवार, 12/02/2018 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
मला शाळेत एकदा विचारलेले, तुला तुझ्या वडीलांबद्दल काय वाटते? मी सांगितले, "भीती!" विचारणारा काही क्षण गोंधळून गेला. सारा वर्ग विचारणाऱ्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होता. गोंधळ इतका वाढला की पुछो मत. त्यानंतर बसण्याच्या जागेवर फुटलेल्या फटाक्यांमुळे माझे बसायचे हाल झाले. हे त्या काळचे उत्तर आहे. सध्या असे कोणी उत्तर दिले तर अमेरिकेत जसा नाईन वन वन ला फोन करतात तसाच पोलिसांना फोन करून वडिलांची(च) चौकशी करायला घेतील. पूर्वी बापास शाळेत बोलावणे म्हणजे पोराने कोणता तरी अनंत अपराध केल्याची नांदी असे.

प्रपोज डे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 11/02/2018 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रपोज डे ------------- बेसावध,धुंद क्षणी मनात तिचा विचार आला तिच्या आठवणी ने वेडा जीव व्याकुळ झाला * ताटातूट झालेली ,ती तिच्या मार्गाने ,मी माझ्या वॉट्सपले भेटू यात का? संध्याकाळी एखाद्या * भेटणे तर असंभव होते मार्ग निराळे झालेले होते ती मेसेजली भेटू यात संध्याकाळी एखाद्या * मी पण म्हणालो भेटू यात संध्याकाळी एखाद्या माहीत होते, ना तिला वचन पाळणे शक्य होते, ना मला

मी माझा

लेखक दिपोटी यांनी रविवार, 11/02/2018 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
‘आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे रहातो खालच्या मानेने आमच्या मारेकऱ्यांच्याच दाराशी’ बेलवलकरांच्या अस्तित्वाचा गाभारा नीरव-अतीव शांततेने केव्हा भिजणार? कोलाहल हा कधी थांबणार? काळाचा ओघ कधी थिजणार? सत्वाची विटंबना स्वत्वाचे विडंबन अजस्र महाकाय बीभत्स प्रचंड गदारोळात जो तो आपला मी माझा - दिपोटी