Skip to main content

कविता महाजन: शैलीदार लेखिका

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/10/2018 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे दिनांक 27-09-2018 च्या संध्याकाळी झी चोवीस तासवर ब्रेकींग न्यूज येत होती : लेखिका कविता महाजन यांचे न्यूमोनियाच्या आजाराने निधन. प्रचंड हादरलो. अस्वस्थ झालो. कवयित्री कविता महाजन यांच्याशी पहिली भेट झाली तेव्हा त्या पांढर्याड साडीत आणि गळ्यात रूद्राक्ष माळा घातलेल्या तरूणी होत्या. दुसरी भेट 2000 साली बडोद्याला भाषा केंद्रात झाली. कविता महाजनचं ‘वारली लोकगीबतं’ हे संकलीत पुस्तक आणि माझं ‘आदिम तालनं संगीत’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन बडोद्याच्या भाषा केंद्राच्या कृतीसत्रात सोबतच झालं. यावेळी साहित्य आणि कवितेवर आमच्या अनौपचारिक गप्पा झाल्या होत्या.

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ७

लेखक आदित्य कोरडे यांनी सोमवार, 01/10/2018 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक भाग १ https://www.misalpav.com/node/43088 भाग २ https://www.misalpav.com/node/43118 भाग ३ https://www.misalpav.com/node/43144 भाग ४ https://www.misalpav.com/node/43170 भाग ५ https://www.misalpav.com/node/43224 भाग ६ https://www.misalpav.com/node/43298 मागील प्रकरणात आपण म्हट

पितृ"पक्षी"

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 30/09/2018 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझा कावळा अजब जीवखड्याशी खेळतो इहलोकीच्या अंगणी परलोक धुंडाळतो माझा कावळा गणिती तेरा आकडे मोजतो आठ नख्यांच्या अष्टकी पंचप्राण मिळवितो माझा कावळा तत्वज्ञ गुह्य विश्वाचे जाणतो जे जे पिंडी ते ब्रह्मांडी पिंड फोडून सांगतो पैलतीरी कोकताना हळवा का होसी काऊ जीवखड्याची रे माझ्या आज नको वाट पाहू
काव्यरस

समाधान कुठे सापडेल हो ?

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 30/09/2018 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
समाधान कस कुठे सापडेल सांगता येत नाही राव. कधी ते निसर्गात सापडत तर कधी पार निर्मानुष्य नसलेल्या देवळात मिळत. हे समाधान खुप वेगळे असते. नाकात उदबत्ती धूप कर्पूर मिश्रीत सुगंध, डोळ्याला पार गाभारा भरून राहीलेली मूर्ती शितल, कानात येते वेळी वाजवलेल्या घंटेचा रेंगाळणारा नाद ब्रम्ह, मध्येच छेदणारा दूर कुठल्यातरी पक्षाच्या किलकिलाट अगदी अकृत्रिम, पायाला स्पर्शणारा दगडी फर्शीचा ठंड़ावा, जिभेवर कर्पूर मिश्रीत तीर्थाचा शिडकावा कान, डोळे, नाक, स्पर्श, चव सर्व एकाच वेळी सुखावतात.

स्ट्रॉबेरी सालसा

लेखक जुइ यांनी रविवार, 30/09/2018 05:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १. १/२ किलो ताज्या लाल चुटुक पिकलेल्या स्ट्रॉबेरीज २. अर्धे मोठे लिंबू ३. एका लिंबाची किसलेली साल ४. गोड छोटी ढब्बू मिरची केशरी रंगाची ५. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ६. कांद्याची पात आणि त्याचा कांदा -१ काडी ७. चवीपुरते मीठ आणि ताजी मिरपूड कृती: प्रथम स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुऊन चिरून घ्याव्यात. कांद्याची पात आणि कांदा बारीक चिरावा. तसेच ढब्बू मिरची बारीक चिरून घ्यावी. एका मोठ्या पातेल्यात चिरलेल्या स्ट्रॉबेरीज घ्याव्यात. त्यात लिंबाचा रस आणि लिंबाची साल घालावी.

शार्प ऑब्जेक्टस्

लेखक एमी यांनी शनिवार, 29/09/2018 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
Persephone : Daughter of Demeter and Zeus. She is Greek Goddess of Spring and also the Queen of the Underworld. Her story is one of abduction, love, grief, and celebration. === ओसाड रस्ते, रिकामे मॉल, ग्राफिटी केलेल्या भिंती, तुरळक कुठेतरी दिसणारी, वारा घेत बसलेली एखाददुसरी व्यक्ती. अशा सुनसान गावातुन दोन लहान मुली स्केटिंग करत चालल्या आहेत. एक टॉमबॉईश आहे हॉटपॅन्ट-टीशर्ट, छोटेछोटे केस. दुसरी अगदी तिच्या उलट, नाजूक फुलासारखी, फिकट रंगाचा फ्रॉक, दोन बो वगैरे. ती विचारते "आपण घराबाहेर हुंदडत फिरतोय हे आईच्या लक्षात नाही ना येणार?".