मराठी दिन २०१८: इरसाल म्हणी (मालवणी)
मालवणी माणूस खट म्हणूनच ओळखला जातो. तशीच त्याची भाषा. सरळ शब्दात बोलले तर मालवणचा खरोखरच कॅलिफोर्निया होईल की काय अशी त्याला भिती वाटत असावी. तर आज सादर करतोय अस्सल मालवणी इरसाल म्हणींचा खजिना. कुठेकुठे थोड्या वाह्यात वाटतील पण प्रगल्भ मिपाकर समजुतीने घेतील ही खात्री आहे.
१ जळ्ळो तुझी पिठी, घोवान धाडली चिठ्ठी
त्याचं काय आहे, एकेकाळी कोकणात घरोघरी चाकरमानी असायचाच. बायका मुलं गावाला आणि चाकरमानी नोकरीसाठी मुंबै लागले. गणपती आणि शिमग्याला फक्त घरी येत असे. त्याची जी काय खुशाली कळायचीची ती पत्र किंवा मनीआर्डरीच्या मागच्या जागेतून.
मिसळपाव
सांज कोवळी येते का
गंध अाठवांचा घेऊन
उमटीत जाते मनी वेडी
हळवी स्वप्नसुरांची धून
पदर हा रातीचा ढळता
सांडे उरात चंद्र नभीचा
ओठानीच कसा चूंबावा
प्राण विरता रातराणीचा
झरे अशी गात्रागात्रातूनी
तू थरथरती पहाट ओली
विरून क्षितिजाच्या रेषा
आभाळ चुंबते धरा गाली
परशुराम सोंडगे,पाटोदा
sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com
prshuramsondge.blogsopt.com