Skip to main content

गाडीच्या इंजिनात शिरणारे उंदीर कसे रोखावेत?

लेखक सतिश पाटील यांनी बुधवार, 28/02/2018 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात मी १० -१२ दिवस बाहेर असल्याने गाड़ी पार्किंग मधेच उभी होती, हीच संधी साधून २ लहान डुकराएवढ्या उंदीर/घुशिंनी गाडीच्या इंजिनात संसार थाटला होता. गाड़ी चालू होत न्हवती म्हणून बाजुच्या ग्यारेज मधून मेकनिक आणून तपासले असता समजले की, उंदीर मामाने वायरिंग कुरतडली आहे. ब्याट्रीतुन इंजिनला पॉवर सप्लाय होत न्हवता. पण धक्का मारून चालू होत होती. दुसरया दिवशी ऑफिसला सुट्टी घेउन ग्यारेज मधे काम करुण घेतले. त्यानंतर व्यवस्थित चालली.

मराठी दिन २०१८: समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता.... (उखाणे)

लेखक नूतन यांनी बुधवार, 28/02/2018 10:24 या दिवशी प्रकाशित केले.

समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता....

कथा, कादंबऱ्या, काव्य, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, लघुनिबंध, नाटकं, लोकसाहित्य, समीक्षा इत्यादी विविध प्रकारांचा साजशृंगार चढवून आपली मराठी भाषा सजली आहे, नटली आहे. पण बहुधा फक्त महाराष्ट्रात आणि मराठी संस्कृतीतच आढळणाऱ्या एका प्रथेत सादर होणारा साहित्य प्रकार म्हणजे - शुभप्रसंगी उखाण्यात नाव घेणं. साहित्य प्रकार म्हणून जरी याची विशेष गणना होत नसली, तरीही मराठी भाषेच्या साजशॄंगारातील हा एक छोटासा पण सुबक दागिना. उखाण्यात पतीचं नाव घेण्याची सुरुवात सहसा मुलीच्या लग्नापासून होते. (अर्थात नाव घेण्यात पुरुषांचाही समावेश असतोच).

मराठी दिन २०१८: माले का मालूम भाऊ? (झाडीबोली)

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 28/02/2018 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
माले का मालूम भाऊ? 'कोनं बगरवलन बे माह्या सपनाईचा कचरा? डुंगा करूनस्यानी ठेवलो होतो जाराले सोपा जाते. कोनं बगरवलन बे?' माले का मालूम भाऊ! 'साला सपना त सपना सपन्याचा कचरा बी डबल मेहनत कराले लावते!' येवड्या जल्दीमदि कोटी चाल्लास गा? पिक्चर पावाले कोनाय हिरोहिरोईन? भाई अना कतरीना मानुसमाऱ्या वाघ हिंडून रायला ना बे? माले का मालूम भाऊ! टायगर त कसाबी जिंदा रायल, पर तू जिंदा रायसीन का? 'गारा पडतीन म्हून माहीत नोहोता माहित राहून बी का तोफ झाडला रायता मना' अगा बंड्या, गारा काहून पडते गा?' ​'​माले का मालूम भाऊ!​'​ अबे विकास!
काव्यरस

वलय (कादंबरी) - प्रकरण १७ आणि १८

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 28/02/2018 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १६ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42100 प्रकरण 17 सकाळी दहा वाजता आईने बनवलेलं भाजणीचं थालीपीठ हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यासोबत खातांना राजेश आईला म्हणाला, “मस्त झालंय थालीपीठ आणि ठेचा! आणि सोबत ताजं दही असल्याने झकास बेत आहे. आता दुपारी तीनेक वाजेपर्यंत तरी भूक लागणार नाही. मी नाश्टा झाला की धर्मापूरला जाऊन येतो जरा.” “अरे राजेश! काय नुसता फिरत असतोस? आजच्या दिवस आराम केला असतास, मग उद्या गेला असतास. आज आपल्या गावातल्या नदीवरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात संध्याकाळी जाऊ आपण!” “आई!

