Skip to main content

सायकोसोशल

लेखक वनफॉरटॅन यांनी सोमवार, 19/02/2018 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
Jason, you're too fucking metal man Too metal for your own good You guys want some more don't ya we're just getting warmed up now man कुठल्याही समाजाचे आखणीबद्ध नियम, संकेत, परंपरा ह्यांचा दरवेळी बऱ्याच लोकांना त्रास होत असतो. संगीताचंही तसंच आहे. आत्तापर्यंतच्या सर्वमान्य असलेल्या संगीतातले बरेचसे नियम पायदळी तुडवून एक प्रकार निर्माण झालेला आहे. रॉक नवीन होतं तेव्हाही तेच. रॅप, हिप-हॉप, फंक आणि ब्लूजचंंही बरचसं तसंच. फरक इतकाच, की समजाची 'अमान्यता' ह्यांनी फाट्यावर मारली.

वलय (कादंबरी) - प्रकरण १३

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 19/02/2018 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १२ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42012 --- प्रकरण 13 आठ दिवसांनी कारने रागिणी हॉस्टेलवर गेली. सोनी बाहेरच कट्ट्यावर सिगारेट पित बसली होती. “ओह माय गॉड सोनी. तू सिगारेट प्यायला लागलीस? सो बॅड!” सोनी उठून उभी राहिली पण तीने सिगारेट पिणे चालूच ठेवले आणि निराशेने ती म्हणाली, “केव्हा आलीस? खूप वेळ लावलास या वेळेस रागिणी?” “हो. मी आता सूरज सोबत त्याच्या फ्लॅटवर शिफ्ट होणार आहे. लिव्ह इन रिलेशनशिप! त्याने मला एक कारसुद्धा भेट दिली आहे! बाहेर उभी आहे.” सोनी जवळ कट्ट्यावर बसत रागिणी म्हणाली. “वाव! ग्रेट.

सोसायटी प्रश्न २०१८

लेखक एकुलता एक डॉन यांनी रविवार, 18/02/2018 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी पुण्यात ऑगस्ट २०१२ मध्ये फ्लॅट घेतला ९ फ्लॅट ची अपार्टमेंट अग्रीमेंट तो sale झाली होती फक्त २०१४ मध्ये अपार्टमेंट डीड पण २०१२ पासून चैर्मन महिना मेन्टेन्स घेत आहेत ,पावती देत नाहीत ,काय करावे ? खरड वहीच्या चर्चेतून धागा बनत आहे कृपया डॉक्टर साहेब व बाकी साहेब यांनी मार्ग दर्शन करावे

वेदांग शिरोडकर

लेखक arunjoshi123 यांनी शनिवार, 17/02/2018 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रारंभ: एच् ब्लॉक, रुम नंबर ११७. हॉस्टेलच्या ४-५ मजली इमारतीच्या तळमजल्यावर लोखंडी जाळीच्या गेटपासून पहिलीच रुम मी पसंद केली होती. भूकंप झाला तर सर्वात अगोदर इमारतीपासून शक्य तितक्या दूर धूम ठोकता यावी असा माझ्या लातूरकडच्या भूकंपकंपित मनाचा हिशेब त्यामागे होता. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठवाड्याचा कोटा कमी असल्यानं त्यामानानं चांगले मार्क असूनही मला उशिरा, म्हणजे दुसर्‍या यादीत, १-२ महिन्यांनी, हॉस्टेलरुम अलॉट झाली होती. रुमच्या लोकेशनवर मी खुष असलो तरी मात्र तिथला व्यत्यय नि वर्दळ यांच्यामुळं शिरोडकरला ती आवडत नसे.

पुन्हा एक स्वातंत्र्यासाठी..!!

लेखक परशुराम सोंडगे यांनी शनिवार, 17/02/2018 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
***************** अजून एका स्वांतञ्यासाठी....!! ************************* मातीची महती गात. तुक्याचे अभंग घोकत. रक्ताचं पाणी करतं नुसता घाम गाळत राहूनचं रान हिरवं गार करायचं पण मातीचं तरी मोल असत का आमच्या जिण्याला तुमच्या बंगल्यातल्या कुत्र्या इतकं ही नशिबवानअाणि महत्वाचं अाम्ही असू नाही तरी या देशाचा शेतकरीराजा अाहे असं समजून हा देश क्रषीप्रधान अाहे म्हणून नुसत्या टिरी बडवून का घ्यायच्या? शेती तंत्रज्ञान , नवीन शोध,कार्यशाळा वैगेर असे खास थाट करून भाषण छान होतील पण रान नसतात पिकत अशा क्रत्रीम अवसानाने अाणि हे समजून घ्या तज्ञाच्या मेंदूला राबवून नाही निघत घाम नि रक्ताचे ही नाही होत पाणी घ

