Dead Man's Hand - ४
रात्रीचे आठ वाजून गेले होते. सांताक्रूजच्या त्या पबमध्ये बर्यापैकी गर्दी होती. अर्थात त्यात तरुणाईचा जास्तं भरणा होता. जवळपास प्रत्येकजण आपल्या पार्टनर बरोबर किंवा मित्रं-मैत्रिणींच्या ग्रूपबरोबर तिथे आलेला होता. पबच्या एका बाजूला असलेल्या डान्सफ्लोअरवर अनेकजण बेधुंदपणे नाचत होते. पबचा डीजेही तरुणाईची नस बरोबर ओळखून एकापाठोपाठ एक गाणी वाजवत होता आणि त्याला दाद देत प्रत्येकजण मनसोक्तं थिरकत होता. काहीजण आरामात ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते आणि मधूनच उठून डान्सफ्लोअरवर एखादी चक्कर टाकत होते. वातावरणात वेगळाच उत्साह आणि सळसळता जोश भरुन राहीला होता.
मिसळपाव