माझ्या आठवणी

लेखक प्रणया यांनी मंगळवार, 27/02/2018 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
मिटलेल्या नयनांची ओलावते पापणी आसवांनी सांगितले न दिसे तू मज या क्षणी मग आठवणींचा पाऊस पडू लागला मनी अन् अधरांवर हास्याची अलगद सुरु झाली पेरणी चालले होते चार पाऊले, पावलांवर तुझ्या ठेऊनी न उरले तुझे असे काही, मज तुझ्यात सामावुनी मग वाटले, तुझ्या निश्चयी पाऊलखुणांना साथ देत होती माझ्या पैंजणांची गाणी न पाहता मज चालताना, काय पाहिले मागे वळूनी न बोलताच तेव्हा, शब्दांचे काम केले भावनांनी काय उमगले बोलणे तुझे, ना जानो मज त्यावेळी पण वाटले हाती न घेता हात, जोडले भाग्यरेखांनी पाहता हे सारे, पारव्याची कुजबुज वाऱ्याच्या कानी कोणते नाते यांचे, विणले जात आहे रेशीमधाग्यांनी समजावे सारे मज, एवढ्यात नाही

माय गे माय...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 27/02/2018 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळपासूनच्या कौतुकाने हरखलेली माय मराठी दमून भागून जरा ओसरीवर टेकली. डोक्यावरचं संदेशांचं, भाषणांचं, योजनांचं ओझं उतरवलं. गळ्यातले हारतुरे काढून बाजुला ठेवले. पिशवीतला श्रीखंडाच्या गोळ्यांचा डब्बा पुन्हा घडवंचीवर ठेवत पुटपुटली, "एवढा मोठा सोहोळा झाला ,सगळी पोरं जमली पण नातवंडं काही भेटली नाहीत. "
काव्यरस

मला भेटलेले रुग्ण - १३

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 27/02/2018 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42057#new हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? .....

वलय (कादंबरी) - प्रकरण १६

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 27/02/2018 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १५ ची लिंक: http://www.misalpav.com/node/42084 (सूचना: वाचकांच्या वाढत्या मागणीमुळे आज माझ्या वाढदिवसापासून या कादंबरीचे दर सोमवारी आणि शुक्रवारी ऐवजी दररोज एक प्रकरण प्रकाशित करण्यात येईल) प्रकरण 16 ही घटना राजेश जवळ जवळ विसरून गेला. आर्ट्सला शिकत असतांना राजेशने सहज म्हणून एक छोटी थरारक आणि रहस्यमय कादंबरी लिहिली: “खेळ हा नशिबाचा!. त्याचे हस्तलिखित त्याने एका मुंबईच्या नवीनच सुरु झालेल्या दिवाळी अंकाला पाठवले (“कथामंथन”). काही दिवसांनी संपादक विभागाचे पत्र त्याला आले.

इंग्रजी कादंबरी प्रकाशनासंदर्भात माहिती आणि मदत

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 27/02/2018 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स, बर्‍याच दिवसांनी भेट होतेय. तसे मी वाचन मोडमध्ये असतोच आणि काही धाग्यांवर प्रतिक्रियादेखील देत असतो पण आताशा जरा माझा मिपावरचा वावर कमी झालेला आहे. मागील वर्षी मार्चमध्ये आमच्याघरी बाळराजांचे सुखद आगमन झाले. ठरलेल्या तारखेच्या दोन महिने आधीच बाळराजांचे आगमन झाल्याने आम्हाला जवळपास दीड महिना अतिदक्षता विभागात बाळाची काळजी घ्यावी लागली. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत मिपावरच काय इतरत्र कुठेच फारसे जाता आले नाही. असो. आजच्या या धाग्याचे प्रयोजन मिपावर इंग्रजी कादंबरीच्या प्रकाशनासंदर्भात काही मदत मिळू शकते का हे आहे.