घुंगरू
पायातल्या घुंगरानी मला विचारले ….
“खरे खरे सांगशील? ...तू नाचतेस की मी नाचतो ?
तूच नाचतेस तर माझी जरुरी काय ?
जर मीच नाचतो तर तुझा उपयोग काय ?
केव्हा केव्हा अशीच श्रांत उगाचच बसलेली असतेस …
माझ्याकडे नजर जाताच …
सारी सारी फुलून येतेस !
माझ्यासवे तू आणि तुझ्यासवे मी ..
मग नाचच नाच होतो …
तू तू नसतेस ..मी मी नसतो …..”
प्रश्न माझेच घुंगरानी विचारलेले ….
नाच होतो तेव्हा नेमके काय होते ?
मिसळपाव