मूठ / कर्ज

लेखक संदीप-लेले यांनी शुक्रवार, 16/02/2018 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
मूठ झाकली मूठ म्हणे सव्वा लाखाची दाबली मूठ ती मात्र तिजोरी कुबेराची कर्ज अर्जावर अर्ज तरी नाही गरिबाला कर्ज हात करा ओले मिळेल अर्जाशिवाय कर्ज

अनवट किल्ले २७: राणी लक्ष्मीबाईचा माहेरचा वारसा, पारोळा ( Parola )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 16/02/2018 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
"मै मेरी झांसी नही दुंगी" हा बाणेदार उदगार काढणारी मर्दानी झाशींची राणी उर्फ मनकर्णिका तांबे ह्या मुळ पारोळा या गावच्या. याच गावात खंदकांनी वेढलेला बळकट भुईकोट आज काहीश्या पडीक अवस्थेत उभा आहे. याच भुईकोटाची या धाग्यात माहिती घेणार आहोत. केळी, सोन्याच्या पेठा आणि चित्रपटांच्या वितरणाचे केंद्र अश्या विवीध कारणासाठी प्रखात्य असणार्‍या जळगाव जिल्ह्यातून धुळे-नागपुर महामार्ग जातो. याच महामार्गावर धुळे व जळगाव जिल्ह्याच्या मध्यभागी पारोळे गाव वसलेले आहे. पूर्वी या गावातील रस्त्यावर अधूनमधून पिंपळाचे अनेक ' पार ' ओळीने बांधलेले दिसायचे.

काही त्रिवेणी रचना...

लेखक राघव यांनी शुक्रवार, 16/02/2018 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
सहज विचार करतांना उतरलेले हे काही शब्द.. ============ सांगायचं कसं अन् लिहायचं कसं.. मनांतलं शब्दांत मांडायचं कसं? त्या अग्नीपंखाचा तुटक्या पंखांना सवाल, "आता उडायचं कसं?" ============ लहान मुलं आणि त्यांची निरागसता.. वेड लावणारं त्यांचं निष्पाप मन.. पारिजाताच्या फुलांसारखं नितळ विश्व! ============ प्रयत्नांची कास सोडू नये.. कामनांची आस धरू नये.. ईच्छा अर्पण करावी.. निष्काम कर्म करावं.. गुंतागुंत आणि परस्परविरोध ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात! ============ केवढाली कपाटं आणि पुस्तकांची आरास..
काव्यरस

बक्षिस समारंभ (शतशब्दकथा)

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 16/02/2018 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
अरे बापरे..एवढी सगळी प्रशस्तीपत्रके ? कमीतकमी अर्धा तास तरी लागेल हा सगळा गठठा संपायला... आयोजकांनी हे आधी सांगायला नको का ? सगळीकडची हीच बोंब. ..नियोजन म्हणून काही नाहीच. आणि एवढं करून मिळणारे मानधन किती ? सात हजार फक्त. कोण कुत्र तरी विचारत का सात हजारला .. छ्या.. वेळ काही संपतच नाही आजचा. कधी एकदा हॉटेलवर जाऊन झोपतो अस वाटतयं.. ................................................................................ माहितेय आज मला बक्षिस मिळणार! फक्त अर्धा तास राहिला आता.. आला की नंबर माझा..धावत जाऊन बक्षिस घेतो आता.. बापरे..यात चक्क पन्नास रुपये आहेत ..एवढ्या पैशाच काय करावं ?

॥ रमू नको या जगात ॥

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 16/02/2018 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
रमू नको या जगात दुःखांचा राजा तू दुःख कनवटीला असे घे दुःखांची मजा तू विरह असो , प्रेम असो असो प्रेमाचा भंग तो कुणीही तुला काही म्हणो तू मात्र अभंग हो जळो कुणी , कुणी मरो जगण्यात काय ते जळीस्थळी दुःख ज्याला त्याला मरण्यात काय ते दुःख दुःख दुःख कुणी पहिले नसेल ते सुख सुख सुख कुणी स्पर्शिले नसेल ते वंद तू धर्मास या कर्माचे मर्म जाण मोक्ष असा ना मिळतो विरहाचे कर्मकांड अंतरी तू शोध घे विरहाचे काय ते सोड वस्त्र देहाचे आत्म्याचे पाय ते उडून जा किरणासम भेद घे तू आत्म्याचा मोक्ष प्राप्त होई तुज आवाज हा परमात्म्याचा सिद्धेश्वर विलास पाटणकर C
काव्यरस