चंद्रगड ते आर्थरसीट ट्रेक ( Chandragad To Aurtherseat Point )
पर्यटकांचे आवडते थंड हवेचे ठिकाण, महाबळेश्वर. इथे यायचे आणि महाबळेश्वर पठाराच्या सर्व बाजुच्या टोकाला उभारलेल्या पॉइंटवर जाउन सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा हि एक प्रथाच झाली आहे. या सर्व पाँईटपैकी पर्यटकांचा सर्वाधिक ओढा असतो, तो ऑर्थरसीट पाँईटला. मुळात सह्याद्रीची ७०० मीटर उंची आणि त्यावर वसलेले साधारण १३७२ मीटर उंचीचे महाबळेश्वर पठार. हि संपुर्ण उंची अनुभवायची असेल तर एकच सुयोग्य जागा, म्हणजे "ऑर्थरसीट पाँईट". एकाच वेळी रायगड, पुणे आणि सातारा असे तिन्ही जिल्ह्याचा परिसर ईथून पहाता येतो. इथल्या सज्जावर उभारल्यास खाली सावित्री नदीचा उगम आणि एका बाजुला पिटुकला "चंद्रगड" दिसतो.
मिसळपाव